फुकटात विनासायास वेटलॉस

Submitted by शाम भागवत on 3 July, 2018 - 03:17

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मी सध्या Preventive and Social Medicine चा भाग असलेल्या Biostatistics and Epidemiology ह्या विषयात Ph.D. करत आहे. डॉ. जगन्नाथ दीक्षित Preventive and Social Medicine विषयाचे Govt. Medical College, लातूरला Associate Professor आहेत. सदर चर्चा माझ्या विषयाशी संबंधीत असल्याने मीही काही मुद्दे मांडत आहे.

डॉ. दीक्षितांचा जो लेख इकडे कुणीतरी दिला होता (https://www.ijclinicaltrials.com/index.php/ijct/article/view/44/37), त्याला खर्या अर्थाने संशोधनपर लेख म्हणता येणार नाही. आम्हाला M.Sc. (Biostatistics and Epidemiology) मध्ये Methods in Clinical Trials हा विषय शिकवायला AIIMS Delhi हून Biostatistics ह्या विषयाचे Professor आले होते. त्यांच्या शिकवण्यानुसार जगात/भारतात कोणतीही clinical trial करताना WHO (जागतिक आरोग्य संघटना) च्या निर्देशानुसार आधी तिची नोंदणी करावी लागते. प्रस्तावित trial, जर सगळ्या ethical guideline/consideration वर खरी उतरत असेल तरच तिला परवानगी दिली जाते. जगातील/भारतातील नामवंत नियतकालिकांनी देखील घोषित केले आहे की clinical trial संबंधीत लेख नोंदणीशिवाय स्वीकारणारच नाहीत. मला आठवते, त्यांनी आम्हाला एक assignment दिले होते; ज्यात कोणतीही प्रकाशित clinical trial संबंधीत study घेऊन त्यांच्यासमोर सादर करायची होती. मात्र सादरीकरणानंतर त्यांनी लक्षात आणून दिले की ती registered नव्हती, कारण नियतकालिकांना सदर studies प्रकाशीत करतांना registered no. सुद्धा छापावा लागतो. त्यांनी आम्हाला सांगितले होते कि तुम्ही सदर नियतकालिकाला unregistered study का छापली म्हणून जाब विचारू शकता, किंबहुना विचाराच. भारतातही clinical trial registry आहे (संबंधित लिंकवर सविस्तर वाचू शकता: http://ctri.nic.in/Clinicaltrials/login.php). डॉ. दीक्षितांचा लेख International Journal Of Clinical Trials ह्या नियतकालिकामध्ये प्रकाशीत झाला असल्याने त्यांची study ही clinical trial आहे असे वरकरणी भासत असले तरी ती नाही. मुळात माझा तर नियतकालिकाच्या विश्वासाह्र्तेवरच प्रश्न आहे. त्यांना सदर लेख भेटल्यानंतर (२१ जुलै २०१४) पुढच्या दहाव्या दिवशीच (३१ जुलै २०१४) प्रकशित केला आहे. कोणतेही उत्तम नियतकालिक लेख छापण्यास सरासरी २ महिन्यांपेक्षा जास्त दिवस घेतात. संबंधीत नियतकालिकाला initial screening नंतर सदर लेख प्रकाशनासाठी सुयोग्य वाटला तर तो कमीत कमी दोन peer-review फेर्यांमधून जातो (माझे स्वतःचे दोन संशोधन लेख छापण्यास अनुक्रमे ६ महिने व १ वर्ष लागले, एक लेख तर ४ peer-review फेर्यांमधून गेला होता). सध्या भारतात गल्ली-बोळांत जागोजागी संशोधनपर लेख छापणाऱ्या नियतकालिकांची दुकाने उघडली आहेत. WHO चे स्पष्ट निर्देश असताना हे नियतकालिक International Journal Of Clinical Trials ह्या नावाखाली unregistered clinical trial ka छापत आहे, हे कळण्यास मार्ग नाही.

आता प्रश्न राहिला डॉ. दीक्षितांच्या लेखाचा, तर ह्याला social research मध्ये Pre-Post Non-experimental study म्हणतात. ह्यात कोणताही comparative/control गट नसतो, तर एखाद्या विशिष्ट गटात एखाद्या intervention आधी व नंतरच्या स्तिथीचे मोजमाप केले जाते. अश्या प्रकारच्या studies ह्या social research मध्ये अत्यंत प्राथमिक स्तरावरच्या मानल्या जातात, त्यामुळे त्यांच्या निष्कर्षांवर कितपत विश्वास ठेवावा हाच खूप मोठा प्रश्न असतो. मुळात अश्या studies ची विश्वासर्हता clinical trial द्वारेच प्रस्थापित केल्या जाऊ शकते. डॉ दीक्षितांचा पिंड हा researcher चा नाही, ते activist वाटतात. आपण जेव्हा एखादी नवीन पद्धत सुचवत असतो तेव्हा तिची विश्वासर्हता आणि उपयोगिता वेगवेगळ्या अभ्यासांद्वारे तपासावी लागते, तरच लोक त्यावर विश्वास ठेवतील.

