दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजित वाडेकर आणि अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली Sad

वाजपेयी खूप आवडते कवी होते. त्यांची भाषणे मी ठरवून ऐकायचे.__/\___

भावपूर्ण श्रद्धांजली!
"मोरूची मावशी", आणि "श्रीमंत दामोदर पंत" मधले "अण्णा" अविस्मरणीय!

मोरूची मावशी काळाचा पडद्याआड
टांग टिंग टिंगा ग ... कै.विजय चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली
परवा रविवारी सोनी मराथी वर त्यांना मिळालेला जीवन गोरव पुरस्कार बघितला आणि आज ही बातमी वाचुन धक्का बसला. तेव्हा ते किती छान बोलले. तेव्हा असे काही वाटलेच नाही.

"माझ्या लहानपणापासून मी तुमचं काम बघतेय... आणि आता चक्क मी काम करणार तुमच्यासोबत..मला खूप खूप आनंद झालाय" असं म्हणून मी त्यांना घट्ट मिठी मारली आणि त्यांनी मला जवळ घेतलं. ही जिजींची (शुभांगी ताई) आणि माझी पहिली भेट! कुंकू टिकली आणि टॅटू ह्या मालिकेच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी आम्ही भेटलो. पहिल्याच भेटीत आमच्या खूप गप्पा झाल्या. 'आभाळमाया' माझी आई बघायची. मी तेव्हा खूप लहान होते. पण तेव्हाही दोन नातींना प्रेमाने सांभाळणारी ही आजी मला खूप आवडायची.

शुभांगी ताईंचा जितका सहवास मिळाला तेवढ्यात त्यांच्याकडून खूप शिकले. आम्ही सगळेच शिकलो. सहज आणि नैसर्गिक अभिनय, खणखणीत आवाज, स्पष्ट शब्दोच्चार, अतिसहज हालचाली... काय शिकू नि काय नाही! त्यांच्याइतकं sincerely काम करणारे कलावंत हल्ली सापडणं विरळाच!!

जिजींना वाचनाची खूप गोडी होती. अलीकडे जिजींना वाचायला त्रास होई. काही दिवसांपूर्वी म्हणाल्या, ' पुस्तक वाचण्यासाठी काहीतरी उपाय करायला हवा, एकतर टाईप तरी मोठा करावा नाहीतर चष्म्यात भिंग लावावं.' बरेचदा त्या स्क्रिप्टसुद्धा फक्त 'ऐकत'. पण एकपाठी होत्या. एकदा ऐकलेलं जसंच्या तसं लक्षात राहायचं. त्यांच्याबरोबर केलेले वन शॉट्स म्हणजे तर पर्वणी.. अफलातून टायमिंग आणि improvisations असायचे त्यांचे! भल्याभल्यांना लाजवेल असा stamina होता. 'मी दमले' हे तर कधी ऐकलंच नाही त्यांच्या तोंडून. प्रचंड ऊर्जा आणि जिद्द होती त्यांच्यात. काम करत रहायची प्रबळ इच्छा होती. कमरेचा त्रास असून, belt लावून त्या शूटिंगला येत, पण चेहऱ्यावर मरगळ कधीच नसे. कायम ते infectious smile!!!

जितक्या प्रेमळ शुभांगी ताई भूमिकेत दिसायच्या तितक्याच प्रेमळ त्या वास्तविक आयुष्यातही होत्या. सगळ्यांसाठी सगळं करायच्या. आम्हा सगळ्यांवर त्यांनी भरभरून प्रेम केलं. सेटवर आमची काळजी घेणारं एक माणूस आहे, ही भावना आमच्या मनात होती, ती त्यांच्यामुळे!!! सगळ्यांच्या आवडी निवडी जाणून घेऊन त्यानुसार त्यांचे खाण्यापिण्याचे लाड करणे, ह्यात तर त्यांचा हातखंडा होता. सुगरण होत्या जिजी. तांदळाची उकड, वाटली डाळ, पचडी, आंब्याची डाळ, शिरा, भरली कारली किती पदार्थांची नावं लिहू..? जिजींनी खूप प्रेमाने खाऊ घातलं आम्हाला. मी कारलं खात नाही ह्याबाबत कायम त्यांची नाराजी असायची. 'अगं कारलं ते कडूच लागणार' असं दटावायच्या. आमच्या मेकअप रूम्समधलं अंतर तसं काही कमी नव्हतं.. पण एखादी वस्तू आणली की आवर्जून आमच्या रूममध्ये एकतर घेऊन यायच्या, नाहीतर स्वतः येऊन सांगायच्या 'वेळ मिळाला की चक्कर टाका'. हे ऐकलं की समजायचं काहीतरी मेजवानी आलीय. प्रत्येकावर त्यांचा जीव होता. एखाद्याचा कॉल टाइम उशीराचा असेल तर सांगायच्या 'त्याला दोन घास राहू दे बरं'! खूप प्रेम केलं त्यांनी आमच्यावर! राजश्री (निकम) गुरुवारी उपास करते म्ह्णून तिच्यासाठी खास मोठा डबाभरून राजगिरा लाह्यांचा उपासाचा चिवडा करून आणला. किती माया!!! कोण करतं हो हल्ली इतकं??? आम्हाला जीव लावला त्यांनी!!!

