भारतीय वाहीन्या आणि निवेदकांचा विश्वविजय

Submitted by थॅनोस आपटे on 1 March, 2019 - 11:17

नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान सामन्या मधे भारतीय माध्यमांनी आदर्श वस्तुनिष्ठ बातमीपत्र म्हणजे काय असते याचे वस्तुपाठच जगाला घालून दिले आहेत. या वाहीन्यांचा अभ्यास आता जागतिक स्तरावर चालू आहे असे समजते. युद्धाचे रिपोर्टिंग कसे करावे याबाबत फॉक्स टीव्ही मधे भारतीय माध्यमाचे दाखले दिले जात आहेत. सीएनएन ने सर्व वाताहरांना भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. बीबीसी या वाहीनीची तर भारतीय माध्यमांनी केलेल्या शोधपत्रकारीतेने लाजच गेली आहे. खालील वाहीन्या / निवेदक यांची थोडक्यात वैशिष्ट्ये

झी वाहिनी - ही वाहिनी नि:स्पृह आणि तडफदार वृत्तांकन आणि रिपोर्ताज साठी प्रसिद्ध आहे. मोदी सरकार आल्यापासून या वाहीनीने त्यांच्या कारभारावर कडक वचक ठेवून विरोधकांची पोकळी भरून काढली आहे. या वाहीनीचे मुख्य संपादक सुधीर चौधरी हे एक कर्तव्यदक्ष पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहे. यांना सरकार पक्षाकडून त्यांच्या बाजूने रिपोर्टिंग करण्याची ऑफर धुडकावून त्यांनी आपले कर्तव्य चोख पार पाडल्याचे सांगितले जाते.

इंडिया टीव्ही - रजत कुमार नामक एक पत्रकार आहेत. जे जनता की अदालत चालवतात. त्यांच्याकडे न्यायबुद्धी असल्याने सर्वोच्च न्यायालयाने देखील या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाच्या वरचे न्यायालय अशी मान्यता दिलेली आहे. विशिष्ट लोकांना अडचणीचे प्रश्न आणि ठराविक लोकांना लाडे लाडे खोडे प्रश्न असे या वाहीनेने आजतागाय कधीही केलेले नाही. राजकारणाशिवाय या वाहीनीने शोधपत्रकारीतेत काही मानदंड स्थापित केले आहेत. जसे बजरंगबली श्रीलंकेत कुठे उतरले, रावण अजूनही कोणत्या गुहेत जिवंत आहे. हनुमान हिमालयात कोणत्या ठिकाणी अद्याप आहे अशा काही अविश्वसनीय गोष्टींवर तितकीच अविश्वसनीय शोधपत्रकारिता करून त्यांनी जगाला स्तिमित केलेले आहे.

रिपब्लिक टीव्ही - अर्णब गोस्वामी या भारतातील सर्वात शांत आणि मृदू स्वभावाच्या व्यक्तीकडे या वाहीनीचे सर्वाधिकार आहे. या वाहीनीचे वैशिष्ट्य म्हणजे डिबेट मधे असलेली शिस्त आणि शांतता. प्रश्न विचारल्यानंतर समोरच्याला वेळ देणे, त्याला विचार करता यावा म्हणून मधे मधे न टोकणे या बाबी या वाहीनीवर कसोशीने पाळल्या जातात. उगीच गोंधळ करणारे ग्रॅण्डमास्टर शिफू वगैरे सारखे लोक या वाहीनीवर औषधालाही दिसत नाहीत. सरकारच्या कामाचा आढावा घेणे, त्रुटी असतील तर त्यावर विशेष कार्यक्रम घेणे, मोदींना अडचणीचे प्रश्न विचारणे या साठी ही वाहीनी प्रसिद्ध आहे. मीडीया नेहमी विरोधी पक्षात असतो हे अर्णब चे म्हणणे तर दर्शकांच्या डोळ्यात पाणी आणते. सरकार पक्ष सोडून विरोधकांच्या मागे लागणे या वाहीनीकडून कधीही झालेले नाही.

