लहान मुलांना "जात" संकल्पना कशी सांगाल?

Submitted by सिम्बा on 30 July, 2018 - 03:27

Tr निमित्त झाले मराठा मोर्चाचे.
सकाळी मुलगी शाळेसाठी तयार होत असताना vanवाल्या काकांचा मेसेज आला,
सकाळी स्कुल बसेस, vans काही ठिकाणी अडवल्या आहेत, बरोबर मुले असल्याने आंदोलकांचा सूर समजावण्याचा होता , पण संध्याकाळ पर्यंत वातावरण कसे असेल माहित नाही , त्यामुळे आज van सर्विस बंद राहील.

मग मुलीला शाळेत पाठवायचे कि नाही ? पाठवले तर परत आणायचे कसे या बद्दल आमची चर्चा चालू होती.
साहजिकच शाळा बंद का? कोण vans अडवते आहे वगैरे चौकशी मुलीने केली.
या आधी मराठा मोर्चा बद्दल तिने फोटो किंवा उडत्या बातम्या ऐकल्या होत्या ( शेजारच्या बिल्डिंग मधली अमुक तमुक मावशी मोर्च्याला एन्फिल्ड घेऊन गेली होती स्वरूपाच्या) पण त्यातले गांभीर्य तिला तेव्हा कळले नसेल
आज थेट तिच्या जगण्याशी संबंध आल्याने तिला जास्त शंका होत्या.

आरक्षण म्हणजे काय? कशासाठ? मुळात जात म्हणजे काय??हे विषय सकाळच्या घाईत सांगण्यासारखे नव्हतेच, त्यामुळे संध्याकाळी नीट सांगेन म्हणून वेळ मारून नेली.
संध्याकाळ जवळ येत आहे, आणि तिला उत्तर देणे भाग आहे.

तुम्ही तुमच्या मुलांना "'जात" हि संकल्पना कशी सांगितलीत? किंवा सांगाल.? कि तुम्हाला कधी जाणीवपूर्वक सांगावी लागली नाही.
माझ्या केस मध्ये आम्ही घरात/ मित्र परिवारात कधीही जातीचा उल्लेख केलेला नसताना तिला तिची जात, पोट जातीसकट माहित होती , हा माझ्यासाठी धक्का होता. (वय वर्षे ८-९ )
तिला धर्म संकल्पना सांगताना विशेष त्रास झाला नाही, वेगळ्या देवाची पूजा करणारे लोक, इतपत स्पष्टीकरण तिला तेव्हा (वय वर्षे ५-6) पुरेसे होते. पण एकाच देवाला पुजणारे तरीही वेगळे लोक आणि त्यात मानली जाणारी उतरंड हे तिला कसे समजवावे?

काही टिप्स असतील तर नक्की सांगा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जातीव्यवस्था कशी निर्माण झाली असेल, ती कशी मूळ धरून रुजली असेल व तिचे काय दुष्परिणाम समाजावर झाले आहेत इतके सांगून सोडून द्या. त्यातून तिला जे प्रश्न पडतील त्याची पुढे उत्तरे देत जा.

माझ्या भाच्याबरोबर (वय ९) काही महिन्यांपुर्वी गावात हिंडत असताना माझा एक वर्गमित्र भेटला. तो गेल्यावर एकदम भाच्याने "त्याची जात काय" असा मला प्रश्न विचारला. मी विचारले तुला हा प्रश्न का पडला तर तो म्हणाला असच. मग घरी आल्यावर मी त्याच्याशी जातव्यवस्था का / कशी निर्माण झाली असावी, तिचे दुष्परिणाम व १९-२०व्या शतकात त्याविरोधात झालेली आंदोलने वगैरेबद्दल बोललो. मग माझ्या स्वतःच्या पुस्तक संग्रहातला आंबेडकर-फुले-सावरकर कप्पा त्याला उघडून दिला. आंबेडकरांची व फुल्यांची महाराष्ट्र शासनाने (चरित्र साधने प्रकाशन समिती, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन) प्रसिद्ध केलेली पुस्तके आहेत. त्यातल्या बहुतेकांवर त्यांचे फोटो आहेत. ते पाहून त्याने मला अजून काही प्रश्न विचारले, मी जमेल तशी उत्तरे दिली. मूकनायक/बहिष्कृत भारत असे संयुक्त एक मोठ्या आकाराचे, हार्ड बाउंड पुस्तक (संकलन) आहे त्यातला एक सोपा लेख त्याला वाचून दाखवला.

