Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
- आता वि च्या डोळ्यात पाणी,
- आता वि च्या डोळ्यात पाणी, उताणा झोपूनही ते गालावरूनच ओघळते, गळ्यातील नॅपकीनचे डिझाईन बदललेले दिसते) >> LOL
- चमचा येतो .. चमचा + खिरीचा क्लोजप ; तोपर्यंत खिरीचा वाडगा, खिरीची लेवल, खिरीचा प्रकार बदलेला दिसतो आणि सुकामेवा गायब होतो> LOL
- मायरा मॅम कॅलरी कॅल्क्युलेट करून सांगणारेत, सरांनी किती थेंब खायची ते. >> LOL
विक्या गुढगायावर बसलाय आणि मायरा डाॅपरनं काही थेंब खीर तोंडात टाकतिये असं डोळ्यापुढं आलं.
सोन्या कायम किती तिरकी उभी रहाते. सरळ दिसतच नाही कधी. तिला इआईच्या संगतीत ठेवायला हवं. ती कायम सरळ ची सरळ उभी असते. धबाधबा इकडे तिकडे जाते जरा म्हणून वाकत नाही.
सुभा नेहमी म्हणत असतो की
सुभा नेहमी म्हणत असतो की विश्वास महत्वाचा आहे आणि सॉंन्या ने बंद खोलीबद्दल म्हटलं तर ईबाळावर का चिडतोय काहीपण..
कारवी मानलं तुम्हाला काय
कारवी मानलं तुम्हाला काय तुफान फटकेबाजी केलीत हसुन हसुन पागल..आणि dialoges पण किती भारी.. आणि ते जड पडदे हलतात हलके स्थिर .....भारीच.
सार्या प्रतिसादांबद्दल आभार
सार्या प्रतिसादांबद्दल आभार
@ देवकी
हिंस्र ना.. हो. स्ट्रेप्सिलचा तो सिंह यायचा ना पूर्वी, तशीच. पैसा, वेळ खर्च करून काय करतात हे लोक? अभिनय / मनोरंजन रोजीरोटी आहे ना तुमची, मग करा जीव लावून, पाट्या का टाकतात?
@ आर्या
त्यांनी द्यावी की पैठणी / कर्नाटकी कशिदा, किमान जयपूर कॉटन तरी. पटकूर दिले तर हेच होणार ना.
@ स्निग्धा
काळजी नको, मी खूप सारे दिवे लेवूनच असते नेहमी ( यारानातल्या गाण्यासारखे). आणि फुटते तेव्हा सुरूंगासारखी, वात खूप वेळ सरसर करत. पदर खोचून, हातातल्या बांगड्या जरा घट्ट वर सारुन, दात ओठ खात + हातात लाटणे / झाडू / दांडके / गरम उलथणे -- हे राहिले.
@ वत्सला
TRP कसा काढतात माहीत नाही. पण आमच्यासारखे प्रतिनिधी झीला पचायचे नाहीत.
खोक्यातला पॅकिंगचा भुसा / कागदाच्या झिरमिळ्या पण ' हे फारच अद्भुत आहे. मी कल्पनाही करू शकत नाही. लोकांना फारच आवडेल. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करून बनवलेली गोष्ट आहे, amazingly fantastic ' असे म्हणत कॅमेरासमोर नाचवणारे प्रतिनिधी असावेत हे बरे.
@ anjali_kool
भाजीवाला परत गेला भाज्या न विकता तरीही मेनू तोच शिजला जो ठरला होता. + ७-८ माणसांच्या कोशिंबीरीला २ किलो तोंडली घेत होत्या ईशादेवी
@ Nidhii
३ दिवस सलग बघून सटकली माझी खरे तर
@ फारएण्ड
वाचा पूर्ण वेळ मिळाला की.
सचिनही पार्थिव पटेलला वेल प्लेड म्हणालाच असेल ना कधीतरी.