मीही डॉ. दीक्षितांची ABP Majha वरची मुलाखत ऐकली आहे, त्यावर मी नंतर सविस्तर लिहील.

राहुल छान प्रतिसाद.

500 प्रतिसाद आधी हा वरील प्रतिसाद आला असता तर लोकांची किती ऊर्जा वाचली असती Wink

राहुल
त्या रिसर्च पेपरच्या मेथडॉलॉजी बाबत मी मागच्या किंवा त्या आधीच्या पानावर प्रतिसाद दिलेला आहे. कृपया वाचावा ही विनंती. हे मत मान्यच आहे.

@ राहुल +१.

गुरू माऊलीचे विश्वासू समर्थक कुठे आहेत?
>>
आ.रा.रा.
ते अजुनही समर्थनच करतील!

ते लाख करे ना समर्थन जाहिरातबाजी. पब्लिक हेल्थ बेटरमेंटची खोटी कळकळ दाखवून, दुसर्‍या कुणाच्या नावावर जाहिरातबाजी करून आपला मतलब साधणार्‍या एखाद्याची कसोशी समजू शकतो पण ईथली शिकली सवरलेली मेंढरं चमत्काराला भुलून, कॉमन सेन्स विसरून जाहिरातबाजांकडून हाकून घेत त्यांची भलामण करत होती हे बघणे अतिशय दुर्दैवी, केविलवाणे आणि अनाकलनीय होते.

बस्के
तुमचा प्रतिसाद मी आमच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर कॉपी केला आहे. परवानगी गृहीत धरली होती.

इथे काही मुद्दे पुन्हा पुन्हा भोपळे चौकात आल्याप्रमाणे येत आहेत. पुन्हा पहिल्यापासून वाचणे आणि तिथले संदर्भ देणे हे जिकीरीचे आहे. कुणीतरी यातले हेत्वारोप खोडून तसेच भक्ती बाजूला सारून नेमकेपणाने नवा धागा मांडल्यास नवीन वाचणा-यांची सोय होईल. त्यावर मिशन मोड मधे असणा-यांनी विरोध किंवा समर्थन या चष्म्यातून आपले सामाजिक कार्य चालू न ठेवल्यास प्रतिसाद संख्या आटोक्यात राहील.

नव्या धाग्यात यातले महत्वाचे प्रतिसाद देखील यावेत. जेणेकरून एकाच छाताखाली महत्वाची माहिती मिळत राहील.

हेत्वारोप याचा अर्थ स्पष्ट करतो. एक उदाहरण म्हणून काहीही खा वर झालेल्या चर्चांची संख्या मोजा. यावर सुरूवातीला जी स्पष्टीकरणे दिली आहेत तीच बस्केंच्या प्रतिसादात वेगळ्या शब्दांत आलेली आहेत.
काहीही खा ही कल्पना दीक्षित भाषणात स्पष्ट करताना सांगतात की आत्ता असलेले डाएट प्लान्स अमूक खा, तमूक खा, अमूक खाऊ नका असे सांगतात. त्यामुळे माझ्या एकट्याचा आहार वेगळा असे. नंतर आजूबाजूचे चांगले चुंगले खात असल्याने संयम ठेवणे जड जात असे. असे प्लान सांभाळणे कठीण आहे. त्यामुळे दोन वेळा खाताना काहीही खाल्ले तरी फारसा फरक पडत नाही. थोडक्यात पथ्यपाणी कमीत कमी असल्याने हा प्लान सोपा आणि सुटसुटीत आहे. याचा आर्थ काहीही खा आणि कितीही खा असा नाही हे त्यांच्या व्याख्यानात पुढे आणि नंतर पुस्तक वाचताना ध्यानात येते.

विपर्यास करून चर्चा घडवणे आणि ती दाखवून देणा-यास भक्त ठरवणे अशा मार्गाने ही चर्चा चालू आहे.

विपर्यास करून चर्चा घडवणे आणि ती दाखवून देणा-यास भक्त ठरवणे
<<
किरणू,
तुम्ही भक्त आहात हे मान्य करून टाका. Lol
कारण तुम्ही (तुमच्या मते) मुद्देसूदपणे स्वतःची भक्ती सिद्ध करीत आहात. या धाग्यातले तुमचे सगळे भक्तीपर प्रतिसाद मी पाहिले आहेत. अन काहीच बोललो नाहिये. पण आता मात्र बिल झालंय. कुणी कशाचा कुठे विपर्यास केलाय?

