निकालाची रणधुमाळी संपली आहे आणि भाजपने निर्विवादपणे कॉँग्रेस आणि अन्य पक्षांना भुईसपाट केले आहे. २०१४ पाठोपाठ २०१९ मध्येही भाजप असा काही दणका देईल असे मुळीच वाटले नव्हते.
भाजप कॉग्रेसपेक्षा जास्त सीट्स घेणार यात शंका नव्हती, पण इतक्या मोठ्या फरकाने धूळधाण उडेल याची मुळीच शक्यता वाटत नव्हती.
याला कारणे अनेक होती, त्या नोटबंदी, राफेल घोटाळा, निवडणूकीआधी भ्रष्ट्राचारी नेत्यांच्या नावाने केलेली आगपाखड पण पाच वर्षांत त्यांच्याविरुद्ध काहीही न करणे, मंत्रीपदी असूनही बेताल बोलणे, खुद्द मोदींचे अनेक हास्यास्पद दावे, घटक पक्षांशी चाललेली हाणामारी, पार अफझालखान वगैरे ऐकून घेऊनही शिवसेनेच्या गळ्यात गळा घालणे, पुलवामा संदर्भात अनेक उलट सुलट दावे या सगळ्याचा परिपाक अंतिमत भाजपला महागात पडेल असे वाटत होते पण तसे काही झाले नाही.
जनतेने सर्व मुद्दे निकालात काढत मोदींच्या ओंजळीत भरभरून दान टाकले. यावर आज अनेक तज्ज्ञ लोकांची मते वाचली असता असे जाणवत आहे की समर्थ पर्यायी पक्ष नसणे हे भाजपच्या विजयात फार मोठे योगदान ठरले.
कॉंग्रेसपक्षाची गोंधळाची स्थिती, राहुल गांधी यांनी गेल्या पाच वर्षात आपल्या वक्तव्यात आणि राजकीय समजात बरीच चांगली प्रगती घडवून आणली पण अजूनही अनुभवी मोदींसमोर त्यांची डाळ शिजली नाही. अद्याप राहूल गांधी यांना मोठी मजल मारावी लागणार आहे, बरेच काही शिकावे लागणार आहे, प्रियंका गांधी म्हणलं तर आहेत म्हणलं तर नाहीत अशा दोलायमान स्थितीत आणि एकूणच धरसोड राजकारण यामुळे भाजपचे फावले असे म्हणायला हरकत नसावी.
आणि आता विजय मिळताच भाजप नेत्यांनी आणि समर्थकांनी विजयोन्मादात डरकाळ्या फोडण्यास सुरुवात केली आहे की कॉँग्रेसमुक्त भारत म्हणून. आणि एकेकाळचा मी कट्टर भाजप समर्थक असूनही ही बाब अतिशय चिंतेची वाटत आहे.
सत्ताधारी पक्ष कुठलाही असु दे त्यांना कायम धारेवर धरणारा आणि चाकोरीत रहायला भाग पाडणारा समर्थ विरोधी पक्ष असणे हे निरोगी लोकशाहीचे लक्षण आहे. गेली पाच वर्षे निष्प्रभ विरोधी पक्ष म्हणून कॉँग्रेसने काहीही केले नाही याचीच फळे त्यांना २०१९ ला मिळाली आहेत. मोदी नकोत तर दुसरे कोण हा प्रश्न मतदारांना पडला हेच कॉंग्रेसचे दारूण अपयश आहे. आणि हे अपयश कायम रहावे ही भाजपची इच्छा असणार हे उघड आहे.
सरकारला नुसते प्रश्न विचारणे किंवा भाषणात त्यांचे दावे फोल असल्याचे सांगणे इतक्याने सत्ताधारी पक्ष नमत नाही हे आता पाच वर्षात उघड झाले आहे. आता त्यामुळे कॉँग्रेसला तळागाळापासून बांधणी करत येत, नव्या दमाच्या तरुण पिढीला संधी देत आणि ज्या राज्यात मतदारांनी पसंती दिली आहे चांगले भरीव काम करून दाखवणे गरजेचे आहे.
सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने देखील कॉँग्रेसचे भवितव्य टिकून राहणे आवश्यक आहे. जेव्हा केव्हा कुठल्या देशात एखाद्याच पक्षाला अनिर्बंध सत्ता मिळते तेव्हा त्याची परिणीती कशात होते याचा इतिहास साक्ष आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपला एक जरब असावी यासाठी एक समर्थ पर्याय म्हणून कॉंग्रेस असणे ही तमाम भारतीय लोकांची गरज आहे. काही लोकांना हे पटणार नाही कदाचित कारण जोवर बहुमत आपल्या बाजूने असते किंवा आपण बहुमताच्या बाजूने असतो तेव्हा सगळे गोड गोड छान छान वाटते, त्याचा जेव्हा बडगा बसायची वेळ येते तेव्हा उशीर झालेला असतो आणि मग अरुण्यरुदन करून काहीही उपयोग नसतो.
