झिरो परीक्षण

Submitted by अज्ञातवासी on 23 December, 2018 - 11:59

गणेशोत्सवात गावोगावी खूप देखावे उभारलेले असतात.पण प्रत्येक गावाचं आकर्षण असतो, तो एक देखावा, जो सगळ्या देखाव्यात उठून दिसतो. आपल्याला माहिती असतं, हा एक देखावा आहे, मूळ घटना यापेक्षा खूप भव्यदिव्य आहे. पण तरीही आपण तो देखावा मनापासून एन्जॉय करतो, त्या देखाव्यातील सत्यतेत कितीही भगदाडे असली तरी!

झिरो बघून मला काय मिळालं?
आनंद? हो थोडासा.
मी भावनिक झालो? नाही.
माझ्या मनावर काही खोलवर ठसा उमटला? नाही.
तरीही हा चित्रपट मी एन्जॉय केला. एका तटस्थ नजरेतून. ना मला कंटाळा आला, ना मला असं वाटलं हा चित्रपट संपू नये.
कारण भव्य देखावे सगळ्यांना आवडतात, पण देखावा संपल्यावर कुणालाही तिथे थांबावं वाटतं नाही!
या चित्रपटाची कथा सांगायची झाली तर बव्वा सिंग नावाची व्यक्ती वयाच्या ३८ व्या वर्षीही अविवाहित असते. कारण सगळ्यांना माहितीये, तो बुटका असतो. लग्नासाठी तो आसुसलेला असतो, आणि असच एका लग्न जुळवणार्या संस्थेत त्याला एक फोटो मिळतो. त्या मुलीला तो बघताच पसंद करतो, पण तिला प्रत्यक्षात बघून तो शॉक होतो, कारण ती असते नासाची वैज्ञानिक व तिला सेरेब्रल पालसी चा आजार असतो. मात्र आता बव्वा हट्टाला पेटलेला असतो, तो तिला पटवतो, मात्र त्याच्या आयुष्यात येते बबिता, आणि सुरू होतो प्रेमाच्या त्रिकोणी प्रवास. खाचखळग्यांचा प्रवास!
कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं, तर मी उतरत्या क्रमाने बोलेन. सर्व सहकलाकार, मग बव्वाचे आई वडील असो, लग्न जुळवणार्या संस्थेत असलेला पांडे असो, किंवा बव्वाचा मित्र असो, हे सर्व हिंदी पट्ट्यातील सिनेमामधील अत्यंत कसलेले कलाकार आहेत. त्यांच्या वाटेला कोणतीही भूमिका येवो, त्यांनी ती चोखपणे बजावली आहे, आणि येथेही त्यांच्या वाटेला जेवढं काम आलंय, ते त्यांनी चोखपणे बजावलंय, ना कमी ना जास्त. चोख व्यवहार.
आता मुख्य तीन कलाकारांविषयी म्हणायचं ठरलं, तर सगळ्यात कमी भूमिका कतरिनाची आहे. एक अल्कोहॉलिक, नैराश्य आलेल्या पण अजूनही अहंकार असलेल्या बबिताची भूमिका कतरिना करते, आणि नेहमीप्रमाणे, कतरीना कुठेही या रोलमध्ये फिट बसत नाही, आणि तिने या रोलसाठी मेहनत घेतलेलीही कुठे जाणवत नाही. सगळ्यात जास्त तिने माती खाल्ली असेल, तर हिंदी पट्ट्यातल्या उच्चारांमध्ये. इतकी वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत राहून जर साधे शब्दोच्चार न जमणारी ऐक्ट्रेस फक्त सुंदरतेच्या बळावर आज टॉपला असेल, (आता कतरिनाला मी ती आता सुंदर दिसत नाही असं म्हणणार नाही, कारण अजूनही ती छान दिसते. भलेही तिचा जुना चार्म गेलाय तरी!) तर हॉलीवूड बॉलीवूडला भारतातच का मागे टाकतय, याचं उत्तर मिळतं.शब्दोच्चार जरी सोडलेत, तरीही अभिनयाच्या बाबतीतही कतरिना कुठेही बबिता जाणवत नाही. दिसते ती फक्त कतरीना.
आता अनुष्काविषयी बोलूयात. तोंड वेंगाडून बोलणे, वाकडं चालणे ह्या दोन गोष्टी करून अनुष्का स्वतःला सेरेब्रल पालसीची रुग्ण दाखवते. पण तिच्या देहबोलीत कुठेही तो आजार, अथवा मर्यादा जाणवत नाही. कितीही आशावादी असलं, तरीही या आजारांनी शारीरिक मर्यादा येतातच. पण वरवरची शारीरिक लक्षणे घेऊन भूमिकेचा अभ्यास न करता, अनुष्काने ही भूमिका साकारलीये, मग त्या व्यक्तीची मानसिकता दूरच राहिली. अनुष्काच्या भूमिकेत पावलोपावली तो भडकपणा व उथळपणा जाणवत राहतो.