>>
दीक्षित भाषणात स्पष्ट करताना सांगतात की आत्ता असलेले डाएट प्लान्स अमूक खा, तमूक खा, अमूक खाऊ नका असे सांगतात. त्यामुळे माझ्या एकट्याचा आहार वेगळा असे. नंतर आजूबाजूचे चांगले चुंगले खात असल्याने संयम ठेवणे जड जात असे. असे प्लान सांभाळणे कठीण आहे. त्यामुळे दोन वेळा खाताना काहीही खाल्ले तरी फारसा फरक पडत नाही. थोडक्यात पथ्यपाणी कमीत कमी असल्याने हा प्लान सोपा आणि सुटसुटीत आहे. याचा आर्थ काहीही खा आणि कितीही खा असा नाही हे त्यांच्या व्याख्यानात पुढे आणि नंतर पुस्तक वाचताना ध्यानात येते.
<<

इथे किती कोलांट उड्या मारल्या ते लक्षात येतंय का?

०. आत्ताचे डाएट प्लॅन्स अमुक तमुक खाऊ नका सांगतात.
१. "प्लान सांभाळणे कठीण कारण आजूबाजूचे चांगले चुंगले खातात."
२. त्यामुळे दोन वेळा खाताना काहीही खाल्ले तरी फरक पडत नाही. "फारसा"
साडे माडे ३. याचा अर्थ काहीही खा अन कितीही खा असा नाही, "हे त्यांच्या व्याख्यानात अन पुस्तकात ध्यानात येते"

तुमच्या "ध्यानात" नक्की काय आलं ते माझ्यातरी बालबुद्धीच्या पलिकडचे आहे.

कस्लं ध्यान आहे हे किरणुद्दीन?! Lol

असो. आता स्वतःच्या प्रतिसादास प्रतिसाद देणारे किमान १२-१५ तरी दिसू द्यात.

हो गडे!
कोणीतरी एक नवा धागा काढा.
त्यात भाघवतांनघ लिहिलंय त्याचा नेमका अर्थ, दीक्षीतांनी कुठल्या भाषणात, कार्यक्रमात काय सांगितलंय त्याचा नेमका अर्थ असं सगळं सांगणारा.
क्लिनिकल रिसर्च परवडणार नाही, तरीपण रिसर्च म्हणा आणि त्याचा निकालही मान्य करा.
इन्सुलिनची बेसिक थियरी (माप पडणे) गंडलीय त्याबद्दल अजिबात बोलू नका.
एवढं करून ही मेथड चांगली का, तर इतर डाएट प्लान्सपेक्षख पाळायला सोपी.
(आहारात योग्य बदल करणं कठीण पण आहे तोच आहार कायम ठेवून दिवसातून फक्त दोनदा खाणं सोपं. )
एवढं करून पुढे पठार लागेल, तेव्हा कठीण पद्धतच निवडावी लागेल.
म्हणजे फायदे किती अचाटच. वा!वा!

Kiranuddin, thank you for the complement. But kindly, please, don't forward without permission. And I do not give permission to use my personal info to be forwarded on whatsapp groups.

एवढं करून ही मेथड चांगली का, तर इतर डाएट प्लान्सपेक्षख पाळायला सोपी.
<<
नव्हे.

चांगली का??

तर फुकट. विनासायास. अन डॉक्टरांच्या पोटावर पाय देणारी, *म्हणून*. उग्गं सोपी बिपी म्हणू नका. दिवसातून दोनदाच ५५-५५ मींटं वाट्टेल ते हादडायला कित्ती सेल्फ कंट्रोल लागतो ठौकेय का? Angry

भरत.
प्रतिसादात व्याकरण संशोधन नीडेड. L-)

Baske
ok
I don't have any personal info of yours. I have just mentioned a lady on online Marathi forum. I have copied the methodology which will be convenient for everybody.

एक डॉक्टर असलेल्या व्यक्तीला दुस-या कुणीतरी दाखवून देईपर्यंत रिसर्च पेपर बाबत काय आक्षेप घ्यावेत हे समजत नाही हेच गंमतीचे आहे. हे म्हणजे काय झालेय की आता भूमिका तर घेतलीय विरोधाची तर मागे हटता येत नाही. आपली सुरूवात जाहीरात करण्यावरून झाली , ते आक्षेप खोडल्यानंतर अजून काहीतरी, मग अजून काही तरी ,, मग अजून काही तरी असे करून धाग्याचा विचका झाला.

