मायबोली अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाले.

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्‍यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अ‍ॅप असावे अशी सुचना बर्‍याच मायबोलीकरांकडून येत असते. यावर बरेच दिवस काम सुरु होते.

मायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप आजपासून गुगल प्ले स्टोअर मधे सर्वांसाठी उपलब्ध आहे.

या आवृत्तीच्या पहिल्या चाचणी टप्प्यात मदत करणारे मायबोलीकर चिन्नु, टवणे सर, उपाशी बोका, चिनूक्स, नरेन., भास्कराचार्य, अमितव, फारएण्ड आणि दुसर्‍या चाचणी टप्प्यात सूचना करणारे मायबोलीकर दत्तू, राजसी , हिम्सकूल, आका, पन्तश्री, पियू, बुन्नु, स्वरुप , जिज्ञासा , वरदा, विजय दिनकर पाटील, अॅस्ट्रोनाट विनय, king_of_net, Srd , Seema२७६, चिमु ,अल्पना, Nidhii , द्वादशांगुला, सिद, अक्षय दुधाळ यांचे आभार. एकूण २५८ मायबोलिकरांनी बीटा चाचणी साठी मदत करून वेळोवेळी सूचना केल्या त्यांचे आभारी आहोत. गुगल प्ले स्टोअर मधे कोण कोण खुल्या चाचणीसाठी मदत करत आहे हे कळत नाही त्यामुळे त्यांचा वैयक्तिक उल्लेख करू शकत नाही.

तुमच्या कडे बीटा टेस्टींगसाठी ०.८ आवृत्ती अगोदरच असेल तर नविन घ्यायची गरज नाही. पण त्या अगोदरची आवृत्ती असेल तर लवकर अपग्रेड करून घ्या. अ‍ॅपच्या मेनूत सेटींग्जमधे जाऊन तुम्हाला तुमची आवृत्ती कूठली ते कळू शकेल.

तुमच्या सूचनांचे स्वागत आहे आणि अ‍ॅप मधे सुधारणा सुरूच राहतील.

तुम्हाला काही सूचना / अडचणी असतील तर इथेच कळवा म्हणजे वेळोवेळी योग्य ते बदल करता येतील.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मी आताच ऍप बंद करून पुन्हा चालू केलं आणि स्क्रीन लॉक करून पाहिलं आणि जिथे होतो ति थे चालू झाले>> लगेचच केलं तर तसं चालू होते. पण मध्ये 20-25 मिनीटांचा गॅप पडला एखाद्या कामानिमित्त आणि नंतर पुन्हा चालू केलं अॅप तर मेन पेजवरच अॅप उघडतं.

मध्ये 20-25 मिनीटांचा गॅप पडला एखाद्या कामानिमित्त आणि नंतर पुन्हा चालू केलं तर मेन पेजवरच अॅप उघडतं
>>>
मी काल रात्री app ज्या पेजवर बंद केलं होतं तेच पेज आज सकाळी उघडलं

दोन गोष्टी मांडायच्या आहेत.
1. अॅपमधून प्रतिसाद लिहीताना आधीचे प्रतिसाद दिसत नाहीत. हे बदलता येईल का? काही वेळा आधीच्या प्रतिसादातला काही भाग कॉपी करायचा असतो ते ह्यात जमत नाही.
2. जास्त वेळ अॅप वापरलं तर जाहिराती जास्त frequently येतात असं वाटतं. ज्या जाहीरातींना आवाज आहे त्या अॉटो म्यूट मोडवर उघडतील असे काही करता येईल का? सार्वजनिक ठिकाणी अशी मधेच जाहीरात सुरू झाली तर ते नको वाटते.

मी काल रात्री app ज्या पेजवर बंद केलं होतं तेच पेज आज सकाळी उघडलं>> हे मी खूपवेळा करुन पाहिलंय पण प्रत्येकवेळी अॅप मेन पेजवरच उघडतं.

