मायबोली अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाले.

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्‍यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अ‍ॅप असावे अशी सुचना बर्‍याच मायबोलीकरांकडून येत असते. यावर बरेच दिवस काम सुरु होते.

मायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप आजपासून गुगल प्ले स्टोअर मधे सर्वांसाठी उपलब्ध आहे.

या आवृत्तीच्या पहिल्या चाचणी टप्प्यात मदत करणारे मायबोलीकर चिन्नु, टवणे सर, उपाशी बोका, चिनूक्स, नरेन., भास्कराचार्य, अमितव, फारएण्ड आणि दुसर्‍या चाचणी टप्प्यात सूचना करणारे मायबोलीकर दत्तू, राजसी , हिम्सकूल, आका, पन्तश्री, पियू, बुन्नु, स्वरुप , जिज्ञासा , वरदा, विजय दिनकर पाटील, अॅस्ट्रोनाट विनय, king_of_net, Srd , Seema२७६, चिमु ,अल्पना, Nidhii , द्वादशांगुला, सिद, अक्षय दुधाळ यांचे आभार. एकूण २५८ मायबोलिकरांनी बीटा चाचणी साठी मदत करून वेळोवेळी सूचना केल्या त्यांचे आभारी आहोत. गुगल प्ले स्टोअर मधे कोण कोण खुल्या चाचणीसाठी मदत करत आहे हे कळत नाही त्यामुळे त्यांचा वैयक्तिक उल्लेख करू शकत नाही.

तुमच्या कडे बीटा टेस्टींगसाठी ०.८ आवृत्ती अगोदरच असेल तर नविन घ्यायची गरज नाही. पण त्या अगोदरची आवृत्ती असेल तर लवकर अपग्रेड करून घ्या. अ‍ॅपच्या मेनूत सेटींग्जमधे जाऊन तुम्हाला तुमची आवृत्ती कूठली ते कळू शकेल.

तुमच्या सूचनांचे स्वागत आहे आणि अ‍ॅप मधे सुधारणा सुरूच राहतील.

तुम्हाला काही सूचना / अडचणी असतील तर इथेच कळवा म्हणजे वेळोवेळी योग्य ते बदल करता येतील.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

@मंजूडी
तुम्ही मोबाईलवर कुठले किबोर्ड अ‍ॅप वापरता का? तुमचे अँड्रॉईड वर्जन कुठले आहे?

अभिनंदन. डाउनलोड केले आहे.
*फोटोज, फाईल्स्/फोल्डर्स आणि लोकेशन अ‍ॅक्सेस कंपल्सरी नसायला पाहिजे.

माझ्याकडे मायबोली वर्जन 0.8 आहे. Beta testing साठी download केलेले. अॅप वापरताना मला काही अडचण येत नाहीये.
पण मी गुगल प्ले स्टोअरमध्ये रेटींग आणि अभिप्राय द्यायला गेले तर मला रेटींग देता येत नाहीये कारण माझ्याकडे अजूनही मायबोली अॅप beta testing मध्येच दाखवलं जातंय. वर्जन अपडेटेड आहे त्यामुळे अपडेट करण्याचाही काही प्रश्न येत नाहीये.
पहिलं beta test चं अॅप डिलीट करून पुन्हा मायबोली अॅप install करायचंय का??

वाह धन्यवाद. मला साईट वर जाऊन वाचणे कटांळवाणे होते. मध्यतरी मी ऑफिस मधून मायबोली वर फेरफटका मारत असे पण प्रोजेक्ट निम्मीत वेगवेगळ्या ठिकाणी बदल होत राहिले कुठे इंटरनेट ऍक्सेस होत असे तर कुठे नाही खाते उघडून जवळपास 10 वर्ष जरी होत असली तरी मी कधीतरी येत असायचो. आता मोबाईल अप मुळे या सर्व गोष्टीशी परत जोडला जाऊ शकतो. खूप आनंद वाटला. सातत्यानं मायबोली टीम ने केलेले आजवरच्या कामाचेही खूप खूप कौतुक.

