आयआयटी कानपूरचा एक प्रशंसनीय उपक्रम

Submitted by राघोभरारी on 8 May, 2019 - 11:33

परवाच कायप्पा वर मेसेज आला...IIT कानपुर ने भारतीय धर्म आणि तत्वज्ञान विषयी माहिती देणारी वेबसाईट बनवली आहे. यामध्ये रामायण, रामचरितमानस, भगवद्गीता, उद्धवगीता,अष्टावक्रगीता, ब्रह्मसूत्रे, पतंजली योगसूत्रे, उपनिषदे, वेदांत अश्या सर्वांची उत्तम माहिती उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ही माहिती ११ वेगवेगळ्या भाषांमध्ये देण्यात आलेली आहे. मुख्य ग्रंथ जसे रामायण, गीता, उपनिषदे यांच्या भाषांतराबरोबर जाणकारांच्या टीकादेखील उपलब्ध आहेत.
उपक्रमाविषयी ते लिहितात:
What we wish to do is to:
1. Create a repository of Indian philosophical texts on the Internet, and to make these freely available to whoever is interested.
2. Create tools as well as a process that will make the putting up of such texts on the web simple.
3. Explore the different ways in which the content can be presented, in order to enhance the study of these texts

आधुनिक युगात संस्कृती जोपासण्याचा आयआयटी कानपूरचा हा उपक्रम नक्कीच स्त्युत्य आहे...जिज्ञासूंनी याचा जरूर लाभ घ्यावा

https://www.gitasupersite.iitk.ac.in/

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

कोकाटे इंग्लिश? माझा गैरसमज झाला असा तुमचा गैरसमज झाला की काय? आय आय टी संस्था तंत्र आणि शास्त्र या विषयांच्या सखोल आणि उच्च अभ्यासाविषयी प्रसिद्ध आहेत. साहित्य आणि भाषा आणि धर्मशास्त्राविषयी नाहीत. लिखित साहित्य जालावर कसे न्यावे या बाबतीत ते तज्ज्ञ आहेत. पण अर्थ, खरेपणा, योग्य साहित्यनिवड लिन्ग्विस्टिक्स याविषयी नाहीत. असोच.

भारतातल्या शाळांची अवस्था पाहता पहिल्यांदा मुलांना नीट लिहायला वाचायला शिकवले पाहिजे. नवीन विषय वाढवण्यापेक्षा आहे ते विषय जरी नीट शिकवले तरी खूप आहे.- हा एक प्रतिसाद खूप आवडला . कारण मला हे ज्ञान पहिल्यादा झाले कि आपण लिहिता वाचता ना येताच मोठे झालो आणि सगळं शिक्षण पूर्ण केले, नोकरी केली , जगातील आठव आश्चर्य आहे भारतीय लोक म्हणजे . उगाच जगातले उद्योजक भारतामध्ये येऊन आपले उद्योग आणि रिसर्च प्रकल्प उभारत आहेत. भारतामध्ये एकूण ७५० पेक्षा जास्त रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर आहेत बाहेरच्या उद्योजकांचे हे बहुतेक टाइम पास म्हणून असतील .बाकी मुळात काही लोकांना हे खटकलं कि हे काम आयआयटी ने का केला, ते जर दुसऱ्या कोणी केला असता तर खपवून पण घेतलं असता..बाकी संस्कृत हि भाषा विलुप्त होऊन चालली म्हणून शिकायची नाही असा काहींनी प्रतिसाद दिला आहे , पण जर शिकलीच तर काय वाईट होणार आहे देशाचे हे समजत नाही. आपल्या कडे एवढी जनता आहे, ज्याला जो इंटरेस्ट आहे तो ते करेल, सुविधा उपल्बध असणे महत्वाचे ..काही लोक पबजी खेळतील काही संस्कृत शिकतील..

>>पण अर्थ, खरेपणा, योग्य साहित्यनिवड लिन्ग्विस्टिक्स याविषयी नाहीत. <<
त्या वेबसाइटवर कित्येक स्कॉलर्स, शंकराचार्य इ. प्रभृतींनी केलेलं भाषांतर/निरुपण आहे. त्याची निवड, खरेपणा यात तृटी आहेत, असु शकतात असं म्हणायचं आहे का तुम्हाला? सर्वप्रथम, आयआयटी सारख्या संस्थेने कुठलंहि सबपार मटिरियल पब्लिश करणं हि शक्यताच दुर्मिळ; जरी तो त्यांचा प्रांत नसला (तुमच्या मते तो नाहि, असं ध्वनीत होतंय) तरिहि. असं असताना या उपक्रमांतर्गत डिफेक्टिव मटिरियल पब्लिश करुन, व्हाय वुड दे पुट देअर रेप्युटेशन ऑन द लाइन?..