विशाल भारद्वाजच्या चित्रपटात एक संवाद आहे. हमेशा संतुलन बने रहना जरुरी है, आग के लिये पानी का डर बना रहना चाहीये
त्याप्रमाणे सत्ताधीश भाजपला आणखी उन्मत्त न होऊ देता त्यांना सतत टांगती तलवार डोक्यावर ठेवणे हे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे आणि यासाठी कॉंग्रेसला आमुलाग्र बदल घडवून आणावा लागणार आहे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असे म्हणून चालणार नाही. ही पाच वर्षे त्यांच्यासाठी आणि त्यांच्याकडून काही चांगले भरीव अपेक्षीत असलेल्या जनतेसाठी कसोटीची आहेत.
तोवर अशी आशा आणि प्रार्थना करुया की भाजप सरकार या विजयाचा आपल्याला हवा तो अर्थ काढून मतदारांना गृहीत धरणार नाही. मतदारांनी जो विश्वास दाखवला आहे तो योग्य ठरवेल आणि देशाच्या भल्यासाठी काम करेल.
आता ह्यावर्षी प्रथम 272
आता ह्यावर्षी प्रथम 272 स्वतःचे आणलेत,
नवीन Submitted by BLACKCAT on 25 May, 2019 - 14:19
कोणता गान्जा मारता हो? २०१४ ला २८२ आणि २०१९ ला ३०३ खासदार असे आकडे आहेत.
विपक्ष समर्थ व्हावा असा
विपक्ष समर्थ व्हावा असा ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांनी काँग्रेस चा सभासद बनून प्रयत्न केले पाहिजे. उगाच राहुल गांधीला किंवा काँग्रेस ला इंटरनेट वर सल्ला देऊन काय फायदा. गेला बाजार चार दोन एलोक्टरल बॉण्ड देऊन टाकले पाहिजे.
२७२ पैकी स्वतःचे मूळ किती
२७२ पैकी स्वतःचे मूळ किती आहेत? कि पतंजलीचा पॅटर्न वापरला आहे? फेक्टरी दुसर्याची प्रोडक्ट दुसर्याचे ह्यांनी केवळ आपला लोगो चिकटवला.. सुजय विखे पाटील एक उत्त्म उदाहरण. बाकीचे संघी दिग्गज तर केव्हाच घरि बस्लेत
>>>कि पतंजलीचा पॅटर्न वापरला
>>>कि पतंजलीचा पॅटर्न वापरला आहे?
पतंजलीचा पॅटर्न वापरायला युवराजान्ना कोणी अडवले होते? निदान विरोधी पक्शान्ची एकजूट तरी करायला हवी होती. पण तेवढी अक्कल युवराजान्ना नाही आणि त्यान्च्या समर्थकन्ना तर अजिबात नाही!
हा हां... मोदीने तर खून पाडून
हा हां... मोदीने तर खून पाडून आपले गुजरात मधले स्पर्धक संपवले... उद्या म्हणाल राहुल गांधीला ते करायला काय हरकत होती...
लागले धुळवड खेळायला...
लागले धुळवड खेळायला... कोर्टाने त्यान्ना निर्दोष मुक्त केलय हा तपशील विसरलात का?
भाजपाचे सरकारही कडबोलेच होते,
भाजपाचे सरकारही कडबोलेच होते,
आता ह्यावर्षी प्रथम 272 स्वतःचे आणलेत >>>
भाऊ लिंबू रस घालून 2 लिटर पाणी प्यायलात तर लवकर उतरेल.
काँग्रेस ची अधोगती पडलो तरी
काँग्रेस ची अधोगती पडलो तरी नाक वर या हेलकट मनोवृत्तीमुळे झालीय. हीच मनोवृत्ती भाजपला जिंकवत असल्याने आपण सगळ्यां मोदी समर्थकांनी सहन करायला हवी.
कोणता गान्जा मारता हो? २०१४
कोणता गान्जा मारता हो? २०१४ ला २८२ आणि २०१९ ला ३०३ खासदार असे आकडे आहेत.
282 होते , मग काही गचकून ते 272 लाही कमी झाले होते, विसरले का ? आणि त्या त्या ठिकाणी पुन्हा भाजपे आले नाहीत. पोट निवडणुकीत भाजपे उलथतात.
