उरी - चित्रपट परीक्षण

Submitted by अज्ञातवासी on 20 January, 2019 - 01:43

लष्करातील सगळ्यात मोठा संकेत म्हणजे गुप्तता! या गुप्ततेच्या बळावर अनेक युद्धे जिंकली गेलीत...
...आणि जेव्हा गुपिते फुटलीत, तेव्हा अनेक सत्ता धुळीस मिळाल्या.
चित्रपटाची टॅगलाईन आहे, 'ये नया हिंदुस्थान है, ये घुसेगा भी, और मारेगा भी'
पुढे ऍड करायला हवं होतं... 'फिर सबको बतायेगा भी, प्रचार भी करेगा, धिंडोरा भी पिटेगा... और जिन लोगो ने काम किया, ओ चुपचाप तमाशा देखते रहेंगे'
आंतरराष्ट्रीय इमेजची पर्वा आहे कुणाला?
उरी बघतांना, खरोखर, खूप मिक्स फिलिंग आल्यात, आणि कधीकधी असा विचार मीच करतोय का, असं जाणवलं...
कारण चित्रपट बघतांना, चित्रपट संपताना,
सगळे फुल जोशात होते, आणि मी मनात अनेक प्रश्न घेऊन बसलो होतो.
१. हा चित्रपट खरोखर घडलंय, तसा बनवला गेला का?
२. आपला देश एका मोठ्या आंतरराष्ट्रीय संकेताची धूळधाण करतोय, हे पडदयावर ग्लोरिफाय करावं का? (तेही पाकिस्तानसारख्या कांगावाखोर देश शेजारी असताना) होतात सर्जिकल स्ट्राईक, पण ते करून सगळे देश तो मी नव्हेच आणि आम्ही किती शांततेचे पुरस्कर्ते या थाटात वावरतो. इथे अशाने भारतासारखा युद्धखोर देश नाही, असं वाटेल, बाहेरच्या लोकांना!
३. लष्करी अधिकाऱ्यांना डोकं नसून, सगळी प्लॅनिंग राजकारणी व सनदी अधिकार्यांनीच केली का?
अनेक प्रश्न उरी बघून आल्यावर डोक्यात थैमान घालतात.

तर सगळ्यात आधी बघुयात कथेकडे. होय, कथा आणि पटकथा, दोन्ही चांगल्या गुंफल्या गेल्या आहेत. वेगवान आणि एक एंगेजिंग हाताळणीच श्रेय मी लेखक व दिगदर्शक आदित्य धरला देईन. खरंच बऱ्याच दिवसांनी अशी वेगवान पटकथा बघायला मिळाली.पण...
कथेत परिपक्वता नाहीये... दृश्ये वरवर लिहिलेली वाटतात आणि पदोपदी लष्कर फक्त होय जी करायला आहे का? असं वाटतं.
म्युजिक लाऊड आहे, जोशपूर्ण आहे, पण कर्णमधुर नाही, आणि त्यापासून काही फ़रकही पडत नाही.
दिगदर्शन... चांगलं आहे. व्हिज्युयलायजेशन सुंदर आहे, कागदावरची कन्सेप्ट चांगल्यारित्या उतरवलीय. काही ठिकाणी अतिशय उथळ व भडकपणा दाखवलाय, ते सोडून ओव्हरऑल नाईस वर्क.
अभिनयाच्या बाबतीत, सर्व सहकलाकार चांगले काम करताना दिसलेत. प्रत्येक अभिनेता चांगल्यारित्या स्वतःला कॅरी करतो.
यामी गौतम, ही अभिनेत्री का घेतलीये, असा मला प्रश्न पडतो. ना धड अभिनय, ना धड त्या भूमिकेची देहबोली. प्रचंड खटकते.
परेश रावलनी भूमिका सुंदर वठवलीय. भूमिकेशी एकरूप होतो. एक विचारी आणि करारी अधिकारी छान जमून आलाय!
प्रमुख अभिनेता, विकी कौशल. हा अभिनेता कितीही क्रिटिकली अक्लेमड असला, तरीही या चित्रपटात हा शोभत नाही. एक आर्मीची देहबोली, आक्रमकता, नजरेत अंगार, काहीही याच्याकडे दिसत नाही. परफेक्ट मिसमॅच जाणवत राहतं...
आणि स्पेशल मेंशन, मोहित रैना...
कमी स्क्रीन स्पेस असूनही, हा माणूस लष्करी अधिकारी कसा असावा याचा उत्तम नमुना सादर करतो...
उरी बघितल्यावर माझ्या एका जवळच्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे बोल मला आठवतात.
'अरे, ज्या गोष्टी अनेक वर्षानंतर विश्वासू मित्रांबरोबर एखाद्या रम्य रात्री हळू आवाजात बोलाव्यात, त्या लाऊडस्पीकरवर गावभर काय सांगत फिरतायेत?'
असो, निवडणुका जवळ येतायेत Wink

