मराठी साहित्यातील वाड्ःमयचौर्य (plagiarism) ह्या समस्येवर आपण काही उपाय करू शकतो का? कोणते उपाय असावेत?

Submitted by किल्ली on 17 April, 2018 - 02:36

वाड्ःमयचौर्य हा हल्ली कळीचा मुद्दा झाला आहे.इंग्लिश भाषेत ही चोरी पकडण्यासाठी मुबलक साधने उपलब्ध आहेत. त्यांना plagiarism detection software असे म्हणतात. ही साधने संपूर्ण आंतरजालावरील माहिती बरॊबर तुमच्या लिखाणाची तुलना करून लिखाणामध्ये unique contents चं प्रमाण टक्केवारीमध्ये किती आहे ते सांगतात.अधिक माहितीसाठी ह्या संकेतस्थळाला भेट द्या:
http://www.plagiarism.org/article/what-is-plagiarism

अशी plagarism detection tools देवनागरीसाठी उपलब्ध आहेत का? कुणाला काही माहिती असेल तर सांगावे.
उपलब्ध नसतील तर आपण develop करू शकतो. programmer माबोकर कृपया ह्यावर मदत करा. अस्मादिक स्वतः NLP आणि machine learning जाणतात. त्यामुळे ह्या बाजुने प्रयत्न करता येईल.
admin तुम्हीही मार्गदर्शन करा.

ही साहित्यचोरी कशी पकडावी आणि त्यावर उपाय काय ह्यावर चर्चा करण्यासाठी आणि मत मांडण्यासाठी हा धागा काढत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

डाइंग डिटेक्टिव्ह>> ह्या नावाची दिसली नाही
प्रतिलिपी वर 'अनिल चव्हाण' ह्या नावाने सर्च करून प्रोफाईल बघा, तिथे दिसेल त्यान्चे प्रकाशित साहित्य'

<<< पण माझ्यासाठी माझा 50 ओळींचा लेख 12000 युरो च्या बॅगवती इतकाच किमती असतो >>>
स्वतःच्या लेखनाच्या प्रेमात पडलेल्यांनी आणि त्याची चोरी होईल या काळजीत पडलेल्यांनी Who stole my story? हा लेख आणि हा लेख व त्यावरील प्रतिक्रिया जरा वाचाव्यात. हल्ली उत्तम दर्जाचे लेखन आंतरजालावर अनेक जण स्वतःहून फुकटात उपलब्ध करून देतात. त्यामुळे आपण जगावेगळे काहीतरी फार भारी लिहून जगप्रसिद्ध होऊ आणि लाखो रुपये कमवू, या भ्रमातून बाहेर आलेलेच बरे.

त्यापेक्षा लेखकाने आंतरजालावर लिहिलेले लेखन स्वतःहून Creative Commons वापरून उदार मनाने इतरांबरोबर शेअर करणे जास्त चांगले ठरेल.

गज़लकार इलाही जमादार यांच्या गज़लांनी प्रेरित होऊन मी मराठी गज़ल चे पहिले धडे गिरवले. अर्थातच इलाही माझे अतिशय जवळचे मित्र बनले व अजूनही (जरी आम्ही वर्ष-दोन वर्षातून एखाद्याच वेळी भेटत असलो तरी) आहेत.

इलाही यांचे पहिले पुस्तक 'जखमा अशा सुगंधी' छापून झाल्यावर त्यांनी मला भेट दिले होते. त्यातली एक गज़ल मला खूप आवडायची. तिचा मथळा होता:

'आकाशाला 'भास' म्हणालो, चुकले काहो?
धरतीला 'इतिहास' म्हणालो, चुकले का हो?

विशेषत: त्यातला एक शे'र वाचून मला नेहमी वाटायचे की इतक्या उच्च पातळीचे शे'र मला रचता आले पाहिजेत. तो शे'र असा:

'चौदा वर्षे पतिविना राहिली उर्मिला,
'हाच खरा वनवास', म्हणालो, चुकले का हो?'