त्या ऐवजी सुरूवातीलाच रिसर्च पेपरबाबत आक्षेप घेऊन बॉ़ंबगोळा नसता का टाकता आला ?
अर्थात त्यालाही इथे उत्तर देता येऊ शकते. पण या पद्धतीने आजारी असलेल्या आयडीजना उत्तर देणे हे माझे जीवितकार्य नाही. विरोधभक्ती नावाचा प्रकार मात्र चांगल्या प्रकारे समजला.
(आता घरी आल्यानंतर कॉबोर्ड हाताशी आला. उशिराबद्दल क्षमस्व ! Wink )

अन डॉक्टरांच्या पोटावर पाय देणारी, *म्हणून* >>>> अरेच्चा ! हे आत्ता वाचलं. बरं तर मग आता विरोधाचे कारणच जर लक्षात आले तर पुढे बोलण्यात अर्थ नाही. नाही का ? तुम्हाला उत्साह असेल तर ( हा काय प्रश्न झाला ?) तर , तर, तर चालू द्या !

डॉ. दीक्षितांच्या मधुमेह आणि स्थूलत्वावर मात या संबंधीच्या जीवनशैली बदल अभियानाबद्दल इथे बरीच भवती न भवती चालू आहे.

ढेरी-आहेरे आणि ढेरी-नाहीरे अशा दोन्हीही वर्गांनी या चर्चेत भाग घेतला आहे. त्याचप्रमाणे काही आहार शास्त्राचे तज्ञ् आणि डॉक्टर मंडळींनी देखील या डॉ. दीक्षित प्रचलित द्वीभुक्त जीवन शैलीवर उलट सुलट मत प्रदर्शन केले आहे. त्यामुळे माझ्यासारखा सामान्य वाचक गोंधळात पडला आहे.

त्यात आणखी भर म्हणजे स्वतः डॉ. दीक्षित माबो वर उपस्थित नसल्याने या चर्चे संदर्भात त्यांची बाजू न कळल्याने हि चर्चा एकांगी होते आहे असे वाटते आहे.
नुकतेच कायप्पा वरून फिरत आलेले एक फॉरवर्ड माझ्या हाती पडले आहे. ते स्वतः डॉ. दीक्षितांनी लिहिले आहे असे दिसते आहे. त्यात त्यांनी सर्व आक्षेपांना उत्तरे दिली आहेत. त्यावर साधक बाधक चर्चा व्हावी हि अपेक्षा.

झैरात : मी नुकतेच या विषयावर लिहलेले होते :- जेवीद्वि व्रत - द्विभूक्त्स्य वजनो दास:

Quote
“करके देखो!!”

गेल्या काही दिवसांपासून आमच्या जीवनशैली बदलाच्या योजनेबाबत (ज्याचा उल्लेख काही लोक गैरसमजातून आहार योजना किंवा डाएट प्लान असा करतात) अनेक पोस्ट सोशल मेडिया वर व्हायरल झाल्या. पोस्ट लिहिणाऱ्या लोकांमध्ये फेसबुक/whatsapp वरील विद्वान, काही आयुर्वेदिक डॉक्टर, काही आहारतज्ञ तसेच काही मधुमेह तज्ञ यांचा समावेश आहे. आमच्या अभियानातील अनेक सदस्यांनी व हितचिंतकांनी “सर, याबाबत काही लिहा” असे अनेकदा सांगूनही मी काही लिहिले नाही. एकतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात “विनासायास वेट्लॉस व मधुमेह प्रतिबंध” या विषयावर व्याख्याने देत मी भ्रमंती करत होतो. दुसरे म्हणजे अशी प्रतिक्रिया देऊन काही उपयोग होतो याविषयी मी साशंक होतो...आपण आपले काम करत राहावे. जर त्याचा लोकांना फायदा झाला तर ते काम टिकेल नाही तर काळाच्या ओघात लोप पावेल अशी माझी याबाबत साधी सोपी philosophy आहे!
या सर्व अभियानाची पार्श्वभूमि थोडक्यात सांगतो. तशी ती माझ्या youtube वरील अनेक व्याख्यानांमध्ये मी सांगितली आहेच. २०१२ मध्ये माझे वाढलेले वजन कमी करण्यासाठी मी प्रयोग केले. अनेक अयशस्वी प्रयोग फसल्यावर माझ्या हाती कै.डॉ.जीचकारांचे youtube वरील एक व्याख्यान पडले. माझ्या तर्काला त्यातील विवेचन पटल्याने मी स्वतःवर प्रयोग केला. माझे वजन ८ किलो आणि पोटाचा घेर २ इंच कमी झाला. त्यानंतर मी शेकडो लोकांवर प्रयोग केले आणि मग हे अभियान सुरु झाले. आज ३७ देशातील सुमारे ४०००० हजार लोक आमच्या प्रत्यक्ष सम्पर्कात आहेत आणि लाखो लोकांनी youtube वरील व्याख्याने ऐकली आहेत. या अभियानात आम्ही ६१ लोक काम करतो. यात अनेक डॉक्टर्स आहेत ज्यात सर्व प्याथी व अनेक विशेषज्ञांचा समावेश आहे. याखेरीज अनेक डॉक्टर नसलेले लोकही आहेत. आम्हा सर्वांना जोडणारा एकच दुवा आहे आणि तो म्हणजे या जीवनशैली बदलाचा आम्हा सर्वांना लाभ झाला आहे! आपल्याला एकही पैसा खर्च न करता जे जीचकारांमुळे मिळाले ते इतरांना तसेच मिळावे हि एकच भावना आमच्या मनात आहे. या अभियानात कोणाकडूनही एक पैसाही घेतला जात नाही.
जीवनशैली बदलामुळे झालेल्या स्थूलत्व आणि मधुमेह अशा आजारांचा मुकाबला प्रभावीपणे करायचा असेल तर त्यासाठी गोळ्या औषधे नाही तर जीवनशैलीत योग्य बदल करणे हाच उपाय असू शकतो यावर आमचा विश्वास आहे. हा तर्क विचार करणाऱ्या कोणालाही पटेल असाच आहे. आमचा हा तर्क केवळ wishful thinking वर आधारित नसून याला आम्ही प्रसिध्द केलेल्या शोधनिबंधांचा आणि जागतिक संशोधनांचा आधार आहे.