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे जाणून न घेताच राजकारणी , भक्त , इतिहासात प्रथमच पाकिस्तानवर अशा प्रकारचा हल्ला केला , हे सांगत फिरत आहेत.
नवीन Submitted by BLACKCAT on 22 January, 2019 - 15:31
<<

कोण सांगत फिरत आहेत ??

मित्रा,
भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक पाकव्याप्त भारतातच केला होता हे आता एकादे शेंबडे पोर देखिल सांगेल. तसेच म्यानमार मध्ये भारतीय सैन्याने जो सर्जिकल स्ट्राईक केला तो देखिल म्यानमारच्या मुख्यभुमीवर नव्हे तर आता जी भारत-म्यानमार कृत्रिम सीमा आहे त्याच्या व छिंदवीन नदीच्या मधल्या भारतीय भुमीत.

कारण छिंदवीन नदी ही भारत व म्यानमारमधील खरी भौगोलिक सीमा आहे. जम्मु-काश्मिरप्रमाणे, म्यानमार सीमेबाबत कॉंग्रेसच्या बोटचेप्या धोरणामुळे हा सीमा भाग आजही वादग्रस्त आहे व ह्याच वादग्रस्त भागात पाकव्याप्त काश्मिरप्रमाणे अनेक दहशतवादी तळ निर्माण झाले.

नवीन Submitted by जावेद_खान on 22 January, 2019 - 16:59
हे साहेब सांगत फिरत आहेत
https://www.ndtv.com/india-news/pm-narendra-modi-on-surgical-strike-what...
<<
New Delhi:
When Prime Minister Narendra Modi sent army commandos across the border to conduct surgical strikes in Pakistan-occupied-Kashmir, it was with the message that they return safely "irrespective of the mission's success or failure".

मंडळी , पाकिस्तान की पी ओ के ही चर्चा त्या वेळच्या धाग्यावर झालेली आहे.

https://www.maayboli.com/node/60373 पाकिस्तान मधील अतिरेकी तळ उध्वस्त
पुरेशी झाली नाही, असं वाटल्यास तिथे पुढे चालू ठेवता येईल.

प्रतिसादां बद्दल धन्यवाद अनिरुद्ध, अज्ञातवासी व अस्मानी.
एकूणच असं दिसतय कि सर्जिकल स्ट्राईक चा विषय विद्यमान सरकारने कसा हाताळला हे तुम्हाला (अज्ञातवासी), भरत व इतर काहींना आवडले / मान्य नाही. त्यावर एवढच म्हणू ईच्छितो कि हे परिक्षण लिहिताना राजकिय मते आणि चित्रपट समीक्षा ह्यांची जरा सरमिसळ झाली आहे. हा धागा चित्रपट परिक्षणाचा असल्यामुळे बाकि मतांना वेगळ्या धाग्यावर मांडले असते तर जास्त बरे झाले असते, हे माझे मत. अर्थात मी सुद्धा प्रतिसाद लिहुन चर्चेला हातभार लावलाच.. पण जसे जसे सगळे प्रतिसाद वाचत गेलो तसे जाणवले कि दोन भिन्न धागे चालले असते. असो, परत एकदा धन्यवाद आणि पु. ले. शु.

चौकट राजा, सर्जिकल स्ट्राइकनंतर आता हा चित्रपटही सरकार म्हणा, सत्ताधारी पक्ष म्हणा , हाताळताना दिसतोय. त्यामुळे दोहोंवरच्या चर्चांतली सीमारेषा पुसली गेलीय. चालायचंच.