आता प्रथमच भाजपाचे इतके 272 प्लस झाले आहेत की चार दोन मेले / फाफलले तरी आता 272 च्या खाली जाणार नाही , हे नक्की , म्हणून 272 ही फिगर खर्या अर्थाने आताच ओलांडली.
आता पुढच्या निवडणुकीत मित्रपक्षांना किटली , कढइ अन झारा आहेच . आठवलेंना किटली, राजू शेट्टीना झारा ह्याच वर्षी मिळाला.
हे पुढचे व्हाट्सएपवर आले ----
*सौ बात की एक बात बोलू*
एक योग्य व्यक्ति की वजह से कितने ही अयोग्य नेता जीत गए औऱ
एक अयोग्य व्यक्ति की वजह से कितने ही योग्य नेता हार गए l
आशुचॅम्प, लेख आणि प्रतिसाद
आशुचॅम्प, लेख आणि प्रतिसाद आवडले.
समजा काँग्रेस हे नाव नष्ट झाले अथवा पक्ष विसर्जित झाला तरी त्याच्या विचारधारेचे अनुयायी शिल्लक राहातीलच. जसे की एके काळी जनसंघ हे नाव आणि पक्ष विसर्जित झाले आणि जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टी उदयास आली. तेव्हा विरोधी विचार हे उरणारच. भले त्या धारेचे नाव काँग्रेस नसेल. तसे तर २०१४चा भाजप आणि आताचा भाजप यातही फरक दिसतो आहे. तेव्हाची वक्तव्ये आणि देहबोली उद्दाम, मगरूर, हिस्टेरिकल होती. आता थोडा मवाळपणा जाणवतोय. आता कदाचित अधिक विचाराने निर्णय घेतले जातील, अंमलबजावणीचा विचार आणि सर्व शक्यता व लूप होल्सचा विचार आधी केला जाईल, भडक नाट्यमयता टाळली जाईल, पोरसवदेपणा जाईल, गांभीर्य येईल. सांगायचे असे की भाजपचा चेहरा राहील पण मोहरा बदलेल.
असे तर प्रत्येक बाबतीत होतच असते. खुद्द काँग्रेस ही एक अनेक विचारधारांचे कडबोळे होती. समाजवादी, टोकाचे उजवे, टोकाचे डावे, धर्माभिमानी, अश्या अनेक मंडळीची गठडी एकत्र वळलेली होती. सगळ्यांना सांभाळत, कलाकलाने घेत कारभार चालला होता. अंतर्गत धुसफूस होतीच. हळूहळू प्रत्येक विचारधारेला आपली घुसमट होतेय असे वाटू लागले आणि एक एक गट वेगळा होऊ लागला. कम्यूनिस्ट आधीच वेगळे झाले होते, पण काही डावे, काही मवाळ डावे, काही समाजवादी होतेच. पण पूर्ण आपल्या मताप्रमाणे हे काँग्रेसनामक अगडबंब तारू चालत नाहीय ह्याची जाणीव झाल्यावर किंवा आपल्या मतप्रणालीचा पुरेसा प्रभाव पाडण्यास असमर्थ ठरल्यावर हळूहळू (खरे म्हणजे १९४२ पासूनच) गळती सुरू झाली. लोहियांनी काँग्रेस हटाओ चा नारा देऊन काँग्रेसमुक्त भारताची स्वप्ने प्रथम पाहिली. काँग्रेसमधले मवाळ डावे आता समाजवादी, संयुक्तसमाजवादी, प्रजासमाजवादी वगैरे बनले. १९६९मध्ये इन्दिरा गांधींनी कडव्या उजव्यांना बाहेर काढले. विनोबांबरोबर गोरक्षण आणि इतर सौम्य हिंदुत्ववादी मुद्दे काँग्रेसच्या अजेंड्यावरून हटले. मुळात काँग्रेस हा काही काडरबेस्ड पक्ष नव्हता. सगळ्यांना पोटात घेऊन हलत डुलत चालणारे ते एक अजस्र जहाज होते.