आता या कथेतील सर्वात मुख्य पात्र, ज्याच्यावर या चित्रपट मार्केटिंगचा सर्वात जास्त फोकस होता, त्या शाह रुख खानवर येऊ. एका शब्दात सांगायचं झालं, तर या चित्रपटात शाहरुखने फक्त माती खायची बाकी ठेवलीये. मी बाकी ठेवलीये असं यासाठी म्हटलो की नेहमीच गालात हसणं, शरीर वाकवून रोमान्स करणं, भडकपणे राग दाखवणं, मान हलवून अभिनय करणं, यात शाहरुख पैकीच्या पैकी मार्क घेतो. पण एका बुटक्या व्यक्तीचा लहेजा, शारीरिक मर्यादा, त्यातून येणारा न्यूनगंड, लग्न जमत नसल्याने येणारी निराशा, काहीतरी नवीन करण्याची प्रचंड उर्मी व आशावाद, या सर्व आघाडीवर तो सपशेल माती खातो.
आता या चित्रपटाच्या VFX अथवा CGI कडे वळू. एका शब्दात म्हणायचं झालं, तर वेल ट्राय, पण बुटका आणि लहान हे शब्द कितीही समानार्थी वाटत असले, तरी यांचा स्पष्ट अर्थ ना समजल्यास काय अनर्थ होऊ शकतो, याच उत्तम उदाहरण. एखाद्या १२ वर्ष वय असलेल्या मुलावर तुम्ही शाहरुखला चिकटवला, असं वाटत राहतं, आणि ते बेमालूमपणे झालंय. पण त्याची चित्रपटात गरज नाही, आणि ज्याची गरज आहे, ते कुठेही दिसत नाही. म्हणून लहान शाहरुखला पैकीच्या पैकी मार्क, बुटक्या शाहरुखला शून्य मार्क, आणि गरज बुटक्याची होती राजा...
छायालेखन ज्या मनू आनंदने केलंय, त्यांना सलाम. देशी मातीपासून अंतरिक्षपर्यंत जो एक टच आहे, तो त्यांनी छान जपलाय. प्रत्येक फ्रेम नेत्रसुखद वाटते. भव्य वाटते. चित्रीकरण तर अत्यंत टवटवीत वाटत. एकंदरीत हा खुप छान अनुभव वाटतो.
म्युजिक मध्ये अजय अतुलने तुम्ही हिंदीत का नेहमी माती खाताय? असा प्रश्न मला यावेळीही विचारण्याची संधी दिलीय. 'मेरे नाम तू' सोडलं तर सगळी गाणे विस्मरणीय आहेत. आणि 'मेरे नाम तू' वर 'सैराट झालं जी'चा प्रभाव जाणवत राहतो.
आता बोलूयात कथेविषयी आणि पटकथेविषयी. कथा खरंच भव्य आहे. कथेची कल्पनाच मुळात अतिशय एपीक म्हणावी अशी आहे (मी एपिक म्हटलंय, युनिक नाही. गैरसमज नको). मात्र पटकथा, जी चित्रपटाचा आत्मा असते, तिच्यातच जीव नाही. मुख्य त्रिकोण सोडला तर, कुठल्याही व्यक्तिरेखेची चित्रपटात नीट वाढ किंवा ओळख होत नाही. मुख्य व्यक्तिरेखाही खूप उथळ लिहिलेल्या वाटतात. छोट्या छोट्या गोष्टी का व कशा घडतात, याचं स्पष्टीकरण मिळत नाही, व प्रेक्षक गोंधळून जातो.
आता शेवटचा व मुख्य भाग दिग्दर्शन. आनंद राय ही व्यक्ती उत्तर भागातील चित्रपट बनवणारा हुकुमी एक्का. तिथल्या व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करणं, ही त्यांची खासियत. पण या चित्रपटात नेमकं त्यांना व्यक्तिरेखा उभ्याच करता आल्या नाहीयेत,कारण...
...त्यांचं सगळं लक्ष शाहरुखच्या स्टारडमकडे केंद्रित झालंय...
वरची ओळ मी यासाठी हायलाईट केली, कारण याच एका कारणाने चित्रपट दणक्यात आपटतो. बव्वा सिंग जरी बुटका आहे, तरी तो शाह रुख असल्याने त्याची वागणूक स्टारसारखीच असणार, हे धरून सगळा चित्रपट त्याभोवती केंद्रित केलाय, आणि परिणाम... शून्य!
समारोपात मी असं म्हणेन की शेवटी ही कथा भव्य आहे, देखाव्याच्या कथेसारखी. पण देखावा दाखवताना त्या कथेला करावी लागणारी डागडुजी स्पष्ट दिसते. पण भव्यदिव्य देखावा उभं करायलाही कसब लागत...
हा चित्रपट म्हणजे असाच एक देखावा आहे. भव्य कथा, पण भगदाड पडलेली पटकथा. सर्व कलाकार अभिनयाचा देखावा करतायेत, पण कुणीही तो जगत नाहीये. सादरीकरण सुंदर आहे, पण ओढ लावणारं नाही. एखाद्या सुंदर देखाव्याकडे माणूस क्षणभर ओढला जाऊन तटस्थ होतो, तसंच इथे होतं. हा चित्रपट ना हुरहूर लावतो, ना टिकणारा आनंद देतो. आपण चित्रपट बघायला आलोय, चित्रपट संपलाय, चला आता घरी जाऊन अर्जंट मेल टाकायचाय...
...आणि शून्यापासून सुरुवात करून बाहेर पडताना तो शून्य होऊनच पडतो...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी शाहरुख खान चे बरेच Diehard फॅन पाहिलेत माझ्यासकट. पण हा प्रकार काहीतरी वेगळं आहे

