रिक्षा, रिक्षाचालक आणि मला आलेले वाईट अनुभव

Submitted by VB on 25 February, 2018 - 13:56

रिक्षा चालकांची मुजोरी, उद्दामपणा न अनुभवलेला अपवादाने सुद्धा सापडेल कि नाही माहित नाही.

तर बहुतांशी नोकरदारांप्रमाणे मीही रोज ट्रेन आणि रिक्षाने प्रवास करते , अन इतरांसारखी चांगलीच रुळलीसुद्धा आहे. पण तरी कधी कधी एखाद्या वेळी येतो वाईट अनुभव. असाच एक वाईट अनुभव गेल्या आठवड्यात आला. त्याबरोबर एक असाच खूप वर्षांपूर्वी आलेला आणि आता विस्मरणात गेलेला अनुभवही आठवला.

तर झाले काय , जवळपास दहा वर्षांपूर्वी, नवीन नवीन नोकरीला लागले होते. रोजची यायची, जायची वेळ ठरली होती पण एक दिवस ऊशीर झाला, ऊशीर म्हणजे खूप जास्तच, ऑफीसातच दहा वाजले रात्रीचे. खूप टेन्शन आले कारण त्याकाळी रात्री नऊ साडेनऊ नंतर बर्यापैकी वर्दळ शांत झालेली असायची.. म्हणून सरळ रिक्षा करून रेल्वे स्टेशनला आली अन तिथून ट्रेन ने ठाण्याला. यात अकरा वाजले होते. इतका ऊशीर झाल्यामुळे मी बसच्या ऐवजी रिक्षाने घरी जायचे ठरवले अन लगेच एक रिक्षासुद्धा मिळाली, त्यामुळे जरा बरे वाटले. पण हे समाधान क्षणिक निघाले. स्टेशन सोडल्यावर रिक्षा रोजचा मार्ग सोडुन दुसऱ्या भलत्याच रस्त्याला वळली. मी मनातून घाबरली पण वरवर तसे न दाखविता रिक्षावाल्याला जाब विचारून रिक्षा मेन रोड वर घ्यायला सांगितले तर त्याने त्यावर मलाच उद्धटपणे ऐकविले कि हा शॉर्टकट आहे अन तुम्हाला बरोबर सोडेन मी. मला माहित होते की हा शॉर्टकट नाहीये पण घाबरले होते त्यात माझ्याकडे तेव्हा मोबाइल हि नव्हता काय करावे काही सुचत नव्हते. थोड्यावेळाने रिक्षा एका बार समोर थांबली अन एक बाई रिक्षात येऊन बसली. मी अजूनच घाबरले पण शांत बसून होते काहीही न सुचल्यामुळे. मध्ये अजून थोडावेळ गेला पण तो थोडासा वेळ अगदी एका युगासारखा वाटत होता, त्यात ती बाई अन रिक्षावाला दोघांचे अगदी घाणेरड्या भाषेत बोलणे चालू होते, ते तर अगदी ऐकवत हि नव्हते. शेवटी रिक्षा त्या छोट्या गल्ल्या सोडून ओळखीच्या रस्त्यावर आली अन सोबत मला थोडा धीरही. रिक्षावाल्याला म्हटले मला इथेच उतरायचे आहे आधी तो नाही बोलला पण थांबला. मी जिथे उतरली होते तो रस्ताही सामसून होता, तशीच सरळ चालायला लागले. जवळपास दहा मिनिटे चालल्यावर एक बस दिसली जी माझ्या घरापर्यंत जाणारी होती, हात दाखविला अन थांबवली , कशीबशी पोहचली एकदाची घरी.
त्या दिवसापासून ठरविले होते की कधीही रिक्षा करायची नाही किमान एकटी असताना तर नाहीच नाही.
मधली खूप वर्षे ठरविल्याप्रमाणे टाळत आली रिक्षा, पण हळू हळू दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने परत एकदा रिक्षा प्रवास सुरु झाला.

