भारतीय वाहीन्या आणि निवेदकांचा विश्वविजय

Submitted by थॅनोस आपटे on 1 March, 2019 - 11:17

नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान सामन्या मधे भारतीय माध्यमांनी आदर्श वस्तुनिष्ठ बातमीपत्र म्हणजे काय असते याचे वस्तुपाठच जगाला घालून दिले आहेत. या वाहीन्यांचा अभ्यास आता जागतिक स्तरावर चालू आहे असे समजते. युद्धाचे रिपोर्टिंग कसे करावे याबाबत फॉक्स टीव्ही मधे भारतीय माध्यमाचे दाखले दिले जात आहेत. सीएनएन ने सर्व वाताहरांना भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. बीबीसी या वाहीनीची तर भारतीय माध्यमांनी केलेल्या शोधपत्रकारीतेने लाजच गेली आहे. खालील वाहीन्या / निवेदक यांची थोडक्यात वैशिष्ट्ये

झी वाहिनी - ही वाहिनी नि:स्पृह आणि तडफदार वृत्तांकन आणि रिपोर्ताज साठी प्रसिद्ध आहे. मोदी सरकार आल्यापासून या वाहीनीने त्यांच्या कारभारावर कडक वचक ठेवून विरोधकांची पोकळी भरून काढली आहे. या वाहीनीचे मुख्य संपादक सुधीर चौधरी हे एक कर्तव्यदक्ष पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहे. यांना सरकार पक्षाकडून त्यांच्या बाजूने रिपोर्टिंग करण्याची ऑफर धुडकावून त्यांनी आपले कर्तव्य चोख पार पाडल्याचे सांगितले जाते.

इंडिया टीव्ही - रजत कुमार नामक एक पत्रकार आहेत. जे जनता की अदालत चालवतात. त्यांच्याकडे न्यायबुद्धी असल्याने सर्वोच्च न्यायालयाने देखील या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाच्या वरचे न्यायालय अशी मान्यता दिलेली आहे. विशिष्ट लोकांना अडचणीचे प्रश्न आणि ठराविक लोकांना लाडे लाडे खोडे प्रश्न असे या वाहीनेने आजतागाय कधीही केलेले नाही. राजकारणाशिवाय या वाहीनीने शोधपत्रकारीतेत काही मानदंड स्थापित केले आहेत. जसे बजरंगबली श्रीलंकेत कुठे उतरले, रावण अजूनही कोणत्या गुहेत जिवंत आहे. हनुमान हिमालयात कोणत्या ठिकाणी अद्याप आहे अशा काही अविश्वसनीय गोष्टींवर तितकीच अविश्वसनीय शोधपत्रकारिता करून त्यांनी जगाला स्तिमित केलेले आहे.

रिपब्लिक टीव्ही - अर्णब गोस्वामी या भारतातील सर्वात शांत आणि मृदू स्वभावाच्या व्यक्तीकडे या वाहीनीचे सर्वाधिकार आहे. या वाहीनीचे वैशिष्ट्य म्हणजे डिबेट मधे असलेली शिस्त आणि शांतता. प्रश्न विचारल्यानंतर समोरच्याला वेळ देणे, त्याला विचार करता यावा म्हणून मधे मधे न टोकणे या बाबी या वाहीनीवर कसोशीने पाळल्या जातात. उगीच गोंधळ करणारे ग्रॅण्डमास्टर शिफू वगैरे सारखे लोक या वाहीनीवर औषधालाही दिसत नाहीत. सरकारच्या कामाचा आढावा घेणे, त्रुटी असतील तर त्यावर विशेष कार्यक्रम घेणे, मोदींना अडचणीचे प्रश्न विचारणे या साठी ही वाहीनी प्रसिद्ध आहे. मीडीया नेहमी विरोधी पक्षात असतो हे अर्णब चे म्हणणे तर दर्शकांच्या डोळ्यात पाणी आणते. सरकार पक्ष सोडून विरोधकांच्या मागे लागणे या वाहीनीकडून कधीही झालेले नाही.

एनडीटीव्ही - रवीशकुमार नावाचे पाकिस्तानी अँकर या वाहीनीचे संपादक आहेत. प्रणव रॉय या देशद्रोही इसमाकडून ही वाहीनी चालवली जाते. त्यामुळे देशाच्या विरोधात कारस्थाने करण्यासाठी ही वाहिनी कुप्रसिद्ध आहे. युद्धाच्या दरम्यान सर्व वाहीन्यांनी पाकिस्तानवर आक्रमण करून इम्रानखान यांना भयभीत केले असताना ही वाहिनी देशातल्या जनतेला शांततेचं आवाहन करून त्यांचा निर्णय डळमळीत करू पाहत होती.
इतर वाहीन्यांचे अँकर्स स्वतः मिग २१ , मिराज आदी विमाने घेऊन बाँब टाकण्यासाठी गेले असताना ही वाहिनी पुलवामा हमला कुणी केला याबद्दल शंका घेत होती. इतर वाहीन्यांच्या अँकर्सनी स्वतः बाँब टाकून त्या प्रकाशात मृतांची संख्या मोजली असतानाही ही वाहीनी मात्र कुठे आहे प्रेतं असे निर्लज्ज प्रश्न विचारत होती.

