मतदार यादीत आपले नाव आहे का या साईटवर पहा

Submitted by अतुल. on 14 April, 2019 - 01:56

खालील संकेतस्थळ निवडणूक आयोगाचे आहे. इथे आपल्याला आपले नाव मतदार यादीत आहे कि नाही व असल्यास आपला EPIC (Electoral Photo Identity Card) नंबर काय आहे ते पाहता येईल.

कसे शोधाल?

१. या वेबसाईटवर जा: https://electoralsearch.in/

२. नाम/Name मध्ये फक्त आपले नाव लिहा (उदाहरणार्थ Atul, Sandip etc) आणि
पिता / पति का नाम (Father's/Husband's Name) मध्ये आडनाव/वडिलांचे/पतीचे नाव लिहा

३. बाकीची आवश्यक माहिती (राज्य/State, जिला District, कोड / Code) भरा आणि खोजें/Search वर क्लिक करा.

४. सर्च रिझल्ट मध्ये EPIC No. सहित आपली इतर माहिती सुद्धा दिसेल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत, theoretically तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण पक्षांचे जाहिरनामे आणि त्यांची निवडून आल्यावर धोरणं ह्यात काही ताळमेळ न्सतो हे आता अनुभवाने समजून चुकलेलं आहे. त्यामुळे ह्या जाहिरनाम्यांकडे मी आता पहात नाही. उमेदवाराला (बाई असो किंवा पुरुष) कितपत अनुभव आहे, दुसर्‍या पार्टीतून नुकताच इथे उडी मारून आलेला आहे का, नुस्तं मिरवायची हौस किंवा फावल्या वेळेतलं काम म्हणून आला आहे का, गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का वगैरे वगैरे मला अधिक महत्त्वाचं वाटतं. नाहीतर सरळ NOTA चा पर्याय आहेच. 'वाईटातलं कमी वाईट निवडावं' हा पर्याय मला कधी पटलेलाच नाहिये. वाईट ते वाईटच. ते ठामपणे नाकारलं तरच अधिक चांगले पर्याय समोर येतील असं मला वाटतं. असो हा ह्या धाग्याचा विषय नाही म्हणून ही माझी ह्या विषयावरची शेवटची पोस्ट.

>>यादीत नाव दिसतंय, पण त्याच्या आधीचा EPIC No. हा रकाना रिकामा दिसतो , तरी मतदान करता येतं ?

हयाबाबत कोणी प्लीज खुलासा करेल काय? असं असेल तर मत देता येईल का नाही?

>> माझे नाव जरी मतदार यादित नसले तरिही सबळ पुरावे घेऊन गेल्यास मला मतदान करता येईल का?

यादीत नाव नाही याची आपण खात्री केली असेल व नाव नक्की नसेल तर मतदान नाही करता येत Sad या बातमीनुसार उमेदवार निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या कमीतकमी पंधरा दिवस आधी मतदारांनी आपले नाव मतदारयादीत नोंदणे आवश्यक आहे.

>> Submitted by भरत. on 17 April, 2019 - 14:17

पूर्ण सहमत आहे. (आमच्या सोसायटीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या उमेदवाराला लोक नगरसेवकाला विचारावेत असे प्रश्न, उदाहरणार्थ नळाला पाणी का येत नाही वगैरे, विचारत होते आणि त्यांनी नंतर आपल्या भाषणात जे राष्ट्रीय प्रश्न आणि मुद्दे मांडले त्यात फार कुणी रस दाखवला नाही)

>> यादीत नाव दिसतंय, पण त्याच्या आधीचा EPIC No. हा रकाना रिकामा दिसतो , तरी मतदान करता येतं ?

स्ट्रेंज! आपण गजानन व भरत. यांनी दिलेल्या या साईटवर जाऊन प्रयत्न करून पहा.

