रिक्षा चालकांची मुजोरी, उद्दामपणा न अनुभवलेला अपवादाने सुद्धा सापडेल कि नाही माहित नाही.
तर बहुतांशी नोकरदारांप्रमाणे मीही रोज ट्रेन आणि रिक्षाने प्रवास करते , अन इतरांसारखी चांगलीच रुळलीसुद्धा आहे. पण तरी कधी कधी एखाद्या वेळी येतो वाईट अनुभव. असाच एक वाईट अनुभव गेल्या आठवड्यात आला. त्याबरोबर एक असाच खूप वर्षांपूर्वी आलेला आणि आता विस्मरणात गेलेला अनुभवही आठवला.
तर झाले काय , जवळपास दहा वर्षांपूर्वी, नवीन नवीन नोकरीला लागले होते. रोजची यायची, जायची वेळ ठरली होती पण एक दिवस ऊशीर झाला, ऊशीर म्हणजे खूप जास्तच, ऑफीसातच दहा वाजले रात्रीचे. खूप टेन्शन आले कारण त्याकाळी रात्री नऊ साडेनऊ नंतर बर्यापैकी वर्दळ शांत झालेली असायची.. म्हणून सरळ रिक्षा करून रेल्वे स्टेशनला आली अन तिथून ट्रेन ने ठाण्याला. यात अकरा वाजले होते. इतका ऊशीर झाल्यामुळे मी बसच्या ऐवजी रिक्षाने घरी जायचे ठरवले अन लगेच एक रिक्षासुद्धा मिळाली, त्यामुळे जरा बरे वाटले. पण हे समाधान क्षणिक निघाले. स्टेशन सोडल्यावर रिक्षा रोजचा मार्ग सोडुन दुसऱ्या भलत्याच रस्त्याला वळली. मी मनातून घाबरली पण वरवर तसे न दाखविता रिक्षावाल्याला जाब विचारून रिक्षा मेन रोड वर घ्यायला सांगितले तर त्याने त्यावर मलाच उद्धटपणे ऐकविले कि हा शॉर्टकट आहे अन तुम्हाला बरोबर सोडेन मी. मला माहित होते की हा शॉर्टकट नाहीये पण घाबरले होते त्यात माझ्याकडे तेव्हा मोबाइल हि नव्हता काय करावे काही सुचत नव्हते. थोड्यावेळाने रिक्षा एका बार समोर थांबली अन एक बाई रिक्षात येऊन बसली. मी अजूनच घाबरले पण शांत बसून होते काहीही न सुचल्यामुळे. मध्ये अजून थोडावेळ गेला पण तो थोडासा वेळ अगदी एका युगासारखा वाटत होता, त्यात ती बाई अन रिक्षावाला दोघांचे अगदी घाणेरड्या भाषेत बोलणे चालू होते, ते तर अगदी ऐकवत हि नव्हते. शेवटी रिक्षा त्या छोट्या गल्ल्या सोडून ओळखीच्या रस्त्यावर आली अन सोबत मला थोडा धीरही. रिक्षावाल्याला म्हटले मला इथेच उतरायचे आहे आधी तो नाही बोलला पण थांबला. मी जिथे उतरली होते तो रस्ताही सामसून होता, तशीच सरळ चालायला लागले. जवळपास दहा मिनिटे चालल्यावर एक बस दिसली जी माझ्या घरापर्यंत जाणारी होती, हात दाखविला अन थांबवली , कशीबशी पोहचली एकदाची घरी.
त्या दिवसापासून ठरविले होते की कधीही रिक्षा करायची नाही किमान एकटी असताना तर नाहीच नाही.
मधली खूप वर्षे ठरविल्याप्रमाणे टाळत आली रिक्षा, पण हळू हळू दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने परत एकदा रिक्षा प्रवास सुरु झाला.
गेल्या आठवड्यात सुद्धा एक दिवस असाच ऊशीर झाला ऑफिसमध्ये. साडेनऊ होत आले होते. हल्ली इतका ऊशीर होणार असेल तर सरळ कॅब बुक करते पण त्यादिवशी गडबडीत राहून गेले. म्हटले आधीच ऊशीर झालाय त्यात आता कॅब बुक करुन वाट बघत बसण्यापेक्षा सरळ जावे रिक्षाने स्टेशन पर्यंत. अन निघाली लगेच, ऑफिस समोर येताच लगेच एक रिक्षाही मिळाली . खरेतर लगेच रिक्षा मिळाली म्हणून मी खुष झाले पण तो आंनद काही फार काळ टिकला नाही. रिक्षात बसल्या बसल्या आधी घरी फोन करून मी निघाल्याचे आणि ऑफिसमध्ये फ्रेंडला मला रिक्षा मिळाल्याचे कळविले. अन मग इतका वेळ जे लक्षात आले नव्हते ते जाणविले कि रिक्षा वाला प्यायलाय अन आरश्यातून सारखा मागे बघतोय. एकदोनदा तर सरळ मागे वळून बघत होता.
