स्पर्शिका जोशी, scam की सत्य?

Submitted by हेला on 13 July, 2018 - 11:15

मैत्रिणींनो! सावधान!!

"तुम्हाला इंजेक्शनची भीती वाटते का? मी मदत करु शकते" अशा अर्थाची मराठी आंतरजालावर अनेक दिवसांपासून एक छोटेखानी सुचवणी फिरते आहे. त्या चार ओळींच्या लेखात खास महिलांना आवाहन केले जात आहे. केवळ मायबोलीच नव्हे तर मिसळपाव संकेतस्थळावरही हा लेख आला होता. त्यात कोणीतरी डॉक्टर असल्याची बतावणी करुन महिला सदस्यांना जीमेलवर चॅटवर यायला सांगत आहे. एवढेच नव्हे तर कित्येक स्त्री सदस्यांना व्यक्तिगत मेल आयडीवर 'मी तुमचे लेख वाचले, मला खुप् आवडले, आपण चॅट करु शकतो का' अशा अर्थाचे मेल पाठवले आहेत. एकाच व्यक्तीकडून अशा प्रकारचे मेल्स आल्याची दोन्ही संस्थळावरच्या अनेक महिला सदस्यांनी कळवले आहे. हे सर्व मागच्या गेल्या सात ते आठ दिवसांत घडले आहे.

या प्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे असे वाटल्याने मी व माझ्या पत्नीने याचा छडा लावायचे ठरवले. त्यातून आम्ही त्या जीमेल आयडीवर चॅटमधून संपर्क साधला. त्यातून त्या व्यक्तीने आपली ओळख नीटपणे दिली नाही. आम्ही विचारले की नक्की कशाबद्दल आहे हा लेख? तुम्ही काय मदत करता? तर त्यावर ती विचारत होती की तुमचा आधीचा इंजेक्षनचा अनुभव काय आहे, तो सांगा मग मी पुढे सांगते. म्हणजे नीटपणे काही सांगत नव्हती.

त्या व्यक्तीने स्वतः डॉक्टर असल्याचे सांगितले पण क्लिनिकचा पत्ता व मोबाइल नंबर देण्यास टाळाटाळ केली. सदर व्यक्ती "जूहू व ठाणे इथे माझे क्लिनिक आहे व माझा नवराही डॉक्टर आहे, आम्हाला एक दोन वर्षांची मुलगी आहे" अशी बतावणी करते. या व्यक्तीने आम्हाला सर्व डिटेल्स मागितले, जसे तुमचा फोटो द्या, नाव, कुठे जॉब करता, इत्यादी सर्व खोदून चौकशी केली. आम्हाला बघायचेच होते की हे प्रकरण नेमके काय आहे म्हणून आम्ही सर्व सत्य माहिती दिली. परंतु आम्ही जेव्हा साधा क्लिनिकचा पत्ता आणि मोबाईल नंबर मागितला तर आधी पुरेशी ओळख होऊ द्या एकमेकींची, मग पत्ता, फोन देते असे म्हणाली. पण आम्ही विचारले की डॉक्टरला क्लिनिकचा पत्ता द्यायला कशाला ओळख वगैरे लागते, तुम्ही पत्ता द्या, आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष भेटू. तेव्हा ती म्हणाली की "मी विकेंडला क्लिनिकला नसते, उद्या बँगलोरला कॉन्फरन्सला जायचे आहे अशी थातूरमातूर कारणे दिली. शेवटी आम्ही क्लिनिकच्या पत्त्यासाठी अडून बसल्यावर "माझी मुलगी झोपेतून उठली आहे आणि तिला झोपवून परत येते" असे म्हणून ही व्यक्ती जी ऑफलाइन झाली आहे ते गेल्या चार दिवसांपासून परत आलेली नाही. ह्या व्यक्तीने जो स्वतःचा फोटो म्हणून आम्हाला दाखवला, त्या फोटोची फेसबुक प्रोफाईलसुद्धा फेक असल्याचे आढळले आहे.