खोकला झाला होता त्यांना. संवाद म्हणताना खोकला आला की त्यांची स्वतःवर चिडचिड होई. पण कधीच असं म्हणाल्या नाहीत की नंतर घेऊ शॉट. उलट आणखी जिद्दीने क्लोज करायच्या. कधीच कुरकुर नाही. पहाटे साडेतीनलासुद्धा तेवढ्याच ताकदीने त्यांनी सीन केले आहेत. अंधारात त्यांना दिसायला त्रास होत असे. पण पायाखालची वाट असेल तर सराईतपणे चालायच्या. 'त्यांचं कौतुक वाटायचं' हे लहान तोंडी मी म्हणणं चुकीचं...! मी अवाक व्हायचे... फक्त अवाक!!!

स्पष्टवक्त्या होत्या जिजी!! आमचं कौतुक करायच्या तितक्याच परखडपणे चुकाही सांगायच्या.पण मोठेपणाने 'अक्कल शिकवायला' कधी गेल्या नाही. म्हणूनच त्यांच्या सांगण्याचा कधी रागही आला नाही. एकदा सीनमधे जिजींचाच एक शब्द स्लिप झाला (कदाचित हे त्यांच्या संबंध आयुष्यात पहिल्यांदा झालं असावं) तेव्हा त्या स्वतः तब्बल वीस मिनिट हसत होत्या आणि आम्ही ते निखळ, निष्पाप हसू डोळेभरून बघत होतो. त्या pure होत्या. बनावट नव्हती त्यांच्यात. त्यांच्यात दडलेलं एक अवखळ, खेळकर, मस्ती करणारं पण अत्यंत इनोसंट लहान मूल मधेच कधीतरी डोकवायचं. तेव्हा, एरव्ही अनुभवाने परिपक्व असलेल्या त्यांच्या डोळ्यांमधली भाबडी चमक अवर्णनीय असायची.

कोणताही प्रॉब्लेम घेऊन जायला एक हक्काची जागा होती आम्हाला. कोणत्याही बाबतीत त्या योग्य मार्गदर्शन करत. स्थितप्रज्ञ राहून परिस्थितीकडे बघणं आणि मार्ग काढणं हे साधलं होतं त्यांना.

जिजी परिपूर्ण व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांना अभिनयाचा, ह्या क्षेत्राचा , इथल्या वातावरणाचा, लोकांचा आणि आयुष्याचाच इतका दांडगा अनुभव होता की त्या शिदोरीचा उपयोग आम्हाला पदोपदी झाला. आम्हाला आधार होता त्यांचा!!

आज सकाळी मिळालेल्या ह्या विचित्र बातमीवर मला विश्वासच ठेवायचा नव्हता. अजूनही ठेवायचा नाही. मला जिजी हव्या आहेत. मला खूप सीन करायचे आहेत. पुन्हा उकड खायची आहे. पुन्हा त्यांना ‘माझी जिजुली’ म्हणून त्यांचा गालगुच्चा घायचा आहे. ‘माझ्यासाठी डाळिंब का नाही आणलं?” म्हणून भांडायचं आहे. ‘तुमचं फक्त रमावर प्रेम आहे’ म्हणून पिडायचं आहे. ‘जिजी उद्या साडी नेसून या’ असा हट्ट करायचा आहे आणि आल्यावर त्यांना घट्ट मिठी मारायची आहे.

