संघाच्या गोष्टी भाग ४

Submitted by satishb03 on 3 May, 2016 - 00:05

संघाच्या गोष्टी भाग ४

घेउनी अंती अपेशा , राहुनिया अर्धपोटी
सोडूनी देशास जाणे , हेच आहे रे ललाटी !

शाखेतले खेळ संपले व बौद्धिक सुरु झाले कि अप्पा ही कविता म्हणायचा व जोगळेकर गुरुजींचे डोळे पाणावायचे . पुन्हा आमच्यातला मेहेंदळे घनगंभीर डुकरी आवाजात वेडात मराठे वीर दौडले सात म्हणून हडकुळ्या जोगळेकर गुरुजींच्या अंगी , जोश व उत्साह आणायचा . त्यांचे रक्त गरम व्हायचे . व ते इंग्रजांना शिव्या घालू लागायचे . मग मी इंग्रज कुठाय ? असे विचारायचो .मी लाडका असल्याने ते न चिडता मला सांगायचे इंग्रज आजही मुसलमान लोकांमध्ये विचाराने वावरतो आहे . बाळ आपल्यासाठी तोच इंग्रज . तर मग मला माझा शाहनवाज दोस्त आठवायचा . तो तर खूप चांगला . भरपूर शिरखुर्मा देणारा , बिर्याणी खिलवनारा , इतकेच काय वासंती भेटण्याच्या आधी त्याच्या मामाची मुलगी मला आवडलेली तर तिला पटविण्यास मनोभावे सहाय्य करणारा . म्हणजे मला ओढून तिच्या घरी न्हेने , मला व तिला टीव्ही पाहायला एकटे सोडून बाहेर निघून जाणे . वगैरे . त्याच्यात इंग्रजी विचार मला कधी आढळायचा नाही . पण हे मी जोगळेकर गुरुजींना विचारू शकत नसे . कारण चुकून त्यांनी घरी हा विषय काढला तर माझ्या प्री प्ल्याटोनिक लव्हची माहिती मिळून वासंतीस दुःख होईल . व मला ते चालणारे न्हवतेच मुळी. मी मुसलमान लोकांना इंग्रजसमान मानायची कोशिस करीत पुढे बौद्धिक ऐकत असे . हे बौद्धिक कधी पाठक कधी जोगळेकर तर कधी कटककर , चिकरमाने ही दक्ष माणसे आम्हाला द्यायची . या देशावरची आक्रमणे सांगायचे . हाती शस्त्र धरावे लागणार हे सांगायची . आम्ही म्हणजे मी आणि मांगाचा लक्ष्या , वडराचा गुंजाळ कधीही तत्काळ हाती शस्त्र धरायला तयारच असायचो. त्यामुळे आम्ही त्या लोकांना खूपच आवडत असू . वासंतीला मात्र फक्त मीच आवडत असे . कारण मी अभ्यासात हुशार व रंगाने गोरा होतो . आयमिन आजही आहे . आणि हे दोघे ठार काळे . व अभ्यासात माठ . अभ्यासापोटी माझा जोगळेकर गुरुजींच्या घरी सहज प्रवेश होत असे . तर ते असो .

