करणी प्रकार खरेच असतो का????

Submitted by VB on 30 June, 2018 - 02:39

आज सकाळी माझ्यासोबत थोडा विचित्र प्रकार घडला. झाले असे की आज शनिवार असल्यामुळे थोडी ऊशिरा निघाली ऑफिसला. रोजची ट्रेन नसल्यामुळे एकटीच होते. बोलायला कोणी नव्हते सोबत त्यामुळे आपोआप तंद्री लागली , स्वत:च्याच विचारात गुंतली होती. मधे अचानक एका बाईचा आवाज कानावर पडला. म्हणे " बेबी, राग येणार नसेल तर काही बोलु का?" , अचानक तंद्री तुटल्यामुळे आधी काही कळलेच नाही, मग भानावर आल्यावर म्हटल , "बोला काय बोलायचे आहे". त्यावर खुप विचीत्र प्रकारे माझे निरीक्षण करत त्या बोल्ल्या की " मला त्यातले कळते, आणी तुला पाहुन हे जाणवितेय की तुझ्यावर कुणीतरी करणी केलीये. " मला एक क्षण कळलेच नाही की ती काय बोलतीये. नुसती बघत बसली मी तीला, ते पाहुन माझ्या बाजुला बसलेल्या एक काकु त्यांना ओरडल्या, की काहिही का बरळताय, का घाबरवताय या मुलीला. त्यावर त्या बाईने स्पष्टीकरण दिले की " हिला खुप धोका आहे असे दिसले, अगदीच रहावले नाही म्हणुन बोलली आणी मी नक्की सांगु शकते की ही खुप त्रासात आहे वगैरे" ईतक्यात अजुन दोघी-तीघी त्यांना ओरडल्या म्हणुन त्या तिथुन निघुन गेल्या. ईतक्यात माझे स्टेशन आले म्हणुन मी उतरली.
तरी खुप सारे प्रश्न मनात आलेच, म्हणजे जरी माझा देव , करणी , भुते यासर्वावर विश्वास नसला तरी खरेच माझ्या मनात काही प्रश्न आले, जसे
ईतक्या जणी मधुन ती मलाच असे का बोलली?
खरेच करणी वगैरे असते का?
तिचे मी त्रासात वगैरे असणे अगदीच काही चुकीचे नव्हते, पण कदाचित ते माझ्या चेहर्यावरुन किंवा माझी जि तंद्री लागली ते पाहुन ती असे बोलली असेल?
अन हे असे मला सांगुन तिला नक्की काय मिळाले? म्हणजे यापुर्वी मी तिला कधी पाहिल्याचे आठवत नाही, किंवा आताही तीने काही पैसे वगैरे मागीतले नाही.

या प्रकाराबद्द्ल ईथे कुणाला काही शेअर करायचे असेल नक्कीच लिहा.

**** वेमा, जर हा धागा नियमात बसत नसेल तर ऊडवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही तंद्री लावून बसला होतात, तुमच्या भाव मुद्रेवरून तुम्हाला काही त्रास आहे असे त्यांना वाटले असेल,
इझी टार्गेट म्हणून त्यांनी बाकीच्या लोकांतून त्या तुम्हाला अप्रोच झाल्या असतील.

करणी मानो या ना मानो या प्रकारात मोडते. ज्याने अनुभव घेतला त्याचा विश्वास असतो आणि ज्यांना अनुभव नाही आला त्यांच्यासाठी अंधश्रद्धा.
ही एक प्राचीन विद्या आहे. अजूनही महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमाभागात या विद्येचे उपासक असतात.
बाकी तुम्हाला आलेल्या अनुभवा बाबत सिम्बांशी सहमत

ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी(च) असतो हा प्रकार, ज्यांचा नाही त्यांच्यासाठी नाही.

सिम्बा +1
लोकल मध्ये फोन मध्ये डोकं खुपसून न बसल्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्ही तुमचा विचार करताय ते ही उत्तम आहे. उगा नका विश्वास ठेवू अशा गोष्टींवर.

सिम्बा +१. असं काहीही नसतं. तुम्ही तुमच्या विचारात गुंतला असाल इतकंच. त्या बाईला तिच्या विचारांनुसार काहीही वाटेल. तुम्ही अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. उगाच अस्तित्वात नसलेल्या गोष्टींबद्दल विचार करून तुमची मनःशांती भंग होईल.

करणी कमकुवत मनोबलावर होते. खंबीर कणखर मनोबल असल्यावर करण्या बरण्या चालत नाहीत! तेंव्हा काही विचार करू नका!