स्पर्शिका जोशी नावाची कोणीही व्यक्ती गायनॅकॉलॉजिस्ट असल्याचे आढळून आलेले नाही. त्या व्यक्तीने ठाण्यातल्या 'माहेर' क्लिनिक चा पत्ता दिला आहे तर त्या माहेर क्लिनिकशी कोणत्याही स्पर्शिका जोशींचा संबंध नाही आहे.

स्पर्शिका जोशी असे नाव घेऊन कोणी तुम्हाला चॅट वर यायचे आमंत्रण देत असेल तर कृपया सावध रहा. हा काहीतरी खूप मोठा स्कॅम आहे. ज्यात आपल्यासोबत काही चुकीचे घडल्यास कदाचित तुम्ही कोणाला सांगूही शकणार नाही. तेव्हा परत एकदा आवाहन कृपया सावध राहा, कोणत्याही मेल्स ला, चॅट इन्विटेशनला फशी पडू नका.

अ‍ॅडमीन व वेबमास्तरांना विनंती की सदर आयडी मायबोलीवरुन स्त्री आयडींना संपर्क करत आहे त्यामुळे तुमच्या पातळीवर याबाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती.

सदस्यांपैकी कोणी सायबर गुन्हेगारी संदर्भात मदत करु शकत असेल तर कृपया पुढाकार घेऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा असे वाटते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथलं वाचून मी देखिल इमेलला रिप्लाय दिला :

Jul 7, 2018, 10:57 PM (10 days ago)
नमस्कार मिरा ताई, छान लिहिता तुम्ही. मायबोली
वरचे तुमचे लेखन वाचले. (कँसर बद्दल ). तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल मला. मी डॉक्टर स्पर्शिका जोशी. मी मुंबई ला असते. मला तुम्ही hangout वर sparshika@gmail.com इथे संपर्क करू शकता. म्हणजे आपण बोलू. धन्यवाद , डॉक्टर स्पर्शिका जोशी.
M.D. D.G.O. स्त्री रोग तज्ज्ञ मुंबई

Mon, Jul 16, 7:08 PM (6 hours ago), Meera TamhaneAgrawal to sparshika
hello, sure. How did you get my email by the way?

Sparshika Joshi, Jul 16, 2018, 7:12 PM (6 hours ago)
me maayboli war sampark option la select kele fakt.

Meera TamhaneAgrawal, Jul 16, 2018, 7:18 PM (6 hours ago)
ok.

Meera TamhaneAgrawal, Jul 16, 2018, 7:18 PM (6 hours ago)
tumhi doctor aahat ka? kasalya doctor aahat?

Sparshika Joshi, Jul 16, 2018, 7:28 PM (5 hours ago)
हो मी डॉक्टर आहे. MD DGO. माझे मुंबई ला क्लिनिक आहेत. तुम्ही काय काम करता? तुमचे वय काय?

Meera TamhaneAgrawal, Jul 16, 2018, 7:39 PM (5 hours ago)
DGO म्हणजे? मुंबईत कुठे असता आपण? आपण गायनॅक आहात का? मला एक स्त्री गायनॅक डाॅक्टर हवी आहे.

Sparshika Joshi, Jul 16, 2018, 7:45 PM (5 hours ago)
DGO - Post Graduate Diploma in Gynecology and Obstetrics (DGO) माझे ठाणे आणि बांद्रा ला क्लिनिक आहेत. हो मी gynec आहे. तुमचे वय काय आणि काय काम करता? मी माझ्या टीम बरोबर रिसर्च पण करते.

Meera TamhaneAgrawal, Jul 16, 2018, 7:48 PM (5 hours ago)
अच्छा. वांद्रयाला कुठे आहे क्लिनिक? अपाॅइंटमेंट कशी घ्यायची? कधी येता येईल मला. जरा अर्जंट आहे.