गेल्या आठवड्यात सुद्धा एक दिवस असाच ऊशीर झाला ऑफिसमध्ये. साडेनऊ होत आले होते. हल्ली इतका ऊशीर होणार असेल तर सरळ कॅब बुक करते पण त्यादिवशी गडबडीत राहून गेले. म्हटले आधीच ऊशीर झालाय त्यात आता कॅब बुक करुन वाट बघत बसण्यापेक्षा सरळ जावे रिक्षाने स्टेशन पर्यंत. अन निघाली लगेच, ऑफिस समोर येताच लगेच एक रिक्षाही मिळाली . खरेतर लगेच रिक्षा मिळाली म्हणून मी खुष झाले पण तो आंनद काही फार काळ टिकला नाही. रिक्षात बसल्या बसल्या आधी घरी फोन करून मी निघाल्याचे आणि ऑफिसमध्ये फ्रेंडला मला रिक्षा मिळाल्याचे कळविले. अन मग इतका वेळ जे लक्षात आले नव्हते ते जाणविले कि रिक्षा वाला प्यायलाय अन आरश्यातून सारखा मागे बघतोय. एकदोनदा तर सरळ मागे वळून बघत होता.
आताही इथे मधेच उतरणे शक्य नव्हते कारण दुसरी रिक्षा मिळेल याची खात्री नाही अन तो रस्ताही इतका काही सेफ नाही म्हणून ठरविले कि जावे पुढे. पण मग लगेच माझ्या मित्राला मेसेज करून त्याला थोडा अंदाज दिला आणि फोन केला. त्यानंतर स्टेशन येई पर्यंत आम्ही ऊगाचच फोन वर गप्पा मारत होतो. त्यामुळे किमान मला थोडे बरे वाटले आणि, भीती, जी आधीच्या अनुभवामुळे मनात होती ती ही जरा कमी झाली. पूर्णवेळ मनात स्वतःला बजावत होते की बी अलर्ट अँड पोजिटीव्ह. शेवटी आले स्टेशन अन मी उतरले एकदाची.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२.

पुन्हा एकदा बस स्थानकापासून रिक्षा. आधी त्याला विचारले कि मीटर ने जायचे कि आधी ठरवून? (कारण काही शहरांत कुठे जायचे ते सांगून आधीच भाडे ठरवून रिक्षा घेतली जाते). तर त्याने कुठे जायचे विचारले. मी भागाचे नाव सांगितले. त्याने किती होतील ते सांगितले. झाले. जाताना वाटेत एक विचित्र प्रश्न याने केला. कोणत्या रस्त्याने जायचे? मला आश्चर्य वाटले म्हटले कोणत्याही जो जवळचा तुम्हाला वाटेल त्या रस्त्याने घ्या. भाडे तर आपले ठरलेलेच आहे. त्यावर काहीतरी थातूरमातूर बोलला. मी लक्ष दिले नाही. त्या भागात आल्यावर चौकातच याने रिक्षा थांबवली. मी म्हणालो अहो घर इथे नाही अजून थोडे पुढे जावे लागेल. तर म्हणाला भाडे आधीच ठरले असेल तर त्या भागातल्या बस स्टॉपपर्यंतच आम्ही सोडतो. घरापर्यंत जाण्यासाठी इथून तुम्हाला मीटरने जावे लागेल. Uhoh मला शॉकच बसला. मी म्हटले असे कुठे असते का? कुठल्याच शहरात असे करत नाहीत. आणि असेच होते तर तुम्ही मला आधी का नाही सांगितले? तर म्हणाला तुम्ही का नाही विचारले? Biggrin मग मला लक्षात आले हा मूर्ख आहे. याच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही. पैसे थोबाडावर फेकून निघून आलो. सुदैवाने घर तिथून फार लांब नव्हते म्हणून बरे.

३.

यावेळी जायचे ठिकाण तसे अगदी जवळ होते. पण माझ्याकडे जड बॅग होती म्हणून रिक्षा करण्याशिवाय पर्याय नव्हता. झाले. तिथे रिक्षांची रांग होती. यावेळी त्यांनी नियम केला होता म्हणे कि कुणीही प्रवासी आला कि रांगेतल्या पहिल्या रिक्षावाल्यानेच जायचे. त्यानुसार पहिला रिक्षावाला आला. पण त्याला जेंव्हा कळले कि मला जवळच जायचे आहे तेंव्हा तोंड काळे केले. पण नियम असल्याने त्याचा बहुतेक नाईलाज झाला होता. मग काय? पाचेक मिनिटातच ठिकाण आले. तर याने अव्वाच्या सव्वा भाडे सांगितले. मी चमकलो. म्हटले मीटरनुसार इतके होत नाहीत. तर साहेबांचे लॉजिक बघा. म्हणाला,

"अहो तासभर रांगेत उभारून मग शेवटी तुमचे भाडे मिळाले. ते पण इथल्या इथे. आता मी पुन्हा जाऊन रांगेत उभारणार. मला परवडायला नको का?"

