पुलवामा हल्ला.

Submitted by Filmy on 15 February, 2019 - 04:09

ह्या भ्याड हल्ल्यात ४० हून अधिक जवान मृत्युमखी पडले आहेत आणि कित्येक जखमी झाले आहेत.
ड्युटी जॉईन करायला निघालेल्या जवानांच्या वाहनांवर हल्ला झाला आहे. नेहमीपेक्षा अडीचपट अधिक जवानांचा ताफा होता. ३५० किलोची स्फोटके घेतलेला ट्रक वाहनांना जाऊन धडकतो आणि त्याचवेळी गोळीबारही होतो म्हणजे हा नक्कीच पूर्वनियोजित कट आहे आणि आपले इंटेल काय करीत आहे?

जैश ए महम्मद या अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पण आपल्याकडे या अपयशाची जबाबदारी कोण स्विकारणार आहे? सरकार? ५६ इंची छातीचा लोहपुरुष? संरक्षण मंत्री? गृहमंत्री? डोवाल? लष्कर? इंटेलिजन्स एजन्सीज?

उरी नंतर गाजावाजा करून सर्जीकल स्ट्राईक केले. त्यावर राजकारण केले गेले. नुकताच चित्रपट काढून जाहिरातीही केल्या आणि आता पुन्हा तीच आवृत्ती?

हे कधी थांबणार आहे का? सरकारला पर्यायाने आपल्यालाही काय करावे लागणार आहे याची थोडीतरी कल्पना आहे का? मुळात प्रश्न काय आहे याची जाणीव तरी आहे का? जाणीव नसणाऱ्यांनाच आपण सत्तेच्या चाव्या देत आहोत का?

निषेध, राग, उद्विग्नता, उदासीनता, RIP इत्यादींच्या स्मायली आणि बाष्कळ ओळी टाकण्यापेक्षा ठोस काही होणार आहे का? कधी?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हा एक महत्त्वाचा लेख आहे ह्या संदर्भात:

पुलवामा सारखी भयंकर घटना घडली असताना ह्याचा जाब गेली पाच वर्षे सतत देशभक्तीचे, छप्पन इंची छातीच्या मापाचे, निर्भीडपणाचे दाखले देत जाहिराती आणि सभा गाजवणाऱ्या सरकारला विचारायचा नाही तर मग नेमका कुणाला विचारायचा? आज विचारायचा नाही तर मग कधी विचारायचा? कि अश्या घटना घडल्यावर नेहमीप्रमाणे पाणावलेले डोळे बंद करून शोकाच्या मेणबत्त्या पेटवुन तोंड पाडून आजच्या दिवशी तरी राजकारण करु नका म्हणणाऱ्या, कधी पराकोटीची तर कधी सोयीची राजकीय वैचारिक निष्क्रियता अंगी भिनवलेल्या लोकांना विचारायचा? अमुक ह्याच्यावर राजकारण करू नका, तमुक ह्याच्यावर राजकारण करू नका म्हणणारी झुंडीत एका जागी ढिम्म बसून शोकात्म अवस्थेत डुलले कि आपण संवेदनशील होतो असे समजणारी पब्लिक जोवर तुंबळ आहे तो तोपर्यंत मेंदू उघडे ठेवून प्रश्न विचारण्याला इथे अजिबात वाव नाही.