Sparshika Joshi, Jul 16, 2018, 7:52 PM (5 hours ago)
तुम्ही GMAIL chat वर बोलू शकता का? मग ठरवू. मी सध्या भारताबाहेर आहे सेमिनार साठी. मुंबई ला आले कि कळवेन

Meera TamhaneAgrawal, Jul 16, 2018, 7:57 PM (5 hours ago), to Sparshika
चालेल तुम्ही मुंबईत परत आल्यावर मला सांगा. तोवर तुमच्या क्लिनिकचा नंबर द्या ना. मी अपाॅइंटमेंट घेऊन ठेवून तिथे. माझ्या एक दोन मैत्रीणींना देखिल हवीये एक चांगली गायनॅक.

Sparshika Joshi, Jul 16, 2018, 8:00 PM (5 hours ago)
सध्या मी नसल्यामुळे अपॉइंटमेंट बंद आहेत. आपण gmail वर chat कराल का?

Meera TamhaneAgrawal, Jul 16, 2018, 8:04 PM (5 hours ago)
मला प्रत्यक्ष भेटूनच माझा प्रॉब्लेम सांगता येईल. आपण भारताबाहेर म्हणजे कुठे गेला आहात? कधी परत येणार?

Meera TamhaneAgrawal, Jul 16, 2018, 8:06 PM (5 hours ago)
तुमच्या ओळखीची दुसरी कोणी गायनॅक आहे का? मला लवकरात लवकर डाॅक्टरकडे जायला हवंय.

Sparshika Joshi, Jul 16, 2018, 8:07 PM (5 hours ago)
मी ऑस्ट्रेलिया ला गेले आहे. 25 दिवसांनी येईन. तुमच्या मैत्रिणींना माझा ई-मेल देऊ शकता. मी मेल वर सल्ला देईन जमले तर म्हणजे निदान त्यांना काय बोलायचे आहे ते समजेल.

Meera TamhaneAgrawal, Jul 16, 2018, 8:11 PM (5 hours ago)
तुमचे मिस्टरपण गायनॅक आहेत का? ते काय करतात? त्यांचं नाव काय?

Sparshika Joshi, Jul 16, 2018, 8:14 PM (5 hours ago)
ते सर्जन आहेत. तुम्ही काय काम करता? तुमचे वय?

Meera TamhaneAgrawal, Jul 16, 2018, 8:20 PM (5 hours ago)
अरे वा. ते कशातले सर्जनशील आहेत? पण इतके 25 दिवस सेमिनार कसा काय? विषय काय आहे सेमिनारचा? वक्ते कोणकोण डाॅक्टर्स आहेत? साॅरी हा, पण डाॅक्टरांचे पण सेमिनार असतात हे ऐकून गंमत वाटली. मला वाटायचं फक्त प्रोफेसर लोकं सेमिनार अटेंड करतात. LOL! विषय काय आहे ते ऐकायला आवडेल. तुम्हीपण बोलणार आहात का?

Sparshika Joshi, Jul 16, 2018, 8:24 PM (4 hours ago)
खूप प्रश्न विचारता तुम्ही. आमची स्टडी टूर आहे ही. माझ्या रिसर्च ची पण माहिती देणार आहे मी. नुकताच यशस्वीपणे पूर्ण झालाय. माझे मिस्टर cardio vascular surgeon आहे

Meera TamhaneAgrawal, Jul 16, 2018, 8:27 PM (4 hours ago)
चॅट म्हणजे? Whatsapp वर?

Sparshika Joshi, Jul 16, 2018, 8:28 PM (4 hours ago)
नाही . Gmail किंवा hangout वर.

Meera TamhaneAgrawal, Jul 16, 2018, 8:28 PM (4 hours ago)
लकी आहात तुम्ही डाॅक्टर. 25 दिवस ऑस्ट्रेलियात. मस्त मजा करा. तुम्ही परत आल्यावर बोलू. आता तुम्ही बिझी असाल. बाय.