याचा किती उपयोग होइल माहिती नाही. माझ्या मनाचे समाधान झाले.

मुले घराबाहेर पडली की जातपातधर्म वगैरे सगळे आपोआप कळते. तुम्हाला काहीही प्रयत्न करावे लागत नाहीत.

शेजारच्या काकूंकडे मूल जायला लागले व काकूंच्या हातचे पदार्थ खाऊ लागले की काकू सीकेपी आहेत म्हणून , ब्राम्हण आहेत म्हणून इ. इ. अमुक तमुक पदार्थ मस्त करतात हे आपोआप कानावर पडायला लागते.

शाळेत/कॉलेजात जायला लागले की obc व इतर वर्गाची लिस्ट लागते नोटीस बोर्डात, फी सवलत व इतर कामांसाठी. जाती कळतात आपोआप.

डॉक्टर इंजिनीआर व इतर अशा अभ्यासक्रमांसाठी सरकारी संस्थांत प्रवेश घ्यायला गेले की कुणाला किती आरक्षण मिळते, वर्गात मेरिटवर आलेले किती व आरक्षणावर आलेले किती हे आपोआप कळते.

सरकारी नोकरीसाठी अर्ज करायला गेल्यावरही सगळे कळते.

त्यामुळे तुम्ही भारतात राहात असाल तर मुलाला जातीपाती वगैरेबद्दल काही सांगावे लागत नाही. त्याचे त्यालाच कळते. त्याचे या सगळ्यांबद्दल काय मत असायला हवे हे तुम्ही व तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे मत काय यावर ठरते. मुले जन्माला आल्यापासून तुम्हाला पाहात असतात, तुमचे विचार त्यांच्यावर परिणाम करतात.

भारताबाहेर जाती पातीचा प्रश्न येत नसेल पण धर्माचा येतोच. इथे त्यावर धागे आहेत बहुतेक.

आमच्याकडे अजून तरी प्रश्न पडलेला नाहीये पण लवकरच पडणार हे नक्की आणि शेंडेफळ जास्त लवकर हा प्रश्न विचारेल असे वाटते आहे..

आज काही झाले तरी मी शाळा बुडवणार नाही कारण पुढे फार अभ्यास करायला लागतो, काका आले नाहीत तरी तू मला शाळेत सोड आणि घ्यायला ये कारण शाळेनी सुट्टी दिलेली नाहीये.. असे सांगून शाळेत जाण्यात आलेले आहे.

मुले घराबाहेर पडली की जातपातधर्म वगैरे सगळे आपोआप कळते. तुम्हाला काहीही प्रयत्न करावे लागत नाहीत. >>>>> +१.

शाळेत शिकताना पहिली का दुसरीत असताना मुलाने विचारले होते की आपण कोण म्हणून्,म्हटलं माणूस! तसं नाही आपण कुठे जातो,देवळात की चर्चमधे तसं.आता हे म्हटल्यावर घरातला देव्हारा दाखवून आपण मंदिरात जातो म्हणजेच आपण हिंदू आहोत हे सांगायला लागलं.

तुम्ही तुमच्या मुलांना "'जात" हि संकल्पना कशी सांगितलीत? किंवा सांगाल.? कि तुम्हाला कधी जाणीवपूर्वक सांगावी लागली नाही.
माझ्या केस मध्ये आम्ही घरात/ मित्र परिवारात कधीही जातीचा उल्लेख केलेला नसताना तिला तिची जात, पोट जातीसकट माहित होती ,
आम्ही, लेकाला बर्‍याच उशीरापर्यंत जात सांगितली नव्हती.घरी आजी आजोबा नसल्याने हे खपूनही गेले.एकदा शाळेत फी सवलतीसाठी जात विचारली त्यावेळी त्याला त्याची जात माहित नाही म्हटल्यावर इतेर मुले हसली आणि ते त्याच्या मनाला लागले होते.त्यामुळे माझी आई घरी आल्यानंतर त्याने जात विचारून घेतली होती.