एनडीटीव्ही - रवीशकुमार नावाचे पाकिस्तानी अँकर या वाहीनीचे संपादक आहेत. प्रणव रॉय या देशद्रोही इसमाकडून ही वाहीनी चालवली जाते. त्यामुळे देशाच्या विरोधात कारस्थाने करण्यासाठी ही वाहिनी कुप्रसिद्ध आहे. युद्धाच्या दरम्यान सर्व वाहीन्यांनी पाकिस्तानवर आक्रमण करून इम्रानखान यांना भयभीत केले असताना ही वाहिनी देशातल्या जनतेला शांततेचं आवाहन करून त्यांचा निर्णय डळमळीत करू पाहत होती.
इतर वाहीन्यांचे अँकर्स स्वतः मिग २१ , मिराज आदी विमाने घेऊन बाँब टाकण्यासाठी गेले असताना ही वाहिनी पुलवामा हमला कुणी केला याबद्दल शंका घेत होती. इतर वाहीन्यांच्या अँकर्सनी स्वतः बाँब टाकून त्या प्रकाशात मृतांची संख्या मोजली असतानाही ही वाहीनी मात्र कुठे आहे प्रेतं असे निर्लज्ज प्रश्न विचारत होती.

सरतेशेवटी इतर सर्व वाहीन्यांचा जय झाला आणि त्यांच्या भयाने इम्रानखान यांनी भयकंपित होऊन भारताचा एक पायलट सोडून दिला. केवळ तेच विमान पायलटने चालवल्याने तो सापडला. जेव्हढी विमाने अँकर्सनी उडवली त्यात भारताला यश आले.

सीएनएनव आणि बीबीसी या वाहीन्यांनी बाँब जंगलात पडले असे खोटे दावे केले. त्यासाठी पाकिस्तानातल्या स्थानिकांच्या मुलाखती घेतल्या. आता पाकिस्तानीच ते. ते काय खरं बोलणार आहेत का ?
एक हजार किलोचा बाँब पडल्यावर प्रेतं काय राहणार आहेत का ? त्यांची वाफ झाली वाफ !!
आज भारतीय वाहीन्यांनी हे सर्व जगासमोर आणलेलं असल्याने सीएनएनची णाचक्की झालेली आहे. बीबीसी भारतातले कार्यालय बंद करण्याच्या विचारात आहे.

भारतीय वाहीन्यांचे अभिनंदन !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आततायी, बेजबाबदार आणि अतिशय बेताल अशा भारतीय मिडीयाबद्दल अतिशय स्ट्रिक्ट अ‍ॅक्शन घ्यायची गरज आहे. वॉअ‍ॅवर अभिनंदन ह्यांच्या रहात्या घराच्या पत्त्यावरुन जो फॉर्वर्ड फिरत होता तो खराच असेल तर ते चॅनल आणि त्यांचे रिपोर्टर्स ह्यांना ठोकायला हवं जेणेकतुन बाकीच्या उत्साही वीरांना जरब बसेल.

श्री रवीश कुमार यांच्या नई सडक या ब्लॉग वरील पोस्टचा त्यांच्याच आवाहनानुसार पुढे सरकावण्याचा प्रयत्न -

ढाई महीने तक कोई भी न्यूज़ चैनल न देखने की मेरी अपील का मराठी अनुवाद। हमारे मित् परिमल ढवळेकरने किया है।

तुम्ही पुढचे अडीच महिने वृत्तवाहिन्या पाहणं बंद करु शकत नाहीत ?
पाहणं टाळाचं !
- रवीश कुमार.

जर तुम्हाला नागरिकता टिकवायची असेल.. लोकशाहीत जबाबदार नागरिकाची भूमिका बजावायची असेल.. तुमच्या मुलांना धार्मिक उन्मादापासून वाचवायचं असेल.. आणि महत्वाचं म्हणजे भारतातली पत्रकारिता जिवंत ठेवायची असेल, तर तुम्ही वृत्तवाहिन्या पाहणं बंद करा. वृत्तवाहिन्या पाहणं म्हणजे स्वतःचं अधोगती करुन घेतल्यासारखं आहे. कृपया हे करणं टाळा.

पत्रकारितेसाठी नाही तर स्वतःला वाचवण्यासाठी वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्या दोन्ही पाहणं बंद करा. मी तुम्हाला विनंती करतोय कि तुम्ही तुमच्या दैनंदिन व्यवहारातून टिव्हीला ह्द्दपार करा. अपवादासाठी पण, टिव्ही मोबाइलवर देखील पाहू नका. एकवेळ टिव्हीवर मला पण पाहणं बंद करा. पण, वृत्तवाहिन्यांच्या आहारी जाणं थांबवा.

