शहीद हेमंत करकरे , आम्हांला क्षमा करा.
२६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री तुम्ही हेल्मेट चढवून जीपमध्ये बसताना टीव्हीवर दिसलात. त्यानंतर काही मिनिटांतच तुम्ही दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडल्याची बातमी पाहिली.
आज त्या घटनेला साडेदहा वर्षं होत असताना पुन्हा एकदा अनेक लोकांकडून तुम्हांला मारलं जाताना पाहतोय.
मालेगाव बाँबस्फ़ोट प्रकरणी ज्या प्रज्ञासिंह ठाकुरला तुम्ही अटक केली होती, तिने तीन दिवसांपूबाँब, १७ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच दिवशी भाजपने तिला मध्यप्रदेशा तील भोपाळ येथून लोकसभेची उमेदवारी दिली.
दोन दिवसांनंतर "अबकी बार फ़िर एक बार मोदी सरकार" अशी घोषणा लिहिलेल्या भाजपच्या मंचावरून बोलताना तिने सांगितले, "मला त्याने कोणत्याही पुराव्याशिवाय अटक केली. त्याचं हे कृत्य देशद्रोहाचं होतं, धर्मविरोधी होतं. मी त्याला शाप दिला. तुझा सर्वनाश होईल.
मला अटक झाली तेव्हा मला सुतक लागलेलं. बरोबर सवा महिन्यांत तो दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडला. माझं सुतक संपलं." या वाक्यावर मंचावर बसलेल्या भगवा फ़ेटेधारकांनी टाळ्या वाजवल्या.
या कथनावर पुरेसा गदारोळ झाला. आय पी एस ऒफ़िसरांच्या संघटनेने त्याचा निषेध केला, तेव्हा भाजपने हे प्रज्ञासिंह ठाकुरचं वैयक्तिक मत असल्याचं सांगून हात झटकले. वर, अनेक वर्षं शारीरिक आणि मानसिक छळ सहन केल्याने तिने असं म्हटलं असेल अशी मखलाशीही केली.
दुस र्या दिवशी प्रज्ञासिंहने करकरेंबद्दलच्या माझ्या विधानामुळे देशाच्या शत्रूंना आनंद झाला. देशाच्या शत्रूंना आनंद होईल, असं काही मला करायचं नाही, म्हणून माझं विधान मी मागे घेते असं सांगितलं. तिच्या वक्तव्यानंतर भारत माता की जय च्या घोषणा दिल्या गेल्या.
प्रज्ञासिंहच्या उमेदवारीचं समर्थन करताना भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी असं सांगितलं की पाच हजार वर्षं जुनप्र, वसुधैव कुटुम्बकम् मानणार्या संस्कृतीवर समझौता एक्स्प्रेस आणि मालेगाव स्फ़ोटात दहशतवादाचा शिक्का मारला गेला. या सगळ्याचं प्रतीकात्मक उत्तर म्हणून तिला उमेदवारी दिली आहे. (प्रज्ञासिंह ठाकुरचं ) हे प्रतीक काँग्रेसला महाग पडणार आहे.
प्रज्ञासिंहला कोणत्याही आरोपपत्राशिवाय (चार्जशीट) , कोणत्याही पुराव्याशिवाय डांबून ठेवलं गेलं, तिचा छळ केला गेला, असं अनेक लोक म्हणू लागलेत.
इथे काही गोष्टींकडे मागे वळून पाहणं क्रमप्राप्त आहे.
१) २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव इथे बॊम्बस्फ़ोट झाला. ७ लोक मरण पावले, ७९ जखमी झाले.
२) एटीएसने प्रज्ञासिंहला २३ ऑक्टोबर २००८ रोजी अटक करून २४ रोजी चीफ़ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट समोर हजर केले.
३) २० जानेवारी २००९ रोजी तिच्या आणि अन्य आरोपींच्या विरोधात चार्जशीट दाखल केली.
४.) जुलै २००९ मध्ये मकोका खालील आरोप विशेष न्यायालाने हटवले
५) जुलै २०१० मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा मकोका लावला.
६) एप्रिल २०११ मध्ये मालेगाव सह अन्य प्रकरणांचा तपास एन आय ए कडे दिला गेला.