आताही इथे मधेच उतरणे शक्य नव्हते कारण दुसरी रिक्षा मिळेल याची खात्री नाही अन तो रस्ताही इतका काही सेफ नाही म्हणून ठरविले कि जावे पुढे. पण मग लगेच माझ्या मित्राला मेसेज करून त्याला थोडा अंदाज दिला आणि फोन केला. त्यानंतर स्टेशन येई पर्यंत आम्ही ऊगाचच फोन वर गप्पा मारत होतो. त्यामुळे किमान मला थोडे बरे वाटले आणि, भीती, जी आधीच्या अनुभवामुळे मनात होती ती ही जरा कमी झाली. पूर्णवेळ मनात स्वतःला बजावत होते की बी अलर्ट अँड पोजिटीव्ह. शेवटी आले स्टेशन अन मी उतरले एकदाची.
दुसर्या दिवशीपासून संप
दुसर्या दिवशीपासून संप पुकारून सर्व रिक्षा बंद पडतील
>>>
मग बस आहेत, ओला उबेर आहेत, स्वतःच्या दुचाकी, चारचाकी आहेत, पायीपायी जाण्याचा पर्याय आहे. तीन हजार सहाशे प्रवासी घरात बसतील असे होणार नाही.
अगदी नोटाबंदीची आठवण झाली.
अगदी नोटाबंदीची आठवण झाली. धन्यवाद बट नो धन्यवाद.
नोटबंदीचे समजले नाही.
नोटबंदीचे समजले नाही.
त्यातून होणार्या त्रासाबद्दल बोलत आहात का?
तर स्वत:ला काहीही त्रास न होता जग सुधरावे ही अपेक्षा नेपोलिअनने सुद्धा कधी ठेवली नसेल.
थोडा तर उचलावा लागेलच. पण काय तो एकदाच. जो पर्यंत ग्राहक शक्ती दाखवली जात नाही तोपर्यंत हे भोग आहेतच !
प्रत्येक धाग्यावर राजकारण
प्रत्येक धाग्यावर राजकारण आलेच पाहिजे का?
माझ्या माहितीप्रमाणे बरेच
"माझ्या माहितीप्रमाणे बरेच ठिकाणी शेअर रिक्षा आणि मीटर रिक्षाची लाईन वेगळी असते. वाशीलाही तसेच आहे. तुम्ही शेअर रिक्षाच्या लाईनीत शिरून त्याला चल मीटरने म्हणून सक्ती करू शकता का?"
रिक्शा हात दाखवून थांबवली होती..बाकी चालू दया....
मला वाईट Sad वाटले... , बळी
मला वाईट Sad वाटले... , बळी तो कान पिळी. त्याने केलेला अडमुढेपणा आणि तुम्ही दिलेली ट्रिट्मेन्ट खुप विषम वाटली. >> +१
बरेचदा लोक मनापासून वाईट नसतात. पण एकूण त्या फिल्डमधली स्टॅन्डर्ड प्रॅक्टीस (लीगल असो का इल्लीगल) करत असतात. ती प्रॅक्टीस योग्य-अयोग्य आहे का हे बघायचा विचार त्यांना कधी शिवलेला नसतो. >> +१
च्र्प्स नोटाबंदीच्या
च्र्प्स नोटाबंदीच्या त्रासाच्या उल्लेखात तुम्हाला राजकारण आढळत असेल तर दुर्दैव आहे. असो.
>> मला पण नाही आवडले आणि
>> मला पण नाही आवडले आणि डेंजर पण आहे. समोरच्याची मनस्थिती काय आहे हे कोणालाच कळू शकत नाही.
++१
>> यापेक्षा फालतू कारणाने घटना घडलेल्या वाचल्या आणि पहिल्या आहेत
बऱ्याच वर्षांपूर्वी पुण्यात एका रिक्षावाल्यात आणि प्रवाशात लागलेले भांडण विकोपाला जावून अचानक त्याने रिक्षातला पेट्रोलचा कॅन त्या प्रवाश्यावर ओतायचा प्रयत्न केल्याची घटना आठवली. आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा करून त्याला रोखल्याने पुढचा अनर्थ टळला.
