पुलवामा हल्ला.

Submitted by Filmy on 15 February, 2019 - 04:09

ह्या भ्याड हल्ल्यात ४० हून अधिक जवान मृत्युमखी पडले आहेत आणि कित्येक जखमी झाले आहेत.
ड्युटी जॉईन करायला निघालेल्या जवानांच्या वाहनांवर हल्ला झाला आहे. नेहमीपेक्षा अडीचपट अधिक जवानांचा ताफा होता. ३५० किलोची स्फोटके घेतलेला ट्रक वाहनांना जाऊन धडकतो आणि त्याचवेळी गोळीबारही होतो म्हणजे हा नक्कीच पूर्वनियोजित कट आहे आणि आपले इंटेल काय करीत आहे?

जैश ए महम्मद या अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पण आपल्याकडे या अपयशाची जबाबदारी कोण स्विकारणार आहे? सरकार? ५६ इंची छातीचा लोहपुरुष? संरक्षण मंत्री? गृहमंत्री? डोवाल? लष्कर? इंटेलिजन्स एजन्सीज?

उरी नंतर गाजावाजा करून सर्जीकल स्ट्राईक केले. त्यावर राजकारण केले गेले. नुकताच चित्रपट काढून जाहिरातीही केल्या आणि आता पुन्हा तीच आवृत्ती?

हे कधी थांबणार आहे का? सरकारला पर्यायाने आपल्यालाही काय करावे लागणार आहे याची थोडीतरी कल्पना आहे का? मुळात प्रश्न काय आहे याची जाणीव तरी आहे का? जाणीव नसणाऱ्यांनाच आपण सत्तेच्या चाव्या देत आहोत का?

निषेध, राग, उद्विग्नता, उदासीनता, RIP इत्यादींच्या स्मायली आणि बाष्कळ ओळी टाकण्यापेक्षा ठोस काही होणार आहे का? कधी?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पुरावे असतीलच त्या २० लाखाच्या ट्रक सारखे !
Submitted by लखू_रिसबूड on 16 February, 2019 - 15:06

डोवाल मसूद अझहरला सोडतांना स्वतः गेला होता कंदहारला .. फोटोसकट पुरावे आहेत. तू बघून घे गुगल सर्च करुन. त्या देशी बाँडच्या मुलाचे पाकिस्तानी कनेक्शन जगजाहिर आहे त्याचे काय बोलतो का कधी तू?

देशाचा संरक्षणाचा प्रश्न हा देशातील प्रश्न नाही का?
सध्याच्या सरकारच्या मते गाय मारल्याने सुद्धा देशाची सुरक्षितता धोक्यात येते, मग त्या बद्दल पण बोलायचे नाही का?
लष्करी दलांना प्रश्न विचारायचे नाहीत का?
लष्कराला गरजेच्या गोष्टी न पुरवता, पुतळे जाहिराती यावर खर्च करणाऱ्या नेभळट सरकारला प्रश्न विचारायचे नाहीत का?

आणि हे प्रश्न विचारले म्हणजे देश हिताला तिलांजली दिली हे तुम्हाला कोणी सांगितले?

हे माज मत राजकीय हेतूंनी प्रेरित नाही सर्वसामान्य जनता अासाच विचार करते .
उघडा डोळे बघा नीट

लखू रिसबुडच्या बुडाला फार मिर्ची लागली की त्याला डोवालबद्दल इतकी महत्त्वाची माहिती कशी काय नाही. अरे लेका, संघी बदमाश असेच असतात. गोड गोड गोष्टीच फक्त सांगतात, त्यांना त्रास होईल अशा कध्धी कध्धी सांगतच नाहीत. जा आता, बाळगुट्टी घ्यायची वेळ झाली असेल तुझी.

सरकारला प्रश्न जरूर विचारावे आणि आजच आताच विचारावे याबद्दल दुमत असू शकत नाही.
पण काही लोक ते प्रश्न अशा टोन मध्ये विचारतायत कि बघ मोदी कसा धडा शिकवला तुला आमच्या जैशने. काय वाकडं नाही करू शकत तू आमचं.
थोडक्यात, सोशल मीडियावर काही मोदीविरोधी लोकांमध्ये पाकिस्तानविरुद्ध सात्त्विक संताप दिसत नसून विजयोन्माद दिसून येतोय. सर्जिकल स्ट्राईक झाले तेव्हा रडारड झाली आणि आता एकदम संधी मिळाल्याप्रमाणे आक्रमकता सुरु आहे. यांना शत्रू फक्त एकटे मोदीच वाटतात, पाक आणि जैश नाही. हे भयानक आहे.
सन्माननीय अपवाद आहेतच त्यामुळे त्यांनी स्वतःला वरील पोस्टमधून वगळावेच.

