पुलवामा हल्ला.

Submitted by Filmy on 15 February, 2019 - 04:09

ह्या भ्याड हल्ल्यात ४० हून अधिक जवान मृत्युमखी पडले आहेत आणि कित्येक जखमी झाले आहेत.
ड्युटी जॉईन करायला निघालेल्या जवानांच्या वाहनांवर हल्ला झाला आहे. नेहमीपेक्षा अडीचपट अधिक जवानांचा ताफा होता. ३५० किलोची स्फोटके घेतलेला ट्रक वाहनांना जाऊन धडकतो आणि त्याचवेळी गोळीबारही होतो म्हणजे हा नक्कीच पूर्वनियोजित कट आहे आणि आपले इंटेल काय करीत आहे?

जैश ए महम्मद या अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पण आपल्याकडे या अपयशाची जबाबदारी कोण स्विकारणार आहे? सरकार? ५६ इंची छातीचा लोहपुरुष? संरक्षण मंत्री? गृहमंत्री? डोवाल? लष्कर? इंटेलिजन्स एजन्सीज?

उरी नंतर गाजावाजा करून सर्जीकल स्ट्राईक केले. त्यावर राजकारण केले गेले. नुकताच चित्रपट काढून जाहिरातीही केल्या आणि आता पुन्हा तीच आवृत्ती?

हे कधी थांबणार आहे का? सरकारला पर्यायाने आपल्यालाही काय करावे लागणार आहे याची थोडीतरी कल्पना आहे का? मुळात प्रश्न काय आहे याची जाणीव तरी आहे का? जाणीव नसणाऱ्यांनाच आपण सत्तेच्या चाव्या देत आहोत का?

निषेध, राग, उद्विग्नता, उदासीनता, RIP इत्यादींच्या स्मायली आणि बाष्कळ ओळी टाकण्यापेक्षा ठोस काही होणार आहे का? कधी?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आता देशात अनेक ठिकाणांहून काश्मि री लोकांना टारगेट केले जात असल्याच्या बातम्या येताहेत.
सध्याच्या सरकारचे अनेक समर्थकच काश्मिरींविरोधात भावना भडकवताना दिसत आहेत.
नवीन Submitted by भरत. on 17 February, 2019 - 12:19
<<
अश्या येणार्‍या बातम्यांपैकी,
एकाद्या खात्रीशीर माध्यमांतील बातमीची लिंक इथे देऊ शकता आपण ?

52451577_1302296646585009_7682838379553095680_n.jpg

अगदी योग्य मुद्दा आहे. ३००० करोड काही कमी रक्कम नाही. एकीकडे देशाची मिलिटरी पुरेशा निधी अभावी अपुऱ्या आणि कालबाह्य सामुग्रीवर जीवावर उदार होऊन लढते आहे आणि इकडे सरकार हजारो करोडो निर्जीव पुतळ्यांवर खर्च करत आहे. भोंदू आहेत. विश्वास ठेवण्याच्या लायकीचे आहेत. काहीही शक्यता असू शकते...

<< पाकिस्तान जगाच्या पाठीवरून पुसून टाकण्यासाठी निघालेले शूर जवान >>
------- ३ दिवसात तयार होणारी सेना आहे.
https://www.india.com/news/india/rss-able-of-preparing-army-within-three...

घराच्या समोर १०० मिटरवर असलेल्या मैदानात हवेत जोरदार काठी चालवणे / भिरकावणे आणि सिमेवर लढणे दोन्ही सारखेच आहे असाच समज आहे.

२६/११ नंतर शिवराज पाटील, विलासराव देशमुख, आबा पाटील यांनी राजीनामा दिला होता. पण मोदींची भाजपा ही पार्टी विथ द डिफरन्स असल्याने असं काही करणार नाही.

https://timesofindia.indiatimes.com/india/encounter-underway-between-sec...

आज सकाळी पुलवामा मध्ये झालेल्या चकमकीत एका मेजर सह ४ जवानांना वीरगती प्राप्त झाली.
ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो

आणि ५६" चे डोल पिटणाऱ्या लोकांना थोडी अक्कल देवो

काश्मिरमधील फुटिरतावादी दहशतवाद्यांची सुरक्षा केंद्रसरकारने काढून घेतल्याबद्दल, कॉंग्रेसने केंद्रसरकारच्या ह्या निर्णयाचा निषेध केला आहे. ह्या वरुन भारतातील सत्ता उलथवून टाकायला पाकिस्तानकडे मदत मागणार्‍या देशद्रोही कॉंग्रेसची मानसिकता दिसून येते.