आताही संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व निर्विवादपणे हातांत आले असताना भाजपला थोडेसे याच प्रकारचे स्वरूप येणार आहे किंवा येत आहे. प्रत्येक घटकाला थोडेफार खुश ठेवण्याची कसरत करावी लागणार आहे. कुणाला आरक्षण द्या, कुणाला सब्सिडी द्या अशी खिरापत वाटावीच लागणार आहे. बहुमताच्या जोरावर कायदे करता येतील, पण लोकमत आपल्या बाजूला राहील याचीही तजवीज करावी लागेल. तिथे भ्रष्टाचार क्रमप्राप्त आहे. आताही तो नाही असे नाही पण दुसरे काही मुद्दे अधिक प्रभावी ठरले. असो. राजकीय पक्षांच्या किंवा कोणाच्याही भूमिका कालानुसार आणि काळामुळे बदलतात. भाजपसुद्धा काल होता तसा किंवा आज आहे तसा राहाणार नाही. सगळ्या विचारधारांना थोडेसे तरी आपले म्हणावे लागेल. सध्या रास्वसंघाचे नियंत्रण बर्यापैकी आहे. पण राजकीय आघाडी(फ्रंट) पित्यापेक्षा मोठी 'बाप से बेटा सवाई' होऊ लागली की मग काय होईल ते बघणे रोचक असेल. रास्व सं भाजपमागे फरपटत जातो की भाजपला आपल्या चालीने/मार्गाने चालायला लावतो हे भविष्य ठरवीलच. एखाद्या अतिविशाल संकल्पनेच्या पोटातच विरोध दडलेला असतो असा दाखला आहे. तेव्हा विरोधाची चिंता फारशी नको. अर्थात भाजपमध्ये अंतर्विरोध निर्माण होईल म्हणून काँग्रेस संपावी किंवा नामशेष व्हावी असे नाही आणि भाजपमध्ये अंतर्विरोध निर्माण व्हावा असेही नाही.
<<एक योग्य व्यक्ति की वजह से
<<एक योग्य व्यक्ति की वजह से कितने ही अयोग्य नेता जीत गए औऱ
एक अयोग्य व्यक्ति की वजह से कितने ही योग्य नेता हार गए >>
हा हा , काळे मांजर , मान गये .. ज्या डम्ब माणसाला डिफेन्ड करायला हयात गेली त्यावरच खापर फ़ोडताय..
भाजपचा काँग्रेसमुक्त नारा हा
भाजपचा काँग्रेसमुक्त नारा हा काँग्रेसने वर्षानुवर्षे बाळगलेल्या विचारधारेशी संबधित आहे ना की व्यक्ती किंवा पक्षाशी. ज्यामध्ये भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, सत्तेसाठी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली फक्त एका विशिष्ट धर्माचे लांगूलचालन, देशसुरक्षेविषयी उदासीनता, पॉलिसी पॅरालिसिस अश्या गोष्टींचा समावेश होतो. आता लोक बरेच शहाणे झाले आहेत. आत्ताचे जनमत म्हणजे काम दाखवा नाहीतर चालते व्हा हा काँग्रेस ला दिलेला स्पष्ट संदेश आहे. गेली अनेक वर्ष काँग्रेस चा गढ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अमेठी मधून राहुल गांधी सारख्या दिग्गजाचा पराभव हेच सांगतो. आता तरी जेवढ्या सीट्स उरल्या आहेत तिथे जात, पात, धर्म याच्या वर जाऊन भरीव विकासाची कामे जर काँग्रेसच्या खासदारांनी केले नाहीत तर राहिलेल्या सीट्स पण वाचणार नाही २०२४ मध्ये.
हा हां... मोदीने तर खून पाडून
हा हां... मोदीने तर खून पाडून आपले गुजरात मधले स्पर्धक संपवले... उद्या म्हणाल राहुल गांधीला ते करायला काय हरकत होती...>>
हेला चा बुडबुडे गाडगं , नुसता फुसका बार ..काँग्रेस चे लोक आता नुसता मोदींच्या नावानेच गजकतील का काय अशी परिस्तिथी आहे ...
हे केले ते केले , तुमच्या कडे सत्ता होती ना १० वर्ष निदान बैलगाडी तरी बसवायचा होत मग काही पुरावे असेल तर, आता तुमची बैलगाडी तिहार कडे जाणार बघा ...
>>282 होते , मग काही गचकून ते
>>282 होते , मग काही गचकून ते 272 लाही कमी झाले होते, विसरले का ? आणि त्या त्या ठिकाणी पुन्हा भाजपे आले नाहीत. पोट निवडणुकीत भाजपे उलथतात.
आणि तरीही अविश्वास ठराव हरलेच तुमचे डोळे मारणारे युवराज!
>>ज्या डम्ब माणसाला डिफेन्ड
>>ज्या डम्ब माणसाला डिफेन्ड करायला हयात गेली त्यावरच खापर फ़ोडताय..<<
क ड क!