सतत डोक्यात राहिल्याने या गज़लचे विडंबन माझ्या हातून रचून झाले. ते मी इलाही यांना त्यांच्या खोलीवर जाऊन दाखवले. त्यांनाही ते आवडले. ते खालील प्रमाणे होते:

बायकोस मी 'ताप' म्हणालो, चुकले का हो?
अन पोराला 'बाप' म्हणालो, चुकले का हो?

म्हटले कोणी, 'सत्य बोलुनी न्याय मिळाला',
'शंभर टक्के थाप' म्हणालो, चुकले का हो?

एकच धंदा, टोप्या घालत फिरतो आहे,
'दिसेल त्याला काप' म्हणालो, चुकले का हो?

कष्ट कशाला? देव उपाशी ठेवत नाही,
'मिळेल आपोआप' म्हणालो, चुकले का हो?

टी.व्ही. वर संगीत 'पाहतो' असे देखणे,
'झकास असते पॉप' म्हणालो, चुकले का हो?

'चुकले का हो?', 'चुकले का हो?' म्हणणार्‍यांना,
'सॉरी म्हणने पाप' म्हणालो, चुकले का हो?

गोड बोलुनी गळा कापती, 'शरद' तयांना,
'अस्तनीतले साप' म्हणालो, चुकले का हो?
..................................................................

कधी ते नक्की आठवत नाही, २००० - २००१ साल असेल.एकदा बेळगाव वरून इलाही यांना एका कार्यक्रमाचे निमंत्रण आले. त्यांनी मला सोबत येण्याविषयी विचारले. गज़ल मधील काहीतरी शिकायला मिळेल या आशेने मी होकार दिला. तिथल्या मंडळींनी दोन दिवस आमचे छान आदरातिथ्य केले. काही मित्र झाले. दोन दिवस खूप गज़ला - कविता ऐकल्या, ऐकवल्या. मजा आली. एका मित्राने ही हजल कार्यक्रमात सादर करण्याची परवानगी मागितली. माझ्यासारख्या नवीन कवीला असे कुणी विचारणे हाच मोठा सन्मान होता. मी आनंदाने होकार दिला आणि तो प्रसंग विसरून गेलो.

फेब्रुवारी २००४ मध्ये अमरावती इथे भीमराव पांचाळे यांच्या गज़ल सागर प्रतिष्ठान द्वारे गज़ल सम्मेलन आयोजित केले होते. त्यात माझ्या त्या 'मित्राने' ती रचना 'आपली' म्हणून सादर केली. लगेच मी भीमरावांना सांगितले आणि कार्यक्रम संपल्यावर त्या 'मित्राला' विचारले. तो म्हणाला, 'मे तुला परवानगी विचारली होती, आणि तू दिली होतीस.' मी हतबुद्ध झालो. त्याला स्पष्ट शब्दात सांगितले की, 'रचना सादर करण्याची परवानगी दिली होती. त्यावर स्वामित्व गाजवण्याची नव्हे.' नंतर मी त्याला सांगितली की कृपया परत असे करू नको. त्यांनंतर मी ते सर्व विसरून गेलो.

आता इतका ऊहापोह करण्याचे कारण म्हणजे परवा एका कार्यक्रमात तीच रचना (थोडे शब्द इकडचे तिकडे करून) माझ्या समोर, त्या 'मित्राच्या' नावाने सादर झाली. संयोजकांना विचारले तर त्यांनी सांगितले की त्या 'मित्राच्या' छापलेल्या पुस्तकातून रचना घेतली आहे. संयोजकंची काहीच चूक नव्हती. माझा इतिहास त्यांना ठाऊक असण्याचे काहीच कारण नव्हते. मी हताश खालो. मित्र म्हणवणारे लोक असे का वागतात हेच मला कळत नाही.

