उरी - चित्रपट परीक्षण

Submitted by अज्ञातवासी on 20 January, 2019 - 01:43

लष्करातील सगळ्यात मोठा संकेत म्हणजे गुप्तता! या गुप्ततेच्या बळावर अनेक युद्धे जिंकली गेलीत...
...आणि जेव्हा गुपिते फुटलीत, तेव्हा अनेक सत्ता धुळीस मिळाल्या.
चित्रपटाची टॅगलाईन आहे, 'ये नया हिंदुस्थान है, ये घुसेगा भी, और मारेगा भी'
पुढे ऍड करायला हवं होतं... 'फिर सबको बतायेगा भी, प्रचार भी करेगा, धिंडोरा भी पिटेगा... और जिन लोगो ने काम किया, ओ चुपचाप तमाशा देखते रहेंगे'
आंतरराष्ट्रीय इमेजची पर्वा आहे कुणाला?
उरी बघतांना, खरोखर, खूप मिक्स फिलिंग आल्यात, आणि कधीकधी असा विचार मीच करतोय का, असं जाणवलं...
कारण चित्रपट बघतांना, चित्रपट संपताना,
सगळे फुल जोशात होते, आणि मी मनात अनेक प्रश्न घेऊन बसलो होतो.
१. हा चित्रपट खरोखर घडलंय, तसा बनवला गेला का?
२. आपला देश एका मोठ्या आंतरराष्ट्रीय संकेताची धूळधाण करतोय, हे पडदयावर ग्लोरिफाय करावं का? (तेही पाकिस्तानसारख्या कांगावाखोर देश शेजारी असताना) होतात सर्जिकल स्ट्राईक, पण ते करून सगळे देश तो मी नव्हेच आणि आम्ही किती शांततेचे पुरस्कर्ते या थाटात वावरतो. इथे अशाने भारतासारखा युद्धखोर देश नाही, असं वाटेल, बाहेरच्या लोकांना!
३. लष्करी अधिकाऱ्यांना डोकं नसून, सगळी प्लॅनिंग राजकारणी व सनदी अधिकार्यांनीच केली का?
अनेक प्रश्न उरी बघून आल्यावर डोक्यात थैमान घालतात.

तर सगळ्यात आधी बघुयात कथेकडे. होय, कथा आणि पटकथा, दोन्ही चांगल्या गुंफल्या गेल्या आहेत. वेगवान आणि एक एंगेजिंग हाताळणीच श्रेय मी लेखक व दिगदर्शक आदित्य धरला देईन. खरंच बऱ्याच दिवसांनी अशी वेगवान पटकथा बघायला मिळाली.पण...
कथेत परिपक्वता नाहीये... दृश्ये वरवर लिहिलेली वाटतात आणि पदोपदी लष्कर फक्त होय जी करायला आहे का? असं वाटतं.
म्युजिक लाऊड आहे, जोशपूर्ण आहे, पण कर्णमधुर नाही, आणि त्यापासून काही फ़रकही पडत नाही.
दिगदर्शन... चांगलं आहे. व्हिज्युयलायजेशन सुंदर आहे, कागदावरची कन्सेप्ट चांगल्यारित्या उतरवलीय. काही ठिकाणी अतिशय उथळ व भडकपणा दाखवलाय, ते सोडून ओव्हरऑल नाईस वर्क.
अभिनयाच्या बाबतीत, सर्व सहकलाकार चांगले काम करताना दिसलेत. प्रत्येक अभिनेता चांगल्यारित्या स्वतःला कॅरी करतो.
यामी गौतम, ही अभिनेत्री का घेतलीये, असा मला प्रश्न पडतो. ना धड अभिनय, ना धड त्या भूमिकेची देहबोली. प्रचंड खटकते.
परेश रावलनी भूमिका सुंदर वठवलीय. भूमिकेशी एकरूप होतो. एक विचारी आणि करारी अधिकारी छान जमून आलाय!
प्रमुख अभिनेता, विकी कौशल. हा अभिनेता कितीही क्रिटिकली अक्लेमड असला, तरीही या चित्रपटात हा शोभत नाही. एक आर्मीची देहबोली, आक्रमकता, नजरेत अंगार, काहीही याच्याकडे दिसत नाही. परफेक्ट मिसमॅच जाणवत राहतं...
आणि स्पेशल मेंशन, मोहित रैना...
कमी स्क्रीन स्पेस असूनही, हा माणूस लष्करी अधिकारी कसा असावा याचा उत्तम नमुना सादर करतो...
उरी बघितल्यावर माझ्या एका जवळच्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे बोल मला आठवतात.
'अरे, ज्या गोष्टी अनेक वर्षानंतर विश्वासू मित्रांबरोबर एखाद्या रम्य रात्री हळू आवाजात बोलाव्यात, त्या लाऊडस्पीकरवर गावभर काय सांगत फिरतायेत?'
असो, निवडणुका जवळ येतायेत Wink