@जिज्ञासा
१. हे सध्या लगेच बदलता येणार नाही. अ‍ॅपवर प्रतिसाद दिल्यावर आपोआप पान ताजे होत नाही हा प्रश्न सोडवण्यासाठी केलेली हि तडजोड आहे. त्यामुळे नवीन पानावर जाऊन प्रतिसाद द्यावे लागतात. तो प्रश्न सुटला तर हे करता येईल. सध्या जर मुख्य पानावरून प्रतिसादाचा भाग कॉपी केला असेल तर तो नवीन प्रतिसादाच्या खिडकीत पेस्ट करता यावा.
२. > जास्त वेळ अॅप वापरलं तर जाहिराती जास्त frequently येतात असं वाटतं.
१ वेळा वापरा किंवा १० वेळा. सगळ्याच पानावर खाली छोटी जाहिरात आहे.
>ज्या जाहीरातींना आवाज आहे त्या अॉटो म्यूट मोडवर उघडतील असे काही करता येईल का?
तुमच्या कडे लेटेस्ट क्रोम असेल तर कुठल्याच जाहिराती आपोआप आवाज करता यायला नको. तुमच्या मोबाईलमधल्या क्रोमच्या सेटींग मधे हा बदल करता येईल. आणि मायबोली अ‍ॅप त्या नियमाचे पालन करेल.
हा नियम एप्रिल २०१८ मधे क्रोम ६६ पासून सुरु झाला आहे. पण काही व्रात्य जाहिराती त्यातून पळवाटा काढत आहेत. क्रोम ७० - आक्टोबर २०१८ पर्यंत त्यानाही आळा बसेल असे गुगलचे म्हणणे आहे . सध्या क्रोम ६७ चालू आहे आणि प्रत्येक आवृत्तीत ते पळवाटा बंद करत आहेत . हे पहा https://developers.google.com/web/updates/2017/09/autoplay-policy-changes

@Nidhii
तुमचा प्रश्न मला अजून सोडवता येत नाही कारण काय केले तर तुमच्यासारखा अनुभव येईल ते माहिती नाही.

धन्यवाद वेमा! माझा प्रश्न पॉप अप जाहिरातींच्या अनुषंगाने होता. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी क्रोमच्या सेटिंग्जमध्ये बदल केले आहेत. फरक पडला नाही तर इथे लिहेनच.

तुमचा प्रश्न मला अजून सोडवता येत नाही कारण काय केले तर तुमच्यासारखा अनुभव येईल ते माहिती नाही.>>
वेमा, मला जर मोठा लेख वगैरे वाचायचा असेल तर, किंवा मध्ये ब्रेक घ्यावा लागणार असेल तर मी ब्राऊजर वापरतेय. त्यामुळे मला फार अडचण येत नाहीये. माझ्यापुरता हा प्रश्न मी सोडवलाय. Happy
तुम्हाला जेव्हा उत्तर मिळेल तेव्हा तुम्ही अॅपचा प्रश्न सोडवा. Happy

अ‍ॅपवर आणि मोबाईलवर अनेक ग्रूपच्या अनुक्रमाणिका पाहताना आडवे स्क्रॉल करावे लागायचे. हा प्रश्न सोडवला आहे. तो उपाय सगळ्यांनाच आपोआप लागू होईल. नवीन काही डाऊनलोड करायची गरज नाही.

फोनमध्ये 'clear all running apps' केल्यानंतर परत अ‍ॅप उघडलं की लॉग-इन, पासवर्ड द्यावं लागतं.
असंच अपेक्षित आहे का?

(सकाळी अ‍ॅपमधून हा प्रतिसाद देताना एरर आली. आत्ता डेस्कटॉपवरून पोस्ट करत आहे.)

अँड्राॅईड वरुन गूगल फोटो वापरुन मायबोली किंवा मायबोली अॅप वर प्रतिसादामधे गूगल फोटो लिंक कशी द्यायची ?
(मला URL देता येतेय पण पूर्वी प्रमाणे image src वगैरे वापरुन डायरेक्ट फोटो देता येत नाहीये)
Laptop/Desktop वरुन अजूनही जमतंय पण मोबाईल वरुन नाही.
त्यामुळे जसे Facebook वर कुठूनही आणि In Transit जसे प्रतिसाद देता येतात तसे मायबोली अॅप वर करता येत नाही..
कृपया मदत करा..

