शहीद हेमंत करकरे , आम्हांला क्षमा करा.
२६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री तुम्ही हेल्मेट चढवून जीपमध्ये बसताना टीव्हीवर दिसलात. त्यानंतर काही मिनिटांतच तुम्ही दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडल्याची बातमी पाहिली.
आज त्या घटनेला साडेदहा वर्षं होत असताना पुन्हा एकदा अनेक लोकांकडून तुम्हांला मारलं जाताना पाहतोय.
मालेगाव बाँबस्फ़ोट प्रकरणी ज्या प्रज्ञासिंह ठाकुरला तुम्ही अटक केली होती, तिने तीन दिवसांपूबाँब, १७ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच दिवशी भाजपने तिला मध्यप्रदेशा तील भोपाळ येथून लोकसभेची उमेदवारी दिली.
दोन दिवसांनंतर "अबकी बार फ़िर एक बार मोदी सरकार" अशी घोषणा लिहिलेल्या भाजपच्या मंचावरून बोलताना तिने सांगितले, "मला त्याने कोणत्याही पुराव्याशिवाय अटक केली. त्याचं हे कृत्य देशद्रोहाचं होतं, धर्मविरोधी होतं. मी त्याला शाप दिला. तुझा सर्वनाश होईल.
मला अटक झाली तेव्हा मला सुतक लागलेलं. बरोबर सवा महिन्यांत तो दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडला. माझं सुतक संपलं." या वाक्यावर मंचावर बसलेल्या भगवा फ़ेटेधारकांनी टाळ्या वाजवल्या.
या कथनावर पुरेसा गदारोळ झाला. आय पी एस ऒफ़िसरांच्या संघटनेने त्याचा निषेध केला, तेव्हा भाजपने हे प्रज्ञासिंह ठाकुरचं वैयक्तिक मत असल्याचं सांगून हात झटकले. वर, अनेक वर्षं शारीरिक आणि मानसिक छळ सहन केल्याने तिने असं म्हटलं असेल अशी मखलाशीही केली.
दुस र्या दिवशी प्रज्ञासिंहने करकरेंबद्दलच्या माझ्या विधानामुळे देशाच्या शत्रूंना आनंद झाला. देशाच्या शत्रूंना आनंद होईल, असं काही मला करायचं नाही, म्हणून माझं विधान मी मागे घेते असं सांगितलं. तिच्या वक्तव्यानंतर भारत माता की जय च्या घोषणा दिल्या गेल्या.
प्रज्ञासिंहच्या उमेदवारीचं समर्थन करताना भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी असं सांगितलं की पाच हजार वर्षं जुनप्र, वसुधैव कुटुम्बकम् मानणार्या संस्कृतीवर समझौता एक्स्प्रेस आणि मालेगाव स्फ़ोटात दहशतवादाचा शिक्का मारला गेला. या सगळ्याचं प्रतीकात्मक उत्तर म्हणून तिला उमेदवारी दिली आहे. (प्रज्ञासिंह ठाकुरचं ) हे प्रतीक काँग्रेसला महाग पडणार आहे.
प्रज्ञासिंहला कोणत्याही आरोपपत्राशिवाय (चार्जशीट) , कोणत्याही पुराव्याशिवाय डांबून ठेवलं गेलं, तिचा छळ केला गेला, असं अनेक लोक म्हणू लागलेत.
इथे काही गोष्टींकडे मागे वळून पाहणं क्रमप्राप्त आहे.
१) २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव इथे बॊम्बस्फ़ोट झाला. ७ लोक मरण पावले, ७९ जखमी झाले.
२) एटीएसने प्रज्ञासिंहला २३ ऑक्टोबर २००८ रोजी अटक करून २४ रोजी चीफ़ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट समोर हजर केले.
३) २० जानेवारी २००९ रोजी तिच्या आणि अन्य आरोपींच्या विरोधात चार्जशीट दाखल केली.
४.) जुलै २००९ मध्ये मकोका खालील आरोप विशेष न्यायालाने हटवले
५) जुलै २०१० मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा मकोका लावला.
६) एप्रिल २०११ मध्ये मालेगाव सह अन्य प्रकरणांचा तपास एन आय ए कडे दिला गेला.