एनिवेज, मला वाटतंय कि तुमचा याबाबतीतला समज पक्का झालेला अस्ल्याने माझं आर्ग्युमेंट व्यर्थ आहे, म्हणुन मी इथेच थांबतो...

@nmate सामाजिक प्रश्नावर भाष्य करण्याअगोदर त्या विषयाची व्याप्ती समजून घेतली पाहिजे. भावनेच्या भरात एखादा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याअगोदर आपल्याला सद्यस्थितीत शिक्षणाची परिस्थिती काय आहे हे समजून घेणे फार महत्वाचे आहे. महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधील किती मुलांना लिहिता वाचता येत नाही याविषयीची माहिती न घेता हा प्रश्न सोडवणे अशक्य आहे. या विषयीचे बरेच अहवाल उपलब्ध आहेत. त्यांचा अभ्यास केल्यास परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येऊ शकते. असो.

भारतीय तत्वज्ञानाची मुलांना तोंडओळख होणे फार गरजेचे आहे. तुमची याबद्दलची भावना योग्य आहे. 130 कोटी पैकी ज्यांचा वेदांचा अभ्यास आहे असे लोक सोडले तर सामान्य लोकांपैकी 1 टक्के लोकांनाही 4 वेदांची नावे किंवा एका ओळीत माहिती सांगता येणार नाही. तेंव्हा यासारखे उपक्रम गरजेचे आहेत. इतिहासाची शालेय पुस्तके वाचली तर या विषयाची ओळख होईल अशी माहिती त्यात आहे पण आपल्या एकंदरीत शिक्षणपद्धतीनुसार त्याचा उपयोग काय हे मुलांना कळत नसल्याने कोणीही ती माहिती लक्षात ठेवायचे कष्ट घेत नाही. त्यात काही बदल करता आला आणि मुलांमधला या आणि इतर अनेक संकल्पनांचे आकलन कसे वाढेल यावर काम करणे फार गरजेचे आहे. यामध्ये वैदिक किंवा त्यानंतरच्या काळातल्या समाजाच्या काय धारणा होत्या आणि आजच्या काळात त्या विषयांमध्ये काय प्रगती झालीये ह्याची माहिती दिली गेली पाहिजे. त्यामुळे मुलांची कोणालाही दिशाभूल करता येणार नाही. या आणि अश्या प्रकारच्या इतर अनेक विषयांवर काही लहान पुस्तके ऐच्छिक वाचनासाठी उपलब्ध करून दिली तर मुलं वाचू शकतील.

आता आयआयटी ने अश्या प्रकारचे काम करावे का हा प्रश्न अतिशय चुकीचा आहे. संगणक अभियंत्याला अश्या प्रकारचे बरेच प्रश्न सोडवावे लागतात ज्याचा संबंध तंत्रज्ञानाशी नाही. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांनी हे असे विविध विषयांशी संबंधित काम केले पाहिजे. यात खटकणारी गोष्ट ही या वेब ऍप ची गुणवत्ता आहे. आयआयटी च्या गुणवत्तेला साजेसे काम केले नसावे. सुधारणा करण्यासाठी बराच वाव आहे.

या सगळ्या चर्चेत हिंदुत्ववादी, निधर्मीवादी, उजव्या आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांचा या आणि अशा इतर अनेक घटनांचा त्यांच्या त्यांच्या विचारसरणीला सोयीस्कर अर्थ काढण्याचा प्रयत्न प्रत्येकाने लक्षात घेतला पाहिजे. या अश्या प्रकारच्या उपक्रमाचा अर्थ आय आय टी ने हिंदुत्ववादी विचारसरणीला प्रमाणपत्र दिले असा होत नाही. उलट त्यांनी लोकांना ज्ञानार्जन करण्यासाठी एक सहज उपलब्ध श्रोत बनवला आहे. त्यातून समाजाचे चांगलेच होईल.

