ग्रामीण बोली भाषांतील शब्द.

Submitted by कोदंडपाणी on 30 January, 2019 - 06:04

शालींच्या मैत्रचे भाग वाचताना त्यातील पात्रांच्या तोंडात अनेक ग्रामीण शब्द वाचले. काही मजेशीर वाटले. प्रत्येक प्रांताची जशी आपली एक खाद्यसंस्कृती असते तशी एक भाषाही असते. त्यातल्या त्यात ग्रामीण भाषा तर अतिशय गोड असते. त्यात वापरले जाणारे शब्द रोजच्या व्यवहारात वापरले जात असले तरी ते प्रमाण मराठी भाषेत नसल्याने सहसा लिखानात येत नाही. शहरांमधे तर ते बोलण्यातही येत नाही. तर असेच वेगवेगळ्या प्रांतातील ग्रामीण भाषेतील मजेदार, वेगळे शब्द वाचायला मजा येईल. सांगली, कोल्हापुर, नागपुर, नगर, कोकण आणि महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळे शब्द वापरले जातात ते येथे लिहिले तर सर्वांना ते वाचण्यातला आनंद मिळेल तसेच त्यांचे अर्थही कळतील. उदा. आमच्या जुन्नर भागात वापरले जाणारे काही शब्द:

यळोमाळ: येथे तेथे किंवा दिवसभर
कव्हर: किती वेळ
उलसक किंवा उलीशीक: अत्यंत थोडे.
फिंद्री: खोडकर मुलगी
पाठ: शेळी

तुमच्याकडेही असे काही शब्द असतील तर अर्थासहीत व जमल्यास वाक्यासहीत येथे लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, मस्त धागा..

आमच्या घरी सगळे आता प्रमाण मराठीत बोलतात, त्यामुळे गावचे शब्द सहसा येत नाही...

तरीही 'शिरा पडो' हा वाक्प्रचार वापरायला माझ्या लेकीला खूप आवडते. अर्थ साधारणपणे 'सत्यानाश झाला/होवो' च्या जवळपास जातो.

आमच्या कडे गावी शहरी कोकणात
मॉप - खुप
वलान - कपडे सुकत घालण्यासाठी बांधलेली दोरी
खुलगा - रेडा
खलं - अंगण

अजुन खुप आहेत.
आता तर गावीही असे जुने शब्द लोकांच्या बोलण्यात नसतात.

ईदुळ - आत्तापर्यंत
येरवाळी - लवकर सकाळी
भगुलं - पातेलं
ईळी - विळी
आईतवार - रविवार
बेस्तरवार - बुधवार

तसराळे - धातूची खोलगट बुट्टी.
मार्तुल - स्क्रू ड्रायव्हर
मोळा - खिळा
साळूता - केरसुणी
डांब - विजेचा खांब
घसरती - उतरता रस्ता
कानसुलात - कानफाडात
गुच्ची - बुक्की
बेरड गुच्ची - बुक्की साठी हात वळवल्या वर चार बोटांच्या मध्ये अंगठा घालून मारलेली बुक्की (ही स्पेशली नाकावर मारतात ज्यामुळे समोरच्याचे नाक भळभळा रक्ताने वाहू शकते.
शिप्पारस - ओव्हर अ‍ॅक्टिंग

हे आमच्या कोपुतले काही शब्द

चांधई - घराची बाजूची भिंत. हिचा वरचा भाग त्रिकोणी असतो. छतासाठी
सरवा - कुठलाही पिक काढल्यावर शेतात उरलेला भाग. म्हणजे काही दाणे किंवा शेंगा शिल्लक राहतात त्या.

आम्ही घरीसुद्धा प्रमाण भाषेत बोलतो, त्यामुळे ह्याबाबतीत शुन्य माहिती आहे
हा धागा वाचायला मजा येइल.. छान आहे

सांगलीतले काही शब्द ::

मसाला -बॅटरी / टॉर्च मधले सेल
तेल - पेट्रोल
व्दाड - आगाऊ
लबाड बोलणे - खोटे बोलणे

अजून टाकेन Happy

पाठ म्हणजे शेळी? हे कधीच कळलं नसतं Happy
घवला - सापडला,
बोकाल- धाव
गमावला- ( माणूस) वारला
असे काही शब्द आठवतायत गावाकडचे.

ग्रामीण भाषेतील शब्द बहुतेक सारखेच असतात फक्त बोलायचा हेल बदलतो ठराविक भागात .मी थोड्याफार फरकाने लहानपणापासून हीच भाषा नगर-पुणे-लंडन-नगर अशी कायम ठेवली आहे.
विदर्भात "बे" वापरतात तसं इकडं "भो" वापरतात
बिच्चाला का ?- वेडा झाला का ?
पाळी - पाऊस
इस्तू- विस्तव
शेळ्या - शेपुड्या
सपार - मातीच घर
पाभर ,औत (दोन्हीत पण फरक आहे काहीतरी ) - नांगर
कांडवला - ओशाळला
कुत्रू - कुत्रा
केरसुणी - झाडणी
शेणकूर - सकाळची झाडलोट
कोड्यास - कालवण
औंदा - यंदा
आर लपाटण्या - अरे मुर्खा
इपितार - विचित्र
बातराट - वात्रट
अजून आठवल्यावर टाकतो

गायबण्या - मंद
किडुक - साप
ढिगोल - ढीग
इळमाळ - दिवसभर
सानच्याला - संध्याकाळी
खापरं - कपडे
वांती - उलटी
ढाळ - जुलाब
थप्पी - उतरंड

दक्षिणा,
तुझा असाच काहीतरी धागा होता ना? वाचल्यासारखा वाटतोय!