७) २३ सप्टेंबर २०११ रोजी सर्वोच्च न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फ़ेटाळला. तिची अटक बेकायदेशीर असल्याचा आणि एटीएसने तिचा छळ केल्याचा आरोपही न्यायालयाने अमान्य केला. हे निकालपत्र संपूर्ण वाचावं, अशी चर्चेत भाग घेणार्या सर्वांना विनंती.
न्यायालयाचं निकालपत्र इथे वाचता येईल.
८) यानंतर तिने मुंबई उच्च न्यायालयात प्रकृतीच्या कारणावरून जामीन अर्ज केला. हा अर्ज फ़ेटाळताना न्यायालयाने तिच्या विरोधात भक्कम पुरावा असल्याचे म्हटले.
९ ) २०१४ मध्ये दिल्ली आणि मुंबई इथे सत्तांतर झालं.
१० ) एप्रिल २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की प्रज्ञासिंह विरोधात मकोका लावण्याजोगा पुरावा नाही, तेव्हा खालच्या कोर्टाने तिच्या जामीन अर्जावर विचार करावा.
११) जून २०१५ - नवं सरकार मालेगाव व अन्य प्रकरणांत ढील देण्यासाठी माझ्यावर दबाव आ णला जात होता - पब्लिक प्रोझिक्युटर रोहिणी सालियन
त्यांचे पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून काम करणे थांबले.
१२). नोव्हेंबर २०१५ मध्ये मकोका कोर्टाने प्रज्ञासिंह चा प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून केलेला जामीन अर्ज फ़ेटाळला.
१३) मे २०१६ - एन आय ए ने प्रज्ञासिंह विरोधातील म्कोकाखालचे आरोप पुराव्या अभावी मागे घेतले.
१४) मे २०१६ - न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रज्ञासिंहने उज्जैन येथे कुंभस्नान करता यावे म्हणून इस्पितळात उपोषण केले. तिची मागणी मान्य केली गेली.
१५) .जून २०१६ - विशेष न्यायालयाने नीट चौकशी न करणे आणि एटीएसने नोंदवलेले साक्षीदारांचे जवाब पुन्हा नोंदवने यासाठी एन आय ए वर ठपका ठेवत जामीन अर्ज फ़ेटाळला. तिच्यावरचे आरोप खरे आहेत, असे मानायला पुरेशी जागा आहे, असंही म्हटलं. एन आय ने तिच्या जामीन अर्जाला विरोध केला नव्हता.
१६) एप्रिल २०१७ - मुंबई उच्च न्यायालयाने प्रज्ञासिंह ठाकुरला जामीन मंजूर केला.
ती स्त्री आहे, आठ वर्षांपासून तुरुंगात आहे, तिला कॆन्सर झाला आहे आधाराशि वाय चालू शकत नाही, ती सध्या एका आयुर्वेदिक इस्पितळात उपचार घेते आहे, तिला दोषी ठरवण्यासारखे पुरेसे पुरावे नाहीत
१७) मार्च २०१९ -समझौता बॉम्बस्फ़ोट प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत. न्यायालयाने निकालपत्रा त म्हटले आहे की अत्यंत म हत्त्वाचा पुरावा सादर केला गेला नाही, साक्षीदारांचे जवान नोंदवले गेले नाहीत.
कॅन्सरने आजारी असलेली आणि आधाराशिवाय चालू न शकणारी स्त्री आज लोकसभेची निवडणूक लढवते आहे. दहशतवादाचा आरोप असलेली व्यक्ती उद्या संसदेत मानाने प्रवेश करू शकेल.
दुसरीकडे हेमंत करकरेंवर भाजप पाठिराख्यांकडून, हिंदुत्ववाद्यांकडून विविध प्रकारे लांच्छन लावणे सुरू झाले आहे. हेमंत करकरे पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडले. पण आज ते पुन्हा पुन्हा मारले जात आहेत, तेही स्वत:ला देशभक्त, राष्ट्रप्रेमी म्हणवणार्या लोकांकडून.
शहीद हेमंत करकरे, आम्हांला क्षमा करा. या देशाचं रक्षण करताना कोणी आपले प्राण त्यागावेत, अशी आमची लायकी नाही. तुम्हांलाच काय, तु मच्या पत्नीला आणि मुलांनाही जिवंतपणी आणि मेल्यानंतरही ज्या गोष्टींचा सामना करावा लागतोय, त्या पाहून माझी मान खाली झुकते.
