म्हणी, वाक्प्रचार आणि त्यांचा उगम व अर्थ.

Submitted by कोदंडपाणी on 10 February, 2019 - 06:07

ग्रामीण बोली भाषांतील शब्द येथे वाचता येतील.

मला ग्रामीण भाषेतले शब्द आवडतात. रोजच्या बोलण्यामध्ये, ऐकायला छान वाटतात. त्यासाठी मी एक धागा काढला आणि त्याला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे मला फक्त शब्द अपेक्षीत होते पण येथे शब्दांबरोबर त्यांचे अर्थ, त्या वस्तुचा उपयोग आणि साधारण स्वरुप वगैरे खुप माहिती तर मिळालीच पण खूप जुन्या आठवणीसुद्धा जागवल्या गेल्या. प्रत्यक्षात मला मात्र यात शब्दांची, माहितीची जास्त भर घालता आली नाही. कुणा कुणाचे नाव घेऊ? सगळ्यांचेच खुप आभार. खुप सुंदर आणि नविन शब्द कळाले तुम्हा सगळ्यांमुळे.

त्या धाग्यावर भरत यांनी सुचवले की वाक्प्रचारांच्या चर्चेसाठी वेगळा धागा काढा. या अगोदर असा काही धागा असेल तर मला सापडला नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण आपल्याला माहित असलेल्या सुंदर, मजेशीर, विनोदी अशा म्हणी देऊयात. शक्यतो त्या म्हणींचा उगम आणि अर्थ माहित असेल तर वाचायलाही खुप छान वाटेल.

त्या धाग्यावर अप्पाने (शाली) दिलेल्या दोन म्हणींनेच सुरवात करुयात.

पुर्वी ऐनवेळच्या लढाईला सैनिकभरती व्हायची. सैन्य युध्दकुशल असण्याची आवश्यकता नसायची फक्त समोरच्या सैन्यावर दबाव टाकन्यासाठी संख्या महत्वाची असायची. त्यामुळे मिळेल त्याला सैन्यात भरती करत. त्यांची मोजदाद व्यक्तिनुसार न करता घोड्यानुसार करत. म्हणजे किती खोगीर जमा झाले हे पहात. (खोगीर म्हणजे घोड्याच्या पाठीवर बसण्यासाठीचे चामडी आसन.) त्यामुळे मुर्खांच्या किंवा अकुशल लोकांच्या भरतीला 'खोगीर भरती' नाव पडले. जे आपण आजही वापरतो. तसेच सैन्यामुळे मिळालेले अनेक वाक्प्रचार आजही वापरात आहेत. जसे पाचावर धारण बसणे. पाचावर धारण जाणे किंवा बसणे हा धान्याचा बाजार भाव आहे. साधारण एक ते सव्वापर्यंत धारण असेल तर सैन्यात धान्य स्वस्त आहे असे समजले जाई. पण अगदी पाचाच्या वर धारण गेली याचा अर्थ सैन्याला फाके पडणार हे नक्की. त्यामुळे सैन्य घाबरुन जाई. त्यामुळे घाबरण्यासाठी "त्याची पाचावर धारण बसली" म्हणतात. या मोजमापाविषयी जाणकार सांगतीलच.

गाशावरुन एक आठवले. घोड्यावर खोगीर घालायच्या अगोदर एक चामड्याचे तुकडे जोडुन तयार केलेले आच्छादन घोड्याच्या पाठीवर घालायचे. त्याचा बराचसा भाग हा घोड्याच्या दोन्ही पुठ्यांवर येई मग खोगीर आवळत असत व त्यावर गाशा टाकत. या चामडी आच्छादनाला पाखर म्हणत. त्यामुळे घोड्याच्या पुठ्यांना काट्याचा, झुडपांचा त्रास होत नसे. आपण "मायेची पाखर घालणे" असं म्हणतो ती हिच पाखर. मायेची पाखर घालणे हा वाक्प्रचार नसुन ती उपमा आहे. माझ्या आजोबांच्या घोड्याची पाखर आत्ता काही वर्षांपुर्वीपर्यंत आमच्याकडे होती.
(वरील तिनही म्हणींची माहिती शाली यांनी दिली आहे.)



तुमच्याकडे म्हणींचा उगम असेल तर उत्तमच नाहीतर फक्त म्हणी आणि वाक्प्रचार लिहिल्यातरी चालतील.
करुया सुरवात?... ... ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरण्या झाल्या बरण्या अन म्हाताऱ्या झाल्या हरण्या
हे याचेच फिमेल व्हर्शन आईकडून ऐकले आहे.

श्रीमंताच्या घरचा कुत्रा, त्याला म्हणा 'अहो हाडा'
मान अपमानाचे महत्व पाहिले का? Happy

सख्ख्या सासूला दिली लाथ, चुलत सासूचा कापला कान, तिथे मामे-सासू मागते मान
हे एक अजून उदाहरण.

इथे पण मी खूप म्हणी लिहिल्या होत्या.>>> हो तोच वाचून म्हंटलं मी कि तू म्हणींची शाळा आहेस ..
विद्यापीठ म्हणायला हवं खरं तर ! Happy

सख्ख्या सासूला दिली लाथ, चुलत सासूचा कापला कान, तिथे मामे-सासू मागते मान>>> बाबौ. हे तर लईच लांब गेलं. Biggrin
दक्षिणा खरच खुप छान म्हणी दिल्या तुम्ही. भारीच आहेत सगळ्या.

अप्पा, भय्या, याचे संदर्भासहित स्पष्टीकरण द्या...<<< ती म्हण दक्षिणा यांनी दिली आहे, त्या देतील संदर्भ. आमचा कांदा शेतातुन सरळ मार्केटला आणि वाईट नशिब असेल तर रस्त्याला पडतो.

