मिंट-कोरिअँडर सूप.

Submitted by अश्विनीमामी on 4 September, 2011 - 11:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पुदिन्याची पाने, कोथिंबीर, आले, लसूण पाकळ्या दोन, मीठ, मिरेपूड, अजिनोमोटो एक छोटा चमचा,
गाजर- श्रावण घेवडा बारीक कापून पाव वाटी. कांद्याची पात एक चमचा बारीक कापून. तेल एक चमचा, लिंबूरस/ व्हिनेगार दोन तीन थेंब. एक पेला पाणी. हे दोन वाट्या सूप होइल इतकेच प्रमाण आहे. एका माणसाचे सर्विंग. जितके मेंबर तितके वाढवावे.

क्रमवार पाककृती: 

सर्व भाज्या अगदी ताज्या असाव्यात. जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात लसूण सोनेरी रंगावर परतावे. मग त्यात गाजर- श्रावण घेवड्याचे बारीक तुकडे, कांदा पात व अजिनो मोटो घालून परतावे. पण जळू देऊ नये. खमंग वास सुटला की पाणी घालावे व गॅस मोठा करावा. पाण्याला उकळी फुटेस्तो त्यात आल्याचे बारीक तुकडे, पुदिना, कोथिंबीर घालावी. मीठ मिरेपूड चवी नुसार घालावे.
दोन तीन मिनिटे उकळू द्यावे. मग गॅस कमी करून त्यात लिंबूरस किंवा व्हिनेगार दोन तीन थेंब घालावे. सोया सॉस पण दोन थेंब चांगला लागेल पण त्यात जास्त सोडिअम असते त्यामुळे मी तो जपूनच वापरते.

झालंच की वाटी- चमचा घेउन प्या गरम गरम.

वाढणी/प्रमाण: 
हे एका माणसासाठी दोन बारके सूप बोल एवढे होइल .
अधिक टिपा: 

पावसाळ्यात हपिसातून घरी आल्यावर, सणवाराचे/ पार्टीचे जड जेवण झाले असल्यास नंतरच्या मील टाइम ला जरूर प्यावे. पॅलेट क्लीन्सर म्हणून काम करेल. ह्यात सर्व एलिमेंटस अगदी परफेक्ट बॅलन्स मध्ये हवे. म्हणजे सर्व फ्लेवर्स वैयक्तिक स्वरूपात व एकत्र ब्लेंड सुरेख लागेल.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीपण अजिनोमोटो न घालता करून पाहील. मस्त वाटतंय Happy
थिकनिंग काही घालायचं नाही का यात (कॉर्नफ्लोर स्लरी इ.)? का (काही विशेष कारण)?

श्रावण घेवडा म्हंजे फ्रेंचबीन्स ना? म चालतील मला!!!
गरमागरम सूप हे कंफर्ट फूड आहे .नक्की ट्राय करेन.
Btw क्वचित कधी अजिनोमोटो वापरल्यास अजिबात हानिकारक नाही. उलट ते एक टेस्ट एनहान्सर आहे.

>>Btw क्वचित कधी अजिनोमोटो वापरल्यास अजिबात हानिकारक नाही. उलट ते एक टेस्ट एनहान्सर आहे.
माझ्यासारख्या काही लोकांना अ‍ॅलर्जी असते त्याची. पाचेक वर्ष निदान न झाल्यामुळे कमालीचा त्रास सहन केल्यावर मग एक दिवस एक देवासारखा धावून आलेला डॉक्टर सांगतो की तुम्हाला एमएसजी ची अ‍ॅलर्जी आहे. मग अजिनोमोटोला कायमचं दूर करावं लागतं. थोडंजरी गेलं पोटात तरी त्रास होतो त्याचा. ते टेस्ट एन्हान्सर असल्यामुळेच बाहेर काहीही खाताना (विशेषतः भारतात) सतर्क रहावं लागतं -- कारण कृत्रिमरित्या चव वाढवणार रसायन म्हटल्यावर ते सर्वत्र सढळहस्ताने वापरलं जातं, आणि इथे विचारून खात्री करून वगैरे घेणं ही स्वप्नातली गोष्ट आहे.

