उरी - चित्रपट परीक्षण

Submitted by अज्ञातवासी on 20 January, 2019 - 01:43

लष्करातील सगळ्यात मोठा संकेत म्हणजे गुप्तता! या गुप्ततेच्या बळावर अनेक युद्धे जिंकली गेलीत...
...आणि जेव्हा गुपिते फुटलीत, तेव्हा अनेक सत्ता धुळीस मिळाल्या.
चित्रपटाची टॅगलाईन आहे, 'ये नया हिंदुस्थान है, ये घुसेगा भी, और मारेगा भी'
पुढे ऍड करायला हवं होतं... 'फिर सबको बतायेगा भी, प्रचार भी करेगा, धिंडोरा भी पिटेगा... और जिन लोगो ने काम किया, ओ चुपचाप तमाशा देखते रहेंगे'
आंतरराष्ट्रीय इमेजची पर्वा आहे कुणाला?
उरी बघतांना, खरोखर, खूप मिक्स फिलिंग आल्यात, आणि कधीकधी असा विचार मीच करतोय का, असं जाणवलं...
कारण चित्रपट बघतांना, चित्रपट संपताना,
सगळे फुल जोशात होते, आणि मी मनात अनेक प्रश्न घेऊन बसलो होतो.
१. हा चित्रपट खरोखर घडलंय, तसा बनवला गेला का?
२. आपला देश एका मोठ्या आंतरराष्ट्रीय संकेताची धूळधाण करतोय, हे पडदयावर ग्लोरिफाय करावं का? (तेही पाकिस्तानसारख्या कांगावाखोर देश शेजारी असताना) होतात सर्जिकल स्ट्राईक, पण ते करून सगळे देश तो मी नव्हेच आणि आम्ही किती शांततेचे पुरस्कर्ते या थाटात वावरतो. इथे अशाने भारतासारखा युद्धखोर देश नाही, असं वाटेल, बाहेरच्या लोकांना!
३. लष्करी अधिकाऱ्यांना डोकं नसून, सगळी प्लॅनिंग राजकारणी व सनदी अधिकार्यांनीच केली का?
अनेक प्रश्न उरी बघून आल्यावर डोक्यात थैमान घालतात.

तर सगळ्यात आधी बघुयात कथेकडे. होय, कथा आणि पटकथा, दोन्ही चांगल्या गुंफल्या गेल्या आहेत. वेगवान आणि एक एंगेजिंग हाताळणीच श्रेय मी लेखक व दिगदर्शक आदित्य धरला देईन. खरंच बऱ्याच दिवसांनी अशी वेगवान पटकथा बघायला मिळाली.पण...
कथेत परिपक्वता नाहीये... दृश्ये वरवर लिहिलेली वाटतात आणि पदोपदी लष्कर फक्त होय जी करायला आहे का? असं वाटतं.
म्युजिक लाऊड आहे, जोशपूर्ण आहे, पण कर्णमधुर नाही, आणि त्यापासून काही फ़रकही पडत नाही.
दिगदर्शन... चांगलं आहे. व्हिज्युयलायजेशन सुंदर आहे, कागदावरची कन्सेप्ट चांगल्यारित्या उतरवलीय. काही ठिकाणी अतिशय उथळ व भडकपणा दाखवलाय, ते सोडून ओव्हरऑल नाईस वर्क.
अभिनयाच्या बाबतीत, सर्व सहकलाकार चांगले काम करताना दिसलेत. प्रत्येक अभिनेता चांगल्यारित्या स्वतःला कॅरी करतो.
यामी गौतम, ही अभिनेत्री का घेतलीये, असा मला प्रश्न पडतो. ना धड अभिनय, ना धड त्या भूमिकेची देहबोली. प्रचंड खटकते.
परेश रावलनी भूमिका सुंदर वठवलीय. भूमिकेशी एकरूप होतो. एक विचारी आणि करारी अधिकारी छान जमून आलाय!
प्रमुख अभिनेता, विकी कौशल. हा अभिनेता कितीही क्रिटिकली अक्लेमड असला, तरीही या चित्रपटात हा शोभत नाही. एक आर्मीची देहबोली, आक्रमकता, नजरेत अंगार, काहीही याच्याकडे दिसत नाही. परफेक्ट मिसमॅच जाणवत राहतं...
आणि स्पेशल मेंशन, मोहित रैना...
कमी स्क्रीन स्पेस असूनही, हा माणूस लष्करी अधिकारी कसा असावा याचा उत्तम नमुना सादर करतो...
उरी बघितल्यावर माझ्या एका जवळच्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे बोल मला आठवतात.
'अरे, ज्या गोष्टी अनेक वर्षानंतर विश्वासू मित्रांबरोबर एखाद्या रम्य रात्री हळू आवाजात बोलाव्यात, त्या लाऊडस्पीकरवर गावभर काय सांगत फिरतायेत?'
असो, निवडणुका जवळ येतायेत Wink

