रिक्षा, रिक्षाचालक आणि मला आलेले वाईट अनुभव

Submitted by VB on 25 February, 2018 - 13:56

रिक्षा चालकांची मुजोरी, उद्दामपणा न अनुभवलेला अपवादाने सुद्धा सापडेल कि नाही माहित नाही.

तर बहुतांशी नोकरदारांप्रमाणे मीही रोज ट्रेन आणि रिक्षाने प्रवास करते , अन इतरांसारखी चांगलीच रुळलीसुद्धा आहे. पण तरी कधी कधी एखाद्या वेळी येतो वाईट अनुभव. असाच एक वाईट अनुभव गेल्या आठवड्यात आला. त्याबरोबर एक असाच खूप वर्षांपूर्वी आलेला आणि आता विस्मरणात गेलेला अनुभवही आठवला.

तर झाले काय , जवळपास दहा वर्षांपूर्वी, नवीन नवीन नोकरीला लागले होते. रोजची यायची, जायची वेळ ठरली होती पण एक दिवस ऊशीर झाला, ऊशीर म्हणजे खूप जास्तच, ऑफीसातच दहा वाजले रात्रीचे. खूप टेन्शन आले कारण त्याकाळी रात्री नऊ साडेनऊ नंतर बर्यापैकी वर्दळ शांत झालेली असायची.. म्हणून सरळ रिक्षा करून रेल्वे स्टेशनला आली अन तिथून ट्रेन ने ठाण्याला. यात अकरा वाजले होते. इतका ऊशीर झाल्यामुळे मी बसच्या ऐवजी रिक्षाने घरी जायचे ठरवले अन लगेच एक रिक्षासुद्धा मिळाली, त्यामुळे जरा बरे वाटले. पण हे समाधान क्षणिक निघाले. स्टेशन सोडल्यावर रिक्षा रोजचा मार्ग सोडुन दुसऱ्या भलत्याच रस्त्याला वळली. मी मनातून घाबरली पण वरवर तसे न दाखविता रिक्षावाल्याला जाब विचारून रिक्षा मेन रोड वर घ्यायला सांगितले तर त्याने त्यावर मलाच उद्धटपणे ऐकविले कि हा शॉर्टकट आहे अन तुम्हाला बरोबर सोडेन मी. मला माहित होते की हा शॉर्टकट नाहीये पण घाबरले होते त्यात माझ्याकडे तेव्हा मोबाइल हि नव्हता काय करावे काही सुचत नव्हते. थोड्यावेळाने रिक्षा एका बार समोर थांबली अन एक बाई रिक्षात येऊन बसली. मी अजूनच घाबरले पण शांत बसून होते काहीही न सुचल्यामुळे. मध्ये अजून थोडावेळ गेला पण तो थोडासा वेळ अगदी एका युगासारखा वाटत होता, त्यात ती बाई अन रिक्षावाला दोघांचे अगदी घाणेरड्या भाषेत बोलणे चालू होते, ते तर अगदी ऐकवत हि नव्हते. शेवटी रिक्षा त्या छोट्या गल्ल्या सोडून ओळखीच्या रस्त्यावर आली अन सोबत मला थोडा धीरही. रिक्षावाल्याला म्हटले मला इथेच उतरायचे आहे आधी तो नाही बोलला पण थांबला. मी जिथे उतरली होते तो रस्ताही सामसून होता, तशीच सरळ चालायला लागले. जवळपास दहा मिनिटे चालल्यावर एक बस दिसली जी माझ्या घरापर्यंत जाणारी होती, हात दाखविला अन थांबवली , कशीबशी पोहचली एकदाची घरी.
त्या दिवसापासून ठरविले होते की कधीही रिक्षा करायची नाही किमान एकटी असताना तर नाहीच नाही.
मधली खूप वर्षे ठरविल्याप्रमाणे टाळत आली रिक्षा, पण हळू हळू दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने परत एकदा रिक्षा प्रवास सुरु झाला.