शेवटी मरणारा, गोळ्या खाणारा, हल्ल्यात अपंगत्व झेलणारा, रक्तबंबाळ होणारा हा सैनिक हा नेमका येतो तरी कुठून? डोकं ठिकाणावर ठेवून विचार केला तर सहज लक्षात येईल कि तो तुमच्या आमच्या सारख्याच साध्या समाजातून येतो. ज्याला जेमतेम घर असतं, कुटुंब असतं, लेकरंबाळं असतात, पोटपाणी असतं, पोरांची शिक्षणं असतात. असंख्य जबाबदाऱ्या असतात. त्यालाही त्या सर्व अडीअडचणी असतात ज्या दैनंदिन आयुष्यात तुम्हाला आम्हाला असतात. घरच्यासकट तोही कधी काळी नोटबंदीच्या रांगेत ताटकळत उभा राहिलेला असतो. ह्या देशातला बहुतांश सैनिक हा कधी शेतकऱ्याचा पोरगा असतो तर कधी तृतीय चतुर्थ श्रेणी कामगाराचा पोरगा असतो, तर कधी दारिद्र्याशी झुंज देत देत देशाच्याही सीमा सांभाळायचे ओझे घेऊन लढणाऱ्या गरिबातील गरीब बहुजन समाजातला असतो. त्यांचे प्रश्न विचारायचे कुणी? कि त्यांनी निवळ शोकसभेपुरता भावनांचा बाजार मांडणाऱ्या लोकांनी ग्लोरिफाय केलेल्या सोयीस्कर देशभक्तीचा झेंडा सांभाळायचा ठेका घेतलाय? एकदा का ही देशभक्तीच्या आवरणाची रुचकर पापडं सुरक्षित घरात बसून स्वतःवर चढवून घेतली आणि सैनिकाच्या अंगावरही ती चढवली गेली कि लोकं म्हणायला मोकळे असतातच कि ह्याच्यात राजकारण आणू नका, त्याच्यात राजकारण आणू नका. अंगावर देशभक्ती गोंदवलीय ना मग देशाच्या सीमा सुरक्षा ठेवणाऱ्या खुद्द सैनिकालाही देशाच्या आणि स्वतःच्याही सुरक्षेसाठी योग्य साधनांची, योग्य इंटेलिजन्स ची, सैन्याकडे रिमोटवर चालणारं खटका ओढला कि फायरिंग करणारं खेळणं म्हणून न बघता माणूस म्हणून बघू शकणाऱ्या योग्य धोरणाची, आवश्यकता असते हे ह्या दळभद्री लोकांच्या लक्षात येत नाही. देशभक्तीच्या पापडासोबत शोकात्म अवस्थेची लोणची घालायचा प्रकार सुरु होतो.

वास्तव हे आहे कि राजकारणाशिवाय ह्या देशातला धुळीचा कणही हालत नाही. पुलवामा ची घटना न्यूज चॅनेल्स वर नीट झळकतही नाही तोवरच अर्णब गोस्वामी नावाच्या हिडीस पत्रकाराच्या रिपब्लिक चॅनेलच्या सोशल मिडिया पेजच्या बातमीखाली सुरु झालेले, आणि जे जाणूनबुजून सुरु करण्यात आले हे समजायला प्रचंड वाव आहे अश्या प्रकारचे हिंदू विरुद्ध मुस्लिम ध्रुवीकरण करणाऱ्या कमेंट्सचे शेकड्याने संदर्भ दिसून येतील, फेक मुस्लिम आयडी चे लाईक्स दिसून येतील. सरकारला आणि त्याच्या पाळलेल्या पत्रकारी पोपटांना हे कसं चिघळवता येऊन त्यातून फायदे उपटायचे ह्याचा चांगलाच सराव आहे. अश्या वेळीस प्रश्न विचारणाऱ्यांनाच ही हळव्या दांभिक मानसिकतेची प्रचंड मोठी झुंड अक्कल शिकवणार असेल तर आपण युद्धाच्या दंगलीच्या भयंकराच्या दरवाजात उभे आहोत. उद्या मोदी सरकार दंड थोपटून जेव्हा सडेतोड जवाब देण्याची भाषा करून जयजयकाराच्या पाट्या डोक्यावर उचलेल तेव्हा पुलवामा मध्ये हकनाक बळी पडलेले सैनिक सुद्धा हा देश विसरून जाईल. बदला घेतल्याच्या लोकप्रिय लाटेवर बसून मोदी सरकार स्वतःच्या अक्षम्य चुकांवर गोधडी हांथरुन राजकारणाचा योगा करायला बसेल. तरीही काही लोक तेव्हाही म्हणतीलच कि ह्याच्यात राजकारण त्याच्यात राजकारण आणू नका. युद्ध, दहशतवाद, सैन्य, शस्त्र, डावपेच, सुरक्षा, इंटेलिजन्स हे सगळंच्या सगळं सुरुवातीपासून ते शेवटपर्यँत एक राजकारणच असतं. सैन्याचं हालाखीच्या अवस्थेतलं जगणं आणि असं भयंकर रित्या मरणं हा सुद्धा सरकारच्या राजकारणातुन उद्धभवलेल्या धोरणाचाच एक भाग असतो. एकेक सैनिक सीमेवर कधी कुठं कसा उभा राहतो उठतो बसतो हे देशाची राजकीय सूत्रं हाती असणारेच ठरवतात आणि म्हणूनच सैन्य जेव्हा असं विक्राळ मृत्यूच्या दाढेत अडकतं तेव्हा सरकारला जाब विचारलाच पाहिजे.