मला माहिती आहे कि इतक्या सहजतेनं तुम्ही टिव्हीच्या व्यसनातून बाहेर पडणार नाहीत. तरीही मी तुम्हाला बंद करण्याचं परत आवाहन करतोय. तुम्ही आता जे वाहिन्यांवर पाहत आहात ते पहिल्यांदाच होतंय असं नाही, तर हे सात्तत्यानं होत आलंय. हा उन्माद आहे. जेंव्हा पाकिस्तानबरोबर तणाव नसतो तेंव्हा मंदिराचा प्रश्न उपस्थित करुन वाहिन्या तणावाची परिस्थिती निर्माण करत असतात. जेंव्हा मंदिराचा प्रश्न नसतो तेंव्हा हिंदु-मुस्लिम विषयावर तणाव निर्माण करतात. तर कधी पद्मावत चित्रपटावर तणाव निर्माण केला जातो. आणि जेंव्हा हाती काहीच नसतं तेंव्हा वृत्तवाहिन्या खोटे सर्वे करत तासनतास त्यावर चर्चेचं रतीब घालतात. ज्याचा काहीच उपयोग होत नाही.

तुम्हाला माहितीये हे सगळं का होतंय ? माध्यमांतला जनतेचा आवाज तुम्ही ऐकलात कधी ? माध्यमांनी सामान्य जनतेचं प्रतिनिधीत्व करणं केंव्हाच सोडून दिलंय. त्यांचा आवाज दाबला गेलाय. माध्यमं स्वतःच प्रश्न निर्माण करत ते जनतेचे प्रश्न म्हणून मांडत आहेत. ही इतकी पण छोटी गोष्ट नाही कि सामान्य दर्शक हे समजू शकणार नाही. तरुणांचे प्रश्न माध्यमं लावून धरत नाहीत तर माध्यमांचे प्रश्न तरुणांवर थोपले जातात आणि त्यांना मुर्खात काढलं जातं. माध्यमांसाठी हे प्रश्न कुठून येतात हे तुम्हाला माहित असायला हवं. कारण माध्यमं जेंव्हा अशा गोष्टी सातत्यानं करत असतात तेंव्हा त्यातून एका नेत्यासाठी रस्ता बनत असतो. ज्यांचं नाव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी.

वृत्तवाहिन्या, सरकार, भाजप आणि मोदी यांची युती झालीये. ही युती इतकी घट्ट आहे कि, तुम्ही पत्रकारिता आणि प्रचारतंत्र याचा फरक स्पष्ट करु शकणार नाहीत. तुम्ही एका नेत्याला पसंत करता. हे स्वाभाविक आणि एका मर्यादेपर्यंत गरजेचं पण आहे. पण, ह्या पसंतीचा फायदा उठवत जे केलं जात आहे ते फार घातक आहे. भाजपच्या जबाबदार कार्यकर्त्यासाठी पण ख-या माहितीची गरज आहे. सरकार आणि मोदींच्या भक्तीत प्रचारतंत्र राबवणं हा त्या कार्यकर्त्याचा अपमान आहे. त्या कार्यकर्त्याला मुर्खात काढलं जातंय कारण त्याच्या समोर पर्यायचं तसे निर्माण केले जात आहेत. माध्यमं ह्या सामान्य नागरिकांपेक्षा भाजप कार्यकर्त्यांचा जास्त अपमान करत आहेत.

मी भाजपच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो कि तुम्ही वृत्तवाहिन्या पाहणं बंद करा. भारतीय लोकशाहीच्या विनाशामध्ये सामिल होवू नका. तुम्ही वृत्तवाहिन्याही न पाहता नरेंद्र मोदी यांचं समर्थन करु शकत नाहीत ? हे जरुरीचं नाही कि नरेंद्र मोदी यांच्या समर्थनासाठी पत्रकारितेच्या अवमुल्यनाचं समर्थन केलं पाहिजे ? नसेल तर तुम्ही इमानदार राजकिय समर्थक नाही आहात ? पत्रकारितेचे दंडक पाळत नरेंद्र मोदी यांचं समर्थन करणं अवघड झालंय ? मोदींचे समर्थक होण्यासाठी माध्यमांचं प्रचारतंत्र आणि हा उन्माद गरजेचा आहे ? भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपला निवडलं होतं, या माध्यमांना नाही. तुम्ही पक्षासाठी जीव देताल. पण, ही माध्यमं संधीसाधु आहेत. माध्यमांचं अवमुल्यन हे राजकारणाचं आणि एका चांगल्या कार्यकर्त्याचं पण अवमुल्यन आहे.