गेल्या आठवड्यात सुद्धा एक दिवस असाच ऊशीर झाला ऑफिसमध्ये. साडेनऊ होत आले होते. हल्ली इतका ऊशीर होणार असेल तर सरळ कॅब बुक करते पण त्यादिवशी गडबडीत राहून गेले. म्हटले आधीच ऊशीर झालाय त्यात आता कॅब बुक करुन वाट बघत बसण्यापेक्षा सरळ जावे रिक्षाने स्टेशन पर्यंत. अन निघाली लगेच, ऑफिस समोर येताच लगेच एक रिक्षाही मिळाली . खरेतर लगेच रिक्षा मिळाली म्हणून मी खुष झाले पण तो आंनद काही फार काळ टिकला नाही. रिक्षात बसल्या बसल्या आधी घरी फोन करून मी निघाल्याचे आणि ऑफिसमध्ये फ्रेंडला मला रिक्षा मिळाल्याचे कळविले. अन मग इतका वेळ जे लक्षात आले नव्हते ते जाणविले कि रिक्षा वाला प्यायलाय अन आरश्यातून सारखा मागे बघतोय. एकदोनदा तर सरळ मागे वळून बघत होता.
आताही इथे मधेच उतरणे शक्य नव्हते कारण दुसरी रिक्षा मिळेल याची खात्री नाही अन तो रस्ताही इतका काही सेफ नाही म्हणून ठरविले कि जावे पुढे. पण मग लगेच माझ्या मित्राला मेसेज करून त्याला थोडा अंदाज दिला आणि फोन केला. त्यानंतर स्टेशन येई पर्यंत आम्ही ऊगाचच फोन वर गप्पा मारत होतो. त्यामुळे किमान मला थोडे बरे वाटले आणि, भीती, जी आधीच्या अनुभवामुळे मनात होती ती ही जरा कमी झाली. पूर्णवेळ मनात स्वतःला बजावत होते की बी अलर्ट अँड पोजिटीव्ह. शेवटी आले स्टेशन अन मी उतरले एकदाची.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेषदादाचा मागचा प्रतिसाद विषयाला धरून सांगितलेला अनुभव होता.त्यातल्या इतर तपशीलांची उगाच चिरफाड केली जाते आणि मग धागा मूळ विषय सोडून भरकटतो.कुत्रा चावल्यावर चौदा इंजेक्शन घेतात हे माहीत होत.पाच घेतात ते काही महिन्यांपूर्वी कळल.

ऋन्मेषदादाचा मागचा प्रतिसाद विषयाला धरून सांगितलेला अनुभव होता.त्यातल्या इतर तपशीलांची उगाच चिरफाड केली जाते आणि मग धागा मूळ विषय सोडून भरकटतो
>>
असेच बरे काही ऋन्मेषदादा देखील करतो. असो तुमच्या ३ आठवडे ५ दिवसांच्या आयुष्यात हा अनुभव आला नसावा.

<< अवांतर मोड ऑन >>
>>ऋन्मेषदादाचा मागचा प्रतिसाद विषयाला धरून सांगितलेला अनुभव होता
बापरे या कोण ताई आहेत ज्या ऋन्मेसला दादा म्हणत आहेत ? Uhoh
की तो दादा (भाई) कॅटेगरीत गेला आहे आणि गँग बनवत आहे ? Wink
<< अवांतर मोड ऑफ >>

अवांतर
मी आतापर्यंत जे धागे वाचले त्यात बर्याच ठिकाणी मला असच दिसल.बाकी तुम्ही म्हणता ते देखिल बरोबर असू शकेल.पण अनेकदा त्याचा मुद्दा बरोबर असूनही उगाचच विरोध करायचा हे सुद्धा दोन तीन ठिकाणी दिसल आहे.तो माझ्यापेक्षा मोठा आहे म्हणून मी त्याला दादा म्हणाले.
अवांतर समाप्त.

मी वर जी लिन्क दिलेली आहे त्यात एक शंका आहे,
सुरूवातील हाताने ओढण्याची रिक्षा शेवटी अचानक सायकल रिक्षा कशी काय बनली ? Uhoh

आजच आईला आलेला रिक्षावल्याचा चांगला अनुभव... निगडीहून पुण्यात काही कामासाठी जायचे होते. ती बर्ञाचदा ओला, उबर करते. पण आज संप आहे बहुतेक. म्हणून नाक्यावरच्या रिक्षावाल्याला विचारले पुण्यात येणार का? तर हो म्हटला आणी काम होईपर्यंत थांबतो असंही सांगितलं १ तास लागला कामासाठी आणि रिटर्न घेऊन सुद्धा आला. ५०० रु घेतले. आता हे कमी का जास्त माहित नाही सध्याच्या रेटप्रमाणे पण आशा आहे फसवलं नसेल.