७) २३ सप्टेंबर २०११ रोजी सर्वोच्च न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फ़ेटाळला. तिची अटक बेकायदेशीर असल्याचा आणि एटीएसने तिचा छळ केल्याचा आरोपही न्यायालयाने अमान्य केला. हे निकालपत्र संपूर्ण वाचावं, अशी चर्चेत भाग घेणार्या सर्वांना विनंती.
न्यायालयाचं निकालपत्र इथे वाचता येईल.
८) यानंतर तिने मुंबई उच्च न्यायालयात प्रकृतीच्या कारणावरून जामीन अर्ज केला. हा अर्ज फ़ेटाळताना न्यायालयाने तिच्या विरोधात भक्कम पुरावा असल्याचे म्हटले.
९ ) २०१४ मध्ये दिल्ली आणि मुंबई इथे सत्तांतर झालं.
१० ) एप्रिल २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की प्रज्ञासिंह विरोधात मकोका लावण्याजोगा पुरावा नाही, तेव्हा खालच्या कोर्टाने तिच्या जामीन अर्जावर विचार करावा.
११) जून २०१५ - नवं सरकार मालेगाव व अन्य प्रकरणांत ढील देण्यासाठी माझ्यावर दबाव आ णला जात होता - पब्लिक प्रोझिक्युटर रोहिणी सालियन
त्यांचे पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून काम करणे थांबले.
१२). नोव्हेंबर २०१५ मध्ये मकोका कोर्टाने प्रज्ञासिंह चा प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून केलेला जामीन अर्ज फ़ेटाळला.
१३) मे २०१६ - एन आय ए ने प्रज्ञासिंह विरोधातील म्कोकाखालचे आरोप पुराव्या अभावी मागे घेतले.
१४) मे २०१६ - न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रज्ञासिंहने उज्जैन येथे कुंभस्नान करता यावे म्हणून इस्पितळात उपोषण केले. तिची मागणी मान्य केली गेली.
१५) .जून २०१६ - विशेष न्यायालयाने नीट चौकशी न करणे आणि एटीएसने नोंदवलेले साक्षीदारांचे जवाब पुन्हा नोंदवने यासाठी एन आय ए वर ठपका ठेवत जामीन अर्ज फ़ेटाळला. तिच्यावरचे आरोप खरे आहेत, असे मानायला पुरेशी जागा आहे, असंही म्हटलं. एन आय ने तिच्या जामीन अर्जाला विरोध केला नव्हता.
१६) एप्रिल २०१७ - मुंबई उच्च न्यायालयाने प्रज्ञासिंह ठाकुरला जामीन मंजूर केला.
ती स्त्री आहे, आठ वर्षांपासून तुरुंगात आहे, तिला कॆन्सर झाला आहे आधाराशि वाय चालू शकत नाही, ती सध्या एका आयुर्वेदिक इस्पितळात उपचार घेते आहे, तिला दोषी ठरवण्यासारखे पुरेसे पुरावे नाहीत
१७) मार्च २०१९ -समझौता बॉम्बस्फ़ोट प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत. न्यायालयाने निकालपत्रा त म्हटले आहे की अत्यंत म हत्त्वाचा पुरावा सादर केला गेला नाही, साक्षीदारांचे जवान नोंदवले गेले नाहीत.
कॅन्सरने आजारी असलेली आणि आधाराशिवाय चालू न शकणारी स्त्री आज लोकसभेची निवडणूक लढवते आहे. दहशतवादाचा आरोप असलेली व्यक्ती उद्या संसदेत मानाने प्रवेश करू शकेल.
दुसरीकडे हेमंत करकरेंवर भाजप पाठिराख्यांकडून, हिंदुत्ववाद्यांकडून विविध प्रकारे लांच्छन लावणे सुरू झाले आहे. हेमंत करकरे पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडले. पण आज ते पुन्हा पुन्हा मारले जात आहेत, तेही स्वत:ला देशभक्त, राष्ट्रप्रेमी म्हणवणार्या लोकांकडून.
शहीद हेमंत करकरे, आम्हांला क्षमा करा. या देशाचं रक्षण करताना कोणी आपले प्राण त्यागावेत, अशी आमची लायकी नाही. तुम्हांलाच काय, तु मच्या पत्नीला आणि मुलांनाही जिवंतपणी आणि मेल्यानंतरही ज्या गोष्टींचा सामना करावा लागतोय, त्या पाहून माझी मान खाली झुकते.
