स्पर्शिका जोशी, scam की सत्य?

Submitted by हेला on 13 July, 2018 - 11:15

मैत्रिणींनो! सावधान!!

"तुम्हाला इंजेक्शनची भीती वाटते का? मी मदत करु शकते" अशा अर्थाची मराठी आंतरजालावर अनेक दिवसांपासून एक छोटेखानी सुचवणी फिरते आहे. त्या चार ओळींच्या लेखात खास महिलांना आवाहन केले जात आहे. केवळ मायबोलीच नव्हे तर मिसळपाव संकेतस्थळावरही हा लेख आला होता. त्यात कोणीतरी डॉक्टर असल्याची बतावणी करुन महिला सदस्यांना जीमेलवर चॅटवर यायला सांगत आहे. एवढेच नव्हे तर कित्येक स्त्री सदस्यांना व्यक्तिगत मेल आयडीवर 'मी तुमचे लेख वाचले, मला खुप् आवडले, आपण चॅट करु शकतो का' अशा अर्थाचे मेल पाठवले आहेत. एकाच व्यक्तीकडून अशा प्रकारचे मेल्स आल्याची दोन्ही संस्थळावरच्या अनेक महिला सदस्यांनी कळवले आहे. हे सर्व मागच्या गेल्या सात ते आठ दिवसांत घडले आहे.

या प्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे असे वाटल्याने मी व माझ्या पत्नीने याचा छडा लावायचे ठरवले. त्यातून आम्ही त्या जीमेल आयडीवर चॅटमधून संपर्क साधला. त्यातून त्या व्यक्तीने आपली ओळख नीटपणे दिली नाही. आम्ही विचारले की नक्की कशाबद्दल आहे हा लेख? तुम्ही काय मदत करता? तर त्यावर ती विचारत होती की तुमचा आधीचा इंजेक्षनचा अनुभव काय आहे, तो सांगा मग मी पुढे सांगते. म्हणजे नीटपणे काही सांगत नव्हती.

त्या व्यक्तीने स्वतः डॉक्टर असल्याचे सांगितले पण क्लिनिकचा पत्ता व मोबाइल नंबर देण्यास टाळाटाळ केली. सदर व्यक्ती "जूहू व ठाणे इथे माझे क्लिनिक आहे व माझा नवराही डॉक्टर आहे, आम्हाला एक दोन वर्षांची मुलगी आहे" अशी बतावणी करते. या व्यक्तीने आम्हाला सर्व डिटेल्स मागितले, जसे तुमचा फोटो द्या, नाव, कुठे जॉब करता, इत्यादी सर्व खोदून चौकशी केली. आम्हाला बघायचेच होते की हे प्रकरण नेमके काय आहे म्हणून आम्ही सर्व सत्य माहिती दिली. परंतु आम्ही जेव्हा साधा क्लिनिकचा पत्ता आणि मोबाईल नंबर मागितला तर आधी पुरेशी ओळख होऊ द्या एकमेकींची, मग पत्ता, फोन देते असे म्हणाली. पण आम्ही विचारले की डॉक्टरला क्लिनिकचा पत्ता द्यायला कशाला ओळख वगैरे लागते, तुम्ही पत्ता द्या, आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष भेटू. तेव्हा ती म्हणाली की "मी विकेंडला क्लिनिकला नसते, उद्या बँगलोरला कॉन्फरन्सला जायचे आहे अशी थातूरमातूर कारणे दिली. शेवटी आम्ही क्लिनिकच्या पत्त्यासाठी अडून बसल्यावर "माझी मुलगी झोपेतून उठली आहे आणि तिला झोपवून परत येते" असे म्हणून ही व्यक्ती जी ऑफलाइन झाली आहे ते गेल्या चार दिवसांपासून परत आलेली नाही. ह्या व्यक्तीने जो स्वतःचा फोटो म्हणून आम्हाला दाखवला, त्या फोटोची फेसबुक प्रोफाईलसुद्धा फेक असल्याचे आढळले आहे.