पुण्यात म्हणजे नक्की कुठवर नेले होते साहेबांनी? अगदि कोथरुड म्हटले तरी एक मार्गी ३०० सहज होतात.
चांगलंय डिल.
माझ्या मैत्रिणीच्या आईने एक रिक्षावाला ठरवून ठेवला आहे. जेव्हा गरज लागते तेव्हा फोन करून बोलवते. आणि अपरात्री पण स्टेशन वरून कुणाला आणायचे असेल तर त्याला आधी फोन करून ठेवते.
शक्यतो रिक्षावाले आपला धंदा आपल्या राहत्या एरियाच्या आसपासच करतात. त्यामुळे येणे शक्य असावे बोलवल्यावर.

५०० बरोबर किंवा किंचीत कमीच आहेत.
निगडी पासून कोणत्याही पुणे सिटित यायला किमान १५ ते १८ किमि वन वे अंतर असेल.

काल एका मिटींगसाठी तुर्भे एमआयडीसीत गेले होते, तिथेले काम झाले तेव्हा दुपारचे दोन वाजले. जिथे गेले होते तिथुन तुर्भे रेल्वे स्टेशन जवळच होते सो रिक्षाने जावे लागते. तसे हल्ली मी रिक्षाने जातच नाही, अन जरी गेले तरी एकटीने जात नाही. पण आता काय करावे हा प्रश्न पडला. पण मग म्हटले जाऊ दे १० मिनीटाचा तर रस्ता आहे, अन ऊनही खुप होते सो एक रिक्षा थांबवली. तसे पाहता तुर्भ्याला काही मी पहिल्यांदा आले नव्हते पण हा भाग माझ्यासाठी नविन होता, त्यात येताना वाशी वरुन आले होते सो हा रस्ता माहीत नव्हता म्हणुन थोडी एक्स्ट्रा सावध होते.
थोडे अंतर गेल्यावर रिक्षावाल्याने रिक्षा एका गल्लीत वळवली. तेव्हा मी त्याला बोलली की सरळ रस्ता सोडुन अ‍ॅटो आत का वळवली तर म्हणे हा शॉर्टकट आहे, पण मला ते खटकले म्हणुन मी त्याला ओरडली अन रिक्षा परत मेन रोडवर घ्यायला सांगीतले, तरी त्याचे तेच चालु, तेव्हा त्याला बोलली की माझे GPS ऑन आहे अन आता मी पोलिसांना फोन करतीये, तेव्हा त्याने रिक्षा परत मेनरोडवर वळवली. तेव्हा खुप घाबरले होते पण भितीपेक्षाही संताप / राग जास्त आला होता . स्टेशनला ऊतरल्यावर खुप ओरडली त्याला, तेव्हा तो सॉरी बोलला अन परत परत सांगत कि तो शॉर्टकटच होता. खरे खोटे माहीत नाही, पण दुपारच्या वेळी सामसुम रस्त्याला, एका लेडी पॅसेंजरला तीला न विचारता शॉटकटने नेणे चुकीचेच नाही का??

हे मी ईथे याकरीता लिहीलेय की असे कदाचित दुसर्या कुणा सोबत घडलेच तर यातुन काही मदत झाली तर बरेच

भित्या पाठी ब्रह्म राक्षस !

जर जीपीएस ऑन करता येते तर जरा त्या सो कॉल्ड शॉर्ट कट बाबत शहानिशा करायला गूगल मैपही पहायचा नं .... अर्थात अनोळखी रस्ता निवडणे चुकीचे आहे त्यामुळे हाइवे लॉन्ग कट ठरला तरी सुरक्षित अन् श्रेयस्कर पण म्हणून लगेच रिक्षा ड्रायव्हरला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेले पटले नाही.

