तुझमे तेरा क्या है - ५

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 16 January, 2019 - 07:14

या आधीचे भाग ईथे वाचा
तुझमे तेरा क्या है -१
https://www.maayboli.com/node/53637

तुझमे तेरा क्या है -२
https://www.maayboli.com/node/53652

तुझमे तेरा क्या है -३
https://www.maayboli.com/node/65884

तुझमे तेरा क्या है - ४
https://www.maayboli.com/node/68484

पुढे चालू

मी बघतच राहिले. तो इतका वेळ बाहेर थांबला होता! का? मी मेसेज करायला हवा होता का घरात आल्यावर? पण काय म्हणून? त्याच विचारात मला झोप लागली.
नंतरचा एक आठवडा थोडा निवांत होता. बरोबर एका आठवड्याने आमच्या ऑनसाईट टीमकडून मेल आला. रवी आणि माझ्या कामाचं त्यांनी कौतुक केलं होतं. माझ्या आयुष्यातला पहिला appreciation मेल! खूप मस्त वाटत होतं. त्या मेलला अनिरुद्धने रिप्लाय केला, ज्यात त्याने आमच्या दोघांच्या sincerity आणि हार्डवर्कचं
कौतुक केलं होतं. लगेचच त्याचा दुसरा मेल आला. आज टीम dinner होतं, to celebrate our team’s hardwork.

मी घरी फोन करून सांगितलं कि मला उशीर होईल. आई बाबांनी जपून ये, काळजी घे म्हणून सांगितलं. आम्ही venue ला पोहोचलो. ते एक मोठं इटालियन रेस्टॉरंट होतं. आधी drinks menu आला. सर्वांनी आपापली ऑर्डर दिली. मला थोडं अवघडल्यासारखं झालं होतं. एकतर मी इतक्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आधी कधीच आले नव्हते आणि दुसरं म्हणजे मी सांगणार काय होते? Drinks घेणं मला या जन्मात जमणार नव्हतं, मग सांगू काय? पाणी? त्याने माझं हसं होईल का? काय करू? अनिरुद्धने अजून ऑर्डर दिली नव्हती. त्याने एकदा माझ्याकडे पाहिलं, मी आधीच बावचळले होते त्यात अजून भर पडली. त्याची ती थेट नजर. मी उगाचच मेन्यूत डोकं खुपसलं. आणि त्याने ऑर्डर दिली.
“Diet coke. Two. मीरा, तुला diet coke चालेल ना?” त्याने विचारलं आणि माझा जीव भांड्यात पडला. माझा प्रश्न त्याने चुटकीसरशी सोडवला होता. मी डोळ्यांच्या कोपऱ्यातून हळूच त्याच्याकडे पाहिलं, मला thank you म्हणायचं होतं. त्याने ते ओळखलं आणि तो छान हसला. Dinner नंतर आम्ही सगळे निघालो. रवी, विराज आणि शेखर एकत्र आले होते, ते एकत्रच जाणार होते. कुमार त्याच्या two wheeler वरून जाणार होता. मी सर्वांना बाय म्हणून निघणार इतक्यात अनिरुद्ध म्हणाला,
“मीरा, थांब. मी सोडतो तुला”
"Thank you पण मी जाईन बसने” मी बोलायचा प्रयत्न केला, त्यावर तो माझ्याकडे बघत फक्त हसला, म्हणाला “चल. इतक्या उशिरा मी तुला बसने जाऊ देणार नाही”
आम्ही निघालो.
“Thank you“ मी म्हटलं.
“Thanks कशासाठी?” त्याने न समजून विचारलं.
“मगाशी मला काय ऑर्डर द्यायची ते कळतच नव्हतं. तुम्ही ऑर्डर दिलीत म्हणून. माझं उगाच हसं झालं नाही.”
आणि तो खळखळून हसला.
“पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही नाही तू! मी तुझ्यापेक्षा ४ वर्षांनी मोठा आहे फक्त, सो तुम्ही वगैरे म्हणायची गरज नाही. आणि हसं? ते का बरं झालं असतं? उलट तू एकटी मुलगी आहेस ग्रुपमध्ये त्यामुळे सगळे अगदी जपून वागत होते आज, त्यांचं हसं होऊ नये म्हणून. इतके कॉन्शस तर सगळे काम करतानाही नसतात.”
यावर उत्तरादाखल मी नुसतीच हसले.
“मीरा, your work was really commendable . I must say, you have worked like our teams level of perfection. And that’s great!
मी जेंव्हा तुला हायर केलं होतं तेंव्हा टीम मध्ये बरीच चर्चा झाली होती या गोष्टीवरून, फ्रेशरला घ्यावं कि नको. But you have proved my decision right “
मला काय बोलावं तेच कळत नव्हतं. मला कधी वाटलंच नव्हतं कि या टीममध्ये माझं सिलेक्शन होईल. आत्ता माझ्या कामाचं अनिरुद्ध कौतुक करत होता. माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता तो. मी त्याला thank you म्हटलं. मला घरी पोहोचल्यावर झोपेपर्यंत त्याचे शब्द आठवत होते. मी अजून मन लावून काम करायचं ठरवलं. इतर कोणी कौतुक केलं असतं तर मला इतकाच आनंद झाला असता का? कि अनिरुद्धने कौतुक केल्यामुळे मला आनंद झालाय? या प्रश्नाशी खेळत मी झोपी गेले.

