कॉँग्रेसमुक्त भारत का नको?

Submitted by आशुचँप on 24 May, 2019 - 07:18

निकालाची रणधुमाळी संपली आहे आणि भाजपने निर्विवादपणे कॉँग्रेस आणि अन्य पक्षांना भुईसपाट केले आहे. २०१४ पाठोपाठ २०१९ मध्येही भाजप असा काही दणका देईल असे मुळीच वाटले नव्हते.
भाजप कॉग्रेसपेक्षा जास्त सीट्स घेणार यात शंका नव्हती, पण इतक्या मोठ्या फरकाने धूळधाण उडेल याची मुळीच शक्यता वाटत नव्हती.
याला कारणे अनेक होती, त्या नोटबंदी, राफेल घोटाळा, निवडणूकीआधी भ्रष्ट्राचारी नेत्यांच्या नावाने केलेली आगपाखड पण पाच वर्षांत त्यांच्याविरुद्ध काहीही न करणे, मंत्रीपदी असूनही बेताल बोलणे, खुद्द मोदींचे अनेक हास्यास्पद दावे, घटक पक्षांशी चाललेली हाणामारी, पार अफझालखान वगैरे ऐकून घेऊनही शिवसेनेच्या गळ्यात गळा घालणे, पुलवामा संदर्भात अनेक उलट सुलट दावे या सगळ्याचा परिपाक अंतिमत भाजपला महागात पडेल असे वाटत होते पण तसे काही झाले नाही.
जनतेने सर्व मुद्दे निकालात काढत मोदींच्या ओंजळीत भरभरून दान टाकले. यावर आज अनेक तज्ज्ञ लोकांची मते वाचली असता असे जाणवत आहे की समर्थ पर्यायी पक्ष नसणे हे भाजपच्या विजयात फार मोठे योगदान ठरले.
कॉंग्रेसपक्षाची गोंधळाची स्थिती, राहुल गांधी यांनी गेल्या पाच वर्षात आपल्या वक्तव्यात आणि राजकीय समजात बरीच चांगली प्रगती घडवून आणली पण अजूनही अनुभवी मोदींसमोर त्यांची डाळ शिजली नाही. अद्याप राहूल गांधी यांना मोठी मजल मारावी लागणार आहे, बरेच काही शिकावे लागणार आहे, प्रियंका गांधी म्हणलं तर आहेत म्हणलं तर नाहीत अशा दोलायमान स्थितीत आणि एकूणच धरसोड राजकारण यामुळे भाजपचे फावले असे म्हणायला हरकत नसावी.

आणि आता विजय मिळताच भाजप नेत्यांनी आणि समर्थकांनी विजयोन्मादात डरकाळ्या फोडण्यास सुरुवात केली आहे की कॉँग्रेसमुक्त भारत म्हणून. आणि एकेकाळचा मी कट्टर भाजप समर्थक असूनही ही बाब अतिशय चिंतेची वाटत आहे.

सत्ताधारी पक्ष कुठलाही असु दे त्यांना कायम धारेवर धरणारा आणि चाकोरीत रहायला भाग पाडणारा समर्थ विरोधी पक्ष असणे हे निरोगी लोकशाहीचे लक्षण आहे. गेली पाच वर्षे निष्प्रभ विरोधी पक्ष म्हणून कॉँग्रेसने काहीही केले नाही याचीच फळे त्यांना २०१९ ला मिळाली आहेत. मोदी नकोत तर दुसरे कोण हा प्रश्न मतदारांना पडला हेच कॉंग्रेसचे दारूण अपयश आहे. आणि हे अपयश कायम रहावे ही भाजपची इच्छा असणार हे उघड आहे.

सरकारला नुसते प्रश्न विचारणे किंवा भाषणात त्यांचे दावे फोल असल्याचे सांगणे इतक्याने सत्ताधारी पक्ष नमत नाही हे आता पाच वर्षात उघड झाले आहे. आता त्यामुळे कॉँग्रेसला तळागाळापासून बांधणी करत येत, नव्या दमाच्या तरुण पिढीला संधी देत आणि ज्या राज्यात मतदारांनी पसंती दिली आहे चांगले भरीव काम करून दाखवणे गरजेचे आहे.

सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने देखील कॉँग्रेसचे भवितव्य टिकून राहणे आवश्यक आहे. जेव्हा केव्हा कुठल्या देशात एखाद्याच पक्षाला अनिर्बंध सत्ता मिळते तेव्हा त्याची परिणीती कशात होते याचा इतिहास साक्ष आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपला एक जरब असावी यासाठी एक समर्थ पर्याय म्हणून कॉंग्रेस असणे ही तमाम भारतीय लोकांची गरज आहे. काही लोकांना हे पटणार नाही कदाचित कारण जोवर बहुमत आपल्या बाजूने असते किंवा आपण बहुमताच्या बाजूने असतो तेव्हा सगळे गोड गोड छान छान वाटते, त्याचा जेव्हा बडगा बसायची वेळ येते तेव्हा उशीर झालेला असतो आणि मग अरुण्यरुदन करून काहीही उपयोग नसतो.

विशाल भारद्वाजच्या चित्रपटात एक संवाद आहे. हमेशा संतुलन बने रहना जरुरी है, आग के लिये पानी का डर बना रहना चाहीये

त्याप्रमाणे सत्ताधीश भाजपला आणखी उन्मत्त न होऊ देता त्यांना सतत टांगती तलवार डोक्यावर ठेवणे हे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे आणि यासाठी कॉंग्रेसला आमुलाग्र बदल घडवून आणावा लागणार आहे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असे म्हणून चालणार नाही. ही पाच वर्षे त्यांच्यासाठी आणि त्यांच्याकडून काही चांगले भरीव अपेक्षीत असलेल्या जनतेसाठी कसोटीची आहेत.

तोवर अशी आशा आणि प्रार्थना करुया की भाजप सरकार या विजयाचा आपल्याला हवा तो अर्थ काढून मतदारांना गृहीत धरणार नाही. मतदारांनी जो विश्वास दाखवला आहे तो योग्य ठरवेल आणि देशाच्या भल्यासाठी काम करेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पदच्युत नाही झाले पाहिजेत .
हे पोप खरेच आदर्शवत आहेत !
ज्या ज्या पाद्र्यानी सेक्स स्कॅनडल केली त्यांना पूर्वी धर्माची बदनामी होऊ नये म्हणून झाकून ठेवले जायचे . पण या पोप नी असल्या बदनाम पाद्र्याना हाकलून पोलिसांच्या ताब्यात द्यायला सुरुवात केली आणि अशा केसेस पुन्हा होऊ नये म्हणून कॅथलिक चर्च ची नियमावली अधिक कडक केली .
खास करून फ्रांस मधील एक लाख 26 हजार लहान मुलांचे पाद्र्यानी केलेल्या लैंगिक शोषणाच्या केसेस चे रिपोर्ट आल्या नंतर ......

बलात्कार अन् खुनी खटल्यातील आरोपी हा भगव्या धर्मातील असेल अन् त्यातही बम्मराक्षस असेल तर आणि तरच रॅली निघते. इतर कोणत्याही धर्मीय अथवा माणसासाठी अशी रॅली निघत नाही.

इंदिराजी प्रमाणे राहुललाही साथ द्या !
असे कर्नाटक मध्ये प्रचार करताना काँग्रेसची प्रियंका वाड्रा म्हणाली . " ४५ वर्षापूर्वी इंदिराजी वर विरोधकांनी खोटा गुन्हा दाखल केला होता , आता तीच घटना पुन्हा घडली आहे . आज काँग्रेस आणि गांधी घराण्यावर अशीच संघर्षाची वेळ आली आहे , त्यात आम्हा सर्वांना तुमची साथ मिळेल "
प्रियांकाचे विचार किती हृदयस्पर्शी आहेत , डोल्यात पाणी जमा झाले .
पण तिने आणि राहुल ने वारंवार महात्मा आणि इंदिराजींची आठवण करून नाही दिली तरी देशातील जनता काँग्रेसलाच मतदान करील यात काही शंका नाही !
उलट माबोवरील काँग्रेसच्या वाढत्या समर्थकांची संख्या पाहता २०२४ ला काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करू शकतो असा दृढविश्वास वाटू लागला आहे .
भारतातील गोर गरीब जनतेच्या कित्तेक पिढ्या काँग्रेसला मतदान करून संपल्या , पण त्यांनी काँग्रेसची साथ नाही सोडली .
ज्या मतदार संघातून गांधी कुटुंबीय उभे राहिले , त्या मतदारसंघाची अतोनात प्रगती झाली पण गांधी कुटुंबीय मात्र गरीब होत गेले .
अमेठी चे उदाहरण सर्वांसमोर आहेच !
देशातील सर्वात प्रगत मतदारसंघात
अमेठी गणला जातो , तिथे विकासाची गंगा सुरू केल्या नंतर राहुल केरळ मधील वायनाड चा विकास करायला गेला आहे .
प्रियांका म्हणाली त्या प्रमाणे अशा या परोपकारी गांधी घराण्याला साथ देण्याचे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे .

Pages