मी देशातल्या सर्वच जबाबदार नागरिकांना विनंती करतो कि, तुम्ही वृत्तवाहिन्या पाहणं बंद करा. कारण, ते तुमच्या नगरिकतेवर हल्ला करत आहेत. लोकशाहीत नागरिक हा हवेत नसतो. एका भौगोलिक प्रदेशात जन्मल्यानं फक्त तुम्ही नागरिक होत नसतात तर योग्य माहिती आणि योग्य प्रश्न उपस्थित करणं तुमच्या नागरिकतेसाठी गरजेचे असतात. प्रधानमंत्री मोदी या अशा पत्रकारितेचे पालक आहेत. संरक्षक आहेत. त्यांच्या भक्तीमध्ये वाहिन्यांनी स्वतःला विदुषक बनवून घेतलं आहे. तुमचं स्वतःचं विदुषक बनणं लोकशाहीला संपवल्यासारखं आहे. नागरिकांना माहिती पाहिजे,संयम हवा आहे.आणि सुचनेला समजून घेण्यासाठी वेळही !

भारत-पाकिस्तान तणावामुळे वाहिन्यांना राष्ट्रभक्त होण्याची संधी मिळली आहे. वाहिन्यांची देशाप्रती काही भक्ती नाहीये. यांची भक्तीच जर खरी असती तर, यांनी लोकशाहीचं महत्वपुर्ण अंग असलेल्या पत्रकारितेचे मुल्य सांभाळत ती केली असती. वाहिन्यांकडून भारताचं जसं चित्र उभं केलं जात आहे,तसं चित्र तुमच्या मनात नाहीये.तर ते उभं केलं जात आहे. आपल्या सगळ्यांच्या मनातला भारत हा नाही. हा खोटा भारत आहे. देशाविषयी असलेलं प्रेम दर्शवणं म्हणजे आपल्या हाती असलेलं काम मुल्याधिष्ठीत आणि आदर्शांना डोळ्यासमोर ठेवत केलं पाहिजे. तुमच्या देशभक्तीच्या जागी या वाहिन्या कुणा दुस-याच्या सांगण्यावरुन खोट्या देशभक्तीचा प्रसार करत आहेत.या वाहिन्यांची आता इथंवर मजल आलिये कि, खोटी माहिती, चित्र-विचित्र घोषणा आणि विश्लेषणं वापरत तुमची देशभक्ती सिध्द केली जात आहे. तुमच्या आतल्या प्राकृतिक वाहिन्यांना नष्ट करत या वृत्त वाहिन्यांना कृत्रिम वाहिन्या बनवायचं आहे. जेणेकरुन तुम्ही एक मृतप्राय रोबोट बनून जाताल.

सध्या वर्तमानपत्र आणि वाहिन्या तुमची नागरिकता आणि त्यांचे अधिकार नष्ट करण्यावर बसली आहे. तुम्हाला हे लक्षात यायला हवं कि, हे होणार नाही तर हे झालं आहे. वर्तमानपत्रांची परिस्थिती पण सारखीच आहे. हिंदी वर्तमानपत्रांनी तर मान केंव्हाच टाकली आहे. या वर्तमानपत्रांची पानं जर तुम्ही बारकाइनं पाहिली तर ती खोट्या आणि तकलादु माहितीच्या आधारावर वाचकांची दिशाभूल करताना दिसतील. ही वर्तमानपत्रं घराबाहेर फेकुन द्या.. एक दिवस अलार्म लावून लवकर झोपेतून उठा... आणि वर्तमानपत्र वाटणा-या मित्राला सांगा, ' आता निवडणुकीनंतर वर्तमानपत्र दे '.