बहुतांश भारतीय मानसिकता ही सैन्याला एखाद्या सुपरटॉय सारखी समजते वा फॅन्टसी हिरो समजते. म्हणूनच सैन्याकडून कसल्याही खडतर अवस्थेत अचाट पराक्रमाची तिला अपेक्षा असते. युद्धाचा, 'एक के बदले दस' बदल्याचा रोमँटिसिझम भारतीय मानसिकतेत खच्चून भरला आहे. त्यातूनच काश्मीर असो वा नॉर्थ ईस्ट असो वा देशांतर्गत दहशतवाद असो, प्रश्नाच्या मूळापर्यंत जाऊन शांततेनेच तोडगा निघू शकतो ह्यावर कुणाचा फारसा भरवसा नसतो. कारण भरवसा नसणाऱ्या, सैन्याला सुपरटॉय समजणाऱ्या ह्या कचकड्या मनोवृत्तीच्या भारतीयांना कुठं बंदुका उचलायच्या असतात. त्याला देशभक्ती दाखवायला सैन्याप्रती आदरयुक्त अचाट हिरोइझमच्या कल्पना करणे, सैन्य शहिद झाल्यावर डोळ्यांच्या कडा पुसणे एवढंच करता येणं आवश्यक असतं. देशभक्तीची पहिली फेरी म्हणून तेवढं नीट करता आलं कि पाकड्यांना नेस्तनाबूत करायला पाहिजे, लाहोर कराचीत रणगाडा घुसवला पाहिजे, चाळीस चा बदला चार हजारांनी घेतला पाहिजे, त्यांचा एक एक कापून काढला पाहिजे, नकाशावरून नाव मिटवले पाहिजे वगैरे वगैरे अतर्क्य अफाट हिणकस भावनांचा पूर ओसंडून वाहायला लागतो. बरं मग हे सगळं कोण करणार - तर आपलं सैन्यच. त्यात परत कुणाचं आयुष्य पणाला लागणार, कोण परत परत मरणाच्या जबड्यात जाणार - तर तेही आपलं सैन्यच. हे कळण्याची साधी अक्कल भारतीय मानसिकतेत अद्याप रुजलेली नाही. आजवर भारतीय सैन्याला हिरोगिरीच्या भंकस बिरुदाखाली दबाव सहन करायला लावणारी इथली मूर्ख जनता आणि त्या मूर्ख जनतेचं बिंडोक सरकार ह्यांनीच खरंतर वेळोवेळी सैन्याचे, त्याच्या कुटुंबाचे, त्याच्या पोराबाळांच्या भविष्याचे अतोनात नुकसान केलेलं आहे. जेवणातल्या निकृष्ट कारभाराची पोलखोल केली म्हणून सैनिकाला निलंबित केले गेले, बीजेपी भक्तांनी त्या सैनिकालाच ट्रोल केले तेव्हा ह्या सरकारची लायकी काय आहे हे "ह्यावर तरी राजकारण करू नका" वाल्या पब्लिकला लक्षात यायला वेळ लागू नये.

एकविसाव्या शतकात जगताना युद्ध, युद्धाची गरज ह्याविषयी जोपर्यंत सखोल साक्षरता, हिरोइझम ला वाव नसणारी संवेदनशीलता निर्माण होत नाही तोपर्यंत भारतीय सैन्याचे हाल असेच होत राहतील, सैन्य हा राजकारणाच्या पटलावरील प्यादाच असेल आणि स्वतःच्या सलग पाच वर्षाच्या दलिंदर भोंगळ कारभारावरून लक्ष हटवण्यासाठी, राफेल घोटाळ्यात नागडे व्हायची वेळ येऊ नये म्हणून उरलेसुरले कपडे वाचवण्यासाठी देशभक्ती, बदला, करारा जवाब, फिर एक बार सर्जिकल स्ट्राईक वगैरे मसालेदार जाहिरातीचा शो येत्या निवडणुकीत लावत सैन्य पुन्हा पुन्हा बळी पाडले जातील. देशभक्तीच्या ह्या मल्लखांबी दांड्याला धरून , त्यावर शोकाच्या कोलांटउड्या मारत आपली संवेदनशीलता फुलप्रूफ करून घेणाऱ्या इथल्या बहुसंख्य भारतीयांना सैन्याचे माणूसपण जोवर समजून घेता येत नाही तोवर प्रश्न विचारण्यापासून, सरकारला धारेवर धरण्यापासून परावृत्त करणारी, 'ह्यावर त्यावर राजकारण करू नका' वाली झुंड आबादीआबाद होत राहील. प्रश्न निवळ तुमच्या आमच्या देशभक्तीचा नाही, बदल्याचा तर नाहीच नाही, प्रश्न सैन्याच्या माणूसपणाचा आहे. सैन्याचं माणूसपण पणाला लावून जे सरकार राजकीय मायलेज खायला भुकेलं असतं त्याला जाब विचारलाच पाहिजे.
- Mayur Lankeshwar

https://en.m.wikipedia.org/wiki/Russian_apartment_bombings

जिंकून येण्याची सुतराम शक्यता नसताना, ह्या bombings वर सहानुभूतीच्या जोरावर बहुमत मिळवून पुतिनचा पक्ष सहज निवडून आला आणि पुतिन रशियाचा अध्यक्ष झाला.