----------------------------------------------------------------------------------------------------------
२६.०४ .२०१९ रोजी वाढवलेला मजकूर.
मुंबईतल्या जे जे इस्पितळाचे तेव्हाचे डीन डॉ लहाने यांनी सांगितलं की प्रज्ञा सिंग ठाकुरच्या अनेक वैद्यकीय चाच ण्या केल्या, पण त्यात त्यांना कोण त्याही गंभीर आजा राची लक्षणं आढळली नाहीत. एम आर आय आणि इसीजी रिपोर्ट नॉर्मल होते. कॅन्सर साठीच्या एका तपासणीतही काहीही आढळलं नाही.
तिची तपासणी करणार्या डॉक्टरांच्या पथकातील एकाने सांगितलं की ती कोणत्याही डॉक्टर कडून हातही लावून घेत नव्हती. औष धोपचारही घेत नव्हती.
https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/what-bull-say-tat...
अबू जिंदाल हा 26/11
अबू जिंदाल हा 26/11 हल्ल्यातील एक म्होरक्या होता. कराचीहून 10 पाकिस्तानी दहशतवादी बोटीने समुद्रमार्गे निघाले त्यावेळी त्यांना निरोप आणि शुभेच्छा देण्यासाठी तो कराची बंदरावर हजर होता. अबू हमजा(जिंदाल)ने 2009 मध्ये एक दिवस मुंबईतील आमदार निवासात महाराष्ट्र सरकारचे माजी मंत्री यांच्या जागेत मुक्काम ठोकल्याचा ठोस पुरावा एटीएसकडे आहे. याने हल्ल्यामधील लष्कर-ए-तोयबाच्या 10 दहशतवाद्यांना हिंदी आणि उर्दू शिकविले. म्हणजेच हल्ल्यापूर्वी अनेक दिवस हा पाकिस्तनमध्ये होता. या अबू जिंदालबाबत थर्ड डिग्रीचा वापर केला तर 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील सर्व स्थानिक मदतनिसांना अजूनही पकडता येईल.
सर्व दहशतवाद्यांकडे बंगलोर
सर्व दहशतवाद्यांकडे बंगलोर येथे बनवलेली ओळखपत्रे होती.
स्थानिक मदतनिसांच्या सहकार्याशिवाय असा नियोजनबद्ध हल्ला शक्य नाही, असे अनेक लोकांचे आणि पोलीस अधिकार्यांचे मत आहे. नरेंद्र मोदीही तसेच म्हणाले. परंतु, चिदंबरम् यांनी त्यांचे म्हणणे खोडून काढले आणि या मदतनिसांना मोकळे सोडले.
स्थनिक मदतनिसांच्या मदतीशिवय एवढा मोठ हल्ला शक्य नाही, असे म्हणून या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली. यावेळी त्यांनी अमेरिकेतील 9/11 दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेत अशी चौकशी झाली होती, याची आठवण करून दिली. सीआरपीएफ कॅम्पवर दहशतवादी करणार्या फहिम अन्सारीच्या कबुलीजबाबकडेही अडवाणी यांनी खासदारांचे लक्ष वेधले. परंतु, या अन्सारीलाही मोकळे सोडण्यात आले.
(No subject)
छळ झालाच नाही?
वर हेला यांनी केलेली कॉमेंटदेखील अतिशय हीन मानसिकता दर्शविते. इतर आरोपींचा पोलिसांकडून छळ होतो म्हणून या साध्वीचा छळ क्षम्य कसा काय होऊ शकतो?
प्रज्ञासिंग चा छळ झाला म्हणून
प्रज्ञासिंग चा छळ झाला म्हणून तिने करकरेंविषयीचे तिचे बोलणे क्षम्य आहे हे लॉजिक अतिशय कमकुवत आहे.
तसे बघता काश्मीर, अरुणाचल प्रदेश इकडे लष्कराकडून स्थानिक लोकांना मिळणारी अतिरिक्त कडक वागणूक सर्वश्रुत आहे, AFSA अडलेल्या प्रदेशात लष्करानेच लैगिक अत्याचार केल्याच्या गोष्टीही ऐकू येतात, त्याविरुद्ध तिकडे आंदोलने झाली आहेत,
मग यातल्या एखाद्या पीडिताने भारतीय सैन्य किंवा संघराज्य या विषयी मत व्यक्त केले तर त्याला देशद्रोही/ शत्रू चे लेबल लावायला कोण पुढे सरसावते?