इंदिरा गांधी प्रकरण झाल्यावर जसे शिखांना टारगेट केले गेले तसे आता काश्मिरी लोकांना टारगेट केले ज़ात असेल. जे ऐथिक्ली चुकीचे आहे पण मॉब साइकोलॉजी जेथे चालते तेथे भले भले (पुस्तकी) सु- विचार नेहमी तोकडेच पडतात.
हां तात्कालिक ट्रेंड लवकर संपू दे आणि देशवासियात ऐक्याची भावना पुनः रुजू दे !

काश्मिरमधील फुटिरतावादी दहशतवाद्यांची सुरक्षा केंद्रसरकारने काढून घेतल्याबद्दल
गेली पाच वर्षे सुरक्षा देत होते भाजप सरकार? कशाला हो कशाला?

Mirwaiz Umar Farooq, Shabir Shah, Hashim Qureshi, Bilal Lone and Abdul Ghani Bhat are the five separatist leaders whose security has been withdrawn. However, the name of pro-Pakistan separatist Syed Ali Shah Geelani does not feature in the list

किरण, तुमचे अभिनंदन केले पाहीजे. आज किंवा काल तुम्ही खर्‍या अर्थाने न्युट्रल या पदवीमधून बाहेर आलात. Happy तुम्ही तेच किरण आहात ना जे अन्याय झाला की परखड लिहुन आपली बाजू वाचकांसमोर आणता?

किरण मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. त्याच प्रश्नात मी बाकी पण लिहीते.

१) काही मुर्खांनी ( हे आय टी तज्ञ असतात ) राहुल गांधींचा फोटो टाकतांना त्यात दुसर्‍या माणसा ऐवजी परवाच्या घटनेतल्या जैश् ए महंमद्च्या अतीरेक्याचा फोटो, फोटोशॉप करुन लावला. त्याला काय मॉर्फ म्हणतात ना? पण जनतेसमोर सत्य हे येतेच. दुसर्‍याला खड्ड्यात ढकलतांना आपण त्याच खड्ड्यात पडु शकतो हे त्यांना कळत असुन पण वळत नाही. मग तुम्ही त्या लोकांमध्ये का सामिल होताय?

२ ) संघांचे बरेच निर्णय, अपेक्षा, विचार हे आजकाल घातक होत चाललेत, पण ह्याच संघांची माणसे पूर, दुष्काळ, भुकंप वगैरे ठिकाणी काही अपेक्षा न ठेवता मदत करत असतात. अजूनही करतात हे केरळ मध्ये दिसलेय. ज्यांना दिसले नाही तो त्यांचा प्रश्न . मग असे फोटो तुम्हाला इथे कधी छापावेसे वाटले नाही का? की ते सत्य, सत्य नसुन केवळ प्रलाप आहे असे तुम्हाला वाटतेय?

३ ) तुम्ही नाण्याच्या दोन्ही बाजू बघता का? म्हणजे उदाहरणार्थ मोदी हे ७५ टक्के वाईट असु शकतील पण उरलेले २५ टक्के तरी त्यांनी काहीतरी बरे केले असेल. किंवा राहुल गांधी हे कायम मुद्दा भरकटवत बोलतात, पण कधीतरी ते चांगले बोलले असतीलच.

तुम्हाला जबरदस्ती नाही उत्तर द्यायची . तुमची मर्जी !! पण तुमचा अभ्यास, अनूभव हे नेहेमी प्रशंसनीय असते म्हणून विचारले. आणी हो ईच्छा असल्यास तुम्हीच उत्तर द्या. मला मोदी विरोधकांकडुन उत्तर नकोय. कारण केवळ ते मोदी आहेत म्हणून सतत आगपाखड, शिव्या, खालची पातळी गाठुन बोलणे / लिहीणे हे वाचण्याचा कंटाळा आलाय. मायबोली हा सरकार विरोधी व सरकार च्या बाजूचे यांचा अड्डा बनलाय. सुवर्ण मध्य काहीच नाही.

माझा आणि राहुल गांधींचा काय संबंध ? तुम्ही वाचतच असाल ना ख-या डोळ्यांनी ?
उद्या तुमच्या सोसायटीत कुत्र्याने घाण केली तर त्याचा जाब पण मी द्यावा असे तुम्हाला का वाटते ?

