शहीद हेमंत करकरे , आम्हांला क्षमा करा.
२६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री तुम्ही हेल्मेट चढवून जीपमध्ये बसताना टीव्हीवर दिसलात. त्यानंतर काही मिनिटांतच तुम्ही दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडल्याची बातमी पाहिली.
आज त्या घटनेला साडेदहा वर्षं होत असताना पुन्हा एकदा अनेक लोकांकडून तुम्हांला मारलं जाताना पाहतोय.
मालेगाव बाँबस्फ़ोट प्रकरणी ज्या प्रज्ञासिंह ठाकुरला तुम्ही अटक केली होती, तिने तीन दिवसांपूबाँब, १७ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच दिवशी भाजपने तिला मध्यप्रदेशा तील भोपाळ येथून लोकसभेची उमेदवारी दिली.
दोन दिवसांनंतर "अबकी बार फ़िर एक बार मोदी सरकार" अशी घोषणा लिहिलेल्या भाजपच्या मंचावरून बोलताना तिने सांगितले, "मला त्याने कोणत्याही पुराव्याशिवाय अटक केली. त्याचं हे कृत्य देशद्रोहाचं होतं, धर्मविरोधी होतं. मी त्याला शाप दिला. तुझा सर्वनाश होईल.
मला अटक झाली तेव्हा मला सुतक लागलेलं. बरोबर सवा महिन्यांत तो दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडला. माझं सुतक संपलं." या वाक्यावर मंचावर बसलेल्या भगवा फ़ेटेधारकांनी टाळ्या वाजवल्या.
या कथनावर पुरेसा गदारोळ झाला. आय पी एस ऒफ़िसरांच्या संघटनेने त्याचा निषेध केला, तेव्हा भाजपने हे प्रज्ञासिंह ठाकुरचं वैयक्तिक मत असल्याचं सांगून हात झटकले. वर, अनेक वर्षं शारीरिक आणि मानसिक छळ सहन केल्याने तिने असं म्हटलं असेल अशी मखलाशीही केली.
दुस र्या दिवशी प्रज्ञासिंहने करकरेंबद्दलच्या माझ्या विधानामुळे देशाच्या शत्रूंना आनंद झाला. देशाच्या शत्रूंना आनंद होईल, असं काही मला करायचं नाही, म्हणून माझं विधान मी मागे घेते असं सांगितलं. तिच्या वक्तव्यानंतर भारत माता की जय च्या घोषणा दिल्या गेल्या.
प्रज्ञासिंहच्या उमेदवारीचं समर्थन करताना भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी असं सांगितलं की पाच हजार वर्षं जुनप्र, वसुधैव कुटुम्बकम् मानणार्या संस्कृतीवर समझौता एक्स्प्रेस आणि मालेगाव स्फ़ोटात दहशतवादाचा शिक्का मारला गेला. या सगळ्याचं प्रतीकात्मक उत्तर म्हणून तिला उमेदवारी दिली आहे. (प्रज्ञासिंह ठाकुरचं ) हे प्रतीक काँग्रेसला महाग पडणार आहे.
प्रज्ञासिंहला कोणत्याही आरोपपत्राशिवाय (चार्जशीट) , कोणत्याही पुराव्याशिवाय डांबून ठेवलं गेलं, तिचा छळ केला गेला, असं अनेक लोक म्हणू लागलेत.
इथे काही गोष्टींकडे मागे वळून पाहणं क्रमप्राप्त आहे.
१) २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव इथे बॊम्बस्फ़ोट झाला. ७ लोक मरण पावले, ७९ जखमी झाले.
२) एटीएसने प्रज्ञासिंहला २३ ऑक्टोबर २००८ रोजी अटक करून २४ रोजी चीफ़ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट समोर हजर केले.
३) २० जानेवारी २००९ रोजी तिच्या आणि अन्य आरोपींच्या विरोधात चार्जशीट दाखल केली.
४.) जुलै २००९ मध्ये मकोका खालील आरोप विशेष न्यायालाने हटवले
५) जुलै २०१० मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा मकोका लावला.
६) एप्रिल २०११ मध्ये मालेगाव सह अन्य प्रकरणांचा तपास एन आय ए कडे दिला गेला.