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुव्हि बघून लोक्स् लगेच सरकारवर का घसरतात कळतच नाही>>>>
माझ्या परीक्षणात सरकार नावाचा शब्द कुठेही आढळला का Wink
नवीन Submitted by अज्ञातवासी on 20 January, 2019 - 17:58

त्यांच्या मतांचा आदर आहेच Happy
पण मी रिडींग बीटविन द लाईन्स किंवा ओब्जरवेशन आणि कंकलूजनवर जास्त विश्वास ठेवतो!
नवीन Submitted by अज्ञातवासी on 20 January, 2019 - 18:28

ओके
आमच्या घरचे आज बघून आले.
खुश झाले. भारावून गेले. पुन्हा जाणार आहेत. तू सुद्धा नक्की बघ म्हणून मलाही भंडावून सोडलेय.
अर्थात त्यांना यामागील तथाकथित राजकारणाचा गंध नाही. अश्यांना आवडेल असा साधारण आहे तर ....

मुव्हि बघून लोक्स् लगेच सरकारवर का घसरतात कळतच नाही>>>>
माझ्या परीक्षणात सरकार नावाचा शब्द कुठेही आढळला का Wink
नवीन Submitted by अज्ञातवासी on 20 January, 2019 - 17:58

त्यांच्या मतांचा आदर आहेच Happy
पण मी रिडींग बीटविन द लाईन्स किंवा ओब्जरवेशन आणि कंकलूजनवर जास्त विश्वास ठेवतो!
नवीन Submitted by अज्ञातवासी on 20 January, 2019 - 18:28>>>>>

Nakki Kay sangaychay?

चित्रपट गर्दी खेचत आहे. इंडियन आर्मीच्या जवानांनी केलेल्या पराक्रमाचे स्क्रीनवरील प्रेझेन्टेशन अतिशय प्रभावी झाले आहे यात वादच नाही. प्रेक्षकांच्या (विशेषतः यंगस्टर्स) खच्चून शिट्ट्या व टाळ्या मिळवण्यात आणि त्यांना भारून टाकण्यात व प्रसंगी सद्गदित करून टाकण्यात दिग्दर्शक कमालीचा यशस्वी झालाय. सुरवातीलाच एक डिस्क्लेमर आहे त्यात स्पष्ट सांगितलेय कि "उरीच्या घटनेची आणि नंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकची माध्यमातून जी वर्णने येत होई त्यावर आधारित पटकथा आहे आणि ती मूळ घटनेबरहुकूम नाही, सिनेमासाठी त्यात काही काल्पनिक उपकथानकांची आणि पात्रांची भर घातली आहे." सिनेमॅटीक लिबर्टी हा आजकाल परवलीचा शब्द झाला आहे. चित्रपट पाहताना हे प्रकर्षाने जाणवते. तरीही त्यामुळे वास्तवात जी घटना घडली आहे (किंवा अशा अजून ज्या भूतकाळात घडल्या आहेत) आणि जवानांनी प्राण पणाला लावून जो पराक्रम गाजवला आहे त्याबद्दलच्या आदरात सिनेमॅटीक लिबर्टीमुळे तसूभरही फरक पडत नाही. अर्थात याचे श्रेय दिग्दर्शकालाच जाते.