स्पर्शिका जोशी नावाची कोणीही व्यक्ती गायनॅकॉलॉजिस्ट असल्याचे आढळून आलेले नाही. त्या व्यक्तीने ठाण्यातल्या 'माहेर' क्लिनिक चा पत्ता दिला आहे तर त्या माहेर क्लिनिकशी कोणत्याही स्पर्शिका जोशींचा संबंध नाही आहे.

स्पर्शिका जोशी असे नाव घेऊन कोणी तुम्हाला चॅट वर यायचे आमंत्रण देत असेल तर कृपया सावध रहा. हा काहीतरी खूप मोठा स्कॅम आहे. ज्यात आपल्यासोबत काही चुकीचे घडल्यास कदाचित तुम्ही कोणाला सांगूही शकणार नाही. तेव्हा परत एकदा आवाहन कृपया सावध राहा, कोणत्याही मेल्स ला, चॅट इन्विटेशनला फशी पडू नका.

अ‍ॅडमीन व वेबमास्तरांना विनंती की सदर आयडी मायबोलीवरुन स्त्री आयडींना संपर्क करत आहे त्यामुळे तुमच्या पातळीवर याबाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती.

सदस्यांपैकी कोणी सायबर गुन्हेगारी संदर्भात मदत करु शकत असेल तर कृपया पुढाकार घेऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा असे वाटते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिपीनजी, धागा उडवला म्हणून खरेतर सोडूनच दिले होते. परंतु नंतर अनेकांना पर्सनल मेल आले म्हणून शंका वाटली. आणि हे केवळ इथेच नाही तर इतर ठिकाणीही समजले आहे. फेसबुकवर अनेक स्त्रियांनी याबाबत विचारणा केली होती. एकूण प्रकरण गंभीर वाटले म्हणून छडा लावावा वाटले.

धन्यवाद हेला.

हा ID ब्लॉक केला आहे. धागे आधीच ब्लॉक केले होते.

मलाही असा ईमेल आला आहे, अनुभव मासिकाचा संदर्भ देऊन.
पण असे खूप ईमेल येत असल्याने लक्ष दिले नाही. कधी कधी मी धन्यवाद असा रिप्लाय करते पण यावेळी ते ही केलं नाही कारण अनुभव मधले लेख जुने झालेत मग या आत्ता का ईमेल करतायत असं वाटलं

धन्यवाद हेला आणि admin.

=-=-=

मी त्यांना ऑनलाईन चॅटबद्दल काही dos आणि donts सांगितले आणि वाटेला लावलं. >>>> कल्हई

मलाही ईमेल आला आहे.त्याआधी त्या व्यक्तीची भाषा (धाग्यातील) संशयास्पद वाटल्याने इमेलकडे लक्ष दिले नाही.

हेला, आभार!

धागा उडविला, आयडीही ब्लॉक केला पण हे पुरेसे आहे का? डॉक्टरांनी म्हंटल्याप्रमाणे सहा वर्षांपूर्वीही असा उद्योग झालेला आहे. आता या प्रकरणाची पोलिस कंप्लेंट करावी का? आयपी अ‍ॅड्रेसवरुन युजर कोण ते कळू शकेल.

मलाही आलेली ईमेल.... एकदा नाही तर दोन वेळा... मी पण इग्नोर केलं

एकदा फक्त लेखन आवडतं म्हणुन ईमेल आलेली....एकदा तुमची 'ओळखीचा पाऊस' कविता आवडली म्हणुन ईमेल आलेला
मला गंमत याची वाटली की ती कविता एवढी खास पण नाहीये ती यांना आवडली Proud

या मेल्स फक्त फिमेल्सनाच येत आहेत का? मी तर वाट पाहात आहे या बाइंच्या मेलची. कदाचित साधूंना येत नसाव्यात मेल्स.

हे तर भारिय।।।लोकं काय काय करतील काही नेम नाही।।।
पण त्यांच्यामुळे आता कोणाला मी लेख खूप छान होता ।।आवडला असं सांगितलं तर उगाच लेखकाला वाटायचं स्पर्शिका जोशींचा डॉक्टर नवऱ्यानेच मेल केला की काय??