७) २३ सप्टेंबर २०११ रोजी सर्वोच्च न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फ़ेटाळला. तिची अटक बेकायदेशीर असल्याचा आणि एटीएसने तिचा छळ केल्याचा आरोपही न्यायालयाने अमान्य केला. हे निकालपत्र संपूर्ण वाचावं, अशी चर्चेत भाग घेणार्या सर्वांना विनंती.
न्यायालयाचं निकालपत्र इथे वाचता येईल.
८) यानंतर तिने मुंबई उच्च न्यायालयात प्रकृतीच्या कारणावरून जामीन अर्ज केला. हा अर्ज फ़ेटाळताना न्यायालयाने तिच्या विरोधात भक्कम पुरावा असल्याचे म्हटले.
९ ) २०१४ मध्ये दिल्ली आणि मुंबई इथे सत्तांतर झालं.
१० ) एप्रिल २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की प्रज्ञासिंह विरोधात मकोका लावण्याजोगा पुरावा नाही, तेव्हा खालच्या कोर्टाने तिच्या जामीन अर्जावर विचार करावा.
११) जून २०१५ - नवं सरकार मालेगाव व अन्य प्रकरणांत ढील देण्यासाठी माझ्यावर दबाव आ णला जात होता - पब्लिक प्रोझिक्युटर रोहिणी सालियन
त्यांचे पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून काम करणे थांबले.
१२). नोव्हेंबर २०१५ मध्ये मकोका कोर्टाने प्रज्ञासिंह चा प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून केलेला जामीन अर्ज फ़ेटाळला.
१३) मे २०१६ - एन आय ए ने प्रज्ञासिंह विरोधातील म्कोकाखालचे आरोप पुराव्या अभावी मागे घेतले.
१४) मे २०१६ - न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रज्ञासिंहने उज्जैन येथे कुंभस्नान करता यावे म्हणून इस्पितळात उपोषण केले. तिची मागणी मान्य केली गेली.
१५) .जून २०१६ - विशेष न्यायालयाने नीट चौकशी न करणे आणि एटीएसने नोंदवलेले साक्षीदारांचे जवाब पुन्हा नोंदवने यासाठी एन आय ए वर ठपका ठेवत जामीन अर्ज फ़ेटाळला. तिच्यावरचे आरोप खरे आहेत, असे मानायला पुरेशी जागा आहे, असंही म्हटलं. एन आय ने तिच्या जामीन अर्जाला विरोध केला नव्हता.
१६) एप्रिल २०१७ - मुंबई उच्च न्यायालयाने प्रज्ञासिंह ठाकुरला जामीन मंजूर केला.
ती स्त्री आहे, आठ वर्षांपासून तुरुंगात आहे, तिला कॆन्सर झाला आहे आधाराशि वाय चालू शकत नाही, ती सध्या एका आयुर्वेदिक इस्पितळात उपचार घेते आहे, तिला दोषी ठरवण्यासारखे पुरेसे पुरावे नाहीत
१७) मार्च २०१९ -समझौता बॉम्बस्फ़ोट प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत. न्यायालयाने निकालपत्रा त म्हटले आहे की अत्यंत म हत्त्वाचा पुरावा सादर केला गेला नाही, साक्षीदारांचे जवान नोंदवले गेले नाहीत.
कॅन्सरने आजारी असलेली आणि आधाराशिवाय चालू न शकणारी स्त्री आज लोकसभेची निवडणूक लढवते आहे. दहशतवादाचा आरोप असलेली व्यक्ती उद्या संसदेत मानाने प्रवेश करू शकेल.
दुसरीकडे हेमंत करकरेंवर भाजप पाठिराख्यांकडून, हिंदुत्ववाद्यांकडून विविध प्रकारे लांच्छन लावणे सुरू झाले आहे. हेमंत करकरे पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडले. पण आज ते पुन्हा पुन्हा मारले जात आहेत, तेही स्वत:ला देशभक्त, राष्ट्रप्रेमी म्हणवणार्या लोकांकडून.
शहीद हेमंत करकरे, आम्हांला क्षमा करा. या देशाचं रक्षण करताना कोणी आपले प्राण त्यागावेत, अशी आमची लायकी नाही. तुम्हांलाच काय, तु मच्या पत्नीला आणि मुलांनाही जिवंतपणी आणि मेल्यानंतरही ज्या गोष्टींचा सामना करावा लागतोय, त्या पाहून माझी मान खाली झुकते.
