शहीद हेमंत करकरे, आम्हांला क्षमा करा

Submitted by भरत. on 20 April, 2019 - 09:47

शहीद हेमंत करकरे , आम्हांला क्षमा करा.

२६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री तुम्ही हेल्मेट चढवून जीपमध्ये बसताना टीव्हीवर दिसलात. त्यानंतर काही मिनिटांतच तुम्ही दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडल्याची बातमी पाहिली.
आज त्या घटनेला साडेदहा वर्षं होत असताना पुन्हा एकदा अनेक लोकांकडून तुम्हांला मारलं जाताना पाहतोय.
मालेगाव बाँबस्फ़ोट प्रकरणी ज्या प्रज्ञासिंह ठाकुरला तुम्ही अटक केली होती, तिने तीन दिवसांपूबाँब, १७ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच दिवशी भाजपने तिला मध्यप्रदेशा तील भोपाळ येथून लोकसभेची उमेदवारी दिली.
दोन दिवसांनंतर "अबकी बार फ़िर एक बार मोदी सरकार" अशी घोषणा लिहिलेल्या भाजपच्या मंचावरून बोलताना तिने सांगितले, "मला त्याने कोणत्याही पुराव्याशिवाय अटक केली. त्याचं हे कृत्य देशद्रोहाचं होतं, धर्मविरोधी होतं. मी त्याला शाप दिला. तुझा सर्वनाश होईल.
मला अटक झाली तेव्हा मला सुतक लागलेलं. बरोबर सवा महिन्यांत तो दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडला. माझं सुतक संपलं." या वाक्यावर मंचावर बसलेल्या भगवा फ़ेटेधारकांनी टाळ्या वाजवल्या.

या कथनावर पुरेसा गदारोळ झाला. आय पी एस ऒफ़िसरांच्या संघटनेने त्याचा निषेध केला, तेव्हा भाजपने हे प्रज्ञासिंह ठाकुरचं वैयक्तिक मत असल्याचं सांगून हात झटकले. वर, अनेक वर्षं शारीरिक आणि मानसिक छळ सहन केल्याने तिने असं म्हटलं असेल अशी मखलाशीही केली.
दुस र्‍या दिवशी प्रज्ञासिंहने करकरेंबद्दलच्या माझ्या विधानामुळे देशाच्या शत्रूंना आनंद झाला. देशाच्या शत्रूंना आनंद होईल, असं काही मला करायचं नाही, म्हणून माझं विधान मी मागे घेते असं सांगितलं. तिच्या वक्तव्यानंतर भारत माता की जय च्या घोषणा दिल्या गेल्या.

प्रज्ञासिंहच्या उमेदवारीचं समर्थन करताना भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी असं सांगितलं की पाच हजार वर्षं जुनप्र, वसुधैव कुटुम्बकम् मानणार्‍या संस्कृतीवर समझौता एक्स्प्रेस आणि मालेगाव स्फ़ोटात दहशतवादाचा शिक्का मारला गेला. या सगळ्याचं प्रतीकात्मक उत्तर म्हणून तिला उमेदवारी दिली आहे. (प्रज्ञासिंह ठाकुरचं ) हे प्रतीक काँग्रेसला महाग पडणार आहे.

प्रज्ञासिंहला कोणत्याही आरोपपत्राशिवाय (चार्जशीट) , कोणत्याही पुराव्याशिवाय डांबून ठेवलं गेलं, तिचा छळ केला गेला, असं अनेक लोक म्हणू लागलेत.

इथे काही गोष्टींकडे मागे वळून पाहणं क्रमप्राप्त आहे.

१) २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव इथे बॊम्बस्फ़ोट झाला. ७ लोक मरण पावले, ७९ जखमी झाले.
२) एटीएसने प्रज्ञासिंहला २३ ऑक्टोबर २००८ रोजी अटक करून २४ रोजी चीफ़ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट समोर हजर केले.
३) २० जानेवारी २००९ रोजी तिच्या आणि अन्य आरोपींच्या विरोधात चार्जशीट दाखल केली.
४.) जुलै २००९ मध्ये मकोका खालील आरोप विशेष न्यायालाने हटवले
५) जुलै २०१० मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा मकोका लावला.
६) एप्रिल २०११ मध्ये मालेगाव सह अन्य प्रकरणांचा तपास एन आय ए कडे दिला गेला.
७) २३ सप्टेंबर २०११ रोजी सर्वोच्च न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फ़ेटाळला. तिची अटक बेकायदेशीर असल्याचा आणि एटीएसने तिचा छळ केल्याचा आरोपही न्यायालयाने अमान्य केला. हे निकालपत्र संपूर्ण वाचावं, अशी चर्चेत भाग घेणार्‍या सर्वांना विनंती.

