भारतीय वाहीन्या आणि निवेदकांचा विश्वविजय

Submitted by थॅनोस आपटे on 1 March, 2019 - 11:17

नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान सामन्या मधे भारतीय माध्यमांनी आदर्श वस्तुनिष्ठ बातमीपत्र म्हणजे काय असते याचे वस्तुपाठच जगाला घालून दिले आहेत. या वाहीन्यांचा अभ्यास आता जागतिक स्तरावर चालू आहे असे समजते. युद्धाचे रिपोर्टिंग कसे करावे याबाबत फॉक्स टीव्ही मधे भारतीय माध्यमाचे दाखले दिले जात आहेत. सीएनएन ने सर्व वाताहरांना भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. बीबीसी या वाहीनीची तर भारतीय माध्यमांनी केलेल्या शोधपत्रकारीतेने लाजच गेली आहे. खालील वाहीन्या / निवेदक यांची थोडक्यात वैशिष्ट्ये

झी वाहिनी - ही वाहिनी नि:स्पृह आणि तडफदार वृत्तांकन आणि रिपोर्ताज साठी प्रसिद्ध आहे. मोदी सरकार आल्यापासून या वाहीनीने त्यांच्या कारभारावर कडक वचक ठेवून विरोधकांची पोकळी भरून काढली आहे. या वाहीनीचे मुख्य संपादक सुधीर चौधरी हे एक कर्तव्यदक्ष पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहे. यांना सरकार पक्षाकडून त्यांच्या बाजूने रिपोर्टिंग करण्याची ऑफर धुडकावून त्यांनी आपले कर्तव्य चोख पार पाडल्याचे सांगितले जाते.

इंडिया टीव्ही - रजत कुमार नामक एक पत्रकार आहेत. जे जनता की अदालत चालवतात. त्यांच्याकडे न्यायबुद्धी असल्याने सर्वोच्च न्यायालयाने देखील या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाच्या वरचे न्यायालय अशी मान्यता दिलेली आहे. विशिष्ट लोकांना अडचणीचे प्रश्न आणि ठराविक लोकांना लाडे लाडे खोडे प्रश्न असे या वाहीनेने आजतागाय कधीही केलेले नाही. राजकारणाशिवाय या वाहीनीने शोधपत्रकारीतेत काही मानदंड स्थापित केले आहेत. जसे बजरंगबली श्रीलंकेत कुठे उतरले, रावण अजूनही कोणत्या गुहेत जिवंत आहे. हनुमान हिमालयात कोणत्या ठिकाणी अद्याप आहे अशा काही अविश्वसनीय गोष्टींवर तितकीच अविश्वसनीय शोधपत्रकारिता करून त्यांनी जगाला स्तिमित केलेले आहे.

रिपब्लिक टीव्ही - अर्णब गोस्वामी या भारतातील सर्वात शांत आणि मृदू स्वभावाच्या व्यक्तीकडे या वाहीनीचे सर्वाधिकार आहे. या वाहीनीचे वैशिष्ट्य म्हणजे डिबेट मधे असलेली शिस्त आणि शांतता. प्रश्न विचारल्यानंतर समोरच्याला वेळ देणे, त्याला विचार करता यावा म्हणून मधे मधे न टोकणे या बाबी या वाहीनीवर कसोशीने पाळल्या जातात. उगीच गोंधळ करणारे ग्रॅण्डमास्टर शिफू वगैरे सारखे लोक या वाहीनीवर औषधालाही दिसत नाहीत. सरकारच्या कामाचा आढावा घेणे, त्रुटी असतील तर त्यावर विशेष कार्यक्रम घेणे, मोदींना अडचणीचे प्रश्न विचारणे या साठी ही वाहीनी प्रसिद्ध आहे. मीडीया नेहमी विरोधी पक्षात असतो हे अर्णब चे म्हणणे तर दर्शकांच्या डोळ्यात पाणी आणते. सरकार पक्ष सोडून विरोधकांच्या मागे लागणे या वाहीनीकडून कधीही झालेले नाही.