चित्रपट म्हणजे राजकीय अधिप्रचार (propoganda) आहे अशी समजूत अनेकांची झालेली आहे (मानो या न मानो). माझ्या एका मित्राला सांगितले चित्रपट चांगला आहे. नक्की बघ. तर तो ताड्कन म्हणाला "कितीही चांगला असो राजकीय प्रपोगंडा पाहण्यासाठी मी पैसे खर्च करणार नाही". चित्रपटात जी राजकीय पात्रे दाखवली आहेत ती पाहता हि समजूत अगदीच अनाठाई नाही हे सहज लक्षात येते. हेच जर राजकीय पात्रे दाखवणे टाळता आले असते आणि फोकस फक्त मिलिटरी आणि इंटीलीजंसने मिळून केलेल्या ऑपरेशन वर केला असता तर बरे झाले असते असे वारंवार वाटत राहते.

सर्जिकल स्ट्राईक्स किंवा तत्सम वा याहीपेक्षा धाडसी ऑपरेशन्स मिलिटरीकडून पूर्वीही अनेकदा केली गेली आहेत. ती लोकांसमोर अशा प्रभावीपणे चित्रपटाद्वारे येणे खरेच गरजेचे होते आणि आहे. छोट्यामोठ्या समस्यांना कवटाळून बसलेले आपण सामान्य नागरिक वास्तविक पाहता किती सुखासीन आयुष्य जगत आहोत ते केवळ तिकडे घरादाराचा कुटुंबाचा त्याग करून सीमेवर प्राण पणाला लावून लढणाऱ्या जवानांमुळे. अधूनमधून असे चित्रपट पाहिले (पूर्वी "बॉर्डर" सुद्धा आला होता) कि या जवानांसाठी आपण नतमस्तक होतो. किंबहुना यासाठी तरी चित्रपट पाहायला हवा.

ती लोकांसमोर अशा प्रभावीपणे चित्रपटाद्वारे येणे खरेच गरजेचे होते आणि आहे. छोट्यामोठ्या समस्यांना कवटाळून बसलेले आपण सामान्य नागरिक वास्तविक पाहता किती सुखासीन आयुष्य जगत आहोत ते केवळ तिकडे घरादाराचा कुटुंबाचा त्याग करून सीमेवर प्राण पणाला लावून लढणाऱ्या जवानांमुळे>>>>

सहमत.

लष्करी अधिकाऱ्यांना डोकं नसून, सगळी प्लॅनिंग राजकारणी व सनदी अधिकार्यांनीच केली का?>> आणि ह्याच्या बरोबर उलट 'परमाणू' मध्ये, त्याच्यात तर पोखरण हा सगळ लश्कराचाच पराक्रम होता आणि शास्त्रज्ञ नुसते लुडबुड करणारे घोळघालू अशी मांडणी केलेली.
असो, सगळी प्लॅनिंग राजकारणी लोकांनी केली हेच तर ठसवायचे आहे.

उरीमधे जी चार गरुडं दाखवली आहेत ती कल्पना मला नाही आवडली. अगदी रातोरात तो इन्टर्न चार गरुडं बनवून देतो आणि ते परफेक्ट उडतात आणि माहिती गोळा करतात.

असो, सगळी प्लॅनिंग राजकारणी लोकांनी केली हेच तर ठसवायचे आहे.>>>>

राजकारणी लोकांचा म्हणजे जे खुर्चीत बसलेत त्यांच्याकडून जोवर गो अहेड येत नाही तोवर लष्कर व शास्त्रज्ञ प्रत्यक्ष कारवाई करू शकत नाही. त्यांनी कितीही चांगले प्लॅन केले तरी ते प्लॅन्स खुर्चीत बसलेले लोक अडवू शकतात. लष्कराला खुर्चीत बसलेल्याना पटवून द्यावे लागते की अमुक कारवाई आत्ता लगेच करणे आवश्यक आहे किंवा खुर्चीत बसलेले कारवाई करायची हे ठरवून लष्कराला प्लॅन करायला सांगू शकतात.

लष्करी अधिकाऱ्यांना डोकं नसून, सगळी प्लॅनिंग राजकारणी व सनदी अधिकार्यांनीच केली का?>>

हे असं खरोखर दाखवलं आहे का??
कारण नायक सहनायक तर आर्मीवाले आहेत ना?

लष्करी अधिकाऱ्यांना डोकं नसून, सगळी प्लॅनिंग राजकारणी व सनदी अधिकार्यांनीच केली का?
<<

कैच्या कै.