Sparshika Joshi
Jul 16, 2018, 8:30 PM (4 hours ago)
माझ्या रिसर्च बद्दल सांगू का?

Meera TamhaneAgrawal, Jul 16, 2018, 8:31 PM (4 hours ago)
ते जीमेल वगैरे मी कधी वापरलं नाहीये. मला काही त्यातलं कळत नाही. तुम्ही परत आलात की आपण भेटू आणि बोलू. आत्ता जास्त त्रास देत नाही तुम्हाला. उगाच तुमच्या टूर मधे माझी टूरटूर नको. बाय डाॅक्टर. टेक केअर.

Sparshika Joshi, Jul 16, 2018, 8:47 PM (4 hours ago)
तुमचे वय काय आणि काय काम करता? मला वाटले तुम्हाला माझ्या रिसर्च बद्दल ऐकायला आवडेल.

Meera TamhaneAgrawal, Jul 16, 2018, 8:53 PM (4 hours ago)
प्रत्यक्षात भेटू तेव्हा बोलूच. ऑस्ट्रेलियात आज कोणती तारीख आहे आणि किती वाजले आहेत?

Sparshika Joshi, Jul 16, 2018, 8:56 PM (4 hours ago)
17 July ani 1:24 AM.

Meera TamhaneAgrawal, Jul 16, 2018, 8:58 PM (4 hours ago)
अरे वा. नवा दिवस सुरू देखिल झाला तिथे. भारतात अजून 16 जुलै आहे आणि आता 9 वाजतायत.

Sparshika Joshi, Jul 16, 2018, 8:59 PM (4 hours ago)
तुमचे वय काय आणि काय काम करता?

Meera TamhaneAgrawal, Jul 16, 2018, 9:05 PM (4 hours ago) to Sparshika
तुम्ही सारखं वय का विचारताय डाॅक्टर? असं कोणाला डायरेक्ट वय विचारत नाहीत. तुमचं क्लिनिक कुठे आहे वांद्रयला? लीलावती जवळ का? मला साधारण माहीत आहे तो एरीया.

यानंतर ऑस्ट्रेलियात खूपच रात्र झाल्याने 'स्पर्शिकाताई' झोपायला गेल्या असणार.

कोणीतरी पर्व्हर्ट आहे. मागच्या पानावर श्वेता व्यासनं चॅट दिलीये त्यानुसार इंजेक्शनच्या निमित्ताने चावट बोलायची संधी घेतो हा माणूस. त्यातून स्त्रीचा चेहरा दिसत असेल तर अधिकच चेकाळत असणार. वय आणि नक्की काय काम करतात यावरून पुढे संवाद सुरू ठेवायचा की नाही हे ठरवत असणार. कमी शिकलेल्या आणि कमी वयाच्या स्त्रिया योग्य वाटत असतील.

माझ्या मैत्रीणींना काय प्रॉब्लेम आहे ते फोनवरून समजून घेणार म्हणे पण मी इतकेवेळा सांगतेय तर मला काही माझा प्रॉब्लेम एकदाही विचारला नाही.

वय आणि काय काम करता ह्यावर जोर आहे डॉक्टर बाईंचा. Lol फेबु, ट्वीटर, यु ट्युब वर आहेत. जरा जपुनच बोला.
ह्या नावाची खरच कोणी डॉक्टर असली तरी ती ही नाहीये. नक्कीच.