एक दिवस इंग्रज व त्यांना नडलेले म्हणून आज नामवंत असलेले तत्कालीन शाखेतले अनुक्रमे क्रांतीवादी व बंडखोर गटातले देशपांडे आणि पेंडसे व्याख्यान द्यायला आले . त्यांनी सांगितले गुरुजी गेल्यानंतर ( म्हणजे मेल्यानंतर ) स्वयंसेवकांच्या मनातला असंतोष उफाळून आला . दोन कारणाने , पैकी एक गुरुजींनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्याचा आदेश संघाला दिला नाही , दोन . स्वातंत्र्यानंतरच्या काळात संघानं विधायक कामं करायला हवीत ती केली नाहीत संघटनेसाठी संघटना हाच मंत्र चालू ठेवला . पुढे गोळ्वलकरांनी यात सुधारणा घडवून आणली व तीत मुख्य रोल देशपांडे व पेंडसेंचा होता . तेंव्हा ते जवान होते . व अशा बंडखोर जवानांच्या गटाला क्रांतीकारी गट व बंडखोर गट ही नावे मिळालेली . त्यातले हे दोघे . यांनी आमच्यात धाडस निर्माण व्हावे यासाठी शिबीर आयोजन करून वेगेवेगळ्या पद्धतीचे प्रयोग आमच्यासाठी फिक्स केलेले . जसे कि रात्री सूचना न देता नदीकिनारी बोलावणे , टेकडीवर चढून जायला लावणे . अल्लाहो अकबरच्या आरोळयात अंगावर आलेल्या खोट्या मुसलमनांना पक्षी खऱ्या स्वयंसेवकांना खोटी खोटी मारामारी करत परतवून लावणे . ( खोटी मारामारीच्या नावाखाली मी जोशाला कायम जोरदार खरीखुरी मारामारी करून मजबूत ठोकायचो . भेन्चुद होता तो . मी वासंतीबरोबर अभ्यास करीत असलो की मुद्दाम यायचा व वासंतीच्या आईस , जिस आम्ही काकू म्हणीत असू त्यांना मी गाईचे मांस खातो असे सांगायचा .मग लगेच , “वासंती पुरे आता.” अशी अभ्यास आटोपायची नम्र सूचना करून काकू मला घराबाहेर घालवायच्या . तेंव्हा वासंतीच्या डोळ्यातले हळवे काही पाहून माझ्या काळजात कालवाकालव व्हायची . जोश्या या बहिण्चोत इसमाचा मडर करावा असे वाटायचे . पण मग असे केले तर जेल होणार आणि मग वासंती आपल्याला कशी भेटणार ? या विचाराने मी राग घट घट गिळायचो व मुकाट घरी यायचो . वासंतीच्या घरी सिनेमा पाहताना प्रत्येक डाकुत मला जोश्या दिसायचा व हिरोत मी स्वतः ) अशा मारामारीत माझ्याकडून , लक्ष्याकडून , गुंजाळकडून ही कोवळी हडकुळी ब्राह्मण असलेली बोगस मुस्लीम ग्यांग वारंवार खंग्री चोप खाऊन कंटाळेलली . एका रात्री तर शाखेतला कुणीच गडी मुस्लीम व्हायला व खोटा हल्ला करायला तयार झाला नाही . गुरुजी पिसाळले . मग मोठ्या धीराने आम्ही तिघेच मुसलमान होऊन हल्ला करण्यास तयार आहोत असे सांगितले . यालाही सर्वांनी भीत भीत जोरदार आक्षेप घेतला . मग आम्हाला गुरुजींनी सांगितले , अरे खोटे खोटे मारावे हा सराव आहे प्रत्यक्ष वेळ येईल तेंव्हा बळ राखून ठेवावे . वगैरे .

वासंतीचा मोठा भाऊ नचिकेत देखील मला आवडत नसे . तो शाखेत सिनिअर व प्रमुख म्हणून काम करत असे .तो अभ्यासात हुशार नसल्याचे मात्र मला बरे वाटायचे . कारण त्याच्या माठपणामुळेच वासंतीसोबत अभ्यासाची संधी मला मिळालेली . तर एकदा डेक्कन कॉलेजमधल्या मारुतीच्या देवळात गुप्तपणे भरलेल्या सभेत पोचायला मला उशीर झाला . या सभा अचानक ठरत असत . कसलीच पूर्वसूचना नसे . तर मी उशिरा पोचलो . नचिकेत दारात वेताची छडी घेऊन उभा होता त्याने पुन्हा उशीर नकोय म्हणून हात पुढे करायला सांगून सपासप दोन छड्या लगावल्या माझ्या डोळ्यात टचकण पाणी आले . देवळात बसताना मांगाचा लक्ष्या मला म्हटला , बायकोचा भाऊ आंडापेक्षा मऊ , जाव दे सत्या दे सोडून . मग वासंती बायको म्हणून डोळ्यासमोर तरळून मी हसू लागलो . देवळात चर्चा चालू झाली . हल्ला करायचा . इकडून चढाई तिकडून चढाई वगैरे मला त्यात रस न्हवता . मी झोपून गेलो . दुसऱ्या दिवशी रविवार होता . क्लास सकाळीच . क्लासमध्ये मला छडीने मारल्याचे लक्ष्याने वासंतीला सांगितले तर तिचे डोळे पाणावले . मला खात्री होतीच की आता ही माझे वळ बघणार . पण वळ तर साले पुसून गेले . मी महादेवाच्या देवळात जाण्याआधी लक्ष्याकडून पुन्हा हातावर दोन ओले फोक मारून घेतले. व तिथे पोचे पर्यंत वळ पुसू नयेत या साठी महादेवाची करुणा भाकली . वळ पुसण्याची शक्यता लक्षात येताच फोक घेऊन तिथपर्यंत येण्यास व तिला भेटण्याच्या काही मिनिट अगोदर दोन रट्टे देण्यास येण्यासाठी लक्ष्या कासावीस झाला . सोबत येण्याचा जहरी आग्रह करू लागला . मग मी त्याची आईबहीण काढली व मोठ्या मिनतवारीने परतवला . नाईलाजाने तो माघारा गेला. देवळाबाहेरच्या कठड्यावर ती बसलेली होती . सकाळी दहाचे सोनेरी उन . दाट गुलमोहराच्या लाल हिरव्या आसंमतातून तिच्या चेहऱ्यावर सांडलेले . तिचे केस विलक्षण सोनेरी चमकत असलेले . माझ्याकडे पाहणारे तिचे डोळे अत्यंत पाणीदार मधाळ वाटत होते . मी तिच्या डोळ्यात बुडालो . तिने माझे दोन्ही हात तिच्या नाजूक ओलसर हातात घेतले व दोन्ही हातांच्या तळव्याचा हळुवार मुका घेतला . सर्वांगातून लाखो व्होल्टच्या विजेचा करंट दौडला . मी तेहतीस कोटी देवांना बाजूला सारून एकट्या आईघाल्या नचिकेतचे आभार मानले .. महादेवाच्या आडोश्याला आम्ही एकमेकांना अधेमध्ये भेटत होतो . शिरा श्रीखंड खात होतो . माझ्या घरच्या तिखट ठेच्याने तिच्या डोळा पाणी यायचे . मी असले काही करणार नाही हं तू तुझ्या आईला सांगून ठेव असे ती काही म्हटली की माझ्या अंगात मुंग्यांचा गोड झिनझिणाट व्हायचा . माझ्या आईचा व तिचा लटका वाद डोळ्यासमोर आणून मी आनंदी आनंदी व्हायचो . तर दिवस असे जात होते.

