अवनी--माझी पहिली कविता :)

Submitted by ..सिद्धी.. on 28 June, 2018 - 11:46

सुगंध पसरला मातीचा
सोहळा भरला रंगांचा
मेघांनी केली गर्दी
भास्कराने निरोप घेतला

रिमझीम बरसू लागली
थेंबांची रेशीमधारा
टपोऱ्या थेंबानी केली
प्रसन्न सृष्टीची काया

अवनी मोहरली
गारवा पसरला
गात्र गात्र शांत झाली
आनंदी आनंद पसरला

निरोपाची वेळ झाली
विरहाने मेघ आक्रंदले
आदित्याचे आगमन होऊन
सप्तरंगी इंद्रधनु अवतरले

----- आदिसिद्धी
      (लोकहो आयुष्यात पहिल्यांदा कविता लिहीलिये... आवडली नाही आणिअंडी फेकून मारणार असाल तर सांगा... पिशवीत गोळा करून ठेवेन Proud )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिद्धे खूप भारीय कविता !!!!! Happy पहिलीय विश्वास नाही बसणार एवढी मस्तंय! Happy भरपूर आवडली. पुढील कवितेच्या प्रतिक्षेत! Happy

धन्यवाद अविकाताई.. मला सुधारणा करता येईल.... काय चुकतय किंवा कमीये ते सांगा हं....मला पुढच्या वेळी उपयोगाला येईल.... Happy

अरे खरंच की... समानार्थी शब्द शोधताना आपोआप आले ते...

बरं तुम्हाला आणि जुईला पुढच्या कवितेत ब्रेक देते...रुसू नका ना पाफाकाका
:लाडीगोडी लावणारा बाहुला:

मेघा, भास्कर आनंद अदित्य सगळ्यांची नावे घेतलीस माझे नाव का नाही?
:रूसलेला बाहूला: >>> +111 खरंय सिद्धे माझंपण नाव नै घेतलंस कट्टी घेईन हं! Proud

मेघा, भास्कर आनंद अदित्य सगळ्यांची नावे घेतलीस माझे नाव का नाही?
:रूसलेला बाहूला:>>> पाफा तुम्ही कुठं कविता बेस्ट आहे किंवा रोस्ट आहे म्हणालात Lol

जगात लोकं मामा बनायला घाबरतात,
नवीन Submitted by द्वादशांगुला on 28 June, 2018 - 22:27
>>>
खरयं
रस्त्यात जुनी गफ्रे पोरांसोबत भेटली की कळते.

शाली काका धन्यवाद...माझं वोटींग मशीन फक्त काका ऐकल्यावरच मत नोंदवत.. Proud ... Happy

जुया मेरेपे चिडना मत बहेन... तेरेको स्पेशल ब्रेक देते ... Proud

Pages