मी एकदाच हातघाईवर उतरलो होतो. वरती एका प्रतिसादात ज्या हैदराबादच्या रिक्षावाल्याचा उल्लेख केला आहे त्याने हद्द केली होती तेंव्हा. पेट्रोलसाठी म्हणून पैसे घेतले आणि उतरायचे ठिकाण (माझी कंपनी) आल्यावर भाडे सोडून बाकी पैसे हा द्यायलाच तयार नाही. आपल्याकडे काहीच पैसे नाहीत म्हणून निर्लज्जपणे हसला तेंव्हा माझा संयम सुटला. सरळ सरळ त्याने मला उल्लू बनवले होते. पण तिथे कंपनीचे सेक्युरिटी गार्डस तैनात होते त्यामुळे त्यांच्यासमोर तो मला काही करू शकणार नाही आणि मी त्यानंतर पुन्हा हैद्राबादला येणार नाही या दोन गोष्टींची आधी खात्री मनात करून घेतली आणि तिथल्यातिथे त्याला जोरात दोनतीन कानशिलात हाणल्या होत्या. अजूनही मला ते आठवले कि घृणा वाटते कि कधीकाळी ह्या पातळीवर पण आपल्याला उतरायवे लागले होते.
काल की परवाच वाचली ही बातमी,
काल की परवाच वाचली ही बातमी, प्रवाशाने जादा वीस रूपये जे रिक्षावाल्याने आयत्या वेळी मागितले, ते द्यायला नकार दिला म्हणून प्रवाशाला बेदम मारहाण केली. ही सरळसरळ गुंडगिरी झाली.
सध्या रोड रेज फाईट्स मध्ये
सध्या रोड रेज फाईट्स मध्ये जीव जातायत.
ऑफिसात, हॉटेलात, टेली मार्केटिंगमध्ये सर्व अपमान पचवून नम्र बोलणारा माणूस रोड रेज मध्ये आपला संताप काढतो.
शक्यतो रोड रेज मध्ये इगो, आपण (आपला मुद्दा पूर्ण न्यायाचा असताना) जिंकलेच पाहिजे असा आग्रह धरता येत नाही.समोरची पार्टी बघून लढा का तह ठरवावे लागते.
It is not important to win every fight in life.
सध्या रोड रेज फाईट्स मध्ये
सध्या रोड रेज फाईट्स मध्ये जीव जातायत.
ऑफिसात, हॉटेलात, टेली मार्केटिंगमध्ये सर्व अपमान पचवून नम्र बोलणारा माणूस रोड रेज मध्ये आपला संताप काढतो.
शक्यतो रोड रेज मध्ये इगो, आपण (आपला मुद्दा पूर्ण न्यायाचा असताना) जिंकलेच पाहिजे असा आग्रह धरता येत नाही.समोरची पार्टी बघून लढा का तह ठरवावे लागते.
It is not important to win every fight in life. >>> अगदी अगदी. टाईमपास की दुनियादारीच्या वेळेला एक माणुस तिकीट च्या रांगेत घुसला तर त्याला रांगेत या सांगणार्या एका मुलाला सरळ चाकु ने खुपसुन मारल्याची घटना आठवली,
ठाण्यात एकदा साधारण ३-४ वर्षांपुर्वी, कन्या शाळे जवळुन पायी जात होते, तेव्हा एका रिक्षाचा हलकासा धक्का बसला, मी रागावुन त्याच्याकडे पाहिले अन अजुन जरा आतल्या बाजुने चालायला लागली, तर परत एकदा धक्का लागला, आता मला कळले की हे तो मुद्दाम करतोय. तीथेच बाजुला एक हवालदार उभा होता हे सगळे बघत. मी सरळ गेले त्याच्याकडे अन बोलली की हे पाहुनही की तो रिक्षावाला असे मुद्दाम कर्तोय तरी तुम्ही शांत का, की मी समोरुन काही बोलायची वाट बघत होता, की काहीतरी भयंकर प्रकार व्हायची वाट बघत होता की त्याचा हफ्ता पोचलाय मग तो काहिही का करेना. तसे त्या हवालदाराने रिक्षावाल्याला फक्त ओरडा दिला अन मलाच बोलतो की तुम्ही बाईमाणुस आहात म्हणुन मी काही बोलत नाहीये पण असे परत कुठल्याच पोलीसांना असे बोलु नका.