गज़ल सम्राट सुरेश भट म्हणायचे, 'गज़ल आता लिहिली जाते, छापली जाते; त्यामुळे 'मक्ता' या शब्दाला काही अर्थ उरलेला नाही. उगाचच गज़लमध्ये एक शब्द वाया जातो. याचा चांगलाच प्रत्यय आला.

माझ्याच दोन ओळी इथे लिहाव्याशा वाटतातः

'शब्द फिरवतो इकडे तिकडे, तसाच ठेवुन गाभा,
प्रतिभा 'त्यांची', त्यावर 'माझा', हक्क मिरवतो आहे,
डंका माझा सर्व दिशांना रोज वाजतो आहे!!"

माझ्या मूळ रचनेत आता आणखी चार द्वीपदींची भर पडून ती आता आणखी समृद्ध झाली आहे. त्या खालेल प्रमाणे:

' चौदा वर्षे शाळेमध्ये वाया गेली,
'बसलो पण चुपचाप' म्हणालो, चुकले का हो?

आमदार मी, 'मला कायदा दाखवण्याची,
काय कुणाची टाप' म्हणालो, चुकले का हो?

गेंड्याची कातडी असे ह्या सांगाड्यावर,
'शिव्या मिळो वा शाप' म्हणालो, चुकले का हो?

नोटाबंदी झाली बुडला काळा धंदा
'उडला का थरकाप', म्हणालो, 'चुकले का हो?"

'प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी किनार असते' अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. या सर्व प्रकरणाचा फायदा म्हणजे आणखी एक सुंदर द्वीपदी तयार झाली:

वाड्मंय चोरी करणार्‍यांचे धैर्य पाहुनी,
'येतो मज संताप' म्हणालो, चुकले का हो?

कवी शरद पाटील

त्यापेक्षा लेखकाने आंतरजालावर लिहिलेले लेखन स्वतःहून Creative Commons वापरून उदार मनाने इतरांबरोबर शेअर करणे जास्त चांगले ठरेल.
Submitted by उपाशी बोका on 2 February, 2019 - 03:41
>>
Creative Commons परवान्यात मुळ लेखकाचे / कलाकाराचे नाव लिहिने बंधणकारक असते. त्यामुळे या लेखात ज्यावर चर्चा चालू आहे अशा अनिर्बंध व नामोल्लेखाशिवायच्या चोरीवर क्रियेटिव कॉमन्स हा उपाय नाही.
तसेच, उदार मनाने परवानगी देणे म्हणजे चोरी करण्याचे आमंत्रण नव्हे.

लिखाण लिहून पैसे मिळतील न मिळतील(उद्या वाचकांनी लिखाण वाचण्या बद्दल पैसे घेतले नाही म्हणजे भरून पावले ☺️☺️☺️)
पण एखाद्याने हे लिखाण स्वतःच्या नावावर टाकून कॉम्प्लिमेंट नामक मोबदला(याने इगो मसाज मिळत असल्याने हेही एक व्हर्च्युअल मनी समजावे) स्वतः घेण्याला विरोध नक्की असावा.
क्रिएटिव्ह कॉमन ने उपलब्ध केलेल्या लेखनाखाली पण मूळ लेखकाचे नाव असावे.

क्रिएटिव्ह कॉमन ने उपलब्ध केलेल्या लेखनाखाली पण मूळ लेखकाचे नाव असावे.
नवीन Submitted by mi_anu on 2 February, 2019 - 11:19
>>
क्रियेटिव्ह कॉमन मधे लेखकाचे / कलाकाराचे नाव लिहिणे बंधण्कारकच आहे.
Since 2004, all current licenses (beside the CC0 waiver) require attribution of the original author, the BY component.
https://en.wikipedia.org/wiki/Creative_Commons_license

चांगली चर्चा. मला थोडे मार्गदर्शन हवे.