----------------------------------------------------------------------------------------------------------
२६.०४ .२०१९ रोजी वाढवलेला मजकूर.
मुंबईतल्या जे जे इस्पितळाचे तेव्हाचे डीन डॉ लहाने यांनी सांगितलं की प्रज्ञा सिंग ठाकुरच्या अनेक वैद्यकीय चाच ण्या केल्या, पण त्यात त्यांना कोण त्याही गंभीर आजा राची लक्षणं आढळली नाहीत. एम आर आय आणि इसीजी रिपोर्ट नॉर्मल होते. कॅन्सर साठीच्या एका तपासणीतही काहीही आढळलं नाही.
तिची तपासणी करणार्या डॉक्टरांच्या पथकातील एकाने सांगितलं की ती कोणत्याही डॉक्टर कडून हातही लावून घेत नव्हती. औष धोपचारही घेत नव्हती.
https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/what-bull-say-tat...
अश्विनी मॅडम
अश्विनी मॅडम
हे पण सांगा किती बोगस साधू लोकसभेत आहे मोजून 10 पण नसतील
हिंदू कधीच धार्मिक विचार करून मतदान करत नाही .
बहुसंख्य असून सुधा
नाहीतर 300 तरी साधू तरी लोकसभेत असते
अहो एक काय आणि दहा काय ....
अहो एक काय आणि दहा काय .... ज्याचं त्याचं अध्यात्मिक विश्व त्याच्या पुरते असते. मला हेच आश्चर्य वाटतं की हे दोन्ही परस्परविरोधी गोष्टी कश्या करतात? कारण धड कश्यालाच नीट न्याय देवू शकणार नाहीत हे.
हे लोक खरे धार्मिक (खरंतर spiritual) असतील तर ह्यांनी शांतता पसरवायचे काम केले पाहिजे. आज विविध स्तरावरचा प्रत्येकजण वेगवेगळ्या आघाडीवर आपापली लढाई लढतोय. मनाने कुठे ना कुठे जखमी होतोय. ही मनं heal होणे गरजेचे आहे. आणि ही गरज irrespective of religion, भौगोलिक स्थान सर्वांनाच सारखीच आहे. हे काम ह्या लोकांनी करायला काय हरकत आहे?
धर्माच्या आधारावर नकोच व्हायला मतदान. एखाद्या हिंदूला एखादा मुसलमान किंवा ख्रिश्चन उमेदवार पटत असेल तर त्याने जरूर तसे मतदान करावे. हेच इतर धर्मांना लागू. बाहेरची धर्म व जात ही फोलपटे पाखडून दूर करून माणसाचा गाभा महत्वाचा ठरावा. पण आज जगभर सगळं उलटं झालंय. सगळीकडे धर्मच दहशतवादाला कारणीभूत ठरतोय. मग त्याला धर्म तरी कसं म्हणावं? परवा भारत, काल न्यूझीलंड आज श्रीलंका. ह्या आधीही जगाचे वेगवेगळे कोपरे ह्या कारणाने पेटले व ह्यापुढेही पेटणार आहेत ... दुर्दैव.
मा. पंतप्रधान
मा. पंतप्रधान
कर्नल पुरोहित, दयानंद पांडे आणि त्यांचे सहकारी मोहन भागवत आणि इन्द्रेश कुमार यांची हत्या करण्याच्या प्रयत्नात आहेत, कृपया निष्पक्ष चौकशी करावी....
दि.9.02.2011 सुरेश (भय्या) जोशी
RSS
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/agralekh-news/pragya-singh-on-hemant-karkare-18...
<< मुळात साध्वी, महाराज, योगी
<< मुळात साध्वी, महाराज, योगी वगैरे राजकारणात कसे येतात? >>
------ या लोकांची वक्तव्ये, कृत्ये बघितल्यावर हे लोक साध्वी, महाराज आणि योगी म्हणण्याच्या पात्रतेचे आहेत का? नुसतेच नावात साध्वी (योगी/ महाराज) आणल्याने साध्वी बनता येत नाही.
आश्विनी के, तुमची पोस्ट
आश्विनी के, तुमची पोस्ट पटलेली आहे.