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा...
एक के बाद एक हां..
मस्तच Happy

अरे, ज्या गोष्टी अनेक वर्षानंतर विश्वासू मित्रांबरोबर एखाद्या रम्य रात्री हळू आवाजात बोलाव्यात, त्या लाऊडस्पीकरवर गावभर काय सांगत फिरतायेत >>
अगदी बरोबर आहे.
मोहित रैना...(my fav)
कमी स्क्रीन स्पेस असूनही, हा माणूस लष्करी अधिकारी कसा असावा याचा उत्तम नमुना सादर करतो>>+11
21 सरफरोश आॅफ सारागढी मध्ये पण छान शोभलाय.

या चित्रपटात विकी कौशलच्या आईला अल्झायमर आजार असतो, त्यामुळे त्या वारंवार काही गोष्टी विसरत असतात, चित्रपटात "देश भी तो माँ जैसा होता है" असा एक डायलॉग सुद्धा आहे.
चित्रपटाच्या लेखकानं अल्झायमर हाच आजार का निवडला असावा? कारण आपणही त्या आईप्रमाणे, सैन्याला अधून मधून विसरतो, असं काहीसा त्या मागचा संदेश असावा.
तुम्हाला काय वाटलं?

श्रद्धा Lol

Attaach baghun baher alo tar ha dhaga disla...

>> कथा आणि पटकथा, दोन्ही चांगल्या गुंफल्या गेल्या आहेत. वेगवान आणि एक एंगेजिंग हाताळणी

Sahmat. Baki detail pratikriya ghari gelyawar lihito.

चैतन्य, तसं असेल, तर या चित्रपटातही कधीकधी सैन्य विसरलं जातंय असं वाटतं!
आणि दिगदर्शकाने पटकथा व संवाद छान लिहिलेत यात शंका नाही!

अरे, ज्या गोष्टी अनेक वर्षानंतर विश्वासू मित्रांबरोबर एखाद्या रम्य रात्री हळू आवाजात बोलाव्यात, त्या लाऊडस्पीकरवर गावभर काय सांगत फिरतायेत >>
बरोबर आहे पन काहि जनाना ते सान्गावच लागते.

ऍड करायला हवं होतं... 'फिर सबको बतायेगा भी, प्रचार भी करेगा, धिंडोरा भी पिटेगा... और जिन लोगो ने काम किया, ओ चुपचाप तमाशा देखते रहेंगे'
आंतरराष्ट्रीय इमेजची पर्वा आहे कुणाला?>>>
तुम्ही Zero Dark Thirty बघीतलेला दिसत नाही. त्यामानाने उरीत काहीच डिटेल्स दाखवले नाहीत. असो.....

बघितलाय, पण...
त्याआधी लादेनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून व्यवस्थित प्लेस केलं होतं.
असो!

हा चित्रपट भारत सरकारने बनवलाय का? उरी वर आलेल्या पुस्तकावर आधारित आहे की व्हाट्सअप्प फॉरवर्ड्स वरून प्रेरणा घेऊन बनवलाय?

ही गुपिते फोडायला नको होती तर सेन्सॉर बोर्डाने हरकत घ्यायला हवी होती.