Last year there was a debate in my son's school about caste and reservations their pros and corns. I explained him in the best possible and neutral way. I also told him where I was wrong in my earlier understanding about opposing reservations. He chose to speak for reservations and he was the only kid in that discussion forum who supported reservations. So yes we need to explain our kid about caste system. But important thing - be honest to yourself. Sorry English.

- आम्ही कधीच कुणाची जात विचारलेली नाही.
- आडनावावरून लोक जात कसे ओळखतात हे मला पडलेले कोडे आहे.
- आमच्या मुलांना शाळेत जात विचारली तेव्हां त्यांनी घरी येऊन जात म्हणजे काय हे विचारले होते. मग आम्ही शाळेला खरमरीत पत्र लिहीले.
- गावाकडून माणसं आली होती. आपल्या कामासाठी जरा मदत करा म्हणत होते. मी विचारले आपल्या म्हणजे ? ते म्हणाले आपल्या जातीच्या. मी विचारले जात काय असते ?
- पु ल देशपांडे ब्राह्मण आहेत असे एका ओळखीच्या बाईने सांगितले तेव्हां धक्का बसला होता. मला आजवर साहीत्यिकांची, कलाकारांची, देशभक्तांची आणि चांगल्या माणसांची जात माहीत करून घ्यायची गरज पडलेली नाही.
- माझ्या दृष्टीने दोनच जाती. एक वाईट लोक आणि दुसरी चांगली माणसे
- जात सोडा आम्ही धर्म देखील मानत नाही हो
- आरक्षणामुळे जात मजबूत होते
- जात ? आता काय राहीलेय हो असे काही ?

अशा प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत...

हं.

इथे मायबोलीकरांच्या चर्चेसाठी माझी मते लिहायची इच्छा नाही.

सगळे प्रतिसाद संपतील तेव्हा काय शोध लागला ते सांगा, जेव्हा धाग्याचा / प्रश्नाचा सारांश लिहाल तेव्हा.

एक नोंद :

माझ्या लहानपणीतरी, शाळेतल्या कोणत्यातरी पुस्तकात. (प्रायमरी म्हणजे ४थी आधी किंवा ५वी आसपास असावे) वर्ण कसे जन्मले अन त्यांच्या आधारे जाती आल्या, हे शिकवले गेले होते. तुमच्या पैकी कुणाला आठवतेय किंवा कसे ठाऊक नाही. त्या काळी शिक्षकांनी हे सहजतेने शिकवले हेही आठवते.

***

वरचा साधना यांचा प्रतिसाद फॅब्रिकेटेड वाटतोय. कारण → "म्हणून इ. इ. अमुक तमुक पदार्थ मस्त करतात" उर्फ येडी घालायचे धंदे.

***

हा प्रतिसाद वाचणार्‍या भारतीय माणसांस,

लोकहो,

तुमच्या मुलाला जात सांगा.

जातीचे नांव व वर्ण उर्फ शूद्र, वैश्य, क्षत्रिय, ??? इ. समजवून सांगा. तुमच्या वरच्या वर्णाचा माणूस तुम्हाला ऑप्रेस करणारच, व तुम्ही ते सहन करा, कारण, तुम्हाला ऑप्रेस करता येतील अशा अगदी तुमच्याच वर्णाच्या जाती आहेतच, अशी या जातींमुळे व्यवस्था करण्यात आलेली आहे, हे समजवून सांगा.

म्हणजे, देवरुखे ब्राह्मणच नसतात, किंवा शुक्ल यजुर्वेदी कसे यःकश्चित असतात, चित्पावन कसे ग्रेट अन घारे वगैरे.

या देशाच्या घटनेने दिलेल्या अधिकारांनुसार नोकर्‍यांतले / शिक्षाणातले आरक्षण अनुज्ञेय असल्यास हक्काने बजावून वसूल करायला शिकवा.

