अवनी--माझी पहिली कविता :)

Submitted by ..सिद्धी.. on 28 June, 2018 - 11:46

सुगंध पसरला मातीचा
सोहळा भरला रंगांचा
मेघांनी केली गर्दी
भास्कराने निरोप घेतला

रिमझीम बरसू लागली
थेंबांची रेशीमधारा
टपोऱ्या थेंबानी केली
प्रसन्न सृष्टीची काया

अवनी मोहरली
गारवा पसरला
गात्र गात्र शांत झाली
आनंदी आनंद पसरला

निरोपाची वेळ झाली
विरहाने मेघ आक्रंदले
आदित्याचे आगमन होऊन
सप्तरंगी इंद्रधनु अवतरले

----- आदिसिद्धी
      (लोकहो आयुष्यात पहिल्यांदा कविता लिहीलिये... आवडली नाही आणिअंडी फेकून मारणार असाल तर सांगा... पिशवीत गोळा करून ठेवेन Proud )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद गोल्डफीशजी...
अवनी म्हणजे पृथ्वी.... पृथ्वीला असलेल्या अनेक समानार्थी शब्दांपैकी एक आहे... Happy

Pages