संपूर्ण चित्रपटात पंतप्रधान, संरक्षण मंत्री व एनएसए अजित डोवाल सोडून एकही राजकिय पात्र दाखविले नाही. संपूर्ण सर्जिकल स्ट्राईकच्या नियोजनात प्रामुख्यांने लष्करी अधिकारीच सामिल असल्याचे चित्रपटात दाखविले आहे. व वरिल तीन राजकिय कॅरेक्टर्सचा ह्या मोहिमेत महत्वाचा वाटा होता तेंव्हा हे तीनही कॅरेक्टर्स चित्रपटात असल्याचे कुठेच खटकत नाही.

हां आता मोदीद्वेष्ट्यांना वरिल तीनही कॅरेक्टर्स चित्रपटात असल्याचे खटकत असेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे कारण कोणत्या ही देशाचे सैन्य कितीही ताकदवर असले, तरी राजकिय हस्तक्षेपाशिवाय अशी कोणतीही कारवाई सैन्याला करता येत नाही.

पण अजित डोवाल तर इंटलीजन्स ऑपरेशन्स करणारे माजी स्पाय आहेत. म्हणजे ते स्वतः मिलिटरी ट्रेन्ड आहेत आर्मीप्रमाणे (लाइक सेहमत फ्रॉम राझी? )मी तर त्यांनाही डोकं नसल्याचं दाखवलं असावं असंच समजत होते.

हां आता मोदीद्वेष्ट्यांना वरिल तीनही कॅरेक्टर्स चित्रपटात असल्याचे खटकत असेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे कारण कोणत्या ही देशाचे सैन्य कितीही ताकदवर असले, तरी राजकिय हस्तक्षेपाशिवाय अशी कोणतीही कारवाई सैन्याला करता येत नाही.>>>>
एक स्पष्ट सांगतो,
मी मोदिभक्त नाही किंवा द्वेष्टाही नाही, मी माझी मते कार्य बघून ठरवतो, व्यक्ती बघून नाही.
अजूनपर्यंत माझ्या कुठल्याही प्रतिसादात सरकार, मोदी हा शब्द नाही आला.

मी मोदिभक्त नाही किंवा द्वेष्टाही नाही, मी माझी मते कार्य बघून ठरवतो, व्यक्ती बघून नाही.
<<
मग तुम्ही वरिल परिक्षणात >>लष्करी अधिकाऱ्यांना डोकं नसून, सगळी प्लॅनिंग राजकारणी व सनदी अधिकार्यांनीच केली का?<< हा जो दावा केला आहे तो सिद्ध करण्याकरता, चित्रपटातील एक असा सिन सांगा ज्यात सर्जिकल स्ट्राईकचे नियोजन करताना राजकिय कॅरेक्टर्स शिवाय एकही सैन्य अधिकारी उपस्थित नव्हता.

तुमचा फालतू थयथयाट दुसरीकडे दाखवा... दोनदा इग्नोर केलं, पण पुन्हा पुन्हा फालतूगिरी केलीत तर नाही खपवून घेणार!
गुड बाय!
नवीन Submitted by अज्ञातवासी on 21 January, 2019 - 19:40

<<

असो !
सत्य नेहमीच टोचते असे म्हणतात. तेंव्हा तुमच्या वैयक्तिक शेरेबाजीकडे दुर्लक्ष करतो. Wink

ती शेरेबाजी झाल्यावर मी लगेच प्रतिसाद एडिट केला, पण जाऊदेत, माफी वगैरे काही मागणार नाही, जस्ट मला वाईट वाटलं की मी तुमच्या पातळीला का उतरलो.
बाय!!