मग मला लक्षात आले. आता इतका वेळ त्याला वाट पहावी लागली ह्यात माझा काय दोष? पण तो बहुतेक आयुष्याला वैतागलेला होता. Uhoh त्यात आणि रांगेमुळे त्याचा बराच वेळ वाया गेला होता. त्यामुळे थोडेफार ज्यादा पैसे मागितले तर मीटरवर बोट ठेवून घासाघीस न करता प्रवाशांनी ते द्यावेत अशी बहुतेक त्याची अपेक्षा होती. सहानुभूती म्हणून मी पण एकवेळ थोडे ज्यादा पैसे दिलेही असते. पण बोलण्याचीसुद्धा पद्धत असते. त्याची भाषा अतिशय मग्रुरीची होती. मी इथे खुप संयत भाषेत लिहिले आहे. पण प्रत्यक्षात तो माझीच चूक असल्यासारखा माझ्यावरच ओरडू लागला होता. मग मात्र मी पण मनातून प्रचंड चिडलो. पण त्याच्याशी तिथे वाद करण्यातसुद्धा अर्थ नव्हता हे ही मला त्याच्या एकंदर अवताराकडे बघून जाणवत होते. मग मी पण डोके शांत ठेवले. म्हणालो, "हे बघ. माझ्याकडे आता इतके पैसे नाहीत. घरून लगेच घेऊन आलो. तू इथेच थांब". तो थांबला. मी निघून आलो. नंतर बराच काळ तो तिथे येरझाऱ्या घालत होता. मग थोड्या वेळाने त्या अपार्टमेंटच्या खालीसुद्धा आला. मी वरती कोणत्या खिडकीत वगैरे दिसतोय का ते पाहत आक्रस्ताळेपणाने फिरू लागला. आणि मी पण वरून खिडकीतूनच पण त्याला नकळत पाहत होतो. खरे सांगायचे तर मनातून थोडा काळजीत पण पडलो. तिथे तमाशा होईल म्हणून. बराच काळ खाली गेलोच नाही. नंतर तो निघून गेला. मलासुद्धा वाईट वाटले. Sad पण माझा नाईलाज होता. आपण परिस्थितीपुढे हतबल झालो आहोत हे सांगण्याची सुद्धा पद्धत असते. अरेरावीची भाषा केली तर या जगात कोण मदत करेल?

४.

पावसाळ्याचे दिवस होते. रस्त्यांवर पाणीच पाणी आणि कच्चे रस्ते तर घाणीने चिखलाने आणि दगडधोंड्यांनी भरलेले होते (रिक्षावाल्यांच्या दृष्टीने ह्यात पण माझाच गुन्हा होता. कसे ते पुढे सांगतो). तर एक रिक्षा घेऊन उपनगरात गेलो. वेळ रात्रीची होती. पाउस प्रचंड पडत होता. साहित्य घेऊन रिक्षात कसेबसे बसलो होतो. रस्ता अतिशय खराब होता. चालवताना त्याला बरीच कसरत करावी लागत होती. पण चुकून काही दगड धोंडा खालून लागला आणि रिक्षा बंद वगैरे पडली तर मोठाच पेचप्रसंग आला असता. कारण रात्र खूप झाली होती. पाउस धो धो ओतल्यासारखा. शिवाय त्याकाळात मोबाईल वगैरे काहीच साधन नव्हते. त्या सुनसान रस्त्याला मागेपुढे दूरदूरवर कोणतेही वाहन दिसत नव्हते. पण सुदैवाने काहीही अडचण न येता ठिकाणावर पोहोचलो. रिक्षातून साहित्य उतरवून घेतले. विचारले किती झाले? पुन्हा तोच सगळा प्रकार. त्याने मीटरकडे बघून घेतले व डोळे चोळू लागला आणि काही सेकंदानी आकडा सांगितला. तो तिप्पट होता. मी उडालोच. म्हणालो इतके कसे. तर तडकला,

"अहो घाट सेक्शन आहे. दगड धोंडे इतके. कशी रिक्षा आणली माझे मला माहित. माझ्या रिक्षाचे नुकसान खूप झाले आहे तुमच्या नादात. शिवाय आता इथून एवढ्या रात्री परतीचे भाडे पण नाही. खरं तर येणारच नव्हतो..." वगैरे वगैरे...

यात घाट सेक्शन हा त्याचाच शब्द. मला अजूनही लक्षात आहे आणि हसायला पण येते. वास्तविक घाट वगैरे काही नव्हता. शहरातल्या शहरात कसला आलाय डोंबलाचा घाट Biggrin पण मला त्याची भावना पोहोचली. तरीही त्याने याविषयी आधी मला कल्पना द्यायला हवी होती असे मला वाटत होते. तिप्पट ऐवजी पाचपट मागितले असते तर मी काय करणार होतो? पण असले तात्त्विक वाद त्यांच्याबरोबर करून चालत नाहीत हे एव्हाना मला कळून चुकले होते. वरखाली करत थोडेफार ज्यादा पैसे हातावर टिकवले आणि तो निघून गेला.

अतुल. तुमचा पहिला अनुभव माझ्यासोबतही तंतोतंत घडला होता. तेव्हा मी खूप लहान होतो. अनोळखी गावात होतो. रिक्षा वापरणे माहित नव्हते. अतिशय निकडीचे होते व दुसरा पर्याय नव्हता म्हणून रिक्शा केली. तेव्हा असेच दोन तीन जण शेअरिंग मध्ये त्याने घेतले व माझ्याकडूनही पूर्ण पैसे घेतले. तेव्हा मी फारच भोळा होतो. तुमच्या रिक्षावाल्याने दिलेले लॉजिक माझ्या रिक्षावाल्याने न सांगताच मनातल्या मनात माझे माझेच मान्य करुन टाकले आणि पूर्ण पैसे दिले.