पुढच्याच दिवशी मला नेक्स्ट प्रोजेक्ट assign झाला. मी आणि कुमार त्यात एकत्र काम करणार होतो. कुमार फारसा बोलका नव्हता. आम्ही एकत्र काम सुरु केलं, मला काही गोष्टी नवीन होत्या. काही शंका विचारली कि तो मला म्हणायचा तुझं तू उत्तर शोध. त्याचंहि बरोबरच आहे म्हणा, किती दिवस मी इतरांना शंका विचारणार होते. मग मी शंकासमाधानासाठी धडपडायचे. काही प्रश्नांची उत्तरं मिळायची काहींची नाही. पण मी मन लावून काम करणं सोडलं नाही.

त्या दिवशी बरंच काम संपवायचं होतं. माझा कोड लिहून झाला होता. रन ही होत होता व्यवस्थित पण काहीतरी छोटीशी चूक होती. Output format मला हवा तसा येत नव्हता. मी बऱ्याच गोष्टी करून बघितल्या पण जमेना. शेवटी मी कुमार ला विचारलं कि यात मदत करशील का? पण त्याने माझ्या मेसेजला काहीच उत्तर दिल नाही. मला लगेच त्याच्या डेस्ककडे जाऊन विचारणं योग्य वाटेना. त्यात आज रवी पण आला नव्हता, नाहीतर मी रवीला विचारलं असतं. लंच ब्रेक पर्यंत प्रयत्न करू नाहीतर परत कुमारला विचारू असं ठरवून मी पुन्हा कोडमध्ये चेंजेस केले. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मी माझ्या desired output पर्यंत पोहोचले होते. अजून थोडं काम बाकी होतं. तेव्हढ्यात निनादने कॉफी साठी फोन केला. तो आणि मी जाऊन कॉफी पिऊन आलो. मग परत मी कामाला सुरुवात केली. मेलबॉक्स मध्ये नवीन मेल चा पॉपअप आला.तो कुमार चा मेल होता. त्याने सव्वाचारलाच स्टेटस पाठवून दिलं होतं. आणि त्यात मी करत असलेलं काम incomplete आहे असं लिहिलं होतं कि ज्याचं स्टेटस मी पाठवेन. मला काही कळेचना, एकतर इतक्या आधी त्याने स्टेटस का पाठवलं? आणि पाठवायच्या आधी त्याने माझ्या कामाचं स्टेटस माहित करून न घेताच मेल पाठवला होता. या आधीच्या प्रोजेक्टमध्ये रवी आणि मी आमचं झालेलं काम डिस्कस करायचो आणि मगच स्टेटस पाठवायचो. त्यामुळे मला कुमारचं हे वागणं जरा वेगळंच वाटलं. मी त्याच्या डेस्ककडे जाऊन पाहिलं तर तो निघून गेला होता. आता मात्र मी ठरवलं, काहीही झालं तरी काम पूर्ण करून स्टेटस पाठवून मगच घरी जायचं. पुन्हा कोडमध्ये डोकं खुपसलं. एव्हाना बराच उशीर झाला होता. अखेर माझा कोड पूर्ण वर्क झाला, आउटपुट मला जसं हवं होतं तसं मिळालं आणि मी “येस्स!!!” म्हणून जवळजवळ ओरडलेच. ”काय हे मीरा? ऑफिस मध्ये आहेस तू! विसरलीस का काय?” असं स्वतःशीच बडबडत मी हसले.
“सो... झाला का कोड वर्क?” मी दचकलेच. मागे अनिरुद्ध उभा होता.
“ओह्ह... I’m sorry...” माझा मगाशी केलेला दंगा याने पाहिला असणार. छे! इतके कसे बावळट आपण? माझ्या मनात विचार आला.
“Sorry? कशाबद्दल? काम छान झालं म्हणून तुला आनंद झाला ना? मग त्याबद्दल माफी का मागतेस? It’s good that you are enjoying your work. In fact it’s great! Keep it up ” असं म्हणून तो त्याच्या डेस्कवर निघून गेला.
मी स्टेटस मेल पाठवला आणि घड्याळात पाहिलं तर ८ वाजले होते. निघायला हवं होतं. कामाच्या नादात खूप उशीर झाला होता, पोटात भुकेने कावळे ओरडायला लागले होते. कॅफेटेरियात कॉफी घेऊन घरी जावं का असा विचार करत असतानाच मागून आवाज आला,
“मीरा...कॉफी?” अनिरुद्ध विचारत होता.
मी मानेनेच हो म्हटलं आणि आम्ही कॅफेटेरियात निघालो.
अण्णाला कॉफी सांगून एका टेबलापाशी येऊन बसलो. मला उगाचच awkward वाटत होतं. ते अनिरुद्धने ओळखलं असावं. मग आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली. घरी कोण आहे, कुठले काय वगैरे. तो आणि त्याचे बाबा दोघेच राहायचे. त्याची आई काही वर्षांपूर्वी देवाघरी गेली होती.

