लहान मुलांना "जात" संकल्पना कशी सांगाल?

Submitted by सिम्बा on 30 July, 2018 - 03:27

Tr निमित्त झाले मराठा मोर्चाचे.
सकाळी मुलगी शाळेसाठी तयार होत असताना vanवाल्या काकांचा मेसेज आला,
सकाळी स्कुल बसेस, vans काही ठिकाणी अडवल्या आहेत, बरोबर मुले असल्याने आंदोलकांचा सूर समजावण्याचा होता , पण संध्याकाळ पर्यंत वातावरण कसे असेल माहित नाही , त्यामुळे आज van सर्विस बंद राहील.

मग मुलीला शाळेत पाठवायचे कि नाही ? पाठवले तर परत आणायचे कसे या बद्दल आमची चर्चा चालू होती.
साहजिकच शाळा बंद का? कोण vans अडवते आहे वगैरे चौकशी मुलीने केली.
या आधी मराठा मोर्चा बद्दल तिने फोटो किंवा उडत्या बातम्या ऐकल्या होत्या ( शेजारच्या बिल्डिंग मधली अमुक तमुक मावशी मोर्च्याला एन्फिल्ड घेऊन गेली होती स्वरूपाच्या) पण त्यातले गांभीर्य तिला तेव्हा कळले नसेल
आज थेट तिच्या जगण्याशी संबंध आल्याने तिला जास्त शंका होत्या.

आरक्षण म्हणजे काय? कशासाठ? मुळात जात म्हणजे काय??हे विषय सकाळच्या घाईत सांगण्यासारखे नव्हतेच, त्यामुळे संध्याकाळी नीट सांगेन म्हणून वेळ मारून नेली.
संध्याकाळ जवळ येत आहे, आणि तिला उत्तर देणे भाग आहे.

तुम्ही तुमच्या मुलांना "'जात" हि संकल्पना कशी सांगितलीत? किंवा सांगाल.? कि तुम्हाला कधी जाणीवपूर्वक सांगावी लागली नाही.
माझ्या केस मध्ये आम्ही घरात/ मित्र परिवारात कधीही जातीचा उल्लेख केलेला नसताना तिला तिची जात, पोट जातीसकट माहित होती , हा माझ्यासाठी धक्का होता. (वय वर्षे ८-९ )
तिला धर्म संकल्पना सांगताना विशेष त्रास झाला नाही, वेगळ्या देवाची पूजा करणारे लोक, इतपत स्पष्टीकरण तिला तेव्हा (वय वर्षे ५-6) पुरेसे होते. पण एकाच देवाला पुजणारे तरीही वेगळे लोक आणि त्यात मानली जाणारी उतरंड हे तिला कसे समजवावे?

काही टिप्स असतील तर नक्की सांगा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळं कळतंय हो. पण आपल्या अपयशाचे खापर फोडायला कोणीतरी लागतंच.

सर्व सुखसोयी असून पोराला अपेक्षेपेक्षा मार्क कमी मिळाल्यावर "ह्या वर्षी पेपर खूप कठिण काढ्ले होते हो" अशी लिपापोती करणारे पालक माहित्येत.

हौ.. माझ्या भाचीसोबत होती एक मुलगी वीसेक लाख भरुन डेन्टल मध्ये अ‍ॅडमिशन घेतलं. अक्कलेचा पत्ता नाही पण डॉक्टर होणार आता ती.

सॉरी सिंबा,

तुमचा जात कशी सांगायची चा धागा आरक्षणात विरघळतो आहे. पण नाइलाज आहे.
जात अन आरक्षण, आरक्षण अन जातीचा माज, या गोष्टी,

संगीत और गझ़ल, गझ़ल और गुलाम अली, इतक्याच एकमेकांत गुंतलेल्या आहेत.

कुणीतरी धागा लायनीवर आणा रे बाबाहो!

इथली हाणामारी वाचून वाईट वाटले. एकमेकांवर चिखलफेक करून काय साध्य होणार आहे? इथे तावातावाने भांडल्याने ना आरक्षण रद्द होणार आहे, ना वाढणार आहे. जे बदलणे आपल्या हातात नाही त्याच्यावर इतका वेळ का वाया घालवायचा? Ant and Grasshopper – Indian Version of story वाचा. नाकतोडा आणि मुंगी दोघांनाही पोट भरायचे असते, फक्त पद्धत वेगळी. ज्याला जे जमेल, रुचेल, आवडेल तसे करावे. लक्षात ठेवायचे की It is not the most intellectual of the species that survives; it is not the strongest that survives; but the species that survives is the one that is able best to adapt and adjust to the changing environment in which it finds itself.