तेव्हा मी खुप रागात होते तर त्यालाच खुन्नस देवुन निघुन आले होते. पण नंतर विचार केल्यावर थोडी भिती वाटलीच.
रोड रेज --- भ यंकर
रोड रेज --- भ यंकर
https://maharashtratimes
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/ola-uber...
गेल्या काही महिन्यांपासून रोडावलेला व्यवसाय, हमीपेक्षा कमी मिळणारे उत्पन्न, चुकीच्या पद्धतीने काळ्या यादीत टाकणे आदी वेगवेगळ्या मागण्यांसाठी ओला आणि उबर टॅक्सीचालक सोमवारी एकत्र आले. ओला, उबर कंपन्यांचे सहयोगी असलेल्या सुमारे ४५ हजार चालकांनी सोमवारी ऑफलाइन आंदोलन पुकारल्याने मुंबईसह अन्य काही शहरांमध्ये सकाळपासून सर्वच गाड्या रस्त्यावरून गायब झाल्या होत्या.
ओला , उबेर बंद त्यात रेल रोको
ओला , उबेर बंद त्यात रेल रोको
प्रवास्यांचे प्रचंड हाल होताहेत
महिलांनी महिलांसाठी मुंबईत
महिलांनी महिलांसाठी मुंबईत सुरु केलेली Taxi सेवा
http://viiracabs.com
ओला / उबर चा संप संपला का??
ओला / उबर चा संप संपला का?? नसेल तर कधी संपणार आहे??? आजही कायच्या काय दर दिसत होते!
हा धागा वाचला आणि गेल्या दोन
हा धागा वाचला आणि गेल्या दोन तीन दिवसात हा अनुभव दोनदा आला. पण दोन्ही वेळा रांगेतील मागच्या रिक्शाचालकांनी लगेच माझ्या रिक्शात बसा म्हणून सोडले. हे अनुभव गावातले (सदाशिव/शुक्रवार वगैरे). वर "ह्यांना माज आलाय, फुकट बसून टाइमपास करतात" वगैरे डायलॉग पण मारले ज्यांनी नाही म्हटले त्यांना उद्देशून.
काही रिक्षावाले असतात ही
काही रिक्षावाले असतात ही चांगले पण पुलंच्या भाषेत सांगायचं झालं तर ते आपल्याला लाभत नाहीत.
मला एकदाच एक रिक्षावाले काका लक्ष्मी रोड्वरून रात्री ९.३० ला त्यांना स्वतःला घरी (भुसारी कॉलनी) जायचे असून मला सोडायला आले होते. आणि ते चांगल्या कंपनीतून रिटायर झाले होते आणि छंद म्हणून रिक्षा चालवत होते.
२०११ पुर्वी मारु आणि ४४४४ अशी
२०११ पुर्वी मारु आणि ४४४४ अशी काहितरी कूल कॅबची सेवा होती. देव कृपेने भयनक अनुभव असा नाही आला पण बुकींग करण्याचा त्रास होता.
झंपी ते मारू नसून मेरु कॅब
झंपी ते मारू नसून मेरु कॅब असे आहे.
अॅप बेस्ड टॅक्सी सर्विसबद्दल - हे देखील पाहा:-
https://www.youtube.com/watch?v=InY3pQ3yJ2U
https://www.youtube.com/watch?v=CiEB3zPlIS8
मेरू आणि टॅब कॅब महाग पडायचे.
मेरू आणि टॅब कॅब महाग पडायचे.. ओला जर डिमान्ड नसेल तर साध्या टॅक्सीपेक्षाही स्वस्त पडते.. डिमान्ड असेल तर गपगुमान साधी टॅक्सी करायची. मला महिन्यातून तीनचारदा येऊन जाऊन लांबचा प्रवास करावा लागतो. आधी जिथे साध्या टॅक्सीचे पाचशे व्हायचे तिथे टॅबकॅबचे सातशे पर्यंत जायचे. तेच ओला टॅक्सीपेक्षा कमी साडेचारशे पावणेपाचशेमध्येही होते. मग एसी कॅब सोडून कोण जाणार खटारा टॅक्सीने. ते सुद्धा ओला दारात येणार. हिला शोधत नाक्यावर जा. डिमान्ड असेल तर मात्र सात आठशे सहज दाखवतात. मग इज्जतमध्ये पाचशेची टॅक्सी करून पैसे वाचवल्याचा आनंद घ्यायचा.