न्यायालयाचं निकालपत्र इथे वाचता येईल.

८) यानंतर तिने मुंबई उच्च न्यायालयात प्रकृतीच्या कारणावरून जामीन अर्ज केला. हा अर्ज फ़ेटाळताना न्यायालयाने तिच्या विरोधात भक्कम पुरावा असल्याचे म्हटले.

९ ) २०१४ मध्ये दिल्ली आणि मुंबई इथे सत्तांतर झालं.
१० ) एप्रिल २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की प्रज्ञासिंह विरोधात मकोका लावण्याजोगा पुरावा नाही, तेव्हा खालच्या कोर्टाने तिच्या जामीन अर्जावर विचार करावा.

११) जून २०१५ - नवं सरकार मालेगाव व अन्य प्रकरणांत ढील देण्यासाठी माझ्यावर दबाव आ णला जात होता - पब्लिक प्रोझिक्युटर रोहिणी सालियन
त्यांचे पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून काम करणे थांबले.

१२). नोव्हेंबर २०१५ मध्ये मकोका कोर्टाने प्रज्ञासिंह चा प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून केलेला जामीन अर्ज फ़ेटाळला.
१३) मे २०१६ - एन आय ए ने प्रज्ञासिंह विरोधातील म्कोकाखालचे आरोप पुराव्या अभावी मागे घेतले.
१४) मे २०१६ - न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रज्ञासिंहने उज्जैन येथे कुंभस्नान करता यावे म्हणून इस्पितळात उपोषण केले. तिची मागणी मान्य केली गेली.

१५) .जून २०१६ - विशेष न्यायालयाने नीट चौकशी न करणे आणि एटीएसने नोंदवलेले साक्षीदारांचे जवाब पुन्हा नोंदवने यासाठी एन आय ए वर ठपका ठेवत जामीन अर्ज फ़ेटाळला. तिच्यावरचे आरोप खरे आहेत, असे मानायला पुरेशी जागा आहे, असंही म्हटलं. एन आय ने तिच्या जामीन अर्जाला विरोध केला नव्हता.
१६) एप्रिल २०१७ - मुंबई उच्च न्यायालयाने प्रज्ञासिंह ठाकुरला जामीन मंजूर केला.
ती स्त्री आहे, आठ वर्षांपासून तुरुंगात आहे, तिला कॆन्सर झाला आहे आधाराशि वाय चालू शकत नाही, ती सध्या एका आयुर्वेदिक इस्पितळात उपचार घेते आहे, तिला दोषी ठरवण्यासारखे पुरेसे पुरावे नाहीत
१७) मार्च २०१९ -समझौता बॉम्बस्फ़ोट प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत. न्यायालयाने निकालपत्रा त म्हटले आहे की अत्यंत म हत्त्वाचा पुरावा सादर केला गेला नाही, साक्षीदारांचे जवान नोंदवले गेले नाहीत.

कॅन्सरने आजारी असलेली आणि आधाराशिवाय चालू न शकणारी स्त्री आज लोकसभेची निवडणूक लढवते आहे. दहशतवादाचा आरोप असलेली व्यक्ती उद्या संसदेत मानाने प्रवेश करू शकेल.

दुसरीकडे हेमंत करकरेंवर भाजप पाठिराख्यांकडून, हिंदुत्ववाद्यांकडून विविध प्रकारे लांच्छन लावणे सुरू झाले आहे. हेमंत करकरे पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडले. पण आज ते पुन्हा पुन्हा मारले जात आहेत, तेही स्वत:ला देशभक्त, राष्ट्रप्रेमी म्हणवणार्‍या लोकांकडून.