राजेश१८८ यांच्या पोस्ट ओलांडुन जाणे इष्ट
Submitted by अश्विनी के on 21
Submitted by अश्विनी के on 21 April, 2019 - 22:4५....... पोस्ट आवड्ली.
परवा भारत, काल न्यूझीलंड आज
परवा भारत, काल न्यूझीलंड आज श्रीलंका. ह्या आधीही जगाचे वेगवेगळे कोपरे ह्या कारणाने पेटले व ह्यापुढेही पेटणार आहेत ... दुर्दैव.>> अश्विनी छान पोस्ट.. खुप वाईट वाटतं सगळं घडतय ते वाचुन..
हेमंत करकरेंबद्दल प्रज्ञा
हेमंत करकरेंबद्दल प्रज्ञा सिंगने जे काही वक्तव्य केले आहे ते अत्यंत खेदजनक/निषेधार्य आहेत यात वादच नाही. पोलिस तपासादरम्यान पोलिसांना संशयितांविरूध्द कठोर व्हावेच लागते. तिचा शारीरक वा मानसिक छळ करण्यात आला या तिच्या म्हणण्याला कोणत्याही न्यायालयाने मान्य केले नाही. ती फक्त जामीनावर बाहेर तिची त्या खटल्यातून अजून निर्दोष सुटका झालेली नाही. तिला लोकसभा निवडणुकीचे तिकिट देऊन भाजपाने चुकीचा पायंडा पाडला आहे.
एक प्रश्न, जर तिला आजारी असल्याच्या कारणावरून जामीन मिळाला असेल आणि आता ती तंदुरूस्त असेल तर जामीन रद्द होऊ शकतो का ?
एक प्रश्न, जर तिला आजारी
एक प्रश्न, जर तिला आजारी असल्याच्या कारणावरून जामीन मिळाला असेल आणि आता ती तंदुरूस्त असेल तर जामीन रद्द होऊ शकतो का ? >>>
जसे आधी तिच्यावर मारहाण वा छळ करण्याचे काहीही पुरावे नसल्याच काही लोक न्यायालयाने करुन घेतलेल्या तपासणीचा हवाला देउन सान्गत आहेत , तशीच तपासणी न्यायालयाने जामीन देण्याआधी करुन घेतली नाही असे तुम्हाला वाटतय का?
ती नक्की आजारी आहे का हे न्यायालयाने जामीन देण्याआधी नक्कीच पडताळुन पाहीले असणार.
ती नक्की आजारी आहे का हे
ती नक्की आजारी आहे का हे न्यायालयाने जामीन देण्याआधी नक्कीच पडताळुन पाहीले असणार.>>>> नक्कीच! तिचा वैद्यकीय अहवाल पाहूनच जामीन मंजूर झाला असणार.
पण आता जर कोणी ती तंदूरूस्त आहे त्यामुळे तिचा जामीन रद्द करावा असा अर्ज केला तर जामीन रद्द होऊ शकतो का, असे विचारायचे आहे.
कोण हे उद्योग करेल? तिने शाप
कोण हे उद्योग करेल? तिने शाप दिला तर?
नाही होणार. निवडणूकलढवायला
नाही होणार. निवडणूकलढवायला फिटनेस सर्टिफिकेट लागत नाही.
कदाचित तिने तिचा कँसर दाखवला असेल , जीची ट्रीटमेंट व कॉम्प्लिकेशन गुंतागुंतीचे असतात , म्हणून तिला सोडले , पण हा आजार असला तरी ती निवडणूक लढवू शकते
जाम बोअर झालं आता
जाम बोअर झालं आता
अजुन कोर्टात आरोप सिद्ध झाले
अजुन कोर्टात आरोप सिद्ध झाले नाहीत .
त्या मुळे त्यांना दोषी मानता येणार नाही
हाच नियम गांधींनाही ना ?
हाच नियम गांधींनाही ना ?
त्या यडछाप साध्वीनं काय
वाचाळांच्या बडबडीतून भव्य पेटवा रे रान स्पर्धा...असले वाचाळ सगळ्याच पक्षांत सापडतील की राव...हाकानाका..