एनडीटीव्ही - रवीशकुमार नावाचे पाकिस्तानी अँकर या वाहीनीचे संपादक आहेत. प्रणव रॉय या देशद्रोही इसमाकडून ही वाहीनी चालवली जाते. त्यामुळे देशाच्या विरोधात कारस्थाने करण्यासाठी ही वाहिनी कुप्रसिद्ध आहे. युद्धाच्या दरम्यान सर्व वाहीन्यांनी पाकिस्तानवर आक्रमण करून इम्रानखान यांना भयभीत केले असताना ही वाहिनी देशातल्या जनतेला शांततेचं आवाहन करून त्यांचा निर्णय डळमळीत करू पाहत होती.
इतर वाहीन्यांचे अँकर्स स्वतः मिग २१ , मिराज आदी विमाने घेऊन बाँब टाकण्यासाठी गेले असताना ही वाहिनी पुलवामा हमला कुणी केला याबद्दल शंका घेत होती. इतर वाहीन्यांच्या अँकर्सनी स्वतः बाँब टाकून त्या प्रकाशात मृतांची संख्या मोजली असतानाही ही वाहीनी मात्र कुठे आहे प्रेतं असे निर्लज्ज प्रश्न विचारत होती.

सरतेशेवटी इतर सर्व वाहीन्यांचा जय झाला आणि त्यांच्या भयाने इम्रानखान यांनी भयकंपित होऊन भारताचा एक पायलट सोडून दिला. केवळ तेच विमान पायलटने चालवल्याने तो सापडला. जेव्हढी विमाने अँकर्सनी उडवली त्यात भारताला यश आले.

सीएनएनव आणि बीबीसी या वाहीन्यांनी बाँब जंगलात पडले असे खोटे दावे केले. त्यासाठी पाकिस्तानातल्या स्थानिकांच्या मुलाखती घेतल्या. आता पाकिस्तानीच ते. ते काय खरं बोलणार आहेत का ?
एक हजार किलोचा बाँब पडल्यावर प्रेतं काय राहणार आहेत का ? त्यांची वाफ झाली वाफ !!
आज भारतीय वाहीन्यांनी हे सर्व जगासमोर आणलेलं असल्याने सीएनएनची णाचक्की झालेली आहे. बीबीसी भारतातले कार्यालय बंद करण्याच्या विचारात आहे.

भारतीय वाहीन्यांचे अभिनंदन !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एबीपी हिंदी माझ्यामते अगदीच थर्डक्लास न्युजचॅनेल आहेत. ह्याच चॅनेलवर काल अभिनंदन कीती पावले चालून भारतात आला ह्याची संख्या दाखवत होते.
--
ऑनलाईन मराठी न्युज पेपरबद्दल बोलायचे झाले तर काल महाराष्ट्र टाईम्स ने कहरच केला. अभिनंदन ह्यांना भारताकडे सोपवताना त्यांच्या बरोबर डॉ. फरिहा बुगती या पाकिस्तानी परराष्ट्र सेवेतील महिला अधिकारी होत्या, त्यांचा अभिनंदन ह्यांची पत्नी म्हणून उल्लेख मटाने त्यांच्या बातमीत केला होता. हि चुकीची बातमी दिल्याबद्दल त्यानी आता दिलगीरी व्यक्त केली आहे.
--
एनडीटिव्ही इंडीयाबद्दल तर काही बोलायलाच नको. सर्व एकत्रित कम्युनिस्ट मर्कटांचा, वर्तमान सरकारच्या नावाने शिमगा करायचा तो एक परमनंट अड्डा आहे.

आहे.
--
एनडीटिव्ही इंडीयाबद्दल तर काही बोलायलाच नको. सर्व एकत्रित कम्युनिस्ट मर्कटांचा, वर्तमान सरकारच्या नावाने शिमगा करायचा तो एक अड्डा आहे.