मी आत्ताच अ‍ॅप मधून इमेज कशी अपलोड करावी ते बघत होतो तेव्हा एक गोष्ट अशी लक्षात आली, की जेव्हा कॉम्प्युटर वरुन इमेज अपलोड करताना, टायपिंग विन्डोच्या खालच्या लिंक वर क्लिक केल्यावर फाईल अपलोड करण्यासाठी एक नवीन विन्डो उघडते, त्या विन्डोमधे एकूण चार बटन्स दिसतात, त्यातले Insert File हे बटण अ‍ॅप मधून सेम विन्डो ओपन केल्यावर दिसत नाहीये. त्यामुळे अ‍ॅप मधून जरी फाईल खाजगी जागेत आली तरी ती प्रतिसादामधे include करता येत नाहीये.

खाली दिलेल्या चित्रातून हे जास्त स्पष्ट होईल.
पीसी वरुन इमेज अपलोड
image upload from PC.JPG

अ‍ॅप वरुन एमेज अपलोड

हे सोडवता आले तर अ‍ॅप वरुन इमेज अपलोड करणे सुद्धा जमेल जे सध्या घडत नाहीये..

धन्यवाद हिम्सकूल . हीच अडचण अजून सोडवता येत नाहिये. गंमत म्हणजे IOS APP ला ही हीच अडचण आहे. पण या दोन्ही मधे त्या त्या मोबाईल ब्राऊझर वर येत नाही. आपण जे Drupal चे मोड्ञूल यासाठी वापरतोय त्याचा हा प्रश्न आहे. अ‍ॅपचा नसावा .

अ‍ॅपमधून बाहेर काही शेअर करता येत नाही; बाहेर कुणी लिंक पाठवली असेल तर ती अ‍ॅपमध्ये ओपन होत नाही; आणि अ‍ॅप असल्यामुळे लिंकवर टॅप केल्यावर फोन ब्राऊझरही ओपन होत नाही.
माझा अ‍ॅपमधे इंटरेस्ट प्रामुख्याने शेअरिंगसाठी होता; ते होत नसल्याने (सध्या तरी) मी अ‍ॅप काढून टाकलंय Sad

>अ‍ॅपमधून बाहेर काही शेअर करता येत नाही
अ‍ॅपमधे पानाच्या वर उजव्या बाजूला ते शेअर करण्याची सोय आहे त्यात काही अडचण आहे का? त्यातून फक्त फेसबूकच नाही तर व्हॉट्सअ‍ॅप, SMS , ईमेल सगळीकडे शेअर करता येते ते वेबवर करता येत नाही. काही जण ही सोय वापरत आहेत असे दिसते आहे.

स्ध्याच्या आवृत्ती ०.९ मधे लोकेशन ची परवानगी असण्याची गरज काढून टाकली आहे. त्यामुळे ज्याना लोकेशन शेअर करायचे नाही त्यानाही अ‍ॅप वापरता येईल. लोकेशन वर आधारीत सुविधा तयार झाल्यावर, ती ज्याना हवी त्यांच्यासाठी तेंव्हा परवानगी परत मागता येईल.

>ह्याच्या debugging साठी काही मदत हवी असेल तर सांगा, प्रयत्न करून बघता येईल.
अँड्रॉईडच्या जावास्क्रीप्टबद्दल कुणाला माहिती असेल तर मदत होईल. अ‍ॅप तयार करताना अँड्रॉईड स्टुडियो (emulator) किंवा IOS xcode मधेही image insert button दिसते पण प्रत्यक्ष मोबाईलवर (Device वर) ते गायब होते आहे. हा प्रश्न Android and IOS दोन्हीकडे वेगळे कोड असूनही येतो आहे.

अँड्रॉईड अ‍ॅपची नवीन आवृत्ती १.० आज प्रकाशीत केली आहे. यातले मुख्य बदल म्हणजे अ‍ॅप चालवण्यासाठी लागणार्‍या परवानग्या कमी केल्या आहेत. ०.९ पासून लोकेशन चीही परवानगी लागत नाही. खरतर कुठलीच परवानगी आता लागायला नको. ही आवृत्ती थोडी जास्त स्थीर आहे आणि इतर काही छोट्या अडचणी सोडवल्या आहे (सगळ्या अजून सोडवू शकलो नाही). पण अ‍ॅप चालवण्यासाठी लागणार्‍या परवानग्या ही एक मोठी अडचण दूर व्हावी.
अ‍ॅप पहिल्यांदा प्रकाशित झाल्या पासून गेल्या दोन महिन्यात ५००० हून अधिक मायबोलीकर ती वापरत आहेत. त्यातल्या अनेकांनी वेळोवेळी सूचना दिल्या, देत आहेत, अ‍ॅप स्टोअर मधे अभिप्राय देऊन तारांकन देत आहेत त्या सगळ्यांचे आभार.