जिद्दु औत हा शब्द पुण्याच्या आसपास शेतात चाललेला नांगर, पाभार, कुळव, कोळपं इत्यादींसाठी वापरला जातो.
बऱ्याच वेळेला शेतकरी कुळव हाकत होतो म्हणण्याऐवजी औत हाकत होतो असे म्हणतात.
कोड्यास हा कोरड्यास चा अपभ्रंश आहे कोरड्यास म्हणजे कोरड्याबरोबर लावून खायची पातळ भाजी.
शिळपाटणं - कमजोर, कमकुवत,अशक्त
आगार - कोकणात घराच्या आजूबाजूची जागा तर देशावर चिंचेचे आगार म्हणजे चिंचेचे बन किंवा एसटी जिथून सुटते ती जागा.
आमच्याकडे बऱ्यापैकी इंग्रजी शब्दांची घुसखोरी झालेले आहे अगदी ग्रामीण बायकादेखील किचन वटा केला असं म्हणतात स्वयंपाक घरात हल्ली शहरातल्या सारखे उंच ओटे असतात त्याला सगळे किचन वटा असंच म्हणतात.
ईरकल - लुगड्याचा प्रकार
धु-या - बैलगाडी चा मुख्य सांगाडा ज्या भेंडीच्या लाकडाने शिवळाटीला ( बैलाच्या गळ्यात अडकवतात) जोडतात
सरी - ऊस लावला जातो तो उंच वरंबा.
मपला - माझा
तुपला- तुझा
खळं - धान्य मळणी साठी शेतात ओली करुन, ठोकून ,सारवून केलेली गोल जमीन.

गोमतीर -गोमुत्र
चिंपाट - बहिर्दिशेला न्यायचे भांडे (टिन पॉट)
मोगरी - धान्य बडवण्याचे साधन
मावळन - आत्या
माळवं - भाजीपाला
डेंगळा - कांद्याचे फुल
धसकाट - ज्वारी बाजरी कापल्यानंतर जमिनीत राहीलेला काही ईंचाचा भाग
चघाळ - जनावरांचा खाऊन उरलेला चारा
म्होरं - पुढे
ईराकत - (बहुधा) लघुशंका
कुरापत - खोडी
इतरं - द्वाड

गोमतीर -गोमुत्र>>>इकडं गोमतार
चिपाडं - दावणीत उरलेला चाऱ्याचा भाग किंवा डोळ्यातील कचरा
बिरूड - झाड पोखरणारी अळी
जाम्ब - पेरू
सराटा - काटा किंवा गोखरू
बुडखी - सामायकातील विहीर
उकंडा - उकिरडा
वाहण - चप्पल
वाळोट - धुळीचं वादळ

चिपाड - रस काढल्यानंतर उसाचा राहीलेला भाग, चोथा.
वावटळ - धुळीचे छोटे चक्रीवादळ.
फुपाटा - उडणारी धुळ, कचरा.
पाहुनेर - पाहुणचार
माळवद - छतावरील मोकळी जागा
राखुंडी - राख
मिसरी - तंबाखू जाळून केलेली पुड. शक्यतो स्त्रिया दात घासण्याच्या नावाखाली तंबाखुचे व्यसन करतात मिसरी लावुन.

माझ्या आवडीचे जुन्या नागपुरातले दोन शब्द -
झक्की - जो /जी केंव्हा काय करेल, बोलेल ते सांगता येत नाही तो/ती.
भैताड - ज्याला काही समजतच नाही तो/ती - अगदीच वेडा असेल तर भैSSत्ताड असे म्हणायचे.
(ऋन्मेSSष आय डी बघितली की मला लग्गेच भैSSत्ताड शब्दच आठवतो!) Light 1

भाऊसाहेब - हा बहुतेक फक्त नगर जिल्ह्यात वकील आणि महसूलच्या कर्मचाऱ्यांसाठी वापरला जाणारा शब्द आहे. नुकताच वकील संघटनेने हा शब्द न वापरण्याविषयी ठराव केलाय पण ग्रामीण भागातील लोक त्या ठरावाला फार जुमानत नाही .उज्वल निकम नगरला हे संबोधन ऐकून चक्रावून जायचे आधी

बाकीच जाऊ दे,

कोदंडपाणी यांना पहिल्या लेखाच्या अनेकविध शुभेच्छा!
Happy

वाडूळ- वेळ(कमी-जास्त)
बगलत-काखेत
बगलंला- साईडला, बाजूला
बाजिंदी/बाजिंदा - आगाऊ-लबाड

आमच्याकडे तलाठ्याला भाऊसाहेबच म्हणतात.

कुढालचे तुमी ? किती दिवसांनी ऐकला हा प्रश्न.

किट्टू मुलीसाठी चेडु असा भितिदायक शब्द का ठेवला असेल? Happy

अज्ञातवासी, हे सुचलेच नाही अगोदर >>>>>
शालिदा, मला तुमचा पहिला प्रतिसाद हाच अपेक्षित होता. आणि तो हक्कही तुमचाच होता,
पण सगळे चर्चेत रमल्यामुळे शेवटी मला राहवलं नाही...
पण माझी खरंच मनापासून खूप इच्छा होती, की तुम्ही पहिल्या शुभेच्छा द्याव्यात.

Pages