फक्त, आपल्या "समाजा"च्या अस्मिता फुलवून इतर समाजांचा द्वेष करायचा नाही, हे आवर्जून शिकवा.

फॉर द सिंपल रीझन.

सध्याच्या सत्ताधार्‍यांना या क्षणाला धर्माच्या नावावर, अन त्याचवेळी कडेकडेने जाती/वर्णावर देशाचे घास करून खायचे आहेत. एका घासात खाता येत नाही. छोटे घास करायचे असतात...

सध्या ४थ्या पलिकडे देशात पाचवा वर्ण अन खालची नवी जात उर्फ मुसलमान बनवणे सुरू आहेच..

तर, तेव्हा जेव्हा कधी तुमचा घास गिळला जाण्याची वेळ येईल, तेव्हा त्या मुलांना आपली लोकस स्टँडी नीट ठाउक असू द्या.

After-all, recognizing a familiar and dear darling habit, as an addiction or threat to health and therefore your existence, is the first step towards getting rid of it Happy

जातीला समाज उर्फ 'पीपल' म्हणतात यावरूनच समजते की कसे वेगवेगळे लोकल लोक/समाज/पीपल गिळत हा देश/ज्ञातीव्यवस्था जन्मली आहे.

खूऽप जुना असण्याचे चांगले वाईट परिणाम आहेतच की!

माझ्या मुलीला जात या विषयावर काही विशेष माहिती नव्हती. पण आरक्षणामुळे इंजिनीअरिंगला पाहिजे त्या काँलेजमध्ये अँडमिशन मिळाले नाहीं,तेव्हा जात म्हणजे काय ते पुरेपूर कळले आणि या जातिपातिंबद्दल कायमची अढी मनात बसली.

माझ्या मुलीला जात या विषयावर काही विशेष माहिती नव्हती. पण आरक्षणामुळे इंजिनीअरिंगला पाहिजे त्या काँलेजमध्ये अँडमिशन मिळाले नाहीं,तेव्हा जात म्हणजे काय ते पुरेपूर कळले आणि या जातिपातिंबद्दल कायमची अढी मनात बसली.

आ रा रा, पहिला परिच्छेद इतका व्यवस्थित लिहून पुढे गोंधळ का बरं घातलात!

या देशाच्या घटनेने दिलेल्या अधिकारांनुसार नोकर्‍यांतले / शिक्षाणातले आरक्षण अनुज्ञेय असल्यास हक्काने बजावून वसूल करायला शिकवा.--- हे लहान मुलांना सांगणार! अभ्यास, मेहनत कमी पडली तरी चालेल असा गर्भितार्थ नाही का! आरक्षण आहे हे सांगायचे योग्य वय हेच का!

होय. अभ्यास केला तरी शूद्र वा अमुक जातीचे म्हणून तुमची लायकी या देशात दाखवली जाईल हे सांगण्याचे हेच वय आहे.

पैशाने वा अभ्यास अथवा ज्ञानाने बरे असलात तरी तुमची जात xxxxहो, हीच! असे जोवर या देशात एकाही माणसाला सांगण्यात येते, अन ते सांगितल्याबद्दल इथले भिक्करचोतट उच्चवर्णीयांचे सरकार काही ऍक्शन घेत नाही, तोवर जात काय ते समजण्याचे, हेच वय.

आर शशी(राज)कुमार , दोनदा त्याच कॉलेजला अ‍ॅडमिशन मिळाली नाही ?
अपेक्षित प्रतिसादांबद्दल आपले आणि श्रीमती राजसी यांचे आरह्दयापासून आभार.

And yes. I shall teach the kids in different way under different rule.

CONTEXTS MATTER.

AND I shall not teach them one thing INSIDE home And to present another in public, which was done for a long time by many...

मग घरातून जातिभेदाचे बाळकडू पाजणारे तथाकथित उच्चवर्णीय आणि दुसरीकडे लहानपणापासून आरक्षण तरतूद जाणीव करुन देणारे ह्यात नक्की फरक काय!