माझा आणि राहुल गांधींचा काय संबंध ? तुम्ही वाचतच असाल ना ख-या डोळ्यांनी ?
उद्या तुमच्या सोसायटीत कुत्र्याने घाण केली तर त्याचा जाब पण मी द्यावा असे तुम्हाला का वाटते ?>>>>>> तुमचा आणी राहुल गांधी यांचा काही संबंध आहे अस मी वर कुठे म्हणले आहे का? मी फक्त एवढेच विचारते आहे की वर तुम्ही संघांचे जे फोटो टाकलेत तसे तुम्हाला ते ( संघी ) दुसरं चांगले काही करतांना सापडले नाही का? माझा प्रश्न हा साधा आहे, कुचकट नाही.

उद्या तुमच्या सोसायटीत कुत्र्याने घाण केली तर त्याचा जाब पण मी द्यावा असे तुम्हाला का वाटते ?>>>>> असे मी कधी कुठे म्हणले आहे का? किंवा त्या राहुल गांधीचा फोटो मॉर्फ करणारे पण तुम्हीच आहात असेही म्हणलेले नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की दोन्ही बाजू बघा, एक वाईट असु शकते तशी दुसरी चांगली पण असु शकते. माझ्या प्रश्नाचे तुम्ही उत्तर द्याच अशी जबरदस्ती केलेली नाही. आणी करणार पण नाही.

ज्या व्यक्तीचा मेंदू संतुलित विचार करतो ती व्यक्ती विचारी आहे चांगलं वाईट ,योग्य अयोग्य, ह्यातला फरक समजते .
पण ज्या व्यक्तीचे विचार ऐकाच पठडीतील असतील आणि कोण्ही किती ही चांगलं वागत आसेल तरी फक्त वैगुन च दिसतात त्यांना विशिप्त व्यक्ती म्हणतात त्यांना तुम्ही किती ही पटवून द्यायचा प्रयत्न करा काही फायदा नसतो .
दुर्लक्ष करणे हाच उत्तम उपाय

>>पाकिस्तान जगाच्या पाठीवरून पुसून टाकण्यासाठी निघालेले शूर जवान
Submitted by किरणुद्दीन on 17 February, 2019 - 08:41

मा. अ‍ॅडमिन,
हे असले आक्षेपार्ह फोटो ईथे टाकण्याबद्दल आपण काहीही कारवाई केली नाहीत याचा प्रचंड खेद आहे. मायबोली च्या धोरणात हे कसे बसते हे कृपया समजावून द्याल का?
चर्चा भरकटणे व व्यक्तीगत हल्ले हे काही माय्बोलीवर नविन नाही. पण, पुलवामा च्या घटने च्या पार्श्वभूमीवर फोटोला हे असे शीर्षक देणार्‍या व्यक्तीची मानसिकता किती नीच दर्जाची असू शकते आणि खुद्द फोटो देखिल किती हीन पातळीचा दर्शक आहे हे वेगळे लिहायला नको.
नि षे ध!
पुलवामा सारख्या घटना का घडतात याचे एक कारण ही आपल्याच समाजातील साचलेली कीड आहे. आपलेच दुर्दैव!

फोटो सभ्य आहे ना ? मग झाले तर..
टाकणारा तेव्हढा नीच, हलकट... चालू द्या ! लवकर मुखवटा गळाला.

Lol

वास्तविक ह्या धाग्यावर आता चर्चा पाकिस्तानचा mfn दर्जा आणि हुर्रियत नेत्यांची सुरक्षा काढून घेतल्यावर पुढे होऊ शकणाऱ्या योग्य अयोग्य परिणाम ह्यावर होणे अपेक्षित होते. पण ईथे तर भलते काही सुरु आहे Sad

योग
जरा आवरा स्वत:ला. इथे इतर सर्वांवर असभ्य भाषेत टिप्पण्या होत असतात. तेव्हां मी कधीही रिएक्ट झालेलो नाही. तुम्हाला एव्हढा कांगावा करण्य़ाची गरज नाही आणि माझ्यावर वैयक्तिक हल्ले करण्याची तर अजिबातच नाही. या दोघांना समजायला हवे की समाजात कसे आवरावे ते. आणि हे त्या संघटनेला रिप्रेझेंट करतात जे उठ्सूठ पाकिस्तान को मिटा देंगे च्या घोषणा ठोकत असतात. भागवतांनी तर सेनेला एकत्र यायला सात दिवस लागतात पण आम्ही देशाला गरज पडेल तेव्हां दोन दिवसात एकत्र येऊ अशा वल्गना केल्या होत्या.

तुमचे जे लोक आहेत त्यांनी कुठेही हिडीस विनोद करावेत आणि तुमच्या मातृसंघटनेचा फोटो जर मिळाला तर त्याला तुम्हच्याच भाषेतले शीर्षक दिले तर तुम्ही एव्हढी आदळ आपट करावी हे सर्व मनोरंजक आहे आणि तुमची मानसिकता देखील उघड करणारे आहे.