@ मेधावि, शुभांगी -- धन्यवाद. संवादांचे स्फूर्तिस्थान मूळ मालिकाच आहे. त्या लेखकांना मुजरा.
आता पूर्ण वाचले धमाल आहे.
आता पूर्ण वाचले
धमाल आहे.
फक्त एक आहे. एक दोन सीन्स या मालिकेच्या लेव्हलच्या मानाने फारच क्रिस्प आहेत. ते मालिकेत आले तर चांगले ताणून येतील. उदा:
खिरीत सुकामेवा आहे. तर ते स्क्रीनवर दाखवणे पुरेसे नाही. "खिरीत तुमच्या आवडीचा सुकामेवा घातला आहे" असे ती खीर देताना म्हणायला हवे. आणि बेदाणे वगैरे स्पेसिफिक्स उपयोगाचे नाहीत. सुकामेवा सारखे ढोबळच म्हणायला हवे. मग या संवादावर एकदा पुष्पा, एकदा निमकर यांनी माना डोलावणे, आईसाहेबांनी कौतुकाने पाहणे, ईशाने नुसतेच हसून पाहणे हे सगळे एकापाठोपाठ.
मग "अगं चमचा कुठाय? चमचा आण" चा एपिसोड. हे ऐकून बॉबी ते मंदा सर्वांनी धावपळ करणे, पण सर्वांना थांबवून ईशाने एक मानवतावादी संवाद म्हणून तिनेच तो चमचा आणायला जाणे कसे योग्य आहे ते सांगणे. आणि मग स्लो मो मधे ईशा वरच्या मजल्यावरून चालत जाते. मधे एकदा पुन्हा "त्या" खोलीकडे बघून रेंगाळते. मग खाली तिच्या स्वागताला काही कारण नसताना तिरसट चेहरा करून उभी असलेली सॉन्या. "चमचा? ओह यू मीन स्पून?" असे तिने विचारणे. मग किचन मधे "कोठे ठेवत असतील चमचे" असे ईशास्वगत आपल्याला ऐकायला मिळून एकदाचा तो चमचा सापडणे. मग हा सर्व सीन पुन्हा उलट्या दिशेने रिपीट.
तोपर्यंत मायराचा सरांना फोन, कॉम्प्युटर कडे बघत ती म्हणत आहे "सर, आज एक चमचा खालच्या मजल्यावरून वरती नेलाय का?"
सर, आज एक चमचा खालच्या
सर, आज एक चमचा खालच्या मजल्यावरून वरती नेलाय का?">>>>>>>>
काल त्या भाजीवाल्यावर दया
काल त्या भाजीवाल्यावर दया दाखवण्यासाठी सर्जेरावाला लंगडत लंगडत पाणी, गोळी, सरबत आणायला पाठवलं.
पुन्हा वाचली कारवी यांची
पुन्हा वाचली कारवी यांची महापोस्ट
कंटिन्यूटी जर्क्स विशेष आवडले
विक्या आडवा असताना सुद्धा खिरीचा ओघळ गालावर हे ही धमाल
सोबत सगळे उभे कामधाम सोडून, >> हा या सिरीज चा ट्रेडमार्क असावा. अनेक सीन्स मधे सर्व उपस्थित लोक असे उभे असतात.
मेधावि - मलाही तो दिवाळीसण उच्चार खटकत होता ऐकताना. पण मला वाटले असतील म्हणत तसेही.
ज्या रेटने पदार्थ कर्जत-मुंबई-कर्जत करत आहेत त्यावरून लौकरच लोकलच्या मोटरमेन ना सरंजामे घरगुती पदार्थ डिलीव्हरी ची जबाबदारी घ्यावी लागणार. गावातून तालुक्याच्या ठिकाणी जाणारे एस्टीचे ओळखीचे ड्रायव्हर्स तेथील विद्यार्थ्यांकरता जसे डबे नेतात तसे.
सरंजामे लोकल विकत घेतील की.