त्या यडछाप साध्वीनं काय पॉपकॉर्न्सचं दुकान काढायची संधी दिलीय...होऊ दे खर्च...पॉपकॉर्न हाय घरचं!
शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल
शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना आता बाबरी मशिदीसंबंधीचे वक्तव्य भोवलं आहे. निवडणूक अधिकाऱ्याने साध्वी प्रज्ञा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही बाबरी मशीद पाडण्यासाठी गेलो होतो. बाबरी मशीद पाडताना मी सर्वात वरती चढले होते असे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या.
साध्वी असूनही वर चढली , अर्धी
साध्वी असूनही वर चढली , अर्धी चड्डीवाल्यांना चढता नाही आले . नुसत्या वीटा गोळा करत बसले .
Bomb blast सारख्या गंभीर
Bomb blast सारख्या गंभीर गुन्ह्यातील व्यक्तीला शिक्षा होवू नये असे कोणीच म्हणणार नाही .
पण इतके वर्ष होवून सुधा कोर्टात आरोप सिद्ध करता आले नाहीत .
ठोस पुरावे सादर करता आले नाहीत .
हे काय दर्शवते .
Aiktar कथित आरोपी हे राजकारणाचे बळी आहेत किवा केस रखडवली जात आहे आरोप सिद्ध न होताच कथित आरोपी जास्त वेळ तुरुंगात रहावा असे प्रयत्न होत आहेत
बाबरी मशीद प्रकरणी दिलेलं
बाबरी मशीद प्रकरणी दिलेलं वक्तव्य भाजपच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोवलं असून त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पोलिसांना दिले आहेत.
बाबरी मशीद पाडण्यात सहभागी झाल्याबद्दल मला त्याचा अभिमानच आहे, असं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलं होतं. त्याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेऊन प्रज्ञासिंह यांना नोटिस बजावली होती. अयोध्याप्रकरणी दिलेल्या वक्तव्याविरोधात आम्ही साध्वींविरोधात एफआयआर नोंदवत आहोत. टी. टी. नगर पोलीस ठाण्यात हा एफआयआर नोंदवला जाणार असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी सुदाम खाडे यांनी सांगितलं.
https://m.maharashtratimes.com/india-news/lok-sabha-election-ec-orders-f...
जिल्हाधिकारी डॉ सुदाम खाडे
जिल्हाधिकारी डॉ सुदाम खाडे माझा एम बी बी एस चा क्लासमेट.
लोक्स,
लोक्स,
प्रज्ञा ठाकूर चा कॅन्सर बरा झाला आहे,
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.indiato...
गोमूत्राचे इतके जालीम औषध असताना कॅन्सर ची काय बिशाद बरे न होण्याची?
२००८ ते २०१४ दरम्यान पुरावे
२००८ ते २०१४ दरम्यान पुरावे असते तर केस चालून निकालही लागला असता. पुरावे नसताना एखाद्याला इतके वर्ष भगवा आतंकवाद हा शब्द बरोबरच आहे हे दाखवण्यासाठी डांबुन ठेवायचे तंत्र होते. बाकी महाराष्ट्रातील बुध्दीजीवी व तथाकधीत पुरोगामी जेव्हा इतर पक्ष अश्या लोकांना तिकीटे देतात तेंव्हा मुग गिळून गप्प बसतात.
तुम्ही अश्या भोंदू आणि
तुम्ही अश्या भोंदू आणि अतिरेकी लोकांना तिकिटं दिल्यावर तेव्हा जसा आवाज उठवता तसा साध्वी विरोधी आत्ता ही आवाज उठवल्याबद्दल अभिनंदन.
मशिद.पाडली हे बरच झाल....वाईट
मशिद.पाडली हे बरच झाल....वाईट काय त्यात...आता परीक्षा लोकांची...मत तीला देतात की डीग्गीला .ही लीटमस टेस्ट......ईतक्या दिवसाचा अन्याय दूर झाला....काशीलाही ही हिच परीस्थीती ग्यानवापी मशीदीपुढे काशि विश्वनाथ खुजाच.दिसतो.....गावा गावात.मंदीर पाडून.मशीदी उभारल्यात.....हिंदूंचा दहशतवाद अजून बालवाडीत......कालपरवाच श्रीलंकेत.....कालपरवा.च कशाला रोजच.....कुठेनाकुठे
साध्वी जिल्हा कसलीही राजकीय
साध्वी जीला कस लिही राजकीय किंमत नाही .जी समाजासाठी बिलकुल धोकादायक नाही .