पेव: धान्य साठवायची चोकोनी विहिरीसारखी जागा.
पिसा: वेडा.

'बाजारात तुरी आणि, भट भटणीला मारी'
<<
याची गोष्ट मी पूर्वी लिहिली आहे माबोवर.

घरी येताना बाजारात नवी तूर आलेली भटजीबोवांना दिसते.
घरी येऊन बायकोला सांगतात, 'अगं मस्त नवी तूर आली आहे. उद्या विकत आणतो, मग तू मस्त (दाल फ्राय) बनव'
बायको म्हणते 'छेछे! नव्या तुरीचं पिवळंधम्मक पातळ वरण, भात तूप लिंबू काय झकास लागतो'
साहेबांना दालफ्राय हवी असते अन बाईसाहेबांना वरण. लवकरच बाब तू-तू मै-मै वर जाते, पब्लिक जमा होतं, इकडे दोन्ही पार्ट्या इरेला पडलेल्या. शेवटी भडजीबुवा (त्याकाळच्या रीतीनुसार) बायकोला दोन चार दणके देतात.
मध्यस्थी करणारी लोकं शेवटी प्रकरणाच्या मुळाशी पोहोचतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, की अजून तूर बाजारातच आहे, पण ती शिजवायची कशी यावरून प्रकरण हातघाईला आलं आहे.

तेव्हा पासून म्हण सुरू झाली,

बाजारात तुरू, अन भट भटणीला मारी.

अन अर्थात, पुढचा भागही तिथे योग्यच आहे.

मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू
अर्थ - छोट्याशा गोष्टींनीही हुरळून जाणे

लाज नाही मला कोणी काही म्हणा
अर्थ - निर्लज्ज माणूस कशालाच घाबरत नाही.

दुसर्‍याची कढी धावू धावू वाढी
अर्थ - इकडचे तिकडे दान करणे.

थाळ वाजवून साप घरात घेणे>>> आबा ही म्हण मी ही ऐकली आहे पण समजली नाही. थाळ वाजवुन साप कसा घरात येईल? असा काहीसा प्रश्न पडतो.

दुसर्‍याची कढी धावू धावू वाढी>>> अगदी अगदी

Submitted by आ.रा.रा. on 13 February, 2019 - 20:31>> आ.रा.रा. मी ही अशीच कथा ऐकली आहे पण तुम्ही दालफ्राय वगैरे शब्द वापरुन मस्त तडका दिला कथेला.

थाळ वाजवून साप घरात घेणे
<<
घराबाहेर साप निघाला, तर त्याला हाकलायला थाळीवर लाटणं बडवू लागले. साप घाबरून पळाला, तो तुमच्याच घरात शिरला. असलं काही असावं.

बालपणीं आम्ही भावंडं दुपारी कधीच एकाच वेळी जेवायला घरीं येत नसूं. मग त्रासून आई म्हणायची, 'असे फुटक्या तारवासारखे नका रे येवूं जेवायला !'
तिला काय म्हणायचंय तें त्यावेळीं कळलं तरी त्या शब्दप्रयोगाचा नेमका अर्थ मात्र खूप नंतर कळला. एखादं तारू/ गलबत/ जहाज/बोट भर समुद्रात फुटली/बुडाली, तर त्याचे वेगवेगळे भाग , तुकडे समुद्रातील प्रवाहांमुळे वेगवेगळ्या ठीकाणी, वेगवेगळ्या वेळी किनारयाला लागत असतात. ( अर्थात, आई व शब्दप्रयोग दोन्ही मालवणी हें सांगायलाच नको !)

मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार
https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5142173193206251856

पुस्तकाच्या नावावर जाऊ नका. ग्रामीण आणि शहरी बोलीभाषेतील अनेक म्हणींचे आणि वाक्रप्रचारांचे माहितीपर आणि अभ्यासपूर्ण संकलन दिलेले आहे.

सतीच्या दारी बत्ती, आणि छीनालीच्या दारी हत्ती.
मागो, प्रथमच ऐकली ही म्हण. अशीच एक म्हण ऐकली होती पण शब्द नक्की आठवत नाहीत.
चोर पकडावा हाटी आणि शिंदळ पकडावी खाटी.
(शिंदळ - व्यभिचार)

घरची म्हणत्ये द्येवा द्येवा, शेजारणीला चोळी शिवा
खायची बोंब अन हगायचा तरफडा

वर दिलेल्या म्हणींच्या धाग्यावरच वाचलीय...

*लंगडण्याचा आणि शहाणपणाचा संबंध?* - लंगडी गाय इतर मोठ्या गुरांबरोबर लांब चरायला जावूं शकत नाही. त्यामुळे, ती वासरांसोबतच असते व तिथे शहाणी ठरते .

माकडाची लाकडं, चुलीला साकडं.
जंगलात माकडं लाकडं न पेटवता शेकोटी करतात त्यामुळे लाकडातील अग्नीतत्व नष्ट होते व अशी लाकडे कितीही प्रयत्न केला तरी पेटत नाही असे वन्य अभ्यासक मारूती चितमपली ह्यांच्या तोंडून ऐकले आहे .

अर्थ नाही लक्षात आला.
सोयीची जागा निवडल्याने मुख्य काम सोडून अनावश्यक काम करावे लागणे . पाणी जवळ पडेल म्हणून एखादा घागरीपाशी जेवायला जेवायला बसतो परंतू त्यामुळे आजूबाजूचे सगळे त्याच्याकडेच पाणी मागतात .

ओह! आता लक्षात आले.

आंजावर वाचलेली ही एक म्हण. छान आहे.
असतील मुली तर पेटतील चुली.

Pages