तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लग्नाचा खर्च 10 करोड!!! 2 4 नवे सूट नाही घेता आले बिचाऱ्या वीस ला, आला पुन्हा जुन्या सुटमध्ये हापिसला!! आणि मायरा पण त्याच जुन्या पिंक फ्रॉकमध्ये, बेबीचे कपडे तर आधीपेक्षा भयानक आहेत. जयदीप वेडा आहे का, बेबी वहिनी च ना आता त्याची, एवढं ओरडायला काय झालं, कोणी शिकवलं नाही का लग्नात आता बेबीला काय म्हणायचं ते?
तसही बेबी आणि त्याची बौद्धिक पातळी सारखी असल्यामुळे फ्रेंड फ्रेंड झाले दोघे तरी चालेल.

पुनर्जन्म असेल असं logicaly तर अशक्य वाटतंय कारण नंदू गेल्यावर इशा जन्मणार मग काय नंदू 20 व्या वर्षीच म्हणजे लग्न झाल्या झाल्या गेली किंवा ईशाचं २० वय पण match होत नाही

मॅक्स हाहाहा... Good one. काल तर मला किळस आली ईशाला अस पारोस बघून. Finally नेक्स्ट सीन मध्ये कपडे बदललेले बघून बर वाटलं. ह्या विक्रांतच ऑफिस आहे तरी कुठे... रोज कर्जतहून जावं लागतं..

इशुडी फारच बाळासारखी वागते.. काल सुभाचा हात पकडून जाऊ नका ना सर म्हणाली तेव्हा माझी 6 वर्षाची मुलगी म्हणाली ही सेम माझ्यासारख म्हणाली .. परत एपि बघता बघता तर तिला अजूनच वाटायला लागलं म्हणे ही सेम माझ्यासारखी आहे..
लाजल्यावर मान खाली घालणे म्हणजे किती घालायची .. अगदी मान मॉडेपर्यंत खाली घालते.. सुभाने परत Wink किस बिस घेतला तर काय वाकड तोंड करून लाजली .. फारच बोरिंग .. झी ने आता तरी पूर्ण नीट ऑडिशन घेऊन हिरॉईनी घ्याव्या..

इशुडी फारच बाळासारखी वागते.. काल सुभाचा हात पकडून जाऊ नका ना सर म्हणाली तेव्हा माझी 6 वर्षाची मुलगी म्हणाली ही सेम माझ्यासारख म्हणाली .. परत एपि बघता बघता तर तिला अजूनच वाटायला लागलं म्हणे ही सेम माझ्यासारखी आहे..>>>> आवडलं.
बेबी तो घागरा हातात धरून पाय आपटत चालते तेव्हा तर वय वर्षे साडेतीन वाटली

पुनर्जन्म असेल असं logicaly तर अशक्य वाटतंय कारण नंदू गेल्यावर इशा जन्मणार मग काय नंदू 20 व्या वर्षीच म्हणजे लग्न झाल्या झाल्या गेली किंवा ईशाचं २० वय पण match होत नाही>>>
केड्या आणि लॉजिक हे विरुद्धार्थी शब्द आहेत ओ..
आपणच लॉजिक लावायचा प्रयत्न करून बघू..विक्या 26 चा असताना बेबीचा जन्म झाला असणार. म्हणजे नंदू गेली तेव्हा साधारण विक्याच्या वयाचीच असेल असं धरून चालू. म्हणजे

तिकडे नंदू गेली आणि इकडे बेबीचा जन्म झाला. विक्या- नंदुचा बालविवाह होता की काय? जयदीपचं वय काय असेल मग?

सुभाच वय ४२ सन्गितल आहे.. म्हणजे बेबी जर आत्ता २० आहे असं मानलं तर तर सुभा २२ चा असताना बायको गेली असणार.. मग बायको निदान २२ तर असणार.. पण मग सुभा मागे म्हणाला होता की आमचा सुखाचा संसार चालु होता म्हणजे निदान २-३ वर्ष तर लग्नाला झाली असं म्हणायच होत ना.. नाहितर म्हणाला असता की नुकतच लग्न झालं होत आणि ती सोडुन गेली...... मग लग्न १८ वर्षी केलं ..
केड्या लेखन करत असेल तर त्याला आपली थोडी आयडिया दिली.. नाहितर तो काहीही लिहुन दाखवुन मोकळा होइल आणि आपण डोकं धरुन बसु..

सुभाच वय ४२ सन्गितल आहे.>>> केड्या वय विसरलाय विक्याचं. बेबीच्या स्लॅम बुक मध्ये विक्या वय 46 लिहितो.
पण लग्नाच्या वेळी एकदम ४२ झाला.

अरे लोक्स.तुम्ही हिशेब का मांडता आहात.केड्या जो दाखवतो ते मुकाट्याने बघायचं की! उगा त्याला बोलून परिस्थिती बदलतेय का?.....हलके घ्या!

लोकहो,अस समजा ना,नंदू विसपेक्षा वयाने मोठी होती.प्रेमाला वयाच बंधन नसत.मग होईल की पुनरजनम बेबीचा.केड्या आहे तो,बेबी आणि विसमध्ये २०वर्षांच अंतर दाखवू शकतो तर नंदू आणि विस मध्ये किमान 10वर्षांच अंतर तर दासवूच शकतो.
जो माणूस विसच वय ४६वरून ४२वर आणू शकतो तो माणूस नंदूच वय २०वरून ३०नक्कीच दाखवू शकतो.
जर बेबी पुनरजनमच दाखवायचा असेल तर केड्या कुछ भी कर सकता है

असा कसा काय हा नवरा? नवीन लग्न झालय ते एन्जॉय करण्याच सोडून हा लगेच गेला कामाला?

