निसर्गाच्या गप्पा (भाग ३३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 July, 2018 - 03:13
landscape

अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..

आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.

त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .

हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.

सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.

पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.

खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...

बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..

सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा

वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या गावी घाणेरीला रायमुनिया म्हणतात. खुप सुन्दर फुले पण त्यान्ना अतिशय उग्र वास असतो

मस्त फोटो सर्वच...

शाली हा घ्या माझा झब्बु.. माझ्याकडेपन सेम कॅक्टस आहे..
.
19050992_1073364342765068_8092215562488250368_n.jpg
.
.
WP_20160430_09_19_56_Pro.jpg

कऊ आम्ही याला उलटा रावण म्हणतो.. फळं खरच मस्त लागतात याची.. कामुन्या म्हणतात इकडे त्यांना..
माझ्या घरचा हा फोटो.. कधी काळी काढलेला..
आता झाडं उपडलं हे Sad
.
तुम्हाला झब्बु..
.
DSC04544.JPG
.
.
DSC07239.JPG

अहाहा कसली सुंदर फुलं आहेत ..
मस्स्त सूर्यफुलं !
निवडुंगाला in general खरेच खूप छान छान फुलं येतात
आणि कैक प्रकार असतात त्यात !!
मला यावरून नेहेमी इंदिरा संतांची
निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांचे झुबे लालसर ल्यावे कानी, हि कविता आठवते .. Happy

घाणेरी ला आम्ही पण टणटणी म्हणतो Happy आणि त्याची काळी मण्यांसारखी फळं खातोसुद्धा ! मस्स्त लागतात गोड

मला यावरून नेहेमी इंदिरा संतांची
निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांचे झुबे लालसर ल्यावे कानी, हि कविता आठवते .. Happy>> पूर्ण कविता लिवाच तुम्ही हितं..

निरु हा केना वाटतोय मला..

हे घ्या टीना ताई ...

निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांचे
झुबे लालसर ल्यावे कानी,
जरा शिरावे पदर खोवुनी
करवन्दीच्या जाळिमधुनी.
शीळ खोल ये तळरानातून
भण भण वारा चढणीवरचा,
गालापाशी झिळमिळ लाडिक,
स्वाद जिभेवर आंबट कच्चा.
नव्हती जाणिव आणि कुणाची,
नव्हते स्वप्नही कुणी असावे,
डोंगर चढणीवरी एकटे
किती फिरावे,उभे रहावे.
पुन्हा कधी न का मिळायचे ते,
ते माझेपण, आपले आपण,
झुरते तनमन त्याच्यासाठि
उरते पदरी तिच आठवण,
निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांची,
टपोर हिरव्या करवंदाची…

हो का. मग असेल.
कारण मी नाव अंदाजेच दिलं होतं..

वा ! वा !! नवीन भाग आला का ? मनीमाऊ मस्त वर्णन केलय निसर्गाचं !!!
सर्व फोटो सुंदर !

Thanks प्रज्ञा ताई.

IMG_20180730_133753.jpg
सध्या रस्त्याच्या कडेला हे झुडूप खूप दिसते. पाचूचे रोप आहे का?

शालीदा फोटो जबरदस्त पण वॉटरमार्क टाका. हल्ली फोटोंची, लेखनाची खुप चोरी होते.

मनीम्याऊ तो माठ किंवा राजगिरा आहे.

शालीदा फोटो जबरदस्त पण वॉटरमार्क टाका.>> हो नक्कीच. पुढील फोटोंना वॉटरमार्क करायची काळजी घेईन.

anjali_kool आम्हीही याला चतुरच म्हणतो. मोबाईलवरुन फोटो अपलोड केल्यामुळे नाव टाकता आले नाही. वरील फुलांची चार पाच झाडे आहेत अंगणात पण त्यांचे नाव मला माहित नाही.

<<मनीम्याऊ तो माठ किंवा राजगिरा आहे.>>
खरं की काय? सध्या पुण्यात रस्त्याच्या कडेला याचे उदंड पीक आले आहे मग.

@ anjali_kool, पाचू आणि मरवा वेगवेगळे आहेत.

मरवा

DSC01869.JPGDSC01874.JPG

@शालीदा,
चतुरचा फोटो खुप सुन्दर.

ते गाणं आहे नाही का शालू हिरवा पाचू नि मरवा वेणी तिपेडी घाला
मला इतके दिवस वाटायचं हिरवा शालू आणि पाचूसारख्या रंगाचा मरवा
पण तसं नाही हे आत्ताच कळतंय पाचू आणि मरवा .. Happy

पाचू आणि मरवा दोन्ही वेगवेगळे आहेत .

Patchouli म्हणताता इंग्रजीत पाचू ला . याचं तेल , किंवा याच्या वासाच्या मेणबत्त्या बर्‍याच ठिकाणी असतात विकायला.
आणि मरवा म्हणजे marjoram - सूप मधे, सॅलड ड्रेसिंग किंवा मॅरिनेड मधे वापरतात याची पाने. आमच्या इथे उन्हाळ्यात मरव्याची रोपं कायम मिळत असतात. अलिकडेच पाचू ची रोपं पण पाहिलीत.

मरवा म्हणजे marjoram - सूप मधे, सॅलड ड्रेसिंग किंवा मॅरिनेड मधे वापरतात याची पाने>>> काssss य ???मरवा खातात ? भारीच !!
मला वाटलं डोक्यात माळायला वापरतात फक्त ..

woooow !! काय दिसतोय खरंच .. भारी !
हेच रोप किंवा याच्या भावकीताला असावं इथे किंवा भारतात बघितलंय मी असं वाटतंय मला .. पण आठवत नाहीये
हे काय दुर्मिळ वगैरे नाहीये ना ?कुठेही उगवलेलं असतं ना ?

Pages