सरंजामे लोकल विकत घेतील की. हाकानाका.
सरंजामे लोकल विकत घेतील की.
असो, पण गडगंज, अब्जाधीपतीची संपन्नता दाखवणं ही खरंतर कथानकाची गरजच नव्हती. लक्षाधीश किंवा कोट्याधीशही चालला असता. उगीच उं. शे. बुडख्याचा मुका कशाला घ्यायचा म्हणतो मी.
इथून पुढे तरी ह्यांनी आपल्या बजेटाचा अंदाज घेऊन श्रीमंती ठरवावी नाहीतर हास्यास्पद होतं सगळं.
अब्जाधीश सरंजामेंच्या खोलीतलं
अब्जाधीश सरंजामेंच्या खोलीतलं कपाट डुगुडुगु हलतं उघडताना. चावी साधारणपणे drawer मध्ये ठेवतात.
किचन आणि बेडरुम मधल्या कपाटांचा रंग सारखाच वाटतो.
नवीन धाग्यावर लिहा लोकहो.
नवीन धाग्यावर लिहा लोकहो.
इथे २००० होउन गेले
कारवी ची फटकेबाजी तुफानी
कारवी ची फटकेबाजी तुफानी
सर, आज एक चमचा खालच्या मजल्यावरून वरती नेलाय का?">>
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=_7WHNTEKFmo&fbclid=IwAR04vuAqg-8ABYj3ykR...
कारवी , क ह र लिहिले आहेस.
कारवी , क ह र लिहिले आहेस. हसून हसून मेले.
प्राजक्ता, मनीमोहोर, सुलू_८२
प्राजक्ता, मनीमोहोर, सुलू_८२ --
आभार
@ स्वस्ति
अब्जाधीश सरंजामेंच्या खोलीतलं कपाट डुगुडुगु हलतं उघडताना. >>>>>
हलत असतील अब्जाधीशांची कपाटं अशी. (नोटांच्या थप्प्यांची जागा / लेवल / आकडा बदलल्यामुळे) आपल्याला काय माहीत. अब्जाधीश झालो की कळेल. आपण पेस्टच्या खोक्याचे पुठ्ठे लावतो आधाराला कपाटाखाली. त्यांच्याकडे कुठले आलेत पुठ्ठे?
+ आता जिथून सरंजामेंच्या बेडरूमचा दरवाजा दाखवतात, त्या जागी काही भागांपूर्वी बाथरूम होता. आणि बेडवर झोपल्यावर पायाकडे येणार्या भिंतीत बेडरूमचा दरवाजा बघितला होता.
@ फारेण्ड
एक दोन सीन्स या मालिकेच्या लेव्हलच्या मानाने फारच क्रिस्प आहेत. ते मालिकेत आले तर चांगले ताणून येतील. >>>>> त्यांना काय सुलभ पैसा मिळतो. ते बहुतेक लिहीतच नाहीत काही. सकाळी ९ ला फिरत्या चाकावर बसवलेला कॅमेरा सुरू करून दिग्दर्शक, कॅमेरामन निघून जातात. ज्याने त्याने समोर येऊन हवे ते करायचे / बोलायचे. ६ ला कॅमेरा बंद. संकलक फासा टाकतो. जो आकडा येईल तितकी मिनीटे कापायची. मग अटक मटक चवळी चटक म्हणत जिथे व्हिडीओ पोचेल तिथे कट करतो. हे २० मिनीटाचा व्हिडीओ उरेपर्यंत करायचे. मग साडेआठला प्रक्षेपण.
मग स्लो मो मधे ईशा वरच्या मजल्यावरून चालत जाते. >>>> ती पहिले बक्षीस घ्यायला स्टेजवर चालल्या सारखी चालते. हो, मीच ती स्कॉलर असे हास्य मिरवत. जणू दुतर्फा लोक उभे आहेत स्टँडिंग ओवेशन द्यायला.