जर छळ झाला म्हणून कडवट भावना हे स्वीकार आहे, आणि म्हणून पीडित व्यक्तींबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटते, तर ती सर्व पीडितांबद्दल वाटली पाहिजे ना?
दुसरी गोष्ट, आपण परसेप्शन वर अवलंबून राहून बाजू मांडणार आहोत? की कागदोपत्री पुरावा सादर केला आहे त्यावर बोलणार आहोत?
जर सरकारने बसवलेले पॅनल छळ झाला नाही असे निर्विवादपणे म्हणत आहे, तर केवळ "मला वाटते म्हणून तो झालाच" हे म्हणणे किती बरोबर?
तिसरी गोष्ट, ही बाई ,मी कॅन्सर पेशन्ट् आहे, उभी सुद्धा राहू शकत नाही वगैरे म्हणत होती, तेव्हा व्हील चेअर मध्ये बसलेले फोटो म्हणजे तिचा छळ झाला याचे प्रमाण नाही.
26/11 chya काही संशयित आरोपी
26/11 chya काही संशयित आरोपी वर साधी ब्रेन मॅपिंग टेस्ट सुधा केली नाही .
आणि साध्वी वर third degree वापरली
त्या काळात स्मार्ट फोन नव्हते
त्या काळात स्मार्ट फोन नव्हते , कॉम्पुटरही फारसे नव्हते,
मग हे व्हिडीओ दाखवले तरी कशावर ? व्हिडीओ प्लेअर , कॉम्पुटर वापरले , तरी त्याची ने आण सी सी टी व्हीही वर दिसेल ना ?
हाताला सूज यायची म्हणे , मणका तुटला , हे सगळे मेडिकल मध्ये दिसते , कोर्टातही हात दाखवू शकते.
मला केमिकल दिले , म्हणून कँसर झाला, हाही एक दावा,
गंमत म्हणजे ज्या कोर्टाने तिला निर्दोष मानले , त्याच कोर्टाने तिने केलेले आरोपही निराधार मानले आहेत, मग पुन्हा पुन्हा त्याच मुलाखती का दाखवताहेत ?
वरच्या प्रतिसादात एकही चूक
संपादीत.
त्या सर्व इंटरव्ह्यू , मी
त्या सर्व इंटरव्ह्यू , मी म्हणते माझा छळ झाला, म्हणजे झाला या थाटाच्या आहेत.
जर (संशयित) पीडिताचे शब्द प्रमाण मानायचे असतील तर कोण तो अत्याचारी BJP mla आत्ता पर्यंत जेल मध्ये हवा,
वर ७ खाली दिलेल्या सर्वोच्च
वर ७ खाली दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रातून
So far as allegations of torture etc. are concerned.
this Court finds that when the appellant was produced before the Chief Judicial Magistrate, Nasik on October 24, 2008, there was no allegation of any ill treatment by the Police.
When the appellant was again produced on November 3, 2008, there was no allegation of any torture in Police custody.
16. Allegation of ill treatment in the Police custody was made for the first time, in the affidavit dated November 17, 2008, a perusal of which would show that it is not believable as primarily it has been alleged that the Police made her companion Bhim Bhai Pasricha to beat her. No injury was found on her body by any of the doctors in the two hospitals.
उच्च न्यायालयाने याबाबत मत नोंदवलं नाही कारण प्रकरण मानवाधिकार आयोगाकडे होते. छळ झाल्याचं त्यांनाही आढळलं नाही.
इथे पुन्हा पुन्हा जे प्रश्न विचारले जात आहेत, त्यांंबद्दल मूळ लेखात लिहिलं आहे.
पुरावा नसण्याबद्दल - एन आय ए ने आरोप मागे घेईतो, जामीन नाकारताना प्रत्येक वेळी त्या त्या न्यायालयाने पुरेसा पुरावा आहे, असं म्हटलं होतं.
अगदी २०१६ मध्येही याच मुद्द्यावर विशेष न्यायालयाने जामीन नाकारला होता.