बाकी, दुसऱ्या बीबी वर सांगितलेले कर्माचा सिद्धांत इथे पण लागू होऊ शकेल. असो.

तुम्हांला मार्क चांगले नसतील तरी आरक्षणाच्या जोरावर चांगल्या कॉलेजात अ‍ॅडमिशन मिळू शकते आणि एखाद्या हुशार पण आरक्षण न मिळणार्‍या मुलाची संधी पटकवता येऊ शकते हे ही मुलांना सांगा. आज ना उद्या त्यांना कळेलच.

<<< हे विषय सकाळच्या घाईत सांगण्यासारखे नव्हतेच, त्यामुळे संध्याकाळी नीट सांगेन म्हणून वेळ मारून नेली.
संध्याकाळ जवळ येत आहे, आणि तिला उत्तर देणे भाग आहे. >>>

@सिम्बा
सोप्पे आहे. मुलीला सांगा, आता भारतात २ च जाती आहेत, आरक्षण मिळणारे आणि आरक्षण न मिळणारे अशा.

जशी आहे तशी सांगून टाकावी.
किंवा तुम्ही ज्या प्रमाणात जातपात मानता त्यानुसार सांगून टाकावे.

उदाहरणार्थ मला माझ्या मुलांना सांगायचे झाल्यास,
काही नाही रे खुळ्यांचा बाजार असतो. आपण आहोत का खुळे? नाही ना, मग आपली कुठलीही जात नाही.

याबाबतीत साधनाताईंच्या संपूर्ण प्रतिसादाला +१११
काहीही सांगायची गरज नाही...योग्य वेळ आली की मिळणार्या कमी अधीक फायद्या-तोट्यांतून कळेलच सर्व... Wink

आरक्षणाच्या जोरावर चांगल्या कॉलेजात अ‍ॅडमिशन मिळू शकते आणि एखाद्या हुशार पण आरक्षण न मिळणार्‍या मुलाची संधी पटकवता येऊ शकते

... हे नेमके कसे घडते? ह्या वाक्यांतून.. मला तर फक्त जळफळाट दिसतो आहे .

आरक्षणात कोणीही कोणाची संधी पटकावत नसतो. डोक्यातून काढून टाका हे ब्रेन्वाशिंग जागा ओसाड पडल्यात कित्येक कॉलेजात . .. चांगले कॉलेज कमी असतील तर त्यासाठी करा की आंदोलने. पण तसे नाही.

सिम्बा, तिची जात कोणती हे तिला आधीच माहित झाले आहे असे तुम्ही मेन्शन केले आहे. म्हणजे जात नेमकी काय असते याचे काही एक गृहितक तिच्या मनात तयार झालेले असू शकते.
तुमच्या जागी मी आहे असे मानले तर मी पालक म्हणून याबद्दल चर्चा नक्कीच करेन. हे डिस्कशन अगदी लाइट , मुख्य म्हणजे न्यूट्रल मूडमध्ये करेन - म्हणजे फॅक्ट्स सांगणे. मुलीचे स्वतःचे मत आवर्जून विचारणे.
जाती कोणत्या काळात आणि कशा निर्माण झाल्या, लोकांच्या मनात त्या कशा रुजल्या,
जातीव्यवस्थेचे सामाजिक परिणाम काय झाले ( रोटी- बेटी- सोशलायजिंग हे फक्त जातीतच करणे इ.)
आताच्या काळात जातीव्यवस्थेची गरज / रेलेवन्स आहे का? एखाद्याला जातीमुळे वेगळे ट्रीट करावे का? यावर तिचे मत विचारणे.
आपल्या कुटुंबाची जातीच्या बाबतीत काय भूमिका आहे आणि का? तिचे त्यावर मत काय?
मी तरी थोडेफार आरक्षण आणि ते का दिलेले आहे हा मुद्दाही तिला कळेल इतपत डिस्कस करेन आणि मुलीची रिअ‍ॅक्शन बघेन.
माझ्या लेकीसोबत हे डिस्कशन थोड्या फार फरकाने मी केलेलेही आहे. अर्थात इथे आमच्या मुलांना जात ही गोष्ट कधी खर्‍या अर्थाने अनुभवायला लागत नाही, त्यांना ती एक 'पुस्तकात इंडियासंबंधी वाचलेली एक गोष्ट' इतपतच मर्यादित जाणीव होते. पण भारतात राहताना रोजच्या बातम्या आणि जिथे तिथे जात काढणारा समाज यांमुळे तुम्हाला या गोष्टीशी डील करणे खूप जास्त अवघड असणार हे जाणवते.