उरी बघितल्यावर माझ्या एका जवळच्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे बोल मला आठवतात.
'अरे, ज्या गोष्टी अनेक वर्षानंतर विश्वासू मित्रांबरोबर एखाद्या रम्य रात्री हळू आवाजात बोलाव्यात, त्या लाऊडस्पीकरवर गावभर काय सांगत फिरतायेत?'>>>>>>>>

भारत सरकारने सर्जिकल स्राईक केल्याचे जाहीर केल्यानंतर खरेतर वरील अधिकाऱ्याने निषेध करायला हवा होता. चित्रपट हा काल्पनिक घटनांवर आधारित असू शकतो. उरी संबंधित एकही व्यक्ती चित्रपट बनवणाऱ्या टीममध्ये नाही.

he film was directed by debutant Aditya Dhar. He said that the film is "the story of what was imagined to have happened in those eleven days."

दिग्दर्शक असे बोलत असेल तर कथेत किती खरे किती खोटे कसे ठरवणार?

एनी वे, टेम्पररी देशभक्ती जागृत व्हायला सैनिक, गाणी, चित्रपट इत्यादी कारणे लागणाऱ्या लोकांना आवडेल असा मसाला चित्रपटात ठासून भरलाय. निर्मात्याने हा विचार करून चित्रपट आणलाय. त्याचा हेतू साध्य होतोय.

हे वर लिहिलेले परिक्षण आहे ?

आणि राहीला प्रश्न गुपितांचा, तर
या चित्रपटांने नक्की कोणती गुपिते उघड केलीत हे देवालाच ठावुक.

त्याचा हेतू साध्य होतोय.
>>

खरंच.

प्रेक्षकांमध्ये जागी झालेली तात्पुरती देशभक्ती अनुभवली.
"मोदी सरकारने किती ऍडव्हान्स केली ना इंडियन आर्मी? एक्दम मोसाद सारखी" इति माझ्याशेजारी बसलेली मिलेनिअल बाला.

हे म्हणजे 'साहेबानी पोष्ट आणलं आणि केली की नाही वेळच्या वेळी सुतकाची व्यवस्था?'

मुव्हि बघून लोक्स् लगेच सरकारवर का घसरतात कळतच नाही Proud
अरे ती काय डॉक्यूमेंट्री आहे का सरकारी !
पैके खर्चून इन्टर्टेन्टमेंट विकत घेता न थीयटरात मग एन्जॉय करा की सीन्स फाइट डायलॉग गाणी आणि पॉपकोर्न Wink
The End च्या पाटी नंतर खुर्ची सोडली की मग आहेच रोजरोज आपले सरकार आणि आपण !

मला तरी सरकारी डॉक्यूमेंट्रीच वाटली.
आमचं सरकार कसं कणखर आणि आमच्या अगोदरचे कसे मवाळ असंच दाखवायचं होतं.

परंतु चित्रपट छान झालाय. व्यवस्थित वेग.

@साधना

हा चित्रपट भारत सरकारने बनवलाय का? उरी वर आलेल्या पुस्तकावर आधारित आहे की व्हाट्सअप्प फॉरवर्ड्स वरून प्रेरणा घेऊन बनवलाय?
>>>>
पहिली शक्यता, अनऑफिशियली मी नाकारत नाही

ही गुपिते फोडायला नको होती तर सेन्सॉर बोर्डाने हरकत घ्यायला हवी होती.
>>>>>
सेन्सॉर बोर्डची रचना कुठून होते, कशी होते, तिथे कोण लोक बसवले जातात, हे बघता या चित्रपटाच्या लाभार्थींसाठी सेन्सॉर कात्री मारणार नाही

उरी बघितल्यावर माझ्या एका जवळच्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे बोल मला आठवतात.
'अरे, ज्या गोष्टी अनेक वर्षानंतर विश्वासू मित्रांबरोबर एखाद्या रम्य रात्री हळू आवाजात बोलाव्यात, त्या लाऊडस्पीकरवर गावभर काय सांगत फिरतायेत?'>>>>>>>>

