कॉँग्रेसमुक्त भारत का नको?

Submitted by आशुचँप on 24 May, 2019 - 07:18

निकालाची रणधुमाळी संपली आहे आणि भाजपने निर्विवादपणे कॉँग्रेस आणि अन्य पक्षांना भुईसपाट केले आहे. २०१४ पाठोपाठ २०१९ मध्येही भाजप असा काही दणका देईल असे मुळीच वाटले नव्हते.
भाजप कॉग्रेसपेक्षा जास्त सीट्स घेणार यात शंका नव्हती, पण इतक्या मोठ्या फरकाने धूळधाण उडेल याची मुळीच शक्यता वाटत नव्हती.
याला कारणे अनेक होती, त्या नोटबंदी, राफेल घोटाळा, निवडणूकीआधी भ्रष्ट्राचारी नेत्यांच्या नावाने केलेली आगपाखड पण पाच वर्षांत त्यांच्याविरुद्ध काहीही न करणे, मंत्रीपदी असूनही बेताल बोलणे, खुद्द मोदींचे अनेक हास्यास्पद दावे, घटक पक्षांशी चाललेली हाणामारी, पार अफझालखान वगैरे ऐकून घेऊनही शिवसेनेच्या गळ्यात गळा घालणे, पुलवामा संदर्भात अनेक उलट सुलट दावे या सगळ्याचा परिपाक अंतिमत भाजपला महागात पडेल असे वाटत होते पण तसे काही झाले नाही.
जनतेने सर्व मुद्दे निकालात काढत मोदींच्या ओंजळीत भरभरून दान टाकले. यावर आज अनेक तज्ज्ञ लोकांची मते वाचली असता असे जाणवत आहे की समर्थ पर्यायी पक्ष नसणे हे भाजपच्या विजयात फार मोठे योगदान ठरले.
कॉंग्रेसपक्षाची गोंधळाची स्थिती, राहुल गांधी यांनी गेल्या पाच वर्षात आपल्या वक्तव्यात आणि राजकीय समजात बरीच चांगली प्रगती घडवून आणली पण अजूनही अनुभवी मोदींसमोर त्यांची डाळ शिजली नाही. अद्याप राहूल गांधी यांना मोठी मजल मारावी लागणार आहे, बरेच काही शिकावे लागणार आहे, प्रियंका गांधी म्हणलं तर आहेत म्हणलं तर नाहीत अशा दोलायमान स्थितीत आणि एकूणच धरसोड राजकारण यामुळे भाजपचे फावले असे म्हणायला हरकत नसावी.

आणि आता विजय मिळताच भाजप नेत्यांनी आणि समर्थकांनी विजयोन्मादात डरकाळ्या फोडण्यास सुरुवात केली आहे की कॉँग्रेसमुक्त भारत म्हणून. आणि एकेकाळचा मी कट्टर भाजप समर्थक असूनही ही बाब अतिशय चिंतेची वाटत आहे.

सत्ताधारी पक्ष कुठलाही असु दे त्यांना कायम धारेवर धरणारा आणि चाकोरीत रहायला भाग पाडणारा समर्थ विरोधी पक्ष असणे हे निरोगी लोकशाहीचे लक्षण आहे. गेली पाच वर्षे निष्प्रभ विरोधी पक्ष म्हणून कॉँग्रेसने काहीही केले नाही याचीच फळे त्यांना २०१९ ला मिळाली आहेत. मोदी नकोत तर दुसरे कोण हा प्रश्न मतदारांना पडला हेच कॉंग्रेसचे दारूण अपयश आहे. आणि हे अपयश कायम रहावे ही भाजपची इच्छा असणार हे उघड आहे.

सरकारला नुसते प्रश्न विचारणे किंवा भाषणात त्यांचे दावे फोल असल्याचे सांगणे इतक्याने सत्ताधारी पक्ष नमत नाही हे आता पाच वर्षात उघड झाले आहे. आता त्यामुळे कॉँग्रेसला तळागाळापासून बांधणी करत येत, नव्या दमाच्या तरुण पिढीला संधी देत आणि ज्या राज्यात मतदारांनी पसंती दिली आहे चांगले भरीव काम करून दाखवणे गरजेचे आहे.

सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने देखील कॉँग्रेसचे भवितव्य टिकून राहणे आवश्यक आहे. जेव्हा केव्हा कुठल्या देशात एखाद्याच पक्षाला अनिर्बंध सत्ता मिळते तेव्हा त्याची परिणीती कशात होते याचा इतिहास साक्ष आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपला एक जरब असावी यासाठी एक समर्थ पर्याय म्हणून कॉंग्रेस असणे ही तमाम भारतीय लोकांची गरज आहे. काही लोकांना हे पटणार नाही कदाचित कारण जोवर बहुमत आपल्या बाजूने असते किंवा आपण बहुमताच्या बाजूने असतो तेव्हा सगळे गोड गोड छान छान वाटते, त्याचा जेव्हा बडगा बसायची वेळ येते तेव्हा उशीर झालेला असतो आणि मग अरुण्यरुदन करून काहीही उपयोग नसतो.

विशाल भारद्वाजच्या चित्रपटात एक संवाद आहे. हमेशा संतुलन बने रहना जरुरी है, आग के लिये पानी का डर बना रहना चाहीये

त्याप्रमाणे सत्ताधीश भाजपला आणखी उन्मत्त न होऊ देता त्यांना सतत टांगती तलवार डोक्यावर ठेवणे हे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे आणि यासाठी कॉंग्रेसला आमुलाग्र बदल घडवून आणावा लागणार आहे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असे म्हणून चालणार नाही. ही पाच वर्षे त्यांच्यासाठी आणि त्यांच्याकडून काही चांगले भरीव अपेक्षीत असलेल्या जनतेसाठी कसोटीची आहेत.

तोवर अशी आशा आणि प्रार्थना करुया की भाजप सरकार या विजयाचा आपल्याला हवा तो अर्थ काढून मतदारांना गृहीत धरणार नाही. मतदारांनी जो विश्वास दाखवला आहे तो योग्य ठरवेल आणि देशाच्या भल्यासाठी काम करेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुकट मिळालेल्या कोथिंबिरीच्या जुडीवर समाधान मानावे , कसं ?

भाजपाच्याही स्वतःच्या 20 च जागा वाढल्या आहेत, जीडीपीच्या भाषेत बोलायचे तर भाजपा 8 % वाढ अन आमची काँग्रेस 20 % वाढ

Proud

बरेच लोक म्हणतात की काँग्रेस नष्ट होईल, पण काँग्रेस नष्ट होणं हा देशाला शाप असेल.
काँग्रेस जरी संपली तरी भाजपासमोर कडव्या प्रादेशिक अस्मिता असलेले पक्ष उभे राहतील, आणि त्यांनी समजा भाजपला हरवून लोकसभेत कडबोळी तयार करणे हे देशासाठी अधिक घातक असेल.
तमिळनाडू डीएमके आणि बंगालमध्ये तृणमूल याची चुणूक दाखवतय, पण उद्या सपा बसपालाही जास्त मते मिळाली, तर तर देशाचा विकास तर सोडा पण प्रत्येकाला आपली खुर्ची मिळवायची असेल, आणि हे लोक देशाला जास्त घातक ठरू शकतात!
देशाचा चा निकाल संपूर्ण देशात अस्तित्वात असलेल्या पक्षांनीच करावा, आणि विधानसभेचे निकाल त्या त्या राज्यात असलेल्या प्रबळ पक्षानेच करावा हे उत्तम.

हायझेनबर्ग - उत्तम पोस्ट, मला जे म्हणायचं होतं ते उत्तमरित्या मांडल्याबद्दल धन्यवाद.

we have to trust him as we have done before!