हे मात्र खर आहे .ह्यांचा सुधा अजेंडा आहे .
फुकट आव आणतो आहे तो पत्रकार रविष कुमार

<ह्यांचा सुधा >
म्हणजे ? आणखी कोणाचा अजेंडा आहे?

वर्तमान सरकार म्हणजे त्या त्या वेळचं की फक्त आताचं?

मग एन्डीटीव्हीने अण्णा चं रामलीला मैदान प्रकरण दाखवलेलं की नाही?

आणि आणखी कोणाचा अजेंडा आहे ते पण सांगा की हो राजेश१८८.

मग एन्डीटीव्हीने अण्णा चं रामलीला मैदान प्रकरण दाखवलेलं की नाही?
<<

एन्डीटीव्हीने अण्णांच रामलीला मैदान प्रकरण टिव्हीवर दाखवलेल हे अजिबात नाकारता येत नाही.
--
फक्त ,
केजरीवाल आयकर विभागातून सुट्टी घेऊन दूसरेच उद्योग करतोय, स्वत: अण्णा १९६५ चा युद्धात पाकिस्तानी सैन्याला घाबरुन, युद्धक्षेत्रात चालवत असलेला ट्रक सोडून कसे पळून गेले. अण्णांचा 'किसन हजारे' वगैरे एकेरी उल्लेख करणे असे तेंव्हाच्या कॉंग्रेस सरकारला साजेशे वार्तंकन संपूर्ण रामलीला मैदान उपोषणा दरम्यान एनडीटिव्हीने केले.

बाळ बीबीसीहब, तुमच्या गलच्या चॅनेलवल वेगलंच एन्दीतीवी दिसाचं की तेव्हा. आता प्लॉब्लेम सिग्नलचा की दोल्या आणि कानांचा की मेंदूचा?

रविश च्या नावानेच इथे मिरची लागते...
त्याने टीव्ही बघू नका म्हटले त्याचा अधिकार, तुम्ही बघा नका बघू तुमचा अधिकार.
इतके सिम्पल असतांना इथे येऊन 'त्याला असे सांगायचा काय अधिकार' हे विचारणे महान आहे. रविश कुमार जिंदाबाद!

सेनाधिकारी आणि सैनिकांना भडकवण्याचा प्रयत्न करताना महान पत्रकार रविश कुमार.
याबद्दल बहुतेक मूग गिळले जातीलच.
Ravish.jpg

भांडू नका रे मुलांनो अँकर्सवरून.
माझ्या विपूत जा. आणि तडप तडप के गाणे कसे झालेय ते सांगा कळवा बरं.
उद्या मला या वाहीन्यांवर बोलावलंच, आणि मी एखाद्या शो चा होस्ट झालो तर...
ओळख दाखवेन न दाखवेन ..........

( प्रतिसाद विषयाला धरून आहे )

Submitted by अनिरुध्द.. on 2 March, 2019 - 09:58
बाळ बीबीसीहब, तुमच्या गलच्या चॅनेलवल वेगलंच एन्दीतीवी दिसाचं की तेव्हा. आता प्लॉब्लेम सिग्नलचा की दोल्या आणि कानांचा की मेंदूचा?

Submitted by भरत. on 2 March, 2019 - 10:07
रविश च्या नावानेच इथे मिरची लागते...
त्याने टीव्ही बघू नका म्हटले त्याचा अधिकार, तुम्ही बघा नका बघू तुमचा अधिकार.
राविष कुमार नी जाहीर रित्या त्यांची मत मांडली .आणि बाकी लोकांनी स्वतःची मत जाहीर केली

https://twitter.com/thewire_in/status/1101488224395034635

त्यात काहीही वावगं म्हटलेलं नाही. निवृ त्त सेनाधिकार्‍यांचा वापर वृत्तवाहिन्या भावना भडकवायला करतात. त्याबद्दल आहे हे.