पीनी अतिशय सुरेख प्रतिसाद. तुमच्यासारखीच जाणीव जेव्हा शहरी प्रिविलेज्ड समाजाला बहुतांशाने होईल तेव्हा सुदिन. कदाचित माझ्या हयातीतही मी हे बघू शकणार नाही अशी भीती वाटते मला...
लहानपणी साताठ वर्षांची असताना बेबी कांबळे यांचं जिणं आमचं नामक आत्मचरित्र स्त्री मासिकात क्रमशः येत होतं. पहिलं दलित स्त्री आत्मचरित्र. माझ्या आजीच्या वयाची किंवा त्यापेक्षा थोडी लहान असलेली बाई कुठल्या जातवास्तवाच्या संदर्भात वाढली ते वाचून डोळे खाडकन उघडल्यासार्खे झाले होते तेव्हा. आजीच्या लहानपणचा, तरुणपणचा संघर्ष माहित आहे, त्याबद्दल अपार आदर आहे. पण बेबी कांबळेंच्यसारखा संघर्ष आपल्याला कुणाला कधी कल्पनेत तरी करावा लागला आहे का आपल्या तथाकथित उच्चवर्णीय शहरी लोकांच्या पूर्वजांना?
अगदी इथे कलकत्त्यात आमचा जमादार (कचरा गोळा करणारा) आहे त्याने मुलींना पदवीधारक केलं पण पोलिसात भरतीपरीक्षा द्यायची होती एका लेकीला तर एससी चं प्रमाणपत्र मिळवायला त्याने तीन वर्षं चकरा घातल्या हे डोळ्यांनी बघितलं आहे. या अशा लोकांना समाजात वरती यायची इच्छा असेल, श्रम करत असतील तर त्यांच्या पारड्यात उजवं दान पडलंच पाहिजे की..

हेला, "मला वाटले की आता फेफ यांना किती विचार पडला असेल, हेलांनी माबोवर जन्मसिद्ध लिहिलंय.. प्रलय आलाय रं आता पुढच्या लाखो पिढ्यांसाठी.... इतकी काळजी मागच्या पिढ्यांतल्या जन्मसिद्ध अधिकारांबद्दलही असती तर आज ये दिन न देखने पडते...."

मी तुम्हाला उद्देशून कुठलिही वैय्यक्तिक टीका केली नाहीये. म्हणून तुम्ही तसं करावं अशी अपेक्षा नाहेये. पण उगाच त्या मार्गानं जाऊ नका.

बाय द वे, चमकदार वाक्य आहे, पण "इतकी काळजी मागच्या पिढ्यांतल्या जन्मसिद्ध अधिकारांबद्दलही असती तर आज ये दिन न देखने पडते" ह्या वाक्याचा अर्थ काय? मी कसली काळजी केली? इतिहासाविषयी काळजी कशी करणार? आज कुठले दिन मला पहायला लागताहेत, जे नेमकं मी काय केलं असता, मला पहायला लागले नसते?

परत एकदा माझी विनंती: धाग्याचा मुळ प्रश्न वेगळा होता, त्याविषयी, एकमेकांवर चिखलफेक न करता चर्चा करू. ह्या चिखलफेकीतून काहीही साध्य होणार नाही. जे विष आपल्याला पुढच्या पिढ्यांमधे भिनायला नकोय, त्यासाठी काय करता येईल? इतिहास नाकारता येणार नाही, त्याला नावं ठेवूनही मुद्दा स्पष्ट होणार नाही. पण जात, जातीभेद आणी त्याचे दुष्परिणाम ही माहिती पुढच्या पिढ्यांकडे कशी ट्रान्सफर करणार हा चर्चेचा अपेक्षित विषय आहे असं मला वाटतं.

पीनी यांच्या प्रतिसादानंतर इतरांनी थांबावे. कृपया टाळे ठोकावे.
मुलाला काय सांगावे यासाठी आपल्या विश्वासातल्या लोकांशी चॅट केलेली उत्तम. हा धागा आल्यावर हे असेच होणार हा अंदाज खराच ठरला.

It is not the most intellectual of the species that survives; it is not the strongest that survives; but the species that survives is the one that is able best to adapt and adjust to the changing environment in which it finds itself.>>> जियो उबो! Happy

फेफ.. एकूण तीन प्रतिसाद आपण माझ्या जन्मसिद्ध शब्दाबद्दल खर्च केले. जरा इतरांच्याही विखारी प्रतिसादांवर मेहर नजर केले असती.. त्यामुळे तुमचा मुद्दा लक्षात आला. असो.

ती काळजी तुम्हाला उद्देशून नाही. नका मनाला लावून घेऊ हे पहिलेच बोललो

"त्यामुळे तुमचा मुद्दा लक्षात आला. " - कशामुळेही असो, तुम्हाला माझा, 'आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यांवर, इंटरनेट च्या आभासी पडद्यामागून, इतक्या casually मतं मांडण्यात अर्थ नाहे. कुणी कायदेपंडित, समाजशास्त्रज्ञ असतील, तर त्यांचा ह्या विषयावरची अभ्यासपूर्ण मतं ऐकायला आवडतील' हा मुद्दा लक्षात आला असेल, तर मला बरं वाटेल. असो. तुमच्या-माझ्या ह्या वाद-प्रतिवादातून पुढे काहीच घडत नाहीये. त्यामुळे, मी थांबतो.