देशाची व्याख्या काय आहे ?
भूमी chya सीमा म्हणजे देश नसतो .जनता ही महत्वाचं घटक आहे मग त्यांच्या विचारांचा सन्मान नको?

तुम्ही तुमचं स्वतःचं मत मांडा हो,
उगा आपली मतं जनतेच्या नावावर खपवणारे मला बनेल वाटतात. म्हणजे आपल्या स्वतःच्या मतांचीही जबाबदारी घ्यायची भिती वाटते. बाकी जनता येतेच आहे की इथे आपआपली मते मांडायला. तिचे वकिलपत्र घ्यायची कोणाला गरज् नाही. ओपन फोरम आहे.

२०१४पुर्वी दहशतवादी हल्ला झाला की आंदोलने व्हायची , सरकार वर टीका व्हायची , पंतप्रधानांना बांगड्या पाठवल्या जायच्या , मंत्र्याचे राजीनामे मागितले जायचे...
हल्ली असं झालं तर ब्रह्महत्येचे पातक असते. एवढीच आठवण मोदी-भाजप विरोधक करुन देत आहेत.

बाकी देशासोबत सगळेच आहेत्, मोदी भाजप म्हणजे देश नाही.

डांगे sir तुमचं शेवटचं वाक्य १०० percen योग्य आहे
Bjp म्हणजे देश नव्हे मान्य .
पण काँग्रेस chya. राज्यात bjp नी मूर्ख पना केला म्हणून bjp chya राज्यात आपण मूर्खपणा करायचं भले देशाचं नुकसान झालं तरी चालेल हे मात्र patnya सारखं नाही

डांगे sir तुमचं शेवटचं वाक्य १०० percen योग्य आहे
Bjp म्हणजे देश नव्हे मान्य .
पण काँग्रेस chya. राज्यात bjp नी मूर्ख पना केला म्हणून bjp chya राज्यात आपण मूर्खपणा करायचं भले देशाचं नुकसान झालं तरी चालेल हे मात्र patnya सारखं नाही

राजकारण करू नका म्हणणाऱ्या भाजपने सरकारवर जसे हल्ले चढवले होते त्याची आठवण करून देणे हा मूर्खपणा आहे का?

जीव गेलाय ४४ सैनिकांचा , रोज कोणी ना कोणी शहीद होत आहे. बरे लढून समोरच्या दुष्मनाचे दहा वीस मारून वीरगती आली तर हरकत नाही, पण नाहक असे जीव जाणे हे सरकारी यंत्रणेचे अपयश असते, त्याबद्दल प्रश्न विचारलेच पाहिजे. जबाबदारी निश्चित झाल्या पाहिजेत. इथे सरकार कोणाचे आहे ह्याला काही अर्थ नसतो. सैन्य आपली कारवाई आपल्या पद्धतीने करेन, पण सरकारला प्रश्न विचारू नका हे म्हणण्याआधी सरकारपक्ष विरोधकांवर ह्या हल्ल्याची जबाबदारी टाकून मोकळा होत आहे तेही कुठलाही अन्वेषण अहवाल आलेला नसतांना हे लक्षात घेतले पाहिजे..

देश हिता विरुद्ध बोलणारे मग ते काँग्रेस aaso bjp असो नाहीतर देशातील कोणताही पक्ष किंवा व्यक्ती आसी मूर्ख नाही म्हणता येणार पण ठराविक विचाराची कावीळ झालेला आहे आस नक्की म्हणेन

फोटो मॉर्फ करून एखाद्याला बदनाम करताना कोणती देशसेवा करतात हे भक्त लोक? तेव्हा ह्या दुर्देवी प्रसंगाचं गांभीर्य नसतं का त्यांच्याकरता?

बाँडच्या मुलाचे पाकिस्तानी कनेक्शन जगजाहिर आहे त्याचे काय बोलतो का कधी तू?

असं रे काय करतोस संदीप ?
किती जुनी ओळख आहे आपली... एकमेकांना अरे तुरे करण्याचा हक्काच आहे आपला !