आणि मोदीविरोधात काहीही बोलायला भाटांना कसलेही निमित्त पुरते हे हजारो वेळा सिद्ध झाले आहे.

रवीशकुमार, ए न्डी टीव्ही ला लाथा घालणारी मंडळी बाल कोट हल्ल्याचं आ णि नंतरच्या घडामोडींचं तिखट मीठ चाट मसाला पाणीपुरी मसाला लावून वर्णन करणा र्‍या राष्ट्रवादी देशभक्त न्युज अँकर्स बद्दल काहीच का बरं बोलत नाहीत. दुसर्‍या एका धाग्यावर त्या बातम्यांपासून चार हात दूरच आहेत ही मंडळी.
बरखा, रविश, अभिसार इत्यादींचे फोन नंबर व्हायरल करून त्यांना सात्त्विक शुद्ध प्रेमळ मेसेजेस आणि फोन कॉल्स च्या अभिषेकात बुडवून टाकणा र्‍यांत इथलं कोणी आहे की नाही? कपिल मिश्रांनी तर अशा लोकांना धरून मारावं असं म्हटलंय आणि त्याविरोधात कारवाई करणार्‍या सरकारी नोकराला सस्पेंड केलं गेलंय.

बरखा, रविश, अभिसार इत्यादींचे फोन नंबर व्हायरल करून त्यांना सात्त्विक शुद्ध प्रेमळ मेसेजेस आणि फोन कॉल्स च्या अभिषेकात बुडवून टाकणा र्‍यांत इथलं कोणी आहे की नाही? कपिल मिश्रांनी तर अशा लोकांना धरून मारावं असं म्हटलंय आणि त्याविरोधात कारवाई करणार्‍या सरकारी नोकराला सस्पेंड केलं गेलंय.
>>>>

हा तद्दन मूर्खपणा आहे.
नोकराला सस्पेंड करणे हा नाही, त्या आधीचा. स्पष्ट केलेले बरे असते नाहीतर लोक काय वाटेल तो अर्थ काढतात.

एस एस अहलुवालिया हे केंद्रीय मंत्री आहेत ना ?
३०० जण मेले हे मोदी किंवा सरकारने कधीच म्हटले नाही असे म्हणताहेत ते. म्हणजे भक्त तोंडावर पडले तरी चालतील का ? निषेध म्हणून आता भक्तांनी बंड करावे आणि त्यांना पुरवण्यात आलेले साहीत्य कुठून आले हे जाहीर करून टाकावे. म्हणजे हे पण तोंडावर पडतील. बदला घ्या.

https://www.thehindu.com/news/national/ahluwalia-video-on-air-strike-cre...

भक्तांना शक्य झालं तर ते इथेच तीनशे लोकांना मारतील मॉब लिंचिंग करून. ते पाकिस्तानी अति रेकी नसले तरी काय झालं? देशद्रोही , गद्दार तर आहेत्च. अशा लोकांची यादी करण्याचं कामही चालू आहे.
मायबोलीवरही इम्रानचे फॅन्स, पाकिस्तान समर्थक देशद्रोही, इथले उंदिर अशी सर्टफुकटं खिरापतीसारखी वाटली जातातच.

{सेनाधिकारी आणि सैनिकांना भडकवण्याचा प्रयत्न करताना महान पत्रकार रविश कुमार.}
याच्याबरोबर स्क्रीनशॉट आहे. म्हणजे हे फॉर्वर्ड/ शेअर असणार.
मूळ लिंक पाहिली असती, तर तो नक्की काय म्हणाला ते ऐकलं असतं.
आता सांगा, आम्ही तर फॉर्वर्ड्सवर अजिबात विश्वास ठेवत नाही.

मुगाची उसळ, डोसे, कढण, लाडू असे अनेक पदार्थ होतात.