आईसाहेबान्नी कुणाच्याही खोलीत आगाऊपणे घुसण्याचा दुर्गुण नवीन सुनबाईकडून घेतला वाटत. हे अस नवीन सुनेच्या खोलीत नॉक न करता कुठली सासू जाईल? नवीन सूनबाई आहेच आगाऊपणा करायला, सॉनयाच्या रुममध्ये घुसल्या. बादवे, योगासन करण्याची सॉन्याची हि कुठली पध्दत. Lol

मायरालाही कळत नाही का, विस कुणाशी तरी फोनवर बोलतोय, तर मध्ये मध्ये बोलायच नाही. किती वर्ष झाली कॉपोरेटमध्ये काम करुन.

पण मायरा ईशाच्या बाबान्शी जेन्युअली, काळजीने बोलली. ती बोलतेय, तुम्ही पैसे चुकते करण्याची काहीच गरज नाही, तरीही ह्यान्च 'कसेही करुन चुकते करीन चालूच.' मायराने नक्की खराच खर्च सान्गितला ना ? Uhoh

पुनर्जन्म असेल असं logicaly तर अशक्य वाटतंय >>>>>>> काल पुन्हा एकदा पुनर्जन्माची हिन्ट दिली. जयदीप आणि ईशाने एकमेकान्ना उत्सफुर्तपणे टाळया दिल्या. तेव्हा जयदीप म्हणाला, 'अरेच्चा हे आपल्याला कस सुचल?' हयाचा अर्थ नन्दू सुद्दा अश्याच फ्रेन्डली टाळया त्याला देत असणार. तिला सुद्दा हा 'माय फ्रेन्ड वहिनी' म्हणत असणार.

लेटेस्ट मायनस १ भाग होता बहुधा काल पाहिला तो. काय बोअर भाग. ईशा नुसतीच इकडून तिकडे फिरते. पूर्ण एपिसोड मधे दोनच गोष्टी घडल्या. ती एक गूढ खोली जिच्या दारावर नॉक करायचे नाही, आणि जालिंदर रिटर्न्स. बाकी सगळे नुसते पाणी घातलेले. एकेक सीन आर्ट फिल्म पेक्षाही जास्त रेंगाळत रेंगाळत चालला होता. नुसती ईशा खालून वर यायला पाच मिनीटे.

आणि पुन्हा तो कोणाच्यातरी जीवाला असलेला हंगामी धोका राजापूरच्या गंगेसारखा पुन्हा प्रकट झाला आहे. आत्तापर्यंत दहा वेळा मारले असते जालिंदरने ईशाला जर ती टार्गेट असती तर. इन फॅक्ट आत्तापर्यंत यांना समजायला हवे की ती टार्गेट नाही (तो एका सीन मधे स्पष्ट बोलतोही तसे, पण तो सीन प्रेक्षकांकरता आहे, विक्या ला ते माहीत नाही हे गृहीत धरूनही)

जावई असणार. नंदूचा अपघाती मृत्यू झाला असेल पण तो अपघात नसून विक्याने नंदूचा खून केला होता हे जालीला माहित असणार. ईशा पुनर्जम आहे पण काय दिवे लावते काय माहित नाहीतर झीम्मा खेळत बसेल जयदीपबरोबर. ती ईमारत जी शीर्षकगीतात दाखवतात त्यावरून नंदूला ढकलून दिले असेल, बाजीगर स्टाईल. अरूणरावांनी परत काही गहाण नको टाकायला.

नाष्टा म्हणून फोडणीची पोळी करायला निघाली ही ! धन्य ती माऊली>>त्यासाठी शिळ्या पोळ्या लागतात ते सांगा तिला. जयदीपीशा जोडी मस्तय.

तुमचं ऐकलं त्यांनी, आता डायरेक्ट घर विकलं! >>>>> अनेक इललॉजीकल गोष्टीमधली ही पण एक का? कारण ते चाळीत रहातात आणि चाळीमधले लोक टेनंट्स असतात ना? ते घर कसं विकू शकतील? कोणी तरी एक ओनर असतो तो भाडं वसूल करायला येतो असं वैभव मांगलेच्या सिरीयलमध्ये पाहिलं होतं.

पागडीचं असेल तर विकता येतं. >>>> पागडी ही कॉन्सेप्ट माहीत नाही, पण असं काही असेल, तर मग घर विकल तर ठीक आहे. मला वाटलं की लेखक विसरला की चाळीतील घर आहे आणि ते विकता येणार नाही.
लग्नानंतर स्टोरी मध्ये ट्विस्ट येणार हे ऐकून मी गेले 2-3 दिवस परत पाहायला सुरुवात केली आहे, पण आज फोडणीची पोळी ऐकून, परत डिप्रेशन आलं Proud

हे दोघे लग्न झाल्यासारखे तर अज्जिबात वाटत नाहीत.. ऑफिस मध्ये होते तसेच फॉर्मल आहेत एकमेकांशी ..
नवी नवरी टाईप काही वाटलंच नाही..

Pages