भारत सरकारने सर्जिकल स्राईक केल्याचे जाहीर केल्यानंतर खरेतर वरील अधिकाऱ्याने निषेध करायला हवा होता. चित्रपट हा काल्पनिक घटनांवर आधारित असू शकतो. उरी संबंधित एकही व्यक्ती चित्रपट बनवणाऱ्या टीममध्ये नाही.
>>>>
ती व्यक्ती एक छान निवृत्त आयुष्य जगतेय. कधीकधी चार लोकांमध्ये बसते, कधीही राजकीय गोष्टींवर भाष्य करत नाही, आल्या तरी गालात हसून टाळून देते.
उरी हल्ल्यानंतर बातम्यांमध्ये जे नेहमीचे चेहरे दिसत होते, सगळीकडे प्रचारकी थाटात घोषणा दिल्या जात होत्या, तेव्हा त्यांनी वरील वाक्ये म्हटलीत.
आणि ती निषेध वगैरे नाही करणार, आफ्टर ऑल ते, मी कॉमन मॅनच आहोत Happy

he film was directed by debutant Aditya Dhar. He said that the film is "the story of what was imagined to have happened in those eleven days."
>>>>
एक्साक्टली मला हेच म्हणायचंय, ते अकरा दिवस आणि त्यानंतर स्ट्राईक घडली, हे दिगदर्शक म्हणतोय हेच गुप्ततेचा भंग करणारं असू शकतं.

एनी वे, टेम्पररी देशभक्ती जागृत व्हायला सैनिक, गाणी, चित्रपट इत्यादी कारणे लागणाऱ्या लोकांना आवडेल असा मसाला चित्रपटात ठासून भरलाय. निर्मात्याने हा विचार करून चित्रपट आणलाय. त्याचा हेतू साध्य होतोय.>>>
+१११११११

मुव्हि बघून लोक्स् लगेच सरकारवर का घसरतात कळतच नाही>>>>
माझ्या परीक्षणात सरकार नावाचा शब्द कुठेही आढळला का Wink

लष्करी अधिकाऱ्यांना डोकं नसून, सगळी प्लॅनिंग राजकारणी व सनदी अधिकार्यांनीच केली का?>>>
प्रेक्षकांमध्ये जागी झालेली तात्पुरती देशभक्ती अनुभवली.
"मोदी सरकारने किती ऍडव्हान्स केली ना इंडियन आर्मी? एक्दम मोसाद सारखी" इति माझ्याशेजारी बसलेली मिलेनिअल बाला.>>>
जास्त माहितीसाठी हे नक्की वाचा.

https://www.thequint.com/voices/opinion/uri-review-perspective-of-former...

उरी हल्ल्यानंतर बातम्यांमध्ये जे नेहमीचे चेहरे दिसत होते, सगळीकडे प्रचारकी थाटात घोषणा दिल्या जात होत्या, तेव्हा त्यांनी वरील वाक्ये म्हटलीत>>>>

तेव्हा म्हटली असतील तर he is justified.

एक्साक्टली मला हेच म्हणायचंय, ते अकरा दिवस आणि त्यानंतर स्ट्राईक घडली, हे दिगदर्शक म्हणतोय हेच गुप्ततेचा भंग करणारं असू शकतं.>>>>. त्या टीममध्ये असलेला कुणी चित्रपट निर्मितीत असता तर गुप्ततेचा भंग झाला म्हणता आले असते. सत्य माझ्या कल्पनेप्रमाणे निघाले यात माझा दोष काय असे लेखक म्हणू शकतो.

निर्मात्याने खूप चलाखीने चित्रपट बनवलाय इतकेच. आणि त्याचे फाईनांसर दुहेरी फायदा मिळवत असतीलही. कुणी सांगावे। Wink Wink

@प्राची
त्यांच्या मतांचा आदर आहेच Happy
पण मी रिडींग बीटविन द लाईन्स किंवा ओब्जरवेशन आणि कंकलूजनवर जास्त विश्वास ठेवतो!

निर्मात्याने खूप चलाखीने चित्रपट बनवलाय इतकेच. आणि त्याचे फाईनांसर दुहेरी फायदा मिळवत असतीलही. कुणी सांगावे। >>>>
वाह! किती मोदक हवेत Lol

परेश रावल यांनी मोदींचा रोल याच चित्रपटात केला आहे का?
की तो वेगळा?
यात मोदींची भुमिका कोणी केली आहे मग?

Pages