(तिथे Name Wise -> Assembly हे ऑप्शन्स निवडा आणि मग तुमचा District व Assembly निवडल्यानंतर नाव इंग्लिशमध्ये टाईप करा)

माझं नाव दिसतेय .
अतुल यांनी सांगितल्याप्रमाणे केले. नावाच्या स्पेलिंगमध्ये घोळ घातलंय EC ने. पण बाकी डिटेल्स बरोबर आहेत .

धन्यवाद अतुल Happy

मतदानकेंद्रावर मतदान कक्षापर्यंत फोन नेता येतो. काहीच अडचण नाही. मतदान करताना मी फोन घेऊन गेलो होतो. खरे तर मला फोनचा उपयोगच झाला. कारण तिथे गेल्यानंतर लक्षात आले कि अनेक मतदारांच्या हातात वरील वेबसाईटवरून मिळालेल्या Voter Information स्लीपच्या प्रिंट्स होत्या. त्यावरील सिरीयल नंबर पाहून तेथील अधिकारी त्यांच्याकडील यादीत नाव शोधत होते. सिरीयल नंबर मुळे शोधणे सोपे जात होते. पण मला हे माहित नसल्याने मी फक्त Voter ID card भेऊन गेलो होतो (ज्यावर EPIC No असतो). पण जवळ फोन असल्याने मी तिथेच उभ्या उभ्या वरील वेबसाईट वरून माझी Voter Information काढून फोनवरच त्यांना दाखवली.

{{{ मतदानकेंद्रावर मतदान कक्षापर्यंत फोन नेता येतो. काहीच अडचण नाही. मतदान करताना मी फोन घेऊन गेलो होतो. }}}

खरे तर परवानगी नसायला हवी. नाही तर काही महाभाग यंत्रावर बटन दाबून कुठल्या उमेदवारासमोरचा लाईट लागला याचा सेल्फी घेऊन त्याच्याकडून नंतर पैसे घेतील किंवा आदल्या रात्री ज्यांनी पैसे वाटले ते कार्यकर्ते दुसर्‍या दिवशी मतदारांना सेल्फीची मागणी करताना दिसतील.

>> निवडणूक आयोगाने स्लिप्स घरोघर वाटल्या आहेत.

माझ्या माहितीनुसार आयोगाने वाटलेल्या नाहीत. उमेदवाराच्या माणसांनी आपापल्या विभागात प्रिंट काढून वाटल्या आहेत. बहुतेकांना मिळाल्यात. काहीना नाही. तसेही, मतदानासाठी स्लीप घेऊन जाणे बंधनकारक नाही.

http://mumbaivotes.com/
इथे उमेदवारांबद्दल माहिती गोळा केली आहे. शिक्षण, गुन्ह्यांचे रेकॉर्ड इ..

साध्या फोनवर मतदान केंद्र कळण्यासाठी

51969 या नंबरला

EPIC {SPACE} {VOTER CARD NUMBER}

पाठवायचा आहे. पण Department Service is not available. Please try after some time हा मेसेज आला.

वेबसाइटमधून मतदार नाव येत आहेच पण उत्सुकता म्हणून हे केले.

>>मतदानकेंद्रावर मतदान कक्षापर्यंत फोन नेता येतो. काहीच अडचण
खूप खूप धन्यवाद! गुगलव र कुठेतरी फोन नेता येणा र नाही असं वाचलं होतं म्हणून विचारलं

>> निवडणूक आयोगाने स्लिप्स घरोघर वाटल्या आहेत.
आमच्या सोसायटीत तरी कोणी आलेलं नाहिये

आमच्या भागात सोसायटीच्या सेक्रेटरीकडे सगळ्यांच्या स्लिप्स दिल्यात.
लोकांना मतदानाला उद्युक्त करायची जबाबदारीही त्यांच्यावर टाकली आहे.

मतदार यादीत नाव आहे पण व्होटर कार्ड सापडत नाहीये. तर मतदान करण्यात काही प्रॉब्ल्रेम येईल का? पिंक स्लिप मिळाली आहे.

