प्रश्न - शतशब्दकथा

Submitted by भास्कराचार्य on 17 June, 2018 - 10:08

गेले काही दिवस तो ह्या प्रश्नाने कासावीस झाला होता. त्याला दुसरं काही म्हणजे काही सुचत नव्हतं. परिस्थितीने गांजलेले असे अनेक क्षण त्याच्यापुढे पूर्वी येऊन गेले होते, पण ह्या क्षणाने त्याला पुरतं हताश केलं होतं. कसा मार्ग काढावा, कोणाला विचारावं, ह्या गर्तेत तो पूर्ण बुडून गेला होता. मायेचा एखादा हात पाठीवरून फिरावा, आणि ह्या विवंचनेतून त्याने आपली सुटका करावी, असं त्याला मनोमनी वाटत होतं. पण असं कोणीच त्याच्या ओळखीचं नव्हतं. शेवटी धीर करून त्याने अवघ्या जगालाच ओरडून विचारायचं ठरवलं. 'कोणी उत्तर देता का रे उत्तर' असा आक्रोश करणारा हा प्रश्नसम्राट शेवटी विचारता झाला -

"हे शतशब्दकथेचं फॅड माबोवर इतकं कसं आलं???"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भा Rofl

Lol
हो. मी सुद्धा मध्यण्तरी गायब होतो तर मलाही वाटले काही नवीन स्पर्धा उपक्रम वगैरे सुरू झालाय की काय Happy

येनीवेज विचार करतच होतो की एक नवीन धागा काढावा.

तुम्ही शशक कश्या वाचता?

1) थेट शेवटची ओळ वाचता
2) एकेक शब्द गाळून 50 शब्दच वाचता
3) आधी प्रतिसाद वाचता
4) वाचता वाचता शब्द मोजत वाचता..
5) चुकून एखद्या कथेत 101 वा जास्त शब्द झाले असतील तर शंभराव्या शब्दाला वाचन थांबवून तत्वाला जागता.
6) चुकून एखद्या कथेत 99 वा कमी शब्द झाले असतील तर भाजीवाल्याने वजनात मारल्यासारखा चेहरा करता.
7) वगैरे वगैरे ....

मागे मी शतशब्दकथांवर चर्चा करायला धागा काढलेला.. मिळाला तर शेअर करतो लिंक

भा Lol

हे बाफ बघितलेले आहेत, फारसे वाचलेले नाहीत. मलाही हेच विचारायचे होते की हे नव्याने एकदम सगळे शशक का लिहीत आहेत? आणि शंभर शब्दांचे काय लॉजिक आहे?

बाय द वे हे खरेच १०० शब्द आहेत का? मला वाटले जर शंभर झाले नाहीत तर भांना फिलर वाक्ये टाकावी लागतील. म्हणजे साधारण असे:

"हे शतशब्दकथेचं फॅड माबोवर इतकं कसं आलं???" (समजा इथपर्यंत ९६च झाले, तर)
...
"...कसं आलं?"
"...कसं आलं?"

<<<खरं तर शेवटचं वाक्य सोडून बाकी सगळी वाक्यं फिलरच नाहीत का?>>>
शशक काय, गझल काय, राजकारणावरील चर्चा काय, मला तर आजकाल मायबोलीवरचं सगळंच फिलर वाटते. त्यांनी फिल करायचे नि मी टापा करायचा.
<<तुम्ही शशक कश्या वाचता?>>
शक्य तितक्या भर्रकन वाचतो नि लग्गेच भर्रकन विसरतो, तोपर्यंत आणखी एखादी शशक येतेच.
शशक म्हणजे ससाच, खरे तर ससीण! म्हणूनच एकामागून एक भराभरा एव्हढ्या येतात मायबोलीवर.

<<<खरं तर शेवटचं वाक्य सोडून बाकी सगळी वाक्यं फिलरच नाहीत का?>>>
शशक काय, गझल काय, राजकारणावरील चर्चा काय, मला तर आजकाल मायबोलीवरचं सगळंच फिलर वाटते. त्यांनी फिल करायचे नि मी टापा करायचा.
<<तुम्ही शशक कश्या वाचता?>>
शक्य तितक्या भर्रकन वाचतो नि लग्गेच भर्रकन विसरतो, तोपर्यंत आणखी एखादी शशक येतेच.
शशक म्हणजे ससाच, खरे तर ससीण! म्हणूनच एकामागून एक भराभरा एव्हढ्या येतात मायबोलीवर.

Lol
पण मजा येते वाचायला.
माझी एक सिरीज होती “मालक” ती टाकायच्या विचारात होतो तेवढ्यात ‘शशक’ सुरू झाले. ही लाट ओसरली की टाकेन.

भा आद्य बार चालक आहे >>
'शशक = ससा' हा बार कथेत गाडण्यावाचून स्वतःला फार कष्टाने परावृत्त केलं >>> Lol

भा हा आद्य बार चालक (गाडक) आहे का या प्रश्नावर "कोई शशक?" असेही उत्तर देता येइल.

इथे मीही बार गाडलेला पाहून भा शोले मधल्या धरम सारखे "काफी होशियार लडका है, जल्दी सीख जायेगा" म्हणत आहेत असे डोळ्यासमोर आले.

Pages