श्रावण घेवडा म्हंजे फ्रेंचबीन्स ना? >>> ब्बाब्बोव... इथे झालेला खल आठवत नाय काय वर्सूतै तुला?

Ooohhh. Thanks for the reminder..haha!!

माझ्यासारख्या काही लोकांना अॅलर्जी असते
Oh ok!!!. नोटेड.

अॅलर्जी नसणार्यांनी कधीतरी वापरल्यास
अपायकारक नाही.

वर्षूचे म्हणणे बरोबर आहे. अजिनोमोतो उर्फ MSG हे अपायकारक नाही.
अमा, फक्त अजिनोमोतो वापरताना ते शेवटी घालायचे तरच तो उमामी/सेव्हरी फ्लेवर येतो. रूल ऑफ थंब म्हणजे जेव्हा तुम्ही मीठ घालता तेव्हा घालायचे पण जेवढे मीठ वापरणार असाल त्याच्या २/३ च घालायचे. म्हणजे खारट न होता उमामी मिळते. चायनीजच नाही तर बिर्याणी , भूर्जी, स्क्रॅम्बल्ड एग, घरी केलेले सॅलड ड्रेसिंग मधे पण सुंदर चव येते.

माझ्यासारख्या काही लोकांना अॅलर्जी असते>> तुम्ही टोमॅटो पास्ता, टोमॅटो केचप , पिझ्झा, पार्मेजान चीज, मश्रुम्स खाऊ शकत असाल तर तुम्हाला नकी वेगळी कसली तरी अ‍ॅलर्जी आहे. अजिनोमोतोची अ‍ॅलर्जी असेल तर तुम्ही वरील पदार्थ खाऊ शकणार नाही. आईच्या दुधात पण ग्लुटामेट असते किंबहुना सर्वात जास्त असते. Happy

हे सूप करायचे खूप मनात होते.आज केले,पण बरंच काही विसरले.पण जे झाले ते मस्त लागले. पुदिना+लसूण यांचा स्वाद! धन्यवाद अमा!
फ्लॉवरचे देठ (दांड्या) बारीक कापले. लसूण बारीक कापला.थोड्या तुपावर परतून कोथिंबीरीचे देठ चिरून टाकले.पुदिना टाकला.साध्या मीठाऐवजी काळे मीठ घातले.हे सारे अर्धकच्चे असतानाच सूप प्याले.पुठल्यावेळी कोथिंबीरीचे देठ घालणार नाही.

फ्लॉवरचे देठ (दांड्या) बारीक कापले.>> फ्लॉवरचा स्वतःचा असा एक स्वाद खूप ओव्हर पावरिंग आहे. माइल्ड हलक्या चवीच्या भाज्या बेस्ट फिट होतील. गाजर बीन्स मका दाणे. खरे तर अगदी बाइट साइज्ड चिकन व मशरूम्स पण छान लागेल.

फ्लॉवरचा स्वतःचा असा एक स्वाद खूप ओव्हर पावरिंग आहे. >>>>> नाही लागला.तुरे न घेता देठ घेतले म्हणूनही असेल.तसेही ते कोवळे देठ मुद्दाम राखून ठेवले होते.पुढल्यावेळी गाजर वगैरे घालून करायचा बेत आहे.

पुदिना आणि कोथिंबीर किती घ्यायचे?>> वरील प्रमाणात एक सर्विंग साठी कापलेला पुदिना व कोथिंबी र प्रत्येकी
एक चहाचा चमचा झाले पाहिजे. कोथिंबीर जास्त झाली तर कोरिएंडर मिंट सूप म्हणून प्यायचे.

भगिनिन्नो व बंधुंन्नो, हे बघा घरात काही नसले तर गरम पाणी उकळून लिंबू पिळून प्या. उससे तो कोई हार्म न होवे है. ना उसकी अ‍ॅलर्जी हो सकती है आय होप्प.

Hi see this soup recipe. I have given up ajinomoto 10 years back and have a very low salt/sodium diet.