आमचा सल्ला साधा आणि सोपा आहे. दिवसातून दोन वेळा जेवा (प्रत्येक जेवण 55 मिनिटांच्या आत सम्पवा) आणि ४५ मिनिटात दररोज ४.५ किमी चाला असा तो सहज अमलात आणण्याजोगा सल्ला आहे. इन्सुलिन निर्माण करणाऱ्या, साखरेचा चहा अशा सर्वांना निरुपद्रवी वाटणाऱ्या पदार्थांनाही आम्ही जेवणच समजतो हेही आम्ही सांगतो!

आमच्या जीवनशैली बदलांचे खालील चार objective परिणाम होतात:
१) वजन कमी होते
२) पोटाचा घेर कमी होतो
३) HbA1C (रक्तातील तीन महिन्यांची सरासरी रक्त शर्करा ) कमी होते
४) उपाशीपोटीचे रक्तातील इन्सुलिन कमी होते

या जीवन शैली बदलाबाबत मत प्रदर्शित करणाऱ्या सर्वांना माझे सांगणे आहे की जर उपरोक्त चार बाबी घडत असतील तर जगातील कोणताही डॉक्टर हे चांगले घडते आहे असेच म्हणेल! माझी विनंती एवढीच आहे की मी सांगतोय तो प्रयोग तुम्ही फक्त ३ महिने करून पाहा. प्रयोग करण्या आधी हे चार parameters स्वतःच नोंदवून ठेवा आणि तीन महिन्यांनी त्यात काय बदल होतोय ते पाहा... फायदा झाला तर आमच्यात सामील व्हा! नाही झाला तर जगात इतर हजारो पद्धती उपलब्ध आहेतच!! आणि इतर कोणत्या पद्धतीने असा फायदा झाला तर ते आम्हाला सांगा... अभियानात त्याचाही आम्ही समावेश करू...कारण आमचे कोणतेही दुकान नाही, आणि आम्हाला काहीही विकायचे नाही...विचार करून कोणाचेही वजन कमी झाल्याचे ऐकिवात नाही हे लक्षात घ्या! तर्क आणि बुद्धी इतकाच अनुभव हा महत्वाचा आहे.
आता लोकांनी व्हायरल केलेल्या पोस्ट विषयी थोडक्यात खुलासा करतो:

१) फेसबुक आणि whatsapp वरील करमणूक करणाऱ्या पोस्ट:
या पोस्टचे अनेक प्रकार आहेत. त्यात काही विनोद हास्य निर्माण करतात...काही अभिरुचीहीन आहेत! असे लिहिण्यामागचे मुख्य कारण हेच की याबाबत लिहिले तर ते वाचले जाईल हि खात्री! याकडे किती लक्ष द्यावे याचा विचार ज्याने त्याने करावा. पण स्वतःचे किंवा इतरांचे लट्ठपणा किंवा मधुमेह या बाबत गंभीर असणारे बहुतांश लोक अशा पोस्ट बाबत नाखूष असतील यात शंका नाही. माझे सांगणे एवढेच आहे कि असे काही लिहून किंवा share करून तुम्ही एका सेवाभावी अभियानाला मदत करत आहात कि त्याची शक्ती कमी करण्याचा प्रयत्न करत आहात याचा विचार जरूर करा. तुमचा जो उद्देश्य आहे त्याबरहुकूम तुम्ही वागत असाल तर काही अडचण नाही पण तसा हेतू नसेल तर मात्र लक्ष्य द्या.
२)आयुर्वेदिक डॉक्टरांच्या पोस्ट:
अनेक आयुर्वेदिक डॉक्टरांनी काही पोस्ट लिहिल्या. त्यापैकी एकाने ५५ मिनिटे सलग किंवा थांबून थांबून खाण्याने आयुर्वेदाच्या द्रूष्टीकोनातून काय दुष्परिणाम होतील याचा उहापोह केला. '५५ मिनिटात जेवण आटपा' आणि '५५ मिनिटे जेवत राहा' यातील फरक लक्षात न घेतल्याने ही टीका झाली. आयुर्वेदाबाबत काही बोलावे हा माझा अधिकार नाही. पण आधुनीक वैद्यकाच्या माझ्यासारख्या डॉक्टरने आयुर्वेदाचे याबाबत काय म्हणणे आहे ते मान्यच करायला हवे हा हटट अनाठायी वाटतो! लोकांना pathyपेक्षा परिणाम महत्वाचा वाटतो हे वास्तव आहे.
काही तज्ञ म्हणाले की तुम्ही हे सर्व आयुर्वेदावर आधारित आहे असा ऋण निर्देश केलेला नाही! आमचा जीवनशैली बदल हा इन्सुलिन निर्मितिच्या सिद्धांतावर आधारित आहे. त्याला पूरक असलेले आयुर्वेद, वेद, जैनीसम आदींचे संदर्भ आम्ही जरूर वापरतो. उपरोक्त दोन बाबींमधील फरक लक्षात घेतला म्हणजे गैरसमज होणार नाही.
काही तज्ञ म्हणाले की यात प्रकृती बघून आहार द्यायला हवा... आम्ही असे सांगतो की आमचा जीवनशैली बदल स्वीकारण्यापूर्वी जे खात होतात ते नंतरही खाऊ शकता फक्त दोन जेवणात विभागून खा. सामान्यपणे लोक त्यांना सहन होतील असेच पदार्थ खातात. अभियानात सामील होण्यापूर्वी ज्यांचा आयुर्वेदावर विश्वास आहे असे लोक त्यांच्या प्रकृतीनुसारच खात असणार!
३) आहार तज्ञांच्या पोस्ट:
यातील काही लोकांच्या मते डॉक्टरांनी आहाराविषयी बोलायला नको कारण त्यांनी पोषण शास्त्राचा अभ्यास केलेला नाही आणि तशी कुठली पदवी प्राप्त केलेली नाही. डॉक्टरकीच्या (MD) साडे चार अधिक एक अधिक तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात nutrition या विषयाबाबत बराच अभ्यास करावा लागतो. पोषणाचा आरोग्यावर होणारा परिणाम आणि विविध आजारांमध्ये कोणता आहार द्यायला हवा याचाही सखोल अभ्यास डॉक्टरांना करावाच लागतो. त्यामुळे आहाराविषयी बोलणाऱ्या डॉक्टरांना पोषण क्षेत्रातील quack म्हणणे हे जरा अतीच झाले! असो. कोणी काय म्हणावे याला सोशल मेडिया मध्ये काही बंधने आजतरी नाहीत!
दुसरे म्हणणे असे की प्रत्येकाचा आहार वेगवेगळा ठरवून द्यायला हवा. सगळ्यांना एकच आहार कसा चालेल? प्रत्येक व्यक्ती वेगळी असली तरी मनुष्य म्हणून सर्व समान असतात हे सत्य आहे! त्यामुळे व्यापक तत्व सर्वांनाच लागू होतात तपशिलात फरक पडू शकतो.
४) मधुमेह तज्ञांच्या पोस्ट:
एका मधुमेह तज्ञांनी “कैफ,धोनी वगैरे...” अशी छान पोस्ट टाकली होती. त्यांनी इन्सुलिन कमी झाल्याने काय फायदे होतात याचे उत्तम विवेचन केले आहे. त्यांना मी असे लिहिले की “तुमच्या काही रुग्णांमध्ये दोनदा जेवून आणि अनेकदा जेवून मी सुरुवातीला सांगितलेल्या चार objective parameters मध्ये काय फरक पडतो ते पाहा आणि मग आपले मत बनवा”. त्यावर अजून त्यांचे उत्तर आलेले नाही. महाराष्ट्रातील डॉ.बंडगर, डॉ.इंदुरकर आणि डॉ.अष्टेकर असे अनेक मधुमेह तज्ञ या जीवनशैली बदलाला आपली मान्यता दर्शवतात!