मला पण दोन वेळा इमेल आला आहे. पण अगदी पहिल्यांदा आला तेव्हाच मला संशय आला त्यामुळे मी तो सरळ इग्नोर केला. आणि रिप्लाय वगैरे पण नाही दिला. असे संपर्कातून मायबोली वर अनेक मैत्रिणी मिळाल्यात (जीवाभावाच्या) पण या बाईंचा मेल वाचून चक्क वास आला काहीतरी. त्यामुळे उत्तर दिलंच नाही.
एकदा आमच्या माबोच्या whatsapp ग्रुप वर कवीन ने उल्लेख केला तेव्हा मी सांगितलं की मलाही आलाय इमेल.
मग अनेक जणांना/जणीना आल्याचं समजलं. पण तुमच्या लेखामुळे समजलं की हे प्रकरण काही साधं नाही.

मला पर्सनली वाटतय की उगीचच लक्ष वेधून घेण्याचा प्रकार आहे हा.
As we all know ignorance is bliss.

इतक्या महिला सदस्यांना मेल्स येत होते तर कोणीही मुद्दाम 'हो, मला इंजेक्शनची भीती वाटते' असे सांगून fake inquiry केली नाही का?

मला तर मजा येते अशी fake inquiry करून त्या मार्केटिंगवाल्यांची टर उडवायला! (खास करून DND registered number वर मार्केटिंग करणारे)
१. मला एकदा एक कॉल आला होता. "मै xxx finance से बोल रहा हू| क्या आपको लोन चाहिये???" मी त्याला म्हटले, "हा, मुझे कमसेकम १० करोड का लोन चाहिये, लेकीन लोन मिलने के बाद मै विजय मल्ल्या, नीरव मोदी की तरह भाग जाऊंगा! चलेगा ना?" त्याने फोन कट केला, पुन्हा परत कधीच नाही केला! (वोही भाग गया!!! Proud Proud Proud )
२. दिल्लीस्थित काही बोगस औषध कंपन्यांचे जाहिरातींचे मेसेज येत असतात, वजन कमी करणाऱ्या औषधांबाबत. त्यांना सांगण्यासाठी माझा एक काल्पनिक चुलतभाऊ आहे, जो आत्ताच दहावी पास होऊन अकरावीत गेला आहे, ज्याचं वजन ९५-१०० किलो आहे!!!

गम्मतच आहे. हे स्कॅम आहे हे पहिल्या धाग्यातच लक्षात आलेलं. पण 'इंजेक्शनची भिती' वरुन गिर्‍हाईकं खेचणे हे किती पुचाट आणि गरीब आहे!
कॉन आर्टिस्ट मध्ये इंजेक्शनची भिती घालावं लागेल वाटलं न्हवतं. Biggrin

व्हाई शूल्ड गर्ल्स हॅव ऑल द फन
मुलांना का नाही येत हे मेल Happy

जोक्स द अपार्ट,
धागा काढलात हे छान केलेत हेला.

हा निव्वळ मार्केटींगचा प्रकार नक्कीच नाही.

कारण ओळख लपवली जात आहे.
नक्कीच धोका दगाफटकाच करण्याचा हेतू असणार

इतक्या महिला सदस्यांना मेल्स येत होते तर कोणीही मुद्दाम 'हो, मला इंजेक्शनची भीती वाटते' असे सांगून fake inquiry केली नाही का?>>>> नसते लचांड मागे लागू नये म्हणून.

Unknown emails, msgs, phone calls यांना प्रतिसाद देणे कधीही धोक्याचेच असते. Ignore करण्याचा हक्क आहेच की आपल्याकडे. ऊगीच daring दाखवायला जाणे म्हंजे विषाची परीक्षा घेतल्यासारखेच आहे. समोर कोण बसलंय, त्याच्या मनात नक्की चांगलं आहे की वाईट हे माहितीच नसताना दुर्लक्ष केलेलं बरं.
हेमावैम.