कुणी कायदेपंडित, समाजशास्त्रज्ञ असतील, तर त्यांचा ह्या विषयावरची अभ्यासपूर्ण मतं ऐकायला आवडतील >> असे असेल तर आपण भारत का कानून, इंडीया लॉ अशा संकेतस्थळावर जावे ही नम्र विनंती. इतिहास, विज्ञान विषयावर तशी संस्थळे आहेत.... एक नम्र सूचना

डबा बाटली, नम्र सूचना बरी आहे. २ आठवड्यात अंदाज येणार नाही तुम्हाला, पण इथे बर्याच विषयातली तज्ञ मंडळी आहेत.

तसंही तुम्हाला अभ्यासपूर्ण माहिती असलेली संस्थळं माहीत आहेतच. तर इतक्या संवेदनशील आणी महत्वाच्या विषयावर तिथून माहिती मिळवून मतं मांडावी आणी भडक विधानं टाळावी, अशी तुम्हाला नम्र सूचना.

र्‍
रश्मी, तुम्हाला वाटतय मी पुण्यात जन्मले आणि पुण्यात वा ढले. तुमची माहिती चुकीची आहे.
मी छो ट्या गावातच जन्मले आणि तिथेच वाढले.
सर्व जातीचा शेजार आहे. शाळेतल्या मैत्रिणी सर्व जाती धर्माच्या होत्या ( आजचे मित्रमन्डळही आहे).
सेम केस आई वडीलान्ची ,बहिणीची आहे. अगदी ज्याला तुम्ही बीसी म्हणता, गाव कुसाबाहेरच्या म्हणताहात ते ही लोक आहेत.
खरतर ह्यात समाजाच्या दृ ष्टीन काही कमी जास्त असू शकतं हे ही जाणवले नव्हते. (कागदावर इतिहास वाचणे वेगळे, अनुभवणे वेगळे)
हे तुम्हाला खोटे वाटत असेल, तर कदाचित मी एका आदर्श गावात रहात असावे, किंवा आदर्श कुटुंबात.

वरदा, पीनी ह्यांनी आमच्या सारख्यांना जाणीव हो ऊ शकणार नाही असे म्हटले आहे. तेव्हा त्या अनुषंगाने दोन गोष्टी सांगते.
पहिल्यांदा मी काय ऐकले गेल्या २ दिवसात ते सा न्गते. म्हणजे ही कीड कुठे पोचली आहे ते कळेल. मी माझ्या शीलाला स्मरून माझ्या साईड ने एकही उणा अधिक शब्द नाही ह्याची हमी देते:
एका शेजारणीच्या मुलीच्या वर्गात एका मुलीने शिवाजी महाराजांचे लॉकेट घातलेले. तर दुसरा मुलगा तिच्या अंगावर धावून आला आणि म्हणाला तू ब्राह्मण आहेस, तू शिवाजी महाराजांचे लॉकेट घालू शकत नाहीस. असेच अजून दोन मुलांचे जाती वरून ही भांडण झालेले ऐकले.
अर्थातच आई वडिल शाला प्रशासनाकडे जाऊन हे सोडवतील, पण मला तरी ह्या दोन घटनांनी फार हादरा बसला आहे.
जात असते, ह्यापलिकडे त्याच्याबद्दल राग/लोभ वाटू नये ह्या वयात आपल्या पिढीने मुलांना हे काय विष दिलय! फार वाईट वाटून फार अस्वस्थ झालेय मी.
आरारांसारख्यांच्या पोस्टस दुसरं वेगळं काय दर्शवतात?

प्लीज नोट, जे गतकानुगतिकं मेन स्ट्रीम मधे नाहीत - त्यांना मेनस्ट्रीम मधे येता याव, त्याकरता समाजाच्या लेवलला, प्र शासनाच्या लेवल ला प्रयत्न व्हावेत, त्याकरता त्या घटकांना आरक्षण हवे ह्यात काहीच दुमत नाही.
पण ज्या घटनांमधे ब्राह्मण समाजाचा संबंध ही नाही त्यातही त्यांचे बॅशिंग करायचे कारण काय?

