झब्बू क्र. १ - क्षितिज नवे

Submitted by संयोजक on 12 September, 2018 - 06:54

मायबोली गणेशोत्सव २०१८ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि पहिला विषय आहे - क्षितिज नवे - प्रेक्षणीय स्थळांची प्रकाशचित्रे.
आयुर्विन पूल, सांगली
Screenshot_20180912_232441.png

आपल्यातल्या बर्याचजनांना वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यायला आवडते. शहरं, देश बदलतील तस तश्या संस्कृती बदलतात. खाण्याचे पदार्थ, वेशभूषा, भाषा अश्या बऱ्याच वेगवेगळ्या संस्कृतीचं दर्शन होते. अश्याच तुम्ही पाहिलेल्या सुंदर प्रेक्षणीय स्थळाची प्रकाशचित्र सगळ्यांसाठीच उपलब्ध करुन देऊया.

मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस्‌ अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?
आपण जशी इतरांनी उपलब्ध करून दिलेली चित्रं वापरतो, त्याच सागरात आपल्याला काही थेंब टाकता आले, काही खारीचा वाटा उचलता आला तर, असा विचार करून पहिला झब्बू हा देवाला, अर्थात आंतरजाल वापरणाऱ्या समुदायाला अर्पण करायचं आम्ही ठरवलं आहे.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

20180807_061445.jpg
विवेकानंदपुरम कन्याकुमारी

जुई, मस्त फोटो. (फोटो काढताना ग्रीड लाईनवर लक्ष ठेवले तर फोटो सुरेख दिसतील.)

मंजुताई, अप्रतिम फोटो.

मंदार, अगदी वॉलपेपर म्हणून ठेवावा असा फोटो आलाय. या भटकंतीत धरमशाला नक्की. Happy

सगळे फोटो एकदम छान!

शाली, सिमाताई हे ठिकाणाचे नाव आहे. त्याच्या पायथ्याशी 'गुबेई' अर्थात उत्तरेकडचे वॉटरटाऊन म्हणून नितांतसुंदर कालव्यापाशी जागा आहे. तोच कालवा फोटोमध्येही आहे.

शाली, योसेमिटीचे ते पहाड पांढरे ग्रानाइट स्टोन चे असल्यामुळे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे रूप दिसते. आम्ही काही वर्षे बे एरियात राहत असताना खूपदा जाणे झाले तिथे, त्यामुळे पौर्णिमेच्या चांदण्यात, सूर्यास्ताच्या वेळी, हिवाळ्यात बर्फच्छादित असताना, असे खूप सुंदर नजारे पाहिलेत त्यांचे.

C24B6965-9F36-460E-B17D-083299231770.jpeg

न्यूयॉर्क स्कायलाइन

वा!

machupicchu at sunrise.jpg

माचू पिचू इथे सूर्योदयाची वाट पहाताना

grand teton2.JPG
ग्रँड टीटॉन नॅशनल पार्क. Grand Teton national park
या लेक चं पाणी इतकं स्वच्छ नितळ होतं!

Pages