सध्या मी एका दिवंगत प्रसिद्ध लेखकाच्या पुस्तकावर 'पुस्तक-परिचय' या स्वरूपाचा लेख लिहितो आहे. त्यात अधूनमधून त्या लेखकाची पुस्तकातील मूळ वाक्ये उद्धृत केली आहेत. ती अवतरण चिन्हांत आणि italics मध्ये देणार आहे. समजा लेख २००० शब्दांचा असेल तर जास्तीत जास्त मी किती मूळ वाक्ये उद्धृत करू शकतो?
ह्याला चौर्य म्हणतात का?
वाक्ये सोडूनचे संपूर्ण निवेदन हे माझ्याच शब्दांत आहे.

तुम्ही जर हा लेख एखाद्या अभ्यासक्रमासाठी किंवा परीक्षेचा भाग म्हणून लिहीत नसाल तर ती चोरीच आहे. लेखक व प्रकाशक यांच्या परवानग्या घेऊन लेख लिहिणे योग्य आहे.

हजार शब्दांच्या लेखात शंभर शब्द इतरांचे चालतात वगैरे थापा आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे.

While the fair use approach followed in the US can be applied for any kind of uses, the fair dealing approach followed in India is clearly limited towards the purposes of

private or personal use, including research,[24] and education,[25]
criticism or review,[26]
reporting of current events and current affairs, including the reporting of a lecture delivered in public.[27]

https://en.wikipedia.org/wiki/Copyright_law_of_India#Exceptions_to_copyr...

चिनूक्स व अभि नव धन्यवाद !
बरं अजून एक शंका. मराठी संस्थळावर जेव्हा ' वपु किंवा पुलं यांची आवडलेली वाक्ये' असे धागे निघतात, तेव्हा प्रताधिकार भंग होतो का ?

criticism or review फक्त शैक्षणिक कारणांसाठी. private or personal use हे महत्त्वाचं आहे. यात प्रकाशन येत नाही. प्रकाशनासाठी परवानगी हवी.

वपु किंवा पुलं यांची आवडलेली वाक्ये' असे धागे निघतात, तेव्हा प्रताधिकार भंग होतो का ?

हो.

वपु किंवा पुलं यांची आवडलेली वाक्ये' असे धागे निघतात, तेव्हा प्रताधिकार भंग होतो का ?

हो. >>> मग आजपर्यंत याला संस्थळ प्रशासकांनी हरकत का घेतली नसावी?

criticism or review फक्त शैक्षणिक कारणांसाठी. private or personal use हे महत्त्वाचं आहे. यात प्रकाशन येत नाही. प्रकाशनासाठी परवानगी हवी.
>>
मग त्याचे तीन स्वतंत्र मुद्दे का आहेत?
एकाच मुद्यात criticism and review only for private or personal use अशी वाक्यरचना का नाही?
वेगळा मुद्दा क्रमांक का दिला आहे?

वपु किंवा पुलं यांची आवडलेली वाक्ये' असे धागे निघतात, तेव्हा प्रताधिकार भंग होतो का ?
हो.
>>
वपु / पुलं यांच्या पुस्तकातल्या अनेक वाक्यांची नुसती जशीच्या तशी यादी देणे व त्यासोबत स्वतःचे काहीच विवेचन नसणे हे Criticism / Review मधे येते का?

Fair dealing is never absolute.
It depends on the purpose and the content, unless it is being used as part of research or academic criticism.
The court would always consider the purpose of the dealing and the amount of the dealing. Since the copyright law does not describe the 'amount' and the purpose is commercial (because the website / publication / author) is going to earn money out of it, permissions should be sought from the copyright holdsrs.

चिनूक्स,
समजा मी असा लेख कुठलाच नफा न मिळवणाऱ्या संस्थळावर लिहिला आणि मलाही काही मानधन नसेल तरी हा भंग होईल ?