नेहमीपेक्षा २.५ पट ताफा एकत्र प्रवास करतोय, त्याच रस्त्यावर protocol झुगारून civilians ला ही रास्ता वापरायची मुभा, intel असून सुद्धा न घेतली गेलेली खबरदारी, अगदी ३५० किलो स्फोटक जमा करे पर्यंत कसलाही थांगपत्ता लागला नाही हे सर्व बघितल्यावर १९९९ च्या रशिया ची आठवण झाली

शांततेने म्हणजे कसा सोडवायचा हा प्रश्न?

लाहोर बस डिप्लोमसी झाली तरी कारगिल युद्ध झाले.संसदेवर हल्ला झाला.

२००४- ते २०१४ शांततेचे धोरण होते तरी २६/११ झाले. मुम्बई लोकल मधे बॉब स्फ़ोट झाले.

हे प्रॉक्सी वॉर आहे. तुम्हाला लढायच की नाही हे समोरचा देश विचारत नाही. तुम्ही उत्तर द्या अगर ना द्या ते तुमच नुकसान करत रहाणार.

त्यांच्या @#$%*& मध्ये दम नाही, मुंग्यांसारखे चिरडले जातील हे माहीत असल्याने असले स्लो पॉयझनिंग चालले आहे. Angry ( शिवीबद्दल सॉरी पण घ्या एखादा अ‍ॅटम बाँब आणी टाका त्यांच्यावर असेही करता येत नाही ना !! )

आजपर्यंत जगातले कोणते युद्ध निर्णायक झालेले आहे? अमेरिकेचे अफगाणिस्तानात काय झाले?

सुरक्षित घरात बसून गरमागरम पोळीचे तुकडे तोडत चर्चा करणाऱ्यांना काय जाते बोलायला की बॉम्ब टाका, संपवून टाका, म्हणायला... युद्ध पुकारले तरी सैनिकच जाणार आहे लढायला आणि मरायला ..

अशा हल्ल्यात मरतात ते सैनिक, त्यानंतर त्याचा राग येऊन आपण बदला घेण्याच्या गोष्टी करतो.. बदला घ्यायला जाणार तेही सैनिकच... बदला घेतल्याच्या बातम्या आल्या कि आपण सुखावणार... अरे काय मनोरंजन आहे का हे?

हातावर हात धरून बसायची गरज नसते. योग्य त्या गोष्टी योग्य ती लोकं करतात तेव्हा योग्य ते परिणाम मिळतात. यासंदर्भातल्या आकडेवारी पुरेशा बोलक्या आहेत.

टाळूवरचे लोणी स्वरूपाचा धागा आहे हा

मायबोलीभर ट्रोलिंग करून हाती काही न लागल्याने आता धागानिर्मितीचे श्रेय तरी लाटता येते का पाहू ह्या उद्देशाने लेखणी झरली एकदाची!

असले हल्ले फक्त गेल्या पाच वर्षातच झालेले असल्याने सगळे अपयश विद्यमान सरकारचे आहे हे सिद्धही झाले एकदाचे

Rofl

काश्मिरमध्ये इतर राज्यातील हिंदूंना वसायला परमिशन देणे हा एकच उपाय आहे. भारतीय सेनेला धोका स्थानिक मुस्लिम बंडखोरांपासून आहे. पद्धतशीरपणे काश्मिरमध्ये हिंदूंना वसवले तर बरेच प्रश्न निकालात निघतील,पर्यटन वाढेल व दहशतवाद्यांना चाप बसेल.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/china-rejects-indias-appeal-to...

https://www.loksatta.com/trending-news/freedom-fighter-strikes-how-pak-m...

