रोमँटिक :- ती आवडते मला

Submitted by प्रतिक सोमवंशी on 17 May, 2019 - 00:27

ती , हो आवडते मला, का प्रेम करतो म्हणून?
नाही हो
आधी आवडली म्हणून तर प्रेम झाला ना
का आवडते ती मला, कारण अनेक आहेत, actually रोज ती नवे कारण देते मला तिच्या प्रेमात नव्याने पडायला
ती आवडते मला सुंदर दिसते म्हणूनच नाही पण मनाने खूपच सुंदर आहे म्हणूनही
ती आवडते मला माझ्यावर प्रेम करते म्हणूनच नाही पण माझी खूपच काळजी करते म्हणूनही
ती आवडते मला लहान मुलीसारखी वागते म्हणूनच नाही पण खूपच maturity दाखवते कधी कधी म्हणूनही
ती आवडते मला लेखणीशी संवाद करते म्हणूनच नाही पण माझ्यावर कविता करते म्हणूनही
ती आवडते मला माझ्यावर रुसते म्हणूनच नाही तर मी रुसल्यावर मला मनवायला येते म्हणूनही
ती आवडते मला busy असते म्हणून नाही पण कितीही busy असली तरी माझ्यासाठी वेळ काढतेच म्हणूनही
ती आवडते मला माझ्याकडे बोलायला काही नाही हे माहिती असते तिला पन माझ्याशी बोलल्याशिवाय तिला न मला झोप येत नाही म्हणूनही
ती आवडते मला माझ्याशिवाय राहू शकत नाही ती म्हणूनच नाही तर आमच्यातल्या त्या unknown connection मुळेही
ती आवडते मला माझ्या तिला न आवडणाऱ्या गोष्टीतही आवडीने भाग घेते म्हणूनच नाही तर त्यात लाजेने चुर होऊन जाते म्हणूनही
ती आवडते मला माझ्या स्पर्शाने शहारते म्हणूनच नाही तर अजूनही पवित्र आहे ती म्हणूनही
ती आवडते मला माझ्याशी भांडते म्हणूनच नाही तर खूप काही झाल तरी मला अजून सोडून गेली नाही वा जाऊ शकत नाही म्हणूनही
ती आवडते मला कारण तिला सगळ जमत प्रेयसी बनून प्रेम करण आई बनून काळजी करण, मैत्रीण बनून मला समजून घेण म्हणूनच नाही तर सुगरणी सारखा स्वयंपाक करते, श्रद्धाळू आहे म्हणूनही
ती आवडते मला मला भेटायला आली म्हणूनच नाही तर माझ्या डोळ्यात डोळे घालून i love you बोलली म्हणूनही
ती आवडते मला माझ्या मिठीत शिरली माझ्या ओठांचा स्पर्शाने घाबरली म्हणूनच नाही तर एवढ होऊनही तिने स्वतःच्या सीमा तोडल्या नाहीत म्हणूनही
ती आवडते मला रोज माझी आठवण काढते म्हणूनच नाही तर माझ्या विचारात रात्र रात्र जागून स्वतःला त्रास करून घेऊन रडते म्हणूनही
ती आवडते मला आजारी पडते म्हणूनच नाही तर माझ्यासाठी सगळा त्रास सहन करते म्हणूनही
ती आवडते मला प्रेम जपते म्हणूनच नाही तर मैत्रीही करते तेवढीच म्हणूनही
ती आवडते मला मी कवी आहे म्हणूनच नाही तर आज ती मला का आवडते हे एवढ लिहून पण मला अजून अपूर्ण भासतेय म्हणूनही
©प्रतिक सोमवंशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम लेखनशैली.
पण हा मला लेख वाटत नाही,दिर्घकविता वाटतेय.
Happy पु.ले.शु!

छान लिहिलय.
मलाही जरा कवितेकडे झुकल्यासारखे वाटले.

छान लिहिले आहे☺️

पण मला एक कळले नाही
<<<ती आवडते मला आजारी पडते म्हणूनच नाही तर माझ्यासाठी सगळा त्रास सहन करते म्हणूनही>>>>
याचा नीट अर्थ लागला नाही, ती आजारी पडलेली त्याला आवडते? Uhoh

छान लिहिलंय..
खरं आहे अगदी !
तिच्याविषयी लिहिताना कधीच मन पूर्ण भरत नाही आणि शब्दही कधी संपत नाहीत..
फेसाळत्या लाटे प्रमाणे तिच्याबद्दलच्या नवीन भावना सतत मनाच्या किनाऱ्यावर आदळत राहतात
कधी अल्लडपणे तर कधी रौद्रपणे
आणि दरवेळी माघारी जाताना अगदी हक्काने रेतीचे काही कण सोबत घेवून जातात... जणु तिच्या आठवणीत व्याकुळ होवून घालवलेले आपले क्षण... जे फक्त तिचे असतात...
कायमचे !!

ओहह, असे म्हणायचे होते का तुम्हाला

Ok

बाकी ती नशीबवान म्हणायला हवी , जे तुम्ही इतके प्रेम करता तिच्यावर☺️