पहिल्यांदाच आम्ही इतका वेळ बोलत होतो. त्याची ती समोरच्याच्या मनाचा ठाव घेणारी नजर पाहून प्रत्येकवेळी मला अडखळल्यासारखं होत होतं. तिच्यात मी अडकायचे आणि सुटणं अवघड होऊन बसायचं. परत तर त्यालाही ते लक्षात आलं बहुतेक. मग त्याच्या नजरेची धार आणखीनच तीव्र झाली. आणि एक मिष्कीलपणाही आला तिच्यात. मग मात्र मी निग्रहाने खिडकीबाहेर नजर खिळवून बोलायला सुरुवात केली.
“काही सापडलं तर मलाही सांग” तो म्हणाला.
“काय?” न कळून मी विचारलं.
“मगापासून काहीतरी शोधतेयस ना खिडकीबाहेर?” त्याच्या बोलण्यातली खोच कळली मला. पण माझ्याकडे त्याचं उत्तर नव्हतं. मी त्याच्याकडे पाहिलं शेवटी. मी पुन्हा हरले होते... खरंतर स्वतःला त्याच्यासमोर हरू
देणं मला आवडायला लागलं होतं.. आणि त्याला जिंकताना बघणंही Happy
क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks हा भाग लवकर टाकल्याबद्दल.. Happy
छान जमला आहे.. हा ही भाग..

Mast:)

धन्यवाद DShraddha, Vchi Preeti, विंगार्डीअम लेविओसा आणि राजसी Happy

खरंतर स्वतःला त्याच्यासमोर हरू
देणं मला आवडायला लागलं होतं.. आणि त्याला जिंकताना बघणंही Happy>> अरेरे

मस्त Happy

मस्त

Chan

"कॉफी आणि बरच काही..." ह्या चित्रपटाच्या कथेशी मिळतं-जुळतं वातावरण असलेली कथा! म्हणजे निदान सध्या तरी... तरीपण; छान आहे! फ्रेश आहे...ह्यावर एखादी short web-series होऊ शकेल... by the way, तू IT मध्ये आहेस का?

कॉफी आणि बरच काही..." ह्या चित्रपटाच्या कथेशी मिळतं-जुळतं वातावरण असलेली कथा! म्हणजे निदान सध्या तरी... तरीपण; छान आहे! फ्रेश आहे...ह्यावर एखादी short web-series होऊ शकेल>>>> धन्यवाद अपूर्व जांभेकर Happy
by the way, तू IT मध्ये आहेस का?>>>
>>>मलाही हीच शंका आहे>>>
IT त होते आता नाही Happy

म्हणुन मी क्रमश: कथा वाचत नाही, दोन भागात दोन जास्तित जास्त तीन दिवसांचा गॅप समजु शकतो.
पण काही काही लेखक महिन्याचे महिने घेतात पुढचा भाग टाकायला Angry

त्या पेक्षा, सरळ ईग्नोर करावे, केलीच कुणी पुर्ण तर मग सगळे भाग एकत्र वाचुन काढणे बेस्ट. तसेही हल्ली आंतार जालावर मुबलक कथा आहेत वाचायला , सो जास्त काही फरक पण पडत नाही

VB Lol