पण मला ते खटकले म्हणुन मी त्याला ओरडली अन रिक्षा परत मेन रोडवर घ्यायला सांगीतले, तरी त्याचे तेच चालु>>>>
अशावेळी कोनाला कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊ कि नको याचा विचार करत बसण्यापेक्षा पुढे आलेली प्रतिक्रियाच योग्य होती. सध्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना बघता विषाची परीक्षा न घेतलेलीच बरी.

मुंबई चे रिक्षावाले आणि बस वाले महाराष्ट्र मधील बाकी शहरांपेक्षा नक्कीच शिस्तबध्द होते (आता नाहीत), त्याला कारण मुंबई पोलिस .
मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिस शी होत होती
त्या मुळे ४ सीट घेणे, मीटर न वापरणे अशा घटना दुर्मिळ पने पाहायला मिळायच्या .
पण आता त्यांना सुधा लाचघोरी मुळे ग्रहण लागले आहे .
बाकी लोक परिस्थिती बघून नियम पाळतात. इथे सर्व वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवण्यात एक्स्पर्ट असणारे दुबई सारख्या ठिकाणी गेले की सर्व नियम कसून पाळतात

रिक्षा आणि कॅब चालक सिग्नल ला थांबणं टाळायला आड मार्गाने नेतात.कधीकधी तो मार्ग शॉर्ट कट पण बसतो.अगदी घाण आणि लांबचा वळसा असतो.पण शॉर्टकट्स म्हणजे शॉर्टकट्स. तत्व म्हणजे तत्व. एकाने औंध मध्ये असताना म्हाळुंगे मधून ब्लु राज हिंजवडी ला नेऊ का विचारलं होतं. त्याला बिल जास्त झालं तरी चालेल पण नेहमीच्या चेस्ट हॉस्पिटल-वाकड फाटा-निळख-हिंजवडी मार्गाने ने सांगितलं.म्हाळुंगे रस्ता ओस आणि खडबडीत आहे.

एक मनुष्य अखंड फोन हातात धरून नातेवाईकांशी बोलत होता.सॉस बटन दाबलं नाही कारण घर जवळ होतं. मग तो मध्ये एक यु टर्न वाचवायला भर हायवे वर रोंग साईड वळायला लागला.त्याला तोंडाने पुढून यु टर्न घे म्हटलं, थांबा हो म्हणून दामटून जायला लागला.हातात फोन कानाला चालू होताच.त्याला खांद्यावर चापट मारून आताच्या आता इथे थांब आणि पुढून यु टर्न घे सांगितलं.मग पुढे 5 मिनिट तो 'माझं मूल आजारी आहे म्हणून रोंग साईड घेतली, माझ्या सारख्या गरिबाला मारायचा तुम्हाला काय हक्क आहे' म्हणून भांडला(it was just a tap on shoulder as he was on phone and not listening anyway).
घराच्या गल्लीत उतरले, आणि मग 1 स्टार रिव्ह्यू देऊन ओला ला फोन लावून पूर्ण किस्सा समजावला.

काल एका मुलीने माझा फोटो काढला. https://www.maayboli.com/node/69985 >> काय योगायोग आहे! रिक्षाच्या धाग्यावर रिक्षा फिरवणे म्हणजे त्या इन्सेप्शन प्रमाणे एक 'रिक्सेप्शन' म्हणायला हरकत नाही. Happy

मला मात्र टॅक्सी आणि रिक्षा वाल्यांच्या काही वाईट अनुभव बरोबर चांगला सुद्धा अनुभव आला .
पावसाचे दिवस होते आणि मला उशीर झाला होता रात्रीचे 1 ते 1.30 वाजला होता .
मी मुलुंड स्टेशन बाहेर कोणते वाहन मिळत की नाही त्याची वाट बघत होतो अजुन सुद्धा 3/4 लोक होती .
रस्त्यावर एक सुद्धा वाहन नव्हतं तेवढ्यात 1 टॅक्सी वाला आला तो वैशाली नगर ल जात होता त्यांनी सर्वांना बोलावून गाडीत बसवले आणि वैशाली ल सोडले आणि महत्वाचं म्हणजे पैसे सुधा नाही घेतले .
पैसे का नाही घेत विचारल तर त्याचे उत्तर मी खाली गाडी घेवून घरीच चाललो होतो

Pages