√√√√√√

कर्रेक्ट !

मै सिर्फ फॅन नही हू उसका..
दुनिया है वो मेरी..

रेहन दे.. तुम नही समझोगे

येनीवेज...
झिरोने नाताळच्या सुट्टीला पुन्हा वर उसळी घेतली आहे.
कोणाकडे काही आकडे ?

ओवरसीज मार्केट तर शाहरूख एकहाती खातो. शाहरूख नाम ही काफी है.. त्याचे एनाअराआई फॅन खूप आहेत.
बाकी ते आणखी कसले कसले राईटस असतात ते हिशोवात घेऊन किती पल्ला गाठला?
अजून एक आठवडा व्हायचा आहे....

धागा दुसऱ्यांदा स्थलांतरित करण्याची वेळ आलीये. तेव्हा दुर्लक्ष करा. व्यक्तीकडे व प्रवृत्तीकडेही....
नवीन Submitted by अज्ञातवासी on 26 December, 2018 - 19:29
<<

Lol
--
धागा डिरेल होण्यात अर्धेअधिक प्रतिसाद स्वत: धागा लेखकाचे आहेत.

किल्ली - नुसते जन्माला येणे म्हणजे लग्न करणे आणि मुले जन्माला घालणे हाच उद्देश बरोबर नाही ना ☺️
मी तुमच्या लिखाणाचा पंखा आहे पण तुमची कंमेंट वाचून राहवले नाही.

किल्ली - नुसते जन्माला येणे म्हणजे लग्न करणे आणि मुले जन्माला घालणे हाच उद्देश बरोबर नाही ना
<<

चित्रपटात अभिनय(?) करण्याव्यतिरिक्त, सार्वजनिक जीवनात असे काय दिवे लावलेत सलमानने ?
--
Being human foundation बद्दल सांगू नका,
गतकाळात केलेली पापे झाकण्याकरिता सलमानने पांघरलेली एक चादर आहे ती.

बादवे - zero पाहिलेले कोण कोण आहेत या धाग्यावर?
मी, लेखक आणि manaskanya?
न बघणारे ना बघताच किती शिव्या घालतायत शाखा आणि चित्रपटाला? बरे झाले मी आधीच बघायला गेलो, हे असले निगेटिव्ह कंमेंट्स पाहून गेलोच नसतो.

अरे इतका वाईट नाहीय चित्रपट...एकदा बघण्यासारखा आहे.