अतुल फारच मनस्ताप देणारे अनुभव आहेत तुमचे. थोड्क्यात काय तर विळा भोपळ्यावर पडला काय? आणि भोपळा विळ्यावर पडला काय? मान कापली जाते भोपळ्याचीच. त्याप्रमाणे, पाऊस, उन्हाळा, अंतर लांब जवळ, परतीचे भाडे न मिळणे हे सर्व ग्राहकाचे दोष आहेत त्यामुळे त्याला हे भोग भोगणे अप्राप्य आहे Sad

मग मला लक्षात आले हा मूर्ख आहे.
पण तो बहुतेक आयुष्याला वैतागलेला होता
मी पण वरून खिडकीतूनच पण त्याला नकळत पाहत होतो
त्याने मीटरकडे बघून घेतले व डोळे चोळू लागला
घाट सेक्शन
>>
Rofl Rofl

अतुल छान अनुभव आहेत एकेक.
कोल्हापूर पुण्याला टफ देतेय..

पहिल्या अनुभवासारखा सेम अनुभव मलाही नवी मुंबईला आला आहे. मीटरने स्टेशनला जात असताना असेच दोघा जणांनी हात दाखवला तर रिक्षावाल्याने मला "चालेन ना" विचारत त्यांना पटकन आत घेतले. मी कशीबशी चालेन म्हणत मान डोलावली ईतकेच.

पण मग मनातल्या मनात मी एक एक्शन प्लान तयार केला. स्टेशनला पोहोचलो तेव्हा मीटरने 28 झाले होते. त्या दोघांनी पर हेड दहा शेअरनुसार दोघांचे वीस द्यायला पुढे केले. तसे मीच त्यांच्या हातातून ते घेत स्वताकडचे आठ त्यात घालत रिक्षावाल्याला अठ्ठावीस करून दिले आणि सरळ उतरून चालता झालो Happy
वर म्हटल्याप्रमाणे नवी मुंबईचे रिक्षावाले उर्मट, उद्धट, असभ्य, असंस्कृत यापैकी कुठल्याही कॅटेगरीत मोडत नसल्याने त्याने मागाहून माझ्याशी वाद घातला नाही. मी त्याची एक्स्ट्रा पैसे मिळवायची आयडिया फोल ठरवली हे त्याने मान्य केले आणि जे हक्काचे होते ते गपगुमान स्विकारले.

ओला उबर त्यामानाने बरच बरं आहे.. ओपोजिट साईड च लांबच भाडं मिळायचे चांसेस कमी असतात कारण..
ड्रायव्हर ना ऑप्शन असतो मला या साईड्च भाडं द्या हा ऑप्शन सिलेक्ट करायचा..
आमचं डेली ट्रॅव्हलिंग होतं ऐरोली बोरिवली..
१ च जणाने कॅन्सल केलय आजपर्यंत.. १.५ वर्षे ट्रॅव्हल झालय.. ज्याने कॅन्सल केलं त्याने मुलुंड टाकलं होत प्रेफरंस आणि त्याला ऐरोली मिळालं.. त्यानेच सांगितल.. म्हणुन नाही म्हणाला तो.. आम्ही रागावलो पण त्याच्यावर.. पण ओके आहे.. अशे अनुभव खुप कमी..

अतुल जी, तुमचे किस्से वाचुन मलाहि माझे कोपु अन नाशिकातले अनुभव इथे लिहावेसे वाटतायेत.
कंटाळा आला म्हणुन आधी नाही टाकले पण आता ते ही लिहीते सवडीने.

प्रतिसादाबद्द्ल आभार सर्वांचे Happy

>> मीच त्यांच्या हातातून ते घेत स्वताकडचे आठ त्यात घालत रिक्षावाल्याला अठ्ठावीस करून दिले
हे भारीये Lol

@VB धाग्याच्या विषयात मांडलेला तुमचा अनुभव थरारक आहे. दररोज अशा कित्येक वाईट घटना घडता घडता राहत असतील, कित्येक घटना घडत सुद्धा असतील. पण त्यातील फार थोड्या पोलिसांपर्यंत येतात आणि त्यातील फार थोड्यांची बातमी होते आणि आपल्यापर्यंत पोहोचतात. तसे हे खूप चिंताजनक आहे. Sad