पुलवामा हल्ला(षडयंत्र ) व्हायच्या आधी रा. रा. श्री. प्रधानसेवक काही दिवस आधी श्रीनगर मध्ये होते. तिथे त्यांनी मोठा विस्तार असलेल्या दलसरोवरात काही काळ त्यांचा बहुमूल्य वेळ व्यतीत केला. त्यावेळी तिथं एक गम्मत झाली ती मुम्बैभूषण शेटजी यांच्याच वृत्तवाहिनीने दिली आहे ती लिंक खाली पहा . चांगली करमणूक होईल
https://www.news18.com/news/buzz/people-left-puzzled-after-pm-waves-at-e...

https://www.youtube.com/watch?v=cx6lpHS4ReE
https://www.youtube.com/watch?v=2wOnxTlBBAE
https://www.youtube.com/watch?v=NhZC3DgtHYc
https://www.youtube.com/watch?v=YJTc7a9d2DA

आणि मोदीविरोधात काहीही बोलायला भाटांना कसलेही निमित्त पुरते हे हजारो वेळा सिद्ध झाले आहे.
नवीन Submitted by रिव्हर्स स्वीप on 2 March, 2019 - 23:34

~ ठोकून देतो ऐसा जे.... Rofl

जरा हे हजारो वेळा सिद्ध झालेले सिद्ध करता का? कि मनाला येईल ते ठोकून मोकळं व्हायचं?

तरी बरे Bw मोदिजि आपल्या सोताच्या तोंडाणे सगळं बोललेलं व्हिडीओसकट अनकट उपलब्ध असतं. मोदीविरोधात बोलायला अजिबात काहीही खोटेपणा करायची गरज नसते ना काही ट्विस्ट करायची गरज असते. सारवासारव तर मोदीभक्तांना संसदेत तोंड खाली पाडून करावी लागते हे सगळ्या जगाने बघितले आहे.

सगळ्यांनी मिळून सगळ्या वृत्त वाहिन्यांवर बहिष्कार घालावा. Trp नाही मिळाला तर वाहिन्या बदलतील.

आणि हे जगभर सर्वत्र कमी अधिक प्रमाणात आहे. कालच्या न्यूझीलंड हत्याकांडाचा विडिओ वाहिन्यांवरून व सोशल मिडियावरून काढून टाकण्यासाठी इतके प्रयत्न होऊनही तो विडिओ परत परत शेअर होत होताच.

परवा क्राईस्टचर्च येथे झालेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर आपल्याकडील पत्रकारितेतील भडकपणा परत एकदा ठळकपणे जाणवला.
एव्हढया मोठया प्रमाणावर जिवीतहानी होऊनही एकाही पत्रकाराची जिवाच्या आकांताने ओरडून ओरडून बाईट घेण्याची क्लिप किंवा रक्तरंजीतपणा दिसला नाही. पंतप्रधानाना किंवा सत्तेत असलेल्या पक्षाला वाटेल ते बोल लावण्याची चढाओढही दिसली नाही.

हत्याकांडाचा विडिओ वाहिन्यांवरून व सोशल मिडियावरून काढून टाकण्यासाठी इतके प्रयत्न होऊनही तो विडिओ परत परत शेअर होत होताच.>>> मी जी बातमी वाचली त्यात तो विडिओ नव्हता किंवा कोणत्याही TV चॅनेलवर ती क्लिप दाखवली नाही पण फेसबुकवर मात्र ती क्लिप दिसत होती.

आज शेतकऱ्यांचा देशव्यापी भारतबंद आहे. ndtv सोडला तर एकाही प्रमुख राष्ट्रीय न्युजचॅनेलनी शेतकऱ्यांच्या बातम्या कव्हर केल्या नाहीत Sad
यूटुबरवर प्रमुख वाहिन्यांच्या चॅनेलवर जाऊन पाहिल्यास लगेच लक्षात येईल. शेतकरी सोडून बाकी सगळा रोजचा भिकार माल भरलेला दिसेल. हो... या विधेयकावरून विरोधकांवर केलेली टीका मात्र आवर्जून दिलेली सापडेल. फक्त शेतकऱ्यांचे वावडे आहे यांना.

Pages