----------------------------------------------------------------------------------------------------------
२६.०४ .२०१९ रोजी वाढवलेला मजकूर.
मुंबईतल्या जे जे इस्पितळाचे तेव्हाचे डीन डॉ लहाने यांनी सांगितलं की प्रज्ञा सिंग ठाकुरच्या अनेक वैद्यकीय चाच ण्या केल्या, पण त्यात त्यांना कोण त्याही गंभीर आजा राची लक्षणं आढळली नाहीत. एम आर आय आणि इसीजी रिपोर्ट नॉर्मल होते. कॅन्सर साठीच्या एका तपासणीतही काहीही आढळलं नाही.
तिची तपासणी करणार्या डॉक्टरांच्या पथकातील एकाने सांगितलं की ती कोणत्याही डॉक्टर कडून हातही लावून घेत नव्हती. औष धोपचारही घेत नव्हती.
https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/what-bull-say-tat...
पोलीस अश्लील चित्रफिती
पोलीस अश्लील चित्रफिती दाखवायचे म्हणे, त्याकाळात असे मोबाईल होते का?
करकरेंना धमक्या येत होत्या.
करकरेंना धमक्या येत होत्या. ते राजीनामा देण्यासाठी गृहमंत्र्यांकडे गेले होते. गृहमंत्र्यांनी राजीनामा स्विकारला नाही. पण धमक्यांच्या आरोपांची चौकशी का झाली का ? नसल्यास का नाही ?
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/-/articl...
हुतात्मा हेमंत करकरे
हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबद्दल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांना आता मतदारांनीच धडा शिकवावा,' असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
'आपण शाप दिल्यानेच करकरे यांच्या संपूर्ण परिवाराचा अंत झाला,' असे वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना हजारे बोलत होते. ते म्हणाले, 'मतदारांच्या हातात मतरुपी चावी आहे. अशा उमेदवारांना त्यांनीच धडा शिकविला पाहिजे. आपल्या निवडणुकांमध्ये पक्ष आणि पार्ट्यांचे प्राबल्य वाढत असून मतदार आपला हक्क विसरत आहेत. मतदार हा या देशाचा मालक आहे. मात्र, तो जागरुक नसल्याने राजकारण्यांनी पातळी सोडली आहे. सध्याच्या प्रचारातही विकास, देशाचे हित हे मुद्दे बाजूला पडले आहेत. खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांच्या उकाळ्या-पाकाळ्या काढल्या जात आहे. यातून कोणाचेच भले होणार नाही. प्रलोबनाला बळी पडून मते देण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. मतदारांनी जागरुकपणे मतदान केले तर नक्कीच सुधारणा होईल.'
मंडळी, शाब्दिक युद्धात पडू
मंडळी, शाब्दिक युद्धात पडू नका. भाजप सम र्थकांच्या शेंडा बुडखा नसलेल्या आरोपांना आणि कथनाला उत्तर देऊ नका. त्यांना धाग्याचा रोख भलतीकडे वळवायचा आहे. या प्रयत्नात त्यां ना साथ देऊ नका.
प्रज्ञा सिंह ठाकुरने केलेले छळाचे, अवैध अटकेचे आरोप सर्वोच्च न्यायालयात, मानवाधिकार आयोगासमोर टिकलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची लिंक वर दिलेली आहे.
यानिमित्ताने एका गोष्टीची आठवण करून द्यायला हवी. प्रज्ञा सिंह आणि अन्य संशयितांना महाराष्ट्र एटीएसने अटक केली तेव्हा हेमंत करकरेंवर अत्यंत गलिच्छ स्वरूपाचा पर्सनल अॅटॅक हिंदुत्ववाद्यांकडून झाला होता. त्यांच्या कुटुंबियांनाही टारगेट केलं जाईल, अशा धमक्या दिल्या गेल्या होत्या. आज ते व त्यांच्या पत्नी दोघेही जिवंत नसताना त्यांच्यावर त्याच प्रकारचा हल्ला होतो आहे.