कालच चित्रपट पाहिला आणि खूप आवडला. तो चित्रपट आहे आणि अशा युद्धपट / थरारपटांमधे दिग्दर्शक सढळ हातांनी "कलाकृती स्वातंत्र्य" वापरतो हे कळत असूनही आवडला कारण,
१. आपल्या देशानी केलेल्या एका पराक्रमाची गोष्ट पडद्यावर बघताना रोमांच उभे राहिले. खरे सर्जिकल स्ट्राईक केले तेव्हा असे सगळे घडले नसेल हे कळत असूनही दिग्दर्शकानी ज्या प्रकारे ते पडद्यावर दाखवले आहेत ते हॉलीवूडपटांच्या तोडीचे होते. आजपर्ञंत खूप कमी वेळा हिंदी चित्रपटात एवढे चांगले सीक्वेन्स बघितले आहेत. सहसा हिंदी चित्रपटात जे असतं ते खरच बाळबोध वाटतं. पण उरी बघताना अजिबात तसं वाटलं नाही.
२. हीरो, हिरोईन प्रेमकथा, गाणी काहीही नाही. सरळ सरळ मुद्द्याला हात आणि संपूर्ण चित्रपट एकच गती, एकदम फोकसड. प्रेमकथेचा नॉनसेन्स नसल्यामुळे एकदाही मूळ विषय भरकटला नाही.
३. नायकाच्या घरातील परिस्थीतीचे चांगले चित्रण केले आहे आणि दर पिढी घरातील व्यक्ती लष्करात असलेल्या कुटुंबांचे काय होत असेल, त्यांनाही दुखणी खुपणी असतात आणि ती त्यांना कशी निभावावी लागत असतील ते जाणवले. परत एकदा, तो कथेचा एक भाग आहे पण त्यापाई लहानपणच्या आठवणी, आईबरोबर गाणी वगैरे टाकून मूळ विषय भरकटू दिला नाहिये. लष्करातील लोकांच्या जीवनातील त्या बाजूची जाणीव मात्र प्रेक्षकांना नक्कि होते.

अज्ञातवासी, चित्रपटाच्या इतर बाजुंबद्दल जसे कि यामी गौतमला का घेतलय, विकी कौशल आवडला नाही वगैरे तुमची मते समजू शकतो. तुमची बाकिची मते पटली नाहीत. मला तरी चित्रपट बघताना राजकिय नेत्यांना महत्व वगैरे काही वाटले नाही. सगळी कारवाई राजकिय व सनदी अधिकार्‍यांनी प्लॅन केली असे काही दाखवले नाही आहे. एक तर एवढी मोठी कारवाई देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या साथीनेच होऊ शकते आणि इतर संस्थांचा टॅक्टीकल सपोर्ट नसला तर लष्कर अशी कारवाई करणे आपल्या देशात अशक्य आहे, हे खरे सत्य आहे व ते तसे दाखवले आहे. तेव्हा लष्कराचे क्रेडीट कमी केले आहे असे अजिबात वाटले नाही. बाकि आखणीत इतर अनेक लोक सहभागी असले तरी शेवटी कारवाई लष्करानेच केली हे व्यवस्थित चित्रपटात अधोरेखीत होते आहे.
चित्रपटात एकाही नेत्याचे किंवा पक्षाचे नाव नाही. आणि चित्रपट बघून कांगावा करायला पाकिस्तान दुधखुळा नाही. तेव्हा "'फिर सबको बतायेगा भी, प्रचार भी करेगा..." वगैरे तुम्ही जे म्हणाला आहात ते मला मान्य नाही. ही कारवाई गुप्तच ठेवायला हवी होती का? ती जाहीर करून काय साधले? वगैरे प्रश्न चर्चेसाठी योग्य आहेत पण आता ते जाहीर करून झाले आहे. तरीही लोकांनी चित्रपट काढू नये असे वाटतय का तुम्हाला? ज्या लष्करी व सनदी अधिकार्‍यांनी कारवाईत प्रत्यक्ष सहभाग घेतला त्यांचा सरकारने सत्कार केला, त्यांना शौर्यपदकेही मिळाली असतीलच. पण त्यांची नावे चित्रपटात घेऊन जगाला सांगावे अशी काही अपेक्षा आहे का तुमची? त्यांची ओळख जगापुढे येऊ नये ही लष्कराची आणि त्यांची स्वतःची ईच्छा असण्यात काहीच आश्चर्य नाही असे मला वाटते.
एका शौर्यगाथेची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणून उरी अगदी मस्त जमला आहे. अजून कोणीतरी हा रोल चांगला केला असता किंवा अमूक पात्र घेऊन काय साधले असे नंतर वाटले तरी चित्रपट म्हणून उरी मनावर ठसा उमवटून जातोच.