**तुमच्या कडे बीटा टेस्टींगसाठी ०.८ आवृत्ती अगोदरच असेल तर नविन घ्यायची गरज नाही. पण त्या अगोदरची आवृत्ती असेल तर लवकर अपग्रेड करून घ्या**

०.८ आवृत्ती असली तरी बीटाटेस्टरचाच शिक्का असतो, दिलेला फिडब्याक फक्त डेवलपरपर्यंतच पोहोचतो.
रेटिंग देणे अलाउड नाही.निधिप्रमाणेच.
१)
मग प्रथम लीव बीटा टेस्टर अॉप्शन सबमिट करून अप अनिनॉन्स्टॉल केले आणि पुन्हा डालो केल्यावरही बिटा टेस्टरच आले.
२) ठीक आहे. पुन्हा अनिनस्टॉल, लाइब्रितूनही काढले आणि डाउनलोड केले. ओके.
३) प्रतिसाद लिहितांना कॉल आल्यावर लेखन गायब झाले.
असो. थोडंथोडं कॉपी करत जातो. ब्राउजरवरही होते असे कधी. ओके.
४)अपवरच्या अनुक्रमणिका नोंदी एका पानावर २५-३०शक्य आहेत का?
५) अगोदर आलेल्या दुसय्रा कुणाच्या प्रतिसादातील काही मजकूर कॉपी करून पेस्ट करून त्यावर उत्तर ब्राउजरमध्ये लगेच स्क्रोल करुन पोहचता येते तसे अपमध्ये करायचे झाल्यास प्रथम कॉपी करून मगच "नवीन प्रतिसादाचे बटण" वापरावे लागते अन्यथा परत मागे जावे लागेल.
ओके.

@Nidhii आणि @Srd

तुम्ही बीटा चाचणीसाठी मदत केली आणि त्याबद्दल खूप आभार. पण गुगल प्ले स्टोअरच्या नियमाप्रमाणे बीटा चाचणीत भाग घेणार्‍यांचे प्रतिसाद प्रसिद्ध होत नाहीत. तुमचा अभिप्राय प्रसिद्ध करायचा असेल तर आधी बीटा टेस्टींग मधून बाहेर पडावे लागेल. मला असे वाटतेय तेवढे पुरेसे व्हावे. परत अ‍ॅप इन्स्टॉल करायची गरज नाही. पण बीटा टेस्टींग मधून बाहेर पडलात तर अभिप्राय लिहण्याअगोदर १-२ तास जाऊ द्यात कारण अ‍ॅप स्टोअर तातडीने ताजे होत नाही.

@Srd
४)अपवरच्या अनुक्रमणिका नोंदी एका पानावर २५-३०शक्य आहेत का?
पाहतो पण सांगत येत नाही. अनुक्रमणिका नोंदी वाढवल्या तर एक पान डाऊन्लोड करायला जास्त वेळ लागतो आणि अ‍ॅप फास्ट वाटत नाही. पण नाही केल्या तर सारखे पान बदलावे लागते त्यामधला सुवर्ण मध्य शोधतो आहे.

@मंजूडी
तुमचा कीबोर्ड माझ्या माहितीचा नाही. मोबाईल ब्राऊझर मधेही असेच होत का?

@ अदिती
>*फोटोज, फाईल्स्/फोल्डर्स आणि लोकेशन अ‍ॅक्सेस कंपल्सरी नसायला पाहिजे.
तुमच्या सारखी सूचना इतरांनीही केली आहे. पाहतो काय करता येते ते.

दत्तात्रय साळुंके, Hharshu ,यदु , शाली , राधिका
इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला शक्य असेल तर गुगल अ‍ॅप स्टोअर मधे अभिप्राय लिहिलात तर हे अ‍ॅप इतरांना सापडायला सोपे जाईल,.

