पाऊस त्याचा पाऊस तिचा...

Submitted by Nikhil. on 12 June, 2018 - 12:20

त्याची पावसाला आर्जवे
नकोच पडु आता .
तिचीही पावसाला विनंती
चिंबच भिजव आता ...

त्याचा पाऊस म्हणजे
चिखलाने वैतागलेला
तिचा पाऊस म्हणजे
मृदगंधाने शहारलेला...

पाऊस त्याचा पाऊस तिचा
दरवेळी दोघांचा ठरलेला वाद
सैरावैरा पावसासारखे दोघेही
धुमसायचे मनातल्या मनात...

पाऊस थोडा ओसरला की
दोघेही शांत व्हायचे.
श्रावणसरींनी बरसल्यावर जसे
पुन्हा ऊन पडायचे...

पाऊस तुझा पाऊस माझा
वाद शेवटी मिटायचा
मिठीत सामावताच दोघे
पाऊस पुन्हा बरसायचा...

- १२-०६-२०१८ निखिल..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान !

@VB, सिद्धी,शालीसर,दत्तात्रयजी,जुई
आपल्या सर्वांचे मनापासुन धन्यवाद Happy