I wonder why people are so against sharing, similar to Wikipedia using Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 Unported License (CC BY-SA) and the GNU Free Documentation License (GFDL)

Wikipedia content can be copied, modified, and redistributed if and only if the copied version is made available on the same terms to others and acknowledgment of the authors of the Wikipedia article used is included (a link back to the article is generally thought to satisfy the attribution requirement.....(verbatim from Wikipedia)

व्यक्तिशः माझ्या मते लेखकाचे नाव (नक्कीच) आणि लिंक दोन्ही द्यावे. जमले तर CC BY-SA वगैरे लायसन्सचा उल्लेख पण करावा. व्हॉटसॅपमध्ये शेअर करताना लिंक देणे जमत नसेल, तरी नाव तरी नक्कीच द्यायला हवे, याबद्दल दुमत नसावे.

याच विषयाशी संबंधित अधिक माहितीसाठी: The Right to Read by Richard Stallman

चिनूक्स - ज्यांना हे चुकीचे नाहीच या हट्टाने विचारायचेच नाहीये असे लोक सोडले तर बाकीचे बहुधा कोणाला आणि कसे विचारायचे हे माहीत नाही म्हणून, किंवा आपली कोणीही दखल घेणार नाही या समजाने परवानगी काढायचा प्रयत्न करत नसतील. याबाबतीत तू किंवा कोणी स्वतःचे अनुभव लिहीलेत तर लोकांना उपयोग होईल.

बाय द वे ५० वर्षे जुने पुस्तक असेल तर ते पब्लिक डोमेन मधे येते वगैरे खरे आहे का? तसे असेल तर पुलंची बरीच पुस्तके त्यात येतील.

कॉपीराईटच्या अट्टाहासाने काय होते, याचे केवळ १ उदाहरण. रॉबर्ट फ्रॉस्ट ची ही कविता ७५ वर्षांनी पब्लिक डोमेनमध्ये आली असती, पण यशस्वी (विशेषतः वॉल्ट डिस्नी सारख्या कंपन्यांच्या) लॉबिंगमुळे कॉपीराईट अजून २० वर्षे वाढवण्यात आला.

‘Stopping by Woods on a Snowy Evening' is part of a huge cache of copyrighted works entering the public domain on New Year’s Day.

बाय द वे ५० वर्षे जुने पुस्तक असेल तर ते पब्लिक डोमेन मधे येते वगैरे खरे आहे का? तसे असेल तर पुलंची बरीच पुस्तके त्यात येतील.

In India, it is 60 years after the author's death.

No. ONLY after the death.
With a literary, dramatic, musical or artistic work (other than a photograph) which is published anonymously or pseudonymously, copyright subsists for 60 years from the year in which the work is first published: Provided that where the identity of the author is disclosed before the expiry of the said period, copyright shall subsist until 60 years from the year in which the author dies

@ उ बो,
व्यक्तिशः माझ्या मते लेखकाचे नाव (नक्कीच) आणि लिंक दोन्ही द्यावे. >>>
मग या न्यायाने ‘लेखकांच्या आवडत्या वाक्यांचे’ संस्थळावरचे धागे नियमबाह्य कसे होतील ?

आपल्या सदस्य-माहितीत पण अनेकांनी आवडते वाक्य हे एखाद्या लेखकाचे लिहिले ले आहे. त्यालाही प्रताधिकार असतो ?

@कुमार१
तुमचा प्रश्न योग्य आहे, माझ्या मते Fair Use नुसार ते चालावे पण नक्की उत्तर मला माहीत नाही आणि मी वकील पण नाही.

म्हणूनच म्हणतोय की लेखकाने स्वतःच जर CC BY-SA किंवा GFDL सारखे लायसन्स वापरून शेअर केले तर स्वतःचे नाव आंतरजालावर बघायची खाज पण भागेल आणि इतरांना पण ते शेअर करायला अडचण येणार नाही. मात्र लायसन्सनुसार लेखकाला क्रेडिट द्यायलाच पाहिजे. (नाव, लिंक वगैरे) याबाबतीत माझा प्रेफरन्स वर लिहिला आहे.