मी चिन्मयी सहमत आहे. मार्केटींग करणारयांना पिडणे वेगळे झाले. ते करायला मजा येते. पण समोरच्याचा हेतू माहीत नसताना आणि संशयास्पद असताना सावध राहणे आणि ईतरांना सावध करणे हेच योग्य.

ऊगीच daring दाखवायला जाणे म्हंजे विषाची परीक्षा घेतल्यासारखेच आहे. समोर कोण बसलंय, त्याच्या मनात नक्की चांगलं आहे की वाईट हे माहितीच नसताना दुर्लक्ष केलेलं बरं.
हेमावैम.>>>>>>> +111111111111111111

हा आयडी इथे दिसतोय.

https://www.maayboli.com/user/68624

सदस्य झाल्यापासूनचा कालावधी
1 आठवडा 2 दिवस

असं दिसतंय.

https://www.maayboli.com/user/68624/followers

यांच्या चाहत्यांमध्ये निल्सन हा एक आयडी दिसतोय.

https://www.maayboli.com/user/54717

आणि निल्सन यांचा सदस्य झाल्यापासूनचा कालावधी
4 वर्ष 9 months दिसतोय.

स्वतः स्पर्शिका मात्र निल्सन यांच्या चाहत्यांच्या यादीत नाहीत. कदाचित निल्सन त्यांना व्यक्तिशः ओळखत असतील.>>>>> अरे बापरे. मी नाही ओळखत या बाईंना. ते चाहते वैगरे चुकून झालं असेल. आतापर्यंत मी ऋन्मेष, बेफि आणि स्वप्नाराज यांची चाहती झाली आहे तेसुद्धा त्यांच्या लिखाणामुळे.
मला हा धागा उघडायला उशिर झाला, जोशीबाईंना आधीच नारळ मिळालाय त्यामुळे त्यांची डिटेल मी बघू शकत नाहीये तसेही ते चुकूनच झालेले होते कारण बाईंनी असे काय लिखाण केलेले की मी चाहतेमधे सामिल होईल? त्या इंजेक्शनच्या धाग्यावर गेलेली पण मुळात मला इंजेक्शनची भिती वाटत नाही त्यामुळे मी तो फॉलो नाही केला.
मी इथे कोणालाही व्यक्तिशः ओळखत नाही.

आता पाहिले बाईंनी इथे बर्याचजणींना तो मेसेज केला आहे पण मला नाही आला. संशयाची सुई अजूनही माझ्यावर राहू शकते Wink

Lol

निल्सन मला नाही वाटत तू असशील. मी व्यक्तिश: तुला ओळखत नसले तरी, तुझ्या पोस्टस वाचत असते. त्यावरून म्हणतेय, एक अंदाज माझा.

अमानवीय धाग्यावरील किस्से वाचून हा धागा वाचला. फार भयंकर वाटले Uhoh Uhoh (कोण असेल हे? एखाद्या उडवलेल्या आयडीचा आत्मा तर नसेल? वगैरे विचार मनात आले. असो)

>> यांच्या चाहत्यांमध्ये निल्सन हा एक आयडी दिसतोय.
>>>>> अरे बापरे. मी नाही ओळखत या बाईंना. ते चाहते वैगरे चुकून झालं असेल.

एक क्लिक पडली कि चाहते होतो आपण. कन्फर्मेशन नाही काही नाही. त्यामुळे मोबाईलवर स्क्रोल करताना चुकून चाहते कधी झालो कळतही नाही. अशा प्रोव्हिजनमुळे फेसबुकवर अनेकदा गैरसमज झाल्याचे पाहिले आहे. एखाद्या फ्रेंडला एखादी बातमी आवडली असे नोटिफिकेशन सगळ्यांना जाते. ती बातमी भलतीच असते आणि त्या फ्रेंडला मात्र पत्ताच नसतो.

डॉ आरारा, खऱ्या डॉ स्पर्शिका जोशी तुमच्या संपर्कात असल्यास त्यांना या प्रकरणाची माहीती देऊन ठेवता येईल का?

इंजेक्शनची भीती वाटत असल्यास लावायचे औषध आधीच अस्तित्वात आहे ना? इथली एक मैत्रीण तिच्या मुलीला इंजेक्शन घेण्यापूर्वी एक मलम लावताना बघितले आहे.