प्राचीन लोकांमध्ये असलेली वैज्ञानिक दृष्टी, सूर्य मृग नक्षत्रात आला कि पाऊस सुरु होतो हे सत्य शोधण्यामागची जिज्ञासा आणि कारण, त्यांची मनुष्य आणि समाज याकडे पाहण्याची दृष्टी असे अनेक पैलू मधून आपण आजही प्रेरणा घेऊ शकतो. आस्तिक आणि नास्तिक चर्वणातून ज्याप्रकारे भारतीय तत्वज्ञान प्रगल्भ झाले त्याप्रमाणे एकाच प्रश्नाचा चहुबाजुने विचार करण्याची पद्धत आपल्याला फार गरजेची आहे. कुठलाही विचार त्याची सत्यता पडताळून पाहून आणि बाबा वाक्यं प्रमाणम न मानता गीतेमध्ये सांगितलेली ज्ञानार्जन कसे करायची याची परिप्रश्नेन म्हणजे पुन्हा पुन्हा प्रश्न विचारून पाहायची प्राचीन वृत्ती आपल्यात येऊ शकेल.

अशाप्रकारचा सारांश हा मुलांना समजावून दिला तर आजच्या काळात त्यांना भारतीय असण्याचा अभिमान आणि दैनंदिन आयुष्यात विचार करताना काहीतरी वैचारिक बैठक निर्माण होईल असा मला वाटते.

चिडकू , प्रतिसाद आवडला. फक्त एक छोटी दुरुस्ती. 'सूर्य मृग नक्षत्रात आला कि पाऊस सुरु होतो' हे वाक्य असे असले पाहिजे: 'पाऊस सुरू होताना सूर्य मृग नक्षत्रात असलेला दिसतो.' सांगण्याचा उद्देश हा की पाऊस हा सूर्याचा नक्षत्रप्रवेश अथवा एखाद्या नक्षत्रात असणे नसणे बघून सुरू होत नाही. शिवाय संपूर्ण भारतात सगळ्याच ठिकाणी पाऊस मृग नक्षत्रावर सुरू होतो असे नाही. दक्षिण भारतात पावसाची सुरुवात रोहिणी नक्षत्रावर होऊ शकते आणि उत्तरेत पाऊस सुरू होईपर्यंत सूर्याची आर्द्रा पुनर्वसू नक्षत्रे चालू होतात. आपल्याकडे श्रावणात पावसाची उतरती कळा असते तर उत्तरेकडे तुफान पावसात यमुनेच्या पुरात श्रावण कृष्ण अष्टमीला कृष्णजन्मोत्सव साजरा होतो. ऋतूंशी सूर्यापेक्षा पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या लंबवर्तुळाकार कक्षेचा अधिक संबंध आहे. आता तर मोसमी म्हणजे आपल्या उपखंडातल्या पावसाच्या नियमिततेचे अनेक पॅरामीटर प्रस्थापित झाले आहेत त्यात नक्षत्रप्रवेश हा गौण आहे. अर्थात पूर्वी लोक काही दृश्य घटनांवरून ठोकताळे बांधत आणि ते अंदाजपंचेच यशस्वी होत.
शिवाय पृथ्वीचे सूर्याभोवतीचे लंबवर्तुळाकार भ्रमण आणि त्याचे परिणाम ह्या संबंधात आपल्या लोकांची जिज्ञासा दुर्दैवाने जागृत झाली नाही आणि शोध दुर्दैवाने आपल्या लोकांनी घेतला नाही. मात्र, गेल्या दोन तीन दशकांत मोसमी वार्‍यांसंबंधीचे संशोधन आपण खूप पुढे नेले आहे.
बाकी प्रतिसाद आवडला. चोहो बाजूनी विचार करण्याची जरूर आहे याच्याशी १००% सहमत.

@हीरा तुम्ही दिलेलं नक्षत्र आणि पाऊस यांचा नातं, दक्षिण ते उत्तर कसं बदलतं ते एक पायरी पुढे आहे. माझी चूक तर आता वेळ संपल्याने बदलता येणार नाही पण यापुढे लिहिताना जास्त काळजी घेईन. तुमचे सगळेच प्रतिसाद उत्तम आहेत. ह्याच विचारांनी एक दिवस हिंदू धर्म अधिकाधिक विज्ञानाभिमुख आणि लोकोपयोगी होऊन त्यातली साचलेली शेवाळे दूर होतील अशी अपेक्षा आहे.
आजकाल असे विचार मांडले जात नसल्याने हिंदू धर्म म्हणजे काहीतरी तालिबानी प्रकार आहे अशी नव्या पिढीच्या समजूत होत आहे.

Pages