तोपर्यंत मायराचा सरांना फोन, कॉम्प्युटर कडे बघत ती म्हणत आहे "सर, आज एक चमचा खालच्या मजल्यावरून वरती नेलाय का?" >>>>> हो हे राहिलं खरं
आणि शवासन १० मि च करायचे असताना तुमची पाठ ३० मि जमिनीला समांतर असल्याचे सेन्सर रिडींग दिसत आहे असेही सांगेल. नेम नाही.
यांच्या निर्माता आणि वित्तपुरवठादार यांची इन्कम टॅक्सला टीप दिली पाहिजे. चौकशीसाठी रेड पडून ऑफीस, घर, बँक अकाऊंट सील झाले, की मालिका आपोआप थांबेल.
आता मात्र किल्लीच्या धाग्यावर लिहीले पाहिजे. इथे जास्त झाले प्रतिसाद.
सकाळी ९ ला फिरत्या चाकावर
सकाळी ९ ला फिरत्या चाकावर बसवलेला कॅमेरा सुरू करून दिग्दर्शक, कॅमेरामन निघून जातात. ज्याने त्याने समोर येऊन हवे ते करायचे / बोलायचे >>>
हे परफेक्ट आहे. सॉन्याला सगळे अधिकार (म्हणजे एक चेकबुक) देण्याचा एपिसोड असाच वाटला अगदी. टोटल एपिसोड मधे काहीतरी घडले असे म्हणता येइल असे फक्त तीन संवाद होते जे पहिल्या मिनीटात झाले असते. सॉन्याला चेकबुक. सॉन्या केक खाते. सॉन्या त्या खोलीबद्दल विक्याला विचारते. बास. बाकी सगळे रॅण्डम फिलर बडबड.
ती पहिले बक्षीस घ्यायला स्टेजवर चालल्या सारखी चालते. हो, मीच ती स्कॉलर असे हास्य मिरवत. जणू दुतर्फा लोक उभे आहेत स्टँडिंग ओवेशन द्यायला. >>> लोल. टोटली.
हलत असतील अब्जाधीशांची कपाटं अशी. >>> हो अब्जाधीशांकडे खूप गोष्टी असतात. मग दर वेळेस कपाटे भरली की रिक्विझिशन द्यावे लागते. तोपर्यंतच्या काळात गोष्टी चपखल बसाव्यात म्हणून सेल्फ मूव्हिंग अॅड्जस्टेबल कपाटे आणली असतील इटलीहून. पण हे गरिबांचे अब्जाधीश असल्याने उपमा चाळीतील वापरल्या जातात. त्यामुळे डब्यात गहू/पीठ भरत आले की कसे गदागदा हलवून ते चपखल बसवून आणखी जागा करतात, तशी ही कपाटे आपोआप स्वतःच करतात.
बाकी विक्याने चेकबुक देणे
बाकी विक्याने चेकबुक देणे म्हणजे फिल्म कॅमेर्यात नुसताच फ्लॅश मारता येत असे तसे काहीतरी असेल. सॉन्याला सायनिंग ऑथोरिटी वगैरे दिल्याशिवाय त्याचा काही उपयोग नाही. पण कोणत्याही ठिकाणी एक प्रोसेस असते आणि त्याप्रमाणे गोष्टी घडतात हे या सिरीयल ला मान्य नसल्याने चेकबुक दिले की सगळे अधिकार दिले असे आपोआप झाले. त्यात मला आधी वाटले फक्त खर्चाचे अधिकार आहेत. वरच्या रूम मधे काय आहे हे विचारायचा संबध त्यात कोठून आला माहीत नाही.
exactly. one has to sign a
exactly. one has to sign a form and get sign authorised. Saranjame family HUF bank account asel tar they have to authorise sonya to use it. Without this just giving book is meaningless. And it is 5 people household
how complicated it is going tobe to run it? no kids no elders no special people. more than enough money and resources. She prolly has to decide what to cook and shop for every day.