VB धाग्याच्या विषयात मांडलेला तुमचा अनुभव थरारक आहे. दररोज अशा कित्येक वाईट घटना घडता घडता राहत असतील, कित्येक घटना घडत सुद्धा असतील. पण त्यातील फार थोड्या पोलिसांपर्यंत येतात आणि त्यातील फार थोड्यांची बातमी होते आणि आपल्यापर्यंत पोहोचतात. तसे हे खूप चिंताजनक आहे. Sad >>+१

धाग्याच्या विषयात मांडलेला तुमचा अनुभव थरारक आहे. दररोज अशा कित्येक वाईट घटना घडता घडता राहत असतील, कित्येक घटना घडत सुद्धा असतील. पण त्यातील फार थोड्या पोलिसांपर्यंत येतात आणि त्यातील फार थोड्यांची बातमी होते आणि आपल्यापर्यंत पोहोचतात. तसे हे खूप चिंताजनक आहे >>> हो खरच हे सर्व खूप भयानक आहे, अन मुलींसाठी तर खूप जास्त.
मी ज्या रूटने रोज प्रवास करते तिथे शक्यतो असे अनुभव जास्त येत नाहीत म्हणजे, तशी रिक्षावाल्यांची मुजोरी असते जसे भाडे नाकारणे, फक्त एकाच व्यक्तीला घेणे असे, पण इतक्या वर्षांत असा कोणी प्यायलेला रिक्षावाला नव्हता भेटला (या मार्गावर).
याआधी तर न जाणो किती वेळा मी अक्षरशः रात्री दहा साडेदहा पर्यंत सुद्धा थांबलीये ऑफिसमध्ये, तेही अगदी एकटीने, पण कधी भीती नाही वाटली. जेव्हा तो प्यायलेला रिक्षावाला पहिला अन खासकरुन जेव्हा त्याने वळून मागे पहिले तेव्हा नाही म्हटले तरी भीती वाटली अन त्याही पेक्षा कितीतरी जास्त किळस.

आणि म्हणूनच आता अगदी सोपा पर्याय निवडला मी , बसने प्रवास करायचा. पण यात वेळ खूप जातो.

तसे हे खूप चिंताजनक आहे.
>>>>>
चिंताजनक आहे, पण आपण सुरक्षित जगात नाही राहत हे फॅक्ट स्विकारून मुलींनीही अवेळी निर्जन जागीचा प्रवास टाळण्याची काळजी घ्यायला हवी.

मी एकदा कोथरूडला दुपारी १-१:३० ला शिवाजीनगरला जाणार का विचारले तर त्याने सांगितले कि आता झोपायची वेळ आहे त्यामुळे नाही जमणार आणि तो सरळ रिक्षेत झोपला Happy Happy

रिक्षावाल्यांना इतका माज करणे कसे परवडते हा मला पडलेला प्रश्न आहे. ते काही सगळे प्रचंड श्रीमंत घरातले असतात, सुखवस्तू असतात असे वाटत तरी नाही. मग जास्तीत जास्त कमाई करावी असे त्यांना का वाटत नाही? प्रत्येक वेळी गिर्‍हाईकाला नाही म्हणणे कसे परवडते? इतक्या प्रचंड संख्येने रिक्षा असताना त्यांच्यात स्पर्धा का नाही? ते सगळे रिक्षांचे मालक असतात की मालक कुणी वेगळा असतो आणि हे फक्त ड्रायवर. तसे असेल तर मालकाला अमुक इतके पैसे प्रत्येक दिवशी देणे गरजेचे नसते का? युनियन असते म्हणून असा माज केला जातो का? निव्वळ गिर्‍हाईकांना छळणे हाच उद्देश असतो की खरोखर काही कारण असते?

एक संतापजनक प्रकार म्हणजे रिक्षा स्टँडवरील रांगेत सगळ्यात पुढच्या रिक्षावाल्याला अमुक एका जागी याल का असे विचारले तर तो १००% मागल्या रिक्षेवाल्याला विचारणार. तो आणखी कुणाला तरी. जणू त्यांना मोठा त्याग करायला सांगत आहोत!
एकदा एक रिक्षावाला माझ्यावर डाफरला की तो दोन तास रिक्षा स्टँडवर वाट पहातो आहे आणि इतक्या जवळ का जायला सांगतो आहेस? आता मी माझे गंतव्य स्थान तो रिक्षावाला किती वेळ वाट पहातो आहे ह्यावर ठरवायचे हे जे काय गणित आहे ते मला कळलेले नाही.

एकदा मुंबईहून बसने पुण्याला आलो. पुण्याला जिथे जायचे होते ते १-२ कि मी वर होते. दुपारची १२ ची वेळ. एका माजोरड्या रिक्षावाल्याने मुंबई पुणे बसभाड्यापेक्षा जास्त भाडे मागितले. का? तर माझ्या हातात "लगेज" होते म्हणून. आता त्या लहानशा बॅगेला "लगेज" असे जाहीर करुन त्याकरता अवाच्या सवा पैसे मागणे म्हणजे गांडूळाला शेषनाग म्हणण्यासारखे होते! मी त्याला म्हटले की इतके पैसे देण्यापेक्षा मी चालत जातो!