अशीच कुठेतरी दंगल झाल्यानंतर एकदा रात्री अकराला आम्हाला शाळेजवळच्या मैदानात गोळा केले . आम्ही विसेक लोक जमलो . व आताच्या आता जाऊन कुणातरी मुसलमान माणसाला चोप द्यायचा व लगेच माघार फिरून गुपचूप घरी जाऊन झोपायचे असे ठरले . रात्री अचानक बोलावल्यामुळे खाकी हाफ प्यांट व पांढरा सदरा ही कम्पल्सरी औपचारिकता बाजूस सारून आम्ही फुल प्यांटीत एकत्र जमलेलो . तर मारामारी करायची हा ठाम निर्णय घेऊन आम्ही मैदानातून बाहेर पडून रात्री बाराच्या दरम्यान कुणी अश्राप मुस्लीम घावतो का हे शोधू लागलो . आमच्यातले , आकनकर , जोशी , देशपांडे , वर्तक उत्तेकर हे लोक वेगवेगळ्या दिशेला जाऊ असे म्हणत आपापल्या घरच्या दिशेला जाऊन घरात झोपून गेले . आम्ही यांच्या मागोमाग जाऊन बाहेरून आवाज देऊन ओ ऐकून खात्री करून घेतली . व मग आम्ही देखील माघारी फिरलो . तर आम्हाला रस्त्यात एका दंडुकेधारी पोलिसाने हटकले , हेवडया रातचं कुठं चाल्लाव रे ? मी म्हटले तमाशा पाहायला . तर , तुझ्या बापानं ठेवलाय का ? असे म्हणत पोलिसाने खाडकन कांठाळीत ओढली . आमच्यातला एक जन म्हटला आम्ही पुरंदरे बाल शाखेचे विद्यार्थी आहोत तर पोलिसाने ह्या जोगळेकरच्या तर आयचा दाणा असे चिडून म्हणत सर्वाना अजून दोन दोन रट्टे दिले . आम्ही ते रट्टे गुपचूप स्वीकारून परतलो .

आम्ही जोगळेकर गुरुजींना हा वृतांत दुसऱ्या दिवशी सांगितला तेंव्हा ते म्हणाले , अरे पळून यायचे . मग आम्हाला पळता आले नाही हे सांगितले तर ते म्हणाले तुम्ही काल हाफ प्यांट घालून गेला न्ह्वतात का ? यापुढे हाफ प्यांट घालत चला पलायनास सोपे जाते .
एकूण हाफ प्यांट किती महत्वाची हे आम्हास कळले .

क्रमशः
@प्रा. सतीश वाघमारे .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हसुन हसुन मेलो.. अगदी असेच किस्से माझ्या ४ वर्षांच्या संघाच्या सानिध्यात आले. Biggrin

मुर्खांची मांदियाळी भेटली.. निवासी शिबिरात तर काय काय चालते हे सांगु नये इतके बावळत वागतात हे लोक..

Khilli changali udavali ahe.:)
Sanghachya sanghaTeet PaNache , sevakaryache kautuk vaTate.
Ekarale paNa , hindu hindu karaNe, swatantrya sangramatil lokanbaddal kevaL congress Che mhanun dwesh baLagaNe adi guN awadat nahit.

Pages