ऍप मधून प्रतिसाद देताना एक गोष्ट लक्षात आली, प्रतिसाद दिल्यावर दिलेला प्रतिसाद दिसतो, आणि मग परत सगळ्या लेखांच्या लिंक्स बघायच्या असतील तर कमीत कमी तीनदा मागे जावे लागते, पहिल्यांदा मागे गेल्यावर दिलेल्या प्रतिसादाची खिडकी दिसते, त्यानंतर परत मागे गेल्यावर ज्या बाफ वर प्रतिसाद दिला तो दिसतो आणि परत एकदा मागे गेल्यावर लेखांची सूची दिसते, इथे काही सोपा पर्याय आहे का..

गूगल ड्राईव्ह वरून फोटो शेअर करा. शेअर केलेली लिंक साधारण अशी
https://drive.google.com/ file/d/1CvcQFQ14d2Z6cCxP626dkoYWS71mGOD/view? usp=drivesdk

असते. या लिंक मध्ये file/d/ नंतरचा आणि /view आधीचा ३३-३५ अंकाक्षरांचा कोड कॉपी करा. आणि

< img src="https://drive.google.com/uc?id=xxxxx">

या लिंक मध्ये xxxxx च्या जागी पेस्ट करा.आणि ही लिंक माबो अॅप वर लेखन/प्रतिसादात द्या. फोटो दिसू लागेल.

< आणि img मध्ये मी जागा सोडली आहे कोड दिसण्यासाठी. माबो अॅप वर देताना सलग द्या

मायबोली अ‍ॅप,
दोन दिवसात एकदाही ओपन न केल्यास ऑटोमॅटिक लॉगऑफ होतेय. हा सर्वसाधरण प्रॉब्लेम आहे की फक्त माझ्याच मोबाईलवर असे होत आहे. ह्याबद्दल कोणी सांगू शकेल काय ?

>अ‍ॅपमधून बाहेर काही शेअर करता येत नाही
अ‍ॅपमधे पानाच्या वर उजव्या बाजूला ते शेअर करण्याची सोय आहे त्यात काही अडचण आहे का? त्यातून फक्त फेसबूकच नाही तर व्हॉट्सअ‍ॅप, SMS , ईमेल सगळीकडे शेअर करता येते ते वेबवर करता येत नाही. काही जण ही सोय वापरत आहेत असे दिसते आहे.

स्ध्याच्या आवृत्ती ०.९ मधे लोकेशन ची परवानगी असण्याची गरज काढून टाकली आहे. त्यामुळे ज्याना लोकेशन शेअर करायचे नाही त्यानाही अ‍ॅप वापरता येईल. लोकेशन वर आधारीत सुविधा तयार झाल्यावर, ती ज्याना हवी त्यांच्यासाठी तेंव्हा परवानगी परत मागता येईल.

Submitted by webmaster on 19 August, 2018 - 04:22 >>>>>
पानाच्या वरती उजव्या बाजूला असणारी शेअर करा सुविधा वापरून लिंक शेअर केली तर धाग्याचे पेज दिसत नाहीए. प्रत्येक लिंक होम पेज वर नेते. इतर वेगळी काही पद्धत आहे का अ‍ॅपमधून शेअर करण्याची?

'मायबोली'वरचे मराठी टंकलेखनाचे सॉफ्ट्वेयर 'ऑफ लाइन' केंव्हा उपलब्ध करून देणार?

@pkarandikar50 सध्यातरी असे काही करण्यासाठी प्राधान्यक्रम नाही. गुगल इनपुट टुल आणि मायक्रोसॉफ्ट असे दोन पर्याय अनेक वर्षे उपलब्ध आहेत. पण ते सुद्धा आता 'ऑफ लाइन' आहेत का ते माहित नाही.

Pages