शहीद हेमंत करकरे, आम्हांला क्षमा करा. या देशाचं रक्षण करताना कोणी आपले प्राण त्यागावेत, अशी आमची लायकी नाही. तुम्हांलाच काय, तु मच्या पत्नीला आणि मुलांनाही जिवंतपणी आणि मेल्यानंतरही ज्या गोष्टींचा सामना करावा लागतोय, त्या पाहून माझी मान खाली झुकते.
----------------------------------------------------------------------------------------------------------
२६.०४ .२०१९ रोजी वाढवलेला मजकूर.
मुंबईतल्या जे जे इस्पितळाचे तेव्हाचे डीन डॉ लहाने यांनी सांगितलं की प्रज्ञा सिंग ठाकुरच्या अनेक वैद्यकीय चाच ण्या केल्या, पण त्यात त्यांना कोण त्याही गंभीर आजा राची लक्षणं आढळली नाहीत. एम आर आय आणि इसीजी रिपोर्ट नॉर्मल होते. कॅन्सर साठीच्या एका तपासणीतही काहीही आढळलं नाही.
तिची तपासणी करणार्‍या डॉक्टरांच्या पथकातील एकाने सांगितलं की ती कोणत्याही डॉक्टर कडून हातही लावून घेत नव्हती. औष धोपचारही घेत नव्हती.
https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/what-bull-say-tat...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही सगळे प्रज्ञा सिंह ठाकु रबद्दल बोलायचं का बरं टाळताय? जे बोलताय तेही खोटं. छळ झाला, आरोप ठेवले नाहीत, पुरावे नाहीत.
<<

एकाद्या व्यक्तिचा तुरुंगात छळ झाला हे कोर्टात कसे सिद्ध करतात ? पोलिस स्वत: कोर्टात सांगतात की Interrogation च्या वेळी एकादा Magistrate पोलिसांसोबत असतो ?

१. आलात परत? वर मुद्दा क्र. ७ मध्ये न्यायालयाच्या आदेशाची लिंक दिली आहे. ती वाचा. त्यातला संबंधित भागही मी आधीच्या एका प्रतिसादात डकवला आहे.

२. खटला इतकी वर्षं का रेंगाळला असा एक प्रश्न आला आहे. खटला चालू नये , त्यात अडथळा यावा यासा ठी आ रोपीने हर प्रकारे प्रयत्न केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या त्याच आदेशात अटक बेकायदा होती, चार्जशीट वे ळेत दाखल झाली नाही, असे मुद्देही निकाली का ढले आहेत. पुढे मकोका लावण्यावरून आणखी दोन वर्षे गेली आहेत.

( इथे दोन उदाहरणं देणं भाग आहे - कन्हैयाकुमारविरोधात तीन वर्षं झाली तरी आरोपपत्र दाखल झालेलं नाही. ऐन निवडणुकांच्या तोंडावर आरोपपत्र दा खल करायची घिसाडघाई मात्र झाली.
भीमा कोरेगावप्रकरणी आरो पपत्र दाखल करायला आणखी नव्वद दिवस मिळावेत म्हणून रविवारी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले गेले. )

३ भाजपकडून राजकारणात आलेल्या साधु संतांची मांदिया़ळी पाहू.
उ मा भारती - बाबरी मशीद प्रकरणी आरोपी.
निरंजन ज्योती - विरोधी पक्षाला हरामजादे म्हटलं. या मंत्री आहेत.
साक्षी महाराज - जे लोक मला मत देणार नाहीत, त्यांना मी शाप देईन.
अजय सिंग बिश्ट - बस नामही काफी है. तरीही काही मासले. यां च्या सं घटनेच्या मंचावरून यांच्या उप स्थितीत - मुस्लिम स्त्रियांना कबरीतून काढून त्यांच्यावर बलात्कार करा असं सांगितलं जातं.
केरळमध्ये जाऊन हे उत्तर प्रदेशच्या उत्तम आरोग्य सेवेचे दाखले देतात.
यांच्या राज्यात पोलीस ऊठसूट कोणालाही गोळ्या घालू शकतात. पोलिसांनाही गोळ्या घातल्या जाऊ शकतात. पण चौकशी गाई कशा मेल्या याची होते.
प्रज्ञा सिंह ठाकुर - दहशतवाद्यांच्या गोळ्यांना एक पोलिस ऑफिसर बळी पडला तर ही बाई आनंद व्यक्त करते. घटना घडून गेल्यावर दहा वर्षांनी प्रचारसभेत तसं सांगते आणि मंचावरचे लोक त्यावर टाळ्या वाजवतात.

४ काही लोकांना करकरेंची हत्या कशी झाली याबद्दल अचानक आताच बरेच प्रश्न पडलेत. करकरेंची २६/११ च्या रात्रीची दृश्य जी हजारो वेळा टीव्हीवर दाखवली गेलीत ती त्यांना माहीतच नव्हती

या विषयावर मला जे जे लिहायचं होतं ते लिहून झालंय. भाजप समर्थकांकडून पुन्हा पुन्हा तेच नि र र्थक /असंबद्ध मुद्दे मांडले जाताहेत.
जोवर काही नवा मुद्दा येत नाही तोवर थांबतोय.

Pages