अहो, २०१४ सालापासून हेच करत आलोय. मी धाग्यातही लिहीले आहे की एकेकाळी मोदी हाच देशाचा तारणहार आहे असे समजून आलेल्या लाटेत ज्या भाबड्या मतदारांनी भाजपाला मतदान केले त्यात मीही होतो. मलाही सुरुवातीला वाटत होते की नोटबंदी म्हणजे मास्टर स्ट्रोक आहे. नंतर हळूहळू वस्तुस्थितीची जाणीव येत गेली आणि भ्रमनिरास होत गेला. हा माणूस एकदा जरी म्हणाला असता, बाबांनो माझा नोटबंदी करण्याचा उद्देश चांगला होता पण तो नीट राबवता आला नाही आणि सगळ्या जनतेला माझ्यामुळे त्रास झाला, तरी भरून पावलो असतो, पण तसे कुणीही कधीही म्हणाले नाही. उलट तो निर्णय कसा बरोबर होता आणि त्यावर शंका घेणारे कसे देशद्रोही आहेत हे सांगणाऱ्यांची चढाओढ सुरु झाली.

यापूर्वीचे सरकार चुकीचे निर्णय घेत नव्हते असे नाही, पण चुकीच्या निर्णयावर देशभक्तीचा मुलामा पसरण्याची भाजप सरकारची जी खेळी आहे ती महाभयंकर आहे. अद्याप सुदैवाने खूप बिकट नाहीये परिस्थीती आणि होऊही नये अशी इच्छा आहे.
इथे मला हिटलरशी तुलना करायची नाहीये पण शेवटपर्यंत हिटलर बरोबर होता असे मानणारी जनता होती. त्याने घेतलेले निर्णय चुकीचे आहेत हे कित्येकांना धडधडीत दिसत होते पण त्याविरुद्ध कोणी बोलत नव्हते कारण तोवर हिटलरचे देशप्रेम, त्याचे संसार न करता देशाला वाहून घेणे, देशाला राष्ट्रवादाचा सहारा घेऊन एक नवी दिशा देणे हे प्रोपगेंडामधून इतक्या प्रभावीपणे पसरवण्यात आले होते की हिटलरला विरोध म्हणजे देशाला विरोध अशी परिस्थिती झाली होती.

हा माणूस लोकशाही मार्गानेच सत्तेवर आला. आल्यावर त्याने कम्युनिस्ट आणि सोशलीस्ट पक्षाचे नामोनिशाण मिटवून टाकले. त्या पक्षांनीही एकत्र येऊन नाझी पक्षाला विरोध न करता एकमेकांत भांडत बसले आणि फायदा हिटलरचा करून दिला.

मोदी हे दुसरे हिटलर नाहीत, होऊ नयेत आणि होणार नाहीत अशी आशा आहेच. पण हिटलर होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण होऊ देणे धोक्याचे आहे इतकेच सांगणे आहे.

मोदींनी किंवा भाजपने चांगले निर्णय घेतले, आश्वासक वातावरण निर्माण केले तर कोणाला आवडणार नाही. केवळ मोदीविरोध आहे म्हणून मी त्यांना नावे ठेवणार नाही. त्यांनी चांगले केले तर त्यांचे तोंडभरून कौतुक करणारच.

ना मी भाजप भक्त ना मी कॉंग्रेस चमचा. मी एक सर्वसामान्य नागरिक आहे आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की जो कोणी सत्ताधारी पक्ष असेल त्याने नागरिकांच्या हितासाठी काम करावे आणि विरोधी पक्षाने ते तसे काम करत राहण्यासाठी दबाव टाकत रहावा.

यांच्यापेक्षा हे वाईट म्हणून त्यांना निवडून देण्याची परिस्थिती न येता, यांच्यापेक्षा हे अजून चांगले काम करतील म्हणून आता निवडून देऊ अशी परिस्थिती यावी असा भाबडा आशावाद माझ्याकडे अजूनही आहे आणि तो तसाच रहावा अशी अशी इच्छा आहे.

२०२४ ला खरेच निवडणूक होईल का ? सध्याचे आंतर राष्ट्रीय अस्थिरता / जागतिक महायुद्धाचा येणाऱ्या काळातील आवाका पाहुन कदाचित राष्ट्रपती राजवट असेल

नवीन Submitted by वीक्ष्य on 24 May, 2019 - 21:36 >>>

हे सर्व भीतीदायक प्रकार भोंदू फुरोगाम्यांच्या स्वप्नात घडत असतात. 2014 सालीही बरीच भविष्यवाणी करत होते, मग 2019 ची निवडणूक जाहीर झाली तेव्हा तोंडावर आपटले. निवडणुकीचा निकाल लागल्यावर एक दिवसासाठी बिळात बसले नि आजपासून पुन्हा डराव डराव करू लागलेत.