मत देताना निळं बटण ७ सेकंद दाबून धरायचं, असा मेसेज किती लोकांना आलाय? सात सेकंद दाबायची गरज नाही. फक्त बीप ऐकू येईपर्यंत थांबा.
व्ही व्हीपीएटीमध्ये आपण मत दिलेल्या उमेदवाराचं नाव लगेच दिसतं.
https://www.boomlive.in/should-you-keep-your-finger-on-an-evm-machine-ti...
BOOM contacted Sheyphali Sharan, official spokesperson of the Election Commission of India (ECI), who said that the WhatsApp forward was “incorrect and baseless”.

BOOM also checked the the fourth Edition of ‘Manual on Electronic Voting Machine’ and ‘VVPAT manual’ on the Election Commission Of India (ECI) website, and found no mention that a voter should not remove their finger from the button until the VVPAT slip comes out.

मला एक मेसेज आलाय ज्यात म्हटलंय की असं ७ सेकंद दाबून धरल्याने मशीन हँग होऊ शकते. हे खरं आहे का माहीत नाही. पण नेमका माझा नंवर आला, तेव्हा मुख्य अधिकार्‍याने दोन तीन मिनिटांसाठी मतदान थांबवलं. बीप ऐकू यायलाही वेळ लागला. मी तोवर मतदान कक्षातून (म्हणजे मतदान यंत्रा जवळून) बाहेर पडलो हो तो, तर मला परत बोलवलं. तोवर बीप झाली आणि मग मला जा असं सांगितलं.

मी मतदान केलं. प्रोसिजर काय झाली ते सांगतो. मी मतदान यंत्राचे बटन दाबून लगेच सोडले. लगेच बाजूच्या VVPAT मशीनवर मतदान केलेल्या उमेदवाराचा फोटो आणि नांव दिसले. सात सेकंदानंतर ते फोटो आणि नांव जाऊन मशीन ऑपरेटरकडे बीपचा आवाज आला. आणि मगच मी मतदान कक्षातून बाहेर पडलो.

थोडक्यात बीप आवाज ऐकू आल्यानंतर मतदान कक्षापासून दूर व्हावे. VVPAT मशीनवर फक्त इलेक्ट्रॉनिक फोटो आणि नांव दिसते. कागदी स्लिप वगैरे काही बाहेर पडत नाही.

वर दिलेल्या लिंकनुसार, माझे नाव फक्त ठाणे विभागात दाखवीत होते, अन घरच्या बाकीच्यांचे, ठाणे अन आता जिथे राहतोय तेथे असे दोन्हीकडे. मला सुट्टीच्या दिवशी तितके लांब जाऊन मतदान करणे जीवावर आले होते, सो यावर्षी मतदान न करण्याचा निर्णय घेतला. अन आज सकाळी घरी स्लिप्स आल्या ज्यात माझे नाव ईकडच्या विभागात देखील आहे. जे घराच्या अगदी बाजूला आहे, फक्त दोन मिनिटांवर, सो जाईन आता.
हे सगळे इकडे सांगायचे कारण, ही साईट अपडेटेड नाहीये, जर कुणाचे नाव तिथे दिसत नसेल तर जाऊन बघा, असेल कदाचित

काल पेपरात फोन नेण्यास मनाई आहे असं वाचलं आणि फुकट त्रास नको म्हणून घरीच ठेवून गेले. कोणी चेक केलं नाही. पण मतदानाला आलेल्या लोकांपैकी कोणाच्या हातात फोन दिसलेही नाहीत. असो.