बिटावरून बाहेर पडल्यावर - अनिनॉन्स्टॉल - लाइब्रितून काढणे - पुन्हा इन्स्टॉल केल्यास लगेच नवीन येते.

बिटा आणि अल्फा दोन्हीला अभिप्राय/रेटिंग दिले कालच.

कालच्या प्रतिसादातला क्र ५ पाहा. ( अप /ब्राउजर तुलना आहे फक्त)

^^फोटोज, फाईल्स्/फोल्डर्स आणि लोकेशन अ‍ॅक्सेस कंपल्सरी नसायला पाहिजे.^^

सर्व परमिशन्स द्याव्या लागतात तरच एप्स काम करतात स्टोरवरच्या. जे लेखक फोटोच्या लिंक्स दुसय्रा शेअरिंग साइटवरून आणतात त्यांना फोटो फाइल्स संपर्क नसला तरी चालणार आहे.
लोकेशन संपर्काने जवळपास कुणी मायबोलीकर असल्यास त्याची सूचना मिळू शकेल अति प्रगत मोबाईलवर. परदेशात/सुटीवर याचा उपयोग होईल.

वेबमास्तर, मोबाईल ब्राऊजरमधे असं होत नाही. इतर सगळीकडे मी हा कीबोर्ड व्यवस्थित वापरते.

पण इकडे हा कीबोर्डचाच प्रॉब्लेम दिसतोय. कारण सॅमसंग कीबोर्ड निवडल तर नीट टाईप करता आले, फक्त ते इंग्रजीतून असल्याने पोस्ट नाही केले.

मायबोली टीमचे मनःपूर्वक अभिनंदन!
छान आहे अॅप!
नवीन प्रतिसादानंतर पान रिफ्रेश होण्याबद्दलचा प्रश्न सोडवल्याचं छान केलंत. ती एकच अडचण होती. Happy

गेल्या आठवड्यात डाऊनलोड केलं होतं, पण नीट पाहायला वेळ आज मिळाला.
मस्त वाटतंय app ☺
अजूनतरी काही समस्या आलेली नाही. आल्यास इथे सांगेनच.

अ‍ॅपवरून 'ग्रूपमध्ये नवीन' या यादीत `मांसाहार : एक विरोधाभास' हा धागा दोनदा दिसतो. ४ दिवसांच्या अंतराने त्याचे २ स्क्रीनशॉट्स काढून ठेवले आहेत. अ‍ॅपमार्फत ते इथे पोस्ट करण्याचा प्रयत्न केला. इमेजेस खाजगी जागेत अपलोड झाल्या; पण `insert file' हा टॅब अ‍ॅपमध्ये दिसलाच नाही. (सर्व अ‍ॅप परमिशन्स दिलेल्या आहेत.)

(हा प्रतिसाद अ‍ॅपवरून टाकताना सारखी एरर येते आहे. आता डेस्कटॉपवरून पोस्ट करत आहे.)

>अ‍ॅपवरून 'ग्रूपमध्ये नवीन' या यादीत `मांसाहार : एक विरोधाभास' हा धागा दोनदा दिसतो.
ही अ‍ॅपची अडचण नाही वेबवरही हे होते आहे.
>इमेजेस खाजगी जागेत अपलोड झाल्या; पण `insert file' हा टॅब अ‍ॅपमध्ये दिसलाच नाही.
या प्रॉब्लेम वर अजून ईलाज सापडला नाही . शोध चालू आहे.
>हा प्रतिसाद अ‍ॅपवरून टाकताना सारखी एरर येते आहे.
नक्की काय एरर मेसेज आहे?

ही अ‍ॅपची अडचण नाही वेबवरही हे होते आहे. >>> डेस्कटॉपवरून पाहताना मला तो धागा दोनदा दिसत नाही.