जिजी तुम्हाला दृष्ट लागली हो!!!!

गेले काही दिवस मालिकेच्या कथानकात बदल झाल्याने खूप लगबग होती सेटवर. नवे लुक्स, फोटोज.. एकमेकांशी बोलायला पुरेसा वेळही मिळत नव्हता. परवा जिजी बाहेर पडल्या तेव्हा लुकचे फोटो काढायलाच मी उभी होते. जिजींची तब्येत जरा नरमगरम होती. त्या जाताना दिसल्या. माझे फोटो काढणे सुरू असल्याने मी त्यांना हात दाखवला. आलेच मे अशी खूणही केली. त्यांनीही लांबूनच हात केला. त्या अजून काही वेळ आहेत ह्याच भ्रमात मी होते. फोटो प्रकरण संपवून मोकळी झाले की जाऊन बोलते म्हणेपर्यंत जिजी घरी गेल्या होत्या. असं स्वप्नातही वाटलं नाही की ती आमची शेवटची भेट असेल. भेट कसली नजरानजर!!! मी का नाही गेले तेव्हाच भेटायला? आयुष्यभर ही बोच राहणार!!!

त्यांना काम करायचं होतं आणि अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी ते केलं!! एका परिपूर्ण कलावंताला आणखी काय हवं? जिजींना परवलंबी आयुष्य नको होतं, कधीच! एका सच्च्या माणसाची, एका गुणी कलावंताची ही इच्छा त्या विधात्याने पूर्ण केली म्हणायची!

काय बोलू?
जिजी खूप आठवण येईल हो.. पदोपदी!!!
या ना परत.. प्लिज जिजी!!!

श्वेता पेंडसे

Sad काही माणसे काळजात खरच घर करुन जातात. विजय चव्हाण आणी गौरीच्या आजी उर्फ शुभांगी जोशी यांच्या बर्‍याच भूमिका म्हणजे खरोखर अस्सल सोन आहे. श्रीमंत दामोदरपंत मध्ये मला भरतपेक्षाही विजय चव्हाणच जास्त आवडले. भरत ने तर उत्तम काम केल होतच.

विजय चव्हाण आणी शुभांगी जोशी आजी या दोघांना श्रद्धांजली !!

शुभांगी जोशींना श्रद्धांजली Sad
काहे दिया परदेस, कुंकू टिकली वगैरे मालिका कधीच पाहिल्या नाहीत. घरातले सिनियर सिटीझन्स एकापाठोपाठ मालिका पाहतच असतात. त्यामुळे ह्या मालिका इच्छा नसताना ही ओझरत्या दिसतात तेवढंच काय ते पाहणं. पण दोन्ही मालिकांमधे या आजी दिसल्या की थोडा वेळ आवर्जुन पाहणं व्हायचं. आपलंच कोणीतरी नात्यातलं वयस्कर माणूस असल्यासारखं त्यांना पाहताना कायम वाटायचं Sad

Sad श्रद्धांजली.

श्वेता पेंडसेचं वाचून डोळ्यातून पाणी आलं.

क्काय.. आत्ताच तर पुण्यात शिफ्ट झालेल्या त्या.. काही दिवसांपूर्वी ताप अन दुखणे सुरु झाले म्हणुन पोस्ट टकलेली..

हो. गेल्या महिन्यात पुण्यात राहायला आल्या. दुखणं हाताबाहेर गेलं. गेले पाच दिवस बावधनच्या एका रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.
काही वेळापूर्वी गेल्या. न्यूमोनिया झाला होता. पुणं मानवलं नाही. Sad
त्यांची मुलगी दिशाही आजारी आहे.

अरेरे...
मला काय बोलावं सुचतच नाहीए.. आत्ताच तर आलेल्या इथे.. तापाचं निमित्त होऊन जाणं म्हणजे Sad ..
आई ग्ग.. दिशापन लहानच आहे..

अरेरे फार वाईट झालं Sad .

वसईत होत्या गोखीवरेला ते माहिती होतं. आम्ही नालासोपारा इथे राहताना तो भाग दिसायचा खिडकीतून, जायचोही त्या भागात, खूप वाटायचं त्यांना जाऊन भेटावे असं.

मुलीला लवकर बरं वाटूदे.

Pages