सत्तेची चटक लागलेल्या इंदिरा गांधीने जे केले तेच पुढे मोदी करणार नाहीत कशावरून ?

नवीन Submitted by वीक्ष्य on 24 May, 2019 - 22:20 >>>

प्रत्येक व्यक्तीचे संस्कार वेगळे असतात. आधीपासून विलासी जीवन जगणार्यांना जनतेचे पैसे उधळले तर शरम वाटत नाही ( उदा. बंगाराम बेटे), पण गरिबीतून वर आलेल्या व 2002 पासून हिणकस शेरे व खोट्या केसेसमधून तावून सुलाखून निघालेल्या माणसाला सामान्य जनतेची नस व तिच्यासाठी काय चांगलं आहे ते समजतं. त्यामुळेच "गरिबी हटाव" सारखा 47 वर्षे चालणारा कार्यक्रम तो घोषित करत नाही व विरोधकांना सरसकट तुरुंगात टाकण्याऐवजी न्यायपालिकेवर विश्वास दाखवतो.

जोपर्यंत डावे,नाटकी धर्मनिरपेक्ष वाले बहुसंख्य असलेल्या उजव्या विचारसरणी chya लोकांवर गलिच्छ टीका करतील .
बहुसंख्य असलेल्या जनतेच्या श्रद्धा स्थानावर आघात करतील तो पर्यंत bjp हा पक्षच निवडून येईल .
जे सरकार मध्ये नसतील ते विरोधी पक्ष एक रित आहे म्हणून

चापलुसी मंडळींनी दीलेल्या प्रतिक्रिया अगदीच अपेक्षित आहे , आता सामान्य लोकांना शिव्या घालणारच मोदींना पुन्हा निवडून दिल्या बद्दल , कारण त्यांना अपेक्षित काही चमत्कार घडला नाही , पप्पू फेल हो गया वापस..मुळात काँग्रेस च्या एकूण थिंक टॅंक असू किंव्हा राजकारणी असू ह्यांची जनते बरोबरची नाळ तुटली आहे हे अजून समजलच नाही आहे , कित्त्येक राज्यांमध्ये भाजप ला ५०% पेक्षा जास्त मत आहेत , ती काय फक्त मोदींच्या नावावर नाही तर कामावर पण आहेत पण ह्यांना ते मान्य करायची नाही , काँग्रेस चे लोक अजून मान्य करणार नाही कि त्यांनी देशाच्या विकासाचा वारू कायम धरून ठेवला आणि गरिबांची प्रगती होऊन दिली नाही तो पर्यंत हे असेच राहणार..जरा जमिनीवर या आता तरी..नाही तर २०२४ ला फिर एक बार..

आशुचँप, मस्त लेख व तुमचे सर्व विचारही.... विशेषकरुन 'आग को पानी का डर बने रहना चाहिये' हा ओम पुरीच्या आवाजातला डायलॉग आठवला, अगदी खरंच...पण ते पाणी खरंच आग विझवण्याच्या ताकदीचं हवं एवढीच अपेक्षा.

मलाही कॉन्ग्रेसमुक्त भारत नको आहे. परन्तु अजुनही ईव्हीएम्वर सन्शय घेत रहिले तर खरोखरच तसे होईल. EVMs ही stand alone मशिने आहेत याचा अर्थ म्हणजे त्यान्चा आन्तरजालाशी सम्बन्ध नाही. तसेच ज्यानी मोदीन्चे भाषण ऐकले पण त्याचा अर्थ त्याना समजलेला नाही ते पण परत हरतील कारण ते जातपात करत बसतील व देशासाठी काही करणार नाही. सर्व पक्षानी हिन्दु-मुस्लिम-दलित असा भेदभाव करणे व votebank politics करणे सोडून द्यावे तरच देशाचे भवितव्य चान्गले राहिल.