भाजप समर्थकांकडून , चौकीदार म्ह णवून घेतलं जाणार्यांकडून काय प्रकारचं लिहिलं जातंय हे पाहणं अत्यंत क्लेशदायक असलं, तरी आपण कशा परिस्थितीकडे वाटचाल करतोय हे समजून घेण्यासाठी ते माहीत असायला हवं. या गोष्टी इथे नोंदवल्या जातील.
भाजप समर्थकांना एक सांगणं - होत असलेला प्रकार लोक पाहता हेत, वाचताहेत. तुम्ही काय लिहिता, कशा प्रकारे लिहिता , यावरून ही ते स्वतःची मतं बनवणार आहेत. तेव्हा शक्य झालं तर खोटं , रचलेलं, द्वेषपूर्ण लिहिणं सोडा.
इतरांना पुन्हा एकदा विनंती -dont engage in war of words. Dont get into arguments . तुमची मतं, तुमच्याकडे असलेली माहिती वस्तु निष्ठपणे मांडा, कोणालाही उद्देशून नको. _/\_
करकरेंना धमक्या येत होत्या,
करकरेंना धमक्या येत होत्या, आबांनी नाकारले, दिग्विजयसिंह यांनी बीएसएनएल चे रेकॉर्डिंगच सादर केले.
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/-/articleshow/7219948...
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी तपासाधिकार्यांना धमक्या
16 नोव्हेंबरएटीएसचे जॉइंट सीपी हेमंत करकरे, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातले सरकारी वकील अजय मिसर आणि याप्रकरणातील तपास अधिकारी मोहन कुलकर्णी या तिघांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 699132 या क्रमाकावरून हा धमकीचा फोन सरकारी वकील अजय मिसर यांना आला होता.
https://lokmat.news18.com/news/article-4498.html
आर आर पाटील यांनी धमक्या आल्याचे का नाकारले ?
<< शहीद हेमंत करकरे, आम्हांला
<< शहीद हेमंत करकरे, आम्हांला क्षमा करा. या देशाचं रक्षण करताना कोणी आपले प्राण त्यागावेत, अशी आमची लायकी नाही. >>
------ तळमळ समजते... सर्वांसाठीच कसोटीचा काळ आहे.
आर आर पाटील आणि हिंदुत्ववादी
आर आर पाटील आणि हिंदुत्ववादी यांचे काय संबंध होते याचीच चौकशी करण्याची वेळ आलेली आहे.
२००९ साली मिरज सांगली दंगल झाली. पोलिसांनी भिडेंचा संबंध असल्यावरून त्यांना अटक केली. पाटलांनी वयाने जास्त असल्याचे कारण देत त्यांना सोडून दिले. हे वाक्य टीव्हीवर राष्ट्रवादीच्या प्रवक्र्त्यांनी उच्चारलेले आहे.
अफजलखान कबरीवरून दंगलीचे वातावरण निर्माण करणे, दंगलीचा कट रचणे, कोल्हापूर, सातारा येथे भडकाऊ भाषणे देणे आणि कबर उखाडण्याचा प्रयत्न करणे यावरून मिलिंद एकबोटेंना अटक झाली. आबांनी त्यांना सोडून दिले.
नरेंद्र दाभोळकर यांची मुलाखत उपलब्ध आहे. त्यात ते सांगतात की त्यांनी आबांची भेट घेऊन नरेंद्र महाराजांना अटक करण्याची, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर आबांनी म्हणजे आम्ही लाखो मतांवर पाणी सोडायचे का असा प्रश्न केला होता असे दाभोळकरांनी सांगितले.
ही राष्ट्रवादी संशयास्पद आहे. तरीही काँग्रेसशी तिची आघाडी आहे. हिंदुत्ववादी दोषी आहेत. त्यांना शिक्षा होत नाहीत. वेळकाढूपणा अवलंबला जातो यामागे काय कारण असावे ?
हिंदुतवाद्यांसोबत यांचीही चौकशी झाली पाहीजे. त्यासाठीच ज्यांचे हात दगडाखाली नाहीत असे लोक सत्तेत हवेत आणि प्रशासनातले यांचे चेले चपाटे हलवले गेले पाहीजेत.
ब-याच गोष्टी उजेडात येतील.
