मतदार यादीत आपले नाव आहे का या साईटवर पहा

Submitted by अतुल. on 14 April, 2019 - 01:56

खालील संकेतस्थळ निवडणूक आयोगाचे आहे. इथे आपल्याला आपले नाव मतदार यादीत आहे कि नाही व असल्यास आपला EPIC (Electoral Photo Identity Card) नंबर काय आहे ते पाहता येईल.

कसे शोधाल?

१. या वेबसाईटवर जा: https://electoralsearch.in/

२. नाम/Name मध्ये फक्त आपले नाव लिहा (उदाहरणार्थ Atul, Sandip etc) आणि
पिता / पति का नाम (Father's/Husband's Name) मध्ये आडनाव/वडिलांचे/पतीचे नाव लिहा

३. बाकीची आवश्यक माहिती (राज्य/State, जिला District, कोड / Code) भरा आणि खोजें/Search वर क्लिक करा.

४. सर्च रिझल्ट मध्ये EPIC No. सहित आपली इतर माहिती सुद्धा दिसेल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला सुट्टीच्या दिवशी तितके लांब जाऊन मतदान करणे जीवावर आले होते, सो यावर्षी मतदान न करण्याचा निर्णय घेतला.>>>>

कितीही लाम्ब असले तरी लोकांनी जावे यासाठी सुट्टी दिली होती हे कृपया लक्षात घ्या. तुम्ही शेवटी मतदान केले त्यामुळे, जीसका अंत भला वो सब भलाही भला.

निवडणूक आयोगाने स्लिप्स घरोघर वाटल्या आहेत. >

आमच्या पूर्ण कॉलनीत कोणालाही स्लिप मिळालेली नव्हती हे आज सकाळी बुथवर गेल्यावर कळले. पण बेलापूर गावातील झोपडपट्टीत 2 पक्षांनी वाटल्या होत्या .

मी मतदान केलं. प्रोसिजर काय झाली ते सांगतो. मी मतदान यंत्राचे बटन दाबून लगेच सोडले. लगेच बाजूच्या VVPAT मशीनवर मतदान केलेल्या उमेदवाराचा फोटो आणि नांव दिसले. सात सेकंदानंतर ते फोटो आणि नांव जाऊन मशीन ऑपरेटरकडे बीपचा आवाज आला. आणि मगच मी मतदान कक्षातून बाहेर पडलो.>>>>>

मीही हेच केले, vvpat वर उमेदवाराचा यादीतील नंबर, नाव व निशाणी दिसते, उमेदवाराचा फोटो दिसत नाही. मी ते बघून लगेच निघत होते तेव्हा पावती घेणाऱ्या मुलीने बीप ऐकू येइपर्यंत थांबवले व तो ऐकलयावरच जा म्हणून खूण केली.

आपला जिप्सी यावेळेस मतदान अधिकारी आहे, अजूनही काही मायबोलीकरांना मतदान ड्युटी आहे.

त्यांच्याकडून कळत होतेच ट्रेनिंग कसे सुरू आहे, मशिन्स किती व्यवस्थित चालताहेत हे कसे टेस्ट करायचे व कसे उमेदवार प्रतिनिधींना दाखवायचे वगैरे.

पण एक माहिती मिळाली जी खूप धक्कादायक वाटली. जे लोक ड्युटी करत आत बसलेले असतात, त्यांना नेचर कॉलसाठीही बाहेर जाता येत नाही कारण तात्पुरते त्यांच्या जागी बसायला बदली माणूस दिलेला नाही. जर कुणी काही कारणाने येऊच शकला नाही तर बदली माणूस आहे पण 5 मिनिटे टॉयलेटला जाऊन यायचे तर बदली नाही. गर्दी जरा कमी झालीय वगैरे पाहून आपले आपण मॅनेज करायचे. भूक लागली तर खायचीही नीट सोय नाही. सोय आहे ती संध्याकाळी, मतदान वेळ संपली की. आणि खूप गर्दी असेल तर ही वेळ कधी संपेल सांगता येत नाही.