मराठी प्रकाशक परवानगी मागायला संपर्क साधला तर उत्तर द्यायची तसदी घेत नाहीत असा अनुभव अनेकदा आला आहे. ताजा अनुभव राजहंस प्रकाशनाचा गेल्याच महिन्यातला. (जानेवारी २०१९!)
१० मिनिटांच्या अभिवाचनाची परवानगी मागणाऱ्या ११ जानेवारीच्या ईमेलला आणि त्यानंतर फोनवर ठेवलेल्या निरोपांना अजून उत्तर नाही.

ह् अभिवाचन मी मराठी साहित्याविषयीच्या प्रेमापोटी विनामोबदला करणार होते. यातून झालीच तर पुस्तकाचीच जाहिरात झाली असती, जिचा फायदा प्रकाशकालाच मिळाला असता.

पुस्तकात प्रकाशक आणि लेखक दोहोंची परवानगी घ्यावी असा निर्देश असतो. लेखकाशी संपर्क कसा साधायचा त्याची माहिती दिलेली नसते. प्रकाशकांची असते, पण तिचा उपयोग होत नाही.

इतकी साधी जबाबदारी घेता येत नसेल त्यांनी प्रताधिकाराचा बागुलबुवा नाचवणं हा मोठाच विनोद आहे. लोकांना चोर म्हणणं हा त्याहून मोठा.

मराठी प्रकाशक परवानगी मागायला संपर्क साधला तर उत्तर द्यायची तसदी घेत नाहीत असा अनुभव अनेकदा आला आहे.>>>>>>+ १००००००

स्वाती,
माझा मागचा प्रश्न थोडा फिरवून विचारतो.
पुस्तक परिचय पध्दती च्या लेखात जर ७-८ वाक्ये लेखकाच्या नावसाहित उद्धृत करायची असतील, लेखाचे मानधन नसेल, तर परवानगी मागायचा सोपस्कार करायचा का ? इ मेल ला उत्तराची खात्री नसतेच.
उ बो, धन्यवाद

I wonder why people are so against seeking legitimate permissions.
Submitted by चिनूक्स on 2 February, 2019 - 06:25 >>> काही लोक खरोखर चोर मेन्टालिटीचे असतात आणि बिनदिक्कत वांङमयचौर्य करतात हे खरे पण अज्ञानापोटी होणारे आणि परमिशन घ्यायच्या कुठे आणि कशा हे माहित नसल्यामुळे होणारे चौर्य नक्कीच थांबवता/ कमी करता येऊ शकेल असे वाटते. आपण माबोवर एखादा धागा का काढत नाही? त्यात प्रताधिकाराचे नियम, परवानगी घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकाशनांचे अथवा लेखकांच्या प्रतिनिधी/ वारसांचे पत्ते/ फोन नं असे एका ठिकाणी सेव्ह केले तर परवानगी घ्यायची प्रोसेस जरा सोपी होईल. सर्वांनाच ती माहिती वापरता येईल. चिनूक्स सारखे लोक बरीच माहिती इथे देऊ शकतील. इतर कोणी एखाद्या पुस्तकासाठी, नाटकासाठी या प्रोसेस मधून गेले असल्यास तीही माहिती तिथे लिहिता येईल.
असा धागा माबोवर दिसला नाही म्हणून सुचवले. धागा मीच चालू केला असता पण त्यावर कॉन्ट्रिब्यूट करायला माझ्याकडे काहीच माहिती नाहीये.

याच विषयावर एका प्रसिद्ध लेखकांच्या भयकथांवर सध्या पेपर मध्ये चालू असलेला वाद आठवला.
मला रुपांतराबद्दल भारतात या मर्यादा बर्याच धूसर वाटतात.
तसेच मूळ लेखन परकीय असेल, इंग्लिश लेखकाच्या वारसांना संपर्क साधून रुपांतराची परवानगी मागितली आणि त्यांनी काही हजार डॉलर किंवा पाउंड मध्ये रॉयल्टी मागितली तर लेखनावर जगणाऱ्या एखाद्या मराठी लेखकाला परवडेल का?
मी कन्फ्युज आहे.(विषयांतर वाटल्यास विषय इथेच थांबवते.)