काँग्रेस वर्किंग कमिटीच्या
काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत राहुल गांधी यांचा राजीनामा फेटाळला. या वर्किंग कमिटीचे सदस्य इथे माहिती होतील https://en.wikipedia.org/wiki/Congress_Working_Committee
यातला एखादा तरी (राहुल आणि सोनिया गांधी व्यतिरिक्त) 2019 लोकसभा निवडणूक जिंकला आहे का? ज्या पक्षाच्या सर्वोच्च समितीत 90%अधिक सदस्य हे निवडणूक जिंकू ना शकणारे आहेत व तरीही समिती सदस्यत्व सोडत नाहीत त्या पक्षाची चिंता इतरांनी का करावी? मरो बापडे!
आप चा उदय जर या घडीला झाला असता तर त्यांना ही विरोधी पक्ष जागा/मते खाता आली असती. अजूनही या पद्धतीचा एखादा पक्ष येऊन भाजपला आव्हान देईल अशी आशा आहे. काँग्रेसकडून ते नाही होणार आता.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/blogs-news/article-on-victory-of-smriti-irani-v...
मला वाटते काँग पक्ष बांधणी,
मला वाटते काँग पक्ष बांधणी, राहुल यांचा राजिनामा फेटाळला, वगैरे चर्चा व बातम्यात एक मूळ मुद्दा दुर्लक्षिला जातोय. तो हा की, 'राष्ट्रीय' स्तरावर जनतेने राहुल गांधी किंबहुना गांधी परिवारालाच नाकारले आहे. २०१४ मध्ये त्यांना मोदी हा पर्याय मिळाला आणि २०१९ मध्ये त्यांना गांधी पर्याय नेता म्हणून नको होता. तसे नसते तर राहुल यांना पंतप्रधान पदाचा ऊमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्यात युपिए आघाडीने मागेपुढे पाहिले नसते. किंबहुना २००९, २०१४ मध्ये देखिल काँ सत्तेत आली तरी पंप्रधान्पदाचा चेहेरा म्हणून मनमोहन सिंग हेच होते. त्यामूळे खुद्द युपिए च्या सर्व टीम वे वरीष्ठ नेत्यांना हे पक्के ठाऊक आहे की राहुल गांधी वा गांधी परिवार हे पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट होऊ शकत नाहीत.
स्थानिक राजकारणात देखिल मतदारांना भाजपा वरचा राग, नाराजी व्यक्त करण्याचा पर्याय कॉ. पार्टी असली तरी चेहेरे स्थानिकच असतात. त्यामुळे स्थानिक राजकारणात राहुल वा गांधी परिवार हा फॅक्टर येतच नाही.
थोडक्यात काँ ने कितिही जोड, जुगाड केला, अगदी ऊलट सुलट संरचना व पक्षपुनरचना केली तरिही जोपर्यंत 'राष्ट्रीय' स्तरावर त्या पक्षाकडे अस्सल भारतीय चेहेरा नाही तोपर्यंत पुढील सर्व लोकसभेच्या निवडणूका यात काँ ला हा 'विदेशी' फॅक्टर भोवणारच. त्यातही चेहेरा व ऊमेदवार असा हवा की जो मोदी सारख्या प्रतीमेला टक्कर देऊ शकेल. आज भारत म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे भारत हे समिकरण आहे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देखिल.
२००९ पर्यंत जनमानसिकता वेगळी होती. राजीव हे ईंदीराजींचे पुत्र म्हणून तर सोनिया यांना देश की बहु वगैरे प्रोजेक्ट केल्याने त्यातल्या त्यात मतदाराने विदेशी फॅक्टर कडे दुर्लक्ष केले. (त्यातही स्वामी महाशयांनी मुद्द ऊपस्थित केल्याने आयत्या वेळी सोनिया यांना पंप्र पदावरून मागे हटावे लागेल!) २०१४ पासून राहुल गांधी यांचे विदेशी मूळ, चैन, वडरा संबंध, त्यातही नुकतेच ऊघडकीस आलेले त्यांचे ईटलीतील धंदेवाईक संबंध या सर्वांमूळे आता लोकांच्या मनात गांधी परिवाराबाबत प्रचंड नकारात्मक भावना आहे. आणि दुसरीकडे मोदी, शाह कं मात्र तळागाळातून वर आलेले, देशाच्या संस्कृतीचे व अस्सल आपल्या मातीचे प्रतिनिधीत्व करतात. राम मंदीर सोडून देखिल हिंदुत्वाशी निगडीत ईतत्र सर्व मुद्दे मुख्य प्रवाहात आणता येतात हेही मोदी कं ने खुबीने दाखवून दिले. ईथून पुढे 'राष्ट्रीय' भावना व त्या अनुशंगाने घडणारे राजकारण याचा मोठा परिणाम पुढील पिढ्यांवर देखिल होणार आहे. स्म्रूती, फडणवीस, अशी दुसरी फळी देखिल अधिक अधिक परीपक्व व राष्ट्रीय स्तरावर मोठी होत जाणार हे नक्की.