तसे हे खूप चिंताजनक आहे.
>>>>>
चिंताजनक आहे, पण आपण सुरक्षित जगात नाही राहत हे फॅक्ट स्विकारून मुलींनीही अवेळी निर्जन जागीचा प्रवास टाळण्याची काळजी घ्यायला हवी.
Submitted by ऋन्मेऽऽष on 1 March, 2018 - 22:58. >>>. खरेतर ह्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करायचे ठरविले होते, तुमचे माबोवर चे वागणे पाहता, पण नाही जमले कारण मुळात पटला तर नाही तो प्रतिसाद पण राग हि आला. राग आला कारण ही वस्तुस्थिती आहे की मुली खरेच इतक्या सुरक्षित नाहीयेत आता, निर्जन कशाला अगदी गर्दीच्या ठिकाणीही कितीतरी नजरा आपल्याकडे अश्याकाही बघत असतात की... , नुसते बघणे सोडा मुद्दाम गर्दीचा फायदा घेऊन धक्का देऊ पाहणारे, नको तिकडे घाणेरडे स्पर्श करायला कितीजण वसवसलेले असतात, राग येतो ह्या सगळ्याचा. मी जे म्हटलेय न कि मी बसच्या प्रवासाची निवड केली आहे , कारण जिकडे मी प्रवास करते तिथे बसला इतकी गर्दी नसते, आरामात बसून प्रवास करता येतो नाहीतर तो रिक्षावाला बरा पण बसचा प्रवास नको अशी अवस्था होते बरेचदा .
मुख्य म्हणजे अजूनही स्त्रियांनीच नीट वागावे, अंगभर कपडे घालावे, निर्जन स्थळी जाऊ नये, कुणाशीही जास्त बोलु नये असे वाटणारा समाज आहे रादर अश्यांचे प्रमाण खूप जास्त आहे अन त्यात खुद्द स्त्रियाही येतात.
जर कामाची गरज म्हणून पुरुष उशिरापर्यंत थांबू शकतात किंवा त्याच कामासाठी शहरापासून जरा लांब जावे लागते तर ते स्त्रियांनीही केले तर त्यात चुकीचे काय.
त्यांना कधीच मिळणार नाही का सुरक्षितता, अन बिनधास्त वागणे

हो वंदन, माहित आहे ते मला म्हणून आधी दुर्लक्ष केले होते. पण तरीही मला त्यावर लिहावेसे वाटले हे मात्र खरे

आणि ते इथे स्पष्ट लिहीलेय मी , सो, कदाचित तो शांत बसेल असे वाटतेय.

माझं मत थोडं वेगळं आहे.
बायकानी पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे जावे, त्यांना जज केले जौ नये. समाज बदलावा.पण हा समाज बदलण्याच्या प्रोसेस मध्ये जे बळी जातील, ज्याना न्याय मिळावा म्हणून जनता पेटून उठेल आणि समाज बदलेल तो बळी मला बनायचं नाही.त्यासाठी आवश्यक ते प्रिकॉशन मी घेणार. मी जर उशिरा एकटी अनसेफ ठिकाणी कुठे जात असेन तर ट्रेसेबलिटी, टेक्नोलॉजी, स्वसंरक्षणाची टूल्स जवळ बाळगेन. हिच अपेक्षा अनसेफ रात्री एकटा जाणाऱ्या नात्यातील पुरुषांकड़ून पण बाळगेन. त्याना पण धोका आहे.लुटमारीचा, रोड रेज फाईट मध्ये गावगुंडाकडून मरण्याचा.
इन दॅट केस बाई पुरुष कोणीच मी एकटा टी मुद्दाम अनसेफ ठिकाणी जैन आणि नाइट इन शायनी आर्मर, पोलिस इन शायनी आर्मर योग्य वेळी येऊन माझी सुरक्षा करेल अशी अपेक्षा ठेवणर नाही
विथ ग्रेट पॉवर(एकटे कोणत्याही वेळी कुठेही जाण्याचे घटनेकड़ून फ्रीडम कम्स ग्रेट रिस्पांसिबिलिटी (स्वतःचे रक्षण करायला केपेबल असणे/ती साध्य करणारी टेक्नोलॉजी किंवा हत्यारे जवळ ठेवणे)

mi_anu, मलाही काहीसे असेच वाटते की जर एखादी जागा असुरक्षित आहे तर ती दोघांना असावी, जी काळजी घ्यायला हवी ती दोघांना म्हणजे स्त्री किंवा पुरुष दोघांना असायला हवी

पण , पण वास्तुस्थिती अशी नाहीये, स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत जास्त असुरक्षित आहेत. अजूनही ज्या अपेक्षा एका स्त्री कडून असतात त्या पुरुषांकडून नाही.