महाराष्ट्रात कुठल्या बातम्यांमधे ब्राह्मणांनी जातीवरून मारामारी खून खराबा केल्याच्या बातम्या दिसल्यात? निदान मला तरी नाही!
नात्यातच मुलींपैकी एकीने लोहार, एकीने मराठा आणि एकीने दलित मुलाशी, एकीने भंडारी लग्न केले आहे, एकाची बायको ख्रिश्चन आहे. ते आज त्या त्या घराचा तितकाच भाग आहेत जितके बाकीचे जावई.
-------------
पीनी, वरदा आणि जे तथाकथित उच्चवर्णियांना ( उच्चवर्णिय हा शब्दच मला मजेशीर वाटतो. इस्पे शियली डिस्क्रिमिनेशनच्या विरुद्ध लिहिताना लो क हा शब्द वापरतात तेव्हा) काही सोसायला लागले नाही म्हणतात त्यांच्यासाठी:
जळीताबद्दल ऐकलय? कुळकायद्यात सगळ्या जमिनी गेल्या त्यान्च्याबद्दल ऐकलय?
जळीताबद्दल अनेक प्रत्यक्षदर्षी कथा आजोबा पिढी कडून ऐकल्या आहेत. त्याच्यातले हॉरर, ते तुमच्या कुटुंबाला अनुभवायला लागले न लागल्याने कळणार नाहीच बहुतेक तुम्हाला. आमच्या दोन्ही साईडच्या कुटुंबांच्या मदतीला इतर लोक येऊन थांबल्याने परमेश्वरी कृपेने त्रास झाला नाही, पण अवतीभवती अनेक जणांच्या भयानक स्टोरीज ऐकल्या आहेत.
व्यंकटेश माडगुळकराची कथा आहे ह्यावर. अगदी गरीबातल्या गरीब माणसाचे घरही सोडले नव्हते. कथा मिळवून वाचाच नसली वाचली तर.
कालपर्यंत ज्यांच्याबरोबर खे ळलो, ज्यांच्याशी रोजचे संबंध होते, ते असे जीवावर, अब्रुवर उठतात, तेव्हा विश्वासघात, मॉब लिचींग ह्या सग ळ्याचा धक्का भयानक असतो.
माझ्याकडेही अनेक कथा आहेत, पण वरच्या काही जणांच्या पोस्टस वाचता, माणुसकी, त्यातली भयानकता कळु शकेल का ? का क्रीपी लिखाण आवडणार्‍यांसारखी गत होईल - हा मोठाच प्रश्न मला पडला आहे.

ब्राह्मणांनी ज्ञान स्वतःकडे ठेवले म्हणणार्‍यांनी, वेद, शास्त्रे पुराणे हे खरेच व्यवहारोपयोगी ज्ञान आहे का? ह्याचा विचार करावा. (हेच आजच्या भारतातल्या ईन्जिनियरींग वगैरे शा खांब द्दल मी म्हणेन. इस्पे. आयटी, पण निदान ते पैसे तरी मिळवून देते.).

ह्याशिवाय ब्राह्मण सरसकट श्रीमंत होते, हा समज अत्यंत चुकीचा आहे. कुठल्याही लोक कथा ऐका, त्यात एक ब्राह्मण होता तो खूप गरीब होता अशीच गोष्ट सापडेल. ह्या कथा समाज जीवनाच प्रतिबिंब असतात. तिखट पाण्यात कालवून भाकरी बरोबर खाल्लेले दलित लोकही माहित आहेत आणि ब्राह्मणही. (स्वतः ओळखते असे). माझे आजोबा वडिलांच्या मृत्युनंतर गोठ्यात रहायचे, तसेच शिकले, वकील झाले. स्वातंत्र्य सैनिक असल्याने आणि मुख्य फोकस तो असल्याने नंतरही अतीश्रिमंती नव्हतीच. ह्या सगळ्या पिढीतल्या अनेक लोकांनी वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून समाजाकरता खूप मोठं योगदान दिलं. आज टिळक, चापेकर, सेनापती बापट, महर्षी कर्वे (आणि नंतरच्याही पिढ्या), साने गुरुजी, सावरकर, गोखले, शिव छत्रपती, आंबेडकर, फुले पती पत्नी, आण्णा भाऊ साठे - अशा अनेक ज्ञात आणि तुम्हा आम्हाला अज्ञात लोकांनी जे केलं त्याला आपण जातीत बसवतो तर त्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही.

पण द्वेष हा भारतातलाच नाही तर सर्व जगाचाच जगण्याचा आधार झालाय हल्ली असे वाटते. Sad
चांगले करणारेही अनेक आहेत, त्यांच्याकडे बघायचे, त्यांना मदत करायचा प्रयत्न करावा शक्य ति थे, बाकीच्या आभासी वादावरून ल ढ णार्‍या माणसांना समजवायचा प्रयत्न करावा, एवढेच काय ते करू शकतो, असे वाटते.

खरतर हे कॉर्पोरेटस चे युग आहे. चातुर्वण्य ही सिस्टीम आता कॉर्पोरेट्स ने रिप्लेस झाली आहे, हे लक्षात घेऊन खूप वरपर्यंत पोहोचता येऊ शकतं - एम्पायर उभं करता येऊ शकतं.
पण ते द्वेष पसरवणे/करणे ह्या इतकं सोप्पं नसल्यानं - किंवा आपल्या पुढच्या एन्डलेस पॉसिबिलिटिज अजून लक्षातच आलेलं नसल्याने, आपण आपापसातच भांडणे करत बसतोय.

तुम्हाला माहिती हवी म्हणून त्या संस्थळांची माहिती दिली होती. तुम्हाला त्यात अपमानास्पद वाटलेले दिसते. नाईलाज आहे.

तसंही तुम्हाला अभ्यासपूर्ण माहिती असलेली संस्थळं माहीत आहेतच. तर इतक्या संवेदनशील आणी महत्वाच्या विषयावर तिथून माहिती मिळवून मतं मांडावी आणी भडक विधानं टाळावी >>> भडक विधाने टाळण्याची सूचना वेळच्या वेळी इतरांनाही करत जा ही नम्र सूचना. तुम्हाला ही विधाने भडक वाटतात हे समजले. इथे फुकटे, जागा अडवणे वगैरे भडकपणा होत नाही हे ही समजले. थोडक्यात इथून एक्झिट घ्यावी अथवा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा ही तुमची सूचना स्वागतार्ह आणि विद्वत्तापूर्ण आहे. धन्यवाद आपले.