यावर काहीतरी उपाय काढायला हवा. जिथे उघड्या मैदानात तंबू टाकून मतदान सुरू आहे तिथे सगळ्यांचीच परिस्थिती उन्हामुळे बिकट झालेली आहे.

साधना, जिप्सी अगदी बरोबर बोलतोय. गेली १५-२० वर्षं ही ड्यूटी करतेय. अत्यंत हाल होतात कित्येक वेळा. घरी कधी जायला मिळेल ते ही सांगता येत नाही. सगळं सामान वरात निघाल्यासारखं Central polling station ला जमा केलं की गड जिंकल्यासारखे वाटते. मग अपरात्री घरी परतायला ऑटो वगैरे मिळते का पाहायचे. मग त्यांचं आपल्या सुरक्षित घरी पोहोचण्याशी काही देणं घेणं नाही. घरी पोहोचलं की जाणीव होते की आपण दिवसभर दोन चिमूट चिवडा व एक चकली खाल्लीय आणि आता आपल्याला भूक लागलीय. शहरात हे हाल तर रिमोट एरियात काय असेल? Presiding Officer असलं की सगळीच जबाबदारी. सामान राखायचं म्हणून एका election ला बूथवर झोपले होते. झोप लागलीच नाही खरंतर. मी आणि अजून एक presiding officer मैत्रीण अख्ख्या procedure ची उजळणी करत बसलो होतो परिक्षा असल्यासारखी. एक वर्ष मात्र माझ्या दोन लेडी polling officers पैकी एकीने माझ्यासाठी दोन पोळ्या व भाजी आणली होती आणि खायला हात मोकळा होत नव्हता तर चक्क भरवली होती. तिला मी कधीच विसरणार नाही.

ह्यावेळी आम्हाला ड्यूटी दिली नसल्याने कित्येक वर्षांनी मतदान केल्याचा आनंद घेतला.

हो ग..

आत्ता अजून एका मायबोलीकराचा अनुभव वाचला. त्याच्या बुथवर सकाळपासून तुडुंब गर्दी आणि ह्याचे नावच सापडत नव्हते . स्लिप्स मिळाल्याच नाहीत. दोनदा फेरी मारल्यावर कुठल्यातरी पक्ष प्रतिनिधिकडे पत्ते बदललेल्या कार्डाची यादी होती त्यात नाव सापडले एकदाचे. लोक उन्हात उभे राहून मतदान करताहेत आणि राग बुथमधल्या कर्मचाऱ्यांवर काढताहेत. कर्मचारी स्वतःच पीडित आहेत बिचारे.. ते चूक होईल की या भीतीने काम हळू करतात.

मागच्या फेरीत जिथे मतदान झाले तिकडे छोट्या चुकांसाठीही कर्मचारी निलंबित केल्याच्या बातम्या आलेल्या आहेत, त्यामुले कर्मचारी वर्ग तणावात, त्यात गर्दी, वरून सूर्य आग ओकतोय.... कठीण आहे सगळे.

मागच्या फेरीत जिथे मतदान झाले तिकडे छोट्या चुकांसाठीही कर्मचारी निलंबित केल्याच्या बातम्या आलेल्या आहेत, त्यामुले कर्मचारी वर्ग तणावात >>> माझ्या ऑफिसातली एक बाई गेली १० वर्षं अश्याच अनवधानाने झालेल्या चुकीमुळे कोर्ट केसला सामोरी जातेय बिचारी.

हम्मम

परिस्थिती जरा सुधारून देत नाहीत. किती हाल होतात कर्मचाऱ्यांचे. जिप्सीला रात्री उशिरा सोडले व सकाळी 3 वाजता बोलावले केंद्रावर. माणूस काय व कसे काम करणार? आता कधी सुटका होतेय देवाला ठाऊक. त्याच्याशी कॉन्टॅक्त सुटका झाल्यावरच होईल.

पण नियमांवर बोट ठेऊन कायदे मात्र राबवतात.

Pages