न बघणारे ना बघताच किती शिव्या घालतायत शाखा आणि चित्रपटाला? बरे झाले मी आधीच बघायला गेलो, हे असले निगेटिव्ह कंमेंट्स पाहून गेलोच नसतो. >> +१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

अरे इतका वाईट नाहीय चित्रपट...एकदा बघण्यासारखा आहे. >>> +११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

मंडळी आजची आकडेवारी मांडताना जरा उशीर होतोय. कारण म्हणजे नाताळ. १५ डिसेंम्बर ते २५ डिसेंम्बरच्या दरम्यान रिलीज होणाऱ्या चित्रपटांसाठी नाताळ सगळ्यात महत्वाचा दिवस असतो. कारण चित्रपटाच मॉमेंटम त्यावर ठरत असतं. म्हणून योग्य आकड्यांची वाट पाहणं जास्त सयुक्तिक. जर नाताळचे आकडे विकेंडच्या आकड्यांच्या जवळपास असले, तर चित्रपट यशस्वी होण्याची शक्यता वाढते...
तर काही आकडे सादर करत आहे, इच्छूक लोकांनी लाभ घ्यावा.
#Zero Fri 20.14 cr, Sat 18.22 cr, Sun 20.71 cr, Mon 9.50 cr, Tue 12.75 cr. Total: ₹ 81.32 cr. India biz
जिथे नाताळच्या पूर्ण सूटीच्या दिवशी झिरो २० कोटीच्या आसपास कमवेल अशी अपेक्षा होती, तिथे फक्त पावणेतेरा कोटी कमवलेत.
USA मध्ये स्क्रीन काऊंट ७५% उतरलाय, बाकी ठिकाणी हीच परिस्थिती आहे.
ओव्हर्सिजचा रेशीओ मी आधीच मांडलाय. इच्छूक लोकांनी पुन्हा लाभ घ्यावा.

आता लोकहो मागील दोन नाताळचे आकडे बघू.

२०१७
Day-by-day collection of Tiger Zinda Hai:
Day 1 - Friday (Dec 22) - Rs 34.10 crore
Day 2 - Saturday (Dec 23) - Rs 35.30 crore
Day 3 - Sunday (Dec 24) - Rs 45.53 crore
Day 4 - Monday (Dec 25) - Rs 36.54 crore

२०१६
Day wise collection of Dangal
Day 1 Collection [1st Friday] ₹ 29.78 Cr
Day 2 Collection [1st Saturday] ₹ 34.82 Cr
Day 3 Collection [1st Sunday] Christmas ₹ 42.41 Cr
Day 4 Collection [1st Monday] ₹ 25.69 Cr

मंडळी, तर हा नाताळ डिस्ट्रिब्युटर साठी सुतक घेऊन आलाय असं म्हणायला हरकत नसावी.
असो, बायोपिकमध्ये शाहरुख आपल्याला चांगला रोल दाखवेल ही अपेक्षा करूयात....

अरे इतका वाईट नाहीय चित्रपट...एकदा बघण्यासारखा आहे. >>>>> चित्रपटाच्या जमेच्या बाजू परीक्षणात मांडल्या आहेत. एकदा बघण्यासारखा आहेच. पण थिएटरमध्ये बघावा असा काही नाही.

@चरप्स मलातरी किल्ली यांचा प्रतिसाद हा वाक्प्रचार लिहिलेला वाटतो. आमच्याकडेही कुणाला तावातावाने 'आता लग्न झालं असतं तर दोन पोरांचा बाप झाला असता किंवा माझ्याएव्हढी मुलगी आहे त्यांना, तरी अक्कल नाही' असं म्हटलं जातं. एक साधा वाक्प्रचार आहे तो.

असो, चित्रपटाचे आकडे टाकलेत, त्यावर चर्चा करूयात.

असो, चित्रपटाचे आकडे टाकलेत, त्यावर चर्चा करूयात. >>> आकड्यांवरून काय चर्चा अपेक्षित आहे?
सिनेमा कोणाला, किती आणि का आवडला, कलाकारांचा अभिनय, स्टोरीलाईन, म्युझिक, संवाद, कॅमेरा अशा अंगांनी चर्चा करतात ना?

शाखाचे सिनेमाच्या ईतर कोणाही अ‍ॅक्टरपेक्षा जास्त पायरेटेड कॉपीज अवेलबल होतात म्हणूनही त्याचे कलेक्शन कमी असेल.