मदतपुस्तिकेतलं हे पान वाचलंय का?
https://www.maayboli.com/node/2669

विशेषत: हा भागः
[तुमचा ईमेल पत्ता तुम्ही स्वतः इतरांना संपर्क केल्याशिवाय, अथवा संपर्कातून आलेल्या ईमेलला उत्तर दिल्याशिवाय इतरांना कळणार नाही]

सायबर सेलच्या इथे मिळालेल्या दोन ID ना हे संभाषण कळवलंय, पैकी punepolice@vsnl.com हा
Address not found आलंय, पण crimecomp.pune@nic.in ला मेल गेलीये, धन्यवाद माबोकर

वय आणि काय काम करता ह्यावर जोर आहे डॉक्टर बाईंचा.>>>
वय २६ आणि काम पुणे सायबर सेल सांगुन पहा कोणीतरी Wink

मला एक प्रश्न पडलाय, ह्या स्पर्शिका कि कोण, त्या / तो हा धागा वाचत असेल का. कारण माबोवर ढिगाने ड्यु आयडी आहेत, हे प्रत्येकाला माहित आहे. मग कशावरुन त्यांनी ड्यु आय काढला नसेल.

म्हणजे, ईथेही लिहीताना जरा सावध रहा, ईतकेच

अन शक्यतो नका घेवु विषाची परिक्षा, त्यापेक्षा सरळ सायबर सेलला कळवा, वैयेक्तीक चॅट करण्यापेक्षा ते बरे, कारण जसे अ‍ॅडमिनने सांगीतले, जोवर तुम्ही त्यांना रिस्पॉन्ड करत नाही, तुमचा ई-मेल आयडी त्यांना कळणार नाही.

फारच विकृत कोणीतरी व्यक्ती दिसते आहे की ही स्पर्शिका जोशी.. ज्या स्त्री सदस्यांनी त्या व्यक्तीचे दात घश्यात घालण्याचे प्रयत्न केले त्यांचे अभिनंदन..

@अ‍ॅडमिन
[तुमचा ईमेल पत्ता तुम्ही स्वतः इतरांना संपर्क केल्याशिवाय, अथवा संपर्कातून आलेल्या ईमेलला उत्तर दिल्याशिवाय इतरांना कळणार नाही]

हे फिचर माहिती आहे, पण मग असे असताना ह्या व्यक्तीला सदस्यांचे मेल अ‍ॅड्रेस कुठून मिळाले?

समजा मला एखाद्या माबो आयडीला संपर्क करायचा आहे तर मी संपर्क सुविधा वापरुनच करणार ना?( हा आयडी ओळखीचा नाही). त्या व्यक्तीचा जो इमेल आयडी संपर्क सुविधेशी किंवा मायबोली अकाऊंटशी लिंक केला असेल त्यावर ती इमेल जाणार.

अर्र.. म्हणजे प्रत्येक आयडीच्या माहिती मधे जाऊन तो आयडी काय जेंडरचा आहे ते चेक करुन मग त्यानुसार संपर्क मधे जाऊन मेल केली असणार.. फारच रिकामटेकडी व्यक्ती दिसते आहे की...

- एक तर ती व्यक्ती पुरूष असेल आणि सगळं खोटं असेल
- ती व्यक्ती पुरूष असेल तर इंजेक्शनवर तिच्याकडे काहीतरी इलाज असावा.
- ती व्यक्ती स्त्री असेल तर ती डॉक्टर नसावी आणि काही तरी वेगळ्या जाळ्यात ओढत असावी
- ती व्यक्ती स्त्री असेल आणि तिच्याकडे इलाज असावा पण तिचे नाव वेगळे असावे किंवा ती डॉक्टर नसावी

अशा आणखी एक दोन शक्यता लिहीता येतील पण..

इंजेक्शनची भीती एव्हढेच एक कारण तब्बल १४ वर्षे घेऊन कुणी व्यक्ती विकृत आनंद घेऊ पाहत असेल हे झेपत नाहीये. या व्यक्तीला वेगवेगळी कारणे नाहीत का सापडत ? कि तिची बुद्धीच तेव्हढी आहे ?

चौदा वर्षात खूप मोठ्या स्कॅमची बातमी कशी कुठे नाही आलेली हा एक प्रश्न आहे.

Mala pn ala hota mail. Thank god me ignore kel. Pan ata tyana apla mail id kalato ka? Karan jari ithun block kel tari mail id asel tar tya contact karaycha prayatna karu shaktil.