अभूतपूर्व निकाल होते हे. गेले दोन दिवस थोडेफार पाहिले. जे हुकमी गोडवे गाणार नाहीत अशा एनडीटीव्ही मधल्या प्रणव रॉय वगैरेंचे आणि रवीश कुमार चे विश्लेषण पाहिले. प्रणव रॉय चे बर्‍यापैकी "माहिती देणे व विश्लेषण" स्वरूपाचे होते. . रवीश कुमारची मते पटतील/न पटतील पण त्याच्यासारख्या पत्रकारांची अत्यंत गरज आहे हे नक्की. यावेळेस मात्र त्याने एकदम लोकांना वॉर्न करत असल्यासारखे सांगितले, की तुम्ही वेगळ्या भारताची निवड केली आहे वगैरे. म्हणजे लोकांनी नक्की कोणाला निवडायला हवे होते, आणि मुख्य म्हणजे का निवडायला हवे होते वगैरे बद्दल आधी कधी "गाइडन्स" त्याने दिला होता का कल्पना नाही.

१९७७ च्या निवडणूकीपासून आत्तापर्यंत जनतेने अनेकदा प्रायोगिक तत्त्वावर दिल्यासारखी एकदा सत्ता विरोधकांकडे दिली. मात्र प्रत्येक वेळेस पुढच्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसला सत्तेवर आणले. यावेळेस मात्र सलग दोनदा भाजपला निवडले, आणि त्यातही पहिल्यापेक्षा दुसर्‍यांदा आणखीनच जास्त ठामपणे. अमेरिकेत ज्याला Double Down म्हणतात तसे. अनेक ठिकाणी ५०% पेक्षा जास्त मतदान भाजपला झाले आहे. हे इतके मतदान केवळ नेहमीच्या समर्थकांच्या जोरावर होउ शकत नाही. कुंपणावरच्या असंख्य लोकांनी काहीतरी विचार करून स्वतंत्रपणे ही निवड केली आहे. त्याची कारणे शोधायला बरेच लेख वाचले पण फारसे काही दिसले नाही. दिसले ते फक्त एकतर्फी लेख - आरत्या ओवाळणारे, नाहीतर जनतेला तुच्छ लेखणारे.

एक उदाहरण लिहीतो - काही महिन्यांपूर्वी मी पुण्याहून मुंबईला कॅब ने जात असताना जो ड्रायव्हर होता त्यानेच राजकीय विषय काढला. तो पुण्याचा नव्हता. मूळचा उस्मानाबाद जवळ कोठेतरी राहणारा, तेथे अजूनही शेती करत हे अ‍ॅडिशनल करणारा. तो सध्याच्या सरकारची तारीफ करत होता. त्याला पुढे सहज विचारले महाराष्ट्रातील सध्याचे सरकार बरे की आधीचे. तर तेथेही तो म्हणे हेच चांगले आहे. का, तर पूर्वी शेतीशी संबंधित काही अनुदान/सबसिडी घोषित कितीही झाली तरीही याच्यापर्यंत झिरपत येईपर्यंत जेमतेम दीड हजार हातात पडत, ते ही बरेच हेलपाटे वगैरे घालून मग. तो म्हंटला गेल्या वर्षी थेट अकाउण्ट मधे ८००० जमा झाले.

हे अ‍ॅनेक्डोटल आहे हे माहीत असल्याने जनरलाइज तेव्हाही केले नव्हते. पण हा सदाशिव पेठेतील भाजपचा हुकमी मतदार नव्हे. वार्षिक भारताच्या ट्रीप मधे शहरातील मेट्रो बिट्रो चे काम व एकूण "डेव्हलपमेण्ट" बघून भारत एकदम प्रगतीपथावर आहे असे ठरवून टाकणारा एनआरायही नव्हे. उस्मानाबाद चा शेतकरी. असे अनेक लोकांचे अनुभव असतील तर अशा भरघोस मतदानाचा थोडाफार अंदाज येउ शकतो.