ते ऑस्ट्रेलियन क्रिकेटर नाही का फलंदाजा भोवती उभे राहून सतत त्याला काहीबाही बोलून डिवचत असतात हा देखिल करणीचा प्रकार. कमकुवत फलंदाज बाद होतो. खंबीर फलंदाज टिकून राहतो आणि अगदीच सचिन, कोहली, सेहवाग ह्यांच्या इतका खंबीर असेल तर ४-६ तडकावून उत्तर देतो मग करणी उलटली असेही होते!

त्यामुळे खंबीर रहा करणी बरणी काही नसते!

धारपांची आचार्य किंवा समर्थ ही पात्रे जशी आहेत तसेच एक खरेखुरे प्राध्यापक आहेत. ते संशोधक देखील आहेत. ते अशा गोष्टींमागच्या विज्ञानाचा शोध घेतात आणि उपाययोजना करतात. प्रा. गळतगे असे काहीतरी नाव आहे त्यांचे . त्यांचे एक पुस्तक आहे. आमच्याकडे येणा-या एक बाई आणायच्या. मी पाहीले नाही नाहीतर नाव दिले असते. त्यांच्या म्हणण्यानुसार अशा घटनांमागेही विज्ञान असते. पण जर मान्यच केले नाही तर ते शोधणार कसे ?

व्यावसायिकांमधे करणी वगैरे गोष्टींवर मोठा विश्वास असतो. कारण अनिश्चितता. सम व्यावसायिकांत तर मंतरलेले लिंबू , उतारा असे प्रकार खूप चालतात. रस्त्याच्या पलिकडेच एक व्यावसायिक आहेत. त्यांची सतत नजर असते आमच्यावर. मध्यंतरी त्यांच्या गावावरून एक वयस्कर बाई आल्या होत्या. त्या रोजच लिंबू किंवा असले काही बाही आमच्या दिशेने काहीतरी पुटपुटत फेकत असत. त्या दरम्यानच माझ्या हाताचे दुखणे उद्भवले. पण कधी संबंध नाही जोडला. तसे डोक्यात नाही आले. विश्वास नाही हे एक कारण आहेच. पण व्यवसाय म्हटलं की सगळा विचार करावा लागतो. त्या गळतगें कडे जाऊन विचारायला हरकत नाही असा एक विचार हा धागा वाचताना मनात चमकून गेला.

शुध्द भामटेगिरी असते अजिबात विश्वास ठेवू नका अशा गोष्टींवर. आणि विज्ञानाच्या नावाखाली त्यांचे समर्थन करणाऱ्यांवर सुद्धा. अशा व्यक्तीपासून दूरच राहा.

मला पण एक भेटला होता काही वर्षापूर्वी. बरीच बडबड केली. विश्वास बसावा म्हणून काहीतरी थातुरमातुर जादू पण करून दाखवली. शेवटी म्हणाला,

"तुम्हाला त्रास आहे एका व्यक्तीपासून. ती तुमची जवळचीच आहे. नावाचे पहिले अक्षर सांगेन. पण त्याआधी तुम्ही एक मंत्र म्हणा माझ्याबरोबर"

असे म्हणून देवाच्या फोटोवर हात लावून मला म्हणायला सागितले. फालतुगिरी सुरु आहे मला माहित होते. तरीही मी म्हटले बघू कुठवर जाते ह्याची गाडी. मी पाठोपाठ मंत्र म्हणू लागलो. त्यात मध्येच एक वाक्य होते "मी देवाला इच्छेने पंधरा हजार रुपये देईन" आणि सगळे झाल्यावर म्हणाला,

"त्या व्यक्तीचे नाव सांगतो. पण आधी तुमच्या तोंडून देवाच्या नावाने जे गेलंय पंधरा हजार आकडा तेवढे रुपये आणून द्या. मी इथेच उभारतो"

मी ठीक आहे म्हणालो. मनातल्या मनात हाड म्हणालो. पुन्हा गेलोच नाही.

माझ्या ठिकाणी कोणीही दुबळ्या मनाची व्यक्ती असती तर पैसे घेऊन परत गेली असती. अशा रीतीने लाखो रुपयांना गंडा घालतात हे लोक.

कोणी करणीवर विश्वास ठेवा तर एकवेळ ठीक, पण त्या मागे विज्ञान आहे सांगत कोणी आले तर आधी चार हात दूर व्हा. हे छद्मविज्ञान महाडेंजर.