आणि कोर्टात साधे आरोप सुधा पुराव्या सहित सरकार ल ठेवता आले नाहीत .
तिच्या वर काय चर्चा करणार .त्या पेक्षा करकरे chya मृत्यू कसा झाला ह्या विषयी काही शंका आहेत त्या वर चर्चा झाली पाहिजे .
मेहबूबा मुफ्ती म्हणतेय पाकिस्तान नी अणुबॉम्ब ईद साठी ठेवले नाहीत त्या वर चर्चा झाली पाहिजे .
राजेश१८८, तुमचे लाडके नेते
राजेश१८८, तुमचे लाडके नेते नरेंद्र मोदी म्हणतात प्रज्ञा सिंह ठाकुर ही पाच हजार वर्षं जुन्या महान हिंदू संस्कृतीचं प्रतीक आहे. तिला राजकीय किंमत नाही?
तुम्ही सगळे प्रज्ञा सिंह ठाकु रबद्दल बोलायचं का बरं टाळताय? जे बोलताय तेही खोटं. छळ झाला, आरोप ठेवले नाहीत, पुरावे नाहीत.
तुमचा पक्ष तिला लोकसभेच्या निवडणुकीचं तिकीट देतो. पक्षाच्या व्यासपीठाम्हण, प्रचारसभेत ती काही विधानं करते. ती तिची वैयक्तिक भावना म्हणून सोडून द्यायची? ति ला लोकसभेत पाठवायचं की नाही हे भोपाळचे मतदार ठरवतील असं म्हणताना ती अप क्ष म्हणून उभी राहिलेली नाही हे तुम्ही लक्षात घेत नाही.
मुळात भाजपला तिला तिकीट द्यावंसं का वाटतं, हे तुम्ही स्पष्ट बोलत नाही. जगण्याशी रोजीरोटी संबंधित प्रश्नांशी बोलण्यासारखं काही नाही,
म्हणूनच भाजप हिंदुत्व आणि राष्ट्रवाद हे मुद्दे आणतंय. द्वेषाधारित उग्र हिंदुत्व हाच भा जपाचा खरा चे हरा प्रज्ञा सिंह ठाकुरच्या रूपात अगदी
विचारपूर्वक उघड केला आहे.
आज करकरे आ णि त्यांच्या कुटुंबाबद्दल अनेक चौकीदार लोक जे बोलताहेत, ते अत्यंत संतापजनक आहे. त्याबद्दल तुम्ही अवाक्षरही काढलेलं नाही.
हे सगळे अडचणीचे मुद्दे आहेत म्हणून तुम्ही आणि तुमचे मित्र दुसरे विषय काढताय.
की करकरे , प्रज्ञा यांच्याबद्दलची आपली मते उघडपणे लिहायची नाहीत ?
तुम्हाला ज्या विषयांवर चर्चा व्हावी असं वाटतं. त्याबद्दल वेगळा धागा काढून सविस्तर लिहा. तुम्हांला त्याबद्दल कळकळ वाटते, तर एवढे कष्ट घ्याच.
साध्वीला तिकीट का द्यावेसे
साध्वीला तिकीट का द्यावेसे वाटले....>>>>
या प्रश्नाच्या कक्षेत योगी, आणि इतर महंत, साधू पण येतात.
इतक्या वर्षांपासून हे अध्यात्म मार्गाचे वाटसरू राजकारण का करत आहेत?
करत आहेत हे आहेत त्यात त्यांनी लोकांना काय मिळवून दिले?
उर्मिलाला उमेदवारी दिल्यावर लायकी काढणारे, प्रज्ञा ची लायकी काय हे विचारताना का दिसत नाहीत?
(सध्यातरी उर्मिला सेन्सिबल बोलते, आणि संशयित आतंकवादी नाही इतकी लायकी पुरेशी आहे )
.....माझा एम बी बी एस चा
.....माझा एम बी बी एस चा क्लासमेट.
>> ते कुटचे कुटं पोहोचले, हे बसलंय माबोवर स्क्रीन काळी करत.
Pages