योग्य माहितीच्या आधारावर तुम्ही सक्षम नागरिक बनावं हे या सरकारच्या मनात नाहीये. वाहिन्यांनी विरोधी पक्षाची भूमिका मांडणं तर केंव्हाचं सोडलं आहे. जर तुमच्या आत सरकारचा विरोधक नीट बनला नाही तर तुम्ही नीट समर्थक पण बनणार नाहीत. जागेपणानं सरकारचं समर्थन करणं आणि नशेचं इंजेक्शन घेत समर्थन करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहिल्यामध्ये तुमचा स्वाभिमान दिसतो तर
दुस-यामध्ये तुमचा अपमान. तुम्ही स्वाभिमान गहाण ठेवत या वृत्तवाहिन्या पाहत सरकारचं समर्थन करु पाहत आहात काय ?

मला हे निश्चित माहिती आहे कि माझं म्हणनं कोट्यावधी लोकांपर्यंत पोहचलं जाणार नाही आणि तरिही कोट्यावधी लोक वृत्तवाहिन्या पाहणं बंद करणार नाहीत. तरीही मी तुम्हाला पूर्वसुचना देतोय कि, अशाच पध्दतीची पत्रकारिता वाहिन्यांकडून चालत राहिली तर भारतीय लोकशाहीचं भविष्य हे उज्वल असणार नाही. वृत्तवाहिन्यांनी एक अशा प्रकारचा समुह निर्माण केला आहे कि ज्याचा आधार हा खोटी आणि मर्यादित माहिती हा आहे. वाहिन्याद्वारे बनवलेल्या या समुहाद्वारे माहितीची खरी गरज असलेल्या समुहाला म्हणजे ज्यांच्याजवळ स्वतःचे प्रश्न आहेत त्यांना. तो समुह पराजित करत आहे. प्रश्न आणि माहितीविना लोकशाही आणि जागरुक नागरिक बनत नाही.

सत्य आणि तथ्य यांची शक्यता केंव्हाच समात्म केली गेली आहे. मी रोज जनतेला नाकारलेलं पाहतोय. या राजकिय वावटळीत असे कितीतरी प्रश्न मुख्य प्रवाहापासून दूर नेले जात आहेत. राजकिय पक्षांच्या व्यतिरिक्त अनेक विषय माध्यमांची वाट पाहत आहेत. वाहिन्या आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना इतर जनतेच्या विरुध्द उभा करत आहेत. तुमचा पराजय हा वाहिन्यांचा विजय आहे. वाहिन्यांच्या प्रभावातून बाहेर येणं हे आता इतकं सहज शक्य नाहीये. तुम्ही एक प्रेक्षक आहात.. एका नेत्याच्या समर्थनासाठी पत्रकारितेच्या अवमुल्यनाचं समर्थन करु नका.. फक्त अडिच महिन्यांचा प्रश्न आहे.. वृत्तवाहिन्या पाहणं बंद करा !

मराठी चॅनेल वर पण एवढ्यात सतत सरकारी लाभार्थ्यांची आत्मकथने आहेत. या जाहिराती आहेत हेच बऱ्याच लोकांना कळत नाही . ते बिचारे आपले बातम्या म्हणून पाहत राहतात . मी ग्रामीण-निमशहरी भागाबद्दल बोलतोय .

तुम्ही पुढचे अडीच महिने वृत्तवाहिन्या पाहणं बंद करु शकत नाहीत ?
पाहणं टाळाचं !
- रवीश कुमार.

>>

या वृत्तवाहिन्यात त्यांनी स्वतःच चॅनलसुध्दा पकडलंय का ?

किती ओळी वाचून प्रश्न विचारताय ? >>

एकूण एक.

१) तुम्हाला माहितीये हे सगळं का होतंय ? माध्यमांतला जनतेचा आवाज तुम्ही ऐकलात कधी ? माध्यमांनी सामान्य जनतेचं प्रतिनिधीत्व करणं केंव्हाच सोडून दिलंय. त्यांचा आवाज दाबला गेलाय. >> हे सगळं रवीश कुठल्या माध्यमातून बोलताहेत ? एका वृत्तपत्रातून किंवा व्हिडिओतूनच ना ? त्यांना जसा स्वतःच मत व्यक्त करायचा अधिकार आहे तसा दुसऱ्यांना त्यांना आवडेल ते पाहायचा अधिकार आहे.