<<< पुस्तक परिचय पध्दती च्या लेखात जर ७-८ वाक्ये लेखकाच्या नावसाहित उद्धृत करायची असतील, लेखाचे मानधन नसेल, तर >>>

माझ्या मतानुसार काही प्रॉब्लेम नाही. उदा. नुकताच मिपावर १ लेख आला आहे ज्यात जयंत नारळीकर यांच्या पुस्तकाचा परिचय करून दिला आहे. काही वाक्ये वापरणे हा 'fair use' आहे. शिवाय तुम्ही हौसेसाठी आणि पैसे न घेता लेखन करत असाल तर काहीच प्रश्न नसावा.

याउप्पर कुणी प्रताधिकाराचा बागुलबुवा दाखवून नकार देत असेल त्यांना सरळ खड्ड्यात जा म्हणून सांगावे आणि दुसरा संदर्भ वापरून लिहावे. आता जगात भरपूर माहिती फुकटात (प्रताधिकारमुक्त ) आणि सहज उपलब्ध आहे. अनेकजण ही माहिती फुकटात लिहितात. स्वतः:चा फायदा व्हावा म्हणून कॉपीराईटचा गैरवापर करणारे मुख्यत: प्रकाशक आणि मिडीया कंपनीच असतात. मुळात लक्षात घेतले पाहिजे की पुस्तके आणि वर्तमानपत्रे विकून फायदा होत नाही, छपाईचा खर्चपण निघत नसेल. फायदा होतो तो जाहिरातबाजीमुळे आणि मार्केटिंगमुळे.

पुस्तक परिचय पध्दती च्या लेखात जर ७-८ वाक्ये लेखकाच्या नावसाहित उद्धृत करायची असतील, लेखाचे मानधन नसेल, तर परवानगी मागायचा सोपस्कार करायचा का ?>>>> अशी वाक्ये अवतरण चिन्हात देऊन लेखकाच्या पुस्तकाचा व लेखकाचा योग्य तो संदर्भ द्या.
लोकं दुसऱ्याचे लिखाण वापरून मूळ लेखकाचा कुठलाही संदर्भ देत नाहीत म्हणून प्रॉब्लेम होतो. प्रत्येक वेळी परवानगी घेणे शक्य नसते. अर्थात स्वतःच्या लेखनात दुसऱ्याचे लेखन अपरिहार्य कारण असेल तरच द्यावे.

मायबोली सुरक्षित करा Sad

तिकडे बहिष्कार घालून काही होणार नाहीये. इथले लेखन कॉपी पेस्ट होणे बंद झाले पाहिजे.
प्रतिलिपीला मेल केला आहे.

वरील साईट वर जाऊन प्रतिसाद देउन यावा लागेल, म्हणजे त्यांना समजेल की
"रे बाबा, असं नसतं रे चालत आयुष्यात.. चुक आहे हे"

वरील साईट वर जाऊन प्रतिसाद देउन यावा लागेल, म्हणजे त्यांना समजेल की
"रे बाबा, असं नसतं रे चालत आयुष्यात.. चुक आहे हे" >> हम्म.. मी टाकलाय प्रतिसाद, बघू!

तुझी 'प्यादा' पण आहे तिकडे जुई>> हो प्यादा आणि जीव!

गंम्मतच्चेय! Proud

चारू पण आहे बेफि यांची. >> हो.. मी त्यांच्या कथेखाली कळवलं आहेच.. पण ब्लाॅगवाल्यांनी काॅपीपेस्ट करताना बेफीजींचं नावही पेस्टलंय.. पण न विचारता टाकलं म्हणजेही एकप्रकारची चोरीच.

इकॉनॉमिक टाइम्सच्या संकेतस्थळावरून बातमीला मजकूर कॉपी पेस्ट केला तर Do not copy this site's content! असं आलं.

Pages