तर आणि तरच करकरे क्षमा करतील.
वेड्या भक्तांची ही वेडी माया
वेड्या भक्तांची ही वेडी माया
हेमंत करकरे ह्यांच्या पत्नीने
हेमंत करकरे ह्यांच्या पत्नीने माहितीच्या अधिकारात करकरे ह्यांच्या गहाळ झालेल्या बुलेट प्रूफ जॅकेट विषयी माहिती मागितली होती,त्याचे पुढे काय झाले?
The crucial evidence in
The crucial evidence in Karkare's death - the source of bullet fired into his body was absent. The bullets did not match with few of the terrorist's recovered guns which made it impossible to decide who amongst the terrorists killed Hemant Karkare
an Indian news agency, found
an Indian news agency, found that a substandard bulletproof jacket had been issued to Mr. Karkare. Though, according to the post mortem report, the quality of the vest was not a factor in his death as bullets did not pierce the vest.[28] Concerns in the media about the quality of the vest continue[29] because the vest itself was, according to Indian authorities, misplaced in the hospital.[30] In 2018, the Bombay High Court discarded a pending petition that had claimed that Karkare was not gunned down by terrorists Ajmal Kasab and Abu Ismail.[31]
रआजेश १८८
रआजेश १८८
२६/ ११ च्या दहशतवादी हल्ल्यात
२६/ ११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर देशभरात निर्माण झालेला प्रक्षोभ शमत नाही तोच, भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंहयांनी बाबरी मशिदीबाबत पुन्हा एकदा स्फोटक विधान केले आहे. 'आपण केवळ बाबरी मशिदीवर चढलो नव्हतो, तर तिला पाडण्यासाठीही मदत केली होती. आता आम्ही राम मंदिरही उभारू' असे नवे विधान करत नवा वाद ओढून घेतला आहे.
साध्वी प्रज्ञा सिंह यांनी भोपाळमधील एका प्रचारयात्रेदरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी राम मंदिर नक्कीच बनवले जाईल. ते एक भव्य असे मंदिर असेल असे म्हटले. त्यावर केव्हा पर्यंत राम मंदिर निर्माण होईल असा प्रश्न साध्वींना विचारण्यात आला. त्यावर आम्ही मंदिर बनवणारच, शेवटी आम्ही बाबरी मशीद उद्ध्व्सस्त करण्यासाठीही गेलो होतो, असे साध्वी म्हणाल्या. मी स्वत: मशिदीवर चढून मशीद तोडली होती. ईश्वरानेच मला ही संधी दिली, शक्ती दिली आणि मी हे काम केले, याचा मला गर्व आहे. आता आम्ही तिथेच राम मंदिर बनवणार असे त्या पुढे म्हणाल्या.
साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाने आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावली. इतकेच नाही, तर मध्य प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. एल. कांता राव यांनी सर्व राजकीय पक्षांना निर्देशही जारी केले. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा आचार संहितेचे उल्लंघन केल्यास, तसेच अपमानजनक भाषेचा प्रयोग केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट शब्दात कांता राव यांनी राजकीय पक्षांना बजावले आहे.
ह्या बाई कधी वर चढल्या होत्या
ह्या बाई कधी वर चढल्या होत्या ?
कोर्ट इतकी वर्षे विचारून दमले, फक्त बाळासाहेब बोलले होते , आम्ही पाडली , म्हणून
हिचा जन्म 2 एप्रिल 1988.
हिचा जन्म 2 एप्रिल 1988.
बाबरी पडली तेंव्हा ही चार वर्षांची होती ना ?
संघ, बीजेपी वाले अखखा एप्रिल महिना एप्रिल फुल मोड मध्ये असतात का ?
तीन ऑफिसर एकाच गाडी मध्ये
तीन ऑफिसर एकाच गाडी मध्ये मारले gele.
आणि ते सुधा अनुभवी ऑफिसर हे काही सामान्य लोकांना तेव्हा सुधा पटले नाही.
(No subject)
' यशवंती ' सारखी काम केले
' यशवंती ' सारखी काम केले असेल तिने, चिमुरडी असल्याने दोर बांधून तिला वर फेकले असेल. नखं मजबूत असतील तिची.