मागच्या शनिवारची गोष्ट. मित्राकडे नवी मुंबईला गेलो होतो. एकाला आला दारू पिण्याचा मूड. रात्री बारानंतर आम्ही दारू आणायला बाहेर पडलो. म्हटलं तर दहा मिनिटे चालत अंतर होते. पण रस्त्यात कुत्रे होते. म्हटलं रिक्षा करूया. तर रिक्षास्टँड जो फक्त शंभर पावलांवर होता त्या सामसूम रस्त्यातही कुत्रे होते. तिथून रिक्षावाला दिसतही नव्हता. मग बोलावणार कसे., . अश्यावेळी ओला रिक्षा धावून आली. रिक्षानेच गेलो. दारू घेतली. तिनेच परत आलो. मिनिमम ३४ रुपये नाईटचार्जसह घेतले. तेच चालत गेलो असतो तर चौदा ईंजेक्शन घ्यावे लागले असते.
तेच चालत गेलो असतो तर चौदा
तेच चालत गेलो असतो तर चौदा ईंजेक्शन घ्यावे लागले असते.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 22 March, 2018 - 00:40
ऋन्मेऽऽष, अरे कोणत्या जमान्यात जगतोस??? हल्ली फक्त ५ इंजेक्शन्स घ्यावी लागतात, ती सुद्धा दंडावर. पोटावर नाही. आणि ही ५ इंजेक्शन्स सुद्धा काही एकाच दिवशी घ्यायची नसतात!!!
(अधिक माहिती कुमार१, आ.रा.रा. वगैरे डॉक्टर मंडळी देऊ शकतील.)
विक्षिप्त मुलगा ओके..
विक्षिप्त मुलगा ओके.. माहितीबद्दल धन्यवाद. कुत्रे काही रोज रोज चावत नसल्याने ही माहिती मला नव्हती. तरीही पाच ईंजेक्शन सुद्धा फारच झाली. त्यापेक्षा या भटक्या कुत्र्यांना पकडून पकडून यांची नसबंदीच का नाही करून टाकत..
येनीवेज, सांगयचा मसुदा हा की ओला रिक्षामुळे रात्रीच्या वेळी माफक दरात कुत्र्यांपासून संरक्षण मिळायला सुरुवात झाली आहे.
शाहरुखखान तुला रोजरोज चावतो
शाहरुखखान तुला रोजरोज चावतो का? त्याच्याबद्दल इतकी माहिती आहे म्हणून सहज विचारले.
तो कुत्र्यांचा स्पेशल
तो कुत्र्यांचा स्पेशल स्क्वाॅड आहे. कुणीतरी त्यांच्या (कुत्रा) मित्राला दारूच्या नशेत उडवले. रात्रीच्या वेळी मदत न मिळाल्याने त्या बिचार्या कुत्र्याचे देहावसान झाले त्यामुळे त्याच्या मित्रांनी शपथ घेऊन दारूबंदी साठी ही मोहीम हाती घेतली. बरोब्बर दारू आणायला जाणारे लोक हेरायचे. त्यांना "दारू सोडायला लागणारे औषध " चावून इंजेक्ट करायचे.
पण "दारू साठी कुछ भी" करणारे त्यातूनही वाट काढतातच. ईच्छा तिथे मार्ग.
अवांतर : नशा ही नशाच असते मग ती दारूची असो वा धाग्याधाग्यावर टंकायची असो.
पाफा.
पाफा.
ऋन्मेषने कितीही विषयाला धरुन
ऋन्मेषने कितीही विषयाला धरुन सेन्सिबल प्रतिसाद लिहिला असेल तरी काही प्रतिसाद उसकवणारे, फाटे फोडणारे येतात हे बर्याच्दा नोटीस केलं आहे.
Submitted by पाथफाईंडर on 22
Submitted by पाथफाईंडर on 22 March, 2018 - 03:59>>>>
कुत्रे काही रोज रोज चावत
कुत्रे काही रोज रोज चावत नसल्याने ही माहिती मला नव्हती.
-- सस्मित, तुमच्या दृष्टीने ह्या वाक्यात उचकवण्यासारखे काहीच नाही, हो ना?
विक्षिप्त मुलगा ओके..
विक्षिप्त मुलगा ओके.. माहितीबद्दल धन्यवाद. कुत्रे काही रोज रोज चावत नसल्याने ही माहिती मला नव्हती. तरीही पाच ईंजेक्शन सुद्धा फारच झाली. त्यापेक्षा या भटक्या कुत्र्यांना पकडून पकडून यांची नसबंदीच का नाही करून टाकत.. >>
नसबन्दी केली तरिही इन्जेक्शन्स घ्यावीच लागतात
Pages