आणि हे अजून एक, शेखर गुप्तांच्या लेखातून - १२ कारणे भाजपच्या विजयाची.
7. Modi critics will never give him the credit for it, but his government was incredibly efficient at the delivery of key welfare programmes. I had written two articles recently: One on the five areas on the economy/infrastructure where BJP had done phenomenally better than UPA-2, and the second on the four reasons that put it ahead of the competition.

आशू, लेख उत्तम आहे.

काँग्रेसमुक्त भारत का नको तर खरोखरच विरोधीपक्ष म्हणून काँग्रेसला पर्याय नाही. आणि जर काँग्रेसला पर्याय नाही तर (आतापुरतं तरी ) गांधी घराण्याला पर्याय नाही. काँग्रेसनं कधीच सर्वोच्च स्थानासाठी इतर कोणी वारसदार निर्माण केले नाहीत. त्यामुळेच जर गांधी घराण्यातील कोण नसेल तर काँग्रेसमध्ये बंडाळी माजेल. कारण गांधींच्या खालच्या स्तरावर अनेक नेते आहेत ते त्यांपैकी एकाला अध्यक्ष्यपदी निवडून देऊन तिला पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा देतील हे फार अशक्यप्राय आहे. त्यामुळे काँग्रेसची मोळी एकत्र बांधण्यास गांधी घराण्याची दोरी गरजेची आहे. नाहीतर प्रत्येक काठी (अथवा खोडं म्हणू) वेगवेगळी होतील आणि पार्टी ढासळेल.

राहूल गांधींकडे अनेक जमेच्या गोष्टी आहेत. वय, उत्तम व्यक्तीमत्त्व, भाषेवर प्रभुत्त्व आणि कार्यकर्त्यांचे समर्थन. पण जी गोष्ट मुख्य हवी ती नाही. तळागाळातील कामाचा अनुभव शून्य आहे. काँग्रेसकरता एक ठाम नवी विचारधारा आणि व्हिजन देण्याची क्षमता नाही. जुन्या घोषणा आणि जुनेच राजकारणी डावपेच आता उपयोगी नाहीत. जनतेला काय हवे आहे. त्यांना आत्ता मोदी सरकार कडून काय मिळत आहे आणि त्यापेक्षा जास्त आपण नक्की काय देऊ शकतो याचा विचार करून काँग्रेसला स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल. योग्य सल्लागार नेमावे लागतील. आणि एक लक्ष पुढच्या निवडणुकीकडे ठेऊन अत्यंत झपाट्याने कामाला सुरुवात करावी लागेल. खर्‍याखुर्‍या तळमळीनं. कारण सामना भाजपशी आहे आणि त्यांच्याकडे खंद्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे.

अमेठीतील एक अनुभव तिथल्याच एका व्यक्तीच्या तोंडून :

मागच्या निवडणुकीत स्मृती इराणी हरली होती. तरीही मागच्या पाच वर्षात तिनं अमेठीत अनेक कामं केली. वारंवार जात राहिली. लोकांना भेटत राहिली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीदरम्यान तिची कुठेतरी रॅली होती आणि तिच्या मतदारसंघात एका शेतात आग लागली आहे अशी बातमी तिच्यापर्यंत पोहोचल्यावर रॅली सोडून ती तिथे गेली. जर कोणी नेता इतक्या आस्थेनं काम करत असेल तर ती निवडून येणार यात काय संशय?

अकौंटला 8000 जमा झाले,

मग तेंव्हा ह्या फुकत्याना अनुदान का , टेक्स पेअरचा पैसा वगैरे प्रश्न उपजले नाहीत का ?

मग तेंव्हा ह्या फुकत्याना अनुदान का , टेक्स पेअरचा पैसा वगैरे प्रश्न उपजले नाहीत का ?

नवीन Submitted by BLACKCAT on 25 May, 2019 - 08:29

शेपटीला फटाका बान्ध्लेल्या मान्जरा सार्खी ही तडफड बघाय्ला लैच मजा येतेय... पुढच्या ५ वर्शात जोरदार मनोरन्जन होणार आहे!