आणि म्हणूनच जसे तुम्ही लिहीलेय तसे आपण या सर्वात बळी पडू नये म्हणून प्रत्येक स्त्री काळजी नक्कीच घेत असेल रादर घेतातच.

मी जर उशिरा एकटी अनसेफ ठिकाणी कुठे जात असेन तर ट्रेसेबलिटी, टेक्नोलॉजी, स्वसंरक्षणाची टूल्स जवळ बाळगेन >>> यावर मी आधी लिहिले होते पण मग लगेच प्रतिसाद संपादित केला होता, जो आता परत देते

>>> आमच्या ऑफिसने, फिमेल स्टाफसाठी एक अँप तयार केलेय, ज्यात तुम्ही कोणत्याही संकटात असाल खासकरुन प्रवासाच्या वेळी तर त्यातले पॅनिक बटन दाबायचे. त्याने ते अँप तुमचे लोकेशन ट्रेस करते, शिवाय लगेच एक फोन आपण रजिस्टर केलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्याला जातो अन तेव्हाच दुसरा फोन आपल्या बॉस ला जातो. जर समजा बॉसने पहिल्या तीन रिंगमध्ये फोन नाही उचलला तर सुपर बॉस ला. अन तिसरा फोन ऑफिस security ला. म्हणजे किमान आपण संकटात असू तर कोणालातरी ते कळेल अन कदाचित वेळीच मदत मिळू शकेल. <<<

रिक्शावाल्यांचे अनुभव आतापर्यंत वाईटच आहेत.खासकरून पुण्यातल्या रिक्शावाल्यांच्या अंगात उर्मटपणा ठासून भरला आहे याचा वेळोवेळी अनुभव घेतलाय.
आतापर्यंत एकदाच चांगला अनुभव आला आहे ज्यावरून काही रिक्शावाले चांगलेही असतात असं वाटलं. आम्ही जेव्हा हैद्राबादला फिरायला गेलो होतो तेव्हाचा अनुभव.पहाटेच्या वेळी आम्ही तिथे पोहोचलो.
तेव्हा तिथे रिक्शा उभ्या होत्या .त्यातल्या एकात आम्ही बसलो.अचानक ठरल्याने हाॅटेलच बुकींग पण केल नव्हत.तिथे गेल्यावर कळल की सिझन असल्याने जवळपास सगळी हाॅटेल्स full होती .पण त्या रिक्शावाल्याने खूप ठिकाणी फिरवून एक खूप चांगल हाॅटेल शोधून दिल. सामानासकट तिथे उतरलो.बाबांनी किती रूपये झाले अस विचारल्यावर तो म्हणाला;तुम्हाला वाटतील तितके द्या.तुम्हाला सुखरूप आणून सोडण हे माझ कर्तव्य होत.मग बाबांनी अंदाजे त्याला 500 रूपये दिले.पण तेही खूप जास्त आहेत म्हणून तो नाकारायला लागला मग त्याला कसतरी समजवल्यावर त्याने घेतले आणि अट घातली की जातानाही त्यालाच सोडायला बोलवायच पण भाडं द्यायच नाही.हे सगळ बघताना मी भारावून गेले आणि चांगली माणसही असतात यावर विश्वास बसला.

पुण्यातल्या रिक्शावाल्यांच्या वागणूकी बरोबरच त्यांच रिक्शा चालवणही तितकच बेशिस्त आहे. आपल्यापेक्षा छोट्या गाड्याही रस्त्यावर आहेत हे जवळपास ते विसरलेलेच असतात. याचा चांगलाच दणका आम्हाला मागच्यावर्षी बसला. एक रिक्शावाला रस्त्याच्या मधोमध wrong side ने येवून आमच्यावर आपटला.यात आईचा हात फ्रॅक्चर झाला.तरीही मदत करायची सोडून आमचीच चूक असल्यासारखा तावातावाने भांडायला लागला. सुदैवाने तिथे पोलीस होते आणि त्यांनी त्याला चांगला प्रसाद दिला. पण पुढचे काही दिवस आईलाच सहन कराव लागल.