मला पण आलेय मेल.
इंजेक्शन ची भीती वगैरे अगदीच अनझेपेबल वाटल्याने, आणि माझ्या सर्व भीती(रोलर कोस्टर,पॅरा सिलिंग इ.) मी अशी ऑनलाइन कौंसेलिंग वर कोणी न काढू शकणारे हट्टी खोड असल्याने संपर्क अर्थातच वाढवला नाही.
स्पर्शिका बाईच्या पहिल्या लेखात ज्यांना फिशी कंटेंट दिसला अश्याचे आभार.मला तो लेख फक्त 'हे काय, इतक्या लोकांना इंजेक्शन ची भीती वाटते का, कमाल आहे' असा वाटला होता, हे मैत्रिणी टारगेट करून संपर्क वगैरे डोक्यात आलंच नाही.
खरा धोका हा आहे की पुढेमागे हे आयडी इंजेक्शन ऐवजी एखादी खरोखरची गंभीर भीती आवाहनात वापरून बायकांना हँग आउट वर बोलावेल.
आता परत मेसेज वाचला तर कळले की माझे कँसर बद्दल च्या लिखाणाबद्दल कौतुक केलेय ☺️☺️.घाईत गल्ल्या बर्याच चुकतायत

निल्सन,
मलापण काही तो मेसेज आलेला नाही. अजूनही बर्याचजणी असतील आपल्यासारख्या त्यामुळे

< संशयाची सुई अजूनही माझ्यावर राहू शकते Wink >
>> याबद्दल नो वरीज Happy

मलाही नाही आलाय असा काही मेल, कदाचित जे आयडीनाव स्पष्ट स्त्री आयडी म्हणून ओळखले जातात त्यांना मेल केले असावे. (तसेही मी व्यक्तिगत संपर्क पर्याय बंद केलाय, माबोवरच्या काही कटू अनुभवानंतर, असो)

पण हे सगळे करण्यामागे त्यांचा उद्देश नक्की काय असावा, हा मुख्य प्रश्न आहे, स्त्रियांची माहिती घेऊन त्या माहितीचा गैरवापर केला जाणारे की अजून काही, हे कळणे जास्त गरजेचे वाटतेय. एडमीन ने आयडी ब्लॉक करून धागा उडविला हे चांगले केले पण सोबत सायबर क्राईम सेल ला रिपोर्ट करावे असे वाटते, जेणेकरून पुढे तपास होईल.

थोडेसे अवांतर>> फ्रॉड कॉल अन मार्केटिंग मधे फरक आहे,
मध्यंतरी मला एक फोन आलेला, मी अमुक बँकेतून बोलतोय, तुमचे क्रेडिट कार्ड अपग्रेड करायचेय, त्यासाठी अमुक अमुक माहिती हवीय, मग तुम्हाला एक OTP येईल तो तुम्ही आम्हाला द्या,
मला खूप गंमत वाटली म्हणून इतके सगळे ऐकून घेतले, कारण ज्या बँकेचे नाव त्यांनी घेतले, त्याच बँकेत मी काम करतेय, म्हटले बाई तुझा एम्प्लॉयी आयडी दे, बघूतर कितपत पोच आहे यांची, तर तिने दुसऱ्या माणसाला दिला फोन. त्याने बरोबर अगदी खरा वाटेल असा आयडी नंबर दिला, मी त्याला म्हटले की एक मिनिट थांब मी सिस्टीम मध्ये चेक करते, तर लगेच समोरून फोन कट.
सिस्टीम मध्ये जेव्हा चेक केला तर कळले की एका सोडून गेलेल्या एम्प्लॉयी चा आयडी होता. मी लगेच याबद्दल फ्रॉड मॅनेजमेंट टीमला कळविले, तर तिथून कळले की आपल्या एम्प्लॉयी आयडी पॅटर्न लक्षात घेऊन हे लोक असेच रँडम नंबर सांगतात, एखादा तरी विश्वास ठेवून अडकतोच यात Angry

Pages