आशुचॅम्प , उत्तम लेख.
नंतर दिलेला Submitted by आशुचँप on 24 May, 2019 - 21:56/em> हा प्रतिसादही टू द पॉईंट . एकदम मनातलं लिहिलेत

लेख काही अंशी पटला।
रागा मस्त कॉमेडियन आहे, काँग्रेस आहे तर पप्पू आहे। मला आवडतात पप्पू ची भाषणे आणि कॉमेडी।

राजकीय घराण्यात जन्म होवून सुधा जो राजकीय बनिल्पणा,धूर्तपणा राजकीय नेत्यांमध्ये असतो तो राहुलजी मध्ये आहे असे वाटत नाही .त्या पेक्षा सोनिया जी चं परत काँग्रेस नेतृत्व थोडे दिवस करावे .

ह्या लोकसभेत महाराष्ट्रात निम्म्या सीट भाजपाच्याच आहेत , विधानसभेला पुन्हा स्वबळाचे वारे येणार का ?

Submitted by BLACKCAT on 24 May, 2019 - 21:59

बेगानी शादी में बाटगा अब्दुल्ला दिवाना! सेना-भाजप वेगवेगळे, एकमेकांच्या विरोधात लढले तरी तुमच्या काँगेस ला विरोधी पक्ष नेतेपद मिळेल एवढे सुद्धा आमदार येणार नाहीत.

कडबोळी सरकार असा उल्लेख झालाय ते आघाडी सरकार कधीच वाईट नसते पण त्याकरिता प्रमुख नेता चांगला असावा लागतो आणि पाठिंबा देणारा पक्ष प्रामाणिक व समान विचारसरणीचा असावा लागतो.

१९७७ साली

मोरारजी सरकार - नेता चांगला नव्हता + पाठिबा देणारे समान विचारसरणीचे नव्हते.
चौधरी चरणसिंह सरकार - नेता चांगला नव्हता + पाठिबा देणारे प्रामाणिक नव्हते. कधीही काढता यावा याकरिताच पाठिंबा दिला होता.

१९८९ साली

व्हीपीसिंह सरकार - नेता चांगला होता पण पाठिबा देणारे समान विचारसरणीचे नव्हते.
चंद्रशेखर सरकार - नेता चांगला नव्हता + पाठिबा देणारे प्रामाणिक नव्हते. कधीही काढता यावा याकरिताच पाठिंबा दिला होता.

१९९६ साली

देवेगौडा सरकार - नेता चांगला नव्हता + पाठिबा देणारे प्रामाणिक नव्हते. कधीही काढता यावा याकरिताच पाठिंबा दिला होता.
इंद्रकुमार गुजराल सरकार - नेता चांगला होता पण पाठिबा देणारे प्रामाणिक नव्हते. कधीही काढता यावायाकरिताच पाठिंबा दिला होता.

जर १९९६ साली देवेगौडांऐवजी ज्योति बसू पंतप्रधान झाले असते त वेगळे व सकारात्मक चित्र दिसले असते.

तसेच अजून एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे जेव्हा जेव्हा काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा दिला तेव्हा तेव्हा तो कोणतेही संयुक्तिक कारण न देता अचानक काढला व देशावर निवडणुका लादल्या. याचमुळे आघाडी सरकारच्या स्थिरतेविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण झाली.

म्हणूनच आघाडी सरकार देखील टिकायला हवे असेल तर देश काँग्रेसमुक्तच हवा. तसेच बाबरी मशीद पडल्यावर देशातील चार मोठ्या राज्यांमध्ये पूर्ण बहुमत असलेली व व्यवस्थित चालु असलेली भाजप सरकारे केंद्रातील काँग्रेसने विनाकारण बरखास्त करुन तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली आणि स्वतःच्या सोयीनुसार तिथे निवडणुका घेतल्या.

असे कपटी राजकारण करणारा काँग्रेस पक्ष देशातून हद्दपार व्हायलाच हवा.

भाजपाचे सरकारही कडबोलेच होते,

आता ह्यावर्षी प्रथम 272 स्वतःचे आणलेत,

आता पुढच्या वेळेपासून भाजपाच्या आताच्या 45 मित्रपक्षनी चहा , भजी वगैरेची प्रॅक्टीस आतापासूनच सुरुवात करावी

Pages