सर्वांना धन्यवाद,
शेवटी आमचे बोलणे झाले,
मला अपेक्षित असलेल्या डिटेल मध्ये नाही, तरी झाले,
नक्की काय बोललो ते दुपारपर्यंत लिहितो.

वरचा साधना यांचा प्रतिसाद फॅब्रिकेटेड वाटतोय. कारण → "म्हणून इ. इ. अमुक तमुक पदार्थ मस्त करतात" उर्फ येडी घालायचे धंदे. >>>

अय्या, मी इतकी मेहनत करून फॅब्रिकेट केला आणि अरेरे, आरारा, तुम्ही लग्गेच ओळखलंत.... स्वतःवरून इतरांची परीक्षा इतकी मस्त करता ना तुम्ही. डॉक्टरी याच्यात सुद्धा केलीत का हो?

मैत्रेयी यांचा प्रतिसाद विषयाला धरून आणि बराचसा समतोल आहे. पण बराचसा आदर्शवाद डोकावतो. हा आदर्शवाद प्रत्येकाच्या मनात आहे पण त्यातला फोलपणा प्रत्येकास ठाऊक आहे. त्यामुळे तो आदर्शवाद कुठेतरी एका कप्प्यात बंद करून वास्तवाला शरण जाणे, आहे ती परिस्थिती स्विकारणे आणि ती समजावून सांगणे सोयीचे ठरते.
इतर प्रतिक्रिया ज्ञानवर्धक आहेत. त्यामुळे मुलाला काय समजावून सांगायचे हे सोयीचे जाते.

जात कायद्याने गेली नाही, ना कायद्याने अन्याय अत्याचार थांबले, ना द्वेष गेला. पुढारलेल्या जातींना आरक्षणाची कम्सेप्ट माहीत नाही तरी ते पुढारलेले आहेत. आरक्षण नसल्याने फ्रान्सने वर्ल्डकप जिंकला असे संदेश खरे तर सेल्फ गोल आहेत. कारण खेळात आऱक्षण आहे तरीही आपण
स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या ऑलिंपिक मधे एकही पदक मिळवू शकलो नाही. एखाद दुसरे अपवाद वगळता आपल्या झोळीत शून्य पदके आणि शेवटचे स्थान आपले हे पक्के होते.

क्रिकेटमधे स्वातंत्र्यानंतर खरे म्हणजे जिंकणे अपेक्षित होते. पण आपल्या मेरीटधारी जातींनी सामने अनिर्णीत ठेवणे म्हणजेच मोठी कामगिरी अशी समजूत करून दिली.

एव्हढे मेरीट असतानाही औद्योगिक क्रांती, वैज्ञानिक क्रांती या देशात झाली नाही. परकीय आक्रमणे यशस्वी झाली. त्या वेळी तर आरक्षण नव्हते. तरीही मुघलांनी राज्य केले, ब्रिटीशांनी राज्य केले. अर्थात आरक्षण नसल्याने त्या काळात जाती नसणारच. कारण जात आरक्षणामुळे आली आहे. महणजे सगळेच समान आणि मेरीट धारी असतानाही आपले दारूण पराभव झाले. इतिहासातल्या या पराभवालाही आजच्या काळातले आऱक्षण जबाबदार.

ब्रिटीशांचे प्रशासन तर मेरीटवाल्यांचेच होते. स्वतंत्र भारतात तेच इथे लागू झाले. तरीही देश कुठल्याही क्षेत्रात पहिला नाही. देशात ना कुठले तंत्रज्ञान विकसित झाले ना शोध लागले. जे काही ज्ञान आहे ते पाश्चात्यांकडून आले. आधुनिक वैद्यकीय ज्ञान परदेशी. अभियांत्रिकी परदेशी. आपण ते फक्त शिकतोय. खर तर मेरीटधा-यांकडून ताबडतोब बुलेट ट्रेन, एफ १६ विमाने इतर देशांना निर्यात करण्याची अपेक्षा करणे गैर नाही.