तो सिरियल नंबर माझ्याकडे नसल्यामुळे ३-४ चोपड्या घेऊन बसलेल्या माणसासमोर झालेल्या गर्दीत उभं राहून तो मिळवण्यात १० मिनिटं गेली. बरेच लोक स्लिप्स मिळाल्या नसल्याची तक्रर करत होते. काहींचा नंबर बाहेरच्य रजिस्टरमध्ये दिसत होता पण मतदानकक्शातल्या लिस्टमध्ये नव्हता. रांगेत आणखी १० मिनिटं उभं रहावं लागलं. पण एकूणात शिस्त दिसली. सिनियर सिटिझन्सना नीट आत घेऊन जात होते. मतदानकक्शातले लोकसुध्द न खेकसता नीट सगळं समजावून देत होते. भयानक उकाडा (ही निवडणू़क ऐन उन्हाळ्यात का घेतात?) आणि त्या इमारतीतल्या पब्लिक टॉयलेटसचा वास एव्हढा त्रास सोडला तर मतदान नीट करता आलं.

पोलिस कर्मचारी,सैनिक,निमलष्करी दलाचे
कर्मचारी
हे एक तर duty वर असतात .
किंवा मतदार संघाच्या बाहेर असतात .
त्यांच्या साठी नियम काय आहेत .
की त्यांचा मतदानाचा हक्क नाकारला
जातो

झाले

मी ही करून आले मतदान, घरून जाऊन मतदान करून यायला फक्त १० मिनिटे लागली. माझ्याकडे स्लिप होती, त्यात बुथवर सगळी सोय व्यवस्थित होती. स्त्रियांसाठी वेगळी रांग होती, त्यात माझा नंबर दुसरा होता, सो वेळ वाया गेला नाही. माझ्याकडे फोन होता, पण तो पर्समध्ये अन सायलेंट होता, तसे कुणी काही बोलले नाही, पण तिथे एक लेडीज कॉन्स्टेबल होती, ती सारखी ओरडत होती सर्वांना, की मोबाईल असेल तर बंद करा.

पण एकंदरीत वातावरण छान, अन मुख्य म्हणजे सगळे शिस्तबद्ध होते, ते बघून अन नाही नाही म्हणता केले मतदान म्हणून बरे वाटले

मी मागच्याच आठवड्यात वरील साईटस वर शोधले होते पण माझे नाव सापडले नव्हते. माझे 25 वर्षे जुने वोटर आयडी कार्ड जुन्या पत्त्यावर आहे पण गेले 20 वर्षे इथल्या नव्या पत्त्यावर मतदान केल्यामुळे मी नाव असणारच म्हणून निश्चिन्त होते.

आमच्या भागात कुठल्याही पार्टीने चिठोरे वाटले नाहीत त्यामुळे यादीतील नंबर माहीत नव्हता. मतदानाला गेल्यावर केंद्रात टांगलेल्या यादीत शोधूनही नाव सापडेना तेव्हा मात्र तोंडचे पाणी पळाले. घरी येऊन नेट वर शोधले, जुन्या/नव्या पत्त्याने शोधले तरी सापडेना. इतक्या उशिरा जागे झाल्याबद्दल स्वतःला हजार शिव्या देत परत केंद्रात गेले. वाटेत सोसायटीचे सेक्रेटरी भेटले, त्यांनी माझे नाव यादीत बघितल्याचे सांगितल्यावर जीव भांड्यात पडला. त्यांनी नाव शोधूनही दिले.

बुथवर कार्ड मागितले, मी आधार व पॅन कार्ड पुढे केले पण तिकडे न बघता वोटर कार्ड दाखवा म्हणून सांगितल्यावर मला जुने कार्ड पुढे करावे लागले. ते केंद्र अधिकाऱ्यापर्यंत जाऊन त्याने उलटसुलट करून तपासून शेवटी परवानगी दिली मत टाकायची. जुन्या कार्डावर मत दिले असा शेराही मारला. याआधीच्या मतदानात ओळखपत्र मागत होते पण वोटर आयडी कार्ड मागितले नव्हते कधी.

आता कार्डवरचा पत्ता बदलून घेणे अग्रक्रमाने हाती घेणार. ऑक्टोबरात नवे कार्ड असायला हवे.

Pages