मराठी म्हणी

Submitted by माणूस on 14 January, 2009 - 19:44

म्हणी साठीचे पान...

हमारे लिये काला अक्षर भैस बराबर है, इसलीय हमारे काले अक्षर मे चुका रहीगे तो कानपर्दा कर लो

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चाराण्याच्या कोंबडीला रुपायचा मसाला, ह्या अर्थाची एखादी ईंग्रजी म्हण आहे का?

मी आज त्याचे एका पत्रा मधे असे रुपांतर केले

This is like to cook $ 5 chicken, I have to purchase $ 100 extra ingredients

"खायला फुटाने अन टांग्याला आठाने"

ही मराठी म्हण लागु पडेल. तु भाषांतर जबरी केले आहेस. Happy फुटलो.

हे काय कुणालाही ईंग्रजी अर्थाची म्हण माहीत नाही Sad

अस तरी म्हण..
chicken a dollor, spices 5 dollors.

- अनिलभाई

This is like to cook $ 5 chicken, I have to purchase $ 100 extra ingredients>> अरे इथल्या लोकांना इतका मसाला लागत नाही...कोंबडी घेतली , ओव्हन मधे टाकली आणि काढुन खाल्ली की झालं Wink

अरे इथल्या लोकांना इतका मसाला लागत नाही...>>>> Lol अगदि खरंय...

मग असं म्हण... $5 chicken needs $500 oven .. Proud

आमचे लहानसे, छोटेसे app ह्या लोकांना एका नावाजलेल्या तीन अक्षरी युरोपीअन कंपनीच्या सर्वर वर चालवायचे होते.

त्या तीन अक्षरी कंपनीच्या कागदांचे २ आठवडे वाचन झाल्यावर माझ्या तोंडातुन ती वाक्य बाहेर पडली.

पण TP बास, अजुन कुणालाच ईंग्रजी भाषांतर जमले नाही का?

English Idiom:

our i's are dotted and t’s are crossed.

एखादे काम पुर्ण झाले असे म्हणण्यासाठी जे काही करावे लागते, ते सागळे केले गेले आहे.

running लिपी (longhand) मधे लिहीताना लोक i आणि j वर टिंब द्यायला व t मधे cross द्यायला थांबत नाही, संपुर्ण पेज लिहुन झाल्यावर शेवटी परत वाचताना टिंब आणि cross देतात. त्यावरुन पडलेली म्हण.

our i's are dotted and t’s are crossed. मस्त आहे, पूर्वी वाचली नव्हती. Happy

आपल्यकडे आखूड शिंगी आणि बहुदुधी असं म्हणतात ना - तर जर्मनी मध्ये आमचं नवीन प्रोजेक्ट्च्या requirementsचं discussion चाललं होतं. आमचा analyst वैतागून म्हणाला - यांना 'eierlegende Wollmilschsau' पाहिजे. म्हणजे अंडी घालणरं, लोकर आणि दूध देणरं डुक्कर!

- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/

This is like to cook $ 5 chicken, I have to purchase $ 100 extra ingredients
-------------------------------------------------------------------
महान भाषांतरः) बदलु नकोस , हेच ठेवः))

मोरीला बोळा आणि दरवाजा मोकळा.... - 'Penny wise pound foolish...'
पैसे वाचवायचे आणि रूपये घालवायचे...

आमच्या कामवाल्या बाईंनी नवीन सुनेचं केलेलं वर्णन
"घरात घान दारात घान आन हुबी र्‍हायली गोरीपान"
अर्थ सांगायची गरजच नाही. Lol

ही मी ऐकलेली...

"मी नाही त्यातली, कडी लावा आतली.."

ही अजुन एकः
फुकटचा च्या आन घुटुघुटु प्या!

शिदुळाले आला राग नी मले म्हना फण्या नाग!

खानदेशी म्हण. शिदुळ = गांडुळ

हि एक नविन
माझ्याकडे पहा आणि फुल वहा....

कट्टयावर ऐकलेली म्हण,
कौतुकाची वरात आणि हगायलाही परात !!

अर्धा वैद्य, मरणास खाद्य
अघळ पघ्ळ वेशीला ओघळ
अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल

Lol
अरे काय धम्माल म्हणी आहेत या.. सॉल्लिड Rofl

जिथे फु़कट तिथे फॅमिली सकट
धु म्हनल कि धुवायच, लोंबतया काय म्हणुन इचारायच नाय
जे फुकट, ते पौष्टिक
रिकामा सुतार, कुल्ले तासी
डोक्यावर बशिवला, तर कानात मुताया लागला..

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

काय चालवलय, जनाची नाहीतर मनाची तरी जरा.

का आपल्याला कोण ओळखत नाही म्हणून काहीही लिहीत सुटायचे.

खाई त्याला खव खव Lol

****************
पानावरती कितीक मजकूर शब्द नव्हे ती किटकिट रे... Lol

मक्या उवाच :
वीतभर गजरा आन गावभर नजरा!

Pages