अवनी ; आदीसिद्धी

अवनी--माझी पहिली कविता :)

Submitted by आदीसिद्धी on 28 June, 2018 - 11:46

सुगंध पसरला मातीचा
सोहळा भरला रंगांचा
मेघांनी केली गर्दी
भास्कराने निरोप घेतला

रिमझीम बरसू लागली
थेंबांची रेशीमधारा
टपोऱ्या थेंबानी केली
प्रसन्न सृष्टीची काया

अवनी मोहरली
गारवा पसरला
गात्र गात्र शांत झाली
आनंदी आनंद पसरला

निरोपाची वेळ झाली
विरहाने मेघ आक्रंदले
आदित्याचे आगमन होऊन
सप्तरंगी इंद्रधनु अवतरले

विषय: 
Subscribe to RSS - अवनी ; आदीसिद्धी