कारवी
लय भारी, जबरदस्त कारवी
<टोटल एपिसोड मधे काहीतरी घडले
<टोटल एपिसोड मधे काहीतरी घडले असे म्हणता येइल असे फक्त तीन संवाद होते जे पहिल्या मिनीटात झाले असते. >
इथे सुभा पेटलाय, आणि मधेच निमकर फोन करतो. दोन वेळा..
"अजूऽऽन एकदाऽऽऽऽऽऽच फोऽऽऽऽन करतो.. "
सुभाने फोन उचलल्यावर निम्या अतिशय ह - ळू - ह -ळू बोलायला लागतो.
"काय चालू आहे? "
"घरच्यांशी बोलतो आहे. तुमच्या मुलीने फुल्याफुल्याफुल्या "
निम्याला समजतच नाही. :कपाळाला हात:
"वा वा वा वा. कुटुंबासोबत वेळ दिलाच पाहिजे. कुटुंब म्हणजे..."
अरे लेका, दोनदा फोन केलायस ना? कामाचे बोल! लवकर बोल.
"रँडम शब्द/विषय दिला, तरी काहीतरी दोन वाक्ये बोलून दाखवा", वगैरे कॉमिकिस्तान मधे असतं तसं आहे का इथे?
असला माणूस असेल तर कोणीही चिडेल ह्याच्यावर. आणि हा लगेच रडायला आणि घर विकायला मोकळा. अशावेळी ईआ पण अगदी जुन्या पिक्चरमधल्या सुना-आयांसारखी सोशिक. इथे नाही म्हणणार "बोल्ले!"
बादवे - त्याने चिपळूण का कुठल्या त्याच्या आजोळी फोन करून मित्राला सांगितले का? पुढचा मूर्खपणा करेपर्यंत तुमच्याकडे येण्याची गरज उरलेली नाही ?
हा लगेच रडायला आणि घर विकायला
हा लगेच रडायला आणि घर विकायला मोकळा. अशावेळी ईआ पण अगदी जुन्या पिक्चरमधल्या सुना-आयांसारखी सोशिक>>इथं "बोल्ले" ऐवजी, "जळ्ळे मेले" म्हणायला हवे होते.
बादवे - त्याने चिपळूण का
बादवे - त्याने चिपळूण का कुठल्या त्याच्या आजोळी फोन करून मित्राला सांगितले का? पुढचा मूर्खपणा करेपर्यंत तुमच्याकडे येण्याची गरज उरलेली नाही ? >>>
हो नाहीतर तो अजून वाट बघत बसला असेल.
हो नाहीतर तो अजून वाट बघत
हो नाहीतर तो अजून वाट बघत बसला असेल.>>> त्याला वाटेल चालत येतायत कशेडी खवटी आणि परशुराम घाट चढून उतरून
लोकहो, नवीन धाग्यावर लिहा!
लोकहो, नवीन धाग्यावर लिहा!
चला हवा येउ द्यामध्ये तब्बल
चला हवा येउ द्यामध्ये तब्बल चार दिवस तुपारे ची टीम येणार आहे.म्हणजे या आधी पण तुपीरे वर स्किट होत.पण तेव्हा फक्त दोनच दिवस लाज काढायचे .आता चार दिवस काढतील.
आधी दोन्ही वेळा बीनपाण्याने
आधी दोन्ही वेळा बीनपाण्याने केली तेव्हा ईशा बाई ( गायत्री ) समोर नव्हती. आता तिच्यासमोरच वाजवतील तेव्हा कळेल.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=mLVGD9yetHo&t=15s
ओके चला आता नवीन धाग्यावर.
ओके चला आता नवीन धाग्यावर.
आज पुष्पानं विक्याला लाडू
आज पुष्पानं विक्याला लाडू भरवला...भरवला कसला, तोंडात कोंबला तेव्हा कारवीची आठवण झाली. केड्यानं तुझीच आयड्या ढापली कारवी.
Pages