शाखाचे सिनेमाच्या ईतर कोणाही अ‍ॅक्टरपेक्षा जास्त पायरेटेड कॉपीज अवेलबल होतात म्हणूनही त्याचे कलेक्शन कमी असेल. >>>
खरे आहे. त्याचे चाहते बुद्धीजीवी आहेत, थिएटर मध्ये जास्तीचा पैसा, येण्याजाण्याचा वेळ वाया घालवण्यापेक्षा पायरेटेड कॉपी घेऊन हव्या त्या वेळेला, हवे तेवढ्या वेळा बघणे ते पसंत करतात.

{अरे या सर्व गदारोळात नाताळच्या शुभेच्छा राहून गेल्या. Happy Christmas!}
Merry christmas!
Happy new year वेळेवर करा म्हणजे झालं.

Happy new year वेळेवर करा म्हणजे झालं. >> हो हो... शाखाचा Happy new year मस्त मुवी होता.
सगळ्यांनी हा सिनेमा बघूनच Happy new year सेलिब्रेट करा.

@हायझेनबर्ग>>>>>>>
सिनेमा कोणाला, किती आणि का आवडला, कलाकारांचा अभिनय, स्टोरीलाईन, म्युझिक, संवाद, कॅमेरा अशा अंगांनी चर्चा करतात ना?>>>>>> ते सगळं मी वर मांडलंय. आणि एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगून लोक इरिटेट होतात हो. इथल्याच एका आय डीच उदाहरण आहे. कशाला मी पुन्हा पुन्हा तेच पाल्हाळ लावू. तरीही तुम्ही माझे आवडते लेखक आहात म्हणून खास तुमच्यासाठी.....
https://www.maayboli.com/node/68450?page=5
यावर क्लिक करा, तुम्हाला फर्स्ट हँड परीक्षण वाचायला मिळेल.

आकडे बोलतात हो हायझेनबर्ग... चित्रपटाची सर्वांगाने चर्चा व्हावी तर त्यात पैशाचं यशही आलंच ना. शेवटी धंदा आहे हा

माफ करा. आकडे बोलत नाहीत. आता अंदाधुंद पेक्षा मोठे आकडे झेरो चे आहेत याचा अर्थ असा आहे का की झिरो अंदाधुंद पेक्षा जास्त चांगला?

टुंबाड चे आकडे कमी आहेत पण छान होता मूवी.

खान सिनेमे मल्टिप्लेक्स मध्ये तिकीट किंमत वाढवून लागतात, बीसीनेस होतो मग.

शाखाचे सिनेमाच्या ईतर कोणाही अ‍ॅक्टरपेक्षा जास्त पायरेटेड कॉपीज अवेलबल होतात म्हणूनही त्याचे कलेक्शन कमी असेल. >>>दंगल आणि टायगरच्या कॉपी पहिल्या दिवशी आल्या होत्या. आमिरचा pk आणि 3 इडियट्स तर बुद्धिजीवी आणि कॉलेज स्तुडन्टसनेच हिट केला ना? हे लोक तर फार टेक स्यावी आहेत.
असो...

माफ करा. आकडे बोलत नाहीत. आता अंदाधुंद पेक्षा मोठे आकडे झेरो चे आहेत याचा अर्थ असा आहे का की झिरो अंदाधुंद पेक्षा जास्त चांगला?
टुंबाड चे आकडे कमी आहेत पण छान होता मूवी.
खान सिनेमे मल्टिप्लेक्स मध्ये तिकीट किंमत वाढवून लागतात, बीसीनेस होतो मग.>>>>>
चरप्स एक्साक्टली ... मग सोहम शाह आणि आयुष्यमान ची स्टारडमची व्हॅल्यू शाहरुख इतकी मानायची का? मग चालेल. मी माझे शब्द मागे घेतो. रिटर्न् ऑन इन्व्हेस्टमेंट असते का नाही?

खान सिनेमे मल्टिप्लेक्स मध्ये तिकीट किंमत वाढवून लागतात, बीसीनेस होतो मग.>>>>> प्रचंड अनुमोदन आणि इथे तिघांनी माती खाल्ली

आकड्यांवरून काय चर्चा अपेक्षित आहे?
सिनेमा कोणाला, किती आणि का आवडला, कलाकारांचा अभिनय, स्टोरीलाईन, म्युझिक, संवाद, कॅमेरा अशा अंगांनी चर्चा करतात ना?

√√√√√√√√

जेव्हा मी शाहरूखच्या श्रीमंतीचे आकडे टाकले तेव्हा कोणी त्यावर चर्चा करायला आले नाही. तेव्हा श्रीमंत असणे हे महान असण्याचा निकष नव्हता.