@चौकटराजा -
तुम्ही माझं द अकसिडेंटल प्राईम मिनिस्टर च परीक्षण वाचा, तिथे तुम्हाला ही सरमिसळ झालेली आढळणार नाही.
जिथे सत्ताधारी पक्ष या चित्रपटाचा जमेल तितका वापर करून घेतोय, प्रधानसेवक(?) नेहमीच मानभावी हसू चेहऱ्यावर आणत डायलॉग फेकतायेत,
तिथे मी परीक्षणात कुठेही, भाजप, मोदी, सत्ताधारी हे शब्द न वापरता माझा पॉईंट जमेल तितक्या शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय (त्यामुळे परीक्षण इवलेसे झाले.)
हे म्हणजे आपण म्हशी मारायच्या, आणि दुसऱ्याने माशी मारली तरी बोंबलत हिंडायच असं झालंय. आणि हे वाक्य तुम्हांला उद्देशुन बिलकुल नाहीये, उलट तुमचा अभ्यासू प्रतिसाद बघून मी प्रतिसाद आवडला, असं मनापासून नमूद केलंय.
पण शेवटी ज्याच्या हाती सत्ता, तोच पारधी, आपण फक्त तिचा कसा स्व मार्केटिंग साठी उपयोग करून घ्यायचा, ते बघायचं.
उद्या MBA च्या पुस्तकात कोटलर च्या फोटोखाली (किंवा वर?) मोदींजींचा फोटो लागला, तरी अचंबा वाटायला नको...
Happy

@भरत
प्रतिसाद आवडला, हे वेगळं सांगायला नको.

you can take political stand (pro Modi, anti Modi etc.). It is not a crime to take a political stand..... Yet
>>>>> This 'yet' is speaking much more than your previous statement.
So prevention is always better than cure Wink

https://www.youtube.com/watch?v=SylNSTF-PoM

ह्या छोट्या क्लिपमध्ये परेश रावलच्या आवाजत जे काही ऐकु येते. त्यावरुन असे वाटते की ४७, ६५ ७१ ९९ ह्या युद्धांमध्ये आपण हरलो, आपण काहीच केले नाही. हा मात्र आपल्या पराक्रमी आणि अभिमानास्पद कामगिरी करणार्‍या सैन्याचा अपमान नाही? ह्या सर्जिकल स्ट्राइकनंतर एकही जवान शहिद झाला नाही?

उरी पाहिला .
विकी कौशलने चांगलं काम केलंय. यामी गौतमीपेक्षा कीर्ती कुलहरी चांगली दिसते. चित्रपट जास्त रेंगाळत नाही. काही ठिकाणीची भडकाऊ वाक्ये सोडली तर अजून चांगला झाला असता .
परेश रावल aka गोविंद aka अजित डोवालला जास्त फुटेज आहे .इतके की संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर aka योगेश सोमण बापुडवणे वाटतात . पर्रीकरना काही कामच नाही (म्हणून बॅक टू गोवा झालेलं का Wink ) सगळे डिसीजन परेश रावलच घेतो.अगदी वन मॅन शो
मोदीजीच्या भूमिकेतला रजत कपूर छाप पाडत नाही .
त्यापेक्षा स्वतः मोदीजीनी चांगला अभिनय केला असता . (गरजूना Light 1
गाणी तितकीशी कॅची वाटली नाहीत.ठीकठाक .
काही दृश्ये भारी आहेत .
ओव्हरऑल एकदा बघण्याइतक पॅकेज आहे.

मस्त picture, दोन विकेन्ड्स ना सलग तिकीटं न मिळाल्याने आत्ता मंडे morning शो Happy रजत कपूर मोदी म्हणून आवडला नाही. त्याने लकबी चांगल्या उचलल्या आहेत पण उंची, physique आणि charisma नाही. परेश रावल नी काही ठिकाणी overact केलंय, रिअल life गोविंद चेहऱ्यावर काहीही एक्स्प्रेशन देत असेल अथवा रेघ सुद्धा हलू देत असेल असं वाटतं नाही.0

संरक्षणमंत्रीमहोदया चित्रपट पाहून आल्या. त्याचं , थेटरमध्ये त्यांनी केलेल्या घोषणाबाजीचं व्हिडियोशूट होऊन प्रसारित झालं.
आता सुरुवातीला त्यांना सिनियर असलेल्या पण आता ज्युनियरपदी गेलेल्या स्मृति इराणी या चित्रपटाचे खेळ आयोजित करताहेत.
पंतप्रधानांपासूनच चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात झालीय, तेव्हा मंत्र्यांमध्ये स्पर्धा न लागली तर नवल.

उरी या सिनेमाच्या निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय या सर्व अंगांमधे योगदान दिलेल्या भाजप व संघ कार्यकर्त्यांचे उत्कृष्ट कल्पनाविस्तार व कथानक यासह चांगल्या चित्रपटाबद्दल अभिनंदन !
अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या सिनेमामधे मात्र ज्येष्ठ कार्यकर्ते खेर साहेब व अन्य कार्यकर्त्यांनी निराश केले. इंदू सरकार मधेही कार्यकर्त्यांनी ज्या पाट्या टाकल्या त्याबाबत पक्षाच्या / संघाच्या सिनेमा विभागाने गांभिर्याने विचार करावा ही विनंती.
सूचना संपली.