अमेठी मध्ये राहुल गांधींचा पराभव ही यबदललेल्या मानसिकतेची देखिल सुरूवात आहे. कारण आता अमेठी मध्ये जर भाजपा कं ने ऊत्तम विकास घडवून आणला तर जनतेला हेही कळून चुकेल की आपली कामे होण्यासाठी गांधी परिवाराची गरज नाही.
थोडक्यात कुठल्याही अंगाने कॉ. ची पुनर्बांधणी वगैरे केली आणि राज्य स्तरावर लक्ष केंद्रीत केले तरिही 'राष्ट्रीय' पातळीवर भारत देशाची सूत्रे गांधी परीवाराकडे भविष्यात कधिही जाणार नाहीत हे सत्य आहे.
प्रश्ण एव्हडाच ऊरतो की हे वेळीच ओळखून राष्ट्रीय पातळीवर पंप्रधान चेहेरा प्रोजेक्ट करण्याचे व त्या अनुशंगाने स्ट्रॅटेजि आखण्याची सुरूवात कॉ. पक्ष कधि करू शकेल? आणि ७ दशके निव्वळ एका परिवारा भोवती मोट बांधलेल्या या पक्षाला असे पाऊल ऊचलायचे असल्यास अंतर्गत विरोध, गोंधळ, व बंडाळी याचा सामना करता येईल का? राहुल यांचा रोल फक्त एक पक्ष नेता, अध्यक्ष म्हणून असेल, पण लोकसभेसाठी वेगळा चेहेरा शोधावाच लागेल. फार मोठे आव्हान आहे. If only the party with long history and legacy can look beyond the word 'Gandhi' !
रच्याकने:
'गर्व से कहो हम हींदू है..' तर कधी 'मंदीर वही बनायेंगे' या स्लोगन मध्येच भाजपा च्या रथाचे चाक रुतले होते. पर्यायाने कॉ. ने त्याचा वापर करून अल्पसंख्यांक व सो कॉल्ड सेकुलरिझम च्या काठ्या वापरून निवडणूका लढवल्या व जिंकल्या. मुसलमानांना गोंजारा व हिंदूंना जाती पाती च्या आधारावर फोडा ही निती दुर्दैवाने यशस्वी झाली. पण मोदी, शाह कं ने मात्र ही मेख ओळखली आणि या रथाचे रूतलेले चाक बाहेर काढून सबका साथ सबका विकास च्या मार्गाने घौडदौड सुरू केली. भाजपा ने कूस बदलली आणि मतदारांनी अक्षरशः त्यांच्या या नव्या रूपाला आपल्या कुशीत घेतले. That was a game changer... Congress only realised this on May 23, 2019... too late.
BJP has changed the game, the rules, and the way it is played! Strategy at its best.
(भाजपा चा हाच गुण शिवसेनेला लागल्यास, हिंदुहृदय सम्राटांचा हा पक्ष भविष्यात महाराष्ट्र हृदय समाट म्हणून नावारूपाला येऊ शकतो. सत्तेसाठीची तू तू मै मै, अन बालहट्ट सोडले तर शिवसेना ही खर्या अर्थाने शिवशाही च्या मार्गाने वाटचाल करू शकेल. तरूण नेत्रूत्व, कार्यकर्त्यांची मजबूत फळी, मराठी मनाशी जोडलेली नाळ, आणि बाळासाहेबांचे विचार अशा अनेक जमेच्या बाजू शिवसेने कडे आहेत. आणि आता मनसे शिल्लकच नसल्याने निदान महाराष्ट्रात तरी शिवसेनेच्या रथाची घौडदौड रोखता येणे भविष्यात अवघड असेल. थेट दिल्ली च्या मांडीशी मांडी लावून बसण्याचा मान शिवसेनेचे नेतृत्व कसे हाताळते यावर बरेच काही अवलंबून आहे.)
The only game changer for Congress will be to identity itself as a party which offers the balancing act and not a 'family' driven conglomerate. This is more than simple restructuring,. This is fundmanetaly changing the DNA. If and when they can do this, Indian Democracy will fully mature representing a people facing model.
राहुल गांधींचे कोणते मूळ
राहुल गांधींचे कोणते मूळ परदेशी आहे ?