नक्की काय एरर मेसेज आहे? >>> वेबसाईट एन्काऊंटर्ड अ‍ॅन एरर, प्लीज ट्राय अगेन लेटर - अशा प्रकारचा जेनेरिक मेसेज येतोय

गेले महिनाभर मला आधी कधीही न आलेला प्रॉब्लेम येतोय. मी प्रतिसाद देऊन सेव केले की प्रतिसाद सेव होत नाही व नवीन प्रतिसाद द्या अशी विंडो त्या जागी येते. त्यात फक्त लेख दिसतो व प्रतिसाद विंडो. बाकी कोणाचे प्रतिसाद दिसत नाहीत. तिथे प्रतिसाद दिला की पोस्ट होतो. कधीकधी जिथे दिला तिथेच पहिल्या फटक्यात पोस्ट होतो पण तो संपादित करताना संपादित करा ही विंडोच सेव बटन दाबले की दिसते, मूळ प्रतिसाद तसाच राहतो. मी हल्ली प्रतिसाद आधी कॉपी करून घेते व नंतर सेव करते. खूपदा 2 3 दा परत देऊनही सेव झालाच नसल्याने नाद सोडून दिलाय. आत्ता शाहरुखच्या धाग्यावर प्रतिसाद पहिल्या फटक्यात सेव झाला व नंतर 2 दा एडिटला तरी सेव झालाच नाही.

ही तक्रार या आधी दोनदा एडमिनच्या विपुत दोनदा केली पण सेव झालीच नाही.

@ अनिरुध्द..
तुम्हाला अ‍ॅप मधून लॉग ऑऊट करायची गरज का भासते ते कळू शकेल का? उलट सारखे लॉग ईन/ आउट करावे लागू नये म्हणून सहसा अ‍ॅप वापरले जाते.

@साधना
तुम्हाला ही अडचण कुठे येते आहे ? अ‍ॅपमधे , मोबाईल ब्राऊझर कि लॅपटॉप्/डेस्कटॉप वर? आणि त्याचे ब्राउझर /वर्जन काय आहे? तुमच्या सांगण्यावरून असे वाटते आहे की तुम्ही एकच आयडी पण वेगवेगळ्या ठिकाणाहून लॉगीन केले असावे आणि त्याची सरळमिसळ होत असावी.

अ‍ॅपची ०.९ आवृत्ती प्रकाशीत झाली आहे.
या आवृत्तीतले बदलः
- टॅब्लेटवरून ही वापरता येईल.
- अ‍ॅपमधून लिंक शेअर केली , आणि मोबाईलमधून ती उघडली तर ती थेट अ‍ॅपमधेच उघडेल.
- इतर किरकोळ बदल (काही लायब्ररीच्या आवृत्त्या अद्ययावत केल्या आहेत)

तुम्हाला अ‍ॅप मधून लॉग ऑऊट करायची गरज का भासते ते कळू शकेल का? उलट सारखे लॉग ईन/ आउट करावे लागून नये म्हणून सहसा अ‍ॅप वापरले जाते.
<<

प्रतिसादाची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद webmaster
---
काहीवेळा अ‍ॅपवर क्लिक केल्यावर ती हॅंग झाल्यासारखी मायबोलीच्या लोगोवर अडकून राहते. दोन-तीन वेळा अ‍ॅप उघडून (हॅंग स्थितीत) बंद केल्यावर, चौथ्या पाचव्या प्रयत्नांनंतर अ‍ॅप ओपन होते (झालीच तर) अश्यावेळी मोबाईलच्या ब्राऊझर (क्रोम) मधून मायबोली उघडायचा प्रयत्न केल्यास पुन्हा मायबोली अ‍ॅपच ओपन होते. तेंव्हा मला वाटले अ‍ॅपवरुन लॉगआऊट झाल्यास, ब्राऊझरमधे मायबोली ओपन होईल म्हणून तो प्रश्न तुम्हाला विचारला.
---

Pages