एक माजी मुख्य प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांनी दोन लेख लिहीले आहेत. त्यात तुम्हाला काही माहितीपूर्ण आढळते का ते शोधून सांगा. इथे कुणाला ऐकून घ्यायचे आहे हे ही सांगा.

आरक्षण हा हक्क आहे. पाकिस्तान दिला तसे आरक्षण आहे हे मी वर नमूद केले आहे. हे तुन्हाला माहितीपूर्ण न वाटता भडक वाटतेय, यात सगळे आले.
याउप्पर ज्याला खरेच जाणून घेण्यात रस असेल तो गुगल करेल किंवा संपर्क साधेल. धाग्याच्या निमित्ताने मळमळ बाहेर काढणे एव्हढेच ब-याच जणांना करायचे होते. तुम्हाला ते खटकावे असा आग्रह अजिबात नाही.

फेफ
इथे लिहीणा-या काही आयडींनी वेळोवेळी शाळेच्या दाखल्यावर आऱक्षणासाठी जात लिहीलयाने जात आली / निर्माण झाली असे अनेकदा सहज म्हणून लिहीलेले आहे. विषयाचा संबंध नसतानाही. तसेच आरक्षणामुळे मेरीटवाल्यांवर कसा अन्याय होतो याच्या करूण कहाण्या लिहीलेल्या आहेत. तुमचे इथले वय साधारण ब-यापैकी असेल तर तुमच्या वाचनात आलेच असेल. त्या वेळी कदाचित तुम्हाला ते तज्ञ वाटले असण्याचा संभव आहे. दोष नाही देत तुम्हाला... (ते भडक नसावे).

आणि याच विषयात तज्ञ का हवे ? प्रत्येक धाग्यावर असा आग्रह धरला तर आपला सत्कार शनिवारवाड्यावर केला जाईल. (हे भडक विधान वाटल्यास कळवावे ).

आरक्षण म्हणजे काही तरी हीणकस गोष्ट असा समज करून देणा-या प्रतिक्रिया या कितीही सभ्य भाषेत लिहील्या तरी त्यांना भडक न म्हणणे हे समजण्यापलिकडचे आहे. ती दया पण नाही. स्वातंत्र्य मिळण्या आधी हिंदू , मुस्लीम या शिवायही माणसे राहतात आणि त्यांचा तिसरा पक्ष आहे हे ब्रिटीशांना पटवून देण्यात बाबासाहेबांची हयात गेली. अगदी जाता जाता राज्यघटनेत तिस-या पक्षाची तरतूद असावी या अटीवर स्वातंत्र्य मिळालेले आहे. मुसलमानांनी पाकिस्तान मागितला. दलितांनी आरक्षणाद्वारे सामाजिक न्यायाची अपेक्षा केली.

साधने , नैसर्गिक संपती, बुद्धीजीविका यांचे वाटप कुठल्याही मेरीटवर न होता जातीच्या आधारे झाल्याने त्याच आधारे त्याचे निवारण होणे हा सामाजिक न्याय आहे. हे परक्या लोकांना कळते पण इथे राहणा-या, उच्चशिक्षित लोकांना कळत नसेल ( ते ही वारंवार सांगूनही) तर पुन्हा समजावण्यात अर्थ काय आहे ?

पुणे करार हा बाबासाहेबांनी मिळवलेले हक्क रद्द करण्यासाठीच होता. त्यासाठीच उपोषण होते. त्या वेळी दिलेल्या आश्वासनांप्रमाणे काँग्रेसने बाबासाहेबाआंशी सहकार्य न करता घटनासमितीच्या निवडणुकीत मुंबईतून सर्व विरोधकांना आपल्या बाजूने एकत्रित करत पराभव केला. जे एन मंडल यांनी पश्चिम बंगाल मधून नामशूद्र जातीच्या जोरावर त्यांना निवडून आणले आणि बाबासाहेब घटनासमितीवर गेले. मात्र तो मतदारसंघच काँग्रेसने बांग्लादेशला देऊन टाकला. वास्तविक त्यातल्या दोन जिल्ह्यांत हिंदूंची (नामशूद्र - अस्पृश्य) संख्या मुसलमानांपेक्षा जास्त होती. ५२/४८. त्यामुळे बाबासाहेब तांत्रिक दृष्ट्या पाकिस्तानच्या घटनासमितीचे सदस्य झाले.

यावर बाबासाहेबांनी इंग्लंडला झाला प्रकार कळवला. तिस-या पक्षाचे (अस्पृश्य) प्रतिनिधित्व असल्याशिवाय राज्यघटनेला मान्यता देता येणार नाही आणि स्वातंत्र्याची बोलणी लांबणीवर पडतील असा इशारा मिळाल्याने काँग्रेसला बाबासाहेबांना निवडून आणणे भाग पडले. बॅ. जयकर यांची प्रकृती ढासळल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्या जागेवर बाबासाहेबांना निवडून आणले गेले आणि पश्चिम बंगालमधे केलेल्या अन्यायाच्या परिमार्जन करावे लागले.