येथे मांडलेले अनेक अनुभव (बरेवाईट) हे प्रत्यक्ष रिक्षा प्रवासाने अनुभवलेले सांगण्यात आले आहेत पण ह्या रिक्षवाल्यांचा अजुन एक भयंकर त्रास असतो ज्यात आपण प्रवासी नसलो तरी त्याचा मनस्ताप सहन करायची पाळी येते. आदिसिद्धि ह्यांनी एक्सिडेंट हां एक प्रकार सांगितला पण मी बोलणार आहे तो प्रकार मात्र त्याहुन फारच त्रास दायक आहे , कदाचित आता हे असे प्रकार पोलिसांच्या विविध स्पेशल पथकांमुळे जरा आटोक्यात आलेही असतील पण आमच्या काळात कॉलेज सूटायच्या वेळेत मेन गेट समोर राहून मुलींवर लाइन मारायला ह्यांची भयंकर रोड रोमियोगिरी चालायची. आणि प्रिंसिपल सरांनी पोलिस कंप्लेंट करूनही फार उपयोग नाही व्हायचा कारण अनेक रिक्षावाले पोलिस दप्तरी नोंद असलेले कुख्यात गुंडच असायचे Uhoh ज्यांचा रिक्षाचालक असणे म्हणजे रिक्षेतुन कमाई करणे ह्याच्याशी काहीही संबध नसे. गरीब मुलींना भुरळ पड़ण्यास सजवलेले एक वाहन आणि हेतुपूर्वक लावलेली गाणी हाच काय तो त्या रिक्षाचा उपयोग Sad

जर एखादी जागा असुरक्षित आहे तर ती दोघांना असावी, जी काळजी घ्यायला हवी ती दोघांना म्हणजे स्त्री किंवा पुरुष दोघांना असायला हवी
पण , पण वास्तुस्थिती अशी नाहीये, स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत जास्त असुरक्षित आहेत. अजूनही ज्या अपेक्षा एका स्त्री कडून असतात त्या पुरुषांकडून नाही.

^^^^^

हेच मी देखील लिहिले आहे.
आदर्श स्थिती आणि वस्तुस्थिती यात फरक आहे. जो पर्यंत तुम्हाला वस्तुस्थिती आदर्श स्थितीपर्यंत बदलता येणार नाही तोपर्यंत तुम्ही काळजी घ्यायलाच हवी.

एखाद्या आईबापाला विचारा, त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघे रात्री बारा एकला उशीरा घरी येणार असतील तर त्यांना मुलाचे जास्त टेंशन येईल की मुलीचे? मुलाची जास्त काळजी वाटेल की मुलीची? जर मुलीची काळजी जास्त वाटत असेल तर तुम्ही अश्या आईबापांना मुलगा-मुलगी भेद करणारे बोलणार का?

कदाचित आज तुम्ही वादाला वाद म्हणून याचे उत्तर द्यालही.
पण खरे उत्तर तुम्हाला तरुण मुलामुलींचे आईबाप झाल्यावरच समजेल.

बायकानी पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे जावे, त्यांना जज केले जौ नये. समाज बदलावा.पण हा समाज बदलण्याच्या प्रोसेस मध्ये जे बळी जातील, ज्याना न्याय मिळावा म्हणून जनता पेटून उठेल आणि समाज बदलेल तो बळी मला बनायचं नाही.त्यासाठी आवश्यक ते प्रिकॉशन मी घेणार. मी जर उशिरा एकटी अनसेफ ठिकाणी कुठे जात असेन तर ट्रेसेबलिटी, टेक्नोलॉजी, स्वसंरक्षणाची टूल्स जवळ बाळगेन.> अनु +१

सगळे रीक्षावाल्यांना धडा शिकवायला ओला उबर वापरा म्हणतायेत म्हणून एक ओलाचा अनुभव. ह्यात ओला कंपनीची काही चुक नाही खरंतर.

भांडुप हायवेवरुन वरुन ओला बूक केली शेअरींग मधे. मी आणि माझा नवरा दोघे होतो. गाडी आली त्यात ड्रायव्हर च्या बाजुला एकजण आधीच बसुन आलेला. गाडीत बसल्यावर वेगळाच वास यायला लागला. ते दोघे एकमेकांशी बोलत होते त्यावरुन जो बसलेला तो ड्रायव्हरचाच माणुस होता. मित्र किंवा नातेवाईक. हे कळलं.
ड्रायव्हर गाडी अगदी ३० च्या स्पीडने चालवत होता हायवे वर. थोड्या अंतरावर दोघे दारु प्यायलेत हे समजलं. इतका वेळ एसी आणि गाडीतला पर्फ्युम असं वासाचं मिक्स्चर होतं.
दारु प्यायलेत हे समजल्याक्षणी नवर्‍याने त्याला गाडी थांबवायला सांगितलं. तर म्हणे सर मै आपको बराबर लेके जाता हु. आप टेन्शन मत लो.
तरी नवर्‍याने गाडी थांबवायला लावली. आम्ही दोघे खाली उतरलो. नवर्‍याने ओला कडे त्याची कंप्लेंट केली. ड्रायव्हर प्यायलेला आहे आणि त्याला आता अजुन कुठलंही भाडं देउ नका असं खडसावलं.
ओलाने दुसरी गाडी बूक करवुन दिली. आणि ह्या राईडचे पैसे ही काही मिनिटातच रीफंड केले.

Pages