गोळ्या झाडल्या, हेच लॉजिक
प्रत्यक्षय गोळ्या झाडल्या, हेच लॉजिक लावले तर ..... संघात किती स्वातंत्र्यसैनिक आहेत म्हणे ?
(No subject)
तीन ऑफिसर एकाच गाडी मध्ये
तीन ऑफिसर एकाच गाडी मध्ये मारले gele.
आणि ते सुधा अनुभवी ऑफिसर हे काही सामान्य लोकांना तेव्हा सुधा पटले नाही. >>>
अले भाई, कैना क्या चाहते हो ?

आणि 49 गेले ते ?
आणि 49 गेले ते ?
सद्य स्थितीवरून लक्ष
सद्य स्थितीवरून लक्ष भरकटवणाऱ्यांना मदत न करणाऱ्यांचे आभार.
हिचा जन्म 2 एप्रिल 1988.
हिचा जन्म 2 एप्रिल 1988.
>>
कुठेतरी वाचलंय की तिचं वय आज ४७ वर्षे आहे.
एक आतंकवादी निवडणुक लढवते आणि
एक आतंकवादी निवडणुक लढवते आणि आर्थिक गुन्हे दाखल झालेले दोघे निवडणुक लढवतात यात कोणाला काहीच फरक दिसत नसेल तर या देशाचे भवितव्य आतंकवाद्यांच्या हातात असेल यात शंकाच नाही,
बाकी साध्वीला पॉर्न दाखवण्यात आले या वावड्या उठवणार्यांचा मेंदू किती धुतला गेला असेल याची कल्पना करवत नाही. १९९२ साली तथाकथित साधी ऋतुंभारा ज्या प्रकारची भाषा वापरत असे त्यावरुन साध्वी ही शिवी ठरावी असे माझे मत आहे. प्रज्ञा ठाकूरदेखिल त्याच पठडितील आहे
‘अगर प्रज्ञा ठाकुर महिषासुर
‘अगर प्रज्ञा ठाकुर महिषासुर मर्दिनी हैं तो चुनाव की ज़रूरत क्या है. अगर आपने हेमंत करकरे को श्राप देकर मारा, वैसे ही दिग्विजय सिंह को भी मार दीजिए.'
~ स्वामी स्वरूपानंद
बाकी साध्वीला पॉर्न दाखवण्यात
बाकी साध्वीला पॉर्न दाखवण्यात आले या वावड्या उठवणार्यांचा मेंदू किती धुतला गेला असेल याची कल्पना करवत नाही. >>>
आसिफ, तुमचा मेंदू शाबीत आहे ना? मग खालील गोष्टी का झाल्या त्या सांगा बरं...
1) 2008 पासून 2014 पर्यंत काँग्रेस प्रज्ञावरचे आरोप सिद्ध करून कसाबप्रमाणे तिला शिक्षा का करू शकली नाही? तिला जामीन मिळाला याचा अर्थ तिच्याविरुद्ध बॉम्बस्फोट केल्याप्रकरणी ठोस पुरावेच नाहीत.
2) कामटे , साळसकर व करकरे हे अधिकारी एकाच गाडीत का होते नि एकत्र शहिद का झाले? त्यांचे चिलखत हॉस्पिटलात गायब झाले की मुळात नव्हतेच?
3) चौकीदार चोर है हे कुठल्या पुराव्यांच्या आधारे म्हटलं जातं?
4) जर चौकीदार चोर है या वाक्यासाठी पुरावे नसतील आणि राफुल गांधी, क्रेझीवाल वा मोमताला काहीही बोलण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल तर झालेल्या अन्यायाविरुद्ध व छळाविरुद्ध बोलण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य इतरांना नाहीय का?
राज्य सरकारने करकरे ह्यांच्या
राज्य सरकारने करकरे ह्यांच्या चिलखताचा तपास केलाच असेल ना ? सापडले का?
या हल्ल्यात स्थानिक
या हल्ल्यात स्थानिक मदतनिसांचा सहभाग नव्हता, असे तत्कालिन केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम् म्हणाले. त्यामुळे स्थानिक मदतनिसांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. परंतु, स्थानिक मदतनिसांच्या सहभागाशिवाय इतका योजनाबद्ध हल्ला शक्य नाही
Pages