२०१४ च्या आधी मोदी दर दोन तासांनी उठून हल्ला झाला की जाब विचारत. आज तेच व्हिडीओ पाहताना पीएम आस्क्स पीएम असे शीर्षक वाचून जनतेचे मनोरंजन होते आहे. तुम्ही व्हिडीओ शेअर करणा-याला नीच म्हणाल पण ज्याने व्हिडीओत सरकारला धारेवर धरले आहे त्याला म्हणणार नाही. तुम्ही देशाचे मनोरंजन करण्याचे ठरवले आहे ते ठीक आहे. पण शिवीगाळ करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला ? तुम्ही आहात तरी कोण ? तुमचे लोक ज्याला त्याला जाब विचारत फिरणार आणि तुम्हाला विचारले की देशद्रोही !

कोण मानसिक रित्या आजारी आहे हे मला सांगायची गरज नाही. तुमचे खरे स्वरूप उघडकीस आलेले आहे. मला तुमच्यासारख्या विकृत आयडीवर एव्हढा वेळ घालवायची आवश्यकता नाही. मी संवाद ठेवू पाहिला, पण तुमची तेव्हढी पात्रता आहे असे दिसत नाही.

फक्त तुमच्याच विचारांना मान्यता दिली तर छान छान, तुमच्या मोदींच्या चुका काढल्या नाही तर वाहवा यातून तुम्ही बाहेर पडू शकणार नाही. त्यामुळे गेट वेल सून म्हणून भलत्याच अपेक्षा ठेवणार नाही. तुम्ही त्या पलिकडे गेलेला आहात.

याउप्पर तुमच्या प्रतिसादांची दखल घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही.

रश्मीताई
मी न्युट्रल आहे असा दावा कधीही केलेला नाही. एका चित्राने तुम्हाला एव्हढ्या वेदना का झाल्या ? त्यांच्या कडून धुळवड चालूच असते की ! तुम्हाला झाल्या का कधी वेदना ? मला असल्या आरोपांना उत्तर देणं अजिबात बंधनकारक नाही. तुम्ही भाजपेयी आहात हे उघड झाले इतकेच. मी भाजपेयीही नाही आणि काँग्रेसीही नाही.

कॅन्सर आवडत नसेल तर एड्स स्विकारलाच पाहीजे असं तुमचं तत्त्वज्ञान असेल तर प्रश्नच मिटला. मला दोन्ही न झालेले आवडते. हा माझा चॉईस आहे आणि तुम्हाला काय वाटते याच्याशी माझ्या वाटण्याचा काही एक संबंध नाही. मला जे आवडेल, रुचेल, पटेल तेच मी स्विकारणार. तुम्ही इथे कितीही प्रचार केला तरीही.

>>याउप्पर तुमच्या प्रतिसादांची दखल घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही.
तुमच्या 'त्या' पोस्ट ची दखल अ‍ॅडमिन ने घ्यावी असे मला वाटते हे निश्चीत.
तुम्हाला कुणाच्या पोस्ट ची दखल घ्यायची असे वा नाही हा तुमचा वै. प्रश्ण. चालू देत. Proud

कृपया माझ्याशी संभाषण करू नये. तेव्हढी तुमची लायकी नाही आणि विकृत माणसांना मी किंमत देत नाही. संपूर्ण भारतभर जे लोक बरखा दत्त सारख्या महिलांना कुठली भाषा वापरतात त्यांनी इतरांना शिकवू नये. Proud

फक्त तो युनिफोर्म जरा नीट घालत चला . अर्थात तो तुमचा प्रश्न आहे. पण फोटो मिळाला तर काय करायचं हा माझा प्रश्न आहे.
या फोटोत तुम्ही असाल तर तसे कळवा अ‍ॅडमिनला. नसेल तर तुमच्या या बंधूंना आक्षेप घेण्यासाठी कळवा, नाहीतर गावठी जेम्स बॉडला कळवा.
मला फरक पडत नाही Lol

https://boltahindustan.in/bh-news/alka-lamba-commented-on-sadhvi-prachis...

या असल्या लोकांची दलाली करण्यापेक्षा आयडी उडाला तरी चालेल मला.

मी न्युट्रल आहे असा दावा कधीही केलेला नाही. >>>> ओके, ते किरण वेगळे होते मग, जे कुठल्याच राजकीय पक्षाला मानत नव्हते. त्यांचा आय डी उडाला वाटत.