त्याचे आई वडील दोन्ही भारतीयच आहेत, सुप्रीम कोर्टानेही त्यांच्या नागरिकत्वाचा वाद सम्पवला आहे.
साहेबांचा लाडका मित्र अक्षयकुमार हाच आता परदेशी आहे
पुढच्या निवडणुकीत भाजपा
पुढच्या निवडणुकीत भाजपा मित्रपक्षांना किटली, कढइ अन झारा देणार आहे,
ठाकरेंच्याही हे लक्षात आले आहे
माझ्या वरच्या प्रतिसादाचा
माझ्या वरच्या प्रतिसादाचा पुढील भाग :
भाजपच्या हातांत हिंदु मतदारांनी सर्व सूत्रे विनाअट दिल्यामुळे आता भाजपला हिन्दुत्वाचा पत्ता खेळण्याची गरज नाही. आता मोदी कॅन शो टु बी,कॅन बी ऑर कॅन अफोर्ड् टु बी मॅग्नॅनिमस. आता मुस्लिमांशी ते मवाळ आणि उदार वागले तरी त्यांच्यावर लांगूलचालनाचा आरोप होणार नाही. सनातन संस्था,बजरंग दल, हिन्दु वेदिके वगैरे अतिरेकी हिदुत्ववादी संस्था यांना श्री मोदी आपल्या मागे यायला अथवा आपण ठरवलेल्या मार्गाने चालायला लावू शकतील. किंबहुना कॉन्ग्रेसचा सर्वधर्मसमभाव भाजप हळू हळू अंगीकारू लागेल, कदाचित त्यांच्या नकळत. किंबहुना हीच भारताची ताकद आहे की कोणतीही कर्मठ अथवा टोकाची विचारधारा तो पोटात घेऊन पचवून टाकू शकतो, त्याचे आपल्याला हवे तसे विघटन करून त्यातला हवा तो भाग उचलू शकतो. जर भाजपने काँग्रेसची विचारधारा आपलीशी केली तर वेगळ्या पक्षाची गरज नाही. उदार, सहिष्णु, अशी विचारधारा हिंदु धर्माची विशेषता आहेच. पुरोगामी आणि बुद्धिवादी लोकांचे आवडते असे हेच हिंदुधर्मरूप जर बळकट केले जात असेल तर कुणाची तक्रार राहाणार? पण अर्थात एकजिनसी हिंदुराष्ट्र वाल्यांचा याला विरोध राहाणार. त्यांना बहुविधता नको आहे. शिस्तीच्या नावाखाली बराकीकरण हवे आहे. यापुढे भाजपला आपली रणनीती (हा शब्द मला आवडत आही) बटबटीत आक्रस्ताळी, कंठाळी न ठेवता सूक्ष्म ठेवावी लागेल. समाजाचे भौतिक उन्नयन करायचे /व्हायचे असेल तर भणंगपणा टाळून नव्या नागरी जाणीवा निर्माण व्हायला हव्यात. धार्मिक आणि आध्यात्मिक उन्नती सगळ्यांना जमतेच असे नाही. पुन्हा सामाजिक उन्नतीची भौतिक बाजू केवळ आर्थिक नसते. सुव्यवस्था हा एक मोठा घटक त्यात अनुस्यूत असतो. तो ह्या नव्या नागरी जाणीवा भिनल्यामुळेच अस्तित्वात येऊ शकेल. मूल्यवर्धन म्हणजे ह्या नव्या जाणीवांचे संस्कार हे आता राज्यसंस्थेला कळू लागेल. किंबहुना हे संस्कार म्हणजेच नव्या संस्कृतीची मूल्ये, हे अंगवळणी पाडून घ्यावे लागेल किंवा पडेल. हाच तो बदल राज्यकर्त्या पक्षात अपेक्षित आहे आणि हेच आव्हानही आहे. सूज्ञांना कळेल की सेक्यूलरिझ्मचा मूळ अर्थ म्हणजे बहुतांशी हेच आहे.
हीरा, छान posts आहेत. वाचतेय.
हीरा, छान posts आहेत. वाचतेय. खऱ्या सेक्युलॅरिझमचा उल्लेख आवडला.
उदार, सहिष्णु, अशी विचारधारा हिंदु धर्माची विशेषता आहेच. >>> You nailed it. पण प्रत्यक्षात सेक्युलॅरिझमच्या नावाखाली जे दिसत होते ते अजिबात appealing नव्हते. कुठलाही राजकीय पक्ष अपवाद नाही. हा स्युडोसेक्युलॅरिझम आताच्या कॉंग्रेसनेही दाखवला त्यामुळे मुळच्या कॉंग्रेसच्या विचारधारेपासून ते दूरच होते.