चीन जर आज आशिया मध्ये नसता, तर पाकीस्तान हे नाव जगाच्या नकाशातुन कधीच पुसले गेले असते. हे पिचपिचे दलदलीत जन्माला आलेत आणी तसेच रहातील. स्वतःच्या देशात स्वत:च्या नागरीकांना व मुस्लिम लोकांना कुठलेच स्वातंत्र्य देत नाहीत, आणी इकडे अतीरेक्यांना पाठिंबा देतायत. अमेरीकेने आधी या पिचपिच्यांवरच अ‍ॅटम बॉम्ब टाकायला हवा होता जपान ऐवजी. सडके कुठले Angry

काश्मिरमध्ये इतर राज्यातील हिंदूंना वसायला परमिशन देणे हा एकच उपाय आहे. भारतीय सेनेला धोका स्थानिक मुस्लिम बंडखोरांपासून आहे. पद्धतशीरपणे काश्मिरमध्ये हिंदूंना वसवले तर बरेच प्रश्न निकालात निघतील,पर्यटन वाढेल व दहशतवाद्यांना चाप बसेल. > सूचना कर्त्याने इथल्या सर्व भक्तांना घेऊन जावे. आसिंधु -सिंधु भारतासाठी एव्ह्ढं तरी करतीलच हे लोक

सूचना कर्त्याने इथल्या सर्व भक्तांना घेऊन जावे. आसिंधु -सिंधु भारतासाठी एव्ह्ढं तरी करतीलच हे लोक>>>>> पहा, म्हणजे दुसर्‍याच्या घरातच महाराज जन्माला यावे ही म्हण येथे , या वक्ताला सार्थ ठरवली तर !! Proud Light 1

४० जवान यांना बाँबस्फोटात प्राण गमवावे लागले... Sad खुप वाईट झाले.
अनेक जखमी झाले असतील.
३५० किलोची स्फोटके, ट्रक हे लक्षणे चांगली नाही.

या वक्ताला सार्थ ठरवली तर !>> बिलकुल नाही. असले मूर्ख सल्ले देणार्‍यांना महाराजांसोबत कसे उभे करणार ?

अमेरीकेने आधी या पिचपिच्यांवरच अ‍ॅटम बॉम्ब टाकायला हवा होता जपान ऐवजी. - तेव्हा पाकिस्तान नव्हता ताई.. Sad

आपले देशी बोंड जेम्स डोवालांचे सुपुत्र पाकिस्तानी नागीरकासोबत बिझनेस पार्टनर आहेत. अनेक बिझनेसमन पाकिस्तान शी नियमित व्यवहार करतात.. बॉम्ब कसा टाकायचा..?

<< टाळूवरचे लोणी स्वरूपाचा धागा आहे हा >>
------ असे म्हणता येणार नाही. या आधी पण असे अनेक धागे आले आहेत, जे निव्वळ प्रचाराच्या निर्मळ हेतूने काढले गेले होते. खुप असंतुलित आणि तत्कालिन ताज्या घटनेचा फायदा उपटण्याच्या उद्देशानेच काढले गेले होते.

हा धागा त्या प्रकारातला दिसत नाही, धाग्याचा उद्देश मला तरी स्वच्छ दिसतो आहे. आपण शक्य असल्यास असली प्रकरणे दाबण्याचे (कमी प्रसिद्धी जेणेकरुन लोकांना अस्वस्थ वाटणार नाही) प्रकार करतो. चार दोन दिवसा नंतर लोक विसरतात, आपल्या उद्योगाला लागतात. मग कुणाला आहे काळजी. थोडा काळ गेल्यावर प्रकरणाचे गांभिर्य रहात नाही.

आज या अत्यंत दु:खद घटकेलाही, एक मर्यादित संयमित डोके शांत ठेवत विचारलेले प्रश्न आहेच आणि त्याची उत्तरे शोधणे यात गैर काहीच नाही.

<< शेवटी मरणारा, गोळ्या खाणारा, हल्ल्यात अपंगत्व झेलणारा, रक्तबंबाळ होणारा हा सैनिक हा नेमका येतो तरी कुठून? >>
-------- लाखमोलाचा प्रश्न आहे, अगदी माझ्या मनातला प्रश्न विचारला आहे.
यांचा कधीच विचार होत नाही. यांच्या त्यागाचा केवळ फायदा घेण्यासाठी सर्व पुढे असतात.

आताही अगदी "आतमधे घुसुन मारायलाच हवे, ठोकायला हवे, पुरेपूर हिशेब चुकता करण्याची भाषा पुन्हा सर्जिकल च्या धर्तीवर... त्यांना मदत करणार्‍या सर्वांना कायमचा धडा शिकवण्याची भाषा.... देशाचे नाव पुसण्याच्या वल्गना " या सर्वांसाठी - तुमचे रक्ताचे नातेवाईक, वडील, भाऊ... कुणी आहे का सैन्यात? बहुधा ज्यांचे कुणीच जवळचे सैन्यात नसते (सैन्यात = सिमेवर लढायला) त्यांच्याकडुनच असली भाषा एकायला मिळते.