सरतेशेवटी इतर सर्व वाहीन्यांचा जय झाला आणि त्यांच्या भयाने इम्रानखान यांनी भयकंपित होऊन भारताचा एक पायलट सोडून दिला. केवळ तेच विमान पायलटने चालवल्याने तो सापडला. जेव्हढी विमाने अँकर्सनी उडवली त्यात भारताला यश आले.

सीएनएनव आणि बीबीसी या वाहीन्यांनी बाँब जंगलात पडले असे खोटे दावे केले. त्यासाठी पाकिस्तानातल्या स्थानिकांच्या मुलाखती घेतल्या. आता पाकिस्तानीच ते. ते काय खरं बोलणार आहेत का ?
एक हजार किलोचा बाँब पडल्यावर प्रेतं काय राहणार आहेत का ? त्यांची वाफ झाली वाफ !!
आज भारतीय वाहीन्यांनी हे सर्व जगासमोर आणलेलं असल्याने सीएनएनची णाचक्की झालेली आहे. बीबीसी भारतातले कार्यालय बंद करण्याच्या विचारात आहे.

भारतीय वाहीन्यांचे अभिनंदन !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथेही कोठे चर्चा दिसली नाही निदान कालपर्यंत. भारतीय मीडिया मधे जी माहिती वाचली त्यावरून सध्या तरी इतकेच माहीत आहे:
- ते तीन कायदे व त्याची प्राथमिक माहिती.
- यातून शेतकर्‍यांना होणारे फायदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचा रोल कमी/नाहीसा करणे वगैरे.
- यातून होउ शकणारे नुकसान, मोठ्या कंपन्यांकडून शेतकर्‍यांना असलेला रिस्क. बहुधा हेच सर्वात मोठे विरोधाचे कारण आहे.
- आत्ता विरोध करणार्‍या काँग्रेस च्या निवडणूक जाहीरनाम्यामधे साधारण हीच आश्वासने होती. शिरोमणी अकाली दलानेही आधी असे प्रयत्न केले होते.

हे साधारण इतके वाचले आहे आत्तापर्यंत. बर्‍याच सोशल नेटवर्क वरील वादांत मात्र यात खोल न शिरता लोक लगेच पार्टी लाइन्स वर तेच तेच वाद घालू लागले आहेत, त्यामुळे यापुढे फारसे समजले नाही.

देशाची प्रगती हि जनता कोणत्या विषयाला महत्व देत आहे आणि कोणत्या विषयावर चर्चा करते यावर अवलंबून असते.
Indians must decide they want to discuss GDP, employment, economics,welfare of formers and MSME or distracted news/entertainment news.

देशाची प्रगती हि जनता कोणत्या विषयाला महत्व देत आहे आणि कोणत्या विषयावर चर्चा करते यावर अवलंबून असते. >> वेल सेड!
आपण शेतीकायदा संदर्भातल्या तीन विधेयकांसदर्भात आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी हिवाळी अधिवेशनात केलेल्या अभूतपूर्व चर्चेचे प्रक्षेपण आणि त्या संदर्भातल्या बातम्या मायबोली वगैरे कमी महत्वाचे विषय बाजुला ठेऊन टीवी समोर ठाण मांडून बघितल्या पाहिजेत आणि त्यावर चर्चा केली पाहिजे.
तुम्ही GDP, employment, economics, welfare of farmers and MSME ह्या संदर्भात ईथे एकेक धागा काढला तर चर्चा करायला आवडेल. चर्चा करून आपण सगळे देशाच्या प्रगतीला हातभार लाऊयात. जय हिंद, जय महाराष्ट्र!

चर्चा करून आपण सगळे देशाच्या प्रगतीला हातभार लाऊयात.

Discussion on important topics is the first step to understand each other's perspective, pros and cons of each idea with respect.
This adds value to the individual, society and country.

माझी एक शंका आहे..
फक्त महाराष्ट्रातच 'जय हिंद जय महाराष्ट्र' असं का बोलले जाते?
Of course we love our state and country but if every state start chanting JAI (their state),how we can unite as indians?
मला नाही वाटत दुसरे राज्य असे जय जय बोलत असतील बट स्टील दे लव देअर स्टेट ना?

नवीन Submitted by mrunali.samad on 25 September, 2020 - 13:36 >> Couldn't agree more. Please take the first step and open a forum for discussion.

फक्त महाराष्ट्रातच 'जय हिंद जय महाराष्ट्र' असं का बोलले जाते? >> माफ करा..चूक झाली.
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्व वंदिता महाराष्ट्रस्य राज्यस्य मुद्रा भद्राय राजते, असे पूर्ण म्हणायला पाहिजे. बाकी राज्यातील लोक 'सत्यमेव जयते' असे काहीतरी म्हणतात. त्याचा काय अर्थ आहे माहित नाही. हे प्रत्येक राज्याने अंगिकारलेले प्रांतीय प्रतीक आहे, मात्र प्रांतीय अस्मितेच्या जपणुकीतून प्रांतवाद फोफावत असेल तर त्यावर चर्चा करून आपण ते थांबवले पाहिजे.

त्या सर्व्हेनुसार काँग्रेस , एम आय एम , नॅशनल कॉन्फरस चे मतदार देखील एन डी टीव्ही बघत नाहीत ?
खूपच वाईट ट्रेंड पडतोय Happy

Pages