तेव्हा छळ झाल्याचं आणि पुरावे नसल्याचं गाणं पुन्हा पुन्हा गाऊन काहीही साध्य होणार नाही.
समोर असलेली ऑथेंटिक माहिती न वाचता , सांगोवांगीच्या किंवा पसरवलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा लिहिणे हा चर्चा करण्याची तयारी , मुद्दे नसल्याचे लक्षण आहे.
–-----
२००८ च्या दहशतवादी हल्ल्याबाबतची चर्चा हा या धाग्याचा विषय नाही.
----/---
आता प्रज्ञा ठाकुरच्या समर्थकांसाठी एक प्रश्न. मी आजारी आहे, म्हणून मला जामीन द्या, असं म्हणणारी व्यक्ती निवडणूक लढवण्यासाठी फिट कशी झाली? जर ती निवडणूक लढवण्यासाठी फिट असेल, तर तुरुंगात जायलाही फिट आहे. जामीन फक्त आजाराच्या कारणावरून मिळाला आहे.
निवडणूक लढवायला फिटन्सची गरज
निवडणूक लढवायला फिटन्सची गरज नसते
https://twitter.com/t_d_h
https://twitter.com/t_d_h_nair/status/1119655146840035329
छळाची कहाणी सांगण्याबद्दल प्रश्न विचारल्यावर प्रज्ञासि़ह ठाकुरची प्रतिक्रिया पहा.
इतका गंभीर आरोप असताना
इतका गंभीर आरोप असताना निवडणुकीचे तिकीट दिलेच कसे काय? बाई बरळल्या बघून सर्वोच्च नेता पाठराखण करण्यास धावतोच कसा काय? मुसलमानांना दहशत वाटावी म्हणून हा डावपेच असे सरळ मान्य करून का टाकीत नाहीत.
जामीन फक्त आजाराच्या
जामीन फक्त आजाराच्या कारणावरून मिळाला आहे.
?
म्हणजे पिक्चर अभी बाकी है ?
तिन्ही ऑफिसर एका गाडीतून कसे
तिन्ही ऑफिसर एका गाडीतून कसे निघाले .
ह्याचे नक्की काय कारण असावे
अतिरेक्यांना साह्य करणाऱ्या
अतिरेक्यांना साह्य करणाऱ्या स्थानिक लोकांची चोकशी झाली की नाही .
श्रीलंकेत ईस्टरच्या दिवशी
श्रीलंकेत ईस्टरच्या दिवशी सिरीअल बॉम्ब ब्लास्ट झाला आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये आठ वेगवेगळ्या ठिकाणी हा साखळी ब्लास्ट करण्यात आलाय. यामध्ये तीन चर्च आणि तीन हॉटेलचा समावेश आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.45 वाजता ही घटना घडली. या धमक्यात 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 500 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
ह्या घटने पाठीमागे कोणती संघटना असेल
इथे लिहीणा-यांपैकी
इथे लिहीणा-यांपैकी साध्वीच्या बाजूच्या जेलमधे कोण होतं त्याने कृपया छळाची कहाणी सांगावी. आम्ही ऐकू.
जे नव्हते त्यांनी शस्त्रं म्यान करून सहकार्य करावे ही नम्र विनंती.
ह्या घटने पाठीमागे कोणती
ह्या घटने पाठीमागे कोणती संघटना असेल >> संघटनेतच संघ आहे.
श्रीलंेतील संघटना समजली की
श्रीलंेतील संघटना समजली की जागतिक दहशत वादाचे जनक कोण हे स्पष्ट होईल
कुणास ठाऊक, काँग्रेसने
कुणास ठाऊक, काँग्रेसने पोलिसांवर दबाव टाकून निरपराध लोकांना बॉम्बस्फोट खटल्यात गोवल्यानंतर कदाचित ते अधिकारी डोईजड होऊ लागले असावेत (किंवा काँग्रेसचे घाणेरडे राजकारण मानण्यास त्यांनी नकार दिला असावा) मग काँग्रेसने अतिरेकी हल्ल्याचे निमित्त साधून त्यांना संपविले असावे.