जोवर आपण संपर्क मधून आलेल्या मेल ला रिप्लाय करत नाही तोवर मेल आयडी कोणालाही उघड होत नाही.
बाकी फिमेल जेंडर ला पत्र पाठवणे हे स्कॅनिंग स्क्रिप्ट ने केलेले असू शकेल.
या बाईंना इतर जंक मेल प्रमाणेच वागवून इग्नोर मारावे असे वाटते.
आपल्याला नायजेरियन उद्योगपती ने मरून 2 लक्ष डॉलर आपल्या नावे आपण बँक डिटेल आणि ओटीपी दिला की करण्याची आणि आपण एक मेल वाचून श्रीमंत होण्याची सवय आहे.ओरिजिनल रोलेक्स घड्याळं 1000 रुपयात देणाऱ्या मेल्स ची सवय आहे.आपण बाई असून 'बायकोला रात्री चकीत करा' वाल्या मेल्स वाचण्याची सवय आहे.त्यातलेच हे एक.त्यामुळे सायबर सिक्युरिटी मधल्या जनरीक गाईडलाइन्स इथे वापरून चालू शकेल.

नायजेरियन फ्रॉड हा फ्रॉड असू शकतो ही धोक्याची घंटा मनात किणकिणत असतानाही एका मेलला रिप्लाय दिला होता. मला त्यानंतर खूप दिवस फोन यायचे. एक दोनदा रिप्लाय पण दिला. युरोपियन अ‍ॅक्सेण्ट मधे दरडावून बोलायचे. मग तो नंबर बंद करून टाकला. रक्कमच एव्हढी मोठी होती कि नेमकं काय आहे पाहू, हा नसणार फ्रॉड अशी आशा होती.

हाच मेल मलाही आला आणि मायबोलीवरच्या पहिल्याच भोपळ्याच्या पाककृतीला एका एमडी डिजिओ डॅाक्टर बाईंचा कौतुकाचा मेल आला म्हणून सर्वांना फोनवरून सांगितले.
"वाटवाटसप/फेसबुकपेक्शा मायबोलीसारख्या संस्थळावर लेखन केल्यास जगाच्या कानाकोपऱ्यात आपण पोहोचू शकतो" हे ताबडतोब पटले होते.

यावरुन आठवले.
ब्लॉगवर लिहीलेल्या शिर्‍याचा बायकोशोध लेखाला जीएसटी काऊन्सिल चे 'व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह आर्टिकल अबाऊट जी एस टी' वगैरे प्रतिसाद आले आहेत Happy रोबो ने लेखात काही कॉमर्स शब्द ओळखले असावे.

असच मेल मलाही आला होता. अगदी हाच मजकूर. त्यांनी आपण जुहूला राहतो आणि वांद्रे व ठाणे येथे प्रक्टिस करतो असे लिहिले होते. व आपण pain less injection वर संशोधन केले आहे व आता ( मेल पाठवला त्यावेळी ) आपण ऑस्ट्रेलियात याच संशोधनाबाबत एका सेमिनारला आलो आहोत असे एका मेल मध्ये लिहिले होते.

ब्लॉगवर लिहीलेल्या शिर्‍याचा बायकोशोध लेखाला जीएसटी काऊन्सिल चे 'व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह आर्टिकल अबाऊट जी एस टी' वगैरे प्रतिसाद आले आहेत Happy रोबो ने लेखात काही कॉमर्स शब्द ओळखले असावे.>> Rofl

ब्लॉगवर लिहीलेल्या शिर्‍याचा बायकोशोध लेखाला जीएसटी काऊन्सिल चे 'व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह आर्टिकल अबाऊट जी एस टी' वगैरे प्रतिसाद आले आहेत Happy रोबो ने लेखात काही कॉमर्स शब्द ओळखले असावे >>> एखाद्या रेसिपी ब्लॉगरचा प्रतिसाद नाही का आला, अनु? Wink

Pages