हल्ला आणि त्याची वेळ खुप महत्वाची आहे. या हल्ल्याचा सर्वात जास्त फायदा कुणाला आहे, उद्देश नेमका काय होता या प्रश्नांची उत्तरे काही दिवसात मिळतीलच.

पुन्हा एकदा ४० जवान मारल्या गेल्याचे दु:ख आहे. Sad त्यांच्या थोर त्यागास सलाम.

सिम्बा, या घटनेचा मोदी सरकारला पोलिटीकली भरपूर तोटा होणार आहे. युद्ध केलं तरी आणि नाही केलं तरी. मुंबईत पूर्वी सतत हल्ले व्हायचे तसे ५ वर्षात काही झालं नाही, आयसिसने युरोपात हल्ले केले तसं इथे झालं नाही हा त्यांचा एक प्रचाराचा मुद्दा होता. दुसरीकडे जरी युद्ध केलं तरी आज पाकिस्तान तयारीत असणार त्यामुळे तो पेपर सोपा जाणार नाही. सो पोलिटीकली इट्स अ बिग शॉक टू मोदी.
फायदा कोणाला होणार, आक्रमक प्रश्न आज कोण विचारतेय तेही उघड आहे. Who gains, हे आज सोशल मीडियावर दिसून आले.

>>निवडणुकीच्या आधी (योगायोगाने??) लागलेली राईश् स्टॅग ची आग, आणि नाझी पार्टी चा विजय आठवला,<<

निव्वळ सिक मनोवृतीचा माणुसच असा विचार करु शकतो; ब्लडि पथेटिक. ग्रोस डिस्प्ले ऑफ कंप्लिट डिसरिगार्ड टु दि सर्विस्मेन अँड दि मार्टडम. भारतीय सेना म्हणजे निवडणुकांच्या यज्ञात द्यायची आहुती समजता काय?.. Angry

राज,

शांतच राहू

अजून खूप वाचावे लागणार आहे

भारतीय सेना म्हणजे निवडणुकांच्या यज्ञात द्यायची आहुती समजता काय?.
-- भाजपे तरी तसेच समजतात हे कालच्या हल्ल्यानंतर अवघ्या तासाभरात त्याचे भांडवल करून मत मागण्यासाठी सुरु झालेल्या प्रचारावरून दिसते.

इतक्या वाईट घटनेनंतर लगेचच "तू-मी तू-मी"चे राजकारण सुरु झाले हे बघून वाईट वाटले. Uhoh सध्या इतकेच.

हं... माननीय पंतप्रधान जेव्हा गुजरात चे मुख्यमंत्री होते तेव्हा तर २६-११ चा हल्ला सुरु असतांना तू तू मै मै चे राजकारण करायला मुंबईत येऊन प्रेस कॉन्फरन्स घेत होते... त्यामानाने इथे जे होत आहे ते सामान्य नागरिकांचे विचार प्रदर्शन (राजकारण नव्हे) फारच सामान्य आहे.

माननीय पंतप्रधान ह्या हल्ल्याबद्दलही जाहीर प्रेस कॉन्फेरंस घेतील अशी अपेक्षा आहे. आता तर अधिकृतरित्या त्यांची जबाबदारी आहे.

वरील धागा वाचून मनस्वी दुःख झाले अजून ही प्रत्येक जण आपापला अजेंडा पुढे रेटतो आहे कोणी काँग्रेस च्या बाजूने कोणी बजप बाजूने वरील ID पैकी कोणाचा नातेवाईक किंवा भाऊ सैन्यात आहे , माझा आहे , जेंव्हा हे ऐकू येते सैन्य पोटा साठी लढते आणि थोडे शाहिद होणारच - एक सन्माननीय पत्रकार on tv show , किंवा एक के बदले 10 शीर अरे कोण आणणार ,लढणार आम्हीच आमचे भाऊबंद , त्या वेळेस होणारया वेदने ला अंत नसतो , एकच करा सर्व राजकीय नेत्यांची Z security काढून टाका मग बघा असे सरळ येतील , करा पुकारा पाहिले बदला मग वोट बघू किती जनता तयार होते ते , सरळ युद्ध करण्या पेक्षा ही अनेक जालीम उपाय आहेत ते तर अमलात आना जसे की उच्ययुक्ताला हकलुन देने , Visa बॅन , नो मेडिकल , नो बॉलिवूड , use direct gun instead of pallet gun , cancelled Indus triti ,
Congress or BJP any goverment will not take action until people ban them to enter in their area and ask what action taken
Our family ready to sacrifice if there is direct war. But this type of attack is not at all accepted