२) वृत्तवाहिन्या, सरकार, भाजप आणि मोदी यांची युती झालीये. ही युती इतकी घट्ट आहे कि, तुम्ही पत्रकारिता आणि प्रचारतंत्र याचा फरक स्पष्ट करु शकणार नाहीत. तुम्ही एका नेत्याला पसंत करता. हे स्वाभाविक आणि एका मर्यादेपर्यंत गरजेचं पण आहे. पण, ह्या पसंतीचा फायदा उठवत जे केलं जात आहे ते फार घातक आहे. भाजपच्या जबाबदार कार्यकर्त्यासाठी पण ख-या माहितीची गरज आहे.>>
जर मीडियात सांगितलेल्या सगळ्याच बातम्या खोट्या आहेत, तर मग खऱ्या बातम्या आहेत कुठे ? याच मीडियातून केलेलं रवीश यांचं हे वक्तव्य तरी आम्ही कसं खरं मानायचं ?

३) सध्या वर्तमानपत्र आणि वाहिन्या तुमची नागरिकता आणि त्यांचे अधिकार नष्ट करण्यावर बसली आहे. >> हे ठरवणारे रवीश कोण ?

भले ते खरं बोलत असतील, पण मग त्यांनी ते खोटं खोडून काढावं. पण बोलणाऱ्याचा आवाजच ऐकू नका असं कसं म्हणू शकतात ? आवाज दाबायची हि कुठली नवी पद्धत ? सगळे आवाज दाबण्याचा नादात खरंसुद्धा दाबलं जाईलच की. ओल्याबरोबर सुकंही जळतं. आज जसा न्याय दुसऱ्या वाहिन्यांना त्यांनी लावलाय, तोच ते स्वतःच्या वहिनीला लावतील का ? या वृत्तपत्र, अन न्यूजचॅनल बंदीची सुरुवात ते स्वतःच चॅनल बंद करून करतील का ?

४) कारण माध्यमं जेंव्हा अशा गोष्टी सातत्यानं करत असतात तेंव्हा त्यातून एका नेत्यासाठी रस्ता बनत असतो. ज्यांचं नाव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. >>
रवीश नक्की काय समजतात जनतेला ? अक्कल नसलेली मेंढरांची जमात ? की चॅनलवर जे दाखवलंय ते खरंच आहे मानून चालणारी ?
आजवरचा अनुभव आहे जनतेने मी मी म्हणणाऱ्यांना मतपेटीतून घरचा रस्ता दाखवलाय. काल कांग्रेस होती , उद्या भाजप असेल. रवीश महाशयांसारखी बुद्धी नसेल जनतेत, पण त्यांना वाटते तितकी दूधखुळीहि नाही.

ज्या लोकशाहीची भलामण करताना रविशनी आपलं आयुष्य खर्ची घातलं, त्या लोकशाहीत प्रत्येक मताचा आदर केला जातो. मग दुसऱ्यांच्या मतावर इतका जळफळाट का ?

वाचलं. पण रवीश महशयांच बाकीच्या वाहिन्यांबद्दलच आवाहन लोकशाहीच्या आणि मुक्त पत्रकारितेच्या कुठल्या चौकटीत बसतं हे अजून तरी मला समजलेलं नाही. आता तुम्हीच समजावून द्या म्हणजे झालं.

पुन्हा पुन्हा एकदा वाचा...
प्रश्न बदलू नका. आपण जो प्रश्न विचारतो त्यासाठी नीट वाचता येते का एव्हढाच इश्यू आहे. तुम्हाला पडलेल्या नव्या प्रश्नांची आणि कुतर्कांची उत्तरे द्यायला इथे कुणी बांधील का असेल ?

सैन्यातल्या अधिकार्‍यांना वरिष्ठांचे निर्णय पाळू नका असे भडकवणार्‍यास कायद्यानुसार काय शिक्षा आहे?
सैन्यातलाच अधिकारी असेल तर कोर्ट मार्शल होते हे माहित आहे.
सिव्हीलियनला काय शिक्षा देण्याची तरतूद आहे?
प्रश्न अस्थानी वाटत असला तरी नेमके उत्तर मिळाल्यावर इथे विचारण्याचे कारण सांगेन.

पुन्हा पुन्हा एकदा वाचा...
प्रश्न बदलू नका. आपण जो प्रश्न विचारतो त्यासाठी नीट वाचता येते का एव्हढाच इश्यू आहे.>>

रविशजी जनतेला कुठल्या अधिकाराने म्हणतात की बाकीच्या मीडिया पाहू नका? लोकांना जे आवडत ते पाहतील ते, मग एनडीटीव्ही असो नाहीतर आणखी काही.