बाबासाहेबांना सुरूवातीला फक्त पुणे करार आणि अस्पृश्यांसंबंधी तजवीज आहे कि नाही एव्हढेच पाहण्याची मुभा दिली गेली होती. असो. पुढचे लिहीत नाही.

इथे उच्चशिक्षित मंडळी आहेत. त्यांना शिकवण्यात अर्थ नाही.

पाकिस्तान स्वंतंत्र झाला त्यावेळी शिक्षणसांस्था, नोक-याही घेऊन गेला. त्यामुळे आपला हक्क डावलला जातो असे कुणालाच कसे वाटत नाही ? इथेच राहून वेगळा वाटा काढून दिला तर आमच्यावर अन्याय होतो असे रडगाणे गाणे हे खरे म्हणजे दांभिकपणा आहे. असे आयडी उडतच नाहीत. उलत माज करतात. त्यांना उत्तर देणेही अवघड असते. आयडी उडणे, इग्नोर करणे असे प्रकार चालू राहतात. ज्यांना आयडी टिकवण्यात स्वारस्य आहे ते सडेतोडपणाला मुरड घालतात. याला तरी काय अर्थ आहे ?
फेसबुक मुळे अनेक जण आपले म्हणणे तिकडे विनारोकटोक मांडत असतात. माझे इथले प्रतिसाद इथल्याच एका आयडीने फेसबुक वर कॉपी पेस्ट केले आहेत. अशी माहिती त्यासाठीच असते. मात्र त्यांना इथे समर्थन द्यावेसे वाटले नाही. कदाचित इथल्या वातावरणात त्यांना उघडपणे तसे करणे योग्य वाटले नसेल.
मूठभरांच्या सांस्कृतिक आणि वैचारीक दहशतवादाला मान्यता देऊन निंमूटपणे रहायचे का ? आपण जगभरचा बारीक अभ्यास करतो. देशातला अभ्यास का नाही आपला ?

मराठ्यांचे आरक्षण या बेफिकीर यांनी काढलेल्या धाग्यावर बाकीची सर्व माहिती दिलेली आहे. नेमकी ती वाचनात येत नाही. असे धागे लगेचच ग्रुपसाठी मर्यादीत होत असतात. अशा ठिकाणी आय डी टिकवून राहणे हे महत्वाचे आहे असा समज असणा-यांना शतशः नमन.

नानबा
द्वेष वाढवणारी आणि रजिस्टर्ड नसलेली एक संघटना आहे. तिचे चालक, मालक योगायोगाने एका जातीचे आहेत. या संघटनेने तीन जानेवारीच्या संदर्भात काही पेजेस इंटरनेटवर बनवलेली होती. २ जानेवारी २०१५ ला दिवा जंक्शन मधे लोकल लेट आल्या म्हणून दगडफेक झाली होती. ते व्हिडीओ या मंडळींनी महाराष्ट्र बंद दरम्यान दलितांनी दगडफेक केले म्हणून प्रसारीत केले.

एक जानेवारीला अपुरा बंदोबस्त ठेवला गेला. ३० जानेवारीला परिसरातल्या गावांनी गावबंदी करावी म्हणून एक संघटना प्रयत्न करत होती. त्या त्या गावांनी तसे ठरावे ३० जानेवारीला पोलिसांकडे दिले. शासन, प्रशासन किंवा पोलीस यांनी एक जानेवारीला येणा-यांसाठी इशारे दिले का ? उलट गिरीष बापट यांनी चोख बंदोबस्त ठेवू असे आदल्या दिवशी सांगितले. दर्शनाला येणारे पब्लिक हे कुणी योद्धे नव्हते तर बायकापोरांबरोबर येणारे गरीब लोक होते. त्यांच्यावर आजूबाजूच्या घराच्या गच्चीतून तुफानी दगडफेक झाली. शिक्रापूरला येणा-यांच्या गाड्या जाळल्या. स्तंभाच्या पलिकडे नदी आहे. नदीच्या पलिकडे पार्किंग असते. त्या पर्किंगमधल्या गाड्या जाळल्या आणि हायवे जाम केला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोलिसाम्ची कुमक आली नाही. मुखमंत्री पुण्यातच होते.

राज्यभरातून आलेल्या लोकांन एक दिवस जीव मुठीत धरून काढावा लागला. लहान बाळांचे प्राण वाचवण्यासाठी बायका आडोशाला गेल्या त्यांची चुकामूक झाली. याचा संताप म्हणून तीन जानेवारीला बंद पुकारला. त्याची बदनामी केली.

एक जानेवारीला जे काही झाले त्याचे मोबाईल मधे शूटींग केलेले व्हिडीओ दलितांनी प्रसारीत केले. तेच व्हिडीओ तीन जानेवारीचे आहेत असे इथल्या वहीन्यांनी सुद्धा भासवले. एक जानेवारीला काय झाले यावर चकार शब्द न काढता तीन जानेवारीला काय यावर मौक्तिके झाडली गेली. हे सगळे कुठल्या जातीचे होते हे सांगत नाही. कारण त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून भाग घेतला नाही.