पाकिस्तान त्यांच्या वाटेचा कोटा घेऊन गेला, आरक्षणाचा कोटा आमच्या डोळ्यासमोर आहे म्हणून त्याला डिवचणे, द्वेष करणे हे चालू आहे. पाकिस्तानने जो कोटा तिकडे नेला त्याबद्दल कुणाला असूया नाही हे अजब आहे. देशातच दुर्बल घटकांना वेगळा कोटा दिला तर देश मागे जातो. खरेच असावे हे. वरच्या सगळ्याला आरक्षण आणि अ‍ॅट्रोसिटी जबाबदार आहे हे मुलांना समजावून सांगा. देशाच्या फाळणीलाही आरक्षणच जबाबदार आहे आणि फूटबॉल मधे भारत कुठे नाही यालाही.
मल्ल्या पळाला आरक्षण जबाबदार. दोन मोदी पळाले आरक्षण जबाबदार. मेहता पती पत्नी पळाले आरक्षणच जबाबदार. स्विस ब्यांकेत काळा पैसा ठेवला आरक्षण जबाबदार. हे सगळं समजावून सांगा. म्हणजे काही जणांचे आत्मे थंड होतील.

सॉरी, काल दिवसभर नंतर इथे डोकावायला वेळ मिळाला नाही.
माझं मत बरंचसं टण्या आणि मैत्रेयी सारखं आहे. शाळेत प्राचीन इतिहासात चातुर्वर्ण्य आहे त्यातून कशा हळूहळू जाति उत्पन्न झाल्या हे सोप्या शब्दात सांगता येईल. बहुतेक प्राचीन समाजांमध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात वर्गीकरण होतंच हेही सांगता येईल. त्यानंतर जतिव्यवस्था हळूहळू पक्की झाल्यामुळे कशी अन्यायकारक होऊ शकते हेही मुलांना कळेल अशा शब्दात समजावता येईल.
हेच वय आहे तिला विविध समाजसुधारणेच्या चळवळींची तोंडओळख करून देण्याची..