त्या तिकडे एक मनोरुग्णांचा एक बीबी आहे तिकडे विचारा . ते सगळे कसे खरे आहेते तर सांगतीलच आणि वर पाच पन्नास कथा ठोकूनही देतील.
बादवे वे मधुरांबे आडी उड(व)ला काय? तसाच नवा आलाय म्हणून इच्यारलं ...

छद्मविज्ञान महाडेंजर >> कशावरून ? तुम्ही पाहीलेय का त्या गळतगेंना ? किंवा पुस्तक वाचलेले आहे का ? अनुभव वगैरे ? यापैकी काहीही नसेल तर त्यांना चुकीचे ठरवणे हा वैज्ज्ञानिक दृष्टीकोण आहे का ? चुभूदेघे.

जाऊ द्या, जास्त विचार नका करू. त्या बाईने ग्रहण मालिकेचे सगळे भाग सुट्टीच्या दिवशी लागोपाठ पाहण्याचा प्रयत्न केला असेल.

काही नसत हो अस. ते लोक मोघम बोलतात.
मी दहावीत होते तेव्हाची गोष्ट आठवते. पूर्वीच्या काळी पिंगळे असत तशा वेशा मध्ये एक मनुष्य गावात फिरत होता. लोकाना अशा बाबतीत मार्गदर्शन करत. आमच्या घरीही आला. आइने पाणी दिले आणि तो सुरु झाला " तुमची भावकी तुमच्या वाईट वर आहे, त्यांना बघवत नाही तुमचा चांगला चललेल; तुम्ही कितीही कष्ट करा पैसा टिकत नाहीये, त्यांनी करणी केलिये, माझ्याकडे आहेत उपाय, 500rs द्यावे लागतील"
आता हे एकदमच common आहे ना बोलणे, त्याला काशाला विध्या लगतेय. सगळ्यांचा असाच प्रोब्लेम असतो. सगळ्यांना हे बोलणे लागू होते.

>>ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी(च) असतो हा प्रकार, ज्यांचा नाही त्यांच्यासाठी नाही.<<

या एका वाक्यातच उत्तर आहे. विश्वास ठेवलात तरच करणीचा इफेक्ट्/इंपॅक्ट होतो, नाहि ठेवलात तर काहिहि होत नाहि. Wink आणि विश्वास ठेवणारे आयुष्यातल्या अनसर्ट्निटिज्/इन्सिक्युरिटिज ने पिचलेले असतात, भाबडेपणाने कोणत्याहि गोष्टिंच्या बादरायण संबंधावर पटकन विश्वास टाकुन असल्या प्रकारांवर बळी पडतात...

माझा 'दृष्ट लागणे' या प्रकारावर विश्वास आहे.पण तो वेगळ्या प्रकारे.
'दृष्ट' लागण्या आधी आपण प्रचंड आनंदात किंवा श्रीमंतीत असतो.यात आपण बेसावध असून स्वतः काही चुका,इतरांची हेटाळणी किंवा आगाऊपणा करत असू जो नंतर आपल्याला तोंडावर पाडायला आणि बाजूचे लोक विशेष मदत न करायला कारणीभूत ठरत असेल.म्हणून 'सारखं बोलू नका, चाम्गलं चाललंय म्हणू नका, दृष्ट लागेल' असं सांगून मोठी माणसं गर्वहरण करत असतील.
एकंदर पाहता लोकांत जास्त नोटीस न होणे,वेगळे न पडणे किंवा कोणाच्या द्वेषाचे/हेव्याचे मुद्दाम कारण न बनणे हे समाजात महत्वाचे असावे.
(अजूनही काही एरियात गाडी ला गाडी घासणे प्रकारचा अपघात झाल्यास तुमची गाडी नविकोरी/थोडी भारी असेल,कपडे भारी(नेहमीचे ब्रँडेड नाही, त्याहीपेक्षा भारी.प्रोवोग टॅगहॉयर घड्याळ वगैरे वगैरे) असतील तर भांडणात स्थानिकांकडून तुम्हाला जास्त त्रास होतो.प्रयत्न/प्रयोग करून पाहा ☺️☺️☺️)

आता हे एकदमच common आहे ना बोलणे, त्याला काशाला विध्या लगतेय. सगळ्यांचा असाच प्रोब्लेम असतो. सगळ्यांना हे बोलणे लागू होते.>>+१
कोणताही विचार मनात आणू नका.