अर्थात यामागे द्वेष नसणारच. एक बाजू अगदी भोळी असणार आणि बाकीच्या वस्ताद असणार. एका गावात गरीब ब्राह्मण रहात होता त्या गावातले दलित अतीश्रीमंत असणार. खरंचच, तुमच्या अशा प्रतिसादाची दखल घेऊ नये... तरीही !! (तुमचा आयडी उडणार नाही ही खात्री )

इथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विषय निघाला आहे म्हणून, त्यांच्यावरील विकिपीडिया page खूपच इंटरेस्टिंग आहे. कित्येक वर्षानी काहीतरी वेगळे वाचलं.

मनुस्मृतीच विकीपेज आणि तिथे सापडलेल, मनु विकीपेज सांगतंय की मनु हे पद(? ) होत आणि चौदा क्षत्रिय राजांना मनू म्हणायचे.

द्वेष वाढवणारी आणि रजिस्टर्ड नसलेली एक संघटना आहे. तिचे चालक, मालक योगायोगाने एका जातीचे आहेत. >> हे काय आहे खरोखरच माहित नाही. प्लीज सांगाल का? इथे नाही तर विपु केलीत त री चालेल.

एका गावात गरीब ब्राह्मण रहात होता त्या गावातले दलित अतीश्रीमंत असणार. >> मी मुर्ख नाही म्हणजे तू आहेस असा अर्थ होतो का वाक्याचा? मी ही मुर्ख नाही आणि तु ही नाहीस ही शक्यता वि चारत घेतलीत का? हे कुठून आले? i guess u r too blind by your opinions to recognize when you see a genuine person.
असो!
जे डिस्क्रिमिनेशन झालं त्याचं समर्थन कुठलाही शहाणा माणूस करणार नाही. पण जे डिस्क्रिमिनेशन मी केलं नाही त्याकरता तुम्ही मला दोषी धरून माझ्या विरुद्ध डिस्क्रिमिनेट करत असाल तर तुम्ही कुठल्या गटाचं प्रतिनिधित्त्व करताय? विचार केलात तर उत्तर सापडू शकेल.

मी संवाद साधून दुसरी बाजू सांगायचा प्रयत्न करत असताना - तुम्ही ऐकूनही घेणार न साल, तर काहीच हो ऊ शकत नाही.
बर, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या:
आमच्या सारख्या पापभी रु, कायद्याला धरून वागणार्‍या, आपल्या कपॅसिटीत समा जोपयोगी कामं करण्याचा प्रयत्न करणार्‍या, सर्वांना स मान आणि सन्मानाने वागवणार्‍या,ह्यात जात आली तसेच आ र्थिक वर्गही, मनात तशीच भावना धरणार्‍या ब्राह्मणांनी अजून काय केल्यावर तुमच्या मनातला द्वेष कमी होईल? सकारात्मक कुठले पाऊल उचलावे ह्यावर वाचायला खरेच आवडेल.
तुम्ही वि ध्वंसक संघटनांबद्दल बो लाल तर त्या सर्व जातीधर्मात दिस तात. त्यावर सामान्य माणूस म्हणून माझा काहीच कन्ट्रोल नाही (विरोधी मत नोंदवणे सोडून)

नानबा, तुला उद्देशून मी माझ्या कुठल्याच पोस्ट मध्ये काही लिहिलं नाहीये तेव्हा तू वैयक्तिक का ओढवून घेतलंस कळलं नाही...
मला बाकी आणखी वाद घालण्यात रस नाही पण जळीत आणि कूळकायदा या प्रसंगातून माझं कुटुंब भरडलं गेलं नाहीये हा अंदाज कसा काय लावलास? मी लिहिलं नाही म्हणून? आपण पश्चिम महाराष्ट्रातले ब्राह्मण अजून जळीत विसरू शकत नाही आणि शतकानुशतके अपमानास्पद जिणे जगलेल्या लोकांनी जुने जाऊद्या मरणालागुनी म्हणत पाटी कोरी करावी अशी अनेकांची अपेक्षा बघितली आहे...

हो, आणि माझं कुटुंब या सगळ्यातून व्यवस्थित भरडलं गेलं आहे, खूप सोसलं आहे. त्याच कुटुंबात मोठं होऊन माझे हे असे विचार झालेत

नानबा, जातिद्वेष करणारे सगळ्या जातींत असतात. खालपासून वरपर्यंत.

<पण जे डिस्क्रिमिनेशन मी केलं नाही त्याकरता तुम्ही मला दोषी धरून माझ्या विरुद्ध डिस्क्रिमिनेट करत असाल तर तुम्ही कुठल्या गटाचं प्रतिनिधित्त्व करताय? >
इथे तुम्ही मी म्हणजे ब्राह्मण असं म्हणताय, असं समजून चालतोय. कारण ब्राह्मणांबद्दल काही लिहिलं गेलं कीच तुम्ही लिहित्या होत्या, असं जाणवलंय.
तर कोणीही ब्राह्मण जातिद्वेष/जातिभेद करत्/मानत नाही, असा तुमचा दावा आहे का?
मी तुमच्या पहिल्या प्रतिसादाच्या मागोमाग एक उत्तर लिहिलंय, त्यात उदाहरणं दिलीत.
(आता मझ्या या वाक्यांचा अर्थ ब्राह्मणद्वेष असा तुम्ही लावूच शकता.)