लष्करातील सगळ्यात मोठा संकेत म्हणजे गुप्तता! या गुप्ततेच्या बळावर अनेक युद्धे जिंकली गेलीत...
...आणि जेव्हा गुपिते फुटलीत, तेव्हा अनेक सत्ता धुळीस मिळाल्या.
>>>

ऑ! युद्धस्य कथा: रम्या असलं काहीसं म्हणतात ब्वा! आता ह्या पिच्चरमध्ये किती गुपित फोडलीत?
अन पिच्चरमधल्या गुपितांवर विसंबून खरच दुश्मन देश वगैरे प्लान करतात का?

!!!
असो.

@रॉनी, यांवर मागेच विस्तृत लिहिलंय, ही गुपिते युद्धविषयी नव्हती, तर आंतरराष्ट्रीय राजकारणावर परिणाम करणारी होती.

तरीही लोकांनी चित्रपट काढू नये असे वाटतय का तुम्हाला? >>>>>
मला जे वाटले, ते मी सांगितलंय. चित्रपट काढावा, न काढावा, सेन्सर सर्टिफिकेट द्यावं न द्यावं, तो आपल्या थिएटरमध्ये लावावा न लावावा हे माझ्या हातात नसल्याने मला वाटून न वाटून काय उपयोग? माझं मत मी मांडलं, आणि तुमच्याही मताचा मी आदर करतो. आणि मला कुठलंही लेबल न लावल्याबद्दल धन्यवाद Happy
ज्या लष्करी व सनदी अधिकार्‍यांनी कारवाईत प्रत्यक्ष सहभाग घेतला त्यांचा सरकारने सत्कार केला, त्यांना शौर्यपदकेही मिळाली असतीलच. पण त्यांची नावे चित्रपटात घेऊन जगाला सांगावे अशी काही अपेक्षा आहे का तुमची? >>>>>
तसं काहीही मला म्हणायचं नाहीये, पण प्लानिंग + मोनिटरिंग मध्ये लष्कराचा सहभाग अधिक दाखवायला हवा होता, एवढंच सुचवायचं होतं.
असो, प्रतिसाद आवडला....

चौकट राजा, पोस्ट आवडली. मला हे सगळं लिहायचं होतं पण तुम्ही लिहून माझे विचार शब्दांत मांडलेत.
मला आवडलेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटातल्या strong and purposeful स्त्री व्यक्तीरेखा. ती war cry ओरडत वडिलांना श्रद्धांजली वहाणारी चिमुरडी सुद्धा किती strong आहे!
बाकी,
प्रमुख अभिनेता, विकी कौशल. हा अभिनेता कितीही क्रिटिकली अक्लेमड असला, तरीही या चित्रपटात हा शोभत नाही. एक आर्मीची देहबोली, आक्रमकता, नजरेत अंगार, काहीही याच्याकडे दिसत नाही. परफेक्ट मिसमॅच जाणवत राहतं...
प्रचंड असहमत!

क्रिस्प प्परीक्षण.
<जस्ट मला वाईट वाटलं> असं लिहिलेला, शाल्मली खोलगडेच्या भाषेत चुम्मा प्रतिसाद.

उरी दहशतवादी हल्ल्यापश्चातच्या सर्जिकल स्ट्राइक संबंधी जे नॅरेटिव्ह समोर आलं, त्यावरच चित्रपट बेतला असावा.
म्हणजे सर्जिकल स्ट्राइकचं अगदी सूक्ष्म पातळीवरचं नियोजन करण्यातही पंतप्रधान, संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नुसतेच उपस्थित होते तर सहभागी होते; (लष्करप्रमुखांचं काय?) ,अशा स्ट्राइकचा निर्णय लष्कराच्या पातळीवर नव्हे सरकारच्या पातळीवर घेतला गेला, तो सरकारकडून पुढे सरकवला गेला, असा निर्णय घ्यायला संघशाखेत मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग झाला (इति संरक्षणमंत्री).
मी वाचलेल्या अन्य एका परीक्षणात तर सर्जिकल स्ट्राइक ही संज्ञाही यानिमित्ताने आणि या मंडळींकडूनच घडवली गेल्याचं ठसवण्याचा प्रयत्न चित्रपटात दिसतोय.
जोडीला आधीच्या सरकारांत अशा प्रकारचे हल्ले करायची धमक नव्हती हेही नॅरेशन होतंच.
सर्जिकल स्ट्राइक केला गेला याची जाहीर घोषणा करणं, हे आंतरराष्ट्रीय राजकारणापेक्षा देशांतर्गत राजकारणासाठी असावं. आता या चित्रपटाचं प्रमोशनही सत्ताधारी पक्ष करतोय, स्वतः पंतप्रधान प्रमोशनसाठी वेळ देताहेत, चित्रपटातले संवाद कार्यक्रमांत फेकताहेत, ही टिंब जोडता येतात.