त्या वीस लाखाच्या ट्रक मधून देशभर फिरणारे ते पुरावे सापडले कि इथे दे बरे.
मग बोलू आपण. तो पर्यंत मी काही म्हणजे काही उणेदुणे बोलणार नाही तुला.

अर्थात २६-११ नंतर २४ तासात पत्रकार परिषदेतच पंतप्रधान म मो सिंग यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे चालते. तेव्हा प्रश्न विचारणे राष्ट्रभक्ती होती, बांगड्या पाठवण्याची भाषा विरश्री होते. आता प्रश्नाची निव्वल कल्पना पण द्रोह आहे, तुम्हाला लागलीच जैशच्या रांगेत.

सर्जिकल स्ट्राईक बद्दल आपत्ती घेणारे कुणीच नव्हते... आपत्ती कशाबद्दल होती? (१) इतिहासात पहिल्यांदाच असे झाले / केले , या आधी असे कधीच नव्हते झाले (२) प्रचंड जाहिरात बाजी. एव्हढी जाहिरात केली कि त्या कारवाईचे नेतृत्व करणार्‍या ले ज अधिकार्‍याने नापसंती व्यक्त केली होती.

<< Our family ready to sacrifice if there is direct war. But this type of attack is not at all accepted >>
---- महेन्द्र great respect about your views, शब्द नाहीत.

प्रत्येक लढणार्‍या सैनिका बद्दल, आणि त्याहीपेक्षा त्यांच्या परिवाराबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात आदर, प्रेम भावना आहे, असायलाही हवी. ते पराकोटीचा त्याग, दर दिवशी करत आहेत. त्यांच्या त्यागाला सलाम.

गाडीतल्या स्फोटकांचा स्फोट झाल्याबरोबर तीनशे किलो हा आकडा कसा काढला गेला असेल ? अज्ञानापोटी आहे प्रश्न.

इम्पॅक्टवरुन सहसा काढतात. परंतु ३५० चा आकडा जैशने दिल्याचे समजते. अधिकार्‍यांनी तो दावा फेटाळून लावून ६० किलो सांगितले आहे. अर्थात एक अख्खि बस संपूर्ण उध्वस्त करायला किति किलो लागेल हे तज्ञालाच महिति असेल.

ISEE Blasters' Handbook, 17th ed. चा वापर करून कुठले स्फोटक किती किलो वापरले तर किती टीएनटी इतकी उर्जा उत्पन्न होते हे समजू शकते. काही ठिकाणी थेट कन्व्हर्जन टेबल्स सुद्धा वापरले जाते. पण जर हे ३०० किलो आरडीएक्स असेल तर स्फोट मोठा असायला पाहीजे.
लगोलग ३०० किलो पैकी ६० किलो आरडीएक्स होते असा खुलासा झालेला आहे. हे कसे समजते हा प्रश्न त्यामुळे गडद होतो.

<भूमी chya सीमा म्हणजे देश नसतो .जनता ही महत्वाचं घटक आहे मग त्यांच्या विचारांचा सन्मान नको?>

अगदी, अगदी. फक्त काश्मीरला वेगळा न्याय आहे. ती भूमी आमची आहे, पण तिथले लोक आमचे नाहीत. आता देशभरात जागोजागी काश्मिरी लोकांना धरून त्यांच्यावर बळ आजमावून आपल्या क्षात्र्रतेजाचं आणि राष्ट्रीयत्वाचं प्रदर्शन करणं सुरू आहे.

अतिरेक्यांना जे हवंय नेमकं तेच होतंय.

भारता ने काश्मिरी लोकांचे अधिकार (राज्यघटेनुसार असलेले) कधीच नाकारले नाहीत किंवा भारतीय जनतेनी सुधा त्या अधिकारांचा विरोध केला नाही .
मेडिकल clg पासून शिक्षणात सर्व राज्यात राखीव जागा .
केंद्र सरकार दर वर्षी बाकी राज्यांपेक्षा जास्त पैसे देते तेथील जनतेच्या कल्याण साठी मग आस कस बोलता काश्मिरी जनतेला भारत आपली manat नाही .आणि केंद्र सरकारने काश्मिरी लोकांचे संरक्षण करावे असे आदेश सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना नक्कीच दिले आसणार हयात शंकाच नाही

आता देशात अनेक ठिकाणांहून काश्मि री लोकांना टारगेट केले जात असल्याच्या बातम्या येताहेत.

सध्याच्या सरकारचे अनेक समर्थकच काश्मिरींविरोधात भावना भडकवताना दिसत आहेत.

Pages