असे आवाहन करण्याचा जितका अधिकार रवीशना आहे, तितकाच अधिकार लोकांना त्यांना पटेल ते पाहण्याचा आहे.

मला पडलेला साधा प्रश्न फक्त इतकाच की, ज्या मुक्त पत्रीकरितेमुळे ते आपली मते दुसऱ्यापुढे मांडतात, त्याच पत्रकारितेत दुसऱ्याच्या मतांकडे कानाडोळा करण्यासारखी उघड उघड मागणी कुठल्या आधारावर करतात? का त्यांच्या मुक्त पत्रकारितेत फक्त त्यांचीच मते येतात?

आता यात कु तर्क दिसत असेल तर तर्क काय ते तरी सांगा. (घाबरु नका, मी काही रविशसारख, तुमच्या म्हणणया कडे दुर्लक्ष करा, अस आवाहन करणार नाही. अजूनही (खऱ्या) मुक्त पत्रीकारितेवर माझा पूर्ण विश्वास आहे)

तुम्ही पुढचे अडीच महिने वृत्तवाहिन्या पाहणं बंद करु शकत नाहीत ?
पाहणं टाळाचं !
- रवीश कुमार.

>>

या वृत्तवाहिन्यात त्यांनी स्वतःच चॅनलसुध्दा पकडलंय का ?

Submitted by विलभ on 1 March, 2019 >>>>>>

ही तुमची पहिली पोस्ट. तुमचा पहिला प्रश्न (आता संपादीत करता येणार नाही) यासाठी पुन्हा पोस्ट वाचा. जोपर्यंत तुम्ही ती ओळ कोट करत नाही तोपर्यंत.
बाकीची बडबड नंतर

प्रश्न अस्थानी वाटत असला तरी नेमके उत्तर मिळाल्यावर >>>> प्रश्न अस्थानी आहे हे माहीत असताना इथे विचारण्याचे कारण काय ? मला कशासाठी विचारताय ? इथे प्रधानमंत्री अस्थानी नसणा-या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत तिथे माझं जे क्षेत्र नाही त्या क्षेत्रातला प्रश्न संबंध नसलेल्या धाग्यावर विचारून कारण नंतरस सांगण्याचे उपकार करणारे आपण अत्यंत दयाळू दिसताय.

दाऊदची जन्म तारीख काय हा पुढचा प्रश्न आहे काय ?

भारतीय मीडिया ज्या बातम्या देते त्या mature नसतात हे 100% सत्य आहे .
पण भारतीय मीडिया आत्ताच ( म्हणजे BJP sarkar आल्यापासून ) आशि वागते आहे तर हे स्वार्थी सत्य आहे त्यांच्या जन्मापासून त्या आशाचं वागत आहे .सत्ताधारी मंडळींची बाजू घेणे हे सरकारी जाहिराती मिळण्या साठी आणि बाकी फायद्यासाठी आवशक्या आसात उद्या दुसरा पक्ष सत्तेवर आला तर मीडिया त्यांचं गुण गायील .
पूर्वी सुधा aasach होत होते .
न्यूज chalwane हा ऐक धंधा आहे समाजकार्य म्हणून कोण करोडो रूपये खर्च करून चॅनल काढत नाही .ज्या बातम्या चांगल्या विकल्या जातात त्याच बातम्या दाखवल्या जातात .निःपक्ष बातम्या ना मार्केट नाही त्या मुळे त्या फंदात कोण्ही पडत नाही साधं सोप आहे सीएनएन ,bbc हे पण त्याच कॅटेगरी मधले आहे फक्त त्यांचा आवाका मोठा असल्या मुले आपली लक्षात येत नाही .
जनता पण तशीच सरकारी नोकरी लागली की पगार व्यतिरिक्त जास्त पैसे कमविणे आणि त्याच कारणासाठी नोकरीचा वापर करणे ,हेच ज्या जनतेच कार्य आहे ते चॅनल ल दोषी ठरवू शकत नाहीत शेवटी तो पण त्यांचा धंधा च आहे जे विकल जाईल तेच ते विकणार समाजकार्य करायला कोण्ही मोकळं नाही

२०१४च्या आधी अण्णांचे आंदोलन लाईव्ह दाखवणे म्हणजे सरकारी बाजू घेणे होते का ?
याच वाहीन्यांनी भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली होती की..