समाजात एकंदरित जातिद्वेष वाढतोय, हे तुम्हांला मान्य असावं. पण फक्त ब्राह्मणांबद्दलच लिहिलं गेलं तरच मी त्याबद्दल बोलेन असा तुमचा पवित्रा आहे का?
अन्य एका धाग्यावर "ज्या गोष्टींबद्दल तुम्ही पोटतिडकीने लिहिताय, त्यांचा तुम्हांला प्रत्यक्ष अनुभव्/त्रास आहे का?" असं तुम्ही विचारलेलं. म्हनजे ज्याने त्याने फक्त आपल्यापुरतंच बोलावं, अशी तुमची भूमिका असू शकते. ही तुमच्यापुरती असेल, तर ठीक. इतरांनीही तसंच वागावं , नाहीतर मी त्यांना लेबल लावणार (त्या धाग्यावर तुम्ही लावलीत) असं आहे का?

तुम्ही केलेल्या आरोपांबद्दल आरारांनी काही विचारलंय. त्याचं उत्तर न देता तुम्ही तेच आरोप पुन्हा करताय. मला त्यांची वकिली करायची गरज(त्यांना आणि मलाही ) नाही आणि करतही नाही. हे धाग्यावर आलंय

हो ब्राह्मण गरीब होते, त्यातले अनेक चांगलेच होते. पण तरीही त्यांना केवळ जन्माने श्रेष्ठत्व होते. त्यांचा कुणी पदोपदी अपमान करत नसे. विद्यार्जन करून वरती जाणे हे परंपरागत मुरलेले असते. ते इतर जातींमध्ये गटांमध्ये नव्हते...
ब्राह्मणांशी तुच्छतेने वागणारे जसे लोक भेटले आहेत त्याच्या कैक पटीने आपुलकीने वागणारेही भेटले आहेत त्यामुळे समजा कुणी वाईट वागलं तर समजून घेऊन दुर्लक्ष करण्यात किंवा शांतपणे तोंडावर बोलून तुमचं बरोबर नाही हे सांगून विषय संपवण्यात कधी अडचण आलेली नाही

तीच तर गंमत आहे वरदा. प्रत्यक्षात असे कुणी भेटत नाही तरी ऑनलाईन इतका विखार दिसतो! हा कुठून ये तो?
आता मराठा आरक्ष णावरू न वाद आहेत, मग ब्राह्मण कुठून आले? त्यांना आरक्षण नाही, मागत नाहियेत (आणि मिळणारही नाहिये :ड).
एकतर माझी राजकारणाची समज कमी पडतेय किं वा समाजातील काही घटकां कडून साप म्हणून दोरीला ब डवणे होत आहे काय?
अ सो, आता तेच तेच मुद्दे होताहेत. सो थांबते.
माझ्या वरच्या प्रश्नाला कुणी उत्तर देईल का? मी/माझ्या सारखी माणसे, सध्या जे करतोय, ते सोडून ही दरी कमी करण्याकरता काय सकारात्मक उपाय करु शकतो?

हे काय आहे खरोखरच माहित नाही. प्लीज सांगाल का? इथे नाही तर विपु केलीत त री चालेल. >>> थोडी फार सामान्य माहिती असलेल्यांशी चर्चा होऊ शकते. अमितव, सिंबा किंवा तुम्हाला मी इथून इग्नोर करणारच होतो. कथेतले दाखले देणा-या आयडीशी काय चर्चा करायची ? पुराणात यापेक्षा दाहक दाखले आहेत. तरी शास्त्रात जात नाही मी. किमान हरीश्चंद्र राजाची गोष्ट वाचा. एका राजाला क्षणात भिकारी कुणी केले हे वाचून त्याप्रमाणे जर लोकांनी आपले समज करून घेतले तुमच्याप्रमाणे तर मग लोकांना का दोष द्यायचा ?

ज्यांनी या प्रतिसादांमुळे इग्नोर केले आहे त्यांचे मनःपूर्वक आभार. वेळ वाचला.

उच्चवर्णिय हा शब्द तथाकथित या शब्दाबरोबर सुद्धा वापरु नये. इथे आलेला दिसला म्हणुन लिहावेसे वाटले.

सिम्बा , काय मिळालं हा धागा काढुन ? तुम्ही स्वतः कुठे दिसेनासे झालात?

भरत, अरारा, हेला .... आरक्षण सध्या योग्य व्यक्तिंना मिळते आहे का की ज्यांना आर्थिक पाठबळ व्यवस्थित आहे त्यांनाच जास्तीतजास्त मिळत आहे? तसे असेल तर काहीतरी चुकतंय. योग्य गरजुंपर्यंत पोचायला हवे.

Pages