हो, माझे वडील पूर्वी संघात होते. त्यांनी भरपूर कामे केली आहेत. कुठलाच धर्म वा जात कामे करतांना आडवी आली नाहीत. त्यांना राजकारणात अजीबात रस नाहीये. त्याचमुळे जात-धर्म हे कधी त्यांच्या कार्याच्या आडवे आले नाहीत. पण काळानुसार जसा संघ व त्याचे विचार बदलले, ते त्यांना पटले नाहीत, म्हणून त्यांनी ते सर्व सोडले.

पण याचा अर्थ हा होत नाही की संघाने वाईट कामे केली तरी आम्ही त्याला पाठिंबा देऊ. आणी मला कोणाचा प्रचार करण्याचीही गरज नाही कारण मलाच घाणेरडे राजकारण पटत नाही.

त्यांच्या कडून धुळवड चालूच असते की ! >>>>>. धुळवड कोण करत नाहीत? जे करतात ते त्याची फळे भोगतात हे मी स्वतः डोळ्याने बघीतले आहे. मी वर लिहीलेच आहे की राहुल गांंधी यांना अतीरेक्याबरोबर दाखवणे चूकच होते ते. नाही पटत मला असे निष्कारण कोणाला गोवणे.

मला तुम्ही भाजपेयी म्हणा, संघी म्हणा किंवा काहीही म्हणा. मला त्यांचा प्रचार करण्याची गरज वाटत नाही. काम केले तर तरतील नाहीतर आपटतील. बाकी पक्षाबद्दल बरेच लिहु शकते, पण सगळ्याच पक्षात एवढी घाण आहे की ती काढायला सामान्य जनतेला १०० वर्षेही पुरणार नाहीत.

एका चित्राने तुम्हाला एव्हढ्या वेदना का झाल्या ? >>>>>>>>>. वेदना झाल्या म्हणण्यापेक्षा कीव वाटली. मायबोलीवर बायका सुद्धा चालू घडामोडी या सदराच्या मेंबर्स आहेत हे लक्षात घ्या. बाकी तुमची मर्जी. कारण काँग्रेस व समाजवादी भाजपा सारखेच नंगे आहेत. एकाला झाका व दुसर्‍याला काढा. सगळ्याच पक्षात आयाराम गयाराम आहेत. तिकीट जो देईल तोच त्यांचा मालक. मग सगळे निष्ठावान कुंपणावर बसुन वाट बघतात.

बास !! मी इथेच थांबते.

रश्मीताई
फक्त मुद्द्याचे बोलता आले असते की. त्यासाठी न्युट्रल आहे का, बुरखा फाटला याची काय गरज ? आणि मला जे लागू नाहीत ते प्रश्न विचारण्याचा संबंध काय ? तुम्ही फक्त एव्हढेच म्हणायचे की महिलांना हे चित्र आक्षेपार्ह वाटू शकते. ते तुम्हाला आत्ता सुचतेय. मुद्याचे बोललाच नाहीत. मी सहजच मान्य केले असते.
बाकी, तुम्ही एक पुरूष आहात हे मला ठाऊक आहे. असो.

न्युट्रल कुणीही नसतं. तसा मनुष्य दांभिकच म्हटला पाहीजे. पण २४ तास चिखलात लडबडण्यापासून दूर राहणे मी पसंत करतो. पण मायबोलीवर तुम्ही पर्याय काय ठेवता ? तुम्ही २४ तास धुळवड खेळा आणि एखाद वेळी कुणी प्रतिसाद दिला की
बुरखा फाटला, न्युट्रल मधून बाहेर पडल्याबद्दल अभिनंदन
अशी हास्यास्पद भाषा वापरता.
खरंचच तुम्ही उत्तर देण्याच्या पात्रतेचे प्रश्न विचारलेत का ? या प्रश्नाचे उत्तर मिळते का पहा आणि मगच थांबा.

बाकी, तुम्ही एक पुरूष आहात हे मला ठाऊक आहे. असो.>>>> ओके Proud अभिनंदन !! तुम्हाला महाभारतातल्या संजय सारखी दूर दृष्टी मिळालीय. आनंद आहे. तुम्ही पण खुश रहा या गैरसमजात.

जाता जाता, मी जर पुरुष असते तर यापेक्षा गचाळ फोटो इथे टाकले असते, जसे तुम्ही केलेत तस्सेच. कारण मला जरी असे फोटो माझ्या वॉटस अ‍ॅप वर आले तरी मी कधीही कोणाला फॉर्वर्‍ड केले नाहीत.

तुम्हाला मला पुरुष समजायचे की बाई याच्याशी मला काहीच घेणे देणे नाही. कारण माझे खाजगी जग मी नेटपासुन मी लांबच ठेवते.

Pages