तर यात लष्कराचा सहभाग अधिक हवा यासंबंधी - NSA यापूर्वीपर्यंत फक्त पॉलिसी मेकिंगच्या लेव्हलला असत. सध्याचे NSA माजी गुप्तहेर असल्याने कदाचित ते डिटेल्ड प्लानिंग आणि एक्झिक्युशन भारही उचलत असत.

सध्या centralization of power and decision making चे दिवस आहेत. गुरुदासपूर हल्ल्याच्यावेळी ही NSA स्वतः सूत्र हलवत होते. आर्मी जवळच सज्ज , अशा कॉम्बॅटसाठी सरावलेली असतानाही, त्यांच्या म्हणण्यानुसार NSG आणलं गेलं.
(संबंधित तरीही अवांतर - अन्य देशांशी होणार्‍या अर्थसंबंधी वाटाघाटी हाताळायला पंतप्रधान कार्यालयात एक स्पेशल सेल आहे)

त्यामुळे चित्रपटात तसं दाखवलं गेलं असेल तर नवल वाटू नये. लष्करी अधिकार्‍यांना याबद्दल काय काय वाटतं, ते हळूहळू कळेलच.

गुप्ततेचा भंग आणि त्याचे आंतरराष्ट्रीय संबंधांवर परिणाम काय होतात, हे आपण ब्रह्मदेशात सीमापार कारवाईच्या वेळी पाहिलंच होतं. गंमत म्हणजे या सर्जिकल स्ट्राइकची प्रेरणा त्या कारवाईनंतरच्या पत्रकार परिषदेत , अशी कारवाई पाकिस्तानात कराल का ? असं विचारल्याने डिवचले गेल्याने मिळाली, असंही तत्कालीन संरक्षणमंत्री म्हणाल्याची नोंद आहे.

अशा मोठ्या कारवाईत सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीच्या सहभागाचं चित्रण ओसामा बिन लादेन कारवाई शब्दबद्ध केलेल्या एका पत्रकाराच्या पुस्तकात वाचायला मिळालेलं. (मराठी अनुवाद वाचलेला- नाव लक्षात नाही) . त्या तुलनेत २४ मालिकेतील चित्रणाशी या चित्रपटातलं चित्रण अधिक साधर्म्य राखून असावं.

{चित्रपट आणि कारवाईबद्दलचा पब्लिक डिस्कोर्स यांच्यावरच्या चर्चा काटेकोरपणे अलग ठेवणं, कठीण आहे)

अशी कारवाई पाकिस्तानात कराल का ? असं विचारल्याने डिवचले गेल्याने मिळाली

सर्जिकल स्ट्राइक पाकिस्तानात झाला की पाकव्याप्त भारतात ?

@भरत
प्रतिसाद मनापासून आवडला, जे मला म्हणायचं होतं ते नीट मांडता आलं नव्हतं, पण तुम्ही ते अगदी चपखल मांडलं!
आता देशभक्तीचा मुलामा चढवून राजकीय प्रपोगंडा पुढे करणार्यांना बघून, आणि भलेभले त्याला बळी पडतायेत, हे बघून गालात हसून म्हणावस वाटतं,
नाईसली डन!!!

सर्जिकल स्ट्राइक पाकिस्तानात झाला की पाकव्याप्त भारतात ?

हे जाणून न घेताच राजकारणी , भक्त , इतिहासात प्रथमच पाकिस्तानवर अशा प्रकारचा हल्ला केला , हे सांगत फिरत आहेत.

Pages