धाग्यातील हे मुद्दे (उरी नंतर गाजावाजा.......सत्तेच्या चाव्या देत आहोत का?) म्हणजे निव्वळ विनोदी।लिखाण वाटले Uhoh
म्हणून -
इतक्या वाईट घटनेनंतर लगेचच "तू-मी तू-मी"चे राजकारण सुरु झाले हे बघून वाईट वाटले. Uhoh +१.... प्रचण्ड सहमत

------------
बाकी वर काही प्रतिसादात ऐसा सुर आलाय की युद्ध म्हणजे फक्त आपल्या सैनिकांची आहुति आणि त्याग .... तर त्यांनी ६५च्या मुंबईतल्या आठवणी जरा आपल्या आजी आजोबा आई बाबांकडून विचारुन घेतल्या तर हां प्रश्न ह्यापुढे कधीच पडणार नाही.

कारण जेव्हा प्रत्यक्ष युद्ध सुरु असते तेव्हा सैन्य तर फक्त सीमेवर लढत असते पण देशातील नागरिक देशाअंतर्गत परिस्थितिशी आपापल्या परीने लढतच असतो आणि म्हणूनच कुठलेही युद्ध जिंकले जाते ते सैनिक आणि नागरिक ह्यांच्या एकत्रित सहकार्य आणि समर्पित भावनेमुळे !

भारत के वीर या अ‍ॅप वर जाऊन भक्तांनी देणग्या देऊन त्याचे स्क्रीनशॉट्स टाकायचे आहेत या आवाहनाला भक्तांकडून प्रतिसाद मिळत नाहीये. अशाने त्यांची देशभक्ती कशी मोजता येणार ?

लक्षात ठेवा, जो जेव्हढा मोठा देशभक्त त्याची देणगी तेव्हढी जास्त असेल हे साधेसे सूत्र आहे.
ज्यांना देशाच्या सुरक्षेवरून, सैनिकांच्या काळजीवरून इतर सर्वांना झाप झाप झापायचे आहे त्याला इतर कुणीही देऊ शकणार नाही अशी देणगी देणे भाग आहे.

तन्मय चपटे आणि चिन्मय आपटे यांना आत्ता हेच सांगितले. त्यांना ते पटले. दोघेही राहते घर विकायला तयार झाले होते. पण संघात जाणा-या त्यांच्या (आपापल्या) बाबांनी त्यांना चांगलेच भोसडले.

"या घरासाठी मी पै पै गोळा केली आहे ती अशा पद्धतीने सैनिकांवर फुंकायला का रे ?"
असे त्या दोघांच्या (आपापल्या) बाबांनी त्यांना सुनावले.

ते दोघेही तोंड पाडून फिरताहेत. माझ्याकडे एक घासलेटचा रिकामा डब्बा होता. त्याला वर पत्रा ठोकून आणि एक बीळ पाडून मदत गोळा करायला दोघांना पाठवून दिले आहे. देशभक्ती आता सहजच सिद्ध करता येत असल्याने आणि ती मोजताही येत असल्याने साहजिकच कुणीही आता मोकार देशभक्ती दाखवणा-याला दाखव तुझी देणगी असे विचारू शकणार आहे. जिओच्या कृपेने जवळपास फुकटात सोशल मीडीयावर येऊन इतर सर्वांकडे तुच्छ कटाक्ष टाकत हे सगळे देशद्रोही जमलेत साले अशा विचाराने फेसबुक अकाउंटला लॉगिन होणा-यांना आता कुणीही देशद्रोही पाच दहा हजाराची देणगीची पावती, स्क्रीनशॉट टाकून गप्प बसवताना दिसतोय.

अक्षयकुमार हा चांगला भक्तांच्या कॅम्पस मधला. मग त्याला ही गोची करण्याची दुर्बुद्धी का झाली ?
आता त्याला हाकलले पाहीजे. आता विकी कौशल, अनुपम खेर, परेश रावल, सोनू निगम यांच्यावरच भिस्त ठेवली पाहीजे.

पण यांनाही देशभरातल्या पब्लिकला बोल लावायचे असतात. त्या हिशेबाने यांनी किमान एक एक कोटीची देणगी द्यायला पाहीजे.
आमच्या इथे दगडू बुट्टेपाटलाने आजच ९० लाखाची देणगी पाठवली आहे. आजपर्यंत ८ कोटी जमलेत. त्यात या साहेबांचा वाटा मोलाचा आहे.