बाकी करणी वगैरे सांगणे यावर:
हा एक प्रकारचा बिझनेस आहे.आज त्या बाईने पैसे नाही मागितले तरी ज्या एखाद्याला तिचे म्हणणे पटेल तो ओळख दाखवत राहील.आयुष्यातल्या घटना शेअर करत राहील.
मग एखाद्या वेळी 'अमक्याला असा फायदा झाला' म्हणून हळूहळू काही उपाय/काही लोकांची नावे भेटायला सुचवली जातील.कधीकधी यात पैसा/कमिशन हा हेतूही नसतो.एखाद्या व्यक्तीचा नीट ब्रेन वॉश झाला असेल तर ती व्यक्ती आपला मुद्दा पटवण्यासाठी कितीही वेळ/पेशन्स इन्व्हेस्ट करू शकते.
अडचणीत असताना, कोणताही मार्ग दिसत नसताना माणूस काडीचा आधार शोधत असतो.या काळात त्याला मनाची उभारी देणारी अगदी छोटी घटना पण चालते.(देवळात पुजाऱ्याने प्रसादाचा हार दिला/देवाने कौल दिला/एखादा अगदी लहान रकमेचा बोनस मिळाल्याचा मेसेज).
अत्यंत वाईट काळ चालू असताना भुसभुशीत झालेल्या मनाला श्रद्धा ठेवायला एक स्थान हवे असते.कोणासाठी हे स्थान एखादी नामस्मरणाची बँक, कोणासाठी एखाद्या पवित्र घाटावर पहाटेची पादपूजा आणि महापूजा, कोणासाठी 3 दिवसाचे आर्ट ऑफ लिव्हिंग किंवा लँडमार्क फोरम चे शिबीर.

दहापैकी ८ व्यक्ती त्रासातुन जात असतात, पैकी अनेकान्ना ते खुप त्रासातुन जात आहे असे वाटते.... खडा टाकायचा... कमकुवत मनाचे मासे गळाला लागतात.

गळतगे अन वैज्ञानिक दृष्टीकोण हे दोन शब्द एकाच वाक्यात लिहिणार्‍या मतिमंद प्रोफाईलला बाबाजींनी अत्यंत योग्य शब्दात सुनवले आहे.
*
इनामदार यांचा प्रतिसाद परफेक्ट आहे.

आर्थिक दृष्टीने अत्यन्त दुर्बल अशा घटकान्वर करणीचा इफेक्ट शुन्य असतो.
<<
उदय,
इथे जास्त इफेक्ट असतो, अज्ञान, अंधविश्वास या बाबी इथेच जास्त असतात. अन गैरफायदा घेणारे लोक फक्त पैसाच नव्हे, इतर प्रकारेही शोषण करीत असतात. लैंगिक शोषण हा तर या सर्व बाबा-बुवा-भगतांचा महत्वाचा कार्यभाग असतो.
याच सोबत, बळी दे. मग तो बळी कोंबड्या बकर्‍यापासून थेट नरबळी पर्यंत जाउन पोहोचतो.
अमक्या बाईला डाकीण ठरवून दगडांनी चेचून मारणे काय अन स्टेकला बांधून विचेस जाळणे काय..

बेसिकली,
>>
ईतक्या जणी मधुन ती मलाच असे का बोलली?
खरेच करणी वगैरे असते का?
तिचे मी त्रासात वगैरे असणे अगदीच काही चुकीचे नव्हते, पण कदाचित ते माझ्या चेहर्यावरुन किंवा माझी जि तंद्री लागली ते पाहुन ती असे बोलली असेल?
अन हे असे मला सांगुन तिला नक्की काय मिळाले? म्हणजे यापुर्वी मी तिला कधी पाहिल्याचे आठवत नाही, किंवा आताही तीने काही पैसे वगैरे मागीतले नाही.
<<
या प्रकारचे जर्म्स मनात पेरणे हाच एक्झॅक्टली या प्रकाराचा मूळ भाग आहे.

नुकताच एक बाप्पाचे अनुभव नावाचा महान धागा वाचनात आला.

थक्क झालो, इतकेच म्हणतो.