काँग्रेस कडे प्रतिभावान नेता नव्हता आणि काँग्रेस पुढे जिंकू शकणार नाही ह्याचा अंदाज धूर्त मंडळींना आला होता फक्त धोडा धक्का देणे गरजेचं होते त्यामुळे सर्वच जमा झाले आणि भवितव्याची तरतूद करून ठेवली आणि आण्णा केजरीवाल,आणि मंडळी ह्यांना डोक्यावर घेतलं .

तुम्हाला अपेक्षित असलेली response ch have असतील तर पोस्ट वरती लिहा समविचारी लोकांनीच रिस्पॉन्स द्यावा .
तुम्हाला पण बरे वाटेल आशि उत्तर येतील आणि बाकी लोकांचं वाचण्याचा आणि लिहण्याची पण एनेर्जी वाचेल

स्वतःची मते विरोधकांच्या मतांच्या अतिशयोक्तीखाली पुढे सरकविण्यापेक्षा स्वतःची मते लोक थेट का मांडत नाहीत? ते सोपं नाहीय का? बाकी रवीश कुमारचं ऐकायचं की स्वतःच्या मनाचं हा प्रत्येकाचा स्वतःचा प्रश्न आहे. परंतु रवीश कुमार यांच्या मताला आदर देऊन लोक NDTV पाहणं नक्कीच बंद करू शकतील.

Bjp,modi,pakistan आणि भारतीय मीडिया च वागणं झालं.....
Aivdich मर्यादित रवीश कुमारची मत आहेत त्या मुळे ते प्रामाणिक वाटतं नाहीत .

Submitted by भरत. on 2 March, 2019 - 14:05 >>>
काय भारी ऍनिमेशन आहे! Lol

आज सकाळी एका चॅनेलवर सांगत होते: विंग कमांडर अभिनंदन यांनी ९:२२ला भारताच्या भूमीवर पाऊल ठेवले. त्यासाठी ९ मिनिटात ते १३२ पावले चालले.

सुंदर लिहिलय. आवडलं व सर्वच पटलं. मी यातील बऱ्याच वाहिन्या बघते. काही जास्त वेळासाठी तर काही लगेच बदलावी वाटतात ती थोड्या वेळासाठी. पण निंदकाचे घर असावे शेजारी किंवा दुसरी बाजू पहावी अशा कोणत्याही कारणाने सगळीकडे उड्या मारत का होईना, पाहते.

https://eurasiafuture.com/2019/02/20/the-world-must-know-the-truth-about...

या व अशा बातम्या देणारे भारताबाहेरील कित्येक लोक भारताची जगापुढील छबी मलीन करत आहेत. असल्या साईट्सना भारताने भारतात उघडायला बंदी केली पाहिजे.

जिद्दू,
मला बघणे सोडा असे रवीश यांनी म्हटलेय ती ओळ सगळ्यांनी वाचलीच पाहिजे हा तुमचा अट्टहास अजिबात आवडलेला नाही. लोकांनी कुठल्या ओळी वाचाव्यात आणि कुठल्या ओळींवर प्रश्न विचारावेत याबद्दल तुमचे विचार तुमच्या जवळच ठेवावेत ही विनंती.

मानव,
कोण किती मिनिटांत किती पावले चालले, किती झोपले, किती व काय खाल्ले वा प्याले या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटत नसतील कदाचित पण या बातम्यात इतरांच्या डोळ्यात पाणी आणू शकणारे करुण भाव असूच शकत नाहीत असे तुम्हाला वाटते का? का?

मला बघणे सोडा असे रवीश यांनी म्हटलेय ती ओळ सगळ्यांनी वाचलीच पाहिजे हा तुमचा अट्टहास अजिबात आवडलेला नाही. लोकांनी कुठल्या ओळी वाचाव्यात आणि कुठल्या ओळींवर प्रश्न विचारावेत याबद्दल तुमचे विचार तुमच्या जवळच ठेवावेत ही विनंती.>>>>>>>>

@सोनू- अहो मी कुणालाही कसलाही अट्टाहास केला नाही. कोण काय टाकताय निदान नीट वाचत तरी चला. गजब पब्लिक आहे इथं... माझीही तुम्हाला विनंती .

Pages