सारांश रूपाने सांगायचे तर हा लढा स्वतःचे आरोग्य स्वतःच्या ताब्यात ठेऊ पाहणाऱ्या सर्वसामान्य लोक तसेच त्यांना मदत करू पाहणाऱ्या डॉक्टर्स विरुद्ध कायम लोकांना स्वतःवर अवलंबून ठेवू पाहणाऱ्या तज्ञ तसेच आरोग्याविषयी उदासीन अशा समाजामधिल आहे!

महात्मा गांधींनी मोतीलाल नेहरूंना ब्रिटीश साम्राज्याशी लढण्यासाठी उपवास करणार असल्याचे सांगितले. त्यावर मोतीलाल नेहरूंनी असे करून एवढ्या मोठ्या साम्राज्याला काय फरक पडणार अशी शंका उपस्थित केली. त्यावर गांधींनी दिलेले उत्तर आजच्या चर्चेबाबतही तेवढेच महत्वाचे व दिशादर्शक आहे... गांधी म्हणाले ” करके देखो!”

मत मतांतरे असणाऱ्या सर्वांना मीही तेच सांगेन... करून बघा! वजन, पोटाचा घेर, HbA1C आणि उपाशीपोटीचे इन्सुलिन कमी झाले तर आमच्यात या नाही तर अलविदा!!

-डॉ.जगन्नाथ दीक्षित
Unquote

डिस्क्लेमर : हे कायप्पा फॉरवर्ड आहे. अधिकृतपणाबद्दल खात्री नाही परंतु नाण्याची दुसरी बाजू देखील कळावी म्हणून येथे दिले आहे.

डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचाच हा कायप्पा फॉर्वर्ड आहे का हे तपासता येईल. एखाद्याने इथल्या उपद्व्यापांना उत्तर द्यायचे ठरवले तर साधारण ते असेच असते. (तशी उत्तरे इथे दिली गेलेली आहेत).
रिसर्च पेपरबाबत देखील उत्तर देता येऊ शकते. पण ते नेमके कुणाला द्यायचे हाच प्रश्न आहे. आणि त्याचा उपयोग तरी काय ?

रिसर्च पेपरबाबत देखील उत्तर देता येऊ शकते. पण ते नेमके कुणाला द्यायचे हाच प्रश्न आहे. >> त्याही आधी ऊत्तर कोणी द्यायचे हा प्रश्न आहे.
ऊत्तर देणार्‍याकडे रिसर्च पेपर मध्ये लिहिलेला सायंटिफिक रिसर्च समजून घेण्यासाठी आणि त्यावर अधिकारवाणीने भाष्य करून "convenient for everybody." अशी डिजिटल दवंडी पिटण्यासाठी लागणारी किमान शैक्षणिक पात्रता आहे का प्रश्न कळीचा आहे.

पात्रता नसल्यास तुमची डिजिटल कळकळ जाहिरात ह्या सदरात मोडते.

तात्पर्य.... नुसते 'जाहिरातीचा मुद्दा खोडून काढला' असे पोकळ क्लेम फॅक्ट म्हणून विकत नाहीत.

एखादा डॉक्टर आपल्या पेशंटला काही दिवस ताक, दही हे पदार्थ टाळा असे सांगतो तेव्हां त्याने रिसर्च केलेला असतो का ?

एखादा डॉक्टर आपल्या पेशंटला काही दिवस ताक, दही हे पदार्थ टाळा असे सांगतो तेव्हां त्याने रिसर्च केलेला असतो का ? >> माझे ऊत्तर 'हो किंवा नाही' असे काहीही असले तरी हा प्रश्न तुमच्या डॉक्टरांनाच विचारलेला योग्य नाही का? त्यांच्या सल्ल्याने तुमच्या आरोग्यात फरक पडणार आहे माझ्या ऊत्तराने नाही.

मला नोव्हेंबर १७ मधे मधुमेहपूर्व अवस्थेचे निदान झाले होत. (३ महिन्याच्या साखरेचा निर्देशांक ७.२, आणि साखर >१२५. ) एक गोळीही चालू झाली होती. पण मला अस वाटत होत की आहार पद्धतीत काहितरी बदल केल्यास फायदा होईल. मी खायचो कमी प्रमाणात. आहाराच (साखर, उर्जा, मेद वगैरे) सामान्य ज्ञान होत.व्यायाम माझ्या वयाच्या मानाने जास्तच चालू होता. (आहे). पण तरी सुद्धा वजन काही केल्या कमी होत नव्हते. त्यात शिवाय मधुमेहपूर्व अवस्थेचे निदान.
या परिस्थितीत मायबोलीवरच दीक्षित पद्धतीबद्दल वाचनात आले व मी ती लगेचच अमलात आणायचा निर्णय घेतला. आता मी जवळ जवळ ११ महिने दीक्षित पद्धतीने आहार करत आहे. .