परत इथे आरक्षणावर तेच तेच घिसेपिटे विरुद्ध मुद्दे बघून सखेद आश्चर्य वाटले (माबोवर राजकीय-सामाजिक धागे फारसे वाचत नसल्याने माझी इम्युनिटी कमी झाली बहुतेक Wink )
- सध्या आरक्षण आणि खुल्या दोन्ही वर्गातल्या कट ऑफ लिस्ट्स मध्ये फारसा फरक नसतो. आणि प्रवेशाला आरक्षण असले तरी परीक्षेत पास व्हायला नसते, तेव्हा जे उत्तीर्ण होतात ते काही एक क्षमता सिद्ध केली आहे म्हणूनच होतात
- आरक्षण राबवताना काही त्रुटी जरूर होत असतील पण जोपर्यंत समाजातले दलितांवरचे अत्याचार संपत नाहीत, वंचितातल्या सगळ्यात शेवटच्या घटकापर्यंत त्या सोयी सवलती जात नाहीत तोपर्यंत मागासवर्गीय ही कॅटेगरी राखली गेलीच पाहिजे. कारण वंचितातले बहुसंख्य गट हे सामाजिक उतरंडीत खाली आहेत म्हणून पिढ्यानुपिढ्या वंचित आहेत, आता काही दशके त्यांना संधी मिळते आहे. तेव्हा आरक्षणात क्रीमी लेयर, किती पिढ्या एकच कुटुंबाला आरक्षण सवलत मिळणार वगैरे मुद्दे फारतर चर्चेला ठीक आहेत पण सरसकट आरक्षण वाईट, फक्त लायक नसलेल्यांना त्यामुळे संधी मिळते वगैरे बोलण्याला अर्थ नाही. खुल्या प्रवर्गातले सगळे जण बाय डिफॉल्ट लायक नसतातच. आणि आरक्षित वर्गातले बाय डिफॉल्ट नालायक नसतात.
- ज्या सामाजिक वर्गांमध्ये शिक्षण घेऊन वरती जाणे हा परंपरागत वारसा होता ते कितीही गरीब असले तरी एखाद दोन पिढ्यांमध्ये स्वतःची उन्नती करून घेऊ शकलेच. कष्ट घेऊन शिक्षण घेऊन वरती जाणे याला पर्याय नाही. हे आरक्षित वर्गाला जिथे जिथे कळलं आहे त्यांनीही उत्तम प्रगती केली आहे, करत आहेत. दोनतीन पिढ्यापूर्वी निरक्षर असलेल्यांची मुलं आज विद्वत्क्षेत्रात विद्वान, अभ्यासू म्हणून गणली जात आहेत अशी बरीच उदाहरणे आजूबाजूला बघितली आहेत. ती केवळ त्यांना संधी मिळाल्या, शिक्षणाचे महत्व पटले म्हणूनच घडली आहेत. निश्चितच इतर क्षेत्रांतही असणारच.
- आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मुलांना आरक्षण या एकाच मुद्याभोवती फिरणारे जातवास्तव का सांगायचे? मुंबई पुण्यात कमी 'दिसत' असेल पण बाकी राज्यभर, देशभर दलितांना आजही वाईट वागणूक मिळते, भेदभावाने वागवलं जातं. हे चूक आहे, माणसाला माणसासारखं वागवलं गेलं पाहिजे हे पण शिकवलं गेलंच पाहिजे. आरक्षण द्यायची गरज का भासते ते न सांगता फक्त आरक्षण केंद्रित जातवास्तव मुलांपुढे मांडलं गेलं तर त्यांच्याही मनात आपण जातिभेदाचं विष पेरतो आहोत.

मी सरकारसंलग्न शिक्षणक्षेत्रात असल्याने मलाही वैयक्तिक आरक्षणाचे फटके बसलेले आहेत, पण म्हणून कधी माझ्या तोंडचा घास काढून आरक्षणवाल्या/ली ला दिला आहे असं कधी वाटलेलं नाही. शेवटी ज्याची जितकी क्षमता असते तितके ते मिळवतातच.

मेरीटधा-यांना वरील क्षेत्रात कामगिरी करण्यासाठी परदेशातून मदतीचा हात, तंत्रज्ञानाची आयात आणि एक्स्पोजर हे घटक लागले. राजीव गांधी असताना त्यांनी कोलॅबरेशनची अट घातल्याने जपानी उद्योगांनी भारतीय व्यापा-यांना तंत्रज्ञान देऊ केले. अन्यथा आपल्याकडे तीच ती तिरकी करून किक मारायची स्कूटर बनत होती, अवजड अँबेसेडर कार बनत होती. एन्फील्ड तर परदेशीच होती. मात्र भारत स्वतंत्र झाला तेव्हां भारतात दहा वाहन उद्योग होते. जपान मधे दोन चार होते. आज जपानशी तुलना केली तर मेरीट कशाला म्हणायचं याचा प्रश्न पडेल. चीन, तैवान हार्डवेअरच्या क्षेत्रात कुठच्या कुठे गेले.
चीन आणि भारताची सुरूवात सारखीच झाली असे समजले तर चीन आज कुठे आहे ?
सिंगापूर मागून येऊन कुठे आहे ?
आरक्षण जास्तीत जास्त १८% . त्यातही ते कधीच १००% भरले गेले नाही. या अधोगतीला आरक्षण जबाबदार असेल तर मेरीटधारी कामच करत नाहीत असा अर्थ होईल.
थोडक्यात ..
वेळ लागतो.
मेरीटधा-यांना तो लागत असेल
तर दर वेळी आरक्षणाच्या बाबतीत कुजकट शेरेबाजी करू नये. अर्थात सक्ती नाही. किमान सडकी मनोवृत्ती जाहीर करणे याला जे धाडस लागते ते कौतुकास्पद आहे.

Pages