हे लॉजिक बरोबर आहे असे वाटतेय
विषय भरकटवु नका राजेश१८८
विषय भरकटवु नका राजेश१८८
इथे आपण अतिरेकी प्रज्ञा ठाकुर विषयी बोलत आहोत
राजेश १८८ हावरटासारखे लिहीत
राजेश १८८ हावरटासारखे लिहीत सुटतात... कुठलाही धागा असू द्या.
पण आता शुद्ध लेखन अगदी सदाशिवरावांप्रमाणे एक नंबरी पेठी आहे.
Pranya ठाकूर हे हिंदू वादी
Pranya ठाकूर हे हिंदू वादी दहशत वादाचे .
कथित दुर्मिळ उदाहरण आहे पण जागतिक स्तरावर दहशत वा द ज्यांनी majvala आहे त्याची चर्चा झाली पाहिजे असे मला वाटते .
आणि ते चुकीचे नाही .
राजेश१८८, महाराष्ट्राचे ५
राजेश१८८, महाराष्ट्राचे मागील ५ वर्षे गृहमंत्री पद भूषवणारे महोदय याबाबतीत अनभिज्ञ असावेत किंवा अत्यंत अकार्यक्षम असल्याने त्या पदावर राहण्यास नालाय्क आहेत असे वाटते. आपले काय मत? आणि गृहखाते तुमच्या लॉजिकवरच चालवावे यासाठी आपण एखादा धागा का काढत नाही ?
याची चर्चा झाली पाहिजे असे
याची चर्चा झाली पाहिजे असे मला वाटते . >> वेगळा धागा काढा साहेब
वरच्या लिंक मध्ये दिसते आहे
वरच्या लिंक मध्ये दिसते आहे की प्रश्न विचारल्यावर टुन्नकन उडी मारून उभी राहिली ती खोटारडी प्रज्ञा ठाकूर... व्हीलचेअर वगैरे सगळी नाटके. हिंदुत्ववाद्यांची कथा रचायचे कसब हॉलीवूड च्या सिनेमाना तोंडात मारणारे असते...
जगात घडलेल्या दहशत वादी
जगात घडलेल्या दहशत वादी घटनांचे विश्लेषण करून .
दहशत वादी कोण ह्याचा निष्कर्ष काढणे न्यायाचे आहे
चमचाभर खाल्ले काय अन गाडाभर
चमचाभर खाल्ले काय अन गाडाभर खाल्ले काय ....ते हे शेवटी तेच असते
गावठी म्हण आहे
गाडा भरून कोण खातंय आणि चमचा
गाडा भरून कोण खातंय आणि चमचा भर कोण ghatay हे पण न लाजता सांगा
मुळात साध्वी, महाराज, योगी
मुळात साध्वी, महाराज, योगी वगैरे राजकारणात कसे येतात? त्यांनी खरंच अध्यात्माचा मार्ग धरून सन्यासाश्रम स्वीकारला असेल तर अध्यात्माच्या मार्गावरच राहायला हवे. आचार विचारांनी ऐहिकापासून दूर जाणे असते. केवळ शरीरधर्मापुरते अन्न व वस्त्र असते. बाकी परमेश्वराशी अनुसंधान राखून आतून दया, क्षमा व शांतीने भरून राहायला हवे. राजकारणात तर दया, क्षमा व शांती शोधूनही मिळणार नाही. एकमेकांच्या उरावर बसत कितीही खालच्या थराला जाणे असते. कसं काय राहू शकतात अश्या वातावरणात? राजकारणात काहीच शाश्वत व खरे नाही. मग spirituality मध्ये जो शाश्वत आनंद असतो तो सोडून ह्यात पडायची बुद्धी का होते? 'दया' हे ऐश्वर्य असेल तर ते कुठल्याही सत्तेशिवाय, पदाशिवाय अमर्याद दान देवून जाते. आपल्या आजुबाजुच्या वातावरणात एकप्रकारचा सात्विक आनंद पसरवते.
हे ह्या लोकांचं काहितरी भलतंच. बरं काय बोलावं न बोलावं ह्याला काही धरबंध नाही. समजा छळ झालाच असेल तरी शाप का द्यावा? शाप हा देणाऱ्याचे आत्मिक बळ खर्ची घालत असतो. आणि शाप बिप येऱ्यागबाळ्याचे काम नाही. तेवढी कुवत / सत्व कुणातही नाही.
Pages