दहा कोटी मेंब्र ज्या पक्षाची आहेत त्यांनी एक एक रूपया दिला असता तरी दहा कोटी जमले असते की ! आता याच लोकांनी एक एक रूपया दिला आहे असे समजले तरी..
ते दोन कोटी लोक कोण आहेत ज्यांनी अजिबातच देणगी दिलेली नाही ?

हे देशद्रोही असावेत. हे अस्तनीतले निखारे असावेत.
शोधून काढा अशा घरभेद्यांना !

(व्हॉट्स अ‍ॅप सौजन्याने )

हा मेसेज मिळाल्यानंतर वेबसाइट हुडकून काढली. खरंचच चांगली आहे. अ‍ॅपबद्दल माहिती होतं. पण व्हॉट्स अ‍ॅप मेसेज म्हणून दुर्लक्ष झालं होतं. आताच्या हल्ल्यानंतर मात्र हा मेसेज लक्षात राहिला. त्यातला उपरोध सोडून कामाचे काय आहे ते पाहू.

https://bharatkeveer.gov.in/

इथे आपल्याला ज्या शहीदाला मदत करायची आहे त्यालाच थेट मदत करता येते. अर्थात १५ लाखापर्यंत. किमान रक्कम किती हे सांगितलेले नाही. आपण जी मदत करू त्याबाबत सर्टिफिकेट पण देण्यात येते (याची गरज नसावी).

खरंच एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा मदत केली तर काय वाईट आहे ?

जगात सर्व देशांचे सैन्य आहे आणि युद्ध हे सैन्य च लढत .जनता युद्ध भूमीवर जावून लढलिय आस जगात उदाहरण नाही आसेल तर जरा आम्हाला पण सांगावे .
सैन्य ,प्रशासन ,न्यायालय ही ऐक व्यवस्था आहे आणि त्यांची कामे वेगवेगळी वाटून दिलेली आहेत सरकार नामक व्यवस्था चालवायची आसेल तर सैन्य हे आसवाच लागत नाहीतर तो देश अस्तित्वात राहूच शकणार नाही .आणि हयात सामान्य कुटुंबातील च लोक आसतात .
आपल्या देशाची व्यवस्था आसलेल्या सैन्यावर जर कोनी हल्ला केला तर तो हल्ला सरकार वर असतो व त्या बरोबर जनतेवर सुधा असतो त्याचा प्रतिकार हा झालाच पाहिजे कारण आता पर्यंत चर्चा करून हा प्रश्न सुटलेला नाही .आपल्या सोसायटी मध्ये कसे नाठाळ सभासद आसतात त्यांच्या शी चर्चा करून काहीच फायदा नसती सर्व सभासद जेव्हा दबाव निर्माण करतात तेव्हाच ते नाठाळ सभासद सुधारतात तसाच हा आपला शेजारी नाठाळ आहे त्याला चर्चेची भाषा समजत नाही त्यांची पण majburi आसेल आसो.
आता जो सीआरपीएफ हल्ला झाला त्याची प्रतिक्रिया म्हणून देश अस्वस्थ झाला कारण 40 जवान त्यात हकनाक मारले गेले ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांना शिक्षा मिळावी ही मागणी aikdam न्याय आहे .संतप्त प्रतिक्रिया येवून पाकिस्तान वर हल्ला केला पाहिजे अशी मत व्यक्त होवू लागली आणि ते साहजिक पण आहे पण धागा कर्त्यानी हे समजून घ्यावे पाकिस्तानी जनतेवर हल्ला करा आशि प्रतिक्रिया ना सरकारनी दिली आहे ना जनतेनी ..आणि मूर्ख मागणी कोणीच करत नाही .पण ज्यांनी हल्ला केला त्यांना शोधून target fix करून त्या विषारी शक्तींचा पूर्ण विनाश हा केलाच पाहिजे हयात भारतीय म्हणून तरी मतभेद आसू नयेत .आणि हा विनाश करताना मानवी अधिकार ज्यांनी आपले मान्य केले नाहीत तेव्हा त्यांचे ही मान्य करायचं गरज नाही .
आणि हे सैन्याला च करावे लागणार हयात दुसरा कोणता च पर्याय नाही फक्त आपली जीवित हानी होवूच नये किंवा कमीत झाली पाहिजे ह्याची डोकं शांत ठेवून पूर्ण काळजी घेतली पाहिजे हे मात्र योग्य आहे .
राजकारण म्हणायचे झाले तर जिथे शत्रू चा प्रतिकार करण्याचा विषय असतो तिथे बिलकुल राजकारण पण नको आणि मतभेद तर आसुच नयेत .पण लोकशाही देशात (सर्वच) थोडफार राजकारण होतच p

Pages