-माझे वजन सुरवातीला सहा महिन्यात सहा किलो कमी झाले. नंतर कमी होण्याचा वेग कमी झाला.
-पोटाच घेर कमी झाला. कपडे एक आकाराने कमी झाले. जाड्या दिसण्या ऐवजी मी आता सुदृढ दिसतो. (माझा व्यायाम चालू आहे )
-गेल्या ११ महिन्यात ३ -४ दिवस सोडल्यास जेवणाच्या वेळा पाळल्या. ही गोष्ट अवघड गेली नाही.
- फक्त दीक्षित पद्धतीला अपवाद म्हणजे दररोज सकाळी माझे ३ -४ कप दुध असलेले चहा व्हायचे. वजन कमी होण्याचा वेग कमी झाल्यावर मी हे बंद केले व काळा बिन साखरेचा चहा प्यायला सुरूवात केली. फरक जाणवत आहे.
- माझे खाणे अगदी व्यवस्थित असले तरी मद्यपान यास अजून एक अपवाद आहे.. पुनः प्रगती खुंटलीतर ते कमी करण्याच्या दिशेनी प्रयत्न करेन

सांगण्या सारखी महत्वाची गोष्ट अशी की वैद्यकीय चचण्यांचे निष्कर्ष .
-- एक वर्षापूर्वी (३ महिन्याच्या साखरेचा निर्देशांक ७.२, आणि साखर >१२५. ) -
-- सहा महियापूर्वी (३ महिन्याच्या साखरेचा निर्देशांक ६.२, आणि साखर >११०. ) यावेळेस डॉक्टरांनी मधुमेहाची गोळी बंद केली.
-- आता (३ महिन्याच्या साखरेचा निर्देशांक ५.२२, आणि साखर १०३. )
-- कोलेस्ट्रॉलचे आकडे व त्याचे निर्देशांक आतापर्यंत गेल्या १० वर्षात कधिही अपेक्षित पातळीच्या खाली नव्हते ते खाली आले. (हा फरक दीक्षित पद्धतीमुळे झाला की नाही याबद्दल मी स्वतः साशंक आहे. कारण ६ महिन्यापूर्वीच्या चाचणीत काहिही फरक नव्हता तो आत्ता झाला. मी मध्यंतरी दूधाचा चहा बंद केला, पोळी ऐवजी बाजरीची भाकरी खायला लागलो व जवसाची चटणी जेवताना खायला लागलो त्याचाच परिणाम असेल अस मला वाटतय.)

साखर आणि कोलेस्ट्रॉलचे निष्कर्ष इतके चांगले आले की प्रथम मला ते माझ्या चाचणीचे निकाल नाहीत की काय अशी शंका आली. Happy ते नक्की करण्यासाठी मी १ महिन्याने पुनः चाचणी करणार आहे

मी शक्तिचे खूप व्यायाम करतो. वाटेल तसे अमर्याद खात नाही. जेवताना असेल तर गोडसुद्धा खातो. भात शक्यतो खात नाही. मद्यापान करताना अतिरेक करत नाही.
असो. सध्यातरी दीक्षित पद्धती चालू ठेवावी असे म्हणतो. Happy

आपणा सर्वांच्या माहिती साठी.

@ विक्रमसिंह :
चांगला अनुभव

नियमितता असल्यामुळे फरक पडला असावा,
तुमच्या आहार विहाराच्या सवयी चांगल्या आहेत

मला ही नियमितता जमेल त्या दिवशी मी आयुष्यातली सर्वात मोठी लढाई जिन्केन, अस वाटत

विक्रमसिंह छान पॉझीटिव्ह पोस्ट... मी आत्ता तुमच्या एका वर्षापूर्वीच्या स्थितीत आहे.
मी जेवणाची, चहाची सगळी पथ्य पाळते पण व्यायाम होत नाही अजिबात. Sad म्हणजे सातत्य नाही. जमेल तेव्हा होतो चालण्याचा आणि डान्सचा व्यायाम.

विक्रमसिंह,
छान अनुभव. अनेकांना प्रेरणादायी.
थेरपी म्हणून जर फॉर्वर्ड झाली तर लोकांना उपयोग होईल. पण ही वैयक्तिक माहिती होईल की कम्युनिटी थेरपी होईल ? एक शंका. अर्थात परवानगी न घेता करणे हे तसे चुकीचेच. मात्र तसे सांगितले तर ते कळेल. न सांगता फॉर्वर्ड केल्यास त्याला काय करणार ?

Pages