आता उरी चित्रपट आवड ला की नाही यावरून तु म्ही देशभक्त आहात की नाही, हे ठरू शकेल.
https://twitter.com/SirPareshRawal/status/1093941058575192066
Though not surprising but truly pitiable that not a single opposition party leader has tweeted or praised about URI - The Surgical Strike film ...@narendramodi

आत्ताच उरी बघुन आलो. मस्त चित्रपट, एकदम आवडला.
कुठेही स्लो होत नाही आणि एकदम फोकस्ड बांधीव पटकथा. विकी कौशल आणखी आवडू लागला.
पक्षीय नजतेने बघावा लागू नये इतपतच नया भारत इ. पेरणी आहे. त्याकडे माझं तरी लक्ष गेलं नाही फार, रादर तो पॉईंट आहे असं वाटलंच नाही. आणि तो असेलच तर अत्यंत कौशल्यपूर्णरित्या हाताळला आहे. त्याचे 100 गुण.
टिपिकल आर्मीपट शंभर उपकथानक, प्रेम त्याग बलिदान रोमान्स असा सगळा मसाला घेऊन महा बोर करतात. हा असं काहीही न करता दोन तास खुर्चीला खिळवून ठेवतो आणि मनोरंजन करतो.

Uri लैच भिकार राव
याना कोणीतरी परदेशी युद्धपट दाखवले पाहिजेत
भावनिक कढ न काढता व्यवस्थित मेसेज पोचवण्याची कला आपल्याला येत नाही
आणि आपल्या हिरोना कितीही भारी शस्त्रे दिली तरी हाताने मारामारी केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही
एकतर ती यामी गौतम बळच मध्ये नर्स काय असते आणि एकदम इंटेल ची मेजर अधिकारी होते
मोदी हे मोदी वाटतच नाहीत कुठे आणि परेश रावल इतका अवघडून का चालत असतो
ते गरुड बिरुड फलटूगिरी करण्यासपेक्षा काहीतरी भारी दाखवत आला असतं
गरुड, गुहेचा वापर, खोल्यात शिरून मारणे, पाकिस्तानी पोलीस येणे आणि तयानी गोळीबार करणे बघून अरेरे का मी हा चित्रपट बघतोय असे झाले. त्यापेक्षा डिस्कव्हरीची याच हल्ल्यावरची डॉक्युमेंट्री खूपच जास्त प्रभावी होती.

https://www.youtube.com/watch?v=rXu4loJiEgE&feature=youtu.be
इंग्रजी

https://www.youtube.com/watch?v=Pm1DG-5fY70&feature=youtu.be
हिंदी

आणि ते डीआरडीओ च्या प्रमुखाला इतके बावळट दाखवल्याबद्दल तर दिग्दर्शकाला जाहीर फटके मारायला हवेत इतका संताप आला.

अरे काय लेव्हलची ती लोकं असतात आणि भारतीय लष्करात त्यांना किती मानाचे स्थान आहे याची किमान जाणीव असू नये. त्या प्रमुखाला एक इंटर्न पोरगा त्याच्या कार्यालयात नक्की काय काम करतो हे माहीती नाही, त्यावर कळस म्हणजे त्यांना तो कसा पळवतो आणि बावळट असल्याचे सिद्ध करतो हे पाहून ती कीव आली दिग्दर्शकाची.

@आशुचॅम्प हिस्टरी-टीव्ही च्या लिंक्स बद्दल धन्यवाद... या घटनेवर एवढा किस पाडला गेला की हि चांगली डॉक्युमेंटरी पाहायची राहून गेली

आणि ते डीआरडीओ च्या प्रमुखाला इतके बावळट दाखवल्याबद्दल तर दिग्दर्शकाला जाहीर फटके मारायला हवेत इतका संताप आला.

अरे काय लेव्हलची ती लोकं असतात आणि भारतीय लष्करात त्यांना किती मानाचे स्थान आहे याची किमान जाणीव असू नये. त्या प्रमुखाला एक इंटर्न पोरगा त्याच्या कार्यालयात नक्की काय काम करतो हे माहीती नाही, त्यावर कळस म्हणजे त्यांना तो कसा पळवतो आणि बावळट असल्याचे सिद्ध करतो हे पाहून ती कीव आली दिग्दर्शकाची. >> +१११

Pages