आज बॉक्स ऑफिसचे आकडे जरा कमी आले तर तो कलाकाराच्या महानतेचा निकष झाला.
वाह रे दुनिया !!!

बट .....

धिस ईज शाहरूख फॉर यू Happy

बाई दवे मी ऐकलेय की शोलेने सुद्धा असेच थंड सुरुवात केली होती...

आणि मग घडला तो ईतिहास !

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ....

हा पिक्चर २०० करोडचा पल्ला गाठणार ..
आणि ते देखील हा धागा ५०० चा आकडा गाठायच्या आधी...

हा एका जगातल्या सर्वात मोठ्या सुपरस्टार्रच्या सर्वात मोठ्या सुपर्रफॅनचा शब्द आहे !!!

Submitted by च्रप्स on 26 December, 2018 - 11:23 >> +११११११११११११११११११११११११११११११

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 December, 2018 - 11:29 >> +११११११११११११११११११११११११११११११

शेवटी धंदा आहे हा >> Sad

200 cr overall शक्य आहे ( इंडिया बीसीनेस+ tv rights + इंटरनॅशनल बीसीनेस)

200 cr काय 150 cr फक्त भारतात बीसीनेस होणे अशक्य आहे.

माझ्या मते 110 पर्यंत जाईल मॅक्स.

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ....

हा पिक्चर २०० करोडचा पल्ला गाठणार ..
आणि ते देखील हा धागा ५०० चा आकडा गाठायच्या आधी...

हा एका जगातल्या सर्वात मोठ्या सुपरस्टार्रच्या सर्वात मोठ्या सुपर्रफॅनचा शब्द आहे !!! >> +११११११११११११११११११११११११११११११११११

मी तर म्हणतो अनुक्रमे ५०० आणि १००० चे टार्गेट ठेवायला हवे.

वीएफेक्स ईफेक्ट पायरेटेड सीडीवर चांगले न दिसलयाने लोक नावे ठेवत आहेत... मल्टिप्लेक्स मध्ये वीएफक्स ईफेक्ट आणि म्हणून शाखाची अ‍ॅक्टिंग सुद्धा सुंदर दिसले आहेत.

शेवटी धंदा आहे हा >> Sad

नवीन Submitted by हायझेनबर्ग on 26 December, 2018 - 11:35

<<<<<<< हाब हे वाक्य मी लिहिलंय हे वाचून वाईट वाटलं असेल तर धाग्यात आधीही हे वाक्य वापरलंय. मी फक्त कोट केलं इतकंच

वीएफेक्स ईफेक्ट पायरेटेड सीडीवर चांगले न दिसलयाने लोक नावे ठेवत आहेत... मल्टिप्लेक्स मध्ये वीएफक्स ईफेक्ट आणि म्हणून शाखाची अ‍ॅक्टिंग सुद्धा सुंदर दिसले आहेत.>>>

बरोबरे. फक्त पायरेटेड सिडीत थोडी कथा टाकली असती तर लोक परत थेटरात गेले असते चांगले इफेक्ट्स बघायला. मी मात्र ट्रेलर बघूनच काय ते समजले. असो.

200 cr overall शक्य आहे ( इंडिया बीसीनेस+ tv rights + इंटरनॅशनल बीसीनेस)
200 cr काय 150 cr फक्त भारतात बीसीनेस होणे अशक्य आहे.
माझ्या मते 110 पर्यंत जाईल मॅक्स.>>>>>
च्रप्स तुम्ही माझ्या मनातलं ओळखलं. अगदी हेच लिहायचं होतं...
आणि मी बजेट आधी मांडलंय. पण जे लोक आधी म्हणताहेत चित्रपट आकड्यांवर चर्चा करू नका, आणि तेच अनुमोदन देताना बघून अंमल धक्का बसला.
तर भारतात १२० कोटी --- डिस्ट्रिब्युतर शेर ६० कोटी (optimistic value)
परदेशात १२० कोटी ---- डिस्ट्रिब्युतर शेर ३० कोटी (optimistic value)
(याचं गणित मी मांडलंय)
टोटल ९० कोटी. चला १०० कोटी धरू
सॅटेलाइट राईट आणि मुसिक राईट १०० कोटी (देवा एवढं optimistic तर जगातला सर्वात मोठा फॅनही होणार नाही.)
टोटल २०० कोटी.
प्रोडक्शन कॉस्ट २०० कोटी + मार्केटिंग कोस्ट १०० कोटी
बजेट ३०० कोटी
तोटा (कमीत कमी) १०० कोटी!

Pages