मतदार यादीत आपले नाव आहे का या साईटवर पहा

Submitted by अतुल. on 14 April, 2019 - 01:56

खालील संकेतस्थळ निवडणूक आयोगाचे आहे. इथे आपल्याला आपले नाव मतदार यादीत आहे कि नाही व असल्यास आपला EPIC (Electoral Photo Identity Card) नंबर काय आहे ते पाहता येईल.

कसे शोधाल?

१. या वेबसाईटवर जा: https://electoralsearch.in/

२. नाम/Name मध्ये फक्त आपले नाव लिहा (उदाहरणार्थ Atul, Sandip etc) आणि
पिता / पति का नाम (Father's/Husband's Name) मध्ये आडनाव/वडिलांचे/पतीचे नाव लिहा

३. बाकीची आवश्यक माहिती (राज्य/State, जिला District, कोड / Code) भरा आणि खोजें/Search वर क्लिक करा.

४. सर्च रिझल्ट मध्ये EPIC No. सहित आपली इतर माहिती सुद्धा दिसेल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण आत्ताच confirm केले माझे.
धन्यवाद.
प्रत्येकाने खरं तर केले पाहिजे मतदान पण मी निवडणूक राजकारण ह्यात फारच passive असल्याने जाईन की नाही voting ला हे मात्र doubtful आहे.

मनीमोहोर, क्रुपया मतदान चुकवू नका. आपल्याला व्यक्त होण्याची ही पाच वर्षात एकदा मिळणारी संधी आहे. तुमच्या विभागातील उमेदवारांची माहिती मिळवून योग्य उमेदवाराला मत द्या.

@गजानन लिंक बद्दल धन्यवाद. एक नाव सापडत नव्हते ते तिथे मिळाले. तेथून आयडी घेऊन शोधले असता ते electoralsearch.in वर सुद्धा सापडले.

यादीत नाव नसेल तर काही करता येत नाही, आता पुढच्या इलेक्शन आधी परत यादीत नाव नोंदणी करून घ्या.
एकदा मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष जाऊन नाव अजिबातच नाहीये हे कन्फर्म करून घ्या

हे स्ट्रेंज आहे .
या आधीच्या प्रत्येक निवडणूकित मतदान केलेय .
शिवसेनेच्या शाखेत विचारावं लागेल .

>> माझं नाव दिसत नाहीये . आधी होत .,काय करावं लागेल

मलाही कुटुंबातल्या एका व्यक्तीचे नाव सापडत नव्हते. अखेर सापडले. शोधण्याची बेसिक सुविधा दिली आहे त्यांनी. गुगल इतका स्मार्ट सर्च होत नाही इथे. मराठी/इंग्लिश दोन्हीमध्ये सर्च करून पहा. स्पेलिंग वेगवेगळी लावून पहा. "पिता / पति का नाम (Father's/Husband's Name)" मध्ये आडनाव टाकून पहा. वगैरे वगैरे प्रयत्न करून पहा. गजानन यांनी दिलेल्या साईटवर सुद्धा एकदा व्हेरीफाय करा.

>>यादीत नाव दिसतंय, पण त्याच्या आधीचा EPIC No. हा रकाना रिकामा दिसतो , तरी मतदान करता येतं ?

माझ्याही ओळखीच्या एकाबाबत हे झालंय. मत देता येईल की नाही?? अतुल, गजानन लिंक्स दिल्याबद्दल खूप आभार. आणि हो, https://www.ceo.maharashtra.gov.in/ ओपन करायच्या वेळी फायरफॉक्सने सेक्युरिटी वॉर्निंग दिली.

किती वर्षे मतदान केले नाही तर वोटर कार्ड रद्द होते

या वर्षी मी नाही करणारे मतदान>>> याबद्दल कोणालाच काही माहीत नाही का?

किती वर्षे मतदान केले नाही तर वोटर कार्ड रद्द होते>>> अस काही होत असेल असं वाटत नाही.. रद्द का करतील व्होटर कार्ड.
तुम्ही पत्ता बदल वगैरे काही केले असेल आणि त्यात जर नाव यादीत नीट बदलले गेले नाही तर नाव गायब होऊ शकते यादीतून..

पुण्यात मतदार यादीत नाव घालण्याचे माझे ३ प्रयत्न फसले आहेत. या वर्षी साईट वर सर्व माहिती टाकल्यावर सबमिट बटणावर क्लिक करताना साईट गुल..
तरिही मी प्रयत्न सोडले नाहीत. अगदी आत्तच ४-५ दिवसापुर्वी सबमिट झाले प्रकरण.
माझे नाव येईल का यादित? मला मतदान करता येइल का?
माझे नाव जरी मतदार यादित नसले तरिही सबळ पुरावे घेऊन गेल्यास मला मतदान करता येईल का?

माझे नाव जरी मतदार यादित नसले तरिही सबळ पुरावे घेऊन गेल्यास मला मतदान करता येईल का?>> यादीत नाव नसेल तर मतदान करता येत नाही...

राहुल द्रविड निवडणूक आयोगाचा ब्रँड ambassador आहे आणि त्याचे नाव मतदार यादीतून गायब म्हणे.
पत्ता बदलल्याची नोंद केली नाही.

आपल्या भागातून जे उमेदवार उभे आहेत त्यांची माहिती कुठल्या साईटवर मिळेल का? त्यांनी केलेल्या कामाची यादी वगैरे काही?

लोकसभा निवडणुकीत फक्उत मेदवारापेक्षा पक्षाची धोरणं बघायला हवीत, असं वाटतं. पक्षांचे जाहीरनामे त्यांच्या संकेतस्थळावर आहेत. ते पटतात का आणि पूर्ण करण्याबद्दल विश्वास वाटतो का?
उमेदवाराचं काम हा मुद्दा विधानसभा, मनपात अधिक महत्त्वाचा.
घरासमोरचा रस्ता दुरुस्त करा हे आपण खासदाराला सांगत नाही. (हे आपले माझे मत)

याऊपर उमेदवाराची पार्श्वभूमी, गुन्ह्यांचा रेकॉर्ड हे पाहायला हवं.
काही संकेतस्थळं ही माहिती प्रसिद्ध करतात.
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर त्यांची प्रतिज्ञापत्र पाहता येतात.

Pages