आरारा,
आपल्या मनाचं हे वर्षानुवर्षाचं कंडिशनिंग आहे.इतक्या लवकर बदलत नाही.
घरातून निघताना सासऱयांच्या हार घातल्या फोटोला नमस्कार केला नाही त्याचा आणि अमेरिकेचा व्हिसा रिजेक्ट झाल्याचा संबंध आज 8 वर्षांनंतरही आमचं मन लावतं.
अजूनही आयुष्यात खूप वाईट घटना घडत असतात तेव्हा हिंजवडी च्या तुळजाभवानी देवळात चालत जाऊन 'आई, लॉट इज ऍट स्टेक, योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायची सद्बुद्धी दे' म्हणून नमस्कार केला जातोच.(इंग्लिश फार ग्रेट नसूनही देवाला कळवळून प्रार्थना करताना इंग्लिश मध्ये केली जाते हा यातला विनोदी भाग ☺️☺️☺️)

आरारा, सहमत.
अगदी टोकाच्या, आणीबाणीच्या प्रसंगांमध्ये सुद्धा कधीही देवापुढे किंवा कुठेच हात जोडावासा वाटलेला नाही, आपण अमुक अमुक करायचं राहिलं म्हणून तमुक झालं नाही असेही कधी वाटलेले नाही.
इतक्या वर्षांनंतर सर्व अंधश्रद्धा फक्त फूटबॉल च्या सामन्यात आवडते संघ खेळत असताना कोण कुठे बसणार, कोण जागेवरून उठणार नाही या गोष्टींभोवती दीड दोन तास गुंतलेल्या असतात असे लक्षात आलेले आहे. Proud

- ऋन्मेष -

काय धमाल चालूय धाग्यावर...

मला सांगा ईथे करणी वगैरे झूठ असते असे बोलणारे किती लोकं देवाला मानतात? किती लोकं मंदिरात जातात? किती लोकांच्या घरात देव्हारा आहे? किती लोकं देवाच्या नावाने वार पाळतात??

त्यानंतर मला सांगा यातील किती लोकांना देव प्रत्यक्षात दिसला आहे?

धागाकर्तीला आलेला अनुभव बंडलबाजी असण्याची शक्यता जास्त आहे. कारण असे बनाव करणारे खूप असतात.

पण करणी खरी नसते असे ठामपणे बोलू नका.

कोणी कोकणात राहणारा आहे का या धाग्यावर? जमल्यास आणि करणी प्रकाराबद्दल माहिती असल्यास प्रकाश टाका. मला जास्त माहिती नाही जे अधिकारवाणीने काही बोलेन,, पण माझा ठाम नसला तरी विश्वास आहे..

आणि हो, मी नास्तिक आहे, माझा देवावर विश्वास नाही .. माझ्यामते ईथे कोणीही देव नावाची अज्ञात शक्ती उगाच कोणाचे भले करायला बसली नाही. जर देव म्हणून कोणी असेल तर तो एक चांगला आत्मा असू शकतो, जसे भूत म्हणजे वाईट आत्मा..

भूताला लॉजिक आहे, भूत म्हणजे आत्मा, किंवा त्याहीपलीकडचे काही न गवसलेले.. प्यारानॉर्मल वगैरे बोलतात तसले..
पण देवाला असले काही लॉजिक नाही. दुबळ्या मनाला आधार द्यायला बनवलेली एक संकल्पना म्हणजे देव.
पण जर कोणी देवावर विश्वास ठेवत असेल आणि भूतांवर किंवा करणीवर विश्वास ठेवत नसेल तर खरेच गंमत आहे

आणो हो, देवाच्या नावाने लुबाडणारेही असतात.
फरक ईतकाच, करणीच्या नावे लुबाडणारे भिती दाखवून लुबाडतात तर देवाच्या नावे लुबाडणारे गाजर दाखवून..

देवावर अविश्वास दाखवाल तर जग नास्तिक म्हणून हेटाळनी करते, आणि करणीवर अविश्वास दाखवलात तर तुम्ही विज्ञानवादी म्हणून गौरवले जातात Happy

आ रा रा - सहमत, दुरुस्त केले.

< अगदी टोकाच्या, आणीबाणीच्या प्रसंगांमध्ये सुद्धा कधीही देवापुढे किंवा कुठेच हात जोडावासा वाटलेला नाही, आपण अमुक अमुक करायचं राहिलं म्हणून तमुक झालं नाही असेही कधी वाटलेले नाही. >>
------ योग्य आहे... नसलेल्या देवाला हात जोडला तरी काहीच उपयोग नसतो.
त्यापेक्षा व्यक्तीमधल्या माणुसकीला हात जोडले तर क्वचित मदत मिळण्याची शक्यता असते, ते करावे

आरारा आणि अमितव वेलकम
जर तुम्ही करणी न मानणारे पण देव मानणारे या कॉम्बिनेशनचे असाल तर आपण माझी पोस्ट न वाचणेच उत्तम Happy

Pages