हो हो.. २००२ जे झाले ते किती
हो हो.. २००२ जे झाले ते किती अपिलिंग होते ना? तोच तर खरा हिंदू धर्म आहे ज्यासाठी जीव टाकत आहेत सगळे..
२००२ जे झाले ते किती अपिलिंग
२००२ जे झाले ते किती अपिलिंग होते ना?
नवीन Submitted by हेला on 26 May, 2019 - 14:03
२००२ च्या कारसेवकान्च्या हत्या आणि त्यानन्तर उसळ्लेल्या दन्गली या दोन्ही दुर्दैवी घटना होत्या. मात्र त्यान्चे "हुवा तो हुवा" असे निर्लज्ज समर्थन कोणी केलेय का? गेला बाजार "व्रुक्श पडल्यावर जमीन हलते" असे?
१९८४ बद्दल कोन्ग्रेस पक्षाने
१९८४ बद्दल कोन्ग्रेस पक्षाने अनेक वेळा माफी मागून झाली आहे.
मोदी २००२ बद्दल माफी मागतोय असा एखादा प्रसंग सांगा.
उदारता आणि सहिष्णुता म्हणजे
उदारता आणि सहिष्णुता म्हणजे सेक्यूलरिझ्म नव्हे. ऐहिक किंवा भौतिक बाबीत धर्माचे / धार्मिक कर्मकांडाचे नियम न आणणे म्हणजे सेक्यूलरिझ्म. हे समजवून सांगण्यासाठी एक नेहमी वापरले जाणारे घिसेपिटे उदाहरण म्हणजे : समजा मला माझ्या घराभोवती कुंपण उभारायचे असेल तर मला त्या बाबतीतले सर्व नागरी नियम पाळावे लागतील. एखाद्या धर्मगुरूची आद्न्या चालणार नाही किंवा पुरेशी नाही. या प्रकारच्या भौतिक आणि ऐहिक गोष्टीत धर्माचा हस्तक्षेप नसणे म्हणजे सेक्यूलरिझ्म किंवा स्थूल मानाने इहवाद असे म्हणायचे होते.
बरोबर
बरोबर
"मोदी २००२ बद्दल माफी मागतोय
"मोदी २००२ बद्दल माफी मागतोय असा एखादा प्रसंग सांगा"---> खरंतर २००२ साठी काँग्रेसनेच माफी मागायला हवी. मागून सुद्धा मदत न केल्याबद्दल. या व्हिडिओची पहिली ४ मिनिटे ऐका म्हणजे समजेल. गैरसमज दूर होतील आपले.
https://www.youtube.com/watch?v=FQvOnvJ9EZ8
हीरा, अतिशय उत्तम, संतुलित
हीरा, अतिशय उत्तम, संतुलित विश्लेषण.
सेक्युलॅरिझम या शब्दाची
सेक्युलॅरिझम या शब्दाची कोणतीही अधिकृत व्याख्या भारताच्या राज्यघटनेत किंवा कोणत्याही कायद्यात केलेली नाही असं मला वाटतंय. सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष असा घेतला जातो. थोडक्यात भारत हा देश कोणतंही धार्मिक राष्ट्र नाही. कुठल्याही धर्माच्या कायद्याशिवाय हे राष्ट्र चालणार आहे. हे कसे चालेल तर बहुलवादाचा आदर केला जाईल. बहुलवाद म्हणजेच अनेकतेत एकता असे आपण म्हणतो.
थोडक्यात वेगवेगळ्या विचारांचे, धर्माचे, तत्त्वांचे जे जे राष्ट्र असेल त्या प्रत्येक राष्ट्राला देशात (स्टेट) जागा आहे आणि तिचा आदर केला जाईल. याला आपण सर्वधर्मसमभाव म्हणूनही ओळखतो.
धर्मनिरपेक्षते मधेच धर्माच्या पालनाची सूट दिलेली आहे. मात्र कुणालाही आपला धर्म दुस-यावर थोपवता येत नाही. स्टेट म्हणजे देशाच्या मालकीच्या क्षेत्रात कुणालाही स्वतःचा धर्म आणता येत नाही. यासाठीच सरकारी कार्यालयात देवी देवतांच्या तसविरी नसतात. कारणे ते धर्मनिरपेक्ष असते. एकतर कुठल्याचे धर्माचे नाही किंवा लावायचेच तर सर्वच धर्माचे लावा असाही अर्थ घेतला जातो. नीट व्याख्या नसल्याने गोंधळ होतो इतकेच.
Pages